Monday, 22 August 2016

नमस्कार लाईव्ह २२-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- सिंगापूर; दोन तास सलग भाषणामुळे पंतप्रधान पडले बेशुद्ध 
2- जपानला वादळाचा तडाखा, 10 हजार लोक विस्थापित 
3- नऊ वर्षांच्या भारतीय मुलीची न्यूयॉर्कमध्ये हत्या 
4- आत्महत्त्या करायला निघालेल्या फेल्प्सने जिंकली ऑलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके 
5- टॉरेंट वेबसाईटवर गेल्यास होणार 3 वर्षांची शिक्षा 
6- सोमालियात अल-कायदाचा हल्ला; 17 ठार 
7- सूर्यमालेबाहेरील ग्रहावर ऑक्‍सिजनचे अस्तित्व 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
8- सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार जाहीर 
9- दिल्लीत चांदी ७७५ रुपयांनी घसरून ४५,२00 रुपये किलो झाली, तर सोने २00 रुपयांनी घसरून ३१,0५0 रुपये तोळा 
10- मोदींचे समर्थन करणाऱया नेत्यांवर गुन्हा दाखल   
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
11- दोन वेण्यांची सक्ती करणे हे बालहक्कांचे उल्लंघन! 
12 - गंगाजलाची आता थेट पोस्ट ऑफीसमधून विक्री 
13- मुंबई महापालिका आरक्षण प्रक्रिया 9 सप्टेंबरपासून सुरु होणार 
14- इंदू मिलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
15- भाईंदर; समुद्रातील खडकावर अडकले प्रेमी युगुल 
16- चंद्रपूर - ब्रम्हपुरीच्या वाल्मीक नगरात आईने केली मुलीची हत्या 
17- मुंबई मेट्रो;  २१ सप्टेंबरपर्यंत दरवाढ टळली 
18- मातंग समाजाचे आंदोलन, काही वाहनांची तोडफोड 
19- पालघर; ५० लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त 
20- क्रिकेट: 'नो बॉल'चा निर्णय घेणार 'थर्ड अंपायर'! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
21- गोपी २५ तर खेताराम २६ व्या क्रमांकावर
22- क्रीडा लवादाने पर्यायच ठेवला नाही 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर 

Add करा 
======================================

सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार जाहीर

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. २२ : रिओमध्ये बॅडमिंटन महिला एकेरीचे रौप्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू, महिला कुस्तीत कांस्य विजेती साक्षी मलिक तसेच ५२ वर्षांत भारताला पहिल्यांदा जिम्नॅस्टिकमध्ये सन्मान मिळवून देणारी दीपा कर्माकरला भारता सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. या तीन कन्यांवर भारतातून कौतूक आणि बशिसांचा वर्षाव होत असतानाच भारत सरकारने त्यांना खेलरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान वाढवला आहे. भारताचा उत्कृष्ट नेमबाज जितू रायलाही भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
    साक्षीने यंदा देशाला पहिले पदक मिळवून दिल्याने खेलरत्नची ती सर्वांत मोठी दावेदार बनली. ५२ वर्षांत पहिल्यांदा भारतीय जिम्नॅस्ट म्हणून रिओत उतरलेल्या त्रिपुराच्या २३ वर्षांच्या दीपाने वॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरीसह चौथे स्थान घेतले. तर सिंधूने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला रौप्य पदक मिळवून दिले. वर्षांत एकापेक्षा अनेक खेळाडूंना खेलरत्न दिले जाऊ शकेल, अशी सरकारने आधीच घोषणा केली होती. त्यामुळे खलरत्नसाठी एका पेक्षा जास्त खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 
    खेलरत्नसाठी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याचे नाव देखील होते. पण ऑलिम्पिकमुळे त्याची दावेदारी कमकुवत बनली. याशिवाय टिंटू लुका, अनिर्बान लाहिरी, विकास गौडा, मिताली राज आणि दीपिका पल्लीकल हिच्यासह दहा खेळाडूंनी आपापल्या महासंघांकडून अर्ज पाठविले होते. 
======================================

दोन वेण्यांची सक्ती करणे हे बालहक्कांचे उल्लंघन!


  • विद्यार्थिनींना दिलासा: केरळ बालहक्क आयोगाचा निकाल
    थिरुवनंतपुरम: मुलींनी शाळेत येताना केसांच्या दोन वेण्या घालूनच आले पाहिजे, अशी सक्ती करणे हे विद्यार्थिनींच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे, असा निकाल केरळ राज्य बालहक्क आयोगाने दिला असून शाळांनी अशी सक्ती करू नये, असा आदेश दिला आहे.
    कासरगोड जिल्ह्यातील चिमीनी येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलीने केलेल्या तक्रारीवर आयोगाच्या अध्यक्षा शोभा कोशी आणि सदस्य के. नासिर व सी.यू. मीना यांनी हा निर्णय दिला. मात्र विद्यार्थिनींनी शाळेत येताना पिंजारलेल्या केसांनी न येता ते व्यवस्थित विंचरून आणि वर एकत्र बांधून यावे, असा नियम शाळा करू शकतात, असे आयोगाने स्पष्ट केले. शाळांनी दोन वेण्यांचा आग्रह करू नये, असा आदेश राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने जारी करावा, असे निर्देश आयोगाने दिले.
    केरळमधील मुली आठवड्यातून एकदा नव्हे तर दररोज केसावरून आंघोळ करतात, या पार्श्वभूमीवर या विद्यार्थिनीने आयोगाकडे तक्रार केली होती. तिचे म्हणणे असे होते की, सकाळी शाळेत येण्याच्या घाईच्या वेळी केस नीट न वाळवता त्यांच्या घट्ट वेण्या बांधल्या तर केसांना कुबट वास येतो. शिवाय केसांत कोंडा होतो व खाज सुटून डोक्यावर चट्टे उठतात. यावर उपाय म्हणून अनेक मुली आंघोळ न करताच शाळेत येतात.
======================================

समुद्रातील खडकावर अडकले प्रेमी युगुल ( फोटो स्टोरी)


  • राजू काळे, ऑनलाइन लोकमत 
    भाईंदर, दि. २२ - उत्तन-भाटेबंदर येथील वेलंकनी माता मंदिरामागे असलेल्या समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर आतील खडकावर एक प्रेमी युगुल सोमवारी सकाळी ११.३० वा भरतीच्या  पाण्याची पातळी वाढल्याने अडकले होते. ही बाब तेथे फेरफटका मारणारे स्थानिक मच्छीमार शॉन कोलासो यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी वेलेरिन पन्ड्रिक व अजित गंडोली यांच्या मदतीने त्या युगुलाला सुखरूप किनाऱ्यावर आणले. 
    यामुळे पुढील दुर्घटना टळली. बोरिवली पूर्वेस राहणारी स्वप्नाली (२५) व सूरज (२२) हे सोमवारी सकाळी ११ वा  येथे फिरण्यास आले होते. अर्ध्या तासाने ते किनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर आतील खडकावर जाऊन बसले. काही वेळाने समुद्राला भरती आल्याने खडकाजवळील पाण्याची पातळी वाढली. 
    ते किनाऱ्यावर जाण्यास  निघाले. सुरुवातीला सुरज पाण्यात उतरला. पाणी त्याच्या छाती पर्यंत पोहोचल्याने ते दोघे घाबरून पुन्हा खडकावर जाऊन बसले.  ही बाब  किनाऱ्यावर फेरफटका मारीत असलेले स्थानिक मच्छीमार कोलासो यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्वरित स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच परिसरातील इतर मच्छीमारांना घटनेची माहिती दिली. 
    शॉन यांनी त्वरित तेथे धाव घेतलेल्या मच्छीमारांपैकी वेलेरिन व अजित यांच्या मदतीने युगुलाला किनाऱ्यावर सुखरूप आणले.
    lover
    उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जगदीश बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचविणाऱ्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे त्या युगुलाला पुन्हा तसे न करण्याची समज दिली. वेलेरिन हे स्थानिक काँग्रेसचे ब्लॉक एकचे अध्यक्ष तर अजित हे नगरसेविका शर्मिला  पती आहेत.
    lover
    lover
======================================

पोस्ट ऑफीसमध्ये अवतरली ‘गंगा’!


  • ऑनलाइन लोकमत 
    खामगाव, दि. २२ -  हिंदू धर्मात अतिशय मानाचे स्थान असलेल्या पवित्र गंगाजलाची आता थेट पोस्ट ऑफीसमधून विक्री होत आहे. त्यामुळे ‘कशाला जाता गंगा,काशी...गंगाजल उपलब्ध आहे घरापाशी’ या ओळींचा प्रत्यय अनेकांना येत असून, पोस्ट ऑफीसमध्ये गंगा अवतरल्याचा अनुभव भाविक घेत आहेत.
    भारतात श्रध्दाळूंची संख्या कमी नाही. भूमिला, नदीला माता मानण्याची परंपरा आजही अबाधित आहे. देशात गंगा नदीला अन्यन्यसाधारण महत्व असून, या नदीच्या जलाला तीर्थांचे स्थान आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपºयातील भाविक गंगोत्री, ऋषिकेश, पाटणा येथे जात, गंगास्रान करतात. सोबतच गंगानदीतील पवित्र जल सोबत घेवून येतात. अनेकांना हे भाग्य लाभत नाही, अशा भाविकांसाठी भाविकांनी घरपोच गंगाजल ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 
    राज्यातील सर्व पोस्ट ऑफीसमध्ये गंगाजल विक्रीस उपलब्ध आहे. ऋषिकेश आणि गंगोत्री येथून गंगाजलाच्या बाटल्या उपलब्ध करण्यात येत असल्याने, आता पोस्ट ऑफीसमध्ये ‘गंगा’ अवतरल्याचा अनुभव भाविक घेत आहेत.
    सर्वच पोस्ट ऑफीसमध्ये मिळणार गंगाजल!
    उत्तराखंड टपाल खात्याने पोस्टातून गंगाजल विक्रीस सुरूवात केली. या उपक्रमाला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता संपूर्ण राज्यात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. १०० मिलीची बॉटल १५ रुपये, २०० मिलीची बॉटल २५ रुपयाला उपलब्ध आहे.
======================================

दोन तास सलग भाषणामुळे पंतप्रधान पडले बेशुद्ध

  • First Published :22-August-2016 : 12:00:00Last Updated at: 22-August-2016 : 12:02:13

  • - ऑनलाइन लोकमत 
    सिंगापूर, दि. 22 - सिंगापूरचे पंतप्रधान ली सियेन लूंग एका कार्यक्रमात भाषण करता करता अचानक बेशुद्ध पडले. ली सियेन लूंग दोन तास सलग भाषण करत होते. भाषणामुळे त्यांना इतका थकवा आला की ते बेशुद्ध पडले. पंतप्रधान बेशुद्ध पडल्याने हॉलमधील उपस्थित लोक प्रचंड घाबरले होते. मात्र काही वेळातच ली सियेन लूंग शुद्धीवर आले. यावेळी लोकांनी टाळ्या वाजवून ली सियेन लूंग यांचं कौतुक केलं.
    पंतप्रधान ली सियेन लूंग यांना ऐकण्यासाठी हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. शुद्धीवर आल्यानंतर लोकांनी टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान थकावट आणि डिहायड्रेशनमुळे बेशुद्द पडले असावेत अशी माहिती त्यांच्या जवळच्या सहका-यांनी दिली आहे. 
    शुद्धीवर आल्यावर पंतप्रधान  ली सियेन लूंग यांनी लोकांचे आभार मानले. 'प्रतिक्षा केल्याबद्दल आभार. मी तुम्हा सर्वांना घाबरवलं. मला माहित नाही काय झालं होतं. मी जास्त करुन डॉक्टरांकडे जात नाही. पण जर कधी गेलो तर संपुर्ण चेकअप झाल्याशिवाय निघत नाही', असं त्यांनी सांगितलं.  ली सियेन लूंग 2004 पासून सत्तेत आहेत. 
======================================

जपानला वादळाचा तडाखा, 10 हजार लोक विस्थापित



  • टोकयो, दि. 22 - जपानला माइंडल व लायनरॉक या चक्रीवादळांनी झोडपले असून गेल्या दोन दिवसांमध्ये जपानला बसलेला हा वादळाचा तिसरा तडाखा आहे. एक जण आत्तापर्यंत दगावला असून जवळपास 10 हजार नागरिक विस्थापित झाले आहेत. जपानच्या राजधानीत टोकयोमध्ये जवळपास 110 मैल किंवा 180 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहत असून शेकडोंच्या संख्येने विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
    वादळ कमी पडलं म्हणून की काय अनेक भागांमध्ये पावसानेही दमदार हजेरी लावली आहे.
======================================

No comments: