Friday, 12 August 2016

नमस्कार लाईव्ह १२-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- सायबर क्राईम विधेयकास पाकिस्तानमध्ये मंजुरी 
२- चांग माय; इथे 'हत्ती' देतात मसाज 
३- द. चिनी समुद्रासंदर्भात भारताने निर्णय घ्यावा:चीन 
४- चीनचे परराष्ट्रमंत्री वांग सुरक्षा पाहणीसाठी भारतात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- जीएसटी विधेयक मंजूर करणारे आसाम पहिले राज्य 
६- सेन्सेक्स २९२ अंकांनी वाढून २८,१५२ अंकांवर बंद 
७- २५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके बंद करा - मुंबई उच्च न्यायालय 
८- मद्यपान केलेल्या जेट एअरवेज आणि एअर इंडियाच्या दोन वैमानिक चारवर्षांसाठी निलंबित 
९- काश्मीरमध्ये 35व्या दिवशीही संचारबंदी कायम 
१०- स्वातंत्र्यदिनी सीमेवर तालिबानी हल्ल्याची शक्यता 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- पणजी; गोव्यात मराठीलाही राजभाषेचे स्थान 
१२- मुंबई- रवींद्र गोयल मध्य रेल्वेचे नवे प्रबंधक 
१३- यवतमाळ- 15 दारूच्या दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द 
१४- मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून मागितला न्याय... 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- वसई; अर्नाळा समुद्रात बुडालेल्या चार मुलांचे मृतदेह सापडले 
१६- शिमला; मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून 
१७- दिल्लीत डिझेल वाहनांचा मार्ग मोकळा 
१८- औरंगाबाद: आमखास परिसरात दोन मुलींचा गळा चिरून महिलेला जिवंत जाळले 
१९- बुलंदशहर सामूहिक बलात्कार प्रकरणात अलाहबाद उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश 
२०- पश्चिम बंगाल मालदामध्ये मालदा-दीघा एक्सप्रेसचे तीन डब्बे रुळावरुन घसरले 
२१- भितरकनिका उद्यानात मगरींच्या पिलांचा जन्म 
२२- तमिळनाडूत ट्रक अपघातात 8 ठार 25 जखमी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- २५१ रुपयातल्या मोबाईलनंतर रिंगींग बेलचा आता एलईडी टीव्ही 
२४- नेमबाज गगन नारंग पुन्हा अपयशी 
२५- कडव्या लढतीनंतर अतानू दास पराभूत 
२६- फेल्प्सने मोडला 2000 वर्षांपूर्वीचा विक्रम 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=============================================

जीएसटी विधेयक मंजूर करणारे आसाम पहिले राज्य



  • गुवहाटी, दि. १२ - आसाम विधानसभेने शुक्रवारी एकमताने वस्तू-सेवाकर विधेयक (जीएसटी) मंजूर केले. केंद्र शासनानंतर जीएसटी विधेयक मंजूर करणारे आसाम देशातील पहिले राज्य ठरले आहे. जीएसटी विधेयक मंजूर करणारे आसाम देशातील पहिले राज्य म्हणून लक्षात राहील असे आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी सांगितले. 
    अनेक वर्षांपासून रखडलेले जीएसटी विधेयक मागच्या आठवडयात राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाले. संसदेच्या मान्यतेनंतर २९ पैकी अर्ध्या राज्यांची मंजुरी मिळाली की जीएसटीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे. 
    काँग्रेस आणि एआययूडीएफच्या आमदारांनी आसाम विधानसभेत विधेयकाला पाठिंबा दिला. जीएसटीचा आसामवर काय परिणाम होईल त्यावर चर्चेची मागणी केली होती मात्र सभापतींनी त्यांची मागणी फेटाळून लावली. 
    जीएसटी म्हणजे काय ?
    जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून, व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिलं जात आहे. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही.
    या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे.
=============================================

अर्नाळा समुद्रात बुडालेल्या चार मुलांचे मृतदेह सापडले



  • वसई, दि. १२ - पिकनिकसाठी विरारच्या अर्नाळा समुद्रावर गेलेल्या नालासोपा-यातील चार मुलांचा गुरुवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. या चार मुलांचे मृतदेह शुक्रवारी बाहेर काढण्यात आले. नालासोपाऱ्यातील लक्ष्मीबेन छेडानगरमधील सात मुले गुरुवारी पिकनिकसाठी अर्नाळा समुद्र किना-यावर गेली होती. 
    त्यातील सहामुले समुद्रात पोहण्यासाठी उतरली होती. दोन मुले किना-यावर पाण्यात खेळत होती तर, चार जण खोल पाण्यात उतरले होते. 
    खोल पाण्यात गेलेली चारही मुले पाण्यात ओढली गेली आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. सनी पालव, रोहन जाधव, सुजित विश्वकर्मा आणि चेतन कालप अशी मृत मुलांची नाव आहेत. ही सर्व मुलं १५ ते १६ वयोगटातील होती. 
=============================================

VIDEO: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून


  • ऑनलाइन लोकमत - 
    शिमला, दि. 12 - हिमालच प्रदेशातील कांगरा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेला आहे. मुसळधार पावसामुळे नदीची पातळी वाढली होती. नदीला पूर आल्याने पाण्याच्या प्रवाहात हा पूल वाहून गेला. हिमाचल प्रदेशमधील नुपूर तालुक्याला शेजारच्या पंजाबशी जोडणारा हा पूल 44 वर्ष जुना होता. 
    पुलाला तडे गेल्याचं लक्षात आल्याने प्रशासनाने अगोदरच अलर्ट जारी केला होता. त्यामुळे पूल वाहून गेला तेव्हा कोणीही पुलावर उपस्थित नव्हतं. 
    हा पूल वाहून जाताना पाहून महाडमधील पुल दुर्घटना आठवते. महाडच्या सावित्री नदीवरील पूल 2 ऑगस्टला वाहून गेला होता. नदीत एसटी बस आणि वाहनेदेखील वाहून गेली होती. आतापर्यंत 26 मृतदेह हाती लागले आहेत. तब्बल 9 दिवसानंतर शोधकार्यादरम्यान एसटी बसचे अवशेष हाती लागले आहेत.
=============================================

गोव्यात मराठीलाही राजभाषेचे स्थान



  • पणजी, दि. 12-  गोव्यात कोंकणीबरोबरच मराठीलाही राजभाषेचे स्थान द्यावे, असा डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी मांडलेला ठराव विधानसभेत शुक्रवारी संमत झाला. मात्र सरकारने या विषयात उचित लक्ष घालून व जनतेकडे विचारविनिमय करूनच कायद्यात योग्य ती दुरुस्ती करावी, असेही या ठरावाद्वारे ठरले आहे.
    सावळ यांच्या ठरावास ही दुरुस्ती पणजीचे भाजप आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी मांडली होती. तीही मंजुर झाली. सरकारने गोवा राजभाषा कायदा 1987 मध्ये त्वरित दुरुस्ती करून मराठीला देखील राजभाषेचा दर्जा बहाल करावा, अशी सावळ यांची मागणी होती. त्यावर सभागृहात दोन्हीबाजूंनी बरीच चर्चा झाली. भाषेच्या विषयावरून वाद नको, सावळ यांनी अगोदर विधानसभेतील सर्व मराठीप्रेमी आमदारांशी चर्चा करायला हवी होती, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले. तसेच हा ठराव संमत करून घेण्यास आपली काहीच हरकत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तत्पूर्वी राजभाषा खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी सावळ यांच्या ठरावाला उत्तर देताना प्रशासकीय कामांमध्ये मराठी वापरली जात असून सरकार त्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे व मराठीच्या उत्कर्षासाठी पुस्तक प्रकाशनासह अनेक योजना सरकार राबवत असल्याचे सांगितले. तुम्ही ठराव मागे घेणार काय अशी विचारणा सभापती अनंत शेट यांनी आमदार सावळ यांच्याकडे केली, त्यावेळी सावळ यांनी नकार दिला. तुम्ही ठराव फेटाळला तरी, चालेल पण आपण मागे घेणार नाही, कारण मराठी राजभाषा व्हावी ही गोव्यातील सर्व मराठीप्रेमींची मागणी व भावना आहे व तिच आपण सभागृहात मांडली असल्याचे सावळ म्हणाले. तत्पूर्वी अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी ठरावास विरोध करणारे भाषण केले. गोवा म्हणजे कोंकणी असून मराठीला राजभाषा केल्यास महाराष्ट्रासह परप्रांतीयांना येथील सरकारी नोक:या खुल्या होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. बाणावलीचे आमदार कायतू सिल्वा यांनीही मराठीला राजभाषा करण्यास विरोध केला. मात्र दुरुस्तीसह ठराव संमत झाला तेव्हा कुणीच विरोध केला नाही. कुणी मत विभाजनही मागितले नाही. सर्वानुमते ठराव मंजुर झाला.
=============================================

२५१ रुपयातल्या मोबाईलनंतर रिंगींग बेलचा आता एलईडी टीव्ही



  • नवी दिल्ली, दि. १२ - सर्वसामान्यांना परवडणारा २५१ रुपयातील 'फ्रिडम २५१' हा  स्मार्ट फोन बनवणा-या रिंगीग बेल कंपनीने आता एचडी एलईडी टीव्हीच्या निर्मितीची घोषणा केली आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनापासून एलईडी टीव्हीची ऑनलाइन बुकिंग स्वीकारणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.  
    रिंगीग बेलने ३१.५ इंचाच्या एलईडी टीव्हीसाठी ९,९०० रुपये किंमत निश्चित केली आहे. यापूर्वी 'फ्रिडम २५१'  मोबाईलच्या डिलिव्हरीला विलंब झाला होता. ठरलेल्या वेळात मोबाईल ग्राहकांपर्यंत पोहोचवता आला नव्हता. एलईडी टीव्हींची दुस-या दिवसापासूनच १६ ऑगस्टपासून डिलिव्हरी सुरु करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.  
    आदल्या दिवशी ऑर्डर स्वीकारल्यानंतर लगेच दुस-या दिवशी डिलिव्हरी कशी पोहोचवणार एकूणच या प्रक्रियेबाबत अस्पष्टता आहे. फक्त एका दिवसासाठी ही सुविधा असून, रिंगीग बेलच्या संकेतस्थळावरुन बुकिंग करावे लागेल. कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे एलईडी टीव्ही मिळाल्यानंतर कॅश द्यावी लागेल. सध्या ऑनलाइन पोर्टलवर चांगल्या ब्राण्डच्या ३१.५ इंच एलईडी टीव्हीची किंमत १३ ते १७ हजार दरम्यान आहे. 
=============================================

दिल्लीत डिझेल वाहनांचा मार्ग मोकळा



  • नवी दिल्ली, दि. 12 - दिल्लीत डिझेलवर चालणाऱ्या 2 हजार सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांच्या नोंदीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयानं आज हटवली. मात्र अशा जड वाहनांच्या किमतीवर 1 टक्के ग्रीन टॅक्स लागणार आहे. या वाहनांमुळे वायू प्रदूषण होणार असल्यानं हा एक टक्क्याचा टॅक्स गाड्यांच्या उत्पादक आणि वितरकांना भरावा लागणार आहे.
    दिल्लीत वायू प्रदूषणात वाढ होत असल्यानं गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानेच अशा वाहनांवर बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वर्षी न्यायाधीश ए. के. सिक्री आणि न्यायाधीश आर. बानुमती यांच्या खंडपीठाने डिसेंबरमध्ये डिझेलवरील वाहनांच्या नोंदणीवर बंदीचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयाचा वाहन उत्पादकांनी तीव्र निषेध केला होता.
    तसेच जानेवारीमध्ये न्यायालयात यासंदर्भातील याचिकाही दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यानंतर वाहन उत्पादकांनी वाहनांच्या विक्री किंमतीवर एक टक्का पर्यावरण कर म्हणून लादण्यात येईल, असे सांगितले होते. तसेच हरितकर हा केंद्रीय पर्यावरण नियामक मंडळाने स्वतंत्र बँक खाते काढून त्यात जमा करावा, असेही आदेशात न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान एक टक्का हरितकर हा ग्राहकांकडूनच वसूल केला जाण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.
=============================================

इथे 'हत्ती' देतात मसाज


  • ऑनलाइन लोकमत 
    चांग माय, दि. १२ - शरीरातील स्नायूंमध्ये मोकळेपणा यावा, रिलॅक्स ताजेतवाने वाटावे यासाठी शरीरावर मसाज केला जातो. आज वेगवेगळया पद्धतीचे मसाज तंत्र बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामधून वेगवेगळे उपचारही केले जातात. मसाज हातांनी, बोटांनी,पायानी आणि उपकरणांनी केला जातो. 
    पण हत्तीच्या पायांनी मसाज केला जात असेल तर ?. वाचून धक्का बसला ना. तैवानच्या चांग माय प्रांतात मसाजसाठी हत्तीचा वापर केला जातो.  हत्तीच्या पायांनी आणि सोंडेने मसाज केला जातो. वरचे छायाचित्र पाहून हत्तीच्या पायाखाली माणूस चिरडला जातोय असे तुम्हाला वाटेल. पण हा मसाज सुरु आहे. 
    चांग माय प्रांतात माणसांना मसाज देण्यासाठी हत्तीना खास प्रशिक्षित केले आहे. अशा मसाजमध्ये हत्ती पिसाळला तर, दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने तैवानमध्ये काहीजण बंदी घालण्याची मागणी करत आहेत. 
=============================================

No comments: