Sunday, 5 June 2016

[अंतरराष्ट्रीय] 
१- अफगाणिस्तानातील सलमा धरणाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन 
2- आम्ही कोणालाही घाबरत नाही:चीनचा प्रतिहल्ला 
३- श्रीलंकेकडून चार भारतीय मच्छिमारांना अटक 
४- स्वित्झर्लंडची "रोजगार हमी योजना'..! 
५- चीनने "चिथावणीखोर' कृत्य करु नये: अमेरिका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- ऑनलाईन खंडणी, भारताला मोठा धोका 
७- बुडीत कर्जावर चर्चेसाठी जेटलींची बॅंकांसोबत बैठक 
८- मी पवार,भुजबळ या दोघांचाही कार्यकर्ता: आव्हाड 
९- वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही बसणार चाप 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- जीभेवरचं नियंत्रण सुटल्यामुळेच माझं वाटोळं झालं, अजित पवारांची कबुली 
११- पुण्यात भाजप आणि आप कार्यकर्ते भिडले 
१२- यवतमाळमध्ये दारुबंदीसाठी भर सभेत महिलांनी मुख्यमंत्र्यांवर पत्रकं फेकली 
१३- 'नाथाभाऊ हम तुम्हारे साथ है' खडसे समर्थकांची 'रामटेक'वर गर्दी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- शेडुंगच्या अपघातात एकाच कुटुंबातील आजी, सून, नात मृत्युमुखी 
१५- मुसळधार पावसाने सज्जनगडावर दरड कोसळली, 8 गावं संपर्काबाहेर 
१६- मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात, दहाजण जखमी 
१७- दिल्ली; डोक्यावर पाणी ओतून झाडांचं महत्त्व सांगणारे मंत्री 
१८- आक्सा बीचवर बुडणा-या मुलांना जीवरक्षकांनी वाचवले 
१९- पुणे: धरण क्षेत्रात दमदार पाऊस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- 'कोणी माती खाल्ली रे...' पार्श्वगायक भारत गणेशपुरेचं गाणं 
२१- ऐश्वर्यासोबतच्या 'त्या' सीनची सलमानकडून पुनरावृत्ती?
२२- रिअॅलिटी शो स्क्रीप्टेड नसतात- सनी लिओनी  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

========================================

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार
(प्रातिनिधिक फोटो)
पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेरी संपली आहे. उद्या (6 जून 2016) दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत आज माहिती दिली.

मार्च 2016 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल उद्या सकाळी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. तर 15 जूनला दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यावेळी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर,अमरावती, औरंगाबाद, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण 9 विभागांचा निकाल मंडळाकडून 11 वाजता जाहीर केला जाईल. मात्र, दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध होईल.
========================================

जीभेवरचं नियंत्रण सुटल्यामुळेच माझं वाटोळं झालं, अजित पवारांची कबुली

जीभेवरचं नियंत्रण सुटल्यामुळेच माझं वाटोळं झालं, अजित पवारांची कबुली
सोलापूर कमरेखालची भाषा केल्यामुळं आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रीपद गमावणाऱ्या अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

“दुधानं तोंड पोळल्यामुळं ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळं जिभेवर नियंत्रण ठेवा आणि काळजीपूर्वक बोला”, असा महत्त्वाचा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

सोपलांच्या भाषणाचा समाचार

“आपलं बार्शीचं भाषण शिराळ्यात खूप गाजलं. महाराष्ट्रभर भाषण गाजलं. आपण कधी कधी लोक हसायला लागल्यानंतर, बोलणऱ्यालाही वाटतं की, चला, लोक हसतायेत, तर अजून हसवावं. पण नंतर मग हसवता हसवता, त्यालाच रडायची पाळी येते.” असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीचे नेते दिलीप सोपल यांच्यावर निशाणा साधला.
========================================

पुण्यात भाजप आणि आप कार्यकर्ते भिडले

पुण्यात भाजप आणि आप कार्यकर्ते भिडले
पुणे : पुण्यात अमित शाह यांच्या कार्यक्रम स्थळाबाहेर आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये  बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पुण्यात आज भाजपाध्यक्ष अमित शाह कौशल्य विकास अभियानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर आप कार्यकत्यांनी खडसेंच्या राजीनाम्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी करीत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी भाजप आणि आप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
दरम्यान, या कार्यक्रमात अमित शाह यांनी खडसेंच्या राजीनाम्याबाबत बोलण्यास टाळलं.
========================================

यवतमाळमध्ये दारुबंदीसाठी भर सभेत महिलांनी मुख्यमंत्र्यांवर पत्रकं फेकली

यवतमाळमध्ये दारुबंदीसाठी भर सभेत महिलांनी मुख्यमंत्र्यांवर पत्रकं फेकली!
यवतमाळ यवतमाळमधील महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान दारूबंदी आंदोलकांनी गोंधळ घातला. जिल्ह्यात दारूबंदी करा, अशा घोषणा देत आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

यावेळी सभामंडपात बसलेल्या आंदोलक महिलांनी दारूबंदीच्या मागणीचे मुख्यमंत्र्यांना आवाहन करणारे पत्रकं देखील फेकले. गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात स्वामिनी जिल्हा दारूमुक्ती अभियानाअंतर्गत आंदोलन सुरु असून आमदारांच्या घरांवर मोर्चे काढण्यात येत आहेत.

आरोग्य शिबिराला आलेल्या मुख्यमंत्री महोदयांनी दारूमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन यवतमाळ जिल्हयात दारूबंदी करावी व सामाजिक स्वास्थ्य सुदृढ ठेवावे, अशी मागणी केली. आंदोलकांनी घोषणाबाजी करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
========================================

शेडुंगच्या अपघातात एकाच कुटुंबातील आजी, सून, नात मृत्युमुखी

शेडुंगच्या अपघातात एकाच कुटुंबातील आजी, सून, नात मृत्युमुखी
अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी आहेत.
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या शेडुंग हद्दीत घडलेल्या भीषण अपघातातील बळींचा आकडा 17 वर पोहचला आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाला आहे.


कदम कुटुंबावर काळाचा घाला


या अपघातात मिरारोड मधल्या कदम कुटुंबीयांवर काळाने घाला घातला आहे. अपघातात 4 महिन्यांची नात, सून आणि आजी या तीन महिलांचा मृत्यू झाला. तर कुटुंबप्रमुख कल्याण कदम आणि त्यांचे चुलत भाऊ या अपघातात जखमी झाले आहेत. 28 वर्षीय कल्याण कदम हे मुंबईत चित्रपट निर्माते म्हणून कार्यरत आहेत.
========================================

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बस-कारचा अपघात, 17 जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बस-कारचा अपघात, 17 जणांचा मृत्यू
एक्स्प्रेस वे वर ही खाजगी बस साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना बसचालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर या बसची इनोव्हा आणि स्विफ्टला धडक बसली.
UPDATE : अपघातातील मृतांचा आकडा 17 वर

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर रायगडच्या शेडुंगजवळ बस आणि स्विफ्ट-इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी आहेत.
 
एक्स्प्रेस वे वर ही खाजगी बस साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना बसचालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर या बसची इनोव्हा आणि स्विफ्टला धडक बसली. अपघातानंतर बससह दोन्ही कार रस्त्याशेजारील शिवारात कोसळल्या.
 
ही धडक इतकी भीषण होती की त्यात 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात महिला, तीन पुरुष आणि एका चिमुरड्याचा समावेश आहे, तर अपघातातील जखमींवर पनवेलमधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
========================================

अफगाणिस्तानातील सलमा धरणाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन

अफगाणिस्तानातील सलमा धरणाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
हेरात (अफगाणिस्तान) : भारताच्या मदतीने अफागाणिस्तानमध्ये बांधण्यात आलेल्या सलमा धरणाचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तपणे बटन दाबून धरणाचं उद्घाटन केलं.

हे धरण बांधण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला 1700 कोटी रुपयांची मदत केली. अफगाणिस्तानच्या विकासात भारताने नेहमीच महत्त्वपूर्ण वाटा उचलला आहे. हे धरणही त्याचंच उदाहरण मानलं जातं.

यावेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदी यांना अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार अमीर अमिनुल्ला खार पुरस्कारानेही गौरवले.

चौथा अमेरिका दौरा, तर दुसरा अफगाणिस्तान दौरा

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा चौथा अमेरिका दौरा आहे आणि दुसरा अफिगाणिस्तान दौरा आहे. याआधी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मोदी अफगाणिस्तानात गेले होते. अफगाणिस्तानातील संसद इमारतीचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं होतं.
========================================

'नाथाभाऊ हम तुम्हारे साथ है' खडसे समर्थकांची 'रामटेक'वर गर्दी

'नाथाभाऊ हम तुम्हारे साथ है' खडसे समर्थकांची 'रामटेक'वर गर्दी
मुंबई : एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर नाराज झालेल्या समर्थकांनी मुंबईत धाव घेतली आहे. ‘नाथाभाऊ हम तुम्हारे साथ है’ असं म्हणत समर्थकांनी रामटेक बंगल्यावर गर्दी केली आहे. त्यामुळे खडसेंच्या राजीनाम्यानंतर एकूण राजकीय नाट्याला सुरुवात झाल्याचं चित्र आहे.



जळगाव : एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचे तीव्र पडसाद जळगावात उमटले आहेत. जळगाव महानगरपालिकेतील भाजपच्या 14 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.
 
एकनाथ खडसेंच्या समर्थनार्थ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. त्याचप्रमाणे जळगाव भाजपचे आणखी काही पदाधिकारीही राजीनामे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही काळापासून खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चांना ऊत आल्यानंतर अनेक नगरसेवकांमध्ये खदखद असल्याचं म्हटलं जातं. इतक्या मोठ्या नेत्यावर राजीनाम्याची वेळ आल्याने समर्थक नाराज होते आणि त्यांनी राजीनाम्याची धमकी दिल्याचीही माहिती आहे.
========================================

मुसळधार पावसाने सज्जनगडावर दरड कोसळली, 8 गावं संपर्काबाहेर

मुसळधार पावसाने सज्जनगडावर दरड कोसळली, 8 गावं संपर्काबाहेर
सातारा : साताऱ्या रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सज्जनगडावरील दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या आठ गावांचा संपर्क तुटला आहे, तर सज्जनगडावर गेलेले भाविकही अडकून पडले आहेत.
 
दरड कोसळल्याने सुदैवाने कोणताही अनर्थ घडलेला नाही, मात्र वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या सज्जनगडावरील दरड हटवण्याचं काम सुरु आहे.
 
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. सातारा लगतच्या परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. साताऱ्यातील मान खटाव या दुष्काळी भागातसुद्धा पावसाने हजेरी लावली.
 
सुसाट वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे सातारा परिसरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. या पावसामुळे अनेक झाडे पडली. मात्र वाऱ्यासह पडत असलेल्या पावसाने साताऱ्याच्या वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.
========================================

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात, दहाजण जखमी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात, दहाजण जखमी
पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पहाटे  साडे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दहाजण जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरई-सतिवली येथे कोहीनूर ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बस उलटल्याने मोठा अपघात झाला.

या अपघातात दहाजण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना मनोर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

========================================

'कोणी माती खाल्ली रे...' पार्श्वगायक भारत गणेशपुरेचं गाणं

'कोणी माती खाल्ली रे...' पार्श्वगायक भारत गणेशपुरेचं गाणं
मुंबई : चला हवा येऊ द्या सारखा तुफान लोकप्रियता मिळवणारा विनोदी कार्यक्रम असो किंवा ‘पोस्टरबॉईज’ सारखा चित्रपट, आपल्या अनोख्या अंदाजाने रसिकांना खदखदून हसवणारे भारत गणेशपुरे आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.
 
भारत गणेशपुरे पार्श्वगायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘बरड’ या आगामी सिनेमात भारतने एक गाणं आपल्या शैलीत गायलं आहे.
 
विशेष म्हणजे या गाण्याचे शब्दही फार मजेशीर आहेत. ‘कोणी माती खाल्ली रे’ असे या गाण्याचे बोल असून संगीतकार रोहन रोहन यानं हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
 
भारतच्या विनोदावर फिदा असलेल्या चाहत्यांमध्ये त्याच्या नव्या गाण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
========================================

ऐश्वर्यासोबतच्या 'त्या' सीनची सलमानकडून पुनरावृत्ती?

ऐश्वर्यासोबतच्या 'त्या' सीनची सलमानकडून पुनरावृत्ती?
मुंबई : अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यातील नात्याबद्दल फक्त बॉलिवूडच नाही, तर सर्व चाहत्यांनाही पूर्ण जाणीव आहे. सलमान आणि ऐश्वर्याही एकमेकांसमोर येणं टाळत असले तरी सल्लूच्या मनात जुन्या आठवणी कुठेतरी आहेत का, अशी शंका निर्माण होणाऱ्या घटना अनेकदा समोर येत असतात. आता सुलतानच्या निमित्ताने ही शंका पुन्हा नव्याने डोकं वर काढत आहे.
 
सलमान खान सध्या बुडापेस्टमध्ये ‘सुलतान’ चित्रपटाचं शूटिंग करत आहे. त्यानिमित्ताने बुडापेस्टमधील शेचेन्यी ब्रिजवर सलमान आला होता. याच ब्रिजवर हम दिल दे चुके सनम चित्रपटातील शेवटच्या सीनचं शूटिंग झालं होतं. त्यामध्ये ऐश्वर्या धावत जाऊन अजय देवगनच्या खांद्यात विसावते. मात्र ‘सुलतान’च्या निमित्ताने याच शेचेन्यी ब्रिजवरील एक फोटो पोस्ट केला आहे.


Salman
 
या ब्रिजवर सुलतान चित्रपटातील सीनचं शूटिंग झालं आहे का, याबद्दल अद्याप माहिती नसली तरी त्यानिमित्ताने ऐश्वर्यासोबतच्या ‘त्या’ सीनची सलमानला आठवण होणं साहजिक आहे. त्यामुळे 17 वर्ष जुन्या या सीनची पुनरावृत्ती होणार का प्रश्न दोघांच्याही चाहत्यांच्या मनात आहे.


Aishwarya Hum Dil

========================================

दिल्ली; डोक्यावर पाणी ओतून झाडांचं महत्त्व सांगणारे मंत्री

डोक्यावर पाणी ओतून झाडांचं महत्त्व सांगणारे मंत्री
नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री अंतरसिंह आर्य यांनी एका अनोख्या पद्धतीने जंगलाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. त्यांनी चक्क आपल्या टक्कलाचे उदाहरण देऊन जंगलाचे महत्त्व सांगितले.
मध्यप्रदेशाचे कामगार मंत्री अंतरसिंह आर्य यांनी वन वाचवा, वृक्ष वाचवा अभियानाची सुरुवात करताना, आपल्या डोक्यावर पाणी ओतून घेतले. आणि ज्याप्रमाणे डोक्यावर केस नसल्यास पाणी राहत नाही. त्याप्रमाणेच डोंगरांवर झाडे नसतील, तर चांगला पाऊस होणार नाही, आणि जमिनीत पाणीदेखील मुरणार नाही, असे सांगितले.
========================================

आक्सा बीचवर बुडणा-या मुलांना जीवरक्षकांनी वाचवले


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. ५ - आक्सा बीचवर भरतीच्यावेळेस बुडणा-या दोन मुलांना जीवरक्षकांनी वाचवले. फैयाज इकबाल शेख (१६) आणि अरबाज समिर शेख (१६) अशी दोघांची नावे आहेत. आक्सा बीच वरील भरतीच्या वेळेस दाना पाणी बीच वरुन आक्सा बीचवर येण्याकरीता नाला क्रॉस करताना दोन १६  वर्षीय मुले बुडत होती. 
     
    मुले बुडत असल्याचे लक्षात येताच सचिन मुळीक,नथुराम सुर्यवंशी, प्रितम कोळी या जीवरक्षकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना वाचवले. सदर घटनेच्या आगोदर त्या मुलांना तीन वेळा पाण्यात जाऊ नका असे सांगितले होते.
     
    आज समुद्राला मोठी भरती  होती. त्या भरतीच्या पाण्यात खेळण्याचा मोह मुलांना आवरला नाही. पाण्यात खेळताना मुले नाल्याल बुडु लागली. जीवरक्षकांनी सुखरुप बाहेर काढून त्यांना मालवणी पोलिसांच्या ताब्यात दिले.
========================================

ऑनलाईन खंडणी, भारताला मोठा धोका


  • अनिल भापकर
    अपहरणकर्त्यांनी घरातील एखाद्या सदस्याचे अपहरण करून अमुक इतक्या मोठ्या रकमेची मागणी केली. पैसे मिळाले नाही तर अपह्रत व्यक्तीला ठार मारण्याची धमकी मिळाली. शिवाय पोलिसांना कळविल्यास अपह्रत व्यक्तीला ठार मारण्याची धमकी अशा तऱ्हेच्या बातम्या सर्रास वर्तमानपत्रात पूर्वीपासून वाचायला मिळतात. आता मात्र या टेक्नो काळात गुन्हा करण्याची पद्धत आणि गुन्हेगार दोन्ही बदललेत.
    एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो की तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून, तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शनला क्लिक करून अमुक इतकी रक्कम ह्या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासांत जर ही रक्कम जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलीट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काऊंटडाऊनसुद्धा चालू झालेले असते. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा ह्या हॅकर्सने घेतलेला असतो. या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही. या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. यामध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणी तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत . विशेष म्हणजे असे गुन्हे उघडकीस आलेल्या देशांच्या यादीत भारताचा पाचवा क्रमांक लागतो. म्हणजे रॅन्समवेअर ह्या सायबर गुन्हेगारीचा भारताला फार मोठा धोका आहे.  जगाच्या कुठल्या तरी कानाकोपर्‍यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ह्यसायबर भामटेह्ण करायला लागले.तुमचा सगळा डेटा एका क्षणात नष्ट झाला किंवा त्याची चोरी झाली तर कोणाचंही धाबं दणाणणं साहजिकच आहे.

========================================
आम्ही कोणालाही घाबरत नाही:चीनचा प्रतिहल्ला

सिंगापूर - दक्षिण चिनी समुद्रामधील सीमावादासंदर्भात अमेरिकेने चीनला इशारा दिल्यानंतर आज (रविवार) चीनकडूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. दक्षिन चिनी समुद्रामधील सीमावादासंदर्भात संकटाचा सामना करण्यास आपण घाबरत नसल्याचा प्रतिहल्ला चीनकडून चढविण्यात आला.

"बाहेरील देशांनी यासंदर्भात रचनात्मक भूमिकेचा अंगीकार करावयास हवा. दक्षिण चिनी समुद्रासंदर्भातील मुद्दा हा स्वत:च्या स्वार्थी हितासाठी चिथावणीखोरपणा करणाऱ्या काही देशांमुळे अधिक स्फोटक बनला आहे,‘‘ असे चिनी ऍडमिरल सुन जिंआंग्युओ यांनी सिंगापूरमधील सुरक्षा परिषदेमध्ये बोलताना सांगितले. याचबरोबर "आम्ही कोणास आव्हान देत नाही; मात्र आम्ही कोणाच्या आव्हानास घाबरतही नाही,‘ असा थेट इशारा त्यांनी दिला. 
========================================
रिअॅलिटी शो स्क्रीप्टेड नसतात- सनी लिओनी

मुंबई - "बहुसंख्य प्रेक्षकांना वाटते की टीव्हीवरील रिअॅलिटी शो हे आधीपासून ठरविल्याप्रमाणे (स्क्रीप्टेड) चालविले जातात परंतु वस्तुस्थिती तशी नाही. उलट काही प्रसंग ज्यांच्यामुळे माध्यमांच्या हेडलाइन्स बनतात ते आमच्यासाठी सुद्धा अचानक समोर येणारे आणि धक्का देणारे असतात." हे म्हणणे आहे ‘बिग बॉस ‘ आणि ‘स्प्लिट्झव्हिला‘ या रिअॅलिटी शो मध्ये भाग घेणारी सनी लिओनी हिचे!

सनी पुढे म्हणाली की, "अशा कार्यक्रमांतून काही मसालेदार क्षण येतात जे प्रेक्षकांप्रमाणेच आम्हा कलाकारांसाठीसुद्धा दिग्मूढ करणारे असतात. मला स्वतःला रिअॅलिटी शो आवडतात. बऱ्याच लोकांना वाटते की हे शो कोणीतरी ठरवल्याप्रमाणे चालविले जातात. पण खरं तर अशा शोमध्ये कधी कधी असे काही प्रक्षोभक प्रसंग उद्भवतात की ज्यांची पूर्वकल्पना आम्हा कलाकारांनादेखील नसते. कोणत्या कलाकाराला शो मध्ये ठेवायचे आणि कोणत्या कलाकाराला शो बाहेरची वाट दाखवायची हे प्रेक्षक ठरवत असतात, दुसरे कोणी नव्हे. प्रेक्षक जशी निवड करतील तशी शो ची प्रगती ठरत असते."
========================================
श्रीलंकेकडून चार भारतीय मच्छिमारांना अटक

चेन्नई - श्रीलंकेच्या सागरी हद्दीत मच्छिमारी करणाऱ्या भारताच्या चार मच्छिमारांना आज (रविवार) श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक करण्यात आली आहे.

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रश्नावर लिहिलेल्या पत्रानंतर दुसऱ्याच दिवशी श्रीलंकेने मच्छिमारांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले मच्छिमार रामेश्वरम येथील असून, ते श्रीलंकेच्या सागरी हद्दीतील डेल्फ बंदराजवळ मच्छिमारी करत होते. त्यावेळी नौदलाच्या जवानांनी त्यांना अटक केली.

श्रीलंकेने 31 मे ते 2 जून या काळात अटक केलेल्या 11 मच्छिमारांच्या सुटकेसाठी जयललितांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.
========================================
पुणे: धरण क्षेत्रात दमदार पाऊस

पुणे - पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री दमदार पाऊस पडला. यामुळे पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे.

पुणे शहर व उपनगरात शनिवारी रात्री दहा वाजता किरकोळ पाऊस सुरवात झाली होती. परंतु एक वाजल्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसास सुरवात झाली. शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला.

रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पडलेला पाऊस पुढील प्रमाणे (मिलिमीटर मध्ये)खडकवासला 14
पानशेत 14
वरसगाव 13
टेमघर 19
========================================
स्वित्झर्लंडची "रोजगार हमी योजना'..!

जिनेव्हा -  देशातल्या प्रत्येक नागरिकाला दरमहा एक निश्चित रक्कम वेतन म्हणून सुरू करावे वा नाही यासाठी स्वित्झर्लंड मध्ये लवकरच मतदान घेतले जाणार आहे. या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक प्रौढाला दरमहा २५०० स्विस फ्रँक इतकी रक्कम देण्याचे प्रस्तावित आहे. यात अल्प उत्पन्न असणारे नोकरपेशा व व्यावसायिक तसेच बेरोजगार प्रौढ नागरिकांचाही समावेश आहे.

२१ व्या शतकात बरेचसे कामकाज यांत्रिकीकरणाने पार पाडले जाते आणि त्यामुळे कामगारांसाठी फारच कमी नोकऱ्या उपलब्ध असल्याचे या योजनेच्या समर्थकांचे म्हणणे आहे. स्विस मतदारांपैकी फक्त २५ टक्के या योजनेशी सहमत आहेत. जे कामगार आधीच २५०० स्विस फ्रँक मिळवत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 
========================================
बुडीत कर्जावर चर्चेसाठी जेटलींची बॅंकांसोबत बैठक

नवी दिल्ली - बुडीत कर्जाच्या समस्येने ग्रासलेल्या बॅंका आणि वित्तसंस्थांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणि वित्तसंस्थांच्या प्रमुखांशी सोमवारी बैठक घेणार आहेत. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांसह काही समस्यांवरील उपायांबाबतही चर्चा होणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या द्वैमासिक पतधोरणाबाबत मंगळवारी बैठक आहे. त्यामुळे त्या बैठकीआधी बॅंका आणि वित्त संस्थांसोबत होणाऱ्या या बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसमोरील बुडीत कर्जाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या बैठकीत जानेवारी ते मार्च 2016 या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या कामगिरीचे पुनरावलोकन केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकाचे नुकतेच तिमाही आर्थिक निकाल जाहीर झाले आहेत. त्यातून या बॅंकांना रु. 25 हजार कोटींहून अधिक तोटा झाल्याचे आढळून आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेचे निकाल देखील समाधानकारक आलेले नाहीत. जेटलींबरोबर होणाऱ्या बैठकीत बॅंकांची बुडीत कर्जे (एनपीए), घसरलेला आर्थिक ताळेबंद, स्टेट बॅंक आणि त्यांच्या सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे.
========================================
चीनने "चिथावणीखोर' कृत्य करु नये: अमेरिका

वॉशिंग्टन - दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रामध्ये हवाई प्रतिबंधक (एअर डिफेन्स) झोन लागु करण्याचा निर्णय चीनने घेतल्यास; हे "चिथावणीखोर व अस्थिर‘ कृत्य असल्याचे अमेरिका मानेल, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी आज (रविवार) दिला.

दक्षिण चिनी समुद्रामधील चीनच्या दाव्यांविरोधात फिलिपीन्सने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली असून येत्या काही आठवड्यांत न्यायालयाचा निर्णय सुनाविला जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनकडून दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रात एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (एडीआयझेड) ची घोषणा केली जाण्याची शक्‍यता आहे. 
========================================
मी पवार,भुजबळ या दोघांचाही कार्यकर्ता: आव्हाड

नाशिक - ज्येष्ठ नेते शरद पवार व छगन भुजबळ यांचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुणाचाही विरोधक नाही व समर्थकही नाही. आपण सर्वजण एकत्रितपणे चर्चा करून निर्णय घेऊ व तुम्ही घेतलेल्या निर्णयांना मी केवळ पवारसाहेबांशी बोलून जाहीर करीन. कुठलाही निर्णय एकतर्फी घेतला जाणार नाही. तसेच माझी भूमिका केवळ पोस्टमनची असेल, खबऱ्याची नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाशिक जिल्हा प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवड झाल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर पक्षात संघटनात्मक बदल केले जाणार नसल्याचेही जाहीर केल्यामुळे आव्हाडांच्या नियुक्तीमुळे आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या असंतुष्टांना आजच्या बैठकीतून काहीही हाती लागले नाही. 

========================================
वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही बसणार चाप
-

नवी दिल्ली - वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना आता 100 कोटी रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे. शिवाय वाहन कंपनीला वाहने सदोष असल्यास वाहने माघारी (रिकॉल) घ्यावी लागणार आहेत.

नवीन रस्ते सुरक्षा विधेयकानुसार वाहनचालकाने देखील वाहनामध्ये अनधिकृत घटक आणि इतर हलक्या दर्जाची उत्पादने किंवा देखभालीसंदर्भात उल्लंघन केल्यास पाच हजारांचा दंड करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वितरक आणि व्हेईकल बॉडी बिल्डर्सकडून दुय्यम दर्जाचे उत्पादन दिल्यास अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी त्यांना एक लाखांचा दंड करण्यात येणार आहे. 

No comments: