Tuesday, 23 August 2016

नमस्कार लाईव्ह २३-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- लाहोरमधल्या ऐतिहासिक रेड लाइट एरियाला ई-कॉमर्समुळे ग्रहण 
२- पाकिस्तानमध्ये न्यूज चॅनेलवर हल्ला, एकाचा मृत्यू 
३- चक्रीवादळामुळे जपानमध्ये ४०० हून अधिक उड्डाणे रद्द 
४- समलिंगी दाम्पत्यास भाडोत्री मातृत्वाने तिळे! 
५- बलोच नेत्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे 
६- जपानला वादळाचा तडाखा, 10 हजार लोक विस्थापित 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
७- काँग्रेस नेत्याच्या मुलाने मुंबईत १०० कोटींना विकत घेतले घर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
८- मुख्यमंत्री कार्यालयात अडीच लाख तक्रारी 
९- आधुनिक पद्धत रोखणार बनावट दारू 
१०- मुंबईत खड्ड्यांचा यंदा नवा विक्रम
११- पर्यायी मार्गांमुळे एसटी ‘खड्ड्या’त 
१२- मोनोचे काम युद्धपातळीवर 
१३- सणासुदीच्या काळात महागाईची फोडणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१४- चेन्नई; नोकरीचा तगादा लावणा-या आईला मुलाने जिवंत जाळलं 
१५- मुंबई; महिलेच्या अंर्तवस्त्रात सापडले २ किलो सोने 
१६- मीरारोड स्थानकात ओव्हरहेड वायरच्या धक्क्याने तरूण गंभीर जखमी 
१७- सोलापूर; सुशीलकुमार शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिल्पकृती 
१८- सिंधुदुर्ग : पावसाचे पुनरागमन, जिल्ह्याच्या विविध भागात रिमझीम तर सावंतवाडीमध्ये मुसळधार पाऊस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
१९- नरसिंगचे कृत्य जाणून बुजून; क्रीडा लवादाचा ठपका 
२०- ललिताला महाराष्ट्र सरकारची नोकरीची ‘आॅफर’ 
२१- दीपा करमाकरचे जोरदार स्वागत 
२२- सिंधूच्या चंदेरी यशाचा धडाक्यात जल्लोष  
२३- महागाई नियंत्रण, आर्थिक वृद्धीत समन्वय हवा 
२४- ३ लाखांवरील रोख व्यवहार होणार बंद 
२५- व्होडाफोन, एअरटेल वापरू नका - रिलायन्सची कर्मचाऱ्यांना सूचना 
२६- 3 लाखाहून जास्त रोख रकमेच्या व्यवहारावर निर्बंध येण्याची शक्यता 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर 

Add करा *

=========================================

काँग्रेस नेत्याच्या मुलाने मुंबईत १०० कोटींना विकत घेतले घर

  • First Published :23-August-2016 : 12:00:00Last Updated at: 23-August-2016 : 12:09:28

  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. २३ - काँग्रेस नेते आणि बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय.पाटील यांचा मुलगा अजिंक्य पाटीलने मुंबईत वरळी येथे १०० कोटी रुपयांना ट्रीपल डयुप्लेक्स फ्लॅट विकत घेतला आहे. अलीकडच्या काळातील मुंबईतील हा सर्वात मोठा मालमत्ता खरेदीचा व्यवहार आहे. 
    टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सी फेस व्ह्यू असलेल्या या २३ मजली इमारतीत अजिंक्यने आलिशान घर खरेदी केले आहे. मुंबईत महागडया घरांची खरेदी मंदावलेली असताना हा व्यवहार झाला आहे. हा व्यवहार गेमचेंजर ठरेल असे रिअॅलिटी व्यवसायात काम करणा-यांचे म्हणणे आहे. 

=========================================

अरे बापरे ! नोकरीचा तगादा लावणा-या आईला मुलाने जिवंत जाळलं

  • First Published :23-August-2016 : 11:55:00Last Updated at: 23-August-2016 : 11:54:03

  • - ऑनलाइन लोकमत
    चेन्नई, दि. 23 - बेरोजगार असल्याने सतत नोकरी कर म्हणून ओरडणा-या आपल्याच आईला मुलाने जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थिरुसूलम परिसरात ही घटना घडली आहे. मुलगा अल्पवयीन असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. 
    वेलुथाई असं पीडित महिलेचं नाव असून चेन्नई विमानतळावर हाऊसकीपर म्हणून त्या काम करत होत्या. त्यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा मुथी कुमार लॉरी ड्रायव्हर म्हणून काम करतो तर छोटा मुलगा सुरेश शिक्षण घेत आहे. पती रोजंदारी कामगार आहे. आरोपी मुलाला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं आणि बेरोजगार होता. 
    'रविवारी रात्री आरोपी मुलाने वेलुथाईंकडे काही पैसे मागितले. यावेळी पैसे देण्यास नकार देत वेलुथाईंनी त्याला ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने वेलुथाईंच्या अंगावर केरोसिन ओतून त्यांना पेटवून दिले', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वेलुथाईंचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा आणि पती घरात पळत आले. आग विझवून त्यांनी वेलुथाईंना रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 
    पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन असल्याने त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. 
=========================================

महिलेच्या अंर्तवस्त्रात सापडले २ किलो सोने

  • First Published :23-August-2016 : 12:47:45

  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. २३ - अंर्तवस्त्रात सोने लपवून सोन्याची तस्करी करणा-या महिलेला सोमवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिका-यांनी अटक केली. फरहाथ उनीसा असे आरोपी महिलेचे नाव असून, तिच्याकडे २.२ किलो सोने सापडले. या सोन्याची एकूण किंमत ६४ लाख रुपये आहे. 
    अंर्तवस्त्रात सोने लपवून ही महिला विमानतळा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना कस्टम अधिक-यांनी तिला अटक केली. कस्टमने नंतर फरहाथाची जामिनावर सुटका केली. फरहाथ नियमित हवाई प्रवास करायची असे अधिका-यांनी सांगितले. 
    तिची तपासणी केल्यानंतर अधिका-यांना संशय आला. कस्टम अधिका-यांनी तिची सखोल चौकशी सुरु केल्यानंतर तिने सोन्याच्या तस्करीची कबुली दिली. फराथा जेट एअरवेजच्या विमानाने दुबईहून मुंबई विमानतळावर उतरली होती. 

=========================================

मीरारोड स्थानकात ओव्हरहेड वायरच्या धक्क्याने तरूण गंभीर जखमी

  • First Published :23-August-2016 : 12:00:00Last Updated at: 23-August-2016 : 12:21:53

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २३ - पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड स्थानकात ओव्हरहेड वायरचा जबर धक्का लागल्याने एक गतिमंद तरूण ८० टक्के भाजला आहे. सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून गंभीर जखमी झालेल्या तरूणावर वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
    मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी एक अज्ञात गतिमंद तरूण मीरा रोड स्थानकातील  प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील छतावर चढला आणि तेथून त्याने ओव्हरहेड वायर्सवर उडी मारल्याने तो जबर जखमी झाला. अचानक घडलेल्या या घटनेने स्थानकातील प्रवाशांचा एकच थरकाप उडाला. उच्चदाब असलेल्या वायरच्या संपर्कात आल्याने त्या तरूणाला तीव्र झटका लागला व तो खाली फेकला गेला. 
    रेल्वे अधिका-यांनी ताताडीने घटनास्थळी धाव घेत त्या तरूणाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. 

=========================================

मुख्यमंत्री कार्यालयात अडीच लाख तक्रारी

  • First Published :23-August-2016 : 06:35:05

  • मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेल्या २० महिन्यांत विविध विभागांबाबत तब्बल २ लाख ४४ हजार १२२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी या दस्तरखुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या गृह विभागाबाबत आहेत. ७१ हजार ४७५ नागरिकांनी त्याबाबत अर्ज केले आहेत.
    त्यानंतर महसूल, नगर विकास, सामान्य प्रशासन व ग्रामीण विकास या विभागाचा समावेश ‘टॉप फाइव्ह’मध्ये आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
    आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी १ नोव्हेंबर २०१४ ते ३० जून २०१६ या कालावधीत फडणवीस यांच्या कार्यालयात विविध खात्यांबाबत आलेल्या तक्रारीची माहिती विचारली होती.
    त्यानुसार त्यांना कळविण्यात आले आहे की, २० महिन्यांत विविध ३१ विभागांत २,४४,११२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये गृह विभागाबाबत ७१ हजार ४७५, त्यापाठोपाठ महसूल व वन (२४,२९३), नगर विकास (१५,३८८), सामान्य प्रशासन (९,४६१) व ग्रामीण विकास (९,३६८) यांचा समावेश आहे. एकूण तक्रारींपैकी या पाच विभागांतील तक्रारींची संख्या ५३.२४ टक्के आहे. महिन्याला सरासरी १२ हजार २०५ तक्रार अर्ज येतात. त्याशिवाय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय (६३८२), मुख्य सचिव (७२४), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (११८९), वस्त्रोद्योग आणि पणन (७७७६), रोजगार व स्वयंरोजगार (६६७), पर्यावरण (६६७), वित्त (२२८८), अन्न व नागरी पुरवठा (२८७५), उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण (३,६९३), गृहनिर्माण (८७०८) आदी विभागांत तक्रारी आल्या आहेत.
    रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे गेल्या १२ महिन्यांचा अभिलेख उपलब्ध नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले असून,
    १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत ५५ आणि १ जानेवारी ते ३० जून २०१५ या कालावधीत ५४७ तक्रारी आल्याचे नमूद केले आहे.
=========================================

सुशीलकुमार शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिल्पकृती

  • First Published :23-August-2016 : 07:11:47

  • दीपक होमकर/ यशवंत सादूल :
    सोलापूर, दि. 23 - अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या सोलापुरातील सुशीलकुमार शिंदे यांनी देशाच्या गृहमंत्रिपदाला गवसणी घातली. इतकेच नव्हे तर गृहमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अजमल कसाब, अफजल गुरू सारख्या दहशतवाद्यांना न्यायालयाने दिलेली फाशीची अंमलबजावणी करत सर्वात यशस्वी व लोकप्रिय गृहमंत्री बनण्याचा मान मिळविला. सोलापूरच्या या महान व्यक्तिमत्त्वाला सलाम करण्यासाठी यंदा त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांनी त्यांचे शिल्प तर चित्रकार राम खरटमल यानी त्यांचे चित्र साकारले आहेत. दीड-दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात काव्य मैफलीची रंगत पाहायला मिळाली आहे.

=========================================

आधुनिक पद्धत रोखणार बनावट दारू

  • First Published :23-August-2016 : 07:03:12

  • अतुल कुलकर्णी,
    मुंबई- होलोग्राम पद्धतीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले गेले म्हणून या कामाच्या निविदा रद्द करताना होलोग्रामपेक्षा वेगळी ‘ट्रॅक अ‍ॅन्ट ट्रेस’ पद्धती आणण्याचे नियोजन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने केले जात आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ४ जून रोजी राजीनामा दिला आणि होलोग्रामची निविदा महाटेंडर या वेबसाईटवर १८ जून रोजी प्रकाशित झाली.
    मात्र याची सगळी प्रक्रिया खडसे मंत्री असतानाच्या काळात झाल्याचे समोर येत आहे. आता होलोग्रामची पद्धतीच रद्द केल्याने नवीन प्रक्रिया अंमलात येईपर्यंत कर बुडवून दारू विकणाऱ्यांना पुढचे काही महिने राज्यात मोकळे रान मिळणार आहे. या सगळ्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून जुन्याच पद्धतीने व्यवहार चालू ठेवण्यात एका दारू लॉबीला सध्यातरी यश आले आहे. दरम्यान, स्टॅम्प पेपर्स छापून
    त्यातून पैसा छापण्याचे प्रकार जसे तेलगीच्या काळात घडले तसे होलोग्रामच्या बाबतीत घडू नये म्हणून ही सगळीच
    पद्धती मोडीत काढून पूर्णत: नवीन आणि जगभरात वापरली जाणारी पद्धती आणण्यासाठी संबंधित विभाग कामाला लागला आहे. ज्यावेळी निविदा प्रकाशित झाली त्यावेळी हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा होलोग्रामच्या निविदा प्रकाशित झाल्या त्यावेळी त्यात टाकण्यात आलेल्या अटी आणि शर्थी ठराविक कंपनीला डोळ्यापुढे ठेवून केल्या गेल्याची तक्रार दिल्लीतल्या एका बड्या मंत्र्यांने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याविषयाच्या फाईलीवर काही प्रश्न उपस्थित केले. त्याची समाधानकारक उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली नाहीत म्हणूनच विभागाचे तत्कालिन आयुक्त विजय सिंघल आणि सचिव डॉ. पी.एस. मीना यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याचेही आता समोर येत आहे.

=========================================

No comments: