Thursday, 18 August 2016

नमस्कार लाईव्ह १८-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- तुर्कस्थानमध्ये कारबॉम्बचा स्फोट, 3 जणांचा मृत्यू, 120हून अधिक जखमी
२- जगातील सर्वात मोठ्या विमानाने घेतलं उड्डाण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- दिग्विजय यांनी काश्मीरचा उल्लेख केला 'भारतव्याप्त काश्मीर' 
४- देशद्रोहाच्या आरोपानंतर 'ऍम्नेस्टी'ची कार्यालये बंद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
५- सांगली; मतिमंद मुलीवर बलात्कारप्रकरणी एकास आठ वर्षे सक्तमजुरी 
६- मुंबईकरांचा पुढचा पावसाळाही खड्ड्यात 
७- शिवसेनेला गाफील ठेऊन राज यांचा 'मोके पे चौका' 
८- मुंब्य्राच्या इतिहासात प्रथमच हिंदू-मुस्लीमांमध्ये रक्षाबंधन 
९- स्टूलावर उभं राहून हंडी फोडायची का ? - राज ठाकरेंची कोर्टावर टीका  
१०- मुंबई- जीएसटीसाठी राज्य सरकारनं बोलावलं विशेष अधिवेशन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- परभणी शहरात 13 वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात चारही आरोपींची निर्दोष मुक्तता 
१२- ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीकडून बबिता कुमारीचा 5-1नं पराभव 
१३- हरयाणवी 'दंगल'.. लडकियोंकी कुश्ती ! 
१४- जननेंद्रीयामुळे 'त्याचे' पदक नाही हुकले 
१५- जाणून घ्या एकदिवसीय सामन्यात कोणत्या संघाच्या नावे किती शतकं आहेत 
१६- गडचिरोली - घरजावयानेच सासुवर केला प्राणघातक हल्ला 
१७- माजलगाव;  दोन महिलांचा डेंग्यूने मृत्यू 
१८- डिंडोरी जिल्ह्यात बस आणि कार अपघातात 7 जणांचा मृत्यू 
१९- बिहारमध्ये विषारी दारू बळींची संख्या 15 वर 
२०- औरंगाबाद: केमिकलच्या स्फोटात महिला ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- वाशीम; अनोखे रक्षाबंधन - भावाने बहिणीला दिली रेडीमेड शौचालयाची भेट 
२२- साक्षीनं शोभा डेंना अर्पण केलं ऑलिंपिक पदक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=#=====================================

दिग्विजय यांनी काश्मीरचा उल्लेख केला 'भारतव्याप्त काश्मीर'


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 18 - काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे. जम्मू-काश्‍मीरचा उल्लेख भारतव्याप्त काश्मीर असा केल्याने काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मात्र भारतव्याप्त काश्मीर बोलून गेल्यानंतर लागलीच चूक लक्षात आल्यावर दिग्विजय सिंह यांनी सारवासारव केली आहे.
     
     काश्‍मीर भारताचाच भाग असून, पाकव्याप्त काश्‍मीर आपल्याला म्हणावयाचे होते, अशी सारवासारवही दिग्विजय सिंह यांनी केली आहे. सिंह यांनी यापूर्वी अल कायदाचा म्होरक्‍या दहशतवादी ओसामा बिन लादेनचा उल्लेख ओसामाजी असा केल्यानं वाद ओढवून घेतला होता. त्यावेळी हाफिज सईद याचा उल्लेख सिंह यांनी सईदसाहेब असा केला होता.

=#=====================================

अनोखे रक्षाबंधन - भावाने बहिणीला दिली रेडीमेड शौचालयाची भेट


  • संतोष वानखडे /ऑनलाइन लोकमत
    वाशिम, दि. 18 - घरी शौचालय नसल्याने बहिणीला उघड्यावर शौचास जावे लागण्याची बाब भावाला बोचत होती. हा प्रकार थांबविण्यासाठी एका भावाने बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी रेडिमेड शौचालयाची अनोखी भेट दिली आहे. गणेश खंंडाळकर असे भावाचे नाव असून, देऊळगाव साकर्शा येथील सुनिता नांदेडकर नामक बहिणीला त्यांनी शौचालय दिले.
    स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घरोघरी शौचालय बांधकाम करण्याचा नारा दिला जात आहे. या मिशनअंतर्गत पात्र लाभार्थीला १२ हजार रुपयाचे अनुदानही दिले जाते. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा येथील सुनिता नांदेडकर यांच्या घरी वैयक्तिक शौचालय नसल्याने कुटुंबियांना उघड्यावरच शौचास जावे लागत होते.
=#=====================================

साक्षीनं शोभा डेंना अर्पण केलं ऑलिंपिक पदक



  •  
    साक्षी मलिकने कुस्तीमध्ये मिळवलेलं ऑलिंपिकचं ब्रॉन्झ मेडल लेखिका शोभा डे ना अर्पण केलं आहे. पत्रकार परिषदेत तिनं ही धक्कादायक घोषणा केली आणि पत्रकारांना तर क्षणभर काय विचारावं हेच सुचेनासं झालं. मात्र, ऑलिंपिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरलेल्या साक्षीनं शोभा डेच नव्हे तर भल्या भल्याना शाब्दिक बाणांनी लोळवलं आणि पैलवान असले तरी भेजा पण तेज आहे असाच संदेश दिला. या पत्रकार परिषदेची ही झलक...
     
    पत्रकार - तुम्ही शोभा डेंना पदक का अर्पण करताय? त्यांनी तर हा पैशाचा अपव्यय असून खेळाडू सेल्फी घ्यायला जातात अशी टीका केली होती. तुम्ही त्यांच्यावर राग तर नाही ना काढत आहात?
     
    साक्षी - छे.. छे.. मी त्यांच्यावर अजिबात रागावलेली नाहीये. तुम्हाला माहित्येय ना आपण भारतीय खूप भावनाप्रधान असतो. प्रोफेशनल खेळाडू असा जरी शिक्का बसलेला असला, तरी आपण सगळे भावनेशी ईमान राखतो. त्यामुळे मग पाकिस्तानला हरवल्यावर युद्ध जिंकल्यासारखं वाटतं. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये तर आपण बघितलं, कप हरल्यापेक्षा पाकिस्तानविरोधात जिंकल्याचा आनंद आपल्याला खूप झाला होता.
=#=====================================

मतिमंद मुलीवर बलात्कारप्रकरणी एकास आठ वर्षे सक्तमजुरी



  • सांगली, दि. 18 : मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अंत्राळ (ता. जत) येथील धनाजी विठोबा शिंदे यास दोषी धरून आठ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्रन्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
    पीडित मुलगी कुटुंबासोबत अंत्राळ येथे शेतात राहत होती. आरोपी शिंदे याची तिच्या कुटुंबाशी चांगली ओळख होती. ४ आॅगस्ट २००९ रोजी शिंदे या मुलीच्या शेतात गेला होता. मुलीची आजी व आई शेतात काम करीत होत्या. मुलगी घरात होती. शिंदे याने आजीशी गप्पा मारल्या. त्यानंतर पाणी पिण्याचा बहाणा करून तो त्यांच्या घरी गेला. मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला. शिंदे बराचवेळ न आल्याने आजी त्याला पाहण्यासाठी घरी गेली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता. आजीला पाहून शिंदे पळून गेला होता.
=#=====================================

No comments: