[अंतरराष्ट्रीय]
१- वॉशिंग्टन; अमेरिकेचे ९९ टक्के आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान भारतासाठी खुले
२- मोगादिशु; सोमालियात 'अल शबाब'च्या हल्ल्यात 14 ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- लोकशाहीतील आजचा काळा दिवस, मोदींची टीका
४- दिल्लीत सिसोदियांसह 'आप'चे 60 आमदार पोलिसांच्या ताब्यात
५- NSGचं सदस्यत्व मिळालं तर नुकसानच - यशवंत सिन्हा
६- ३० सप्टेंबरपर्यंत अघोषित मालमत्ता जाहीर केल्यास कोणतीही कारवाई नाही
७- भारताकडून समूह पध्दतीने संकटाचा सामना - मोहन भागवत
८- तलाक, पुनर्विवाह प्रथांविरोधात मुस्लिम महिलांचा एल्गार
९- रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे १०० पेक्षा जास्त खेळाडू पात्र
१०- वर्षअखेरीस एनएसजी देशांची बैठक, भारताच्या प्रवेशावर होणार चर्चा
११- पर्यटकांसाठी लवकरच दीर्घकालीन बहूप्रवेश व्हिसा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- मी केवळ छत्रपतींचा सेवक, फडणवीसांचं पवारांना उत्तर
१३- तुमच्या वृत्तपत्राच्या जाळपोळीस तयार रहा, शेलारांचा इशारा
१४- खडसेंना कॉल करायला दाऊदवर एवढी वाईट वेळ आली आहे का - राज ठाकरे
१५- भारत जगाची फॅक्टरी बनेल- देवेंद्र फडणवीस
१६- यंदा पंढरीची वारी ‘आयटी’त! पुण्यातील 900 आयआयटीयन्स सहभागी होणार
१७- हल्ल्यांमुळे काश्मीरचे नाव खराब- मेहबूबा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- नागोबांचा बुटात घरोबा, लातूरात आतापर्यंत 127 साप पकडले
१९- मालवणी तिहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं, तिघे अटकेत
२०- अकोला; मनश्रीच्या अपहरणकर्तीचे रेखाचित्र जारी
२१- मुंबईत रेल्वेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू
२२- पणजी; खाडीसफाईच्या पाहणीदरम्यान महापौर बुडता बुडता वाचले
२३- बंगळूरू; जाहीर कार्यक्रमात 'तिने' कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन
२४- अकोला; विजेचा खांब अंगावर पडल्यामुळे एक व्यक्तीचा मृत्यू; जिल्हाधिकारी कार्यालासमोरील घटना
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- हैदराबादमध्ये आर्चीच्या उपस्थितीत सैराटचा 'झिंगाट' प्रिमियर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=======================================

पेशव्यांची छत्रपतींनी नियुक्ती केली होती. आज पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केली, असं पवार म्हणाले. त्यामुळे पवारांचं हे विधान मिश्किल असलं तरी त्याची खमंग चर्चा झाली.

विकासाच्या प्रवाहाबाहेर राहणाऱ्यांना एक दिवस जनता लोकशाहीच्या बाहेर ठेवणार, असा टोलाही स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्या सेनेला शेलारांनी लगावला आहे.
त्यानंतर शेलारांनी सेनेला इशारा देत आम्ही ‘दैनिक सामना’च्याही प्रती जाळू शकतो असा इशारा दिला.माधव भांडारींनी नुकतंच शिवसेनेला आपल्या लेखातून घटस्फोट घ्या असे आवाहन दिलं होतं. भाजप नेत्यांनी ताबडतोब हे भांडारींचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत पक्षाला त्या भूमिकेपासून दूर केलं. मात्र शिवसेनेने ताबडतोब पलटवार केला. नागपुरात शिवसैनिकांनी एक पत्रक काढून भाजपला ‘शोले’मधील
सुरमा भोपाळी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शकुनीमामा असल्याचं हिणवलं.

मनिष सिसोदिया काल दिल्लीतल्या गाजीपूर मंडी परिसरात गेले असताना त्यांनी व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. या घटनेची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी आपच्या आमदारांची बैठक झाली.
या बैठकीत सिसोदिया पंतप्रधान कार्यालयाबाहेर पोलिसांना शरण जातील असं ठरलं. त्यानुसार पंतप्रधान निवासाकडे परवानगी न घेता निघालेल्या आमदार आणि मंत्र्यांच्या गाडीला पोलिसांनी रस्त्यात अडवून ताब्यात घेतलंय.

संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड घडवून आणल्याची प्राथमिक माहिती आहे. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी गुजरातच्या वलसाडमधून तीन आरोपींना अटक केली आहे. इमरान, सलमान आणि सलमानची पत्नी अनम यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
गुरुवारी न्यू कलेक्टर कॉलनीत प्लॉट नंबर 23 वर रुम नंबर 92 मध्ये राहणाऱ्या शॉ कुटुंबीयांमध्ये तिहेरी हत्याकांड घडलं होतं. तीक्ष्ण चाकूने वार करुन तिघांचा खून करण्यात आला होता.

सांत इनेज या नाल्यात पणजीचे महापौर सुरेंद्र फु्र्ताडो पाहणी करत होते. त्यावेळी ही घटना घडली. ही घटना नेमकी कधीची आहे, याबाबत माहिती नसली, तरी ‘इनगोवा 24×7’ या स्थानिक वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे.
‘इनगोवा 24×7’वृत्तवाहिनीचा पत्रकारही यावेळी बुडताना वाचल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मशिनवर 6 जण होते. मशिन उलटल्यामुळे सर्वजण पाण्यात पडले.

मी केवळ छत्रपतींचा सेवक, फडणवीसांचं पवारांना उत्तर
कोल्हापूर : मी छत्रपतींचा केवळ सेवक आहे, संभाजी राजेंची राज्यसभेवरील नियुक्ती ही राष्ट्रपतींनीच केली, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिलं आहे. शनिवारी पवारांनी केलेल्या मिश्कील टिपणीवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्यसभेवरील निवडीबाबत पवारांना विचारणा केली, त्यावर सुरुवातीला या निवडीकडे राजकीय दृष्टीकोनातून बघण्याची गरज नाही, असं मत पवारांनी व्यक्त केलं. मात्र त्यानंतर इतिहासाचा दाखलाही त्यांनी दिला. यावेळी पहिल्यांदाच फडणवीसांकडून छत्रपतींची निवड झालीय, असंही मिश्किलपणे ते म्हणाले.
पेशव्यांची छत्रपतींनी नियुक्ती केली होती. आज पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केली, असं पवार म्हणाले. त्यामुळे पवारांचं हे विधान मिश्किल असलं तरी त्याची खमंग चर्चा झाली.
यावर उत्तर देताना मी छत्रपतींचा केवळ सेवक आहे, राज्यसभेवरील नियुक्ती ही राष्ट्रपतींनीच केली, असं फडणवीस म्हणाले. संभाजीराजे यांची खासदारकी हा विचारांचं सन्मान आहे. कोल्हापुरात झालेल्या शेतकरी मेळाव्यानिमित्त फडणवीस बोलत होते.
=======================================
लोकशाहीतील आजचा काळा दिवस, मोदींची टीका
नवी दिल्लीः काही वर्षांआधी 26 जूनलाच जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आज देशातला सर्वसामान्य माणूस निर्णय घेतो. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
‘मन की बात’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनतेशी संवाद साधला. आणीबाणी घोषीत करण्यात आली तो लोकशाहीसाठी काळा दिवस होता. पण हीच आणीबाणी लोकशाहीच्या शक्तीचं सर्वात मोठं उदाहरण असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं.
लोकशाहितील आजचा काळा दिवस
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 26 जून 1975 साली आणीबाणी लागू केली होती. त्याला आज 41 वर्ष पूर्ण होत आहेत. यासंदर्भात ‘मन की बात’च्या माध्यमातून टीका करण्याची संधी पंतप्रधानांनी सोडली नाही. आज देशभरात भाजप आणीबाणीचा दिवस काळा दिवस म्हणून पाळत आहे.
=======================================
तुमच्या वृत्तपत्राच्या जाळपोळीस तयार रहा, शेलारांचा इशारा
मुंबई : युतीत भडकलेला वणवा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. ज्यांनी ‘मनोगत’ पाक्षिकाच्या प्रती जाळल्या त्यांनी स्वतःच्या वर्तमानपत्राच्या जाळपोळीसही तयार राहावं, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.
विकासाच्या प्रवाहाबाहेर राहणाऱ्यांना एक दिवस जनता लोकशाहीच्या बाहेर ठेवणार, असा टोलाही स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्या सेनेला शेलारांनी लगावला आहे.
भाजपचं पाक्षिक असलेल्या ‘मनोगत’मधून भाजप प्रवक्ते माधव भांडारींनी उद्धव ठाकरे यांची तुलना शोले चित्रपटातल्या असरानींशी केली होती. त्यानंतर शिवसेनेनं ठिकाठिकाणी आंदोलन करुन या मनोगत पाक्षिकाची होळी केली. भांडारींचा निषेध करत शिवसैनिकांनी नागपुरात त्यांचा पुतळा जाळला गेला.
त्यानंतर शेलारांनी सेनेला इशारा देत आम्ही ‘दैनिक सामना’च्याही प्रती जाळू शकतो असा इशारा दिला.माधव भांडारींनी नुकतंच शिवसेनेला आपल्या लेखातून घटस्फोट घ्या असे आवाहन दिलं होतं. भाजप नेत्यांनी ताबडतोब हे भांडारींचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत पक्षाला त्या भूमिकेपासून दूर केलं. मात्र शिवसेनेने ताबडतोब पलटवार केला. नागपुरात शिवसैनिकांनी एक पत्रक काढून भाजपला ‘शोले’मधील
सुरमा भोपाळी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शकुनीमामा असल्याचं हिणवलं.
=======================================
दिल्लीत सिसोदियांसह 'आप'चे 60 आमदार पोलिसांच्या ताब्यात
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या सर्व मंत्र्यांसह आम आदमी पक्षाच्या 60 आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पंतप्रधान निवासस्थानाबाहेर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया सर्व आमदारांसह स्वतःला अटक करवून घेणार होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी सर्व आमदार आणि मंत्र्यांना ताब्यात घेतलंय.
मनिष सिसोदिया काल दिल्लीतल्या गाजीपूर मंडी परिसरात गेले असताना त्यांनी व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. या घटनेची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी आपच्या आमदारांची बैठक झाली.
या बैठकीत सिसोदिया पंतप्रधान कार्यालयाबाहेर पोलिसांना शरण जातील असं ठरलं. त्यानुसार पंतप्रधान निवासाकडे परवानगी न घेता निघालेल्या आमदार आणि मंत्र्यांच्या गाडीला पोलिसांनी रस्त्यात अडवून ताब्यात घेतलंय.
=======================================
नागोबांचा बुटात घरोबा, लातूरात आतापर्यंत 127 साप पकडले
लातूरः पावसाळा सुरू झाला आणि जमिनीवरील गारव्याचा आनंद घेण्यासाठी बिळात लपून बसलेले नागोबा बाहेर पडले आहेत. लातूरमध्ये चार दिवसात सर्पमित्रांनी तब्बल 127 साप पकडले आहेत.
वनविभाकडे पकडलेल्या सर्व सापांची नोंद करण्यात आली आहे. लातूरमध्ये पहाटेपर्यंत सर्पमित्रांना साप पकडण्याचं काम करावं लागत आहे. पकडलेले बरेचसे साप बिनविषारी असले तरी काही अशिया खंडातील सर्वात विषारी सापांपैकी आहे.
मराठवाड्यात जवळपास 4 वर्षांनंतर मनसोक्त पाऊस झाला आहे. गेली 3 वर्ष सततचा दुष्काळ आणि पाणीटंचाई, त्यामुळे प्रत्येक सजीवाला इथे मरगळ आली होती. पण आता चित्र बदललं आहे. दुष्काळात खोलवर दडी मारुन बसलेले अनेक जीव सध्या बिळातून बाहेर पडले आहेत.
=======================================
मालवणी तिहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं, तिघे अटकेत
मुंबई : मुंबईच्या मालवणी परिसरात झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात क्राईम ब्रँचला यश आलं आहे. आजी आणि दोन नातवंडाच्या हत्येप्रकरणी एक महिला आणि दोन पुरुषांना अटक झाली आहे.
संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड घडवून आणल्याची प्राथमिक माहिती आहे. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी गुजरातच्या वलसाडमधून तीन आरोपींना अटक केली आहे. इमरान, सलमान आणि सलमानची पत्नी अनम यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
गुरुवारी न्यू कलेक्टर कॉलनीत प्लॉट नंबर 23 वर रुम नंबर 92 मध्ये राहणाऱ्या शॉ कुटुंबीयांमध्ये तिहेरी हत्याकांड घडलं होतं. तीक्ष्ण चाकूने वार करुन तिघांचा खून करण्यात आला होता.
47 वर्षीय बबली शॉ यांच्यासह त्यांचा 13 वर्षांचा नातू आर्यन इस्माईल शेख आणि 8 वर्षांची नात सानिया इस्माईल शेख यांची हत्या झाली होती.
=======================================
NSGचं सदस्यत्व मिळालं तर नुकसानच - यशवंत सिन्हा
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २६ : अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न असताना त्यांना पक्षातूनच विरोध होत आहे. भारताला 'एनएसजी'कडं याचना करण्याची गरज नाही. सध्याच्या परिस्थितीत NSGचं सदस्यत्व मिळालं तर नुकसानच आहे. असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी माध्यमांशी बोलताना केले. मोदी सरकारचं पाकविषयीचं धोरण पूर्णत: फसलं आहे. जितक्या लवकर हे धोरण बदललं जाईल, तितकं ते हिताचं आहे असेही ते म्हणाले.भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३८ देशांनी भारताला सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला होता. एनएसजीच्या ४८ सदस्यीय समूहात सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोर्चेबांधणी केली होती; पण चीनचा विरोध कायम राहिल्याने यात यश मिळू शकले नाही.'एनएसजी' प्रवेशासंदर्भात भारत चीनसोबत सातत्यानं चर्चा करत राहणार आहे. यामध्ये आम्हा यश येईल. अण्वस्त्र प्रसाराच्या मुद्द्यावर भारताची पाकिस्तानशी तुलना होऊच शकत नाही. जगातील कोणताही देश असं करणार नाही भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांची माहिती...
=======================================
३० सप्टेंबरपर्यंत अघोषित मालमत्ता जाहीर केल्यास कोणतीही कारवाई नाही
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २६ : ज्यांच्याकडं अघोषित मालमत्ता आहे त्यांना सरकारनं एक संधी दिली आहे. संबंधितांनी ३० सप्टेंबरपर्यंत स्वत:हून याची माहिती द्यावी. जर त्यांनी स्वत: सर्व माहीती दिल्यास सरकार कुठलीही चौकशी करणार नाही. असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासींयाना केले आहे. ते मन की बात या कार्यक्रमादवारे जनतेशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भारतीय हवाई दलातील महिला फायटरंना शुभेच्छा दिल्या. २१ तारखेला झालेल्या योगा दिनात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी देशवासींयांचे आभारही मानले. ते म्हाणेले योगाद्वारे आपण जगाशी जोडलो गेलो आहे. योगा हा आपल्या जिवनांचा अविभाज्य भाग आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे.या कार्यक्रमाच्या 21 व्या भागातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चांगला पाऊस पडावा यासाठी इच्छा व्यक्त केली. तसेच नागरिकांनी पावसाचा आनंद घ्यावा, पण थेंब न थेंब साठवून ठेवावा, असेही म्हटले आहे.
मोदी म्हणाले की, सरकारने बेकायदेशीररित्या संपत्ती बाळगणाऱ्या नागरिकांना अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देऊ केली आहे. त्यामुळे अश्या लोकांनी 30 सप्टेंबरपर्यंत अघोषित संपत्ती उघड करावी. त्यानंतर मात्र कर बुडव्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. स्वेच्छेने अघोषित देशांतर्गत संपत्ती जाहीर करणारे लोक स्वत:वर होणारी दंडात्मक कारवाई होण्यापासून बचाव करू शकणार आहेत.
=======================================
खडसेंना कॉल करायला दाऊदवर एवढी वाईट वेळ आली आहे का
- ऑनलाइ लोकमतमुंबई, दि. २६ : दाऊद इब्राहिम एकनाथ खडसेंना कॉल करतो म्हणजे दाऊदवर एवढी वाईट वेळ आली आहे का, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडसेंच्या कथित दाऊद कॉल प्रकरणाची खिल्ली उडवली. यूपीएससी आणि एमपीएससी परिक्षेमध्ये यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहामध्ये हा सोहळा पार पडला.यावेळी बोलताना राज ठाकरेंनी खडसेंवर आरोप असलेल्या कथित दाऊद फोन कॉल प्रकरणावरून त्यांना तिरकस टोला लगावला. दाऊद पाकिस्तानातून स्वतःची यंत्रणा सांभाळतो आणि तो खडसेंना फोन करेन का, एवढी वाईट वेळ त्याच्यावर कशी आली, अशा शब्दात राज यांनी खिल्ली उडवली. आपल्याकडे काहीही झालं की लगेच तर्क वितर्क लावले जातात, मात्र त्याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे, असं राज यांनी सांगितलं.
=======================================
भारताकडून समूह पध्दतीने संकटाचा सामना - मोहन भागवत
- ऑनलाइन लोकमतलातूर, दि. २६ : नैसर्गिक असो अथवा अस्मानी संकट असो़ या संकटांचा सामना भारतीय नागरिक समूह पध्दतीने करुन हिमतीने उभे राहतात़ जगामध्ये मात्र असे दिसत नाही़ जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील लोक सप्टेंबर महिन्यात घराबाहेर पडत नाहीत़ कारण या महिन्यात वर्ल्डट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता़ या हल्ल्याची भिती आजही त्यांच्या मनात आहे़ आपण बाँम्बस्फोट झाला तरी दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडून परिस्थितीला सामोरे जातो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे रविवारी व्यक्त केले़जलयुक्त लातूर उपक्रमातंर्गत मांजरा नदीच्या १८ किमीचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे़ या नदीपात्रात स्थिरावलेल्या पाण्याचे कलशपूजन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी जलयुक्त लातूरचे मार्गदर्शक डॉ़ अशोक कुकडे, अॅड़ मनोहर गोमारे, अॅड़ त्र्यंबकदास झंवर, मकरंद जाधव, सुनील देशपांडे, अरुण डंके, निलेश ठक्कर आदींची उपस्थिती होती़
=======================================
मनश्रीच्या अपहरणकर्तीचे रेखाचित्र जारी
- ऑनलाइन लोकमतअकोला, दि. २६ : जिल्ह्यातील अकोटच्या जिजामाता नगरातून अपहरण करण्यात आलेल्या मनश्रीची शोधमोहीम सुरूच आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी हिवरखेड येथील दुकानातील सीसी टीव्हीचे फुटेज २५ जून रोजी पोलिसांनी तपासले; परंतु काही निष्पन्न होऊ शकले नाही. दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी पोलीसांना दिलेल्या माहितीच्या आधारे मनश्रीचे अपहरण करणाऱ्या महिलेचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे.अकोट येथील सीतला माता मंदिरात सवंगड्यांसेबत खेळताना संतोष लाकडे यांच्या साडेपाच वर्षीय मनश्री या बालिकेचे एका अज्ञात महिलेने चॉकलेट देण्याचे आमिष देऊन २४ जून रोजी अपहरण केले. मनश्री सोबत खेळत असलेल्या सवंगड्यांनी सदर महिलेचे वर्णन पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी व नातेवाइकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली.सोशल साईटवरदेखील मनश्रीचा फोटो व वर्णन व्हायरल करण्यात आले, तसेच पोलिसांनी नाकाबंदीही केली; पण पोलिसांना तिचा थांगपत्ता लागला नाही. दुसरीकडे मनश्रीचे वडीलसुद्धा मध्यप्रदेशात आपल्या मुलीच्या शोधासाठी गेले आहेत. मनश्रीच्या वडिलांची परिस्थिती गरिबीची असून, तिच्या घरी आईसह सर्वजण चिंंताग्रस्त झाले आहेत.
=======================================
कोल्हापूर - कोल्हापुरात राजर्षी शाहु महाराजांनी खऱ्या अर्थाने उद्योगाची मुहुर्तमेढ रोवली. राजर्षी शाहुंच्या दूरदृष्टीमुळे शेती, उद्योग, व्यापार अशा सर्व क्षेत्रांमध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रणी आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असताना केवळ भारताचा विकासदर 7.6 टक्के आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. चीनच्या तुलनेत भारतात असलेल्या युवा मानव संसाधनाचा उचित वापर केला तर भारत जगाची फॅक्टरी बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केला.
भारत जगाची फॅक्टरी बनेल- देवेंद्र फडणवीस
| |
-
| |
कोल्हापूर येथे शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच स्मॅक भवनच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, खा. राजू शेट्टी, खा. संजय काका पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, आमदार सदाभाऊ खोत, समरजीतसिंह घाटगे, स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
=======================================
मुंबईत रेल्वेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू
| |
-
| |
मुंबई - दिवा रेल्वे स्थानकाजवळ आज (रविवार) सकाळी रेल्वे रुळ ओलांडताना लोकलचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सितारानी गंगाप्रसाद फतवा (वय 45) असे या महिलेचे नाव आहे. दिवा येथे रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या महिलेकडे कपड्यांचे गाठोडे व पाण्याची बादली सापडल्याने ती कपडे धुण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून गेली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेनंतर महिलेचे कुटुंब घटनास्थळी पोचले. तिला रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. पोलिस अधिक तपास करत आहेत.
=======================================
यंदा पंढरीची वारी ‘आयटी’त! पुण्यातील 900 आयआयटीयन्स सहभागी होणार
पुणे : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींचा वारीत वाढता सहभाग बघता पुण्यात एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्याप्रमाणे वारकरी हरिनामाचा गजर करतात त्याप्रमाणे या तरूणांनाही प्रशिक्षण देण्यात आलं. सिंहगड़ रस्त्यावरच्या विठ्ठलवाडी मंदिरात ही कार्यशाळा पार पडली.
गेल्या दोन वर्षांपासून वारीमध्ये आयटी क्षेत्रात काम करणारे तरूण-तरूणी आयटी दिंडीच्या माध्यमातून सहभागी होत आहेत. ज्याप्रमाणे वारकरी हरिनामाचा गजर करतात, भजन करत टाळ वाजवतात, तसे आयटी दिंडीतील सहभागी तरूणांना करता यावे, असं यासाठी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते.
‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल,जल विठ्ठल निर्मल विठ्ठल’ असा संदेश घेऊन सुमारे 900 जण यंदा वारीत सहभागी होणार आहेत. रोजच्या तणावाच्या वातावरणात जगणाऱ्या आयटीयन्सना अध्यात्माचा आनंद मिळावा, या उद्देशाने यंदाची आयटी दिंडी या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे.
=======================================
हैदराबादमध्ये आर्चीच्या उपस्थितीत सैराटचा 'झिंगाट' प्रिमियर
हैदराबादः महाराष्ट्राला गेल्या 9 आठवड्यांपासून याड लावणाऱ्या ‘सैराट’चा स्पेशल शो आज हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि सैराटची टीम यावेळी हजर होती. तेलंगणातील महाराष्ट्र मित्र मंडळाने सैराटच्या टिमला आमंत्रित केलं होतं.
सैराट लवकरच तेलगू भाषेतही बनवला जाणार आहे. त्यामुळे दक्षिणेतही सैराटचा फिव्हर कायम राहतो का, ते पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सैराटच्या शो साठी आलेल्यांनी कलाकारांसोबत डान्सही केला.
शो संपल्यानंतर मराठी प्रेक्षकांनी सैराटच्या टीमसोबत संवाद साधला. यावेळी सैराटच्या सर्वच चाहत्यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला होता. अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारी आर्ची देखील चाहत्यांसोबत थिरकली.
=======================================
तलाक, पुनर्विवाह प्रथांविरोधात मुस्लिम महिलांचा एल्गार
औरंगाबाद : मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करण्याची मागणी वाढल्यानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्याकडे चर्चेसाठी वेळ मागितला आहे. राज्यातल्या दीडशेहून अधिक महिलांनी विजया रहाटकर यांची औरंगाबादेत भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं.
तलाक शब्द उच्चारून घटस्फोट आणि पूनर्विवाहाची हलाल पद्धत मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक असून, त्यात बदल करावा असं या निवेदनात म्हटलं आहे. या निवेदनावर 1100 महिलांच्या सह्या आहेत.
देशातील 13 राज्यांमधील महिला आयोगांकडे आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे असंच निवेदन मुस्लिम महिलांनी दिलं आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशानंतर आता मुस्लिम महिलाही कालबाह्य प्रथांविरोधात बोलू लागल्या आहेत.
=======================================
खाडीसफाईच्या पाहणीदरम्यान महापौर बुडता बुडता वाचले
खाडीसफाईच्या मशिनवरुन पाहणी करताना मशिन उलटल्याने ते पाण्यात पडले.
पणजी : खाडीसफाईची पाहणी करण्यासाठी गेलेले गोव्यातील पणजीचे महापौर पाण्यात पडल्याची घटना समोर आली आहे. खाडीसफाईच्या मशिनवरुन पाहणी करताना मशिन उलटल्याने ते पाण्यात पडले. सुदैवाने या घटनेतून सर्वजण सुखरुप बचावले आहेत.
सांत इनेज या नाल्यात पणजीचे महापौर सुरेंद्र फु्र्ताडो पाहणी करत होते. त्यावेळी ही घटना घडली. ही घटना नेमकी कधीची आहे, याबाबत माहिती नसली, तरी ‘इनगोवा 24×7’ या स्थानिक वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे.
‘इनगोवा 24×7’वृत्तवाहिनीचा पत्रकारही यावेळी बुडताना वाचल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मशिनवर 6 जण होते. मशिन उलटल्यामुळे सर्वजण पाण्यात पडले.
=======================================
रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे १०० पेक्षा जास्त खेळाडू पात्र
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २६ - भारताच्या मोहम्मद अनिस, शार्बनी नंदा, अंकित शर्मा तर अनातू दास यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून रियो ऑलिम्पिकसाठी आपले तिकीट पक्के केले. रियोसाठी अॅथलेटिक्स खेळाडूंची संख्या आता २३ तर एकूण भारतीय खेळाडूंची संख्या शंभरपेक्षा जास्त झाली आहे.पोलिश अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मोहम्मद अनिसने पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४५.४० सेकंदांची वेळ नोंदवून नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून रिया ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. अनिसने राजीव अरोकियाने नोंदविलेला ४५.४७ सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. कझाकिस्तान येथील अलमाटीमध्ये झालेल्या २६ व्या कोसनोव्ह मेमोरियल स्पर्धेत ओरिसाच्या शार्बनी नंदाने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २३.०७ सेकंदाची वेळ नोंदविली.दुसरीकडे राष्ट्रीय विजेता मध्य प्रदेशच्या अंकित शर्माने पुरुषांच्या लांब उडी प्रकारात ८.१७ मीटरचे अंतर कापून रियोसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. भारतीय आर्चरी असोसिशनच्या वतीने बंगळुरू येथे निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पश्चिम बंगालचा २४ वर्षीय अनातू दासने वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात रियो ऑलिम्पिकसाठी आपली जागा निश्चित केली.
=======================================
अमेरिकेचे ९९ टक्के आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान भारतासाठी खुले
- ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. २६ - अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांपैकी भारत असा एकमेव देश आहे ज्याला अमेरिकेचे ९९ टक्के अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान मिळू शकणार आहे. महत्वाचा संरक्षण भागीदार म्हणून भारताला मान्यता मिळाल्याने भारताला हे तंत्रज्ञान मिळणार असल्याचे ओबामा प्रशासनातील अधिका-याने सांगितले.भारताला मिळालेला दर्जा अनन्यसाधारण असून, आमच्या मित्र राष्ट्रांपैकी भारताला अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचा सर्वाधिक लाभ होणार आहे असे या अधिका-याने सांगितले. या महिन्याच्या सुरुवातील व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये चर्चा झाली.त्यानंतर संयुक्त निवेदनात भारत महत्वाचा संरक्षण भागीदार असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. यापूर्वीच्या आम्ही असे करार केलेले नाही किंवा तसा धोरणात्मक निर्णयही घेतलेला नाही. आम्ही भारताबरोबरच अशा प्रकारचा करार केला आहे असे ओबामा प्रशासनातील अधिका-याने सांगितले. या करारातंर्गत भारताला अमेरिकेकडून दुहेरी वापराचे तंत्रज्ञान मिळणार आहे.
=======================================
जाहीर कार्यक्रमात 'तिने' कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन
- ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. २६ - विविध कारणांमुळे चर्चेत रहाणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या पुन्हा एकदा विचित्र कारणासाठी चर्चेत आले आहेत. रविवारी बंगळुरुमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान एका महिलेने सिद्धरमय्या यांच्या गालाचे चुंबन घेतले. गिरीजा श्रीनिवास असे या महिलेचे नाव आहे.चुंबन घेणारी सदर महिला चिकमंगळुरु जिल्ह्यातील तरीकेरे येथील तालुका पंचायत सदस्य आहे. रविवारी एका जाहीर कार्यक्रमात तिला सन्मानित केल्यानंतर तिने सर्वांसमक्ष मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या गालाचे चुंबन घेतले. सिद्धरमय्या ज्या कुरुबा समाजातून येतात त्या समाजाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
=======================================
वर्षअखेरीस एनएसजी देशांची बैठक, भारताच्या प्रवेशावर होणार चर्चा
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २६ - न्यूक्लियर सप्लायर ग्रुप म्हणजेच एनएसजी देशांच्या गटाचे सदस्यत्व मिळवण्यात अपयश आलेल्या भारताला पुन्हा एकदा या गटाचे सदस्यत्व मिळवण्याची संधी आहे. वर्षअखेरीस पुन्हा एकदा एनएसजी देशांची बैठक होण्याची शक्यता आहे.या बैठकीत अणवस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षरी न करणा-या देशांना संघटनेत कसे सामावून घेता येईल यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा एनएसजी सदस्यत्वाची संधी आहे. चीन आणि अन्य देशांच्या विरोधामुळे शुक्रवारी सेऊलमध्ये झालेल्या बैठकीत भारताला या गटाचे सदस्यत्व मिळाले नाही.भारताने अणवस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्या आधारावर भारताला सदस्यत्व नाकारण्यात आले. मेक्सिकोने या करारावर स्वाक्षरी न करणा-या देशांना एनएसजीमध्ये कसे सामावून घेता येईल त्यावर चर्चा करण्यासाठी पुन्हा बैठक करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे यावर्ष अखेरीस पुन्हा बैठक होईल.
=======================================
पर्यटकांसाठी लवकरच दीर्घकालीन बहूप्रवेश व्हिसा
| |
-
| |
नवी दिल्ली : केंद्र सरकार परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दीर्घकालीन स्वरूपाचा सर्वांगीण बहूप्रवेश व्हिसा लवकरच देणार आहे. अनेकवेळा भारतात प्रवेश करण्यासाठी हा व्हिसा उपयोगी पडणार असून, पर्यटन, व्यवसाय, वैद्यकीय आणि परिषदा यांसारख्या व्हिसांचा यात समावेश करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्यासोबत व्यापार वाढण्यास मदत होणार आहे.
नव्या प्रस्तावित श्रेणीनुसार पर्यटक, व्यावसायिक, उपचारासाठी येणारे परदेशी नागरिक, परिषदांना उपस्थित राहण्यासाठी आणि चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी येणारे यांना एकच व्हिसा देण्यात येईल. व्यापार वाढीसाठी पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या या सूचनेवर वाणिज्य मंत्रालयाने गंभीरपणे विचार सुरू केला आहे. दीर्घकालीन बहूप्रवेश व्हिसा दहा वर्षांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. मात्र, यात काम करण्यास अथवा कायमस्वरूपी वास्तव्य करण्यास मनाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नव्या प्रस्तावानुसार परदेशी व्यक्तीला दीर्घकालीन व्हिसा हा बहूप्रवेश व काम करण्यास परवानगी नसणारा तसेच, कायमस्वरूपी वास्तव्यास परवानगी नसणारा असेल. त्या वास्तव्याचा कालावधी केवळ 60 दिवसांसाठी मर्यादित असून, सरकार यात व्हिसा शुल्क माफ करू शकते. मात्र, परदेशी व्यक्तीला त्याची सर्व माहिती यंत्रणांना द्यावी लागेल. गृह मंत्रालय या प्रस्तावावर काम करीत असून, लवकरच याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. भारताचा सेवा क्षेत्रातील व्यापार वाढविण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने पुढाकार घेतला असून, हे पाऊल त्याचाच भाग मानला जात आहे.

हल्ल्यांमुळे काश्मीरचे नाव खराब- मेहबूबा
| |
-
| |
श्रीनगर : पाम्पोर येथे काल (ता. 26) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज आदरांजली वाहिली. अशा हल्ल्यांमुळे काश्मीरचे नाव खराब होत असून गुंतवणूकदार आणि पर्यटकांचे प्रमाण कमी होते, असे मुफ्ती यावेळी म्हणाल्या.
पाम्पोरमध्ये झालेल्या या हल्ल्यात आठ जवान हुतात्मा झाले होते. आपले कर्तव्य बजावत असलेल्या जवानांना लक्ष्य करणे हे निंदाजनक असल्याचे मुख्यमंत्री मुफ्ती यावेळी म्हणाल्या. "या रमजानच्या महिन्यात लोकांनी एकमेकांना क्षमा करायला हवी. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रयत्न करायला हवे. त्यामुळे हल्ला करत एखाद्या कुटुंबाला उद्धवस्त करणे हे चुकीचे आहे. यामुळे काहीही साध्य होणार नाही. तसेच, यामुळे राज्याचे नावही खराब होत आहे. हा चुकीचा संदेश जगभर जात आहे,‘ असे मुख्यमंत्री म्हणाल्या.
दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही आज या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. जवानांनी यावेळी सर्वोच्च त्याग केला असून आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दु;खात सहभागी आहोत, असे गांधी म्हणाल्या.

सोमालियात 'अल शबाब'च्या हल्ल्यात 14 ठार
| |
-
| |
मोगादिशू : सोमालियामधील एका हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला करत 14 जणांना ठार मारले. दहशतवाद्यांनी काही पर्यटकांना ओलिसही धरले होते. मात्र, सैन्याने कारवाई करत त्यांना ठार मारले.
अल शबाब या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ बॉंबस्फोट करत प्रवेश मिळविला होता. या हॉटेलमध्ये परदेशी पर्यटकांचा कायम वावर असतो.
=======================================
No comments:
Post a Comment