Monday, 1 August 2016

नमस्कार लाईव्ह 01-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- सौदी अरेबियामध्ये अडकलेले 10 हजार भारतीय परतणार मायदेशी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- अन् खासदार शशिकलांना राज्यसभेतच रडू कोसळलं! 
३- रशियन हेलिकॉप्टरवर सिरियात हल्ला, 5 जणांचा मृत्यू 
४- हवाई दलाच्या ग्रुप कॅप्टनची गळफास घेऊन आत्महत्या 
५- 55 दहशतवादी झाकीर नाईकमुळे प्रेरित, एनआयएचा खुलासा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
६- आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार 
७- मुंबईवर वरुणराजाची कृपा, पाणीपुरवठा करणारे तलाव ओव्हरफ्लो 
८- विदर्भावरुन विधीमंडळात विवाद, शिवसेनेने राजदंड उचलला 
९- पैशांची नव्हे झाडांची भिशी, सोलापूरच्या डॉक्टरांचा उपक्रम 
१०- मुंबई बनलं लेकींचं शहर, मुलींच्या जन्मदरात वाढ 
११- मुख्यमंत्रीसाहेब, जोक नको, 106 हुतात्म्यांनी महाराष्ट्र घडलाय : राणे 
१२- 200 किमी प्रतितास वेग, टॅल्गो ट्रेन आज मुंबईत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- वर्षभरात महाराष्ट्रात खड्डेबळींच्या संख्येत 700 टक्क्यांनी वाढ 
१४- आंबोली धबधब्याजवळ दरड कोसळली 
१५- हॉटेलच्या रुममध्ये मग्न जोडप आणि बिबट्याची एन्ट्री 
१६- बलात्कारानंतर मुलीची हत्या, पुरावे मिटवण्यासाठी कमरेखालचा भाग जाळला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- नरसिंग यादवला नाडाकडून मोठा दिलासा, बंदी हटवली 
१८- पतंजलीच्या दंतकांतीला टक्कर देण्यासाठी कोलगेटकडून नवी आयुर्वेदिक पेस्ट 
१९- मारूती सुझुकीकडून कारच्या किंमतीत 20,000 रुपयांनी वाढ 
२०- कानाखाली जाळ काढीन तुझ्या, मकरंदचा डायलॉग संजय दत्तच्या तोंडी 
२१- भिंतीवरुन उडी, बिग बींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

========================================

नरसिंग यादवला नाडाकडून मोठा दिलासा, बंदी हटवली

नरसिंग यादवला नाडाकडून मोठा दिलासा, बंदी हटवली
मुंबई: महाराष्ट्राचा पैलवान नरसिंग यादवला डोपिंगप्रकरणी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं क्लीन चीट दिली आहे. नरसिंगवरील तात्पुरत्या बंदीची कारवाईही मागे घेण्यात आली आहे. उत्तेजक सेवन चाचणीत दोषी सापडल्यानंतर नरसिंग यादवनं त्याच्या खाण्यात काहीतरी मिसळण्यात आल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी आज निकाल देण्यात आला. त्यामध्ये नरसिंगला मोठा दिलासा मिळाला आहे.

25 जून आणि 5 जुलै रोजी झालेल्या तपासणीत नरसिंगच्या अ आणि ब नमुन्यांत मेटँडिएनोन या स्टेरॉईडचा अंश आढळून आला होता. नरसिंगनं मात्र त्याच्या खाण्यात काहीतरी मिसळण्यात आल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणी नाडाच्या शिस्तपालन समितीसमोर नरसिंगची सुनावणी झाली. सुनावणीनंतर नाडानं नरसिंगची बाजू मान्य केली आहे. या निर्णयामुळे  ऑलम्पिकला जाण्याची दारं खुली होऊ शकतात. मात्र, नरसिंगला रिओ ऑलिम्पिकला पाठवायचं की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं समजतं आहे.

========================================

आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार
गांधीनगर : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल राजीनामा देणार आहेत. स्वत: आनंदीबेन पटेल यांनी फेसबुकवरुन घोषणा केली आहे.

पक्षाला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती करणार, असं आनंदीबेन पटेल यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मी वयाची पंचाहत्तरी पार केली आहे. त्यामुळे मी सर्वोच्च पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. युवा नेतृत्त्वाला संधी मिळावी,  मी पक्षातच सामान्य कार्यकर्ती म्हणून कार्यरत राहीन, असं आनंदीबेन पटेल यांनी म्हटलं आहे.

असं असलं, तरी गुजरातमध्ये पटेल आंदोलन, दलित अत्याचार या दोन घटनांमुळे देशभरात चर्चा झाली आणि गुजरात सरकारवर टीका झाली. त्यामुळे  आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

========================================

अन् खासदार शशिकलांना राज्यसभेतच रडू कोसळलं!

...अन् खासदार शशिकलांना राज्यसभेतच रडू कोसळलं!
नवी दिल्ली: नेहमीच वाद विवाद, आरोप प्रत्यारोपांच्या गोंधळानं गाजणाऱ्या राज्यसभेत आज एक महिला खासदार बोलता बोलता चक्क रडू लागली.

तमिळनाडूतील AIADMK च्या खासदार असलेल्या शशिकला पुष्पा यांनी राज्यसभेत बोलताना तमिळनाडूत आपण सुरक्षित नसून सतत आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सांगितलं. पक्ष सोडण्यासाठी आपल्यावर दबाव दिला जातो आहे. असं म्हणत त्यांना राज्यसभेतच रडू कोसळलं.

शशिकला राज्यसभेत बोलत असतानाच तिकडे तमिळनाडूत जयललिता यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.

शुक्रवारी दिल्लीतल्या इंदिरा गांधी विमानतळावर शशिकला यांनी डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांच्या सलग चार कानाखाली लगावल्या होत्या. त्यांची ही कृती पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचं सांगत जयललितांनी ही कारवाई केली.

========================================

मुंबईवर वरुणराजाची कृपा, पाणीपुरवठा करणारे तलाव ओव्हरफ्लो

मुंबईवर वरुणराजाची कृपा, पाणीपुरवठा करणारे तलाव ओव्हरफ्लो
मुंबई : वरुणराजानं मुंबईकरांवर चांगलीच कृपा केली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव आता काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

विहार आणि तुळशी हे तलाव ओव्हरफ्लो झाले असून इतर तलावक्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीची टांगती तलवार दूर झाली आहे.

मुंबईकरांची वर्षभराची तहान 14 दशलक्ष लीटर पाण्याने भागते. सध्याच्या परिस्थितीनुसार मुंबईच्या तलावांमध्ये 10 दशलक्ष लीटर पाण्याचा साठा झाला आहे. येत्या काही दिवसात आणखी पाण्याचासाठा वाढण्याची अपेक्षा आहे. पुढच्या वर्षापर्यंत मुंबईकरांवरचं पाण्याचं टेन्शन आता लवकरच दूर होईल, असं म्हणायला हरकत नाही.


========================================

वर्षभरात महाराष्ट्रात खड्डेबळींच्या संख्येत 700 टक्क्यांनी वाढ

वर्षभरात महाराष्ट्रात खड्डेबळींच्या संख्येत 700 टक्क्यांनी वाढ
मुंबई : रस्त्यांमधील खड्डे हा मुंबईसकट संपूर्ण देशभरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी आपल्या चिंतेत भर घालणारी आहे.

गेल्या वर्षभरात राज्यात खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात 700 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंत्रालयाच्या वाहतूक आणि संशोधन विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

देशभरात गेल्या वर्षात खड्ड्यांमुळे तब्बल 10 हजार 727 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. यावर उपाय काढण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आहे.

यापुढे रस्त्यातील खड्ड्यांमुळे कोणाचा मृत्यू झाल्यास रस्ते बनवणाऱ्या यंत्रणा आणि वाहतूक पोलिस यांना जबाबदार धरण्यात येईल. खड्डे दुरुस्त करण्याच्या कामात अधिकाऱ्यांकडून कुचराई झाल्यास हा गुन्हा म्हणून नोंदवण्यात येणार आहे.

========================================

No comments: