Sunday, 19 June 2016

नमस्कार लाईव्ह १९-०६-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- कैरो; अल-जझिरा वाहिनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मृत्यूदंड
२- आम्ही मराठवाड्यात पाऊस पाडू का? चीनची ऑफर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- राजन यांच्यानंतर कोण? 7 नावं चर्चेत 
४- आरबीआयची दुसरी टर्म स्वीकारणार नाही: रघुराम राजन 
५- बाबा रामदेव यांचा योग दिनी दुबईत योगा 
६- दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना मनोहर कदमचे प्रशिक्षण 
७- 'एनएसजी'संदर्भात परराष्ट्र सचिवांनी केला चीन दौरा 
८- एस्सार फोन टॅपिंग; आवश्यक कारवाईसाठी कागदपत्रं गृहमंत्रालयाकडे पाठवली. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- मुंबई; शेतकऱ्यांना महाबीजच्या वाढीव दराचा परतावा मिळणार 
१०- आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या खासगी सचिवांवर गंभीर आरोप 
११- पुणे; नववी आणि अकरावीसाठी बोर्ड परीक्षा नाही! 
१२- भाजपच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, काही नावांवर शिक्कामोर्तब 
१३- बरं झालं पंकजाच बोलल्या, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला 
१४- मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिल्या ५० व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा 
१५- शिवसेनेला हिंदी समजत नाही - श्रीहरी अणे 
१६- उद्योजकांप्रमाणे शेतकऱ्यांसाठी परिषदा घ्या-उद्धव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- पुण्यातील बिबवेवाडीत 12 ते 15 गाड्यांची तोडफोड, चौघेे ताब्यात 
१८- कल्याण; दुहेरी हत्याकांड, वृद्ध नणंद-भावजयेची निर्घृण हत्या
१९- नोएड सेक्टर आठमध्ये पॅकेजिंग फॅक्टरीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या आठ गाडया घटनास्थळी. 
२०- सोलापूर शहरासह परिसरात जोरदार पाऊस 
२१- नाशिक - निफाडमध्ये लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- वडील आणि मुलाचे नाते संबंध अलगडणारे गूगलने खास डूडल  
२२- हरारे; झिम्बाब्वेचा भारतावर 2 धावांनी विजय
२३- प्रो कबड्डी; चौथ्या मोसमाची सुरुवात मुंबईतून होणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२४- लोहा; कृषी सम्राट नावाचे बोगस खत विक्री करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात 
२५- मुदखेड; वीज पडून दोन बैलांचा मृत्यू 
२६- कंधार; शिवसेना महिला आघाडीतर्फे आज वृक्षवाटप व वृक्षारोपण 
२७- माहूर; लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

======================================

पुण्यातील बिबवेवाडीत 12 ते 15 गाड्यांची तोडफोड, चौघेे ताब्यात

पुण्यातील बिबवेवाडीत 12 ते 15 गाड्यांची तोडफोड, चौघेे ताब्यात
पुणे : पुण्यातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या जळीतकांडाच्या घटना ताज्या असतानाच गाड्या फोडण्याचं सत्रही सुरु आहे. पुण्याच्या बिबवेवाडीत 12 ते 15 गाड्या फोडल्याची घटना समोर आली आहे.

शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत काही जणांनी वाहनांची तोडफोड केल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.

पुण्यात वारंवार घडत असलेल्या जळीतकांड आणि तोडफोडीच्या घटनांमुळे वाहनचालकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान पोलिस अधिक तपास करत आहेत.
======================================

राजन यांच्यानंतर नोटांवर सह्या कोण करणार ? 7 नावं चर्चेत

राजन यांच्यानंतर नोटांवर सह्या कोण करणार ? 7 नावं चर्चेत
नवी दिल्लीः रघुराम राजन गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी सध्या सात नावं चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.


रघुराम राजन यांनी शनिवारी आरबीआय कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात आपल्याला पुन्हा गव्हर्नरपद स्वीकारण्यात रस नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते शैक्षणिक कार्याकडे वळणार आहेत.

यांची नावं आहेत चर्चेत
आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी सध्या विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिरी, उर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य, सुबीर गोकर्ण आणि अशोक चावला या सात नावांची चर्चा आहे.
======================================

प्रसिद्ध अल-जझिरा वाहिनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मृत्यूदंड

प्रसिद्ध अल-जझिरा वाहिनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मृत्यूदंड
कैरो : सुप्रसिद्ध वाहिनी अल-जझिराच्या दोन कर्मचाऱ्यांसह सहा जणांना इजिप्तच्या कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत महत्त्वाची कागदपत्र कतार आणि दोहातील टीव्ही समुहाला दिल्याने देहदंड ठोठावण्यात आला.

मोहम्मद मोर्सी अध्यक्षपदी असताना ही घटना घडल्याची माहिती आहे. मोर्सी आणि त्यांच्या दोन साथीदारांना 25 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला होता. तर सरकारी कागदपत्रं लीक केल्याने मोर्सी आणि त्यांच्या सचिवाला अतिरिक्त 15 वर्षांची जेल झाली.

न्यूज प्रोड्युसर अला ओमर मोहम्मद आणि संपादक इब्राहिम मोहम्मद हिलाल यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. अल जझिराकडून न्यायालयाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधातील हा निर्दयी निकाल असल्याचं म्हटलं आहे. वाहिनीतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांवरील अन्याय मांडण्यात आला आहे.
======================================

शेतकऱ्यांना महाबीजच्या वाढीव दराचा परतावा मिळणार

शेतकऱ्यांना महाबीजच्या वाढीव दराचा परतावा मिळणार
मुंबईः महाबीजने केलेल्या बियाण्यांच्या दरवाढीचा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असं मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना यासाठी खरेदी केलेल्या बियाण्यांच्या पावत्या आवश्यक असणार आहेत.


शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी सहाय्यकाकडे बिलाची पावती सादर करावयाची आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना वाढीव बिलाचा परतावा मिळणार आहे. सर्व बियाणी जुन्या दरानेच मिळतील असं, सीएमओने सांगितलं आहे.
======================================

फादर्स डेसाठी गूगलचा 'बाप' डूडल

फादर्स डेसाठी गूगलचा 'बाप' डूडल

मुंबई : आज वर्ल्ड फादर्स डे आहे. यासाठी वडील आणि मुलाचे नाते संबंध अलगडणारे गूगलने खास डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये मुलगा आणि वडिलांच्या आकाराचे बुट दाखवण्यात आले आहेत.

आजच्या वर्ल्ड फादर्स डेनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. गूगलने यानिमित्त शुभेच्छा देणारे डूडल तयार केले आहे.
======================================

कल्याणमध्ये दुहेरी हत्याकांड, वृद्ध नणंद-भावजयेची निर्घृण हत्या

कल्याणमध्ये दुहेरी हत्याकांड, वृद्ध नणंद-भावजयेची निर्घृण हत्या
कल्याण : कल्याणचा खडेगोलवली परिसर वृद्ध महिलांच्या दुहेरी हत्याकांडानं हादरला आहे. दूधकर निवासात वास्तव्यास असणाऱ्या लीलाबाई दूधकर आणि कमलाबाई दूधकर या दोन वयोवृद्ध महिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

60 वर्षीय लीलाबाई आणि 70 वर्षीय कमलाबाई या नात्याने नणंद भावजय होत्या. संध्याकाळी त्यांना भेटायला आलेल्या नातेवाईकांना या दोघी मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांनी तात्काळ याबाबत कोळसेवाडी पोलीस स्थानकात माहिती दिली.

दरम्यान, घरातील सामान अस्ताव्यस्त असल्यानं ही हत्या चोरीच्या उद्देशानं झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे, मात्र या दुहेरी हत्येमागे दुसरा काही हेतू होता का, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
======================================

हरारेत भारत हरला, झिम्बाब्वेचा भारतावर 2 धावांनी विजय

हरारेत भारत हरला, झिम्बाब्वेचा भारतावर 2 धावांनी विजय
हरारे भारताला विजयासाठी तीन चेंडूंत सहा धावांची गरज असताना ऋषी धवननं दाखवलेल्या फाजील आत्मविश्वासाचा फटका टीम इंडियाला बसला. त्यामुळं हरारेच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियावर दुबळ्या झिम्बाब्वेकडून पराभवाची नामुष्की स्वीकारण्याची वेळ आली.


झिम्बाब्वेनं हा सामना दोन धावांनी जिंकून तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात झिम्बाब्वेनं भारताला विजयासाठी 171 धावांचं आव्हान दिलं होतं.


सलामीवीर लोकेश राहुल शून्यावरच माघारी परतल्यानं टीम इंडिया सुरूवातीलाच बॅकफूटवर गेली. पण मनीष पांडेनं केदार जाधवसह चौथ्या विकेटसाठी 37 धावांची आणि धोनीसह पाचव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला.
======================================

आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या खासगी सचिवांवर गंभीर आरोप

आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या खासगी सचिवांवर गंभीर आरोप
मुंबई राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांच्यावर दोन गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

लाच घेतल्याचा आरोप

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आरोग्यमंत्र्यांचे सचीव सुनील माळी लाखो रुपयांची लाच घेतात असा आरोप डॉ. राहुल घुले यांनी केला आहे. यांसंदर्भात राहुल घुलेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

अश्लील भाषेत संभाषण केल्याची तक्रार

तर सुनील माळी यांनी अश्लील भाषेत संभाषण केल्याची तक्रार जळगावातील एका महिला डॉक्टरनं केली आहे. तक्रारदार महिलेनं यासंदर्भात आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगाचं कथन केलं आहे.
======================================

घाबरु नका, नववी आणि अकरावीसाठी बोर्ड परीक्षा नाही!

घाबरु नका, नववी आणि अकरावीसाठी बोर्ड परीक्षा नाही!
पुणे नववी आणि अकरावीच्या परीक्षा बोर्डाकडून होणार नाहीत, असे स्पष्टीकरण राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. आता ज्या पद्धतीने नववी, अकरावीच्या परीक्षा होत आहेत, त्याच पद्धतीने यापुढेही होतील, असेही ते म्हणाले.

नववी, अकरावीच्या बोर्ड परीक्षा होणार असल्याची चर्चा होती, त्यानंतर तावडेंनी स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

राज्यात सध्या दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जात असताना, आता नववी आणि अकरावी या दोन वर्षांसाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांनुसार परीक्षा घेण्याचा विचार सरकार दरबारी केला जात आहे, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. बोर्डाच्या परीक्षेची तोंडओळख व्हावी, या हेतूने हा निर्णय घेतला जात असल्याचीही चर्चा सुरु आहे.

या केवळ चर्चा असतानाही शैक्षणिक वर्तुळातून मोठ्या प्रमाणात विरोध सुरु झाला. मात्र, या नववी आणि अकरावीसाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नसून, या परीक्षा आधी सुरु असलेल्या पद्धतीनेच होतील, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
======================================

प्रो कबड्डी लीग : चौथ्या मोसमाची सुरुवात मुंबईतून होणार

प्रो कबड्डी लीग : चौथ्या मोसमाची सुरुवात मुंबईतून होणार
प्रातिनिधिक फोटो
मुंबई मुंबईतील कबड्डी चाहत्यांसाठी खुशखबर आहे. प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या मोसमाची सुरुवात पुण्याऐवजी मुंबईमधून होणार असल्याचं आयोजकांनी जाहीर केलं आहे.

पुण्यातील बालेवाडीमधील शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये म्हणजे पुणेरी पलटनच्या होम ग्राऊंडवर 25 जूनला प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमाची सुरूवात होणार होती. पण त्याच दिवशी बालेवाडीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे 25 ते 28 जूनदरम्यान होणारे सामने पुण्याऐवजी आता मुंबईच्या वरळीतील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या इनडोर स्टेडियममध्ये खेळवले जातील.
======================================

भाजपच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, काही नावांवर शिक्कामोर्तब : सूत्र

भाजपच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, काही नावांवर शिक्कामोर्तब : सूत्र
पुणे राज्यीतल मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचालींना वेग आला असूननव्यानं संधी मिळणाऱ्या नावांवर भाजपनं शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते आहे. पुण्यात आज भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत नव्यानं संधी मिळणाऱ्या नावांवर चर्चा झाली.
======================================

आरबीआयची दुसरी टर्म स्वीकारणार नाही: रघुराम राजन

आरबीआयची दुसरी टर्म स्वीकारणार नाही: रघुराम राजन
नवी दिल्ली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) गव्हर्नरपदाची दुसरी टर्म सरकारने देऊ केली, तरी स्वीकारणार नाही, असे आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले आहे.

येत्या 4 सप्टेंबर 2016 रोजी राजन यांचा कार्यकाळ संपत आहे. रघुराम राजन यांच्या या निर्णयाला भाजप नेत्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे.
======================================

बाबा रामदेव यांचा योग दिनी दुबईत योगा

बाबा रामदेव यांचा योग दिनी दुबईत योगा
नवी दिल्ली : जागतिक योग दिनाची भारतासह जगभरात जोरदार तयारी सुरु झाली आहे. या दिवशी दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये रामदेव बाबा योगा करणार आहेत.
येत्या 21 जूनला संपूर्ण जगभरात योग दिन साजरा केला जाणार आहे. त्यासाठी काल रामदेव बाबांनी दुबईतल्या नागरिकांना योगा शिकवला.

दरम्यान, योग दिनीच्या पार्श्वभूमीवर योगगुरु रामदेव बाबा आज राजपधावर 35 हजार नागरिकांकडून योगाचा सराव करून घेणार आहेत. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलीही या सराव कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.
======================================

बरं झालं पंकजाच बोलल्या, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

बरं झालं पंकजाच बोलल्या, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
उस्मानाबाद : गृहविभागाच्या कारभाराबाबत आम्ही बोललो असतो, तर गहजब झाला असता, बरं झालं पंकजा बोलल्या, असा टोला शिवसेनेच्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

बीड जिल्हा बँकेत घोटाळा करणाऱ्या बड्या धेंडांना का अटक होत नाही, असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काल गृहखातं सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना केला होता. पंकजांच्या या प्रश्नाला आमचा जाहीर पाठिंबा असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही करून दाखवलं

या कार्यक्रमात त्यांनी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचाही समाचार घेतला. आम्ही थापा मारत नाही, तर करून दाखवतो,शिवजलक्रांती हे त्याचंच उदाहरण आहे असे ते यावेळी म्हणाले.
======================================

आम्ही मराठवाड्यात पाऊस पाडू का? चीनची ऑफर

आम्ही मराठवाड्यात पाऊस पाडू का? चीनची ऑफर
बिजींग : दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात तंत्रज्ञानाद्वारे पाऊस पाडण्यासाठी चीनने मदतीचा हात देऊ केला आहे. कृत्रिम पावसाचं तंत्रज्ञान ‘क्लाऊड सीडिंग’ उपलब्ध करुन देणं, तसंच हवामान विभागातील कर्मचाऱ्यांना त्याबाबतचं प्रशिक्षण देण्याची ऑफर चीनने महाराष्ट्र सरकारला दिली आहे.

जर महाराष्ट्राने होकार दिला, तर 2017 मध्ये मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो.

नुकतंच चीनमधील अधिकारी आणि वैज्ञानिकांच्या एका पथकाने महाराष्ट्र दौरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अधिकाऱ्यांमध्ये कृत्रिम पावसाबाबत चर्चा झाली.

दुष्काळी महाराष्ट्रासाठी चीन काय मदत करु शकतो, असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या चीनच्या अधिकाऱ्यांना विचारला होता.
======================================

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिल्या ५० व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. १९ - शिवसेना आणि भाजपच्या नात्यामध्ये आता मोठया प्रमाणावर कडवटपणा निर्माण झाला असला तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या दिवशी हा कडवटपणा विसरुन शिवसेनेला ५० व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
    शिवसेना स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे आणि सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा! असे टि्वट फडणवीस यांनी केले आहे. शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले मार्गदर्शन हे नेहमीच मोलाचे ठरले आहे. त्यांची आठवण आज प्रकर्षाने होते असल्याचे मुख्यमंत्र्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. 
    शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असले तरी, आज दोन्ही पक्षामध्ये विळया-भोपळयाचे नाते आहे. परस्परांवर कुरघोडीची आणि टीका करण्याची एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नाहीत. सत्तेत भागीदीर असूनही शिवसेना सातत्याने 'सामना' या आपल्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करत आहे. 
======================================

शिवसेनेला हिंदी समजत नाही - श्रीहरी अणे


  • श्रीहरी अणे यांचा आरोप : शेतकऱ्यांना हवी मदत
    नागपूर : मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, अशी शिवसेना-मनसेची भूमिका आहे परंतु हिंदी भाषिकांची अनेक राज्ये आहेत. विदर्भातील भाषा मराठी-हिंदी आहे. शिवसेनेला हिंदी भाषा येत नसल्याने शिवसेना संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप विदर्भवादी नेते व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी शनिवारी केला. राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीतर्फे जय जलाराम मंगल कार्यालयात आोयोजित वेगळ्या विदर्भ राज्यासाठीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
    व्यासपीठावर व्हीकॅनचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, जनसुराज्यचे अध्यक्ष राजेश काकडे, विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. स्वप्नील संन्याल, प्रकाश निमजे, चंद्रभान रामटेके, महिला शहर अध्यक्ष ज्योती गांधी, शहराध्यक्ष हरेश निमजे, योगीराज वाहने आदी उपस्थित होते. शिवसेनेचा आज ५० वा वर्धापन दिन आहे. अणे यांनी केलेल्या या बोच-या टीकेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय उत्तर देतात याकडे आता लक्ष लागले आहे. 
    शिवसेना-मनसेची भूमिका मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे अशी आहे परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याला ६० वर्षापूर्वीच उत्तर दिले आहे. ही कल्पनाच चुकीची असून विदर्भातील लोकांना मराठीइतकीच हिंदी भाषा सोपी वाटते. शिवसेनेचे म्हणणे विचारात घेतले तर त्यांना इतिहास माहीत नसल्याचे दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य व त्यानंतर पेशव्याचे राज्य देशाच्या ६० टक्के भूभागावर होते. त्यामुळे मराठी माणसाचे एक राज्य ही कल्पनाच चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
======================================

दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना मनोहर कदमचे प्रशिक्षण


  • पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना माजी पोलीस अधिकारी मनोहर कदम याने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा धक्कादायक संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. कदम याने पोलीस उपनिरीक्षक असताना १९९७ मध्ये घाटकोपरच्या रमाबाई नगरात उसळलेल्या दंगलीवेळी जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात त्याला जन्मठेपही झाली होती.
    या प्रकरणातील संशयित सारंग अकोलकर याने केलेल्या एका ई-मेलमध्ये त्याच्या नावासह उल्लेख केला असल्याने त्यानेच या मारेकऱ्यांना प्रशिक्षण दिले होते, असा सीबीआयचा संशय आहे़
    सीबीआयने १ जून रोजी सारंग अकोलकर याच्या शनिवार पेठेतील घरावर छापा घातला होता़ त्या वेळी घेतलेल्या झडतीत सीबीआयच्या हाती दोन ई-मेलची कागदपत्रे मिळाली होती़ पहिल्या ई-मेलमध्ये १५ हजार सेना उभारणे तसेच जत, फोंडा येथे प्रशिक्षण शिबिर याविषयीची माहिती दिली होती़ दुसऱ्या ई-मेलमध्ये मनोहर कदम याचा उल्लेख आहे़ त्यात त्याच्या दोन मोबाइल क्रमांकाचाही उल्लेख आहे़ मात्र, ज्या ई-मेलमध्ये सारंग अकोलकर याने त्याचा उल्लेख केला आहे, तो ई-मेल कधी केला होता़ त्यात नेमका काय उल्लेख आहे, त्यानंतर आणखी काही ई-मेलमध्ये त्यांचा उल्लेख आहे का, हे अद्याप उघड झालेले नाही़ राज्य राखीव दलाचा (एसआरपीएफ) निवृत्त पोलीस उपनिरीक्षक कदम याला रमाबाई नगरातील गोळीबार प्रकरणी २००९ मध्ये सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. मात्र त्यानंतर मुंबई हायकोर्टाने ही शिक्षा स्थगित करून मे २००९ मध्ये त्याला जामीन मंजूर केला होता. हाच कदम आता दाभोलकर हत्येशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून पुन्हा चर्चेत आला आहे.
======================================
'एनएसजी'संदर्भात परराष्ट्र सचिवांनी केला चीन दौरा

नवी दिल्ली - आण्विक इंधन पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी या आठवड्यात चीनचा दौरा केल्याचे वृत्त आज (रविवार) सूत्रांनी दिले. भारताच्या सदस्यत्वासाठी चीनचे मन वळविण्यासाठी जयशंकर यांनी हा दौरा केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. एनएसजीमध्ये भारतास प्रवेश देण्यासंदर्भात चीनचा स्पष्ट विरोध आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी जयशंकर यांच्या या दौऱ्यासंदर्भात माहिती देताना जयशंकर यांच्या या दौऱ्यामध्ये एनएसजीसहच इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. एनएसजीची परिषद येत्या 23-24 जूनला दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊल येथे होत आहे. या परिषदेदरम्यान भारताच्या सदस्यत्वासंदर्भात चर्चा केली जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच वेळी पाकिस्तानच्या सदस्यत्वासंदर्भातही राजनैतिक चर्चा केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, जयशंकर यांचा हा दौरा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. 
======================================
उद्योजकांप्रमाणे शेतकऱ्यांसाठी परिषदा घ्या-उद्धव

परंडा - उद्योजकांसाठी जशा परिषदा घेता, तशा शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी घ्या, मराठवाड्याच्या विकासासाठी तज्ज्ञांची बैठक घ्या, असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.

बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजनेंतर्गत प्रा. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानने परंडा मतदारसंघातील अनेक गावांत नदी-नाला खोलीकरण व सरळीकरणाची कामे केली आहेत. पहिल्याच पावसाने उल्का नदीमध्ये आलेल्या पाण्याचे पूजन ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी (ता. 18) झाले. त्यानंतर येथील आठवडा बाजार परिसरात झालेल्या सभेत ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले आदी व्यासपीठावर होते.

ठाकरे म्हणाले, की शिवसेना दुष्काळावरही मात करू शकते. शिवजलक्रांतीच्या माध्यमातून या भागात शिवसेनेने चमत्कार करून दाखविला आहे. शिवसेना हा भूलथापा मारणारा पक्ष नाही. सत्तेत असो वा नसो, कामे सुरूच ठेवणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे त्यांनी खचू नये. आत्महत्येसारखे मार्ग अनुसरू नये. 
======================================

No comments: