Thursday, 9 June 2016

नमस्कार लाईव्ह ०९-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- श्रीलंकेकडून सहा भारतीय मच्छीमार अटकेत 
२- न्यूयॉर्क; ट्‌विटरच्या सहसंस्थापकाचेच खाते हॅक 
३- चीन व जपानमध्ये राजनैतिक तणाव 
४- बगदादमधील स्फोटांत 22 मृत्युमुखी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- लखनौ; स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध देवबंदचा फतवा 
६- पुण्यात होणार भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी 
७- 'उडता पंजाब'बाबत 'आप'चा खोडकरपणा- स्वामी 
८- सुझूकी मोटर कॉर्पोरेशनच्या सीईओंचा राजीनामा 
९- सागरमाला,फायबर ऑप्टिक प्रकल्प पूर्णत्वाकडे... 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- राज्यातील 26 जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2017 मध्ये 
११- हाजी अली दर्गा प्रवेशाचा निर्णय 28 जूनला ! 
१२- 'काही पक्षांना पोटशूळ होतोय, वेळीच इलाज केलेला बरा', शेलारांचा सेनेला टोला 
१३- सांगली; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडले, सांगलीत राडा 
१४- दिघावासियांची मागणी फेटाळली, घरं तातडीने रिकामी करावी लागणार 
१५- मराठा आरक्षण : नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेशाचं काय होणार? 
१६- मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल उद्या सेना - भाजपाची होणार बैठक 
१७- 48 तासात मान्सून कोकणात दाखल  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- विरार; मुलाच्या हव्यासापोटी चिमुकलीची निर्घृण हत्या, नराधम बाप अटकेत 
१९- औरंगाबाद; 25 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात वडिलांना अटक, मुलाची आत्महत्या 
२०- नाशिक; ...म्हणून मुख्यमंत्र्यांनी हळूच मोबाईल काढून हॉट-स्पॉट ऑन केला 
२१- मुंबई; राज ठाकरेंचा निकटवर्तीय असल्याचं सांगत लैंगिक शोषण, अभिनेत्रीचा आरोप 
२२- इतिहासात प्रथमच कोरडी पडली गोदावरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- व्हायरल सत्य : राऊंड फिगर रकमेत पेट्रोल भरणं योग्य की अयोग्य? 
२४- तुम्ही किती इंटरनेट वापरता? 
२५- केरळचे माजी विधानसभा अध्यक्ष जॉन यांचे निधन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=-=========================================================

'काही पक्षांना पोटशूळ होतोय, वेळीच इलाज केलेला बरा', शेलारांचा सेनेला टोला

'काही पक्षांना पोटशूळ होतोय, वेळीच इलाज केलेला बरा', शेलारांचा सेनेला टोला
फाईल फोटो
मुंबई: ‘काही पक्षांना पोटशूळ होताना दिसतो आहे. त्यावर वेळीच इलाज केलेला बरा.’ अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी केली आहे. मेट्रो-3 साठी मुंबईतील गिरगाव, काळबादेवी भागातील घरं विस्थापित होणार नसून त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन होणार असल्याचं शेलारांनी स्पष्ट केलं.

याशिवाय मेट्रो-3 च्या प्रस्तावाला आधी विरोध करून नंतर प्रस्ताव स्विकारल्यासंदर्भात राज्यसरकारनं महापालिकेला 15 दिवसांच्या आत उत्तर देण्याची नोटीस बजावली.

‘भाजपची भूमिका ही मुंबई विकासाची आहे. मेट्रो 3 बाबत आलेल्या प्रस्तावाला शिवसेनेसह इतर पक्षांनी विरोध केला. मात्र त्यानंतर महापालिका सुधार समितीने प्रस्ताव स्वीकारला.’ असंही शेलार म्हणाले.

दरम्यान, मुंबईत मेट्रो-3 प्रकल्पावरुन शिवसेनेने विरोध दर्शवला होता. त्यामुळे सेना-भाजपात नवा वाद सुरु झाला होता
=-=========================================================

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडले, सांगलीत राडा

सांगली : सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यादरम्यान राडा झाला. माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडले. हा राडा इतका वाढला, की कार्यकर्त्यांनी घटनास्थळी प्रचंड तोडफोड केली.

जयंत पाटलाचं भाषण सुरु असतानाच बाहेर कार्यकर्त्यांची हाणामारी सुरु होती.

या घटनेची माहिती मिळताच जयंत पाटील यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला.
=-=========================================================

विरार; मुलाच्या हव्यासापोटी चिमुकलीची निर्घृण हत्या, नराधम बाप अटकेत

मुलाच्या हव्यासापोटी चिमुकलीची निर्घृण हत्या, नराधम बाप अटकेत
विरार: एकीकडे महाराष्ट्र पोलीस दलात पहिल्यांदाच  सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षणार्थीचा  मान मिळवित महिला पोलीस अधिकारी मीना तुपे यांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केलेला असताना दुसरीकडे विरारमध्ये मात्र, मुलगी झाल्यानं तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

विरारमधील पापडखिंड येथे वासुदेव चाळीत राहणाऱ्या कैलाश भांडे (वय ३० वर्ष) याचे एका  वर्षापूर्वीच लग्न झाले होते. कैलाश वसईतील एक खाजगी कंपनीत कामाला होता. त्याची पत्नी वैष्णवी ही गरोदर राहिल्यानंतर आपल्याला मुलगा पाहिजे. असा त्याने तगादा लावला होता. पण कैलाशच्या पत्नीने मुलीला जन्म दिला, यानंतर कैलाश तिला सतत मारहाण करत असे. 15 मे रोजी त्याने आपल्या पत्नीला मारहाण करून, घराबाहेर काढले आणि दीड महिन्याच्या चिमुकलीचा गळा दाबून तिला ठार केलं.

मुलीला ठार केल्यानंतर त्याने पत्नीलाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सकाळी मृत  मुलीला घेऊन तो डॉक्टरांकडे गेला आणि खोटी माहिती सांगून शवविच्छेदन टाळले आणि मुलीचा दफनविधी पार पाडला.

यानंतर कैलाशने पत्नीला आपण गावी जाऊन राहू असे सांगून, घर रिकामं केलं. त्यानंतर तो तिथून गावाला जाण्यासाठी निघाला. पण चर्चगेट स्थानकात, पाणी आणण्याचा बहाणा करून तो तेथून फरार झाला.
=-=========================================================

हाजी अली दर्गा प्रवेशाचा निर्णय 28 जूनला !

हाजी अली दर्गा प्रवेशाचा निर्णय 28 जूनला !
मुंबई: मुंबईतल्या हाजीअली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश देण्याबाबत हायकोर्ट 28 जून रोजी निर्णय सुनावणार आहे. मुस्लिम महिलांना मक्का, मदिना, नजफ आदी धार्मिक स्थळांवर प्रवेश आहे, मात्र हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना विरोध केला जातोय.

2011 पर्यंत हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश दिला जात होता, मात्र दर्ग्याचे विश्वस्त बदलल्यानंतर महिलांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
=-=========================================================

25 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात वडिलांना अटक, मुलाची आत्महत्या

25 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात वडिलांना अटक, मुलाची आत्महत्या
औंरगाबाद 25 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात वडिलांना अटक केल्याने 16 वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. औरंगाबादमध्ये बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे.


अमोल नाडे असं मृत मुलाचं नाव आहे. अमोलचे वडील हरिश्चंद्र नाडे यांच्यावर 25 वर्षांपूर्वी हाणामारीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली.


मात्र वडिलांना अटक करु नका, अशी विनंती अमोल नाडे वारंवार करत होता. मुलाच्या विनवणीला न जुमानता पोलिसांनी हरिश्चंद्र नाडेंना अटक केली.


वडिलांना अटक झाल्याच्या धक्क्याने 16 वर्षांच्या अमोलने विहरीत उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान, वाळूज पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

=-=========================================================

...म्हणून मुख्यमंत्र्यांनी हळूच मोबाईल काढून हॉट-स्पॉट ऑन केला

...म्हणून मुख्यमंत्र्यांनी हळूच मोबाईल काढून हॉट-स्पॉट ऑन केला
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘डिजिटल महाराष्ट्र’चाही पुढाकार आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राला ‘ऑनलाईन’ आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत.

मात्र नाशिकमध्ये त्यांना इंटरनेट एररचा सामना करावा लागला.  महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमितील बक्षीस वितरणचा सोहळा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे मागील बाजूला उभारण्यात आलेल्या मंडपात आले. पोलीस अकॅडमीच्या ई- अॅकॅडमी या वेबसाईटचे लाँचिंग त्यांच्या हस्ते करण्यात आले.  नंतर ती वेबसाईट ओपन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र 5-10 मिनिटे होऊनही ती वेबसाईट काही ओपन होईना.

पत्रकारांसमोरच असं होतंय हे बघून फडणवीसांनी हळूच खिशातून आपला मोबाईल काढला आणि हॉट स्पॉटद्वारे कनेक्ट करून अखेर ती वेबसाईट ओपन केली.

डोंगल प्रॉब्लेम असल्याने असा प्रॉब्लेम झाला, अन्यथा एरव्ही लगेच कनेक्ट होते असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
=-=========================================================

दिघावासियांची मागणी फेटाळली, घरं तातडीने रिकामी करावी लागणार

दिघावासियांची मागणी फेटाळली, घरं तातडीने रिकामी करावी लागणार
मुंबई : नवी मुंबईजवळच्या दिघ्यातील अनधिकृत बांधकामाप्रकरणी नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. दिघावासियांची मुदतवाढीची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे.

अनधिकृत घरं 31 मेपर्यंत घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावर दिघावासीयांनी मुदतवाढीची मागणी केली होती. ती हायकोर्टाने फेटाळली आहे. तसंच हायकोर्टाच्या या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मागितलेला वेळही नाकारण्यात आला आहे. त्यामुळे आता तात्काळ दिघा वासियांना घरं रिकामी करावी लागणार आहेत.

यापूर्वी राज्य सरकारने या अनधिकृत इमारतींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी गृहनिर्माण मंत्री यांनी चारपट दंड आकारून इमारती नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 31 डिसेंबर 2015 पर्यंतची राज्यातील 2 लाख बांधकामं नियमित केल्याची घोषणा विधानसभेत केली होती. मात्र या इमारती आता तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
=-=========================================================

राज ठाकरेंचा निकटवर्तीय असल्याचं सांगत लैंगिक शोषण, अभिनेत्रीचा आरोप

राज ठाकरेंचा निकटवर्तीय असल्याचं सांगत लैंगिक शोषण, अभिनेत्रीचा आरोप
मुंबई : राज ठाकरेंसोबतचे फोटो दाखवून आणि मनसेचा पदाधिकारी असल्याचं सांगत एका व्यक्तीने अपहरण आणि बलात्कार केल्याचा आरोप मुंबईतील एका अभिनेत्री आणि मॉडेल केला आहे. या अभिनेत्रीने काही हिंदी आणि दाक्षिणात्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.


अभिनेत्रीच्या आरोपानुसार, “निर्माता असल्याची बतावणी करणाऱ्या अल्ताफ मर्चंटने सुरुवातीला बॉलिवूडमध्ये काम देण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो दाखवला आणि मनसेचा सदस्य असल्याचं सांगितलं. त्याने मला ड्रग्जचं व्यसन लावलं. स्वत:च्या घरात कैद करुन माझ्यावर बलात्कार केला.”


“अल्ताफ मर्चंटने त्याच्या राजकीय वजनाचा आणि राज ठाकरेंशी थेट संबंधांचा हवाला देऊन मला आपल्या जाळ्यात फसवलं. त्यानंतर सिनेमात काम देण्याचं आमिष दिलं. यादरम्यान त्याने मला ड्रग्जचं व्यसनही लावलं. इतकंच नाही तर त्याच्या घरात कैद करुन माझ्यावर बलात्कार केला,” असा आरोप अभिनेत्रीने केला आहे
=-=========================================================

मराठा आरक्षण : नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेशाचं काय होणार?

मराठा आरक्षण : नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेशाचं काय होणार?
मुंबई: न्यायालयाने स्थगिती देण्याआधी मराठा आरक्षणानुसार केलेली सरकारी नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेश कायम करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर येत्या काही दिवसात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने 2014 मध्ये मराठा आरक्षण लागू केले आणि त्याचा वटहुकूम जारी केला. याविरोधात न्यायालयात डझनभर याचिका दाखल झाल्या. या याचिकांवर सुनावणी घेताना न्यायालयाने 2014 मध्येच हे आरक्षण स्थगित केले आणि या याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतल्या.

मात्र न्यायालयाने स्थगिती देण्याआधी सरकारने मराठा आरक्षणानुसार काही शैक्षणिक प्रवेश दिले आणि सरकारी नोकर भरती केली. त्यानंतर या आरक्षणाअंतर्गत नोकर भरती व शैक्षणिक प्रवेश दिलेले नाहीत. त्यामुळे आधी दिलेले शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरती न्यायालयाच्या अंतिम निकालाने प्रभावित होऊ नये म्हणून ते कायम करण्याची परवानगी न्यायालयाने द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज सामाजिक न्याय विभागाने मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्याणी यांच्यामार्फत न्यायालयात केला आहे.

या अर्जावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी बुधवारी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर केली.
=-=========================================================

व्हायरल सत्य : राऊंड फिगर रकमेत पेट्रोल भरणं योग्य की अयोग्य?

व्हायरल सत्य : राऊंड फिगर रकमेत पेट्रोल भरणं योग्य की अयोग्य?
मुंबई गाडीमध्ये पेट्रोल भरताना राऊंड फिगर अर्थात 100, 200, 300 अशा रुपयात पेट्रोल भरु नये, असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या मेसेजमध्ये कितपत तथ्य आहे, याची पडताळणी –

तुम्ही कधी पेट्रोल पंपवर गाडी घेऊन गेल्यास नेहमी 50,100, 200 अशा राऊंड फिगर रकमेत पेट्रोल भरत असाल. कधीही कोणी 55, 110, 125 अशा रकमेचं पेट्रोल भरत नाही. त्यामुळे अशाच आशयाचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे.

व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय?
आवश्यक सूचना
कृपया अपनी गाड़ी में पेट्रोल कभी भी राउंड फिगर में ना भरवाएं. 50, 100, 150, 200 रुपए इस रकम पर पेट्रोल ना भरवाएं क्योंकि इन अंकों पर कोड सेट किए हुए होते हैं. जिससे आपकी गाड़ी में भरने वाला ईंधन 15 से 20 फीसदी कम आता है और आपका काफी नुकसान होता है. आगे से अपनी गाड़ी में 55, 60, 110, 115, 155, 160, 170, 205, 210, 220 इन अंको मतलब इतने पैसे का पेट्रोल भरवाएं और अपनी गाड़ी में पूरा पेट्रोल पाएं. आखिर में लिखा है इस मैसेजों के हर किसी तक पहुंचाए ताकि अपना पैसा किसी चोर की जेब में ना जाने पाए. भारत सरकार द्वारा जनहित में जारी.

पडताळणी

या मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी थेट पेट्रोल पंप गाठला असता. तिथे गाडीत पेट्रोल भरण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची पडताळणी केली. पेट्रोल पंपावरील मशीनमध्ये अशी छेडछाड करणं अशक्य असल्याचं, या पडताळणीत समोर आलं.

या मशिन्समध्ये असे सॉफ्टवेअर असतात, ज्यांच्यावर आयओसीएल अर्थात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यासारख्या कंपन्यांचं नियंत्रण असतं.

इतकंच नाही तर कोणत्या नोझलमधून किती पेट्रोल भरलं जात आहे, याचाही संपूर्ण डेटा पेट्रोल पंपापासून कंपनीपर्यंत सर्वांकडे असतो. कोणत्याही प्रकारची अफरा-तफर झाल्यास ते सहज सापडू शकतं.
=-=========================================================

इतिहासात प्रथमच कोरडी पडली गोदावरी


  • ऑनलाइन लोमकत
    नाशिक, दि. ९ : काठोकाठ खळाळणारी नदी ही त्या गावची श्रीमंती मानली जाते. गोदावरी नदीमुळे नाशिकक्षेत्री सुबत्ता आली आणि तीर्थस्थानामुळे ती वाढली. मात्र, बुजुर्गांना ज्ञात असलेल्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर गोदामाई पहिल्यांदाच कोरडीठाक पडल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. दर पावसाळ्यात दुतोंड्या मारुतीच्या छातीला भिडून दुथडी भरून वाहणारी गोदामाई यंदाही नक्कीच खळाळून वाहील आणि पुन्हा एकदा गोदाकाठ चैतन्याने बहरून येईल, अशी अपेक्षा तमाम नाशिककर व्यक्त करताना दिसून येत आहेत.
    मागील वर्षी बऱ्यापैकी पाऊस पडून गंगापूर धरण ७० टक्क्याच्या आसपास भरले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार समान पाणीवाटपाचे धोरण राबविताना गंगापूरचा भरलेला घडा पालथा करण्याचे ‘राजकारण’ नाशिककरांनी अनुभवले. त्यानंतर, गेल्या सात महिन्यांपासून गोदावरी प्रवाहित असल्याचा आनंद घेता आलेला नाही. सद्यस्थितीत संपूर्ण गोदापात्र कोरडेठाक पडले असून, बाहेरून येणाऱ्या भाविक-पर्यटकांच्याही मुखातून ‘ऐसी गोदा कभी देखी नहीं’, असे सहजोद्गार बाहेर पडताना दिसून येत आहे. ऐन सिंहस्थ कुंभमेळा काळात गोदावरी पात्र कोरडेठाक झाल्याचे दुर्दैव वाट्याला आले आहे.
=-=========================================================

औरंगाबाद - वडिलांना अटक केली म्हणून मुलाची आत्महत्या


  • ऑनलाइन लोकमत 
    औरंगाबाद, दि. 09 - वडिलांना अटक केली म्हणून 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली.
    अमोल नाडे असं या मृत मुलाचे नाव आहे. त्याचे वडील हरिश्चंद्र नाडे यांच्यावर 25 वर्षापुर्वी हाणामारीचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली. यावेळी अमोल नाडे माझ्या वडिलांना अटक करु नका अशी वारंवार विनवणी करत होता. मात्र पोलिसांनी त्याला न जुमानता हरिश्चंद्र नाडे यांना अटक केली. वडिलांना अटक झाल्याचा अमोल नाडे याला प्रचंड धक्का बसला आणि त्याने विहरीत उडी मारुन आत्महत्या केली. वाळूज पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
=-=========================================================

राज्यातील 26 जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2017 मध्ये



  • ऑनलाइन लोमकत
    मुंबई, दि. ९ : राज्यातील 26 जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका मार्च 2017 मध्ये होणार आहेत. या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची सोडत उद्या दि-10 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई येथे होणार आहे. 2017 मध्ये जिल्हापरिषेदेच्या होणाऱ्या निवडणूकीतील ज्याल्याची नावे खालील प्रमाणे आहेत. 

    जि.प.निवडणूक-मार्च-2017
    1)रायगड
    2)रत्नागिरी
    3)सिंधुदुर्ग
    4)पुणे
    5)सातारा
    6)सांगली
    7)सोलापूर
    8)कोल्हापुर
    9)नाशिक
    10)जळगाव
    11)अहमदनगर
    12)अमरावती
    13)बुलढाणा
    14)यवतमाळ
    15)औरंगाबाद
    16)जालना
    17)परभणी
    18)हिंगोली
    19)बीड
    20)नांदेड
    21)उस्मानाबाद
    22)लातूर
    23)नागपुर
    24)वर्धा
    25)चंद्रपुर
    26)गडचिरोली⁠⁠⁠⁠
=-=========================================================

स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध देवबंदचा फतवा


  • लखनौ : देशातील सर्वांत मोठा मदरसा (सेमिनरी) असलेल्या देवबंदच्या दारूल उलूमने स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध फतवा जारी केला आहे. स्त्री भ्रूणहत्या ही इस्लामविरोधी असल्याचे या फतव्यात म्हटले आहे.
    दारूल इफ्ता या अशा प्रकारचा फतवा जारी करणाऱ्या विभागाने लिंगनिदान करून गर्भपात करण्याबद्दल इस्लाम, कुराण, हादिथमध्ये नेमके काय म्हटले आहे, याचा खुलासा केला आहे. कन्या आहे म्हणून तिची आईच्या गर्भातच हत्या करणे हे बेकायदा आणि ‘हराम’ आहे. प्राचीन काळात लोक मुलीला जिवंत दफन करीत असत, ज्याचा पवित्र कुराणमध्ये धिक्कार केला आहे. भ्रूण चार महिन्यांचे झाल्यावर गर्भपात करणे बेकायदा व हराम आहे. आपल्या मुलींचा प्रेमाने सांभाळ करण्याचे व स्त्रियांचा सन्मान करण्याचे कुराण आपल्याला सांगतो, असे फतव्यात म्हटले आहे.
=-=========================================================
श्रीलंकेकडून सहा भारतीय मच्छीमार अटकेत

रामेश्‍वर- श्रीलंका नौदलाच्या जवानांनी श्रीलंकेच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याच्या आरोपावरून तमिळनाडूचे सहा मच्छीमारांना अटक केली. या वेळी मच्छीमारांच्या नौकाही हस्तगत केल्या आहेत.

मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष एस. एमिरेट यांनी सांगितले की, ‘तलाईमन्नार क्षेत्रात भारतीय मच्छीमारांना बुधवारी (ता. 8) रात्री पकडण्यात आले. श्रीलंकेच्या नौसैनिकांनी मच्छीमारांचे जाळेही कापले.‘
=-=========================================================
ट्‌विटरच्या सहसंस्थापकाचेच खाते हॅक

न्यूयॉर्क- ट्‌विटरचे सहसंस्थापक व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इवान विल्यम्स यांचे ट्‌विटरवरील खाते हॅक झाले आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी आज (गुरुवार) दिले.

विल्यम्स यांचे ट्‌विटरवरील खाते हॅक केल्याचा दावा आवरमाइन या ग्रुपने केला आहे. फेसबुकचे निर्माते मार्क झुकेरबर्ग यांचे ट्विटर व पिंटेरेस्टवरील खातेही आवरमाइन या ग्रुपनेच सोमवारी (ता. 6) हॅक केले होते. ट्‌विटरवरील जगभरातील 100 मिलियन खाती हॅक केली होती. मात्र, काही काळानंतर ती पुन्हा पूर्ववत केल्याचेही आवरमाइने म्हटले आहे.
=-=========================================================
तुम्ही किती इंटरनेट वापरता?
-

नवी दिल्ली - भारतातील युजर दरमहा साधारण 1.4 जीबी डेटा वापरतो. आपल्या गरजेनुसार आपण कमी-अधिक प्रमाणात डेटा वापरतो. तुम्ही महिन्याला साधारण किती इंटरनेट वापरता? भारतात स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत असून फोनवरून इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्याही वाढत आहे. इ.स. 2021 पर्यंत भारतातील इंटरनेट युजर मोबाईलद्वारे दरमहा साधारण 7 जीबी डेटा वापरेल असा अंदाज एका संशोधनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.



"टेलिकॉम गियर मेकर इरिक्‍सन‘ने केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. 2015 मध्ये भारतातील स्मार्टफोनधारक साधारणत: दरमहा 1.4 जीबी डेटा वापरत होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून 2021 पर्यंत प्रत्येकजण 7 जीबी डेटा वापरण्याची शक्‍यता आहे. तसेच 2021 पर्यंत भारतातील एकूण इंटरनेट ट्रॅफिकपैकी 99 टक्के ट्रॅफिक हे स्मार्टफोनद्वारे असेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

भारतातील 15 ते 24 वयोगटातील वर्गाकडून सर्वाधिक इंटरनेट वापरले जाते. तसेच जास्तीत जास्त शुल्क भरून करून अधिकाधिक वेगवान सेवा मिळविण्याकडे त्यांचा कल असतो. हे युजर्स मनोरंजनाशी संबंधित सेवांचा लाभ घेतात. ही माहिती व्हॉटसऍप, फेसबुक मेसेंजरद्वारे शेअर केली जाते. 
=-=========================================================
पुण्यात होणार भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी

नवी दिल्ली - पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर पुढील वर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी क्रिकेट सामना होणार आहे. यंदाच्या मोसमातील आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीच्या ठिकाणांची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (गुरुवार) केली. त्यामध्ये कसोटी सामन्यासाठी पुण्याचाही समावेश करण्यात आला आहे.

यंदाच्या मोसमामध्ये भारत मायदेशात 13 कसोटी सामने खेळणार आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. या मोसमात भारतीय संघ एकूण 13 कसोटी, आठ एकदिवसीय, तीन ट्‌वेंटी-20 मायदेशात खेळणार आहे. तर, बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धांत एकूण 918 सामने खेळविले जातील.
=-=========================================================
चीन व जपानमध्ये राजनैतिक तणाव

टोकियो - पूर्व चिनी समुद्रामधील काही वादग्रस्त बेटांच्या नजीकच्या भागामध्ये एका चिनी जहाजाने नुकताच प्रवेश केल्याने जपानकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

जपानमधील सरकारने येथील चिनी राजदूतास समन्स धाडून या घटनेचा तीव्र राजनैतिक निषेध नोंदविला. यावेळी याच भागामध्ये काही रशियन नौकाही आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. जपानच्या मालकीच्या सेंकाकु बेटांजवळील भागामध्ये चिनी नौका दिसून आल्याचे जपानी परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनामध्ये म्हटले आहे. या बेटांवर चीनचाही दावा असून चीनकडून या बेटांचे नामकरण दिआयु बेटे असे करण्यात आले आहे.

2012 मध्ये या बेटांपैकी काही बेटांचे जपानने "राष्ट्रीयीकरण‘ केल्यानंतर चीन व जपानमधील संबंध तणावग्रस्त झाले होते. यानंतर या मुद्याचे पडसाद दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये व एकंदरच दक्षिण पूर्व आशियामधील भूराजकारणात सातत्याने उमटत राहिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, जपानकडून नोंदविण्यात आलेला राजनैतिक निषेध अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. 
=-=========================================================
बगदादमधील स्फोटांत 22 मृत्युमुखी

बगदाद - इराकची राजधानी असलेल्या बगदाद शहरामध्ये आज (गुरुवार) दोन ठिकाणी झालेल्या बॉंबस्फोटांमध्ये 22 पेक्षा जास्त जण मृत्युमुखी पडले; तर 70 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. बगदादच्या पश्‍चिमेस असलेल्या फलुजा शहरामधून इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या सैन्यास हुसकावून लावण्याच्या प्रयत्नांमध्ये इराकी सैन्य असतानाच घडविण्यात आलेले हे स्फोट अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहेत.

बगदादमधील आर्थिक व्यवहाराचे एक महत्त्वपूर्ण ठिकाण असलेला "बगदाद अल-जदीदा‘ येथे घडविण्यात आलेल्या स्फोटामध्ये किमान 15 मृत्युमुखी; तर सुमारे 50 जखमी झाले. याचबरोबर, बगदादच्या उत्तरेस असलेल्या ताजी येथील इराकी सैन्याच्या "चेकपॉईंट‘जवळ घडविण्यात आलेल्या स्फोटामध्ये सात सैनिक ठार झाले. हे दोन्ही स्फोट स्फोटकाने भरलेले वाहन चालविणाऱ्या आत्मघातकी दहशतवाद्यांकरवी घडविण्यात आले. इसिस व इराकी सैन्यामधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक रक्तरंजित होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
=-=========================================================
'उडता पंजाब'बाबत 'आप'चा खोडकरपणा- स्वामी

नवी दिल्ली - ‘उडता पंजाब‘ चित्रपटावरून संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असून या वादामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेतली आहे. पंजाबमधील आगामी निवडणुकीच्या प्रसारासाठी आम आदमी पक्ष खोडकरपणा करत असल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे.

File Photo

वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी यांनी हा चित्रपट अयोग्य वेळी आल्याचे म्हटले. तसेच चित्रपटातून पंजाब सरकार अंमली पदार्थांच्या गैरवापराला जबाबदार असल्याचे दिसत आहे. ‘अंमली पदार्थ ही मोठी समस्या यात काहीही शंका नाही. कोण म्हणते ही समस्या ‘अकाली‘ने सुरू केली? ती कॉंग्रेससोबत सुरू झाली.‘ तसेच पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्ष "उडता पंजाब‘च्या निमित्ताने खोडकरपणा करत असल्याचा आरोपही स्वामी यांनी केला.
=-=========================================================
सुझूकी मोटर कॉर्पोरेशनच्या सीईओंचा राजीनामा

टोकियो - जपानस्थित मोटार कंपनी सुझूकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी ओसामू सुझूकी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिला. 

सुझूकीच्या लहान वाहनांची इंधन कार्यक्षमता (मायलेज) ही अधिक दाखविणारी सदोष चाचणी यंत्रणा वापरात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कापनीचे अध्यक्ष सुझूकी यांनी हा निर्णय घेतला आहे.

शिक्षेचे स्वरूप निश्चित 
कंपनीने या प्रकरणात दोषी असलेल्यांसाठी शिक्षेचे स्वरूप निश्चित केले आहे. यामध्ये कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ओसामू होंडा यांना निवृत्ती देण्यात आली आहे. शिवाय सदोष चाचणी यंत्रणेशीसंबंधित कंपनीच्या काही संचालकांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. कंपनीने भविष्यात अशा प्रकारचे गैरव्यवहार किंवा सदोष चाचणी घडणार नाही याची काळजी घेण्यात येईल असेही सांगितले. शिवाय घडलेल्या प्रकरणासाठी ग्राहकांकडे दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन कंपनीने प्रसिद्ध केले आहे.

आज (गुरुवार) मुंबई शेअर बाजारात मारुती सुझूकी इंडियाचा शेअर 4159.90 रुपयांवर व्यवहार करतो आहे. त्यात किरकोळ घसरण झाली आहे. शेअरने वर्षभरात 3202.10 रुपयांची नीचांकी, तर 4789 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.

=-=========================================================
सागरमाला,फायबर ऑप्टिक प्रकल्प पूर्णत्वाकडे...

नवी दिल्ली - देशातल्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवणारे दोन प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आता पूर्णत्वाकडे वेगाने वाटचाल करत आहेत. सागरमाला प्रकल्पांतर्गत देशातील जलवाहतुकीचे सुदृढीकरण करण्यात येत असून त्यामुळे उद्योग-धंद्यांसाठी एक नवा पर्याय खुला होणार आहे. राष्ट्रीय फायबर ऑप्टिक नेटवर्क प्रकल्पामध्ये देशातील प्रत्येक खेड्या-पाड्यात इंटरनेट सुविधा पोहोचवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची नावे गोपनीय ठेवण्याच्या अटीवर याबाबत माहिती दिली आहे..

जलवाहतूक स्वस्त आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने, बंदरांचे आधुनिकीकरण, त्यांच्यामधील अंतरिम संपर्क, त्यांच्याशी संलग्न औद्योगिकीकरण आणि किनारपट्टीतील समाजाचा विकास अशांसारख्या सुमारे १५० लघुप्रकल्पांच्या मिळून बनलेल्या सागरमाला प्रकल्पाची संकल्पना २००३ मध्येच वाजपेयी सरकारच्या काळात मांडली गेली होती. जलवाहतूक मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांच्यामधील तसेच केंद्र आणि राज्य सरकारे यांच्यामधील मतभेदांमुळे हा प्रकल्प रखडला होता.  
=-=========================================================
केरळचे माजी विधानसभा अध्यक्ष जॉन यांचे निधन
-

तिरुवनंतपुरम- केरळचे माजी विधानसभा अध्यक्ष टी. एस. जॉन यांचे आज (गुरुवार) सकाळी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचे रुग्णालयात निधन झाले आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

व्यवसायाने वकील असलेले जॉन केरळ कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य होते. कलोप्परा विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा निवडून आले होते. शिवाय, ए. के. अँथनी यांच्या मंत्रिमंडळात जॉन मंत्री होते.
=-=========================================================

No comments: