[अंतरराष्ट्रीय]
1- खुद्द पाकिस्तानातच पाकविरोधी घोषणाबाजी
2- रिपोर्टः नोकिया 105 दहशतवाद्यांचं सर्वात मोठं शस्त्र
3- नाशिक - १,५०५ शेळ्या, मेंढ्या ओझरहून शारजाला कार्गो विमानाने निर्यात.
4- पाकिस्तानच्या कर्मचाऱ्यांची तालिबान्यांकडून सुटका
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
5- राष्ट्रपतींच्या मुलीला अश्लिल मेसेज पाठवणारा कोण?
6- विजय मल्ल्याविरोधात सीबीआयकडून अजून एक गुन्हा नोंद
7- छत्तीसगड - 41 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण.
8- काश्मीरमध्ये मोबाईल सेवा दुसऱ्या दिवशीही बंद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
9- 'त्या' दलालांचा बंदोबस्त शिवसेना करेल : उद्धव ठाकरे
10- सलग सुट्टयामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व ट्रफिक जॅम
11- आचार्य अत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
12- 23 वर्ष उलटूनही फ्लॅटचा ताबा नाही, बिल्डरवर मोफा अंतर्गत गुन्हा
13- नागपुरातल्या डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील फरार आरोपीची आत्महत्या
14- संघर्षकन्यांसाठी 'माहेर'ची माणसं, अलका कुबल मदतीला
15- चितळे श्रीखंड, दहीभात खाणाऱ्या पुण्यातल्या मांजराला मारहाण
16- बंदूक दाखवताना गोळी सुटली, मित्राच्या छातीत घुसली
17- बीड - पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या.
18- निवृत्त तुरुंग रक्षकाकडून मुलाचा खून
19- मोदींकडून प्रेरणा; चहावाला लढवतोय निवडणूक!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
20- 2008 ला हिरोसोबत फोटो, 2016 ला हिरोला हरवलं
21- वॉटर कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील 9 गावं कोणती?
22- लिओनेल मेस्सीने घेतली निवृत्ती मागे, पुन्हा अर्जेंटिनाकडून खेळणार
23- सर्वोत्तम 18 रोईंगपटूंमध्ये दत्तू भोकनळ 13 वा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==========================================

फक्त राडीतांडाच नव्हे, तर आमीर खानच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक गावांत अशी जलक्रांती घडली आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा 15 ऑगस्टला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
116 स्पर्धक गावांपैकी उत्कृष्ट कामगिरी करणारे 9 गावं अंतिम फेरीत पोहचली आहेत. त्यामध्ये बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा पाटोदा, कुंबेफळ आणि खापरटोनचा समावेश आहे. तर साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातली वेळू, जायगा आणि आनपटवाडी ही गाव अंतिम फेरीत पोहचली आहेत.

डब्बा ट्रेडिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर जवळपास 3 महिन्यांपासून दिनेश गोकलानी फरार होता. तर या प्रकरणातल्या काही आरोपींनी अटकपूर्व अंतरिम जामीन मिळवला होता. नागपुरातच पिपळा परिसरात दिनेश लपून बसला होता. मात्र पोलिसांच्या हाती तो सापडलाच नाही.
शुक्रवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र दिनेशनं खरोखरच आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात घडला? हा प्रश्नही निर्माण झाला आहे.

निकीता आणि पूजा या बहिणींचं शिक्षण जोपर्यंत सुरु राहिल तोपर्यंत प्रत्येक वर्षीच्या दोघींच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी अलका कुबल यांनी उचलली आहे. निकीता दहावीत, तर पूजा आठवीत शिकत आहे.
निकिता 4 वर्षांची असताना वडिलांचं अपघाती निधन झालं. कणखर आईनं दोन्ही लेकींसोबत आई-वडिलांचं घर गाठलं. मोलमजुरी करुन घर चालत होतं. पण तितक्यात नियतीनं दुसरा धक्का दिला. निकिता आठवीत असताना त्यांची आईही गेली.

'त्या' दलालांचा बंदोबस्त शिवसेना करेल : उद्धव ठाकरे
मुंबई : मोठ्या प्रयत्नानंतर गिरणी कामगारांना मिळालेल्या हक्कांच्या घऱांवर दलालांचा डोळा आहे, असा आरोप आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. वरळीत आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते आचार्य अत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. यावेळी ते बोलत होते.
“पुन्हा एकदा मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव दलालांकडून आखला जात आहे. ज्या गिरणी कामगारांना म्हाडा किंवा इतर माध्यमातून मुंबईत घरं मिळाली, त्या कामगारांच्या मागे दलालांनी तगादा लावला आहे. कामगारांची इच्छा नसतानाही घर विकण्याचा आग्रह धरला जात आहे. मात्र गिरणी कामगारांनी दलालांना बळी पडू नये. या दलालांचा बंदोबस्त शिवसेना आपल्या पद्धतीनं करेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
==========================================
वॉटर कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील 9 गावं कोणती?
बीड : सलग तीन वर्ष दुष्काळाची दाहकता सोसणारं राडीतांडा गाव सध्या जलसाठ्यांची शीतलता अनुभवत आहे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या या गावात, जिथं नजर टाकावी तिथं पाणीच पाणी दिसत आहे. वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गावकऱ्यांनी घाळलेला घाम, जणू पावसाच्या रुपात पुन्हा बरसला आहे.
फक्त राडीतांडाच नव्हे, तर आमीर खानच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक गावांत अशी जलक्रांती घडली आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा 15 ऑगस्टला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
116 स्पर्धक गावांपैकी उत्कृष्ट कामगिरी करणारे 9 गावं अंतिम फेरीत पोहचली आहेत. त्यामध्ये बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा पाटोदा, कुंबेफळ आणि खापरटोनचा समावेश आहे. तर साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातली वेळू, जायगा आणि आनपटवाडी ही गाव अंतिम फेरीत पोहचली आहेत.
==========================================
23 वर्ष उलटूनही फ्लॅटचा ताबा नाही, बिल्डरवर मोफा अंतर्गत गुन्हा
नाशिकः फ्लॅटधारकांच्या मालमत्ता तब्बल 23 वर्ष उलटूनही हस्तांतरीत करुन देत नसलेल्या बिल्डर दाम्पत्याला नाशिक पोलिसांनी मोफा अंतर्गत अटक केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सदनिका हस्तांतर उल्लंघन कायद्यांतर्गत अशाप्रकारे झालेली ही जिल्ह्यातील पहिलीच, तर राज्यातली दुसरी कारवाई आहे.
नाशिक पोलीसांच्या या कारवाईमुळे बिल्डर लॉबीमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. बिल्डर साहेबराव कदम यांनी कॉलेज रोड येथे सन्मिज्ञ अपार्टमेंट ही इमारत 1993 साली बांधली होती. मात्र तब्बल 23 वर्षानंतरही कदम यांनी फ्लॅट हस्तांतरीत केले नव्हते.
==========================================
नागपुरातल्या डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील फरार आरोपीची आत्महत्या
नागपूर : नागपुरात बहुचर्चित डब्बा ट्रेडिंग प्रकरणातल्या फरार आरोपीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दिनेश गोकलानी असं आत्महत्या केलेल्या आरोपीचं नाव आहे. यामुळे पोलिसांसह या प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
डब्बा ट्रेडिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर जवळपास 3 महिन्यांपासून दिनेश गोकलानी फरार होता. तर या प्रकरणातल्या काही आरोपींनी अटकपूर्व अंतरिम जामीन मिळवला होता. नागपुरातच पिपळा परिसरात दिनेश लपून बसला होता. मात्र पोलिसांच्या हाती तो सापडलाच नाही.
शुक्रवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र दिनेशनं खरोखरच आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात घडला? हा प्रश्नही निर्माण झाला आहे.
==========================================
संघर्षकन्यांसाठी 'माहेर'ची माणसं, अलका कुबल मदतीला
उस्मानाबाद : आई-वडिलांच्या पश्चात घराची जबाबदारी सांभाळत शिक्षण नेटाने सुरु ठेवणाऱ्या उस्मानाबादच्या संघर्षकन्यांना सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनीही या बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.
निकीता आणि पूजा या बहिणींचं शिक्षण जोपर्यंत सुरु राहिल तोपर्यंत प्रत्येक वर्षीच्या दोघींच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी अलका कुबल यांनी उचलली आहे. निकीता दहावीत, तर पूजा आठवीत शिकत आहे.
निकिता 4 वर्षांची असताना वडिलांचं अपघाती निधन झालं. कणखर आईनं दोन्ही लेकींसोबत आई-वडिलांचं घर गाठलं. मोलमजुरी करुन घर चालत होतं. पण तितक्यात नियतीनं दुसरा धक्का दिला. निकिता आठवीत असताना त्यांची आईही गेली.
==========================================
रिपोर्टः नोकिया 105 दहशतवाद्यांचं सर्वात मोठं शस्त्र
नवी दिल्लीः नोकिया 105 फोन सर्वात मजबूत आणि दमदार बॅटरी बॅकअप असणारा फोन म्हणून परिचित आहे. हाच फोन आतंकवाद्यांचं खरं शस्त्र आहे. बॉम्बस्फोटांसाठी आंतकवादी अशा दोन फोनचा वापर करतात. एक फोन कॉल करण्यासाठी वापरला जातो. तर दुसरा सिग्नल पाठवण्यासाठी वापरला जातो.
आंतकवाद्यांसाठी हा सर्वात प्रभावी फोन असल्याचं समोर आलं आहे. जगभरात या फोनची किंमत 30 डॉलरपेक्षाही कमी आहे. भारतात हा फोन 900 ते 1400 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. कॉन्फ्लिक्ट अर्मामेंट रिसर्च रिपोर्ट नुसार हा फोन आतंकवाद्यांचं प्रमुख शस्त्र आहे.
बाजारात अनेक विविध फीचर्स असणारे फोन आहेत, ज्यांचा वापर आतंकवादी करु शकतात. मात्र आयसिससारख्या दहशतवादी संघटनांमध्ये हाच फोन सर्वाधिक प्रसिद्ध असल्याचं अहवालात सांगितलं आहे.
दमदार बॅटरी बॅकअप आणि कमी किंमत हे हा फोन सर्वाधिक वापरण्यामागचं कारण आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतांना बॉम्बस्फोट कसा घडवून आणतात, हे देखील नोकिया 105 च्या माध्यमातूनचं शिकवलं जातं, असं कॉन्फ्लिक्ट अर्मामेंट रिसर्च रिपोर्ट मध्ये सांगितलं आहे.
==========================================
चितळे श्रीखंड, दहीभात खाणाऱ्या पुण्यातल्या मांजराला मारहाण
पुणे : तेजस… तन्मय… मयुरी… ही नावं आहेत मांजरांची… या मांजरांना चितळ्यांचंच श्रीखंड लागतं… दह्याशिवाय ती भाताला तोंड लावत नाहीत.. पुण्यातल्या सदाशिवपेठेतलं नावडीकरांचं घर हे त्यांचं हक्काचं घर… पण घरातल्या सात मांजरांपैकी तेजस या बोक्यावर तळमजल्यावर राहणाऱ्या खासदार वंदना चव्हाणांची वक्रदृष्टी पडली… वंदना चव्हाण यांच्या कुटुंबियांनी मांजरांना मारहाण केल्याचा आरोप सरांनी केला आहे.
प्रकरण इथंच थांबलं नाही. नावडीकर सर पोलिसात गेले. आता रितसर तक्रार झाल्यानतर वंदना चव्हाण यांनीही आरोपांना उत्तर दिलं आहे. नावडीकरांनी सातच नाही, तर पन्नास मांजरे पाळावीत. पण त्याचा इतरांना त्रास होऊ नये, असा युक्तीवाद त्या करतात.
==========================================
2008 ला हिरोसोबत फोटो, 2016 ला हिरोला हरवलं
Joseph schooling beats michael phelps
रिओ दी जानेरो : लहानपणी ज्याचा फॅन होता, ज्याच्यासोबत एक फोटो काढण्याची इच्छा होती, त्याच आपल्या हिरोला हरवण्याची करामत, जलतरणपटू जोसेफ स्कूलिंगने केली आहे. ऑलिम्पिकमध्ये तब्बल 22 सुवर्णपदकं जिंकणाऱ्या मायकल फेल्प्सला स्कूलिंगने हरवलं.
रिओ ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात, सिंगापूरच्या स्कूलिंगने 50.39 सेंकदाची वेळ नोंदवून गोल्ड मेडलवर कब्जा केला. त्याने अमेरिकेचा विश्वविक्रमवीर जलतरणपटू आणि त्याचा हिरो मायकल फेल्प्सला मागे टाकलं. फेल्प्सने 51.14 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकलं.
पण विशेष म्हणजे या स्पर्धेत फेल्प्ससह दक्षिण आफ्रिकेच्या चॅड ली क्लोज आणि हंगेरीच्या लासल्सो सेह यांनीही 51.14 सेंकदाचीच वेळ नोंदवली. त्यामुळं या तिघांनीही रौप्यपदक देण्यात आलं.
==========================================
राष्ट्रपतींच्या मुलीला अश्लिल मेसेज पाठवणारा कोण?
नवी दिल्ली: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांना अश्लिल संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला आहे. पार्थ मंडल असं या व्यक्तीचं नाव असून, तो शर्मिष्ठा मुखर्जी यांना अश्लिल मेसेज पाठवत होता.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पार्थ मंडलचं फेसबूक प्रोफाईलचे आणि पाठवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केले आहेत. तसेच या व्यक्तीपासून सावध राहण्याचेही आवाहन केले आहे.
==========================================
बंदूक दाखवताना गोळी सुटली, मित्राच्या छातीत घुसली
मुंबई : मुंबईच्या वडाळा परिसरात गोळीबाराची अजब घटना घडली. मित्राला बंदूक दाखवताना, गोळी सुटल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. वडाळा टीटी परिसरात ही घटना घडली.
मंगल सिंह ठाकूर नामक 25 वर्षीय युवकाच्या बंदुकीतून गोळीबार झाला आहे. या गोळीबारात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
काय आहे प्रकरण?
मंगल सिंह ठाकूर आपली बंदूक मित्राला दाखवत होता. त्यावेळी चुकून बंदुकीतून गोळी सुटली आणि मित्राच्या छातीत घुसली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
==========================================
खुद्द पाकिस्तानातच पाकविरोधी घोषणाबाजी
इस्लामाबाद : पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानमध्ये थेट पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. इतकंच नाही तर पाकिस्तानकडून आमच्या भागात अत्याचार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमध्येही पाकिस्तानविरोधात आगपाखड करण्यात आली आहे.
पाकिस्तानी नागरिकांनीच पाकविरोधी घोषणाबाजी केली. महत्त्वाचं म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीत, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचं ठणकावून सांगितलं होतं. तसंच पाकिस्तानने स्वत:च्या देशातील बलुचिस्तानमध्ये नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत उत्तर द्यावं, असंही म्हटलं होतं.
त्यानंतर आज पाकिस्तानात चलबिचल पाहायला मिळत आहे. पाकिस्तान आमच्यावर अत्याचार करतं, असा आरोप बलुचिस्तानमधील नागरिकांनी केला आहे. तसंच एका स्थानिक बड्या नेत्यानंही या प्रश्नी भारताने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
त्यामुळे काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या प्रश्नी भारताला सल्ले देणाऱ्या पाक सरकारवर चांगलीच तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.
==========================================

No comments:
Post a Comment