[अंतरराष्ट्रीय]
१- मॉस्को; जगातील पहिले 3D न्यूज बुलेटिन
२- वॉशिंग्टन; फेडरल बँकेचे व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय
३- लंडन ; ब्रिटिश खासदार जो कॉक्स यांची हत्या
४- यांगून; भारत म्यानमार संबंध बळकट होणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर, सातव्या वेतन आयोगात 30 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव
६- डाळींचे दर कडाडले, तूर डाळ 200 रुपयांच्या घरात
७- दिल्लीत चालत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
८- विद्यार्थ्यांनी बनविलेला उपग्रह झेपावणार
९- अहिंसक देशामध्ये वन्यजीवांची हिंसा
१०- कोचीमध्ये विद्यार्थीच करणार शिक्षकांचे मूल्यमापन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- 'गिरीश महाजन यांची आमदारकी रद्द करा', राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे तक्रार
१२- जळगाव; शिवसेना आमदार गुलाबराव पाटलांना अटक, एक दिवसाची पोलीस कोठडी
१३- ‘आॅनलाइन औषधविक्रीला विरोध का?’- इंडियन इंटरनेट फार्मसी असोसिएशनचा सवाल
१४- सागरी सुरक्षेसाठी स्वतंत्र दल - मुख्यमंत्री मागणी
१५- मुंबई; पालिकेला ४०० कोटींचा चुना
१६- भुजबळांचा मुक्काम तुरूंगातच
१७- मंत्र्यांकडूनच सरकारची प्रतिमा मलिन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- औरंगाबाद; 'तुझ्यामुळे मी आत्महत्या करतेय', मेसेज करुन विद्यार्थिनीची रेल्वेखाली उडी
१९- पिंपरी; धावत्या रेल्वेखाली आलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवलं
२०- अहमदाबाद; गुलबर्ग सोसायटी जळीतकांड : 24 पैकी 11 दोषींना जन्मठेप
२१- पुणे; आंबेगाव येथे किराणा दुकानावर धाडसी दरोडा
२२- येवला; दोनशे रुपये भाव मिळाल्याने महामार्गावर ओतला कांदा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- चॅम्पियन्स ट्रॉफी : सुवर्णपदकासाठी भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार
२४- सेल्फीमुळे रवींद्र जडेजा अडचणीत, कारवाईची शक्यता
२५- हाशिम अमलानं तोडला कोहलीचा विक्रम!
२६- ऑस्ट्रेलियाकडून पराभव होऊनही भारत चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत
२७- 'उडता पंजाब' 700 पेक्षा अधिक संकेतस्थळांवर!
२८- लंडन; भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
विलास मोरे, शहाजी पवळे, अविनाश गायकवाड, मनोज पंडित, गोविंद पोलावार, एजाज अहमद, ज्ञानेश्वर राजगोरे, आकाश रेड्डी, राहुल भराडिया
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=======================================

'तुझ्यामुळे मी आत्महत्या करतेय', मेसेज करुन विद्यार्थिनीची रेल्वेखाली उडी
औरंगाबाद : रेल्वेखाली उडी घेऊन 19 वर्षीय मेडिकल विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. रॅगिंग तसंच मैत्रिणींसोबतच्या विसंवादातून तिने आत्महत्या केल्याचा संशय आहे. शिवाजीनगर भागात गुरुवारी सकाळी आत्महत्येची ही घटना उघडकीस आली.
प्रतीक्षा मोतीराम वाघ असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती मूळची औरंगाबादची आहे. ही विद्यार्थिनी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती.
होस्टेलमध्ये मैत्रिणींकडून होणारी रॅगिंग, सततचा छळ, चोरीचा आरोपाला कंटाळून प्रतीक्षाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. तसंच आत्महत्येपूर्वी तिने मैत्रिणीला मेसेज केला होता.
प्रतीक्षाचे वडील मोतीराम वाघ हे भारतीय स्टेट बँक लाइफ इन्शुरन्समध्ये व्यवस्थापक आहेत. प्रतीक्षाच्या मैत्रिणींनी रॅगिंग करुन माझ्या मुलीला त्रास दिला, त्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप मोतीराम वाघ यांनी केला आहे.
=======================================
धावत्या रेल्वेखाली आलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवलं
पिंपरी : धावती रेल्वे पकडण्याच्या नादात रेल्वेखाली आलेल्या एका तरुणाची दोन पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. लोणावळा स्टेशनवरील या घटनेची थरारक दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसटीहून सुटलेल्या नागरकोईल एक्स्प्रेस लोणावळा स्थानकात पोहोचली. पण धावती गाडी पकडत असताना या तरुणाचा तोल गेला आणि तो गाडीच्या खाली जाऊ लागला. हा तरुण सुमारे 100 मीटर रेल्वेसोबत फरफटत गेला.
सुदैवाने तरुणाच्या किंकाळ्या आणि मदतीसाठीची याचना रेल्वे पोलिसांनी ऐकली. तर यादरम्यान हा सर्व प्रकार गाडीच्या मोटरमनच्याही लक्षात आला. त्यामुळे त्याने त्वरीत गाडी थांबवली. त्यानंतर सचिन भोई आणि सुमीत पाल या दोन्ही पोलिसांनी या तरुणाला सुखरुप बाहेर काढलं.
हा तरुण या प्रकारानंतर इतका भांबावलेला होता की तो आपलं नावही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिलं. केवळ दैव बलवत्तर म्हणून या तरुणाचा जीव वाचला.
=======================================
डाळींचे दर कडाडले, तूर डाळ 200 रुपयांच्या घरात
नवी दिल्लीः डाळीचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. डाळ जवळपास 200 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अतिरिक्त साठ्याची क्षमता 5 टक्क्यांनी वाढवून 8 लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामळे डाळ 120 रुपये प्रति किलोने देणं शक्य होणार आहे.
केंद्राच्या या निर्णयाला मात्र राज्यांनी गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही. कारण या निर्णयानंतर राज्यांचा कसलाही प्रतिसाद आला नसल्याचं दिसून आलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
=======================================
गुलबर्ग सोसायटी जळीतकांड : 24 पैकी 11 दोषींना जन्मठेप
अहमदाबाद : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या गुलबर्ग सोसायटी जळीतकांडातील दोषींना आज एसआयटीच्या विशेष कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. या जळीतकांडतील 24 दोषींपैकी 11 जणांना जन्मठेप, 12 जणांना 7 वर्ष तर एकाला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
गुजरात दंगलीनंतर 2002 मध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचं वास्तव्य असलेल्या गुलबर्ग सोसायटीला आग लावण्यात आली होती. त्यात एहसान जाफरींसह 69 जण मृत्यूमुखी पडले होते. या प्रकरणी एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी गेल्या 14 वर्षांपासून न्यायालयात लढा देत आहेत.
याप्रकरणी विशेष कोर्टाने 2 जून रोजी 24 आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर 36 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती. विशेष कोर्टाचे न्यायाधीश पीबी देसाई यांनी 11 जणांना हत्या आणि इतर गुन्हे, तर विहिंप नेते अतुल वैद्यसह 13 जणांना कमी गंभीर गुन्ह्यात दोषी ठरवलं होतं.
=======================================
चॅम्पियन्स ट्रॉफी : सुवर्णपदकासाठी भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. लंडनमध्ये गुरुवारी झालेल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 4-2 असं पराभूत केलं. मात्र ब्रिटन विरुद्ध बेल्जियमसामना बरोबरीत सुटल्याने भारताचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित झालं आहे.
आता अंतिम फेरीत भारताचा सामना पुन्हा ऑस्ट्रेलियासोबतच होणार आहे.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने कधीही प्रवेश केला नव्हता. 1982 साली नेदरलँडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने ब्राँझ मेडल पटकावलं होतं. ही भारताची या स्पर्धेतली सर्वोत्तम कामगिरी.
दरम्यान काल झालेल्या सामन्यात व्ही.आर.रघुनाथ आणि मनदीप सिंह यांच्या गोलमुळे भारताने कांगारुंना चांगली टक्कर दिली. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताच्या शिलेदारांनी दमदार कामगिरी करुन सुवर्णपदक मिळवावं, अशी अपेक्षा तमाम हॉकीप्रेमींची आहे.
=======================================
सेल्फीमुळे रवींद्र जडेजा अडचणीत, कारवाईची शक्यता
राजकोटः भारताचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. जडेजावर वन्य प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. जडेजा कुटुंबासोबत जंगल सफारी करण्यासाठी गीर सिंहांच्या जगलात गेला होता. मात्र वन विभागाच्या गाडीतून खाली उतरुन सिंहांसोबत फोटो काढल्यामुळे जडेजा अडचणीत आला आहे.
वन सफारी करताना वन विभागाच्या गाडीतून खाली उतरुन गीर सिंहांसोबत फोटो काढला, जडेजाने हा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. गीर जंगलामध्ये कायद्याने गाडीतून उतरण्यास मनाई आहे, त्यामुळे जंगल प्राणी संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे.
=======================================
हाशिम अमलानं तोडला कोहलीचा विक्रम!
सेंट किट्स: दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज हशिम अमलानं भारताच्या विराट कोहलीचा आणखी एक विक्रम मोडीत काढला. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 23 शतकं ठोकण्याचा मान हा आता अमलाच्या नावावर जमा झाला आहे.
अमलानं तिरंगी मालिकेतल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 99 चेंडूंत 13 चौकारांसह 110 धावांची खेळी उभारली. त्याचं हे वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं 23वं शतक ठरलं. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमलाचं 23वं शतक अवघ्या 132व्या डावात साजरं झालं.
विराट कोहलीनं वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं आपलं 23वं शतक 157व्या डावात झळकावलं होतं. दरम्यान, सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कवरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी दिलेलं 344 धावांचं आव्हान विंडीजला पेलवलं नाही. त्यांचा अख्खा डाव 38 षटकांत 204 धावांत गडगडला. त्याआधी, हशिम अमलाच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 50 षटकांत चार बाद 343 धावांची मजल मारली होती.
=======================================
'गिरीश महाजन यांची आमदारकी रद्द करा', राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे तक्रार
मुंबई: जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची आमदारकी रद्द व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. कारखान्यासाठी शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या जमिनीची नोंद निवडणूक प्रतिज्ञापत्रात न करणं हा गुन्हा आहे. त्यामुळं महाजन यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे.
जळगावमधील राष्ट्रवादी नेते दिगंबर केशव पाटील यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळं स्वत:च्या नावावर असलेली संपत्ती लपवणं तांत्रिकदृष्ट्या महाजन यांना महागात पडण्याची शक्यता आहे.
‘जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळं त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्यात यावी.’ अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.
2002 मध्ये गिरीश महाजन यांनी भुसावळ तालुक्यात पूर्णा-तापी कारखाना उभा करण्यासाठी एकर जमीन संपादित केली. शेतकऱ्यांना नोकरीचं आश्वासन दिलं. पण ना कारखाना उभा राहिला, ना नोकऱ्या मिळाल्या.
बरं प्रकरण इथंच थांबलं नाही. गिरीश महाजनांच्या नावावर असलेल्या या जमिनीचा कोणताही उल्लेख त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात नाही. या सगळ्या प्रकरणाचं खापर गिरीश महाजन यांनी मोठ्या चलाखीनं नाथाभाऊंवर फोडलं आहे.
=======================================
केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर, सातव्या वेतन आयोगात 30 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव
नवी दिल्ली: सातव्या वेतन आयोगात करण्यात आलेल्या शिफारशींपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 30 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव देण्यात आल्याचं वृत्त आहे.
कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन हे नव्या शिफारशींनुसार मिळेल. ते १ ऑगस्ट रोजी खात्यात जमा होईल अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचप्रमाणे मागील सहा महिन्यांचा वाढीव पगार देखील देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सातव्या वेतन आयोगात 2,50,000 रु. कमाल वेतन आणि 18,000 रु. किमान वेतन अशी शिफारस देण्यात आली होती. यासोबतच 30 टक्के पगारवाढीचा प्रस्तवाही देण्यात आला होता. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
सातव्या वेतन आयोगामुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे.
=======================================
शिवसेना आमदार गुलाबराव पाटलांना अटक, एक दिवसाची पोलीस कोठडी
जळगाव: एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांना आज कोर्टासमोर हजर केलं असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील म्हसावद इथं पद्मालय शिक्षण प्रसारक संस्था आहे. 1991 साली या संस्थेची स्थापन झाली. त्यानंतर 2012 पर्यंत संस्थेच्या 6 सभासदांचं निधन झालं. मात्र 20 एप्रिल 2008 साली गुलाबराव पाटील यांनी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली. आणि 18 ऑगस्ट 1996 साली मृत पावलेले सभासद महारु काशीनाथ बेलदार सभेला हजर असल्याचं कागदोपत्री दाखवलं. आणि संस्थेची नवीन कार्यकारिणी तयार केली. असा त्यांच्यावर आरोप आहे.
याप्रकरणी अर्जुन पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी गुलाबराव पाटलांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र तो फेटाळून लावला. त्यानंतर गुलाबराव पाटील स्वत: जळगावमधील एमआयडीसी पोलिसांना शरण आले. पोलिसांनी आज त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं. कोर्टानं त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र शिवसेनेच्या आमदाराला अशा प्रकारे फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक होण्याची वेळ आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
=======================================
व्हिडिओ - पाहा 3D न्यूज बुलेटिन
- ऑनलाइन लोकमत -मॉस्को, दि. 16 - तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगती करत आहे. सध्याच्या तरुणांना थ्रीडीचं खूप आकर्षण आहे, आणि त्यामुळेच चित्रपटांपासून ते मोबाईल गेम्सपर्यंत सगळीकडे थ्रीडी टेक्नॉलॉजी वापरली जात आहे. मात्र न्यूज चॅनेल्समध्ये ही टेक्नॉलॉजी आत्तापर्यंत वापरण्यात आलेली नव्हती. पण रशियन टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच थ्रीडी बुलेटिन जारी करण्यात आलं.न्यूज बुलेटीन म्हटलं की अँकर नेहमीप्रमाणे बातम्या सांगणार, रिपोर्टर लाईव्ह, एखादा फोनो हे ठरलेलं असतं.. पण जगामध्ये पहिल्यांदाच एखाद्या टीव्ही चॅनेलने थ्रीडी बुलेटिन केलं आहे. रशियन टेलिव्हिजनवर हे बुलेटिन दाखवण्यात आलं, त्यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन स्वत: स्टुडिओमध्ये हजर होते.
=======================================
ऑस्ट्रेलियाकडून पराभव होऊनही भारत चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत
- ऑनलाइन लोकमत -लंडन, दि. 17 - भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचला आहे. कारण पहिल्यांदाचा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे भारताचं पदक नक्की झालं आहे. विशेष म्हणजे साखळी सामन्यात पराभव स्विकारावा लागलेल्या ऑस्ट्रेलियासोबतच अंतिम सामना होणार आहे. ब्रिटन आणि बेल्जियममधील सामना बरोबरीत सुटल्याने भारत अंतिम सामन्यात पोहोचला आहे.गुरुवारी झालेल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 4-2 ने पराभूत केलं होतं. अंतिम सामन्यात प्रवेशासाठी ऑस्ट्रेलियासोबत ड्रॉ खेळण्याची गरज होती; मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारताच्या आशा ब्रिटन विरुद्ध बेल्जियम सामन्यावर होत्या. मात्र ब्रिटन विरुद्ध बेल्जियम सामना बरोबरीत सुटल्याने भारताचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित झालं आहे.
=======================================
दिल्लीत चालत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. 17 - चित्रपट पाहून घरी परतणा-या 25 वर्षीय तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. अपहरण करुन तिला कारमधून नेण्यात आलं होतं. चालत्या कारमध्येच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.पिडीत तरुणी मैत्रिणीसोबत वसंत विहार परिसरातील पीव्हीआरमध्ये चित्रपट पाहायला गेली होती. पहाटेच्या 3.15 वाजता घरी परत असताना काही लोकांनी तिचं अपहरण केलं. त्यानंतर चालत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कार करुन झाल्यानंतर वसंत विहार परिसरामधीलच पुर्वी मार्ग येथे तिला सोडून देण्यात आलं अशी माहिती पिडीत तरुणीने दिलं आहे.
=======================================
किराणा दुकानावर धाडसी दरोडा
-
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १७ - आंबेगाव पठार येथील एका किराणा मालाच्या दुकानावर चोरटयांनी धाडसी दरोडा टाकत 7 तोळ्यांची सोनसाखळी आणि 30 हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दुकानमालक आणि त्याचा कामगार जखमी झाला आहे.
आंबेगाव पठारावर किराणा दुकान आहे. दुकान मालक आणि त्याचा मुलगा दुकानात सामान लावत होते. यावेळी दोन दुचाकीवरून पाच जणांचे टोळके तेथे आले. दोघे जण बाहेर उभे राहून लक्ष ठेवत होते. तर अन्य तीन जण दुकानात घुसले. आत गेलेल्याचोरटय़ांनी दुकांमालकाकडे पैशांची मागणी केली. त्याला विरोध करताच चोरटयांनी कोयत्यासारख्या धारदार हत्यारांनी त्यांच्या डोक्यात वार करून 7 तोळे चैन आणि 30000 रोख रक्कम लुटली. त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या कामगारावरही त्यांनी हल्ला केला. दोन दुचाकींवरून आरोपी पसार झाले. दोघांना रुग्नालयात दाखल करण्यात आले होते.औषधोपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांनी बनविलेला उपग्रह झेपावणार
- पुणे : रोबोट, वेगात धावणारी रेसिंग कार अशा विविध प्रकारच्या शोधात आघाडी घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी चक्क उपग्रह तयार केला आहे. हा उपग्रह येत्या बुधवारी इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपणतळावरून इतर २० उपग्रहांसोबत झेपावणार आहे.येथील कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी ही डोळे दीपवणारी कामगिरी केली आहे. त्यांनी या उपग्रहाला ‘स्वयम्’ असे नाव दिले आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेला भारतीय बनावटीचा हा पहिलाच लघू उपग्रह आहे. तसेच भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा कमी वजनाचा उपग्रह म्हणूनही ‘स्वयम्’चे वेगळेपण आहे.साधारणपणे एक वर्ष हा उपग्रह कार्यरत राहील. प्रक्षेपण झाल्यानंतर ४५ मिनिटांनी अॅन्टिना निश्चित जागेवर येईल. त्यानंतर उपग्रह व सीओईपीमध्ये उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागेल.मागील वर्षीच इस्रोने या उपग्रहाच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब केले होते. या लघू उपग्रहाच्या निर्मितीसाठी ५० लाखांचा खर्च झाला आहे. या लघू उपग्रहाचे वजन ९९० ग्रॅम असून त्याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी साधारण १० सेंटीमीटर एवढी आहे. सहा सोलर पॅनेलच्या मदतीने उपग्रह कार्यरत राहणार आहे.२० उपग्रह एकाच वेळी अवकाशात पाठवणारयेत्या बुधवारी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून ‘पीएसएलव्हीसी-३४’ हा प्रक्षेपक ‘स्वयम्’सह एकूण २० उपग्रह घेऊन अवकाशात झेपावेल.यामध्ये १८ उपग्रह हे विदेशी आहेत, तर तामिळनाडू येथील सत्यभामा विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी तयार केलेल्या एका उपग्रहाचाही यामध्ये समावेश आहे. शिवाय पुण्याच्या विद्यार्थ्यांचा ‘स्वयम्’ही असणार आहे.2008 पासून विद्यार्थ्यांनी ‘स्वयम्’साठीप्रयत्न सुरू केले होते. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने तब्बल १७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हे मिशन पूर्णत्वास नेले.दरवर्षी या मिशनमध्ये काही नवीन विद्यार्थी आपले योगदान देत होते, अशी माहिती ‘सीओईपी’चे संचालक भारतकुमार अहुजा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.या वेळी अॅप्लाइड सायन्स विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. एम. वाय. खळदकर, डॉ. संदीप मेश्राम उपस्थित होते.
=======================================
‘आॅनलाइन औषधविक्रीला विरोध का?’
- मुंबई : इंटरनेटच्या युगात आॅनलाईन हे खरेदी -विक्रीसाठी नवीन व्यासपीठ निर्माण झाले आहे. लोकांमध्ये जनजागृती नसल्याने त्यांना चांगल्या प्रतीची आणि योग्य संकेतस्थळावरुन औषधे घेता येत नाहीत. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशातील दुर्गम भागातही सहज औषधे उपलब्ध होऊ शकतात, असा युक्तीवाद करत आॅनलाईन फार्मसीला विरोध का असा सवाल इंडियन इंटरनेट फार्मसी असोसिएशनने (आयपीए) पत्रकार परिषदेत उपस्थित केला.आज अनेक वस्तू ग्राहकांना त्यांच्या दारापाशी मिळतात. त्याचप्रमाणे आजारी असणाऱ्या एकटे राहणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुविधा उपयोगी ठरणारी आहे. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची, रुग्णांना फायदा व्हावा, यासाठी आम्ही औषधांचा व्यवसाय आॅनलाईन करत आहोत. त्यात कोणतेही गैरप्रकार करत नाही. लोकांनी योग्य त्या साईटवरुन औषधे घेतल्यास रुग्णांची फसवणूक होणार नाही, असा दावा आयपीएने केला.प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधे विकण्यास बंदी आहे आणि आॅनलाईनमध्ये रुग्णांची फसवणूक होण्याचा धोका अधिक आहे. प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे आॅनलाईन फार्मसीवरकारवाई करण्यात येत असल्याचे एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
=======================================
सागरी सुरक्षेसाठी स्वतंत्र दल
- मुंबई : सागरी सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या धर्तीवर स्वतंत्र सागरी सुरक्षा दलाची स्थापना करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही मागणी महत्त्वाची असून या बाबतचा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकार लवकरच घेईल, असे केंद्रीयगृहमंत्री राजनाथ सिंह यांनीसांगितले.देशाच्या सागरी किनारपट्टीवरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मासेमारी बोटींचे कलर कोडिंग, मासेमारांना बायोमेट्रिक कार्डस् आणि कम्युनिटी पोलिसिंगमध्ये स्थानिकांचा सहभाग याबाबत राज्य शासनाने केलेल्या प्रगतीचा आढावा सादर केला. सागरी किनाऱ्यांबरोबरच मच्छिमार बोटींचा वावर असणाऱ्या ठिकाणांवरही बारकाईने लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी मानवी सुरक्षा तसेच ई-टेहळणी सारख्या सुरक्षा उपायांचा वापर करण्याची आवश्यकता आहे. किनाऱ्यावरील मच्छिमारांना बायोमेट्रिक कार्ड देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शासन मदत करण्यास तयार असल्याचेही मुख्यमंत्रीम्हणाले.
=======================================
पालिकेला ४०० कोटींचा चुना
- मुंबई : वरळी गोमाता नगर येथील पालिकेच्या भूखंडावर प्रकल्प बाधितांच्या सदनिका बांधण्याच्या बदल्यात बिल्डरला चक्क दोन लाख चौरस फूट विकास हक्क हस्तांतरणाची खिरापत वाटण्यात आली होती़ मात्र बिल्डरने बांधलेल्या या इमारती काही वर्षांत मोडकळीस आल्या आहेत़ त्यामुळे याप्रकरणात संशय व्यक्त करीत या चारशे कोटी रुपये घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी मनसेने गुरुवारी केली़वरळी प्रभादेवी परिसरात पालिकेच्या भूखंडावर नऊ इमारती बांधण्यात येणार होत्या़ यासाठी पालिका, झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरण आणि बिल्डर यांच्यामध्ये करार झाला होता़ या मोबदल्यात बिल्डरालाही घसघशीत टीडीआर मिळणार होता़ मात्र नियमांनुसार या बिल्डरने आरसीसीचे बांधकाम करणे अपेक्षित होते़ परंतु बिल्डरने २००६ मध्ये लोड बिअरिंगचे बांधकाम केले़ यामुळे काही वर्षांतच ही इमारत धोकादायक ठरली आहे़
=======================================
भुजबळांचा मुक्काम तुरूंगातच
- मुंबई : वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात यावा, अशी केस अर्जदाराने बनवली नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने ८४० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची जामिनावर तात्पुरती सुटका करण्यास नकार दिला. या आधी पीएमएलए कोर्टाने त्यांना जामीन नाकारला होता.छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असला तरी न्या. पी.एन. देशमुख यांनी कारागृह प्रशासनाला आवश्यक असेल तेव्हा भुजबळांना शासकीय रुग्णालयात उपचार करण्याचे निर्देश दिले.उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या अनेक व्याधी भुजबळांना असल्याने त्यांना यावर उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल करायचे आहे. त्याकरिता त्यांची तात्पुरत्या जामिनावर सुटका करावी, अशी मागणी छगन भुजबळ यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयाकडे केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित करण्यात आलेल्या नऊ डॉक्टरांच्या पॅनलने छगन भुजबळांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या. या वैद्यकीय अहवालात अनेक त्रुटी असल्याचे अॅड. देसाई यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले. चाचण्यांची वेळ आणि भुजबळांची जन्म तारीख वेगळी टाकली असल्याचे अॅड. देसाई यांनी न्या. देशमुख यांना सांगितले. त्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रुग्णालयातील मशिन्समधील बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने ईसीजी चाचणीची वेळ आणि भुजबळ यांच्या जन्म तारखेमध्ये बदल झाला, असे स्पष्टीकरण खंडपीठाला दिले. न्या. देशमुख यांनी हे स्पष्टीकरण समाधानकारक नाही, असे सांगितले.
=======================================
अहिंसक देशामध्ये वन्यजीवांची हिंसा
- किशोर रिथे -(लेखक मध्य भारतातील सातपुडा फाउंडेशन या स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष असून भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या, केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या, स्थायी समितीचे माजी सदस्य आहेत)मुंबई, दि. 17 - सध्या संपूर्ण भारत देश, वन्यप्राण्यांच्या हिंसेमुळे ढवळून निघाला आहे . शाळा-शाळांमधून पर्यावरण, वने व वन्यजीव संरक्षणाचे धडे घेणारे विद्यार्थी आपल्या आईवडिलांना असे का? असा प्रश्न विचारू लागले आहे. गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसेवर भक्कमपणे उभा झालेला भारत देश आज अचानक वन्यजीवांचे मुर्दे पाहून सुन्न झालाय. गव्हा-तांदळांमधील सोंडयांनाही वाचविण्याची संस्कृती जोपासलेला गुजराती समाज, प्रसंगी वृक्षांना कवटाळून चक्क मरणास सामोरा जाणारा राजस्थानचा बिष्णोई समाज, तर विषारी नागांची पूजा करणारी महाराष्ट्रीय जनता भारतीय संस्कृतीचे मानबिंदू ठरलेत! भारत देशामधील ही अहिंसक संस्कृती व त्यामुळे १२० कोटी लोकसंख्येतही, विकसित देशांनाही अशक्य असलेले सिंह, वाघ, हत्ती, गेंडे यांच्यासारख्या प्रजातींचे टिकून राहिलेले भारतातील अस्तित्व संपूर्ण जगात आज चर्चेचा व अभ्यासाचा विषय बनले!
=======================================
फेडरल बँकेचे व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय
- वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदी पाहून येथील फेडरल बँकेने आपले धोरणात्मक व्याजदर ‘यथास्थिती’ ठेवण्याचा निर्णय घेतला. फेडरल बँकेची दोनदिवसीय बैठक बुधवारी येथे पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत विकासाचा अंदाजही घटविण्यात आला.व्याजदर वाढविल्यास वृद्धीचा दर मंदावू शकतो, असा कयास व्यक्त करून व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय बँकेने घेतला.बँकेने म्हटले आहे, यंदा व्याजदरात दोनदा वाढ करण्याचा उद्देश कायम आहे. आर्थिक विकासाचे स्पष्ट संकेत मिळत नाहीत, तोवर व्याजदर वाढवले जाणार नाहीत, असे ‘फेड’च्या अध्यक्ष जेनेट येलेन म्हणाल्या.
=======================================
ब्रिटिश खासदार जो कॉक्स यांची हत्या
- ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 16 - ब्रिटनमध्ये विरोधी पक्ष लेबर पार्टीतल्या 41 वर्षीय महिला खासदार जो कॉक्स यांची हत्या झाली आहे. उत्तर इंग्लंड स्थित जो कॉक्स यांच्या परिसरातच त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर आधी चाकूने हल्ला केला आणि नंतर गोळी झाडण्यात आली. खासदारांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ही घटना ब्रिटिशच्या युरोपीय संघ सदस्यत्वाच्या पार्श्वभूमीवर घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.बीबीसीच्या माहितीनुसार हल्लेखोर हल्ला करून पसार झाले आहेत. या हल्ल्यात आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. यार्कशर पोलिसांनी 52 वर्षांच्या एक व्यक्तीला या हत्येप्रकरणी अटक केली आहे. या खासदार काही लोकांसोबत बैठक केली होती. कॉक्स इंग्लंडमध्ये होणा-या 23 जूनच्या जनमत संग्रहाच्या आधी ब्रिटेन युरोपीय संघात राहण्याचं समर्थन करत होत्या. खासदारांना एअर अँब्युलन्सनी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. गोळीबारानंतर रक्ताच्या थारोळ्यात कॉक्स रस्त्यावर पडल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीनं दिली आहे.
=======================================
दोनशे रुपये भाव मिळाल्याने महामार्गावर ओतला कांदा
| |
-
| |
येवला : आंदोलने झाली तरी सरकार कांद्याच्या पडलेल्या भावासंदर्भात काही निर्णय घ्यायला तयार नाही. यामुळे काल (गुरूवार) येथील बाजार समितीत क्विंटलला दोनशे रुपये भाव मिळाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी विंचूर चौफुलीवर कांदा ओतला. या वेळी घोषणा देऊन कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल हमीभावाची मागणी करण्यात आली.
राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे यांच्या कांद्याला काल (गुरूवार) बाजार समितीत दोनशे रुपये भाव मिळाला. इतर शेतकऱ्यांनादेखील असाच भाव मिळत असल्याने त्यांनी बाजार समितीतून कांदा ट्रक्टर आणत विंचूर चौफुलीवर कांदा ओतला. या आंदोलनामध्ये जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, शिवसेनेचे येथील नेते संभाजी पवार, मविप्रचे संचालक अंबादास बनकर सहभागी झाले. आंदोलनामुळे नाशिक, औरंगाबाद, नगर मार्गावर वाहतूक अर्धा तासाहून अधिक काळ विस्कळित झाली.
कांद्याच्या घसरत्या दराकडे कुणीही लक्ष देत नाही. कुणाचेही सरकार आले तरी शेतकऱ्यांची परवड सुरू असते. या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला असून, कांदा आता दोन रुपये किलोवर आला आहे. सरकारने तातडीने पावले उचलून दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, अशी मागणी या वेळी माणिकराव शिंदे यांनी केली.
=======================================
यांगून - भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांतील सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदावे यासाठी उभय देशांनी निर्धार व्यक्त केला असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांकडून येथे सांगण्यात आले. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष राजदूत म्हणून म्यानमारची राजधानी असलेल्या नॅ पि तॉला पहिल्यांदाच भेट देत आहेत. म्यानमारच्या परराष्ट्र मंत्री अॉंग सान सू की यांनी नुकतीच दोवल यांची भेट घेतली. त्या पार्श्वभूमीवर सीमेवरील सहकार्याची घोषणा करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या दोघांच्या भेटीत उभय देशांमधील भू-मार्गिय संपर्काच्या दूरगामी फायद्यांवरदेखील चर्चा झाल्याचे समजते. गतवर्षी जून महिन्यात भारत-म्यानमार सीमेवर भारतीय लष्कर आणि नागा बंडखोरांची संघटना असलेल्या एनएससीएनमध्ये चकमकी झाल्या होत्या. तथापि, आपल्या भूमीवर कुठल्याही विद्रोही गटाला थारा दिला जाणार नाही असे आश्वासन म्यानमार लष्कराकडून आता देण्यात आलेले आहे.
भारत म्यानमार संबंध बळकट होणार
| |
-
| |
या दोघांच्या भेटीत उभय देशांमधील भू-मार्गिय संपर्काच्या दूरगामी फायद्यांवरदेखील चर्चा झाल्याचे समजते. गतवर्षी जून महिन्यात भारत-म्यानमार सीमेवर भारतीय लष्कर आणि नागा बंडखोरांची संघटना असलेल्या एनएससीएनमध्ये चकमकी झाल्या होत्या. तथापि, आपल्या भूमीवर कुठल्याही विद्रोही गटाला थारा दिला जाणार नाही असे आश्वासन म्यानमार लष्कराकडून आता देण्यात आलेले आहे.
=======================================
मंत्र्यांकडूनच सरकारची प्रतिमा मलिन
| |
-
| |
मुंबई - मंत्र्यांकडूनच सरकारची प्रतिमा मलिन सत्तारूढ भाजपच्या मंत्र्यांकडूनच सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे वास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वीकारावे लागत आहे. रोज नवीन मंत्र्यांवरील आरोपांमुळे फडणवीस कमालीचे व्यथित झाले असून, ते पक्षश्रेष्ठींकडे याबाबत कैफियत मांडणार आहेत. विशेष म्हणजे, सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेच्या एकाही मंत्र्यांवर आतापर्यंत कोणतेही आरोप झाले नाहीत. विविध आरोपांपासून शिवसेनेचे मंत्री चार हात दूर असल्याचे चित्र आहे. भाजपच्या तब्बल दहा मंत्र्यांवर गैरव्यवहारांचे विविध आरोप झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पहिल्यांदा सरकार स्थापन झाले. शपथविधी झाल्यानंतर काही दिवसांनंतर शिवसेनेचा सत्तेत समावेश झाला. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर गेल्या 17-18 महिन्यांत भाजपच्या मंत्र्यांवर विविध प्रकारचे आरोप झाले. त्यामध्ये पक्षाचे सर्वांत ज्येष्ठ, अनुभवी आणि तब्बल 11 खात्यांचा कारभार सांभाळणारे एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. मंत्र्यांवरील आरोपांमुळे बेजार झालेल्या मंत्र्यांची पाठराखण करताना फडणवीस यांची दमछाक झाली आहे. रोज नवीन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे, गैरव्यहाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे.

नवी दिल्ली - आज (शुक्रवार) प्रदर्शित होणारा बहुचर्चित ‘उडता पंजाब‘ हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाल्यानंतर तो डाऊनलोड करण्यासाठीची लिंक इंटरनेटवरील तब्बल 732 संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याची माहिती तेलगु फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या पायरसी विरोधी शाखेने दिली आहे.
"सेन्सॉर बोर्डाकडे दिलेली प्रत हीच लीक झाली आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही‘, अशी माहिती तेलगु फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या पायरसी पथकाचे ए राज कुमार यांनी दिली. "उडता पंजाब‘मधील आक्षेपार्ह असलेली अनेक दृश्ये वगळण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने दिली होती. त्यावर नाराजी व्यक्त करत चित्रपट निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने केवळ एक दृश्य वगळण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र प्रदर्शनापूर्वीच दोन दिवस आधी बुधवारी या चित्रपटाची प्रत बेकायदेशीरपणे टॉरंट वेबसाईटस्वर अपलोड करण्यात आली होती. काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मसवर या चित्रपटातील काही दृश्यांची चित्रे अपलोड करण्यात आली होती. तसेच अपलोड करण्यात आलेली चित्रपटाची प्रत ही सेन्सॉरला पाठविलेली असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्सनी व्यक्त केल्या होत्या. दरम्यान चित्रपटाच्या टीमने युद्ध पातळीवर प्रयत्न करून लीक झालेला चित्रपट हटविण्यात यश मिळविले आहे.
दरम्यान तेलगु फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने हा चित्रपट आतापर्यंत 732 संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. तसेच हे सर्व संकेतस्थळ शोधून तेथून हा चित्रपट हटविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही चेंबरने म्हटले आहे. मुंबईमध्ये तर या चित्रपटाच्या पायरेटेड डीव्हीडीही विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यावर स्पष्टपणे "For Censor‘ असे इंग्रजीमध्ये लिहिल्याने आढळून आले आहे. या प्रकरणी चित्रपट निर्मात्यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे.
टॉरंट वेबसाईटस् म्हणजे काय?
डिजिटल स्वरुपात मोठ्या प्रमाणात (किंवा आकारात) असलेल्या माहितीचे (विविध स्वरुपातील फाईल्स) इंटरनेटवरून वितरण करण्यासाठीचे माध्यम म्हणजे टॉरंट साईटस्. या साईटस्वर गाणी, चित्रपट किंवा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम मोठ्या प्रमाणात अपलोड केले जातात. माहिती वितरणाच्या काही पद्धतींचा (उदा. वेब सर्व्हर, एफटीपी सर्व्हेर) वापर करताना, वितरण करणाऱ्या संगणक आणि नेटवर्कवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. अशा प्रकारचा ताण कमी करण्यासाठी टॉरंट साईटस्चा वापर करण्यात येतो.
'उडता पंजाब' 700 पेक्षा अधिक संकेतस्थळांवर!

भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास
| |
-
| |
लंडन - भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश मिळवून भारताने नवा इतिहास रचला आहे.
अंतिम स्पर्धेतील प्रवेशासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा महत्त्वाचा सामना गुरुवारी झाला. अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे किंवा बरोबरीत सोडविणे आवश्यक होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 4-2 ने पराभूत केलं. या पराभवामुळे भारताला ब्रिटन-बेल्जियम सामन्याकडे डोळे लावून बसावे लागले. तो सामना बरोबरीत सुटल्याने भारत अंतिम सामन्यात पोचला आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत एकदाही अंतिम सामन्यात पोहोचलेला नाही. 1982 साली नेदरलॅंडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने ब्रॉंझ पदक पटकावलं होतं. ही भारताची या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामिगरी होती.

कोची - आतापर्यंत शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करत होते. मात्र कोचीमधील एका विद्यापीठाने शैक्षणिक वर्षातील शिक्षकांचे मूल्यमापन करण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे. दरम्यान शिक्षकांच्या संघटनेने विरोध दर्शविल्याने या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.
कोचीमधील कोची विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने (कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी-कुसात) शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कामिगरीचे मूल्यमापन करण्याची संधी विद्यार्थ्यांनाच दिली आहे. विद्यार्थ्यांकडून शिक्षकांची वर्गातील कामगिरी, नियमित वर्ग, अभ्यासक्रमाची वेळेत पूर्तता, विषय शिकविताना प्रभावी संवादकौशल्य, विद्यार्थ्यांच्या शंकांचे केलेले समाधान आदी बाबींचा समावेश असणार आहे. "सत्र पद्धतीमध्ये (सेमिस्टर) विद्यार्थीच शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणार आहेत‘, अशी माहिती कुलगुरू जे. लेथा यांनी दिली. शिक्षकांच्या एकूण कामगिरीपैकी 30 टक्के हे विद्यार्थ्यांनी केलेल्या मूल्यमापनावर आधारित असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोचीमध्ये विद्यार्थीच करणार शिक्षकांचे मूल्यमापन

No comments:
Post a Comment