Saturday, 6 August 2016

नमस्कार लाईव्ह ०६-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ग्रेट ब्रिटनच्या जलतरणपटूंच्या बॅग गेल्या चोरीला.. 
२- अमेरिकेचा पुरुष बास्केटबॉल संघ राहतो पंचतारांकित क्रुजवर .. 
३- 'इसिस'च्या संशयित दहशतवाद्यास कुवेतमध्ये अटक 
४- फ्रान्स: वाढदिवसाच्या पार्टीत आग; 13 ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- 80 टक्के गोरक्षक हे समाजकंटक आहेत - पंतप्रधान मोदी 
६- शेगाव, शिर्डी मंदीर उडविण्याची इसिसची धमकी 
७- दूध 10 ते 15 रुपयांनी स्वस्त मिळणार? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- महाड दुर्घटनेला आम्ही जबाबदार, 180 दिवसात पूल उभारणार : गडकरी 
९- महाड दुर्घटना: तीन किमीवर बसचे अवशेष सापडले 
१०- केबीसीची सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणची अटकेनंतर पहिलीच मुलाखत 
११- नवी मुंबईत भरदिवसा दरोडा, २०-२२ किलो सोने लुटले 
१२- राजस्थानमध्ये दहा दिवसात 500 गायींचा मृत्यू! 
१३- मंत्र्यांची हाडे खिळखिळी झाल्यावरच दुरुस्ती: सेना 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका, राधानागरी धरण तुडुंब 
१५- उस्मानाबादमध्ये PSI चा अल्पवयीन मुलीवर बलात्कार 
१६- NSEL घोटाळाप्रकरणी जिग्नेश शहाला २ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर 
१७- नागपूरकर डिसेंबर महिन्यात घेऊ शकणार मेट्रो सेवेचा लाभ 
१८- परभणी : परभणी रेल्वे स्टेशन बाँम्बस्फोटाने उडवून देण्याच्या निनावी पत्राने पोलिसांची धावपळ 
१९- पुणे : शहराला मिळणार एकवेळ पाणी, पाणीकपात ऑक्टोबर अखेरपर्यंत मागे.  
२०- नंदुरबारमध्ये शहादा-दोंडाईचा रोड पेट्रोलपंपाजवळ भीषण अपघात, ६ ठार तर १७ जखमी. 
२१- नांदेड- जिल्ह्यात १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा ठप्प, सेवेतील 60 डॉक्टरांनी दिले राजीनामे. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- महिला नेमबाज पात्रता फेरीतच अपयशी 
२३- फिरकीच्या आखाड्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया पराभूत 
२४- रोईंगमध्ये भारताचा दत्तू भोकनळ उपांत्यपूर्व फेरीत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=============================================

महाड दुर्घटनेला आम्ही जबाबदार, 180 दिवसात पूल उभारणार : गडकरी

महाड दुर्घटनेला आम्ही जबाबदार, 180 दिवसात पूल उभारणार : गडकरी
नवी मुंबई : महाडमध्ये घडलेली दुर्घटना ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, अशी कबुली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नवी मुंबईत एका कार्यक्रमावेळी बोलत होते.
महाडमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेला पूल हा येत्या ६ महिन्यात नव्यानं बांधला जाईल, तसंच मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं कामंही येत्या २ वर्षात पूर्ण होईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले,”महाडची घटना ही सरकार म्हणून आमची जबाबदारी. मात्र इथे 180 दिवसात नवा पूल बांधणार. त्यासाठी केंद्र सरकारने मदत केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे 4 लेनचे काम डिसेंबरपर्यंत वेगाने सुरू होईल. येत्या दोन वर्षात हा मार्ग पूर्ण करणार. यासाठी लोकांनी लवकर जमिनी द्याव्या”.
आघाडी सरकारने गोंधळ घातला, काम लवकर केले नाही. तसेच जमीन संपादन समस्या असल्याने मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण रखडल्याचं गडकरी म्हणाले.


=============================================

महाड दुर्घटना: तीन किमीवर बसचे अवशेष सापडले

LIVE : महाड दुर्घटना: तीन किमीवर बसचे अवशेष सापडले
महाड (रायगड) सलग चौथ्या दिवशी सावित्रीच्या पात्रात शोधकार्याला सुरुवात झाली आहे. नौदल आणि एनडीआरएफला सावित्री नदीत एका कारचे अवशेषही सापडले आहेत. तसंच यासोबत एक चटई आणि इतर सामानही हाती लागलं आहे.

दरम्यान, गाडीचे अवशेष तवेरा कारचे असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, त्याला अजूनही दुजोरा मिळालेला नाही. शिवाय, बरसत असलेल्या पावसामुळं शोधकार्यात मोठे अडथळे येत असल्याचं चित्र आहे.

LIVE UPDATE (12.10 PM) : घटनास्थळापासून 3 किमीवर एसटीचे अवशेष सापडले

सावित्री नदीवर पूल कोसळलेल्या ठिकाणापासून तीन किमी अंतरवार बुडालेल्या एसटी बसचे अवशेष सापडले आहेत. नौदलाच्या जवानांच्या हाती हे अवशेष लागले. त्यामुळे बुडालेल्या एसटी आणि कार याच परिसरात असण्याची शक्यता बळावली आहे.


=============================================

केबीसीची सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणची अटकेनंतर पहिलीच मुलाखत

EXCLUSIVE : केबीसीची सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणची अटकेनंतर पहिलीच मुलाखत
नाशिक अल्प काळात लोकांना श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवून केबीसीचा मायाजाल रचणारा भाऊसाहेब चव्हाण पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला. केबीसी या कंपनीमार्फत भाऊसाहेब चव्हाणनं महाराष्ट्रभर अंदाजे 10 हजार कोटींचा चूना लावल्याचा त्याचावर आरोप आहे.

विविध शहरांमध्ये चव्हाणवर गुंतवणूकादारांना  फसवल्याचे गुन्हेही दाखल झाले आहेत. सिंगापूरहून भाऊसाहेब चव्हाण भारतात परतल्यानंतर पोलिसांनी त्याला अटकेत घेतलं आणि सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

भाऊसाहेब चव्हाण आपल्या बाजून काय स्पष्टीकरण देतो आहे? गुंतवणूकदारांना केबीसीमुळे आत्महत्या करण्याची वेळ का आली? गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय? अशा सगळ्या प्रश्नांचा जाब आम्ही भाऊसाहेब चव्हाणला विचारला.

=============================================

कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका, राधानागरी धरण तुडुंब

कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका, राधानागरी धरण तुडुंब
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसात मुसळधार पाऊस  पडत आहे, काही तालुक्यात अतिवृष्टी होत असून गगनबावडा तालुक्यात  एकाच दिवसात तब्बल 202.50 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
धरणक्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाने काळमावाडी वगळता सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे आज पहाटे पावणे सहा वाजता उघडले. त्यातून 12 हजार 200 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र यापैकी 1 आणि 2 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे पुन्हा 11 वाजता बंद झाले.
त्यामुळे हा विसर्ग कमी होऊन सध्या 8740 इतका विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील इतरही लघु आणि मध्यम स्वरुपाची धरणे भरली असून, त्यातूनही होणाऱ्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत  वाढ होत आहे.
प्रतितास 1 इंच पाणी पातळीत वाढ होत असून महापुराची स्थिती निर्माण व्हायला फक्त 5 इंच पाणी पातळी बाकी आहे. जिल्ह्यातून जाणारे  अनेक राज्य  महामार्ग पाण्याखाली आहेत. प्रामुख्याने गगनबावडा-कोल्हापूर, रत्नागिरी-कोल्हापूर हे कोकणाला जोडणारे मार्ग बंद झाल्याने, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
तर जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. एकूणच काही तासातच कोल्हापुरात पुन्हा एकदा महापुराची स्थिती निर्माण झाली असून प्रशासन सज्ज झाले आहे.

=============================================

उस्मानाबादमध्ये PSI चा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

उस्मानाबादमध्ये PSI चा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
उस्मानाबाद रिव्हॉल्व्हरची भीती दाखवून अल्पवयीन मुलीवर पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याची घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. पीडित मुलगी अकरावी इयत्तेत शिकते. तर प्रेम बनसोडे असं या 26 वर्षीय आरोपी पीएसआयचं नाव आहे.

आनंदनगर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी पीएसआय प्रेम बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ उस्मानाबादचा रहिवाशी असलेला पीएसआय बनसोडे हा सध्या सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

धक्कादायक म्हणजे बलात्कारप्रकरणी गुन्हा नोंदवू नये, म्हणून पीडित मुलीच्या आई-वडिलांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून बनसोडेने धमकावलं.

दरम्यान, आरोपी पीएसआय प्रेम बनसोडे याला तात्काळ अटक करण्यात आले आहे.

=============================================

दूध 10 ते 15 रुपयांनी स्वस्त मिळणार?

दूध 10 ते 15 रुपयांनी स्वस्त मिळणार?

ठाणे : मुंबई-पुण्यासह राज्यभरातील ग्राहकांना यापुढे सरकार स्वस्त दराने गाय आणि म्हशीचं दूध उपलब्ध करुन देणार आहे. शेतमालाप्रमाणे दूधही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार पणनमंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

गाईचं दूध ३२ ते ३५ रुपये लिटरने तर म्हशीचं दूध ४५ रु लिटर दराने शहरवासियांना देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही जादा दर मिळेल तर ग्राहकांना गाईचं दूध १५ रुपयांनी स्वस्त मिळेल, असा दावा पणनमंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. ते ठाण्यात बोलत होते.

काही संस्थांनी स्वस्त दूध विक्री योजनेसाठी पुढाकार घेतल्याचंही सदाभाऊ खोत म्हणाले. अशा स्वस्त दूध योजनेसाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांना पणन विभाग पूर्ण सहकार्य करेल असंही त्यांनी नमूद केलं.

सध्या मुंबईत गाईचं दूध सुमारे 45 रुपये लिटर आहे, तर म्हशीच्या दुधाचा दर 60 रुपयापर्यंत आहे

 



=============================================

No comments: