*[अंतरराष्ट्रीय]*
१- पॅरिसवरील इसिसचे हल्ले मुंबईसारखे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
२- नरेंद्र दाभोलकरांचा आज स्मृतीदिन
३- आयटी कंपन्यांमध्ये प्रवेश अधिक कठीण
४- भाजपवासी भानगडखोरांना राष्ट्रवादीत पुन्हा थारा नको - अजित पवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
५- हिंदूंचे सण-उत्सव होणारच, उद्धव ठाकरेंचे न्यायालयाला आव्हान
६- मानेवर डोके आहे ना? उत्सव होणारच!- सेना
७- उजनी धरणाची नाबाद ‘सेंच्युरी’
८- अकोला; राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल !
९- भागलपूर; बिहारमध्ये राजद नेत्याची गोळ्या घालून हत्या
१०- महाराष्ट्र विचारवंतांना सुरक्षित वाटावाः हमिद
११- राज्यातील 2,200 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१२- बुलढाणा; जागतिक छायाचित्रण दिनीच विजेच्या धक्क्याने छायाचित्रकार ठार
१३- बीडमध्ये ठिकठिकाणी वाय-फाय कट्टे !
१४- सोळा वर्षांनी इरोम शर्मिलांची मातृभेट!
१५- खडकवासला धरणातून पाणी सोडले
१६- पंढरपूर; वाळू माफियाविरोधात कारवाई, 10 ट्रॅक्टर, 1 जेसीबी, 2 बोटी केल्या जप्त.
१७- नाशिक - सातपूरमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड
१८- मध्यप्रदेश - राहतगड परिसरात घर कोसळून सात जणांचा मृत्यू, 3 जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
१९- रौप्य मिळवणारी सिंधूच तमाम भारतीयांसाठी ‘गोल्डन गर्ल’
२०- उसेन बोल्टची सलग तिस-या ऑलिम्पिकमध्ये 'सुवर्ण' हॅटट्रीक
२१- पराभवानंतर सिंधूने जे केलं त्यामुळे तुम्हालाही अभिमान वाटेल
२२- काजोलने नाकारली 'दबंग 3'ची ऑफर
२३- बॉलीवूड गिरवणार सिक्वेलचा कित्ता
२४- अक्षयच्या 'रुस्तम'ची 50 कोटींची कमाई
२५- सलमानच्या लग्नाचं सोडून विचारा- सलीम खान
२६- आई माझा सिंधूसोबत फोटो आहे: सलमान खान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
====================================
बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने पी. व्ही. सिंधूला हरवले खरे पण रौप्य मिळवणारी सिंधूच तमाम भारतीयांसाठी ‘गोल्डन गर्ल’
१- पॅरिसवरील इसिसचे हल्ले मुंबईसारखे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
२- नरेंद्र दाभोलकरांचा आज स्मृतीदिन
३- आयटी कंपन्यांमध्ये प्रवेश अधिक कठीण
४- भाजपवासी भानगडखोरांना राष्ट्रवादीत पुन्हा थारा नको - अजित पवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
५- हिंदूंचे सण-उत्सव होणारच, उद्धव ठाकरेंचे न्यायालयाला आव्हान
६- मानेवर डोके आहे ना? उत्सव होणारच!- सेना
७- उजनी धरणाची नाबाद ‘सेंच्युरी’
८- अकोला; राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल !
९- भागलपूर; बिहारमध्ये राजद नेत्याची गोळ्या घालून हत्या
१०- महाराष्ट्र विचारवंतांना सुरक्षित वाटावाः हमिद
११- राज्यातील 2,200 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१२- बुलढाणा; जागतिक छायाचित्रण दिनीच विजेच्या धक्क्याने छायाचित्रकार ठार
१३- बीडमध्ये ठिकठिकाणी वाय-फाय कट्टे !
१४- सोळा वर्षांनी इरोम शर्मिलांची मातृभेट!
१५- खडकवासला धरणातून पाणी सोडले
१६- पंढरपूर; वाळू माफियाविरोधात कारवाई, 10 ट्रॅक्टर, 1 जेसीबी, 2 बोटी केल्या जप्त.
१७- नाशिक - सातपूरमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड
१८- मध्यप्रदेश - राहतगड परिसरात घर कोसळून सात जणांचा मृत्यू, 3 जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
१९- रौप्य मिळवणारी सिंधूच तमाम भारतीयांसाठी ‘गोल्डन गर्ल’
२०- उसेन बोल्टची सलग तिस-या ऑलिम्पिकमध्ये 'सुवर्ण' हॅटट्रीक
२१- पराभवानंतर सिंधूने जे केलं त्यामुळे तुम्हालाही अभिमान वाटेल
२२- काजोलने नाकारली 'दबंग 3'ची ऑफर
२३- बॉलीवूड गिरवणार सिक्वेलचा कित्ता
२४- अक्षयच्या 'रुस्तम'ची 50 कोटींची कमाई
२५- सलमानच्या लग्नाचं सोडून विचारा- सलीम खान
२६- आई माझा सिंधूसोबत फोटो आहे: सलमान खान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
====================================
बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने पी. व्ही. सिंधूला हरवले खरे पण रौप्य मिळवणारी सिंधूच तमाम भारतीयांसाठी ‘गोल्डन गर्ल’
- रिओ : आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर अतिशय चुरशीच्या आणि क्षणोक्षणी रोमांच उभे करणाऱ्या बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने पी. व्ही. सिंधूला हरवले खरे पण रौप्य मिळवणारी सिंधूच तमाम भारतीयांसाठी ‘गोल्डन गर्ल’ बनली. आॅलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली बॅडमिंटनपटू बनण्याचा बहुमान मिळवणारी सिंधू रौप्यपदकाची मानकरी ठरली. वर्ल्ड चॅम्पियनच्या थाटात खेळणारी कॅरोलिना जिंकल्यानंतर सिंधूच्या थेट गळ्यातच पडली अन् सिंधू हारूनही जिंकली.सिंधूची पिछाडीवरून आघाडीशुक्रवारी झालेल्या सामन्यात पहिल्या गेममध्ये मारिनने आक्रमक खेळाने सुरुवात केली. तिने पहिल्या पॉइंटपासूनच आघाडी घेतली. सिंधूने तिला गाठण्याचा खूपवेळा प्रयत्न केला, परंतु जोरदार स्मॅश लगावत मारिन पुढेच जात होती. सिंधू १६ पॉइंटवर असताना मारिन गेम पॉइंटपासून केवळ दोन पॉइंट मागे म्हणजे १९ गुणांवर होती. पण यानंतर सिंधू सुसाट सुटली. तिने सलग पाच गुण घेत २१-१९ असा गेम जिंकला. पहिला गेम जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले होते. गेम जिंकला असला तरी सिंधूने यामध्ये काही चुकाही केल्या; शिवाय तिचे एक रेफरल वाया गेले.
====================================
उसेन बोल्टची सलग तिस-या ऑलिम्पिकमध्ये 'सुवर्ण' हॅटट्रीक
- - ऑनलाइन लोकमतरिओ दी जानेरो, दि. 20 - जगातील सर्वांत वेगवान धावपटू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे जमैकाचा उसेन बोल्ट. उसेन बोल्टला हरवणं कठीण नाही तर अशक्यच आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. एखादी रेस सहज जिंकणा-या उसेन बोल्टने पुन्हा एकदा सुवर्ण पदक जिंकत धावपट्टीवरचा बादशहा आपणच असल्याचं सिद्ध केलं आहे.जमैकाला 4 बाय 100 रिलेत सुवर्णपदक मिळाले असून यानिमित्ताने उसेन बोल्टने आपलं ट्रिपल ट्रिपल साजरं केलं आहे. या सुवर्ण पदकासोबतच सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकणारा उसेल बोल्ट पहिलाच अॅथलिट ठरला आहे. उसेन बोल्टच्या खात्यात तीन ऑलिम्पिकमध्ये नऊ सुवर्णपदकं जमा झाली आहेत. नऊ सुवर्णपदकं जिकंणारा आजवरचा चौथाच खेळाडू ठरण्याचा मानही उसेन बोल्टला मिळाला आहे.
====================================
पराभवानंतर सिंधूने जे केलं त्यामुळे तुम्हालाही अभिमान वाटेल
- रिओ दी जानेरो, दि. 20 - अतिशय चुरशीच्या आणि क्षणोक्षणी रोमांच उभे करणाऱ्या बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने पी. व्ही. सिंधूचा पराभव केला. मात्र पराभव होऊनही तमाम भारतीयांना तिने सुवर्ण आठवणी देत रौप्य मिळवले आणि ‘गोल्डन गर्ल’ बनली. ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली बॅडमिंटनपटू बनण्याचा बहुमानही तिने मिळवला. मात्र पराभवानंतरही पी व्ही सिंधूने जे केलं ते वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल.अंतिम सामना जिंकल्यानंतर कॅरोलिनाला अश्रू अनावर झाले होते. सामना जिंकल्यानंतर जल्लोष साजरा करताना तिने रॅकेट कोर्टवरच ठेवून दिले होते. विजय झाल्यानंतर समोर सुवर्णपदक दिसत असताना कशाचंही भान न राहणं हे साहजिक आहे. पराभव झाल्याने सिंधूही काही वेळ कोर्टवर खाली बसून होती. पण नंतर खेळभावना दाखवत तिने स्वत: जाऊन कॅरोलिनाला मिठी मारत शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही तर रेफ्रीकडे जात असताना कॅरोलिनाचं खाली पडलेलं रॅकेट उचलून योग्य ठिकाणी ठेवले.
====================================
नरेंद्र दाभोलकरांचा आज स्मृतीदिन
- मुंबई, दि. 20 - (नोव्हेंबर १, इ.स. १९४५ - ऑगस्ट २०, इ.स. २०१३)नरेंद्र दाभोलकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.जीवननरेंद्र हे, अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते.शिक्षणनरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.सामाजिक कार्यबाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८३ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.
====================================
हिंदूंचे सण-उत्सव होणारच, उद्धव ठाकरेंचे न्यायालयाला आव्हान
- मुंबई, दि. 20 - गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आदी सर्व आमच्या श्रद्धेचे विषय आहेत. तेव्हा ‘राज्यकारभार’ करणार्या न्यायालयांनी निदान याबाबतीत तरी लक्ष्मणरेषा ओलांडू नये. लोकांनी त्यांचे सरकार लोकशाही पद्धतीने निवडून दिले आहे. त्यांना काम करू द्या. भलेबुरे कळण्याइतपत डोके सरकारच्या मानेवर आहे. हे डोके उडवून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केलाच तर राष्ट्रीय व्यवस्थेचे सर्व थर कोसळतील. हिंदूंचे सण-उत्सव होणारच. ते रोखण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल व शिवसेना त्या असंतोषाचे नेतृत्व करेल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादयकीच्या माध्यमातून दिला आहे.दहीहंडीसह इतर सर्वच सण आणि उत्सवांच्या निमित्ताने न्यायालये जे ‘फतवे’ काढत आहेत त्यामुळे जनतेत संताप आहे. एक प्रकारची अस्वस्थता आहे व या असंतोषाचा स्फोट होऊन ‘न्यायालयास डोके आहे काय?’ असा सवाल विचारीत संतप्त जनता रस्त्यावर उतरू शकते, ही चिथावणी वगैरे न समजता लोकांच्या मनातील खदखद समजून सावध व्हावे, असा विनम्र इशारा देण्याचा प्रपंच आम्ही करीत आहोत असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
====================================
जागतिक छायाचित्रण दिनीच विजेच्या धक्क्याने छायाचित्रकार ठार
- ऑनलाइन लोकमतसाखरखेर्डा (बुलडाणा), दि. १९ : येथील सोमेश डिजिटल स्टुडिओ मध्ये फोटोग्राफर म्हणून काम करीत असलेल्या एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 19 अॉगष्ट रोजी दुपारी दीड वाजता घडली.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक अण्णाभाऊ साठे नगरात राहणाऱ्या मंगल रमेश पारधे वय 23 याची आई सिंधुताई यांना घरकाम करताना विजेचा शॉक लागल्याने त्यांना डॉ किशोर अग्रवाल यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान मंगल यास ही माहिती कळताच तो शिताफीने दवाखान्यात गेला.मात्र सौम्य धक्का असल्याने डॉक्टरांनी मंगलच्या आईला ताबडतोब सुटी दिली दरम्यान आईला घेऊन मंगल घरी गेला व कोणत्या वायरचा शॉक लागला याची पडताळणी करत असताना मंगललाच जबर शॉक लागला. दरम्यान तात्काळ त्याच्या आईने आरडाओरडा केला व आजूबाजूच्या लोकांनी त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने गांवात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
====================================
उजनी धरणाची नाबाद ‘सेंच्युरी’
- दीड शतकाकडे वाटचाल : शेतकरी आनंदी; ऊस, कांदा लागवडीला वेगप्रभू पुजारी (पंढरपूर) : ‘२०-ट्वेंटी’ हा शब्दप्रयोग आता सर्वत्र परिचित झाला आहे़ हा क्रिकेटमधील शब्द असला तरी उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यातही गेल्या काही दिवसांपासून ‘२०-२०-ट्वेंटी’ सुरू असल्याचे दिसून येत आहे़. उजनीने आता नाबाद ‘सेंच्युरी’ केली असून दीड शतकाकडे वाटचाल सुरू आहे़ त्यामुळे शेतकरी आता आनंदी झाला असून ऊस व कांदा लागवडीला वेग आला आहे़सोलापूर जिल्ह्यात अद्याप मुसळधार पाऊस झाला नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील अनेक बंधारे, तलाव, विहिरी, बोअर कोरडे आहेत़ केवळ नीरेतून भीमा नदीत पाणी येत असल्याने ती तेवढी वाहू लागली आहे़ या पाण्यावर शेतकºयांची आणि शहरवासियांची तात्पुरती तहान भागेल, मात्र वर्षभर पुरेल असा पाणीसाठा होण्यासाठी मुसळधार पावसाचीच गरज आहे़ ही गरज परतीचा पाऊस पूर्ण करील, अशी सर्वांची अपेक्षा आहे़
====================================
बीडमध्ये ठिकठिकाणी वाय-फाय कट्टे !
- प्रताप नलावडेबीड - पंधरा दिवसापूर्वी गाजावाजा करत बीड शहराला नगरपालिकेने वाय-फाय शहर बनवल्यानंतर आता ज्या परिसरात वाय-फाय रेंज मिळते, त्या भागात ठिकठिकाणी वाय-फाय कट्टे तयार झाले आहेत. तरूण मंडळी हातात मोबाईल घेऊन याठिकाणी घोळक्याने तास न् तास ठिय्या मारताना दिसत आहेत.नगरपालिकेने शहरातील काही भागात मोफत वाय-फाय सेवा सुरू केली असून हळू- हळू संपूर्ण शहरात ही सेवा मिळणार आहे. सध्या शहरातील बशीरगंज, मोमीनपूरा, अहिल्याबाई चौक, माळी वेस, नगर रोड आदी परिसरात वाय-फाय सेवा मिळत आहे. यामुळे या परिसरात शहरातील विविध भागातून तरूण मंडळी येवून घोळक्याने कारंजाच्या कट्यावर, बंद दुकानांच्या समोर, हॉटेलात आणि अगदी रस्त्याच्या कडेलाही घोळक्याने थांबू लागले आहेत. हातात मोबाईल आणि मोबाईलवर सर्चिंग सुरू, असे चित्र आता या परिसरात नित्याचे झाले आहे.सतत तरूण मुलांचा घोळका थांबू लागल्याने वैतागलेल्या मोमीनपुऱ्यातील नागरिकांनी वाय-फाय कनेक्टीव्हिटीचा बॉक्सच तोडून टाकल्याची घटनाही ताजीच आहे. सध्या एका मोबाईल धारकाला तीस मिनिटांपर्यंत मोफत वाय-फाय सुविधा मिळत आहे.पूर्वी शहरातील चौका-चौकात तरूणांचे गप्पांचे फड रंगायचे. चर्चा व्हायच्या. गप्पा-गोष्टी चालायच्या. परंतु आता वाय-फाय शहरातील हे चित्र बदलू लागले आहे. एकत्र घोळक्याने बसलेली ही तरूणाई एकमेकाशी बोलण्याऐवजी हातातील मोबाईलवर सर्फिंग करण्यात दंग होऊन जाताना दिसते.
====================================
राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल !
- साडे चौदा हजार जागांसाठी ६९ हजार अर्ज ; प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यातऑनलाइन लोकमतअकोला, दि. १९ : राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल वाढत असून, यावर्षी बीएससी कृषी प्रथम वर्षासाठी उपलब्ध असेलल्या १४,७४७ जागांंसाठी तब्बल ६९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. कृषी अभ्यासक्रसाठी स्पर्धा वाढल्याने राज्यातील चारही कृषी विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत. २३ केंद्रावर सुरू असलेली ही प्रवेश प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे.राज्यातील चारही कृषी विद्यापीठातंर्गत शासकीय २,७७४ जागा आहेत तर खासगी कृषी महाविद्यालयातंर्गत १२ हजार विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत शासकीय ७५५ तर खासगी महाविद्यालयाच्या २,३४० एवढी प्रवेश क्षमता असून,अहमदनगर जिल्हयातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ८४४,खासगी ४,५७० परभणीच्या स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत ७९२, खासगी महाविद्यालया आणि कोकणात दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३५६ तर खासगी महाविद्यालयाची प्रवेश क्षमता १,५५० एवढी आहे.कृषी पदवीसाठी कृषी अभियांत्रिकी, उद्यानविद्या शास्त्र, वनविद्या शास्त्र,कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन यासह अनेक विषय आहेत.यामध्ये कृषी या विषयासाठी विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा आहे. राज्यात कृषी अभ्यासक्रमाचे ९२ महाविद्यालय असून, १९ शासकीय तर ७३ महाविद्यालये खासगी आहेत.शासकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २ हजार १२ तर खासगी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ही ७,२९० एवढी आहे. म्हणजेच एकूण १४,७४७ जागांमध्ये ९,३०२ जागा कृषीच्या आहेत.प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी व स्पॉट अॅडमिशनसाठी यावर्षी खासगी शासकीय महाविद्यालयांना जोडण्यात आली आहेत.येत्या तीन दिवसात प्रवेश प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. याकरिताच खासगी महाविद्यालयाचे प्रवेश कृषी विद्यापीठांच्या शासकीय महाविद्यालयातून केले जात आहेत.
====================================
मानेवर डोके आहे ना? उत्सव होणारच!- सेना
| |
-
| |
मुंबई - "गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आदी सर्व आमच्या श्रद्धेचे विषय आहेत. तेव्हा ‘राज्यकारभार‘ करणाऱ्या न्यायालयांनी निदान याबाबतीत तरी लक्ष्मणरेषा ओलांडू नये. लोकांनी त्यांचे सरकार लोकशाही पद्धतीने निवडून दिले आहे. त्यांना काम करू द्या. भलेबुरे कळण्याइतपत डोके सरकारच्या मानेवर आहे. हे डोके उडवून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केलाच तर राष्ट्रीय व्यवस्थेचे सर्व थर कोसळतील. हिंदूंचे सण-उत्सव होणारच. ते रोखण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल व शिवसेना त्या असंतोषाचे नेतृत्व करेल‘, अशा रोखठोक शब्दांत शिवसेनेने "सामना‘तील अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

न्यायालय सरकारच्या भूमिकेत शिरत असल्याची टीका करत अग्रलेखात म्हटले आहे की, "निवडणुका वगैरे रीतसर होऊन लोकनियुक्त सरकार कारभार हाकत असले तरी खरा राज्यकारभार न्यायालयेच करीत आहेत. अर्थात, सरकारच्या भूमिकेत न्यायालये शिरतात तेव्हा राजकीय चिखलफेकीला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी नक्कीच ठेवायला हवी; कारण जे निर्णय सरकारने घेणे अपेक्षित आहे त्या सर्व निर्णयांत न्यायव्यवस्था हस्तक्षेप करू लागली आहे.‘
‘दहीहंडीसह इतर सर्वच सण आणि उत्सवांच्या निमित्ताने न्यायालये जे ‘फतवे’ काढत आहेत त्यामुळे जनतेत संताप आहे. एक प्रकारची अस्वस्थता आहे व या असंतोषाचा स्फोट होऊन ‘न्यायालयास डोके आहे काय?’ असा सवाल विचारीत संतप्त जनता रस्त्यावर उतरू शकते, ही चिथावणी वगैरे न समजता लोकांच्या मनातील खदखद समजून सावध व्हावे, असा विनम्र इशारा देण्याचा प्रपंच आम्ही करीत आहोत‘, असे अग्रलेखात म्हटले आहे.
न्यायालय सरकारच्या भूमिकेत शिरत असल्याची टीका करत अग्रलेखात म्हटले आहे की, "निवडणुका वगैरे रीतसर होऊन लोकनियुक्त सरकार कारभार हाकत असले तरी खरा राज्यकारभार न्यायालयेच करीत आहेत. अर्थात, सरकारच्या भूमिकेत न्यायालये शिरतात तेव्हा राजकीय चिखलफेकीला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी नक्कीच ठेवायला हवी; कारण जे निर्णय सरकारने घेणे अपेक्षित आहे त्या सर्व निर्णयांत न्यायव्यवस्था हस्तक्षेप करू लागली आहे.‘
‘दहीहंडीसह इतर सर्वच सण आणि उत्सवांच्या निमित्ताने न्यायालये जे ‘फतवे’ काढत आहेत त्यामुळे जनतेत संताप आहे. एक प्रकारची अस्वस्थता आहे व या असंतोषाचा स्फोट होऊन ‘न्यायालयास डोके आहे काय?’ असा सवाल विचारीत संतप्त जनता रस्त्यावर उतरू शकते, ही चिथावणी वगैरे न समजता लोकांच्या मनातील खदखद समजून सावध व्हावे, असा विनम्र इशारा देण्याचा प्रपंच आम्ही करीत आहोत‘, असे अग्रलेखात म्हटले आहे.
====================================
बिहारमध्ये राजद नेत्याची गोळ्या घालून हत्या
| |
-
| |
भागलपूर - बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया येथे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते विनोद यादव यांची आज (शनिवार) सकाळी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली.
नवगछिया नगर पंचायतीचे सदस्य असलेले विनोद यादव यांच्यावर आज सकाळी सातच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर नवगछियामध्ये तणाव असून, गावातील सर्व व्यवहार बंद आहेत. हल्लेखोर दुचाकींवरून आले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. विनोद यादव यांच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वीच पाटणातील दानापूर भागात भाजप नेते अशोक जयस्वाल यांची हत्या करण्यात आली होती.
====================================
ज्येष्ठ विज्ञानवादी आणि समाजसुधारणेसाठी आयुष्य पणाला लावणाऱया डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्टला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. दाभोलकरांपाठोपाठ ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात आणि कन्नड विचारवंत एम एम कलबुर्गी यांची धारवाडमध्ये हत्या झाली आणि अवघा देश हादरला. तिनही हत्यांमागे धर्मांध विचारसरणीच्या संघटना असल्याचा आरोप गेल्या तीन वर्षांत सातत्याने होत राहिला; तथापि प्रत्यक्ष पोलिस तपासांत आजही ठोस प्रगती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर दाभोलकर यांचा मुलगा हमिद यांनी मांडलेले विचारः
महाराष्ट्र विचारवंतांना सुरक्षित वाटावाः हमिद
| |
-
| |
नरेंद्र दाभोलकर यांची हत्या हा काही एखाद्या व्यक्तीचा खून होता, असं मला कधीही वाटलं नव्हतं आणि आजही वाटत नाही. मीच नव्हे; समाजातल्या हजारो लोकांनी त्यावेळी आणि वेळोवेळी हीच भावना व्यक्त केली आहे. दाभोलकरांची हत्या हा विचारांच्या विरोधातील गुन्हा होता. या हत्येच्या तपासात काही निष्पन्न झालं असतं, आरोपींना पकडून, सुत्रधारांना पकडून शिक्षा केली असती,
तर त्यानंतरच्या हत्या झाल्या नसत्या. मात्र, दाभोलकरांची हत्या ही विचारांविरोधातील गुन्हा होता, हे तपास यंत्रणांनी कधी मान्यच केले नाही. कुटुंब, वैयक्तिक हेवेदावे अशा पारंपरिक पद्धतीनं पोलिसांनी तपास केला. त्याचा परिणाम म्हणजे आजही मारेकरी आणि सूत्रधार मोकाट आहेत.
दाभोलकरांच्या हत्येच्या तपासावेळी 45 पथकं स्थापन केलीत वगैरे असं पोलिसांकडून सांगितलं गेलं. मला वाटतं, इतक्या मनुष्यबळाची काहीही आवश्यकता नव्हती. ज्या संस्थांवर कारवाईची मागणी आम्ही करत होतो, त्या संस्थांचा इतिहास हिंसक होता. त्यांच्यावर वेळीच कारवाई केली गेली असती, तर आरोपी पकडले गेले असते. ते घडले नाही. ते धाडस पोलिसांमध्ये नव्हतं. आजही आरोपींपर्यंत पोहोचण्याचं धाडस तपास यंत्रणांमध्ये आहे, असं मला वाटत नाही. तपासामध्ये आतापर्यंत जी काही प्रगती झालीय, ती फक्त न्यायालयाच्या आदेशांमुळे. न्यायालय तपासावर देखरेख ठेवून आहे. तरीही तपास लॉजिकल कन्क्लूजनपर्यंत पोहोचलेला नाही. इतका रेटा असूनही तपास लागत नस्ले, तर विचारांना धोका कायम राहणार आहे. त्यातून तपास यंत्रणांमधला फोलपणा दिसून येतो आहे. या फोलपणामुळेच, दाभोलकरांना पुलावर मारणारे मारेकरी पानसरेंच्या हत्येसाठी त्यांच्या घराजवळ पोहचू शकले आणि कलबुर्गींच्या हत्येसाठी दारात. अशा परिस्थितीत सामान्य लोकांना अस्वस्थ, असुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गींना न्याय मिळत नसेल, तर आपलं काय असा विचार लोकांनी केला, तर तो चुकीचा ठरत नाही.
====================================
सोळा वर्षांनी इरोम शर्मिलांची मातृभेट!
| |
-
| |
इंफाळ (मणिपूर) - गेल्या सोळा वर्षांपासून सुरू असलेले उपोषण सोडल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला 16 वर्षांनंतर शुक्रवारी त्यांच्या आईने त्यांची भेट घेतली.

ईशान्य भारतात लागू असलेला लष्कराचा विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) हटविण्याची मागणी करत शर्मिला गेल्या सोळा वर्षांपासून उपोषण करत होत्या. दरम्यान विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत त्यांनी नऊ ऑगस्टला उपोषण सोडले. शुक्रवारी तब्बल 16 वर्षांनंतर त्यांची आई सखी यांनी इरोम यांची भेट घेतली. याबाबत बोलताना इरोम म्हणाल्या, "सोळा वर्षांनंतर आई मला भेटायला येणे हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का आहे. माझी आई आणि माझी बहीण मला भेटायला आल्या.‘ यावेळी शर्मिला यांनी त्यांच्या भावी योजनेविषयी आणि निवडणूक लढविण्याबाबत आईला आणि बहिणीला माहिती दिली. यावेळी इरोम यांचे बंधू सिंहजितनेही भेट घेतल्याची चर्चा सुरू होती. मात्र हे वृत्त इरोम यांनी फेटाळून लावले. इरोम यांनी उपोषण सुरू केल्यानंतर त्यांच्या आईने 4 नोव्हेंबर 2000 साली शुभेच्छा देत ‘मोहिम पूर्ण झाल्यानंतरच घरी ये‘ असे सांगितले होते.
ईशान्य भारतात लागू असलेला लष्कराचा विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) हटविण्याची मागणी करत शर्मिला गेल्या सोळा वर्षांपासून उपोषण करत होत्या. दरम्यान विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत त्यांनी नऊ ऑगस्टला उपोषण सोडले. शुक्रवारी तब्बल 16 वर्षांनंतर त्यांची आई सखी यांनी इरोम यांची भेट घेतली. याबाबत बोलताना इरोम म्हणाल्या, "सोळा वर्षांनंतर आई मला भेटायला येणे हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का आहे. माझी आई आणि माझी बहीण मला भेटायला आल्या.‘ यावेळी शर्मिला यांनी त्यांच्या भावी योजनेविषयी आणि निवडणूक लढविण्याबाबत आईला आणि बहिणीला माहिती दिली. यावेळी इरोम यांचे बंधू सिंहजितनेही भेट घेतल्याची चर्चा सुरू होती. मात्र हे वृत्त इरोम यांनी फेटाळून लावले. इरोम यांनी उपोषण सुरू केल्यानंतर त्यांच्या आईने 4 नोव्हेंबर 2000 साली शुभेच्छा देत ‘मोहिम पूर्ण झाल्यानंतरच घरी ये‘ असे सांगितले होते.
====================================
खडकवासला धरणातून पाणी सोडले
| |
-
| |
पुणे - पानशेत, वरसगाव धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, या धरणात येणाऱ्या येव्यामुळे जादा होणारे पाणी सोडून द्यावे लागते. त्यामुळे, शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता वरसगाव धरणातून 1200 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. ते पाणी खडकवासला धरणात जमा होत असल्याने खडकवासला धरणातून 856 क्युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
पानशेत धरणातून शुक्रवारी संध्याकाळी 602 क्युसेक विसर्ग वीज निर्मितीसाठी सोडला होता. तो मध्यरात्री एक वाजता बंद केला. परंतू टेमघरमधून 290 क्यसुेक विसर्ग सुरु आहे. वरसगावमधून 1200 क्युसेक वीज निर्मितीसाठी 533 क्युसेक असा सुमारे 2023 क्युसेक खडकवासला धरणात जमा होत आहे.
पानशेत वरसगाव धरणे 100 टक्के झाल्यामुळे खडकवासला धरणाची पातळी 100 टक्के आहे. ती थोडी कमी करावयाची असल्याने धरणातून रात्री बारा वाजता 856 क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले.
पानशेत वरसगाव धरणे 100 टक्के झाल्यामुळे खडकवासला धरणाची पातळी 100 टक्के आहे. ती थोडी कमी करावयाची असल्याने धरणातून रात्री बारा वाजता 856 क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले.
खडकवासला धरणातून नदीत 856 क्युसेक, कालव्यातून 1267 व बंद जलवाहिनीतून 325 क्युसेक असे मिळून 2178 क्युसेक पाणी खडकवासला धरणातून सोडले जात आहे. पानशेत धरणातून विसर्ग सोडल्यास खडकवासला धरणातून देखील विसर्ग वाढू शकतो.
====================================
No comments:
Post a Comment