[अंतरराष्ट्रीय]
१- आंब्याचा गोडवा अमेरिकेत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- गौप्यस्फोट: 1992 मध्ये सोनिया गांधींची नरसिंह राव यांच्याकडून हेरगिरी
३- देशात विकासाची स्पर्धा सुरु करा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
४- खडसेंच्या कथित दाऊद कॉल प्रकरणाची राज ठाकरेंकडून खिल्ली
५- दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीत फुटीरतावादी नेत्यांची हजेरी
६- जम्मूत दहशतवादी हल्ल्यात 8 जवान शहीद, तर 17 जवान जखमी
७- आप-भाजप संघर्ष शिगेला, ७ रेसकोर्स परिसरात जमावबंदी
८- सुखोईवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र स्वार
९- आपच्या आणखी एका आमदारास दिल्लीत अटक
१०- ३० वर्षांनी लष्करास नव्या तोफा
११- रॉबर्ट वद्रांविरुद्ध गुन्हा दाखल करा - सोमय्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॉडेलला बेड्या
१३- मुंबईत वरुणराजाची सेंच्युरी पूर्ण, धरणांच्या पाणीपातळीत वाढ
१४- दादरमधील आंबेडकर भवन जमीनदोस्त, नव्या वादाला तोंड
१५- 'व्हॉटसअॅपवर डीपी ठेवणाऱ्या महिलांनो सावध राहा!'
१६- येणाऱ्या ४८ तासांत वरुणराजा बरसणार!
१७- पार्ट्या ठरताहेत अमलीपदार्थांच्या खरेदी - विक्रीचे स्पॉट
१८- उपनगरात होणार दोन नवीन ‘ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर’
१९- गोवेकरांना पोर्तुगीज नागरिकत्व देणे चूक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- मुंबईत उघड्या गटारात पडून महिला वाहून गेली, शोध सुरु
२१- बीड; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळं जलयुक्त शिवार शेतकऱ्यांच्या मुळावर
२२- लातूर; डीएड करणाऱ्यांना नोकरीची हमी नाही
२३- अकोटमधून बांधकाम मजूराच्या मुलीचे अपहरण
२४- मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात
२५- रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे सर्वाधिक 190 मिमी पावसाची नोंद
२६- कोल्हापूर; राजर्षी शाहू महाराजांना शाहू जन्मस्थळी अभिवादनक
२७- बारामुल्लामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- ए. आर. रहमानच्या सूरांवर विराटचा हिपहॉप
२९- रोल्स रॉयसची 'डॉन' भारतात लाँच
३०- विराटला 'भारतरत्न' द्या, राजनाथ सिंहांकडे मागणी
३१- IIFA २०१६ पुरस्कारांवर 'बाजीराव-मस्तानी'ची छाप
३२- डिम्पी गांगुलीच्या घरी नन्ही परी, नाव ठेवलं... रिहाना
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
रुपेश दरक, रवी इंगळे, दत्ता शेम्भाळे, चंद्रशेखर गडप्पा, समीर पठाण, शंकर कलके, गजानन कदम, नितीन पाटील, मिलिंद पालमकर, मंगेश गवारे,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=======================================

वर्सोव्यासारख्या उच्चभ्रू वसाहतीत पोलिसांच्या नाकाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलिस सध्या या रॅकेटचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने लिहिलेल्या पत्रात ही मागणी करण्यात आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासारखीच कोहलीची कामगिरीही विराट असल्याचं सांगत काही बाबतीत विराट अव्वल ठरत असल्याचंही या पत्रात म्हटलं आहे.



डिम्पीने आपल्या मुलीचं नाव ‘रिहाना’ (Reanna) असं ठेवलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने फोटो शेअर करताना ही बातमी सांगितली आहे. डिम्पी गेल्या वर्षी 27 जुलैला बिझनेसमन रोहित रॉयसोबत विवाहबंधनात अडकली होती.

संबंधित महिलेचा शोध सुरु असून ती जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे. सुलोचना भालेराव असं त्यांचं नाव असून वीज बिल भरण्यासाठी त्या जात असताना ही घटना घडली.
संततधार पावसामुळे झाकण उघडं असलेल्या गटारात पाणी भरलं होतं. मात्र सुलोचना यांना त्याचा अंदाज आला नाही आणि त्या थेट खाली गेल्या.
मुंबईत आजही अनेक गटारांवर झाकणं नसल्यामुळे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. काहीच दिवसांपूर्वी वसई स्थानकावर गटारावरील स्लॅब कोसळल्याने काही जण गटारात पडले होते.












१- आंब्याचा गोडवा अमेरिकेत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- गौप्यस्फोट: 1992 मध्ये सोनिया गांधींची नरसिंह राव यांच्याकडून हेरगिरी
३- देशात विकासाची स्पर्धा सुरु करा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
४- खडसेंच्या कथित दाऊद कॉल प्रकरणाची राज ठाकरेंकडून खिल्ली
५- दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीत फुटीरतावादी नेत्यांची हजेरी
६- जम्मूत दहशतवादी हल्ल्यात 8 जवान शहीद, तर 17 जवान जखमी
७- आप-भाजप संघर्ष शिगेला, ७ रेसकोर्स परिसरात जमावबंदी
८- सुखोईवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र स्वार
९- आपच्या आणखी एका आमदारास दिल्लीत अटक
१०- ३० वर्षांनी लष्करास नव्या तोफा
११- रॉबर्ट वद्रांविरुद्ध गुन्हा दाखल करा - सोमय्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॉडेलला बेड्या
१३- मुंबईत वरुणराजाची सेंच्युरी पूर्ण, धरणांच्या पाणीपातळीत वाढ
१४- दादरमधील आंबेडकर भवन जमीनदोस्त, नव्या वादाला तोंड
१५- 'व्हॉटसअॅपवर डीपी ठेवणाऱ्या महिलांनो सावध राहा!'
१६- येणाऱ्या ४८ तासांत वरुणराजा बरसणार!
१७- पार्ट्या ठरताहेत अमलीपदार्थांच्या खरेदी - विक्रीचे स्पॉट
१८- उपनगरात होणार दोन नवीन ‘ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर’
१९- गोवेकरांना पोर्तुगीज नागरिकत्व देणे चूक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- मुंबईत उघड्या गटारात पडून महिला वाहून गेली, शोध सुरु
२१- बीड; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळं जलयुक्त शिवार शेतकऱ्यांच्या मुळावर
२२- लातूर; डीएड करणाऱ्यांना नोकरीची हमी नाही
२३- अकोटमधून बांधकाम मजूराच्या मुलीचे अपहरण
२४- मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात
२५- रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे सर्वाधिक 190 मिमी पावसाची नोंद
२६- कोल्हापूर; राजर्षी शाहू महाराजांना शाहू जन्मस्थळी अभिवादनक
२७- बारामुल्लामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- ए. आर. रहमानच्या सूरांवर विराटचा हिपहॉप
२९- रोल्स रॉयसची 'डॉन' भारतात लाँच
३०- विराटला 'भारतरत्न' द्या, राजनाथ सिंहांकडे मागणी
३१- IIFA २०१६ पुरस्कारांवर 'बाजीराव-मस्तानी'ची छाप
३२- डिम्पी गांगुलीच्या घरी नन्ही परी, नाव ठेवलं... रिहाना
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
रुपेश दरक, रवी इंगळे, दत्ता शेम्भाळे, चंद्रशेखर गडप्पा, समीर पठाण, शंकर कलके, गजानन कदम, नितीन पाटील, मिलिंद पालमकर, मंगेश गवारे,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=======================================
मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॉडेलला बेड्या
मुंबई : मुंबईतल्या वर्सोवा परिसरात एक हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आलं आहे. एका प्रोडक्शन हाऊसच्या नावाखाली हे सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी बनावट ग्राहकांना पाठवून हे सेक्स रॅकेट उधळून लावलंय. रॅकेट चालवणाऱ्या एका महिला मॉडेललाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोबतच दोन तरुणींसह काही रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
वर्सोव्यासारख्या उच्चभ्रू वसाहतीत पोलिसांच्या नाकाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलिस सध्या या रॅकेटचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
=======================================
विराटला 'भारतरत्न' द्या, राजनाथ सिंहांकडे मागणी
नवी दिल्ली : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीकडून तमाम क्रिकेट चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. तडाखेबाज खेळीमुळे जगभरातील क्रीडारसिकांच्या गळ्यातील ताईत झालेल्या विराटला भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करावा अशी मागणी केली जात आहे. ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनतर्फे विराट कोहलीचा ‘भारतरत्न’ने गौरव करण्याची मागणी झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने लिहिलेल्या पत्रात ही मागणी करण्यात आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासारखीच कोहलीची कामगिरीही विराट असल्याचं सांगत काही बाबतीत विराट अव्वल ठरत असल्याचंही या पत्रात म्हटलं आहे.
=======================================
मुंबईत वरुणराजाची सेंच्युरी पूर्ण, धरणांच्या पाणीपातळीत वाढ
मुंबईः शहरात नॉन स्टॉप बॅटिंग करणाऱ्या पावसाने मिलिमीटरची सेंच्युरी पूर्ण केली आहे. सांताक्रूझ वेधशाळेच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात मुंबईत 82.5 मिमी पाऊस पडला आहे. तर कुलाबा वेधशाळेनं 122.4 मिमी पावसाची नोंद केली आहे.
जून महिन्यात मुंबईमध्ये सरासरी 523 मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत मुंबईतल्या पावसाने 380 मिमीचा पल्ला गाठला आहे. यंदाच्या पावसाळ्यात वरूणराजाची मुंबईवर अशीच कृपादृष्टी असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
धरणांच्या पाणी पातळीत वाढ
मुंबईत पावसाने धरण क्षेत्रातल्या परिसरातही बरसायला सुरुवात केली आहे. शुक्रवार रात्रीपासून मुसळधार पाऊस धरणांमध्येही बरसू लागला आहे. त्यामुळे एका दिवसात तब्बल 657 दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे. पाणीटंचाईच्या काळात ही वाढही समाधानकारक असल्याचे मत पालिका प्रशासनानं व्यक्त केलं आहे.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईतील विहार तलावात 88 मिमी आणि तुळशी तलावात दिवसभरात 140 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
=======================================
खडसेंच्या कथित दाऊद कॉल प्रकरणाची राज ठाकरेंकडून खिल्ली
मुंबईः दाऊद इब्राहिम एकनाथ खडसेंना कॉल करतो म्हणजे दाऊदवर एवढी वाईट वेळ आली आहे का, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडसेंच्या कथित दाऊद कॉल प्रकरणाची खिल्ली उडवली.
यूपीएससी आणि एमपीएससी परिक्षेमध्ये यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहामध्ये हा सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी खडसेंवर आरोप असलेल्या कथित दाऊद फोन कॉल प्रकरणावरून त्यांना तिरकस टोला लगावला. दाऊद पाकिस्तानातून स्वतःची यंत्रणा सांभाळतो आणि तो खडसेंना फोन करेन का, एवढी वाईट वेळ त्याच्यावर कशी आली, अशा शब्दात राज यांनी खिल्ली उडवली. आपल्याकडे काहीही झालं की लगेच तर्क वितर्क लावले जातात, मात्र त्याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे, असं राज यांनी सांगितलं.
=======================================
डिम्पी गांगुलीच्या घरी नन्ही परी, नाव ठेवलं...
मुंबई : राहुल महाजन याची घटस्फोटित पत्नी, बिग बॉसच्या आठव्या पर्वातील स्पर्धक डिम्पी गांगुलीच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. डिम्पीने एका गोड मुलीला जन्म दिला आहे.
डिम्पीने आपल्या मुलीचं नाव ‘रिहाना’ (Reanna) असं ठेवलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने फोटो शेअर करताना ही बातमी सांगितली आहे. डिम्पी गेल्या वर्षी 27 जुलैला बिझनेसमन रोहित रॉयसोबत विवाहबंधनात अडकली होती.
गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन तिने तिचे बेबी बम्प मिरवलेही होते. त्यामुळे तिच्या प्रेग्नन्सीविषयी सर्वत्र चर्चा होती. राहुल महाजन आणि डिम्पी ‘राहुल दुल्हनिया ले जाएंगे’ या कार्यक्रमानंतर विवाहबंधनात अडकले होते, मात्र सारं काही आलबेल न झाल्यामुळे ते विभक्त झाले. त्यानंतर डिम्पीने रोहितसोबत लग्नगाठ बांधली.
=======================================
मुंबईत उघड्या गटारात पडून महिला वाहून गेली, शोध सुरु
मुंबई : रस्त्यावरील उघडी गटारं पादचाऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याचं एक उदाहरण समोर आलं आहे. मुंबईतल्या भांडुप परिसरात उघड्या गटारात पडून एक 65 वर्षीय महिला वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
संबंधित महिलेचा शोध सुरु असून ती जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे. सुलोचना भालेराव असं त्यांचं नाव असून वीज बिल भरण्यासाठी त्या जात असताना ही घटना घडली.
संततधार पावसामुळे झाकण उघडं असलेल्या गटारात पाणी भरलं होतं. मात्र सुलोचना यांना त्याचा अंदाज आला नाही आणि त्या थेट खाली गेल्या.
मुंबईत आजही अनेक गटारांवर झाकणं नसल्यामुळे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. काहीच दिवसांपूर्वी वसई स्थानकावर गटारावरील स्लॅब कोसळल्याने काही जण गटारात पडले होते.
=======================================
गौप्यस्फोट: 1992 मध्ये सोनिया गांधींची नरसिंह राव यांच्याकडून हेरगिरी
नवी दिल्ली : नरसिंह राव यांच्या आदेशावरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची हेरगिरी केली गेली, असा धक्कादायक खुलासा विनय सीतापती यांनी आपल्या ‘Half-Lion: How P V Narasimha Rao Transformed Indi’ या पुस्तकात केला आहे.
7 डिसेंबर 1992 रोजी म्हणजेच अयोध्यमधील वादग्रस्त भाग पाडल्याच्या दुसऱ्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी आयबीच्या गुप्तहेरांना आदेश दिला होता. या आदेशानुसार, सोनिया गांधींच्या 10 जनपथ निवास्थानावर नजर ठेवली गेली.
पुस्तकातील दाव्यानुसार, सोनिया गांधी यांच्या घरी तैनात असलेले आयबीचे गुप्तहेर यांना सांगण्यात आले होते की, काँग्रेसचे कोणकोणते नेते सोनिया गांधींशी चर्चा करताना नरसिंह राव यांना विरोध करतात.
पुस्तकातील माहितीनुसार, नरसिंह राव यांना आयबीने याबाबत लेखी रिपोर्टही दिला. या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, सोनिया गांधींशी चर्चेदरम्यान अर्जुन सिंह, दिग्विजय सिंह, अजित जोगी, सलामतुल्ला आणि अहमद पटेल यांनी अयोध्याच्या परिस्थितीशी लढण्यासाठी पंतप्रधानांच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
=======================================
देशात विकासाची स्पर्धा सुरु करा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
पुणे : “गेल्या काही वर्षांपासून देशात मागास राहण्याची स्पर्धा लागली होती, मात्र भाजप सरकार आल्यापासून आता विकासासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. स्मार्ट सिटी योजना त्याचंच प्रतिक आहे,” असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात केलं.
पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात आज दिमाखदार सोहळ्यात स्मार्ट सिटी योजनेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाजपचे अनेक दिग्गज मंत्री उपस्थित होते.
देशाच्या 20 शहरांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं 7 हजार 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं
महाराष्ट्रातील पुणे, आणि सोलापूर ही दोन शहरं स्मार्ट सिटी योजनेतून विकसित केली जाणार आहेत. मात्र या कार्यक्रमाआधी आमंत्रण पत्रिकेत महापौरांचं नाव नसल्याचा आणि सेना-भाजपमधील वादाचा परिणाम आजच्या कार्यक्रमावर दिसून आला. भाजप वगऴता कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेते बालेवाडीकडे फिरकले नाहीत.
=======================================
दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीत फुटीरतावादी नेत्यांची हजेरी
नवी दिल्ली : दिल्लीत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी आयोजीत केलेल्या इफ्तार पार्टीत फुटीरतावादी नेत्यांनी हजेरी लावल्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अब्दुल बसीत आणि फुटीरतावादी नेत्यांमध्ये स्वतंत्र काश्मीरच्या मुद्यावर चर्चा झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र अब्दुल बसीत यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. आम्ही राजकीय चर्चेसाठी नव्हे तर इफ्तार पार्टीचा आनंद लुटण्यासाठी एकत्र जमलो आहोत, असं बसीत म्हणाले.
दरम्यान पत्रकारांनी पम्पोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अब्दुल बसीत यांना विचारलं. मात्र बसीत यांनी दहशतवादी हल्ल्याचा साधा निषेधही व्यक्त केला नाही..
=======================================
जम्मूत दहशतवादी हल्ल्यात 8 जवान शहीद, तर 17 जवान जखमी
फोटो सौजन्य- एएनआय
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पंपोरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 8 जवान शहीद झाले आहेत. तर 17 जवान जखमी झाले आहेत. दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.
पंपोरमध्ये दहशतवादी आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये 8 जवान शहीद झाले. तर भारतीय जवानांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
जखमी जवानांवर लष्कराच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. फायरिंग रेंजवरुन परतत असताना दोन दहशतवाद्यांना भारतीय जवानांवर हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये 8 जवान शहीद झाले. तर 17 जण जखमी झाले. मात्र, हल्ला करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांना भारतीय जवानांना ठार केलं आहे.
=======================================
दादरमधील आंबेडकर भवन जमीनदोस्त, नव्या वादाला तोंड
मुंबईः सिद्धार्थ कॉलेजच्या पाठोपाठ दादरमधील आंबेडकर भवनही वादाच्या भोवऱ्यात आलं आहे. या भवनाची मालकी असलेला आंबेडकर ट्रस्ट आणि आंबेडकरांचे कुटुंबिय यांच्यामध्ये या जागेच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरुन वाद आहेत.
या इमारतीच्या पुनर्विकासासाठी आंबेडकर भवनाचे काल रात्री पाडकाम करण्यात आले, त्याला आंबेडकरांच्या कुटुंबियांनी जोरदार विरोध करत पाडकामाचा निषेध केला.
ट्रस्ट विरुद्ध आंबेडकर कुटुंब वाद?
आंबेडकर भवनची इमारत रात्री पाडण्यात आली. या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडल्याचा दावा आंबेडकर भवन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांनी आंबेडकर भवनच्या पाडकामाला जोरदार विरोध केलाय. आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी दादरमध्ये परिसराला भेट देऊन घटनेचा निषेध केला आहे.
त्यामुळे ट्रस्ट विरुद्ध आंबेडकर परिवार असा वाद पुन्हा रंगण्याची चिन्हं आहेत. सध्या राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
=======================================
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळं जलयुक्त शिवार शेतकऱ्यांच्या मुळावर
बीडः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वरदान ठरलेली शासनाची जलयुक्त शिवार योजना आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे जलयुक्त शिवार योजनेतील बंधारा पहिल्याच पावसात फुटून तब्बल 250 एकर शेतीचं नुकसान झालं आहे.
गेवराई तालुक्यातील भेंड इथे ही घटना घडली आहे. बंधारा तयार करत असताना खोद काम केलेली माती ठेकेदाराने न काढल्यामुळं ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. बंधाऱ्याच्या बाजुची माती तत्काळ काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र ठेकेदाराने माती काढलीच नसल्याचं उघड झाले आहे.
प्रशासनाचा हलगर्जीपणा
बंधाऱ्यातील पाण्याचा विसर्ग येवढा प्रचंड होता की, काही क्षणातच संपूर्ण शेतातील माती आणि नव्याने पेरलेली बियाणे वाहुन गेली आहेत. चार वर्ष दुष्काळाशी झुंज देत असताना यंदा पाऊस चांगला आहे, म्हणून बळीराजा मोठ्या उत्साहाने कामाला लागला आहे. मात्र बंधाऱ्याच्या पाण्यामुळे इथला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
दरम्यान गेवराईचे तहसीलदार संजय पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. घटना घडल्यानंतर ठेकेदाराने गावातुन पळ काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरलेली योजना शेतकऱ्यांसाठीच कर्दनकाळ ठरु नये, यासाठीही प्रशासनाने काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर योग्य कारवाई करण्याची मागणीही शेतकरी करत आहेत.
=======================================
'व्हॉटसअॅपवर डीपी ठेवणाऱ्या महिलांनो सावध राहा!'
मुंबई : व्हॉट्सअॅप कायमच आपल्या यूझर्ससाठी नवनवे फीचर्स घेऊन येत असतं. आता व्हॉट्सअॅप यूझर्सना आणखी काही आकर्षक फीचर्स अनुभवयाला मिळणार आहेत. जर्मन पब्लिकेशन ‘मेकरकॉफ’ने व्हॉट्स अॅपच्या आगामी फीचर्सबाबत माहिती दिली आहे. ‘मेकरकॉफ’ने दिलेल्या माहितीला व्हॉट्सअॅपने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचर्समध्ये म्युझिक शेअरिंग, इमोजी, मेन्शन, पब्लिक ग्रुप इन्व्हाईट लिंक इत्यादींचा समावेश आहे.
म्युझिक शेअरिंग
म्युझिक शेअरिंग फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील गाणी शेअर करु शकता. याआधी गाणी शेअर केल्यास ऑडिओ फाईल म्हणून शेअर व्हायची. मात्र, नव्या फीचरनंतर म्युझिक आयकॉनसह शेअर होतील. शिवाय, अॅपल म्युझिकवरुन गाणी ट्रॅक करण्याची सुविधाही या फीचरमध्ये असेल. तुमच्या व्हॉट्सअॅप काँटॅक्टमध्ये कुणालाही गाणी पाठवू शकता आणि रिसिव्ह करणारा यूझर आयकॉनवर टॅप करुन गाणं ऐकू शकतो.
इमोजी
नव्या अपडेटनंतर इमोजींचा आकारही वाढवण्यात येणार असल्यची माहिती ‘मेकरकॉफ’ने दिली आहे. आताच्या इमोजींच्या तीनपट नव्या इमोजी असणार आहेत.
मेन्शन
फेसबुक, ट्विटरवर यूझर ज्याप्रमाणे समोरील व्यक्तीला मेन्शन करु शकतात, त्याप्रमाणे आता व्हॉट्सअॅपवरही मेन्शन करता येणार आहे. त्यादृष्टीने व्हॉट्सअॅपकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती ‘मेकरकॉफ’ने दिली आहे.
पब्लिक ग्रुप इन्व्हाईट लिंक
व्हॉट्सअॅप लवकर असं एक फीचर आणणार आहे, ज्याच्या माध्यमातून पब्लिक ग्रुपमध्ये चॅटसाठी इन्व्हाईट पाठवता येणार आहे. इतर मेंबर्सना पब्लिक ग्रुपमध्ये जोडण्यासाठी तुम्हाला या लिंकचा फायदा होईल
=======================================
'व्हॉटसअॅपवर डीपी ठेवणाऱ्या महिलांनो सावध राहा!'
हे फीचर आता अँड्रॉईड यूजर्ससाठी रोलआऊट होणं सुरु झालं आहे. हे नवं अपडेट तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर मिळू शकेल.
चेन्नई : मद्रास उच्च न्यायातील एका न्यायमूर्तींनी महिलांनी व्हटसअॅपवर स्वत:चा डीपी ठेवताना सावधानी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. एका सोळा वर्षीय बलात्कार पीडित तरुणीवरील खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्तींनी हा सल्ला दिला.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती एस. वैद्यनाथ यांनी आपल्या निकालपत्रात व्हाटसअॅपच्या माध्यमातून सायबर क्राइमच्या संख्येत वाढ होत आहे. यासाठी महिलांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांना व्हाटसअॅपवर फोटो अपलोड करताना, किंवा व्हिडिओ शेअर करताना सतर्कता बाळगावी, असे सांगितले आहे.
वास्तविक, आजच्या डिजिटल युगात सर्वांनीच सतर्क राहण्याची गरज आहे, पण महिलांबाबतीत घडणाऱ्या घटनांची संख्या पाहता त्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेहसाणा जिल्ह्यातील सूरज नावच्या गावात फेब्रुवारीत झालेल्या ग्रामसभेने तरुणींचा मोबाईल वापरण्याचा अधिकार काढून घेतला आहे.
काही दिवसांपूर्वीही हॉलीवूड सेलिब्रेटींचे नग्न फोटो नेट हॅकर्सनी इंटरनेटवर लीक केले होते.
=======================================
ए. आर. रहमानच्या सूरांवर विराटचा हिपहॉप
मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा प्रत्येक लुक तरुणांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. क्रिकेटचे मैदान असो, कींवा त्याची स्टाइल लाखो तरुणी त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. नुकताच विराट एका नव्या रुपात सर्वांसमोर आहे.
कोहलीने ऑस्कर पुरस्कार विजेत्या ए. आर. रेहमानच्या सूरांवर गाणे म्हणताना आणि त्याच्यासोबत हिपॉपचा ठेका धरल्याचे पाहायला मिळाला. विराटचा ३५ मिनीटांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वास्तविक, विराटने हे थीम साँग तो ब्रॉन्ड अम्बेसिडर असलेल्या प्रिमिअर फुटसालसाठी बनवले आहे. १४ जुलैपासून भारतात पहिल्यांदा प्रिमिअर फुटसाल लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
=======================================
रोल्स रॉयसची 'डॉन' भारतात लाँच
मुंबई : ब्रिटीश आटोमोबाइल कंपनी रोल्स रॉयसने भारतात आपली नवी लक्झरी कनव्हर्टेबल कार डॉन आज भारतात लाँच केली. फॅटम, घोस्ट आणि रेथनंतर रोल्स रॉयसनची भारतात लाँच होणारी ही चौथी चार चाकी गाडी आहे. सध्या मुंबईत या कारची शोरूम किंमत 6.25 कोटी आहे.
या कारचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये 6.6 लीटर टर्बोचार्जड V12 हे इंजिन जोडण्यात आले आहे. यामुळे या गाडीचा स्पीड 563bhp आहे. यामध्ये 8 स्पीज ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही कार 5 सेकंदात 100 किलोमीटर अंतर कापू शकते. या कारचा मॅक्सिमम स्पीड ताशी 250 किमी आहे.
या कारच्या आतील बाजूस आटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, 16 स्पीकर प्रिमिअर ऑडिओ सिस्टिम, 10 इंचाचा टच स्क्रिन एचडी नेविगेशन डिस्प्ले आहे. मल्टिमीडिया नेविगेशन आणि जेस्जर सेंसिटिव टचपॅडसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची केबीन पुर्णपणे सायलेंस बँलेन्स मॅनेज करणार आहे, असा कंपनीचा दावा आहे.
=======================================
डीएड करणाऱ्यांना नोकरीची हमी नाही
लातूर : डीएडचे शिक्षण घेणाऱ्यांना नोकरीची हमी नाही, असा इशारा डीएडच्या माहिती पुस्तकात छापण्याची वेळ सरकारवर आली आहे. गेल्यावर्षी वृत्तपत्रात जाहिरात देऊन सरकारने हे जाहीर केले होते. एकीकडे कॉलेजला परवानगी देणे आणि दुसरीकडे असा इशारा, यामुळे डीएड कॉलेजचा, विद्यार्थ्यांचा आणि कॉलेज कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी खेळ सुरु आहे.
बारावीनंतर अडीच वर्षांचे डीएड केल्यानंतर चांगली पगाराची नोकरी मिळते, यामुळे १९९५ पासून अनेकांचा डीएडकडे ओढा वाढला. त्याचबरोबर शिक्षणाचा बाजार करणाऱ्या शिक्षणसम्राटांनी या क्षेत्रात प्रवेश करून कायम विनाअनुदानित डीएड कॉलेज सुरू केले. लाखो रुपये डोनेशन देऊन मुले शिक्षक होण्याचे स्वप्न पाहू लागले. मात्र, या चक्रची गती आज मरणासन्न झाली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने डीएडच्या माहिती पुस्तकीवर चक्क आम्ही यातून नोकरीची खात्री देऊ शकत नाही, असे छापल्याने डीएडमध्ये शिकणाऱ्या लाखो तरुणांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.
=======================================
अकोटमधून बांधकाम मजूराच्या मुलीचे अपहरण
अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट येथे मनश्री संतोष लाकडे या पाच वर्षीय चिमुकलीचं अपहरण करण्यात आलं आहे. काल दुपारी बारा वाजता स्थानिक जिजामाता चौकानजीक असलेल्या सितलामाता मंदिरापासून मनश्रीचे अपहरण करण्यात आलं.
एका महिलेनं चॉकलेटचं आमिष दाखवून मनश्रीचं अपहरण केलं असल्याचं, तिच्यासोबत खेळणाऱ्या मित्रांनी सांगितलं. अकोट पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात महिलेविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मनश्रीच्या शोधासाठी पोलिसांनी काल दुपारपासून संपूर्ण जिल्ह्यात नाकेबंदी केली आहे. अनेक ठिकाणी मनश्रीच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आली. मात्र, अद्यापही मनश्रीचा शोध लागू शकला नाही.
मनश्रीची घरची परिस्थिती गरिबीची परिस्थिती असल्याने तिचे अपहरण गुप्तधन किंवा इतर कारणांसाठी झालं का?, याचा शोध अकोट पोलीस घेत आहेत. वर्षभरापूर्वी अकोट तालुक्यातील अंबोडा गावात शुभम शिवरकार या चिमुकल्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती.
दरम्यान, सदर मुलगी कुणाला आढळल्यास 07258-222642 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन अकोट पोलिसांनी केलं आहे.
दरम्यान, सदर मुलगी कुणाला आढळल्यास 07258-222642 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन अकोट पोलिसांनी केलं आहे.
=======================================
येणाऱ्या ४८ तासांत वरुणराजा बरसणार!
- ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २६ : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर खऱ्या अर्थाने कोकणात गेल्या ७२ तासांपासून पावसाचा जोर कायम असून, येणाऱ्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. मराठवाडा, तसेच विदर्भातील काही भागातही जोरदार वृष्टी झाली. हमखास पावसाचा बेल्ट समजल्या जाणाऱ्या घाटमाथ्यावरचा पश्चिम महाराष्ट्रात मात्र अजून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल अरबी समुद्राच्या उत्तरी भागात, गुजरात, मध्य प्रदेश तसेच राजस्थानातील काही भागांत होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचे वेधशाळेचे निरीक्षण आहे. २६ जून रोजी कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी हलक्या व मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.मागील २४ तासांत कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत सवार्धिक १९२ मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे झाली आहे.
=======================================
मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २६ : मुंबई गोवा हायवे वर पेण जवळ मिनीडोअर व ट्रेलर मध्ये झालेल्या भीषण अपघातात १ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण २ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना झटपट सेवा देण्यासाठी कल्पेश ठाकूर यांचे शर्थीचे प्रयन्त सुरु आहेत. या अपघातामुळे मुंबई- गोवामहामार्गावर ट्रॅफिक जाम झाली आहे.आज सकाळी ७:३० वाजता पेण जवळील हमरापुर ते ईरवाडी दरम्यान हा अपघात झाला आहे. यामध्ये ट्रेलर क्रमांक MH43 Y 1171 व मिनिडोर MH06 J 1845 यांचे नुकसान झाले आहे. या अपघातात सचिन पाटील यांचा मृत्यू झाला आहे. ते पेण जवळील कामार्ली येथील रहवासी आहेत तर खारसापोली बेडे येथिल प्रसाद पाटील आणि कामार्लीचे सुरेश मुसळे गंभीर जखमी झाले आहेत.
=======================================
आप-भाजप संघर्ष शिगेला, ७ रेसकोर्स परिसरात जमावबंदी
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २६ : 'आप' आमदारावरील पोलीस कारवाईमुळं आप-भाजप संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्चा घेऊन जाणारे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया व अन्य आमदारांना पोलिसांनी तुघलक रोडवर रोखले. त्यानंतर मनीष शिसोदिया यांच्यासह 'आप'चे काही आमदार आणि पोलिसांमध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान 'आप'च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ७ रेसकोर्स परिसरात जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे.काल आम आदमी पार्टीचे आमदार दिनेश मोहनिया यांना दिल्ली पोलिसांनी छेडखानी आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अत्यंत नाट्यमयरीत्या ते पत्रकार परिषदेत बोलत असतानाच अटक केली. त्याचप्रमाणे काल दिल्लीच्या गाझीपूर मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षांनी काल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या विरोधात व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप केला आसून त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, उपमुख्यमत्री मनीष शिसोदिया आज 7, RCR वर पंतप्रधान मोदी यांच्यासमोर शरणागती पत्करणार आहेत. असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
=======================================
IIFA २०१६ पुरस्कारांवर 'बाजीराव-मस्तानी'ची छाप
- माद्रिद, दि. २६ : स्पेनमधील माद्रिद येथे १७व्या IIFA २०१६च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाजीराव मस्तानी‘ चित्रपटाने बाजी मारली. 'बाजीराव-मस्तानी'साठी संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिर्ग्दशकाचा तर णवीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. तर दीपिका पदुकोणला पिकू साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला एकूण नऊ पुरस्कार मिळाले. यापाठोपाठ पिकू चित्रपटाने सर्वाधिक म्हणजे पाच पुरस्कार मिळाले. सलमान खानची भूमिका असलेल्या 'बजरंगी भाईजान'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.पुरस्कार विजेते -सर्वोत्कृष्ट चित्रपट - बजरंगी भाईजानसर्वोत्कृष्ट अभिनेता - रणवीरसिंग (बाजीराव मस्तानी)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - दीपिका पदुकोण (पिकू)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी)सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - अनिल कपूर (दिल धडकने दो)सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - प्रियांका चोप्रा (बाजीराव मस्तानी)सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेत्री - भूमी पेडणेकर (दम लगा के हैशा)सर्वोत्कृष्ट पटकथा - जूही चतुर्वेदी ( पीकू )
स्पेशल अवॉर्ड फॉर वुमन ऑफ द ईअर - प्रियांका चोप्रासर्वोत्कृष्ट डेब्यू कपल अवॉर्ड - सूरज पंचोली आणि आथिया शेट्टीबेस्ट परफार्मेंस इन ए नेगेटीव्ह रोल - दर्शन कुमार ( NH10 )बेस्ट परफॉर्मेंस इन कॉमिक रोल - दीपक डोब्रियाल (तनु वेड्स मनु रिर्टन्स)सर्वोत्कृष्ट पदार्पण (मेल) - विकी कौशल ( मसान)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - मोनाली ठाकुर ( मोह-मोह के धागे, दम लगा के हईश्शा)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायका (मेल) - पपोन ( मोह-मोह के धागे - दम लगा के हईश्शा)
=======================================
रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे सर्वाधिक 190 मिमी पावसाची नोंद
- जयंत धुळपअलिबाग, दि. २६ : रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे जिल्ह्यातील सर्वाधिक 190 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच चोविस तासात जिल्ह्यात एकुण 1853.10 मिमी पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान 115.82 मिमी आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकुण पाऊस 104.40 मिमी होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान 6.53 मिमी होते. दरम्यान जिल्ह्यातील वार्षीक एकुण अपेक्षीत पावसा पैकी 15.25 टक्के पाऊस पूर्ण झाला आहे.रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात रायगड जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी उरण-174, पेण-140, मुरुड-130, रोहा-129, श्रीवर्धन-125, तळा-123, पनवेल-121.60, म्हसळा-116.80, माथेरान-115, माणगांव-109, सुधागड-92, महाड-78, कर्जत- 73.70 , खालापूर-72 तर पोलादपुर-64 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
=======================================
आंब्याचा गोडवा अमेरिकेत!
- पुणे : वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून केशर, तोतापुरी या जातीचा एकूण १३ टन आंबा समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झाला. भारतीय आंबा निर्यातीच्या दृष्टिकोनातून अमेरिकेला समुद्रामार्गे निर्यातीची ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना असून, यामुळे भारतीय आंबा अमेरिकेच्या बाजारपेठेत स्पर्धा करू शकणार आहे.राज्यात उत्पादित होणारा हापूस व केशर आंब्यास जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या २० वर्षांपासून भारतीय आंब्याला अमेरिकन बाजारपेठेमध्ये बंदी होती. सन २००६ मध्ये अमेरिकेने भारतीय आंब्याकरिता अमेरिकन बाजारपेठ काही अटी व शर्तींवर खुली केली. त्यामध्ये आंब्यावर निर्यातीपूर्वी विकिरण प्रक्रिया करण्याबाबत सूचित केले. कृषी पणन मंडळाने सुरवातीला लासलगाव येथील कृषक या विकीरण सुविधेचा वापर करून आंबा निर्यात निर्यातदारामार्फत सुरू केली होती. २०१६ पासून वाशी येथील विकीरण सुविधा केंद्रावरून मोठ्या प्रमाणात आंबा निर्यात सुरू करण्यात आली. या हंगामात आतापर्यंत १७५ टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून निर्यातदारांनी विमानमार्गे निर्यात केला आहे.शुक्रवारी १३ टन आंब्याचा कंटेनर समुद्रामागे अमेरिकेला रवाना झाला. या वेळी अमेरिकन निरीक्षक प्रेम बालकरण, अपेडा मुंबईचे पी. पी. वाघमारे, सी. बी. सिंग, कृषी पणन मंडळाचे ओ. पी. नीला, डॉ. भास्कर पाटील, डी. एम. साबळे, सतीश वराडे, अभिमन्यू माने, सुशील चव्हाण आदी उपस्थित होते.
