[अंतरराष्ट्रीय]
१- शिकागो; घाम आल्याने 'अल्लाह' म्हटल्यामुळे मुस्लीम दाम्पत्याला विमानातून उतरविले
२- काबुल; अफगाणिस्तानमध्ये परदेशी पर्यटकांवर हल्ला, 6 जखमी
३- जळगावचा रेल्वेपूल कधीही पडेल; ब्रिटनचे पत्र
४- पाकिस्तानच्या कारागृहात भारतीय कैद्यावर हल्ला
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- आसाम : कोक्राझारमध्ये दहशतवादी हल्ला, १४ ठार
६- मंत्री, आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ, वेतनवाढ विधेयक मंजूर
७- केंद्र सरकारचे 4 टक्के चलनवाढीचे उद्दिष्ट
८- पाकने चांगली वागणूक दिली नाही- राजनाथसिंह
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- महाड दुर्घटना: आणखी एक मृतदेह हाती, मृतदेह क्र. 22
१०- महाड दुर्घटना - वाहून गेलेल्या तवेरा कारचे अवशेष सापडले
११- पाऊस आला धावून, गाड्या गेल्या वाहून
१२- गुजरातचे नवे मुख्यमंत्री विजय रुपानी होणार, नितीन पटेल उपमुख्यमंत्री
१३- 'नो हेल्मेट, नो पेट्रोल'चा निर्णय मागे
१४- पंजाबच्या माजी अधीक्षकावर बलात्काराचा गुन्हा
१५- बिहारमध्ये पुरात मृत पावणा-यांची संख्या ८९ वर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- तरुणाचा तुरुंगात मृत्यु; 12 पोलिसांचे निलंबन
१७- उदगीर : सैराट जोडप्याचे पोलिस ठाण्यातच शुभमंगल..
१८- खडकवासला धरणातून 35 हजार क्युसेकने विसर्ग
१९- छत्तीसगडमध्ये चकमकीत 3 नक्षलवादी ठार
२०- सोलापूर : बेकायदा डिजीटल तयार केल्यास फौजदारी दाखल करणार
२१- पुणे - शिक्रापूर येथील 106 वर्षा पूर्वीचा पुल वाहतुकी साठी बंद
२२- पुण्यातील कात्रज तलाव ओव्हरफ्लो
२३- नांदेड- आसना नदीवरील निझाम कालीन धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचे सा.बा. विभागाचे आदेश
२४- बीड - खूनाचा आरोप असलेल्या कैद्याचा जिल्हा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- अभिनेता कमल हसन रुग्णालयातून घरी
२६- मुंबई - पकवाज वादक रमाकांत म्हापसेकर यांचे मालाड येथे निधन...
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
===============================================

मंत्री, आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ, वेतनवाढ विधेयक मंजूर
मुंबई: मंत्री आणि आमदारांच्या वेतन भत्त्यात भरीव वाढ करणारं विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. यामुळे मंत्री आणि आमदारांच्या वेतनात घसघशीत वाढ होणार आहे.
हे विधेयक मंजूर झाल्यानं मंत्र्यांना मुख्य सचिवांप्रमाणे वेतन मिळणार आहे. तर राज्यमंत्र्यांना अतिरिक्त मुख्य सचिवांप्रमाणे वेतन मिळणार आहे. तसेच तर आमदारांना प्रधान सचिवांप्रमाणे वेतन-भत्ते मिळणार आहे. तसंच निवृत्त आमदारांना टर्मनुसार निवृत्ती वेतन मिळणार आहे. तर माजी आमदारांना किमान 50 हजार निवृत्ती वेतन मिळणार आहे. तर दोन टर्म आमदार राहिलेल्या आमदारांना 60 हजार वेतन मिळेल. त्याचप्रमाणे सातवा वेतन आयोगही लागू करण्यात येणार आहे.
सभागृहात विधेयक मांडल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हे विधेयक एकमुखानं संमत करण्यात आलं आहे. दरम्यान, या वेतनवाढीवर आमदार बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला आहे. आमदार आणि मंत्र्यांचे पगारात वाढ होते पण अपंगांचे भत्ते वाढवले जात नाही. त्यामुळे त्यांच्याही भत्त्यात वाढ करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
===============================================
महाड दुर्घटना: आणखी एक मृतदेह हाती, मृतदेह क्र. 22
महाड (रायगड) : सावित्री नदीतील शोधमोहीमेच्या तिसऱ्या दिवशी पावसाचा अडथळा निर्माण झाला. मात्र एनडीआरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डने सकाळी नऊच्या सुमारास शोधमोहीमेला सुरुवात केली. तब्बल 59 तासांपासून सावित्रीच्या पात्रात शोधकार्य सुरु आहे.
LIVE UPDATE (4. 26 PM) : घटनास्थळापासून ६ किमी दूर असलेल्या वडवली गावाजवळ आणखी एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह पुरुषाचा आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मृतदेहांची संख्या 22 वर पोहोचली आहे.
LIVE UPDATE (3. 40 PM) : पत्रकाराशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर गुन्हा, साम टीव्हीच्या संपादकांच्या तक्रारीवरुन महाड MIDC पोलिसांत गुन्हा
===============================================
आसाम : कोक्राझारमध्ये दहशतवादी हल्ला, १४ ठार
- ऑनलाइन लोकमतकोक्राझार, दि. ५ - आसाममधील कोक्राझार येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १४ जण ठार झाले आहेत. शुक्रवारी सकाळी कोक्राझार येथे लष्कराच्या वेषात आलेल्या ५ ते ६ दहशतवाद्यांनी बाजारातील नागरिकांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्याचे वृत्त मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दहशतवाद्यांवर हल्ला चढवला. या घटनेत १५ नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.कोक्राझार येथील या हल्ल्यामागे नॅशनल डेमॉक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड व उल्फाचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्याचाच फायदा घेत लष्कराच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी जमावावर अंदाधुंद गोळीबार केला तसेच तेथे ग्रेनेडही फेकल्याचे समजते.दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून त्यांना माहिती दिली आ
===============================================
महाड दुर्घटना - वाहून गेलेल्या तवेरा कारचे अवशेष सापडले
- ऑनलाइन लोकमत -महाड, दि. 5 - महाडच्या सावित्री नदीमध्ये सलग तिस-या दिवशीही शोधकार्य सुरु आहे. पावसामुळे शोधकार्यात अडथळा येत असला तरी सावित्री नदीत वाहून गेलेल्या तवेरा कारचे काही अवशेष सापडले आहेत. तब्बल 63 तासांच्या शोधमोहिमेंतर कारचे अवशेष सापडले आहेत. घटनास्थळापासून अडीच किलोमीटर अंतरावर कारचे अवशेष आढळून आले.सकाळी पावसामुळे शोधकार्यात अडथळा आला होता. शोधकार्याचा आजचा तिसरा दिवस असून, रात्रभर महाड परिसरात पावसाची संततधार सुरु होती. सकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. एनडीआरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डने सकाळी नऊच्या सुमारास शोधमोहीमेला सुरुवात केली. कारचे अवशेष सापडल्याने या दुर्घटनेत बुडालेली बस आणि इतर वाहनं याच ठिकाणी असण्याचा अंदाज आहे..म्हणून तवेरा ज्या भागात आढळली त्याच पात्राजवळ शोधमोहिम अधिक वेगानं सुरु केली आहे.
===============================================
VIDEO: पाऊस आला धावून, गाड्या गेल्या वाहून
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 05 - राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला असल्या कारणाने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. पावसाच्या पाण्यात गाड्या वाहून जातानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओत पाण्याचा प्रवाह इतका जोरात आहे की, दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून जात असल्यासारख्या जात आहेत. आपली गाडी वाचवण्याचा प्रयत्न लोक करताना दिसत आहेत, पण पाण्यापुढे त्यांचा टिकाव लागतं नाही आहे. त्यामुळे हे लोक 'पाऊस आला धावून, गाड्या गेल्या वाहून' असंच म्हणत असावेत.
===============================================
उदगीर : सैराट जोडप्याचे पोलिस ठाण्यातच शुभमंगल..
- ऑनलाइन लोकमतउदगीर, दि. ५ - प्रेमात ‘सैराट’ होवून इंदौरला धूम ठोकलेल्या येथील एका जोडप्यास उदगीर ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी आपल्या ताब्यात घेतले होते. परंतु, अखेरच्या श्वासापर्यंत साथ देण्याच्या घेतलेल्या आणाभाका अन् त्यातून विलग होण्यास दिलेला नकार लक्षात घेता पोलिसांनी कुटूंबियांचे मनपरिवर्तन केले अन् शेवटी ठाण्यातच या जोडप्याचा ‘शुभमंगल’ सोहळा घडवून आणण्यात आला.अमोल बच्चनसिंह पडवाळ (रा़. उज्वलनगर ता़मानोरा जि. वाशिम) हा उदगीरच्या दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयात बी़टेक़चे शिक्षण घेत आहे़ याच महाविद्यालयातील कर्मचारी प्रेमसिंग राठोड यांची व अमोलच्या वडिलांची जुनी ओळख होती़ त्यातून अमोलचे राठोड यांच्या घरी दोन वर्षांपासूनच येणे-जाणे होते़ त्यातच प्रेमसिंग राठोड यांची कन्या शारदा व अमोलची चांगली ओळख झाली़ या ओळखीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले़ याची कुणकूण दोघांच्याही घरी नव्हती़ दरम्यान, अमोलने पुढाकार घेवून पहिल्यांदा त्याच्या घरी या बाबीची माहिती दिली़ परंतु, घरच्यांनी आढेवेढे घेतले़ त्यामुळे हताश झालेल्या अमोल व शारदाने आपल्या लग्नाला परवानगी मिळणार नाही, असे गृहीत धरुन या दोघांनीही घर सोडले अन् थेट इंदौर गाठले़ इकडे मुलगी गायब झाल्याने प्रेमसिंग राठोड यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार उदगीर ग्रामीण पोलिसांत दिली़.त्यानुसार पोलिस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांनी स्वत: लक्ष घालून दोनच दिवसांत त्यांचा छडा लावला़ गुरुवारी अमोल व शारदा यांना कर्मचारी एम़टी़ कोळी, एम़टी़ राठोड यांनी उदगीरला आणले़ परंतु, ठाण्यात पोलिस व कुटूंबियांसमक्ष या दोघांनी विलग न होता विवाहाचा निश्चय बोलून दाखवला़ दोघेही वयाने सज्ञान असल्याने कुटूंबियांचे मनपरिवर्तन करुन शुक्रवारी सकाळी ११ वाजता ठाण्यातच त्यांचा विवाह सोहळा पार पाडण्यात आला़ यावेळी पोनि़राजकुमार सोनवणे, उपनिरीक्षक ए़ए़ मुलानी, कर्मचारी अजय भंडारे, आरक़े़ भोपणीकर, चंद्रकांत कलमे, नामदेव सारोळे, कोळी, राठोड यांच्यासह उपप्राचार्य डॉ़हरीदास राठोड, रिपाइं जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, शेषेराव सुडे, तंटामुक्ती अध्यक्ष विदेश पवार, उपसरपंच मारोती पवार व नागरिकांची उपस्थिती होती़
===============================================
घाम आल्याने 'अल्लाह' म्हटल्यामुळे मुस्लीम दाम्पत्याला विमानातून उतरविले
- ऑनलाइन लोकमतशिकागो, दि. ०५ - विमान प्रवासादरम्यान घाम आल्याने अल्लाह असे म्हटल्यामुळे एका पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन दाम्पत्याला विमानातून उतरविण्यात आल्याची घटना घडली आहे.डेल्टा एअर लाइन्सच्या विमानातून पॅरिस ते सिनसिनाटी असा प्रवास करत असताना घाम आला म्हणून अल्लाह असे म्हटले. त्यामुळे आम्हाला विमानातून इस्लामोफोबिया येथे उतरविण्यात आल्याचा दावा फैसल अली आणि त्याची पत्नी नाजिया यांनी केला आहे.दरम्यान, याप्रकरणी विचारणा केली असता एका क्रू मेंबरने पायलटकडे तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून फोन लपविण्याचा आणि अल्लाह असा आवाज ऐकल्याचे सांगण्यात आले.
===============================================
अफगाणिस्तानमध्ये परदेशी पर्यटकांवर हल्ला, 6 जखमी
- ऑनलाइन लोकमत -काबूल, दि. 04 - पश्चिम अफगाणिस्तानमध्ये परदेशी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. हेरात येथे तालिबान दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात सहा पर्यटक जखमी झाले आहेत. तालिबान दहशतवाद्यांनी अद्याप या हल्ल्याची अधिकृतपणे जबादारी स्किकारलेली नाही. परदेशी पर्यटकांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. विशेष म्हणजे अफगाण लष्कराचा ताफा सोबत असतानाही हा हल्ला झाला.
===============================================
जळगाव : शहरात मध्य रेल्वेच्या मार्गावर शिवाजीनगरकडे जाण्यासाठीचा उड्डाणपूल ब्रिटिशकालीन आहे. सन 1913मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाची मुदत संपली असून हा पूल पूर्णपणे जीर्ण झाला आहे. त्यामुळे पूल कोसळण्याच्या स्थितीत आहे. यासंदर्भात ब्रिटिश सरकारच्या स्थापत्य विभागाने महापालिकेला पत्रही पाठविले आहे. त्यानुसार या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात येऊनही वाहतूक सर्रास सुरुच आहे.
जळगावचा रेल्वेपूल कधीही पडेल; ब्रिटनचे पत्र
| |
-
| |
या पुलासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी जळगाव येथील जाहीर सभेत निधी मंजूर केला आहे. महापालिकेने पुलासंदर्भात नाहरकतपत्र देण्याचा ठराव अद्याप जिल्हा प्रशासनाला दिलेला नाही. त्यामुळे या पुलासाठी निधीचा पाठपुरावा करण्यात अडचणीत येत आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिका या पुलाचे काम करु शकत नाही. त्यामुळे पुलाच्या नव्याने होणाऱ्या बांधकामासाठी पूर्णपणे केंद्र व राज्य सरकारच्या निधीवरच अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र, पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक तातडीने बंद करुन पुलाचे काम हाती घेतले नाही तर गंभीर दुर्घटना घडू शकते.
===============================================
No comments:
Post a Comment