[अंतरराष्ट्रीय]
१- न्यूजर्सी; मेसी, निर्णय मागे घे, राष्ट्राध्यक्षांची विनंती
२- गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचं क्वोरा अकाउंट हॅक
३- लाहोर; तृतीयपंथीयांचा विवाह इस्लाम कायद्याने वैध
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- भारताला पाकिस्तानपासून सावध राहण्याची गरज : पंतप्रधान मोदी
५- अखेर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन कुमार पिल्लई मुंबई पोलिसांच्या ताब्यात
६- शाळेत प्रवेश घेताना मुलांना आधारकार्ड बंधनकारकच
७- सातव्या वेतन आयोगावर उद्या निर्णय ?
८- श्रीनगर; हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर चकमकीत ठार
९- संशोधनातून गायीच्या मूत्रात सापडले सोने
१०- राजन यांच्याबाबत बोलण्यास उशीर केला: काँग्रेस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- पोस्टरवॉर: शिवसैनिकांकडून आशिष शेलारांची शकुनी मामाशी तुलना
१२- लग्न ठरतंय म्हणून रेप केस मागे? पीडितेला कोर्टाने झापलं
१३- मुंबई एन्ट्री पॉइंट्ससह एक्स्प्रेस वे वर टोलबंदीचा विचार
१४- 'मोदीजी 15 लाख कधी जमा करताय?' - सामना
१५- हाजीअली दर्गा प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचं शनीदेवाला साकडं
१६- भाजपने उद्धव ठाकरेंना गंडवलं: पृथ्वीराज चव्हाण
१७- विमानात हवाई सुंदरीवर सेल्फीसाठी जबरदस्ती, प्रवाशाला अटक
१८- बिहार पोलिसांकडून बलात्कारपीडितेचे नाव जाहीर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- ठाण्यात बँकांत पैसे भरणाऱ्या कंपनीवर दरोडा, 12 कोटींची लूट
२०- 'फँड्री' चित्रपटातील कलाकाराला घरफोडी प्रकरणी अटक
२१- मद्यधुंद तरुणीचा वरळी पोलीस स्थानकात धिंगाणा, पोलिसांना शिवीगाळ
२२- नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई
२३- धुळे; बियाणे खरेदीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
२४- पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’
२५- तंझिल अहमद हत्या; प्रमुख आरोपी मुनीरला अटक
२६- मानेसर; गोमांस वाहूतक करणाऱ्यांना खाऊ घातले शेण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- वन डे रॅकिंगमध्ये टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर
२८- इरफान म्हणतो, रजनीकांतने पोस्टरची कल्पना चोरली, पण..
२९- महिनाअखेरीपर्यंत फ्रीडम 251 हातात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
===================================

कंपनीत हजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार चोरट्यांनी 12 कोटींची रक्कम पळवली, मात्र याला ठाणे पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाहीये.
ठाणे मेंटल हॉस्पिटल रोड जवळ एका सोसायटीत या कंपनीचं कार्यालय आहे. स्टँडर्ड चार्टर्ड, आयसीआयसीआय, येस बँक सारख्या नामवंत बँकांसाठी ही कंपनी काम करते.

पुणे पोलिसांनी योगेशसोबत त्याच्या 4 साथीरादांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 615 ग्रॅमचं सोने (यात अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने) 10 तोळे वजनाची सोन्याची लगड, त्याचप्रमाणे 496 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू (यात 13 नाणी) 13 चमचे, लक्ष्मीची मूर्ती, कॅमेरा, दोन मनगटी घड्याळे, सोने वितळवण्यासाठी वापरलेली मशीन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
क्वॉर्टर गेट सोसायटीमधील एका वकिलाच्या घरातील चोरीचा तपास सुरु होता. काही तरुण पिंपरीत सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी 5 जणांना बेड्या ठोकल्या.
योगेशने फँड्री चित्रपटातत शाळेतल्या एका विद्यार्थ्याची छोटीशी भूमिका केली होती. विशेष म्हणजे जब्याच्या भूमिकेसाठी आपली ऑडिशन झाल्याचंही तो म्हणतो. याशिवाय तंबाखु विरोधी प्रतिज्ञा आणि प्रिझम या लघुपटातही त्याने काम केलं आहे. अर्धवट राहिलेलं शिक्षण आणि वाईट संगत, पैशाच्या हावेतून तो गुन्ह्यात अडकल्याचं त्याने सांगितलं.

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्गात शिकणाऱ्या एका तरुणीने दोन वर्षांपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्यावर आरोपपत्रही दाखल केलं. मात्र अचानक लग्नाची मागणी येऊ लागल्यामुळे मुलीनं बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याची इच्छा कोर्टासमोर व्यक्त केली. त्यामुळे संतापलेल्या हायकोर्टानं तक्रारदार पक्षाला चांगलंच धारेवर धरलं आहे.
एकीकडे महिलांवर होत असलेल्या अत्याचारांची चर्चा होते. फिर्यादीप्रमाणे पोलिस गुन्हा नोंदवतात, तपास करतात, चार्जशीट दाखल होते आणि अचानक पीडित व्यक्ती जर काही प्रलोभनांना भुलून गुन्हा रद्द करण्याची मागणी करत असेल तर समाजावर त्याचे फार गंभीर परिणाम होतील, असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे

टोल बंद करण्याबाबातचा अहवाल सरकारला मिळाला असून त्याबाबत येत्या 6 ते 7 महिन्यात योग्य तो निर्णय घेऊ, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात वित्त विभागाशी अधिक चर्चा सुरु आहे.
या प्रस्तावित टोलमुक्तीतून केवळ छोट्या वाहनांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनांमध्ये 85 टक्के लहान गाड्यांचा समावेश असल्यामुळे याचा भार सरकारवर पडण्याची शक्यता आहे. सरकारच्या तिजोरीवर यामुळे वर्षाला 250 कोटींचा बोजा पडू शकतो.

रजनीकांतच्या ‘कबाली’ चित्रपटाचं पोस्टर इरफान खानच्या आगामी ‘मदारी’ चित्रपटावरुन ढापल्याचं खुद्द इरफाननेच म्हटलं आहे. मात्र यावर आपली काहीच हरकत नसून चाहत्यांनी दोन्ही सिनेमा पाहावेत, असं आवाहनही इरफानने केलं आहे.
‘मला आधी याबाबत काहीच कल्पना नव्हती. आम्ही तर छोटेसे फिल्ममेकर आहोत. पण सुपरस्टार रजनी यांच्या कबाली चित्रपटाचं पोस्टर आमच्या मदारी सिनेमाच्या पोस्टरवरुन प्रेरित असल्याचं मी पाहिलं. आता तुम्हीच दोन्ही पोस्टर पाहा ना. पण त्यात काय झालं. तुम्ही आमचाही सिनेमा पाहा आणि त्याचाही सिनेमा पाहा.’ असं इरफानने प्रांजळपणे म्हटलं आहे.
दोन्ही चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मुख्य नायकाचा चेहरा दिसत आहे. तर टोलेजंग इमारती त्यांच्या चेहऱ्यावर आडव्या आहेत. मदारी चित्रपटाचं पोस्टर अधिकृत असून, कबालीचं मात्र फॅन्सनी तयार केलेलं असल्याचं म्हटलं जातंय. कबालीची असंख्य पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.

ऑवरमाइननं या महिन्यात टेक सीईओचे अकाउंट हॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. याआधील ट्विटरचे सहसंस्थापक आणि पूर्व मुख्य कार्यकारी अधिकारी इवान बिलियम्सचं अकाउंट हॅक केलं होतं.
आतापर्यंत हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही की, हे अकाउंट नेमके कसे हॅक केले जातात. तर या हॅकर्सचा दावा आहे की, ते ब्राउजरमधून वेगवेगळ्या प्रकारे पासवर्ड काढतात.

ठाण्यात बँकांत पैसे भरणाऱ्या कंपनीवर दरोडा, 12 कोटींची लूट
ठाणे : बँकांमध्ये पैसे पुरवणाऱ्या चेकमेट प्रायव्हेट सर्विसेस या कंपनीवर आज पहाटे सशस्त्र दरोडा पडलाय. तीन हात नाका परिसरात आज पहाटे 4 वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे.
7 ते 8 इसमांनी चाकू, चॉपर, बंदुकीचा धाक दाखवून लूट केल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर चोरट्यांनी सीसीटीव्हीसह पोबारा केला आहे. हा प्रकार घडला तेव्हा कंपनीत दोन सुरक्षा कर्मचारी हजर होते.
कंपनीत हजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार चोरट्यांनी 12 कोटींची रक्कम पळवली, मात्र याला ठाणे पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाहीये.
ठाणे मेंटल हॉस्पिटल रोड जवळ एका सोसायटीत या कंपनीचं कार्यालय आहे. स्टँडर्ड चार्टर्ड, आयसीआयसीआय, येस बँक सारख्या नामवंत बँकांसाठी ही कंपनी काम करते.
===================================
मेसी, निर्णय मागे घे, राष्ट्राध्यक्षांची विनंती
न्यूजर्सी : गेल्या दशकभरापासून फुटबॉल चाहत्यांच्या गळ्यातलं ताईत बनलेला अर्जेंटिनाचा सुपरस्टार लायनेल मेसीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली.
कोपा अमेरिकात चिलीविरुद्ध सामन्यात अर्जेंटिनाला पराभव स्वीकारावा लागला. अर्जेंटिनाला गेल्या तीन वर्षांत तीन मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि त्याच नैराश्येतून लायनेल मेसीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम ठोकला.
मेसीच्या या निर्णयामुळं क्रीडाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच अर्जेंटिनाचे अध्यक्ष मॉरिसियो मॅक्री यांनी मेसीला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीनंतर मेसी निर्णय मागे घेणार का याकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र अद्याप मेसीकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही.
===================================
पोस्टरवॉर: शिवसैनिकांकडून आशिष शेलारांची शकुनी मामाशी तुलना
मुंबई: शिवसेना आणि भाजपविरोधातला शाब्दिक वाद आता रस्त्यावर आला आहे. कारण शिवसैनिकांनी आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पुतळ्याचं दहन केलं. आशिष शेलार हे युतीमधील ‘शकुनी मामा’ असल्याची घोषणाबाजी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे.
चर्चगेट रेल्वे स्टेशनजवळ शिवसैनिकांनी भाजपविरोधात हे आंदोलन केलं. यापूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली. पण आता थेट रस्त्यावर शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत.
याचबरोबर शिवसैनिकांनी काही पोस्टरही झळकावले. यामध्ये शेलारांना शकुनी मामा म्हटलं आहे. तर अमित शाहा हुकूमशहा गब्बर सिंह असल्याचे पोस्टर तयार करण्यात आले आहेत.
===================================
'फँड्री' चित्रपटातील कलाकाराला घरफोडी प्रकरणी अटक
पुणे : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटात भूमिका केलेल्या एका कलाकाराला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. योगेश चौधरी असं आरोपीचं नाव असून त्यांनी फँड्रीशिवाय अनेक शॉर्टफिल्ममध्येही काम केलं आहे.
पुणे पोलिसांनी योगेशसोबत त्याच्या 4 साथीरादांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 615 ग्रॅमचं सोने (यात अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने) 10 तोळे वजनाची सोन्याची लगड, त्याचप्रमाणे 496 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू (यात 13 नाणी) 13 चमचे, लक्ष्मीची मूर्ती, कॅमेरा, दोन मनगटी घड्याळे, सोने वितळवण्यासाठी वापरलेली मशीन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
क्वॉर्टर गेट सोसायटीमधील एका वकिलाच्या घरातील चोरीचा तपास सुरु होता. काही तरुण पिंपरीत सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी 5 जणांना बेड्या ठोकल्या.
योगेशने फँड्री चित्रपटातत शाळेतल्या एका विद्यार्थ्याची छोटीशी भूमिका केली होती. विशेष म्हणजे जब्याच्या भूमिकेसाठी आपली ऑडिशन झाल्याचंही तो म्हणतो. याशिवाय तंबाखु विरोधी प्रतिज्ञा आणि प्रिझम या लघुपटातही त्याने काम केलं आहे. अर्धवट राहिलेलं शिक्षण आणि वाईट संगत, पैशाच्या हावेतून तो गुन्ह्यात अडकल्याचं त्याने सांगितलं.
===================================
मद्यधुंद तरुणीचा पोलीस स्थानकात धिंगाणा, पोलिसांना शिवीगाळ
मुंबई: वरळी पोलिस स्टेशनमध्ये मद्यधुंद अवस्थेत सहा पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे. 16 जूनला ही घटना घडली होती.
16 जूनच्या रात्री पोद्दार रुग्णालयासमोर आपल्या मित्रांसोबत जात असताना या तरुणीची कार दुभाजकाला आदळली. पोलिसांनी चौकशी केली असता गाडीतील सर्व जण दारु प्यायले असल्याचं समोर आलं.
या सर्वांची पोलिस स्टेशनमध्ये चौकशी करत असताना या तरुणीने जोरजोरात आरडाओरड करत धिंगाणा घालायला सुरुवात केली. इतकंच नाही तर या तरुणीने ड्युटीवर असलेल्या सहा पोलिसांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली. यावेळेस काही पोलिसांना तिने चावाही घेतला असल्याचं समजतं आहे.
===================================
वन डे रॅकिंगमध्ये टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर
मुंबई: टीम इंडियानं आयसीसीच्या वन डे क्रमवारीत तिसरं स्थान कायम राखलं आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडियानं निर्भेळ यश मिळवलं होतं. त्यामुळं भारताच्या खात्यात 110 गुण जमा झाले आहेत.
तिकडे वेस्ट इंडिजमधल्या तिरंगी मालिकेत विजय मिळवणारा ऑस्ट्रेलियाच्या संघ 123 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचा संघ 113 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
वेस्ट इंडिजमधल्या तिरंगी मालिकेतल्या खराब कामगिरीचा फटका दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बसलाय. दक्षिण आफ्रिकेची तिसऱ्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
===================================
लग्न ठरतंय म्हणून रेप केस मागे? पीडितेला कोर्टाने झापलं
मुंबई : बलात्काराचा आरोप म्हणजे चेष्टा आहे का, असा सवाल मुंबई हायकोर्टानं एका बलात्कार पीडितेला विचारलाय. केवळ पीडितेची इच्छा आहे म्हणून बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचा खटला रद्द करता येत नाही, असे खडे बोलही हायकोर्टानं पीडित तरुणीला सुनावले आहेत.
एमबीबीएसच्या शेवटच्या वर्गात शिकणाऱ्या एका तरुणीने दोन वर्षांपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्यावर आरोपपत्रही दाखल केलं. मात्र अचानक लग्नाची मागणी येऊ लागल्यामुळे मुलीनं बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याची इच्छा कोर्टासमोर व्यक्त केली. त्यामुळे संतापलेल्या हायकोर्टानं तक्रारदार पक्षाला चांगलंच धारेवर धरलं आहे.
एकीकडे महिलांवर होत असलेल्या अत्याचारांची चर्चा होते. फिर्यादीप्रमाणे पोलिस गुन्हा नोंदवतात, तपास करतात, चार्जशीट दाखल होते आणि अचानक पीडित व्यक्ती जर काही प्रलोभनांना भुलून गुन्हा रद्द करण्याची मागणी करत असेल तर समाजावर त्याचे फार गंभीर परिणाम होतील, असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे
===================================
मुंबई एन्ट्री पॉइंट्ससह एक्स्प्रेस वे वर टोलबंदीचा विचार
मुंबई : आगामी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकार मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल बंद करण्याच्या विचारात आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉइंट्ससोबतच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर असणाऱ्या टोलचाही यात समावेश असणार आहे.
टोल बंद करण्याबाबातचा अहवाल सरकारला मिळाला असून त्याबाबत येत्या 6 ते 7 महिन्यात योग्य तो निर्णय घेऊ, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात वित्त विभागाशी अधिक चर्चा सुरु आहे.
या प्रस्तावित टोलमुक्तीतून केवळ छोट्या वाहनांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनांमध्ये 85 टक्के लहान गाड्यांचा समावेश असल्यामुळे याचा भार सरकारवर पडण्याची शक्यता आहे. सरकारच्या तिजोरीवर यामुळे वर्षाला 250 कोटींचा बोजा पडू शकतो.
===================================
इरफान म्हणतो, रजनीकांतने पोस्टरची कल्पना चोरली, पण..
मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांच्या पोस्टरच्या कल्पना या हॉलिवूड किंवा इतर परभाषिक चित्रपटांच्या पोस्टरवरुन चोरल्याचं ऐकायला मिळतं. आता मात्र बॉलिवूडच्या पोस्टरची संकल्पना सुपरस्टार रजनीकांतच्या सिनेमासाठी वापरल्याचं म्हटलं जात आहे.
रजनीकांतच्या ‘कबाली’ चित्रपटाचं पोस्टर इरफान खानच्या आगामी ‘मदारी’ चित्रपटावरुन ढापल्याचं खुद्द इरफाननेच म्हटलं आहे. मात्र यावर आपली काहीच हरकत नसून चाहत्यांनी दोन्ही सिनेमा पाहावेत, असं आवाहनही इरफानने केलं आहे.
‘मला आधी याबाबत काहीच कल्पना नव्हती. आम्ही तर छोटेसे फिल्ममेकर आहोत. पण सुपरस्टार रजनी यांच्या कबाली चित्रपटाचं पोस्टर आमच्या मदारी सिनेमाच्या पोस्टरवरुन प्रेरित असल्याचं मी पाहिलं. आता तुम्हीच दोन्ही पोस्टर पाहा ना. पण त्यात काय झालं. तुम्ही आमचाही सिनेमा पाहा आणि त्याचाही सिनेमा पाहा.’ असं इरफानने प्रांजळपणे म्हटलं आहे.
दोन्ही चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मुख्य नायकाचा चेहरा दिसत आहे. तर टोलेजंग इमारती त्यांच्या चेहऱ्यावर आडव्या आहेत. मदारी चित्रपटाचं पोस्टर अधिकृत असून, कबालीचं मात्र फॅन्सनी तयार केलेलं असल्याचं म्हटलं जातंय. कबालीची असंख्य पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.
रजनीकांतने कबाली चित्रपटाचं शूटिंग सुरु झाल्यानंतर दोन पोस्टर शेअर केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रजनीने ट्विटरवर ही पोस्टर्स पोस्ट केली होती.
===================================
'मोदीजी 15 लाख कधी जमा करताय?', सामनातून सेनेचा थेट सवाल
मुंबई: ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी आश्वासन दिल्याप्रमाणं आमच्या खात्यात 15 लाख कधी जमा करणार?’ असा सवाल करत सामनानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीवरच टीकास्त्र सोडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सामनातून भाजपच्या नेत्यांवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. आजही सामनाच्या अग्रलेखातून मोदींना लक्ष केलं आहे.
विरोधक 15 लाख जमा होण्याच्या नावानं सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळं नागरिकांच्या खात्यात 15 लाख जमा करुन मोदींना विरोधकांना शांत करायला हवे असं ही सामनामधून म्हटलं आहे.
एवढंच नाही तर काळा पैसा भारतात आणण्याचं आश्वासनही मोदींनी पूर्ण करायला हवं असंही सामनात म्हटलं आहे
===================================
हाजीअली दर्गा प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचं शनीदेवाला साकडं
फाईल फोटो
मुंबई: हाजीअली दर्गा प्रवेशाचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई चक्क शनीदेवालाच आता साकडं घातलं आहे.
हाजीअली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी मुंबईत तृप्ती देसाईंनी आंदोलन केलं होतं. ज्याला एमआयएम आणि काही मुस्लीम संघटनांनी प्रचंड विरोध केला होता. यानंतर काही संघटनांनी दर्गा प्रवेशाबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्याच्यावर आज निकाल येणं अपेक्षित आहे.
हा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी आपण शनी-शिंगणापूरला जाऊन तृप्ती देसाईंनी दर्शन घेतलं. त्यामुळे शनीदेव तृप्ती देसाईंच्या हाकेला धावून जातात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
===================================
भाजपने उद्धव ठाकरेंना गंडवलं: पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : भाजपने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना गंडवलं आहे, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सेना-भाजप वादावर म्हणाले. शिवाय, राजस्थानमध्ये मायावतींनी जसं दबाव वापरुन काँग्रेसकडून मंत्रिपदं घेतली, ते उदाहरण उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवायला हवं होतं, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात बोलत होते.
पवारांवर बोलण्यास नकार, मात्र राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष निशाणा
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर बोलणार नाही, असे म्हणत शरद पवारांच्या संभाराजेंच्या खासदारकीवरील वक्तव्यावर बोलण्यास पृथ्वीराज चव्हाण यांनी टाळलं. मात्र, अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेस हा एका समूहाचा पक्ष आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस हा काही राज्यव्यापी पक्ष नाही. एका ठराविक प्रदेशापुरता मर्यादित आहे.” असे म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशामा साधला.
===================================
भारताला पाकिस्तानपासून सावध राहण्याची गरज : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी अनेकदा प्रयत्न करुनही संबंध सुधारताना दिसत नाहीत. त्याचसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना मोठं विधान केलं. “भारताला पाकिस्तानपासून सावध राहण्याची गरज आहे. दहशतवाद्यांसंबंधी भारताची भूमिका आता जगालाही समजू लागली आहे.”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘टाईम्स नाऊ’च्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यात आला की, “आता या क्षणी लक्ष्मण रेषा काय आहे, जी पाकिस्तानने ओलांडली नाही, तर राजकीय स्तरवारील चर्चा कशी होऊ शकते?”
या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानसोबत लक्ष्मण रेषेची चर्चा कुणाशी कराल? निवडून आलेल्या सरकारसोबत की अन्य कोणाशी? त्यामुळे भारतालाच आता सावध राहण्याची गरज आहे. प्रत्येक क्षण सतर्क राहावं लागेल आणि यामध्ये अजिबात ढिसाळपणा चालणार नाही. मात्र, माझे सातत्याचे प्रयत्न आणि लाहोरमध्ये जाणं, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भारतात बोलावणं, यावरुन आता जगालाही कळू लागलं आहे की, भारताची भूमिका काय आहे. त्यामुळे आता जागतिक स्तरावर उत्तर देणं पाकिस्तानला कठीण जात आहे. जग कधीच भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला समजून घेत नव्हतं. जगाला कायम वाटायचं की, भारताच्या कायदा-सुव्यवस्थेतच दोष आहेत. मात्र, आता जगाला भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका ऐकून घ्यावी लागते.”
===================================
अखेर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन कुमार पिल्लई मुंबई पोलिसांच्या ताब्यात
मुंबईः भारताबाहेर राहून मुंबईत तब्बल दोन दशकं आपली गँग चालवणारा अंडरवर्ल्ड डॉन कुमार पिल्लई याला भारतात आणण्यात येत आहे. सिंगापूर एअरपोर्टवर 6 महिन्यांपूर्वी पिल्लईला अटक करण्यात आली होती.
मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस पिल्लईला आज रात्री भारतात आणत आहेत. पिल्लईला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. पिल्लईचे एलटीटीई प्रमुख प्रभाकरणशी खास संबंध होते, ज्यामुळे त्याने एवढे दिवस अंडरवर्ल्डमध्ये आपला दबदबा कायम ठेवला.
अशी झाली अटक
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पिल्लईने अंडरवर्ल्डमध्ये पाऊल ठेवलं. उच्चशिक्षित असलेल्या पिल्लईने 1980 च्या दशकात हत्या, हेराफेरी, खंडणी वसूली अशा गुन्ह्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला.
पिल्लई अनेक वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता मात्र, मागील वर्षी हाँगकाँग येथून सिंगापूरला जाताना त्याला सिंगापूर पोलिसांनी अटक केली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
===================================
शाळेत प्रवेश घेताना मुलांना आधारकार्ड बंधनकारकच
पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रं - आधार कार्ड
मुंबई : शाळेत प्रवेश घेताना लहान मुलांना आधारकार्ड सक्तीचं करू नये, अशी मागणी करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
एका सेवाभावी संस्थेतर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, लहान मुलांना शाळेत दाखला घेताना आधार नंबर सक्तीचा करू नये अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली होती. तसेच प्रत्येक लहान मुलाला आधारकार्ड बनवण्यासाठी घेऊन जाणं शक्य नसल्याचंही याचिकाकर्त्यांनी म्हटल होते.
राज्य सरकारनं साल 2015 एक अध्यादेश जारी करत शाळेत दाखला घेताना आधारकार्ड सक्तीचं केल होतं. आधारकार्ड नंबर प्रवेश देताना शाळेकडून नोंदवला गेला तर राज्यातील प्रत्येक मुलाला त्याचा शिक्षणाचा मुलभूत अधिकार मिळतोय की नाही यावर देखरेख ठेवणे शक्य होईल, असं राज्य सरकारच्यावतीनं स्पष्ट करण्यात आल होतं. त्याचबरोबर सातत्यानं प्रत्येकासाठी आधारकार्ड बनवण्याकरता वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. ज्यामुळे प्रत्येकाला आधारकार्ड बनवण सोप जाव. या गोष्टी योग्य ठरवत न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सय्यद यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.
===================================
नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई
नवी मुंबईः महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका सुरूच आहे. मुंढे यांनी शहरातील झुणका भाकर केंद्राना सील ठोकलं आहे. महाराष्ट्र शासनामार्फत झुणका भाकर केंद्रांच्या जागा ताब्यात घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या. त्यानंतर मुंढे यांनी नवी मुंबईमध्ये ही कारवाई केली आहे.
शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या झुणका भाकर योजना बंद झाल्यामुळे राज्य शासनाने 27 जून 2000 च्या परिपत्राकाव्दारे झुणका भाकर केंद्र ताब्यात घेण्यासाठी संबंधित प्राधिकरणांना सूचना दिल्या होत्या. काही झुणका भाकर केंद्र संचालकांनी राज्य शासनाच्या या निर्णयाविरुध्द न्यायालयात याचिका दाखल केल्या.मात्र न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे झुणका भाकर केंद्राच्या जागा ताब्यात घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत.
झुणका भाकर केंद्रांच्या जागी हॉटेल
महापालिकेच्या मालमत्ता विभागाने महापालिका क्षेत्रातील 20 झुणका भाकर केंद्रांना सील ठोकलं आहे.तर 2 केंद्रांना नोटीस बजावली आहे. एका केंद्रचालकाने सदरची जागा खाजगी असून सिडकोने त्यांना ॲमनेस्टी योजनेअंतर्गत वापरासाठी दिली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या जागेबाबत कायदेशीर खातरजमा करण्यात येत आहे.
===================================
बियाणे खरेदीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
धुळे : बियाणे खरेदीसाठी पैसे नसल्याने, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या भाऊसाहेब फकिरा ठाकरे या 46 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली.
भाऊसाहेब आज सोमवारी सकाळी 9 ते 11 वाजेच्यादरम्यान नामपूर येथे बियाणं खरेदीला जात असल्याचं सांगून घराबाहेर निघाले. त्यांनी नामपूर येथे काही बियाणं विक्रेत्यांकडे उधारीवर बियाणं देण्याची मागणी केली. मात्र, त्यांची ही मागणी बियाणं विक्रेत्यांनी धुडकावून लावली, त्यामुळे हताश झालेल्या भाऊसाहेबांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.
भाऊसाहेबांचे 1 हेक्टर 80 एकर शेतजमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळीस्थितीमुळे शेतातील विहरीला पाणी नाही, 50 पैसे पेक्षा कमी आणेवारी जाहीर झालेली असतांनादेखील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शासकीय मदत पोहचलीच नाही. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने स्वतःची दोन्ही मुलं परराज्यात रोजगारासाठी पाठली.
यंदा भरपूर पाऊस होणार, या हवामान विभागाच्या अंदाजाने भाऊसाहेब फकिरा पाटील यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला, मात्र बियाणं खरेदीसाठी पैसा नसल्याने हताश झालेल्या भाऊसाहेबांनी आपली जीवन यात्रा संपवली.
===================================
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचं क्वोरा अकाउंट हॅक
न्यूयॉर्क: ज्या हॅकर्सच्या टीमनं फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचं ट्विटर आणि पिनटरेस्टचं अकाउंट हॅक केलं होतं. त्याच हॅकर्सनं आता गुगलचे सीईओ सुंदर पीचाई यांचं Q&A वेबसाइट क्वोराचं अकाउंट हॅक केलं.
मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी ही गोष्ट समोर आली. रविवारी रात्री उशीरा पिचाईचं अकाउंट हॅक केल्यानंतर ऑवरमाइन नामक एका हॅकिंग टिमनं पिचाईचं अकाउंटवरुन क्वारोवर एक मेसेज टाकला. तसेच क्वोरावरुन पिचाईंची ट्विटर अकाउंटही जोडलं. ज्यामध्ये ऑवरमाइन यांनी आपल्या हॅकिंगनं पिचाईंच्या 5,080,000 फॉलोअरपर्यंत प्रचार केला.
ऑवरमाइननं या महिन्यात टेक सीईओचे अकाउंट हॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. याआधील ट्विटरचे सहसंस्थापक आणि पूर्व मुख्य कार्यकारी अधिकारी इवान बिलियम्सचं अकाउंट हॅक केलं होतं.
आतापर्यंत हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही की, हे अकाउंट नेमके कसे हॅक केले जातात. तर या हॅकर्सचा दावा आहे की, ते ब्राउजरमधून वेगवेगळ्या प्रकारे पासवर्ड काढतात.
पिचाई यांचं क्वोरा अकाउंट हॅक झाल्यानंतर क्वोरानं आपल्या यूजर्सना पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे. काही महिन्यापूर्वीच लिंक्डइनचं ही अकाउंट हॅक करण्यात आलं होतं.
===================================
सातव्या वेतन आयोगावर उद्या निर्णय ?
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २८ - सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारप्राप्त सचिवांच्या समितीने आपला अंतिम अहवाल तयार केला आहे. अर्थसचिव अशोक लावासा यांनी ही माहिती दिली. २९ जून म्हणजे उद्या होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होऊ शकते.सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात कॅबिनेट सचिव पी.के.सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती. ४७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५२ लाख निवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.सातव्या वेतन आयोगाने नोव्हेंबर महिन्यात आपला शिफारशींचा अहवाल केंद्र सरकारकडे सोपवला. या अहवालात केंद्रीय कर्मचा-यांच्या वेतनात २३.६ टक्क्यांची वाढ सूचवली आहे.
===================================
विमानात हवाई सुंदरीवर सेल्फीसाठी जबरदस्ती, प्रवाशाला अटक
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २८ - दमन-मुंबई विमान प्रवासात हवाई सुंदरीवर सेल्फीसाठी जबरदस्ती करणा-या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अबुबाकर (२९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जेट एअरवेजच्या विमानाने गुजरातमधील दमन येथून मुंबईला येत असताना अबुबाकरने हवाईसुंदरीच्या इच्छेविरुद्ध सेल्फी घेतली त्यानंतर प्रसाधनगृहात जाऊन धुम्रपान करुन नियमांचे उल्लंघ केले.विमानाने मुंबई विमानतळावर लँण्ड केल्यानंतर अबुबाकरला अटक करण्यात आली. हवाई सुंदरीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार विमानात असताना अबु बाकरने तिचा हात पकडला व 'चलो ना यार एक सेल्फी लेते हैं' असे म्हटले. मी आक्षेप घेऊनही संपूर्ण प्रवासात त्याची माझ्याबरोबर गैरवर्तणूक सुरु होती. अबुबाकरने सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिने सरळ नकार दिला व आपल्या आसनावर बसली.पण अबुबाकर तिथून हलला नाही. तो तिच्या मागेच उभा होता. जेव्हा हवाईसुंदरी आपल्या आसनावरुन उठली तेव्हा अबुबाकरने हद्दच केली. त्याने सरळ तिच्या दंडाला धरले व सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु लागला. हवाई सुंदरीने आरडाओरडा केल्यानंतर केबिन क्रू चे सदस्य तिथे आले व त्यांनी सुटका केली. कलम ३५४ आणि ३३६ अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, तो न्यायालयिन कोठडीत आहे.
===================================
पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’
- साहेबराव नरसाळेअहमदनगर : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अकोले तालुका म्हणजे नगर जिल्ह्याचे ‘काश्मीरच’... अनोखं निसर्गसौंदर्य, काजवा महोत्सव आणि अशा अनेक गोष्टींनी समृद्ध असलेले हे शहर म्हणजे सर्व ऋतुंमध्ये पिकनिकसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे...हिरव्यागार वनराईच्या कुशीतून शेकडो फूट उंचावरुन फेसाळत वाहणा-या पांढ-याशुभ्र धबधब्यांची मालिका, थंडगार झोंबणारा वारा, कधी रिमझिम तर कधी तुफान कोसळणारा पाऊस आणि लगेचच शुभ्र धुक्यांनी लपेटून घेतलेले रस्ते, या रस्त्यांच्या खाली उतरले तर पायाखाली अवतरतात हिरवेगार गालिचे. हे निसर्गसौंदर्य पाहत पुढे चालत असतानाच हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग-मदन-कुलंग ही पवर्तराजी आपल्यातील साहसाला आव्हान देतच आपल्या पुढय़ात उभी ठाकत़ अशा या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचा असेल आणि काजवा महोत्सव पहायचा असेल तर अकोलेला जायलाच हवे.सर्वात उंच म्हणजे 1646 मीटर उंचीवरील कळसुबाईचे शिखर, सर्वाधिक पावसाचे ठिकाण रतनवाडी-घाटघरही अकोले तालुक्यातच. येथील निसर्गसौंदर्य बहरते ते पावसाळ्यात, तेव्हाचा जलोत्सव आणि ऑक्टोबरनंतरचा फुलोत्सव तर जूनमधील काजवा महोत्सव पाहण्यासाठी निसर्गपर्यटकांची पावले अकोलेची वाट धरतात.अनेकजण फक्त भंडारदरा, रंधा धबधबा, कळसुबाई, रतनगड-घाटघर हे स्पॉट पाहून माघारी फिरतात. भैरवगड, बाबरगड, पट्टा किल्ला, बितनगड अशी ठिकाणेही आपल्यातील साहसाला आव्हान देत उभी ठाकलेली आहेत.
===================================
पाटना (बिहार) - बिहार पोलिसांनी बलात्कारपीडित महिलेचे नाव सोशल मिडियावर जाहीर केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून त्यातून बिहार पोलिसांची असंवेदनशीलता समोर येत असल्याची टीका करण्यात येत आहे.
बिहारमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबात शुभ्रस्था नावाच्या महिलेने मुख्यमंत्र्यांना जाहीर पत्र लिहिले होते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हे पत्र गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले. बिहार पोलिसांनी लिहिलेले उत्तर सोशल मिडियावर पोलिसांच्या अधिकृत पेजवर जाहीर केले. त्या उत्तरातून एक गंभीर चूक समोर आली आहे. पोलिसांनी एका बलात्कारपीडित महिलेचे नाव आणि पत्ता त्या पत्रात लिहिले होते. त्यावरून बिहार पोलिसांवर टीका करण्यात येत आहे. महिला आयोगाच्या माजी सदस्य शमिना शफीक यांनी हे व्यवस्थेचे अपयश असल्याचे म्हटले आहे. तर संयुक्त जनता दलाचे नेते श्याम रजक यांनी अशा प्रकारांना गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकाराच्या चौकशी व्हायला हवी असेही म्हटले आहे. चूक लक्षात आल्याने बिहार पोलिसांनी अल्पावधीतच सोशल मिडियावरून संबंधित पोस्ट हटविली आहे.
बिहार पोलिसांकडून बलात्कारपीडितेचे नाव जाहीर!
| |
-

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर चकमकीत ठार
| |
-
| |
श्रीनगर - काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आज (मंगळवार) सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा स्थानिक कमांडर ठार झाला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील नागरी गावाजवळ आज सकाळी झालेल्या चकमकीत हिज्बुलचा स्थानिक कमांडर समीर वाणी हा ठार झाला आहे. एका घरात तो लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांना घराला लक्ष्य केले. त्यावेळी त्याने गोळीबार सुरु केला. सुरक्षा रक्षकांनी प्रत्युतरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असून, शोधमोहिम राबविण्यात येत आहे.
काश्मीरमधील पम्पोरमध्ये नुकतेच दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या बसला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात आठ जवान हुतात्मा झाले होते.
===================================
तंझिल अहमद हत्या; प्रमुख आरोपी मुनीरला अटक
| |
-
| |
नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारी तंझिल अहमद आणि त्यांच्या पत्नीच्या हत्येप्रकरणातील प्रमुख सूत्रधार मुनीर याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुनीरला गाझियाबादमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून 9 एमएमच्या तीन पिस्तुल जप्त करण्यात आली आहेत. मुनीरची मालमत्ता पोलिसांनी नुकतीच सील केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असली, तरी प्रमुख संशयित आरोपी मुनीर हा फरारी होता. त्याच्या शोधासाठी तपास पथके तयार करत, लवकरच तो जाळ्यात येईल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली होती. अखेर पोलिसांच्या हाती तो लागला असून, त्याच्याकडून हत्येबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे.
तंझील अहमद हे आपल्या कुटुंबासोबत एका लग्न समारंभासाठी गेले होते. ते साहसपूर या आपल्या गावी परतत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी अहमद यांच्यावर तब्बल 24 गोळ्या झाडल्या आणि त्यांच्या पत्नी फरझाना यांना चार गोळ्या लागल्या. दरम्यान, वॅगन-आर मोटारीत मागील सीटवर बसलेली त्यांची 14 वर्षे वयाची मुलगी आणि 12 वर्षे वयाचा मुलगा सुदैवाने या हल्ल्यातून बचावले. उपचारादरम्यान त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला होता.
===================================
जुनागढ - जुनागढ कृषी विद्यापीठाने (जेएयू) गायीच्या मूत्रावर केलेल्या संशोधनातून गीर जातीच्या गायीच्या मूत्रात सोने असल्याचे समोर आले आहे. जेएयूमधील शास्त्रज्ञांनी गीर जातीच्या 400 गायींचा अभ्यास केला. जेएनयूतील अन्न चाचणी प्रयोगशाळेत गायीचे मूत्र तपासण्यात आले.
संशोधनातून गायीच्या मूत्रात सापडले सोने
| |
-
| |
गायीच्या एक लिटर मूत्रामध्ये तीन ते दहा मिलिग्रॅम सोने असल्याचे आढळून आले आहे. मूत्रामध्ये पाण्यात विरघळणारे अत्यंत मौल्यवान असे सोन्याचे क्षार शास्त्रज्ञांना सापडले आहेत. ‘आतापर्यंत आपण गायीच्या मूत्रामध्ये वैद्यकीय गुणधर्म आणि सोने असल्याचे प्राचीन साहित्यामधून ऐकले आहे. मात्र अद्यापपर्यंत सविस्तर शास्त्रीय विश्लेषण करून ते सिद्ध करण्यात आले नव्हते. त्यामुळे आम्ही गायीच्या मूत्रावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला. आम्ही गीर गायीच्या मूत्राचे 400 नमुने तपासले आणि आम्हाला त्यात सोने आढळून आले‘, अशी माहिती संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. बी. ए. गोलकिया यांनी दिली.
===================================
गोमांस वाहूतक करणाऱ्यांना खाऊ घातले शेण
| |
-
| |
मानेसर - गोमांसाची वाहतूक करत असल्याच्या संशयावरून गो रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी दोन जणांना बेदम मारहाण करत गायीचे शेण खायला घातल्याची घटना घडली आहे.
हरियानातील कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर टेम्पोमधून गोमांस नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गो रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहन अडविले. त्यानंतर रिझवान आणि मुख्तयार या दोघांना बेदम मारहाण केली. या दोघांना गायीच्या शेणाचा समावेश असलेले पंचगाव्य खावू घातले, असे गो रक्षक दलाचे गुडगाव येथील प्रमुख धमेंद्र यादव यांनी सांगितले.
या दोघांना सात किलोमीटर पाठलाग करून पकडण्यात आले. बदरपूर सीमेजवळ त्यांना रोखण्यात आले आणि त्यांच्याजवळ 700 किलो गोमांस सापडल्याचा दावा यादव यांनी केला आहे. हरियाना सरकाराने गोमांस विक्रीस बंदी घातली आहे.
===================================
राजन यांच्याबाबत बोलण्यास उशीर केला: काँग्रेस
| |
-
| |
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची बाजू घ्यायला आता उशीर केला आहे. ते जर पुर्वीच बोलले असते तर परिस्थिती बिकट झाली नसती, अशी टीका काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरा आधीच बोलायला हवे होते. कदाचित त्यामुळे परिस्थिती एवढी विकोपाला गेली नसती. त्यांच्या पक्षात सुरु असलेल्या मतभेदांचा त्यांनी आणि त्यांच्या पक्षाध्यक्षांनी सोडवायला हवेत, परंतु स्वामींसारखे नेते त्यांनी स्वतःलाच बक्षीस म्हणून दिले आहेत.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी सुब्रमण्यम स्वामींनी केलेली टीका फेटाळून लावत राजन यांची बाजू घेतली. राजन यांना देशाविषयी आस्था आहे, ते देशावर प्रेम करतात. त्यांच्या देशभक्तीविषयी शंका घेण्याचे कारण नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजन यांची पाठराखण करीत त्यांच्याच पक्षाचे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला.
राजन यांच्यावर केलेले आरोप अयोग्य असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. राजन यांच्या देशभक्तीविषयी तिळमात्रही शंका नाही. त्यांनी जगात कुठेही काम केले तरी ते देशासाठी सदैव तत्पर असतील, असे मोदी म्हणाले.
===================================
महिनाअखेरीपर्यंत फ्रीडम 251 हातात
| |
-
| |
नवी दिल्ली - रिंगिंग बेल्स कंपनीने काही महिन्यांपूर्वी घोषणा केलेल्या फ्रीडम 251 या मोबाईलचे वितरण येत्या 28 जूनपासून सुरू करण्यात येणार असून 30 जूनला तो ग्राहकांच्या हातात असणार आहे. फक्त 251 रुपयांना मिळणारा हा फोन म्हणजे फसवेगिरी असल्याचे समजून पैशांवर पाणी सोडलेल्यांसाठी मात्र हा दिलासा ठरत आहे.
अद्याप कोणीही हा फोन पाहिला नसला तरी रिंगिंग बेल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित गोयल यांनी आम्ही दोन लाख युनिट्सचे वितरण सुरू करणार असल्याचे एका वृत्तसंस्थेला सांगितले आहे. या दोन लाख युनिट्सचे वितरण पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुन्हा नवी नोंदणी सुरू करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
आता 10 हजारांत टीव्ही
स्वस्तातला स्मार्ट फोन आणल्यानंतर आता स्वस्तातला टीव्ही आणण्याच्या दिशेने रिंगिंग बेल्सने मार्गक्रमण सुरू केले आहे. आगामी काळात "फ्रीडम‘ या नावाने 32 इंची हाय-डेफिनेशन एलईडी टीव्ही कंपनीकडून लॉंच करण्यात येणार आहे. या टीव्हीची विक्रीही ऑनलाइन माध्यमातूनच केली जाणार आहे.

तृतीयपंथीयांचा विवाह इस्लाम कायद्याने वैध
| |
-
| |
लाहोर - तृतीयपंथीयांचा विवाह इस्लाम कायद्याने वैध असल्याचा फतवा पाकिस्तानातील पंजाबची राजधानी लाहोरजवळील 50पेक्षा अधिक मुस्लिम धर्मगुरूंनी काढला आहे. हा फतवा इत्तेहाद-ए-उम्मत पाकिस्तान या संघटनेच्या आवाहनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे.
"इत्तेहाद‘चे प्रमुख प्रमुख झिया उल हक नक्शबंदी यांच्या म्हणण्यानुसार 50 पेक्षा अधिक धर्मगुरूंनी फतवा काढला आहे की, "ज्या तृतीयपंथीयांमध्ये शारीरिक स्वरूपामध्ये पुरुषांचे अवयव असतील, त्यांचा विवाह या कायद्याने मान्य आहे. मात्र, त्यांच्या जोडीदाराला स्त्रियांचे अवयव असणे गरजेचे आहे.‘
थोडक्यात फतव्याच्या अटींनुसार स्पष्ट पुरुष आणि स्त्रियांचे अवयव असणारे तृतीयपंथी एकमेकांशी विवाह करू शकतात. मात्र, धर्मगुरूंच्या म्हणण्यानुसार
ज्या तृत्तीयपंथीयांमध्ये पुरुष आणि स्त्रियांचे अंग असतील त्यांचा विवाह मात्र या कायद्याने वैध मानता येणार नाही.
या फतव्यामध्ये तृतीयपंथीयांच्या अधिकारांसाठी उलेमांच्या निगरानीखाली नवा कायदा करण्यात यावा, असेही म्हटले आहे.
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वाह प्रांतातील सरकारने वार्षिक अर्थसंकल्पामध्ये तृतीयपंथीयांच्या विकासासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

No comments:
Post a Comment