=======================================
सुखोईवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र स्वार
- नाशिक : संपूर्ण भारतीय बनावटीचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानांवर बसविण्याचे तंत्र यशस्वी झाल्याने या क्षेपणास्त्राचा हवेतून अचूक मारा करून, शत्रूचा थरकाप उडविण्याची क्षमता भारतीय हवाई दलाच्या आवाक्यात आली आहे.अडीच हजार किलो वजनाचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र हवाई दलातील ‘एसयू-३० एमके आय’ लढाऊ विमानावर बसविण्याचे तांत्रिकदृष्या आव्हानात्मक काम हिंदुस्तान एअरोनॉटिक्सच्या ओझर कारखान्यानेफत्ते केले. असे क्षेपणास्त्र बसविलेल्याएका सुखोई विमानाने येथीलएचएएल विमानतळावरून ४५ मिनिटांचे चाचणी उड्डाण यशस्वी करून इतिहास घडविला. अर्थात, सुरक्षेच्या कारणावरून उड्डाणाच्या वेळी प्रत्यक्ष ब्रह्मोस क्षेपणास्त्र सुखोईवर न बसविता तेवढ्याच वजनाचे व आकाराचे ‘डमी’ क्षेपणास्त्र बसविण्यात आले होते. एवढ्या वजनाचे, आवाजाहूनही अधिक वेगाने जाणारे क्रुझ क्षेपणास्त्र लढाऊ विमानावर यशस्वीपणे आरूढ केले जाण्याची जगातील ही पहिलीच वेळ आहे.
=======================================
पार्ट्या ठरताहेत अमलीपदार्थांच्या खरेदी - विक्रीचे स्पॉट
- - मनीषा म्हात्रे, मुंबईलहान-मोठ्या पार्ट्यांमधून तरुणाई अमलीपदार्थांच्या जाळ्यात ओढली जात असल्याचे धक्कादायक वास्तव अमलीपदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत दिसून आले. त्यातच एमडीपाठोपाठ ‘एन बॉम्ब’चा मुंबईला धोका असल्याचे समोर येत आहे. त्या दिशेने अमली पदार्थविरोधी पथकाने कंबर कसली आहे.पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा सर्रास वापर होण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागासह गुन्हे शाखेने तस्करांवर कारवाई करण्यासाठी पथके तयार केली आहेत. अमलीपदार्थांच्या विक्रीची ठिकाणे, कोडवर्ड आणि रेव्ह पार्ट्यांची माहिती घेण्यासाठी फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅप आणि ईव्हेन्ट आॅर्गनायझर कंपन्यांच्या साइटसह अन्य सोशल नेटवर्किंग साइट व पंचतारांकित हॉटेल, रेस्टॉरंट आणि पब यांच्या आॅनलाइन बुकिंग साइटवर पोलिसांचे विशेष लक्ष असते.
=======================================
उपनगरात होणार दोन नवीन ‘ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर’
- - पूजा दामले, मुंबईदेशासह मुंबईतील तरुणाई विविध व्यसनांच्या आहारी जात आहे. या व्यसनांपासून तरुण आणि अन्य वयोगटातील व्यक्तींना लांब ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येते, पण ज्या व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेल्या आहेत, अशा व्यक्तींना व्यसनांतून बाहेर काढण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबविण्यात येतो. पुढच्या काही दिवसांतच या उपक्रमांतर्गत अंधेरीतील भरडा वाडी आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात ‘ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली.९०च्या दशकापासून केईएम रुग्णालयात व्यसनमुक्ती केंद्र सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी आरोग्य मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत केईएम रुग्णालयातील व्यसनमुक्ती केंद्रात तीन वर्षांपूर्वी ‘ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर’ची स्थापना करण्यात आली. हे प्रादेशिक केंद्र आहे. या केंद्रात १५० ते १७० जुने रुग्ण आहेत, तर रोज १५ ते २० नवीन व्यसनी व्यक्ती उपचारांसाठी येत असतात. मुंबईत सध्या दारूबरोबरच चरस, गांजा यांच्या व्यसनांचे प्रमाणही अधिक दिसून येते. व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनातून मुक्ती करून देणे इतके सोपे नसते. कारण या व्यक्ती फक्त व्यसनांच्या आहारी गेलेल्या नसतात, त्यांना मानसिक आजारही असतात. त्यावर उपचार करणे आवश्यक असते, असे डॉ. पारकर यांनी सांगितले.
=======================================
आपच्या आणखी एका आमदारास दिल्लीत अटक
- नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार दिनेश मोहनिया यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी छेडखानी आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अत्यंत नाट्यमयरीत्या ते पत्रकार परिषदेत बोलत असतानाच अटक केली.दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कारवाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी यांनी राजधानी दिल्लीत आणीबाणी लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष असलेले मोहनिया यांना एका पोलीस अधिकाऱ्याने दुपारी १२.१ वाजताच्या सुमारास दक्षिण दिल्लीच्या खानपूर येथील त्यांच्या कार्यालयातून अक्षरश: खेचून बाहेर काढले. त्या वेळी ते एक पत्रपरिषद घेत होते. दक्षिण पूर्वचे संयुक्त पोलीस आयुक्त आर.पी. उपाध्याय यांनी सांगितले की, मोहनिया यांच्यावर भादंविच्या ३२३ (जाणूनबुजून नुकसान पोहोचविले), ५०६ (धमकी देणे), ५०९ (महिलेचा विनयभंग), ३५४ (विनयभंगाच्या हेतूने महिलेसोबत बळजबरी), ३५४ ए (लैंगिक अत्याचार) आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
=======================================
३० वर्षांनी लष्करास नव्या तोफा
- नवी दिल्ली : सुमारे ७५० दशलक्ष डॉलर खर्च करून भारतीय लष्करासाठी हलक्या वजनाच्या १४५ हॉवित्झर तोफा अमेरिकेकडून घेण्याच्या तसेच देशी बोफोर्स म्हणून विकसित करण्यात आलेल्या धनुष तोफांचे देशातच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या प्रस्तावांना संरक्षण मंत्रालयाकडून शनिवारी मंजुरी मिळाली. बोफोर्स घोटाळ्यानंतर लष्करासाठी या नव्या तोफा प्रथमच घेण्यात येणार आहेत. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिल’च्या (डीएसी) बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या नव्या संरक्षणसामग्री खरेदीच्या प्रस्तावांवरही चर्चा झाली.अमेरिकेकडून घेतल्या जाणाऱ्या हॉवित्झर तोफांची २५ किमी अंतरावर मारा करण्याची क्षमता असून, चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश आणि तिबेटमधील डोंगराळ भागात त्या तैनात करण्याची योजना आहे.संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या तोफा खरेदी करण्याचे स्वारस्य व्यक्त करणारे पत्र भारताने अमेरिकेस पाठविले होते. तो प्रस्ताव स्वीकार्य असल्याचे अमेरिकेने कळविले आहे. त्यासाठीच्या अटी व शर्तींवर ‘डीएसी’ने विचार केला व त्या मंजूर केल्या. आता अमेरिकेस तसे कळविले जाईल आणि खरेदी किंमतीचा पहिला हप्ता देण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल.
=======================================
गोवेकरांना पोर्तुगीज नागरिकत्व देणे चूक
- विदेशस्थ गोवेकर संघटनेच्या अध्यक्षांची प्रांजळ भूमिकापणजी : गोवा ‘ताब्यात’ घेण्यापूर्वी येथील नागरिक असणाºयांना व त्यांच्या अपत्यांना पोर्तुगीज नागरिकत्व बहाल करण्याचा पोर्तुगीज सत्ताधीशांचा निर्णय राजकीयदृष्ट्या चूक होता, असे मत ‘काझा दो गोवा’ या विदेशस्थ गोवेकरांच्या सर्वात मोठ्या संघटनेचे अध्यक्ष एडगर व्हेलीस यांनी शनिवारी व्यक्त केले.प्राईम टीव्हीवरील ‘लोकमत लोकशक्ती’ कार्यक्रमात ब्रिटनच्या ‘ब्रिक्झिट’ विषयावर बोलताना व्हेलीस यांनी वरील उद््गार काढले. या चर्चेत माजी कायदामंत्री रमाकांत खलप व कायदातज्ज्ञ क्लियोफात कुतिन्हो यांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन ‘लोकमत’चे संपादक राजू नायक यांनी केले.व्हेलीस म्हणाले : गोवा भारताने ‘ताब्यात’ घेण्यापूर्वी येथील नागरिक हे ‘पोर्तुगीज’ असल्याचे मत पोर्तुगालच्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी बनविले होते. नेहरूंनी गोवेकरांना स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्याचे मान्य केले होते; परंतु त्यानंतर त्यांनी माघार घेतली. तरी पोर्तुगीज राज्यकर्त्यांना गोवेकरांबद्दल व त्यांच्या पोर्तुगीज प्रेमाबद्दल विलक्षण आदर होता, त्यातूनच इतर कोणत्याही पोर्तुगीज वसाहतींना न देता केवळ गोव्याला त्यांनी नागरिकत्वाचा विशेषाधिकार बहाल केला होता. गोवा ‘ताब्यात’ घेतला होता, त्यावर भारतीय सर्वोच्च न्यायालयानेही मोहोर उमटवली, असे विधान व्हेलीस यांनी केले असता, खलप व कुतिन्हो यांनी तो संदर्भ वेगळा होता, असे मत व्यक्त केले.
=======================================
कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराज यांच्या 142 व्या जयंती निमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देवून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
राजर्षी शाहू महाराजांना शाहू जन्मस्थळी अभिवादन
| |
- -
| |
यावेळी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, आमदार सतेज पाटील, महापौर अश्विनी रामाणे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर शमा मुल्ला, डॉ.जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरली जाधव, नगरसेवक अशोक जाधव, यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
=======================================
बारामुल्लामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
| |
-
| |
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन (एलओसी) घुसखोरी करत असलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोन दहशतवाद्यांचा एलओसीवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा डाव सुरक्षा रक्षकांनी उधळला. या दोन्ही दहशतवाद्यांना गोळीबारात ठार मारण्यात आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील लाचीपोरा भागातून हे दहशतवादी भारतीय हद्दीत घुसत होते. सुरक्षा रक्षकांनी या दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात हे दोन्ही दहशतवादी ठार झाले. या ठिकाणी आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने, परिसरात शोधमोहिम सुरु आहे.
सुरक्षा रक्षकांनी या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली आहे. शनिवारी पम्पोर येथ दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) आठ जवान हुतात्मा झाले होते.
=======================================
रॉबर्ट वद्रांविरुद्ध गुन्हा दाखल करा - सोमय्या
| |
-
| |
नवी दिल्ली - कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या विरोधात जमीन खरेदीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आज केली. राजस्थानच्या पोलिस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात सोमय्या यांनी म्हटले आहे की, बिकानेर येथील जमीन खरेदीप्रकरणी राजस्थान पोलिसांनी रॉबर्ट वद्रा यांच्या मालकीच्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. बिकानेर येथील जमीन खरेदीप्रकरणी वद्रा हे अंतिम लाभधारक आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित जमीन राजस्थान सरकारने जप्त केलेली असली तरी, याप्रकरणी गुन्हेगारी स्वरूपाचा कट केल्याचा मुद्दा शिल्लक राहतो. त्यामुळे वद्रा यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात सहभागी झाल्याप्रकरणी "एफआयआर‘ दाखल करण्यात यावी.
बिकानेर येथील जमीन खरेदीप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे. मात्र, या "एफआयआर‘मधून वद्रा यांचे नाव वगळण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित अनेक आरोपींवर आरोप पत्र दाखल केले आहे. सक्त वसुली संचालनालयही बिकानेर येथील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या पैशांच्या अफरातफरीची चौकशी करत असून, त्यासंदर्भात वद्रा यांच्याशी संबंधित कंपन्यांना समन्स पाठविले आहेत.
बिकानेर येथील जमीन खरेदीप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे. मात्र, या "एफआयआर‘मधून वद्रा यांचे नाव वगळण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित अनेक आरोपींवर आरोप पत्र दाखल केले आहे. सक्त वसुली संचालनालयही बिकानेर येथील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या पैशांच्या अफरातफरीची चौकशी करत असून, त्यासंदर्भात वद्रा यांच्याशी संबंधित कंपन्यांना समन्स पाठविले आहेत.
=======================================
No comments:
Post a Comment