*[अंतरराष्ट्रीय]*
१- बँकॉक; थायलंड साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं, चौघांचा मृत्यू
२- शाहरुखला रोखल्याबद्दल अमेरिकेतून दिलगिरी व्यक्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
३- पुष्पगुच्छ स्वीकारले नाहीत तर करोडो वाचतील, पंतप्रधान मोदींना सल्ला
४- सोन्याची मागणी घटली; संप, कठोर नियमांचा फटका
५- कांद्याला मिळावा १२ रुपये भाव!
६- काश्मीरमधील हिंसाचारबद्दल आज सर्वपक्षीय बैठक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
७- 6 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वे रुळावर
८- वॅक्स म्युझियममध्ये 'सैराट'चा फिव्हर, आर्ची-परशाचाही समावेश
९- पुणे आकाशवाणीसह ७ शहरांत प्रादेशिक बातमीपत्र चालूच
१०- आधीच रस्त्यात खड्डे, त्यात दरवाढीचे विघ्न
११- हिरानंदानीच्या अन्य रुग्णालयांचीही चौकशी
१२- चुकीच्या निकषांमुळे मुलाखती रोखल्या
१३- मुख्य न्यायाधीशपदी मंजुळा चेल्लूर यांची नियुक्ती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१४- सावित्री पूल दुर्घटना - वाहून गेलेल्या एसटीचा लागला शोध
१५- मिहानमधील देखभाल प्रकल्पासाठी एअर इंडियाचा स्पाईस जेटशी करार
१६- मुंबई; अभियांत्रिकी विद्यार्थिनीची आत्महत्या
१७- घाटीच्या दारातच महिलेची उपचारासाठी तडफड
१८- सलग ४३ तास गायनाचा सचिन मोरेंचा विक्रम
१९- बीड - माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे निधन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२०- अमेरिकेने पुन्हा एकदा शाहरुख खानला घेतलं ताब्यात
२१- मायकल फेल्प्सचा भीमपराक्रम, जिंकल 22वं सुवर्णपदक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
=====================================
१- बँकॉक; थायलंड साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं, चौघांचा मृत्यू
२- शाहरुखला रोखल्याबद्दल अमेरिकेतून दिलगिरी व्यक्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
३- पुष्पगुच्छ स्वीकारले नाहीत तर करोडो वाचतील, पंतप्रधान मोदींना सल्ला
४- सोन्याची मागणी घटली; संप, कठोर नियमांचा फटका
५- कांद्याला मिळावा १२ रुपये भाव!
६- काश्मीरमधील हिंसाचारबद्दल आज सर्वपक्षीय बैठक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
७- 6 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वे रुळावर
८- वॅक्स म्युझियममध्ये 'सैराट'चा फिव्हर, आर्ची-परशाचाही समावेश
९- पुणे आकाशवाणीसह ७ शहरांत प्रादेशिक बातमीपत्र चालूच
१०- आधीच रस्त्यात खड्डे, त्यात दरवाढीचे विघ्न
११- हिरानंदानीच्या अन्य रुग्णालयांचीही चौकशी
१२- चुकीच्या निकषांमुळे मुलाखती रोखल्या
१३- मुख्य न्यायाधीशपदी मंजुळा चेल्लूर यांची नियुक्ती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१४- सावित्री पूल दुर्घटना - वाहून गेलेल्या एसटीचा लागला शोध
१५- मिहानमधील देखभाल प्रकल्पासाठी एअर इंडियाचा स्पाईस जेटशी करार
१६- मुंबई; अभियांत्रिकी विद्यार्थिनीची आत्महत्या
१७- घाटीच्या दारातच महिलेची उपचारासाठी तडफड
१८- सलग ४३ तास गायनाचा सचिन मोरेंचा विक्रम
१९- बीड - माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे निधन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२०- अमेरिकेने पुन्हा एकदा शाहरुख खानला घेतलं ताब्यात
२१- मायकल फेल्प्सचा भीमपराक्रम, जिंकल 22वं सुवर्णपदक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
=====================================
6 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वे रुळावर
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 12 - सतत होणारे बिघाड आणि त्यामुळे कामावर जाण्यासाठी होणारा उशीरा यामुळे वैतागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी केलेलं रेल रोको आंदोलन अखेर 6 तासांनी मागे घेण्यात आलं. पहाटे 5 वाजता मध्य रेल्वेच्या संतप्त प्रवाशांनी आंदोलनास सुरुवात केली होती. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, प्रवाशांच्या मागण्या जाणून घेतल्या. शक्य ती मदत करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतरच प्रवाशांनी सकाळी 11 च्या सुमारास पहिली रेल्वे मुंबईकडे सोडली.संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकात लोकल अडवल्याने अगोदरच विस्कळीत झालेल्या लोकल सेवेवर परिणाम झाला होता. बदलापूरकरांनी आंदोलन मागे घेतल्यामुळे आता दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह इतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.भिवपुरी स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाला होता. ज्यामुळे सकाळी 5 वाजून 5 मिनिटांची लोकल उशिरा आली. यामुळे बदलापूरमधील संतप्त प्रवाशांनी स्टेशनवरच लोकल रोखली, आणि स्टेशन मास्तरच्या कार्यालयाला घेराव घातला. गाडी वेळेवर येईल असं लिहून देण्याची मागणी प्रवाशांनी स्टेशन मास्तरकडे केली आहे. संतप्त प्रवाशांनी कर्जतच्या दिशेने जाणारी लोकलही रोखली असल्याने दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सीएसटीच्या दिशेना जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. याशिवाय कर्जतहून येणाऱ्या लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचाही खोळंबा झाला आहे.
=====================================
पुष्पगुच्छ स्वीकारले नाहीत तर करोडो वाचतील, पंतप्रधान मोदींना सल्ला
- नवी दिल्ली, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही लोकांकडून पुष्पगुच्छ का स्वीकारता ? तुम्ही आणि बाकीचे मंत्री पुष्पगुच्छ स्वीकारणं बंद करु शकत नाही का ? फक्त तुम्ही जरी असं केलत तर दीड कोटी रुपये वाचतील..असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अॅपवर अशा प्रकारच्या सूचना लोकांकडून येत आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला भाषण करणार आहेत. त्या पार्श्वभुमीवर त्यांनी लोकांकडून सूचना मागवल्या होत्या.आशीष आनंद या व्यक्तीने हा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदी 9 ऑगस्टला मध्यप्रदेशमध्ये गेले होते तेव्हा त्यांना 10 ते 15 पुष्पगुच्छ देण्यात आले. स्विकारल्यानंतर मोदींनी लगेच पुष्पगुच्छ आपल्या सुरक्षारक्षकांकडे सोपवले. 'त्या फुलांचा सुगंध घेता येईल, त्याआधीच दुसरा पुष्पगुच्छ तुमच्या हातात होता. तुम्ही रोज हजारो लोकांना भेटता, जे तुमच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ देतात', असं आशीष आनंद यांनी लिहिलं आहे.
=====================================
अमेरिकेने पुन्हा एकदा शाहरुख खानला घेतलं ताब्यात
- वॉशिंग्टन, दि. 12 - बॉलिवूड बादशाह शाहरुख खानला अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतलं आहे. स्वत: शाहरुख खानने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. लॉस एंजेलिस विमानतळावरुन शाहरुख खानला ताब्यात घेण्यात आलं. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार शाहरुख आपली मुलं सुहाना आणि आर्यनसोबत अमेरिकेसाठी प्रवास करत असताना कारवाई करण्यात आली.'सुरक्षेसंबंधी मी समजू शकतो आणि त्याचा आदरही करतो, पण अमेरिकेच्या इमिग्रेशनकडून दरवेळी कारवाई करणे त्रासदायक असल्याचं', शाहरुख खानने ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे सर्व प्रकरण गंभीर वाटत असंल तरी शाहरुख खानने पुढील ट्विटमध्ये आपल्या स्वभावाप्रमाणे विनोद करत 'चांगली बाजू ही की तितक्या वेळेत काही पोकेमॉन पकडले ' असं सांगत प्रकरण शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.
=====================================
वॅक्स म्युझियममध्ये 'सैराट'चा फिव्हर, आर्ची-परशाचाही समावेश
- लोणावळा, दि. १२ - सैराट सिनेमातील आर्ची, परश्याची क्रेज अद्यापही कायम असून भारतातील पहिले मेणाचे संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियम मध्ये आर्ची, परश्या व नागराज मंजुळे यांचे मेणाचे पुतळे तयार करण्यात येणार आहे. या संग्रहालयातील वँक्स कलावंत सुनिल कंडलूर यांनी या कलाकारांचे मोजमाप घेतले असून येत्या दोन महिन्यात हे मेणाचे पुतळे तयार होतील अशी माहिती कलावंत सुनिल कंडलूर व संचालक सुभाष कंडलूर यांनी दिली.सैराट सिनेमाच्या यशानंतर सध्या आर्ची, परश्यांची क्रेज सर्वत्र वाढली आहे. त्यांना पाहण्यासाठी महाराष्ट्रातील जनता सैराट झाली आहे, अशा कलावंताचे पुतळे संग्रहालयात उभारण्याचा चंग सुनिल कंडलूर यांनी बांधला व कमीत कमी कालावधीत या कलावंतानी देखिल याकरिता सहमती दर्शविल्याने पुतळे बनविण्याचे काम हाती घेण्यात आले असुन यातील पहिली पायरी असलेले कलावंताचे मोजमाप घेण्याचे काम पुर्ण झाले आहे. आर्ची (रिंकू राजगुरु), परश्या (आकाश ठोसर) व नागराज मंजुळे यांच्या हस्तेच या पुतळ्यांचे अनावरण करण्यात येणार असल्याचे सुभाष कंडलूर यांनी सांगितले. सध्या सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियममध्ये अनेक क्रांतीकारक, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, अभिनेते, अभिनेत्री यांचे जवळपास शंभर मेणाचे पुतळे असून रविना टंडन, सोनू सुत, जँकलिन, प्रकाशराज, श्रेया शरण, मि. वर्ल्ड अनुप सिंग ठाकूर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, थोर समाजसुधारण ज्योतिबा फुले यांचे मेणाचे पुतळे बनविण्याचे काम सुरु आहे.
=====================================
थायलंड साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं, चौघांचा मृत्यू
- बँकॉक, दि. 12 - थायलंडमधल्या हुआ हिन येथील एका रिसॉर्टमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत. सुरुवातीला झालेल्या दोन बॉम्बस्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर 19 लोक जखमी झाले होते. जखमींमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. स्फोटांची ही मालिका एवढ्यावरच थांबली नाही. थोड्या वेळाने अजून दोन बॉम्बस्फोट झाले ज्यामुळे मृतांचा आकडा चारवर पोहोचला. स्फोटकं फुलांच्या कुंड्यांमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. मोबाईलच्या सहाय्याने अर्ध्या तासाच्या अंतराने हे स्फोट घडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार महिला फूड स्टॉलच्या दिशेने जात असताना स्फोटामुळे तिचा मृत्यू झाला. जखमींमध्ये पाच परदेशी नागरिकांचा समावेश आहे. थायलंडमध्ये पर्यटनस्थळ अनेकवेळा निशाण्यावर असतात.'ब्लास्ट झाला तेव्हा मी जवळच होतो. लोक बॉम्ब म्हणून ओरडत होते. मी लोकांचा आवाज ऐकला पण स्फोटाचा आवाज मला आला नाही. मी मदत करण्यासाठी धाव घेतली तेव्हा 10 लोक जखमी अवस्थेत पडले होते. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते', अशी माहिती एका व्यक्तीने बीबीसीला दिली आहे.
=====================================
सावित्री पूल दुर्घटना - वाहून गेलेल्या एसटीचा लागला शोध
- महाड : तब्बल दहा दिवसांनंतर सावित्री पूल दुर्घटनेत नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तीन वाहनांपैकी राजापूर-बोरीवली एसटी बसचा शोध घेण्यात नौदलाच्या पथकाला गुरुवारी यश आले. मात्र बेपत्ता झालेल्या १५ प्रवाशांचा अद्यापही तपास न लागल्याने या यंत्रणेवरील तणाव कायम आहे.गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास दुर्घटनेच्या ठिकाणापासून दोनशे मीटर अंतरावर खोल पाण्यात शोध घेणाऱ्या नौदलाच्या पथकाला या बसचा शोध लागला. पाण्यात अंदाजे पंधरा ते वीस फूट खोल गेलेल्या पाणबुड्यांना पाण्याखाली बस असल्याचे आढळून आले. याबाबतचे वृत्त पसरताच प्रशासकीय यंत्रणेनेही बस बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू केली. बस पाण्याबाहेर काढण्यासाठी नदी किनाऱ्यावर तीन क्रेन्स व तीन जेसीबी यंत्र आणले होते.दुपारी एक वाजता बस बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली, मात्र तांत्रिक अडचणीमुळे ती बस बाहेर काढण्यास विलंब लागला. सायंकाळी पाच वाजता एनडीएफ शासकीय यंत्रणा तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना सुमारे शंभर मीटर अंतरावरील ही पाण्यातील बस किनाऱ्यावर आणण्यात यश आले. या बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता तर बसचे संपूर्ण छप्पर तुटून वाहून गेले होते.राजापूर-बोरीवली या बसमध्ये बेपत्ता प्रवाशांचे मृतदेह सापडतील अशी चर्चा केली जात होती, मात्र ती फोल ठरली. दुर्घटनेनंतर जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या या बस तेथील खडकांवर आदळून त्यावेळी बसचे छप्पर बसपासून मोकळे झाले असेल व त्याचक्षणी बसमधील प्रवासी वाहून गेल्याच्या शक्यतेला आज पुष्टी मिळाली.या राजापूर बसमधील सात, जयगड एसटी बसमधील तीन तर तवेरा जीपमधील पाच जणांचा अद्यापही शोध लागला नाही.गेल्या चार दिवसांपासून एकाही बेपत्ता प्रवाशाचा मृतदेह न सापडल्याने त्यांचे मृतदेह सापडण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली असल्याचे बोलले जात आहे. मात्र एनडीआरएफच्या पथकाने शोधकार्य सुरूच असल्याचेदिसून आले.
=====================================
पुणे आकाशवाणीसह ७ शहरांत प्रादेशिक बातमीपत्र चालूच
- नवी दिल्ली : पुणे, धारवाड, इंदूर, त्रिची आणि अन्य काही शहरांतील आकाशवाणी केंद्रांचे प्रादेशिक बातमीपत्र बंद न करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. ही प्रादेशिक बातमीपत्रे सुरूच ठेवण्याचे निर्देश प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश यांनी दिल्याचे समजते.आकाशवाणीचे महासंचालक (वृत्त) सीतांशू यांनी जारी केल्या पत्रकानुसार पुणे, इंदूर, भूज, धारवाड, दिब्रूगड, त्रिची आणि कोझीकोड येथील आकाशवाणी केंद्रांचे प्रादेशिक वृत्त विभागाच्या बातमीपत्र, मुख्य बातम्या आणि कार्यक्रम यासारख्या सेवा नेहमीप्रमाणे चालू राहतील. अलाहाबाद, पौडी, जालंधर, पटियाला, कोइम्बतूर आणि कोची येथील बातमीदार पुढील आदेशापर्यंत या भागात आपले काम करीत राहतील.माहिती आणि नभोवाणी मंत्रालय काही शहरांतील आकाशवाणी केंद्रातील अनेक दशकांपासूनची वृत्तसेवा बंद करणार, असे वृत्त आल्याने आकाशवणीचे श्रोते नाराज झाले होते.सूर्यप्रकाश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही सेवा सुरूच राहणार असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. यासाठी मी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंतीही करीन, असेही ते म्हणाले.
=====================================
आधीच खड्डे, त्यात दरवाढीचे विघ्न
- मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार आहे. महामार्ग क्रमांक ६६वर खड्डे पडल्यामुळे आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गावी वेळेवर पोहोचता यावे यासाठी परिवहन विभागाने पर्यायी मार्ग सुचविले आहेत. मात्र हे मार्ग फार लांबचे ठरत असल्याने एसटीलाही त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कोकणात जाणाऱ्या मार्गांवर तात्पुरती भाडेवाढ केली जाणार आहे.गणेशोत्सव काळात कोकणातील वाहतूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर खड्डे पडल्याचे निदर्शनास आणण्यात आले. या मार्गाची २५ आॅगस्टपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचा विचार बैठकीत करण्यात आला. तसे झाल्यास वाहतूककोंडीची समस्या सुटेल व प्रवाशांना वेळेत गावी पोहोचता येईल, असा बैठकीत विचार मांडण्यात आला. त्यानुसार रावते यांनी एसटी प्रशासनाला तशा सूचना दिल्या. या सूचनांनुसार मुंबई ते चिपळूणपर्यंत जाणाऱ्या बस खोपोली, पाली मार्गे माणगाव, महाड, चिपळूणपर्यंत जातील. तर चिपळूणच्या पुढे रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्या एसटी बसना पुणे, सातारा, उंब्रज (कुंभार्ली घाट) मार्गे जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र या पर्यायांमुळे एसटी बसनाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या मार्गांवर गणेशोत्सव काळात भाडेवाढ करण्याचा विचार केला जात आहे. मुंबई ते चिपळूण प्रवासात पर्यायी मार्गाचा वापर केल्यास २५ किलोमीटरचा अधिक प्रवास होत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रत्येक तिकिटामागे २५ रुपये जादा मोजावे लागतील. तर मुंबईतून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत पर्यायी मार्गाने प्रवास झाल्यास ११0 किलोमीटर जादा प्रवास होत असून तिकिटामागे ११0 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. स्थितीचा आढावा २५ आॅगस्टपर्यंत घेतला जाईल आणि पर्यायी मार्गांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. ही भाडेवाढ ही १ ते ५ सप्टेंबरपर्यंत लागू राहील. (प्रतिनिधी)गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीकडून १,७५0 ग्रुप बुकिंग सोडण्यात आल्या आहेत. त्याच्या २000 पेक्षा जास्त फेऱ्या होणार असून १ ते ५ सप्टेंबरपर्यंत त्या धावतील. १0 आॅगस्टपर्यंत १,९५२ फेऱ्यांच्या ग्रुप बुकिंगचे आगाऊ आरक्षण झाले आहे. पर्यायी मार्गावरून या बस धावल्या तर ग्रुप बुकिंगमधील प्रत्येक प्रवाशाकडून जदा भाडे घेतले जाणार आहे.त्याचप्रमाणे ३ ते ४ सप्टेंबर रोजीही नियोजित वेळापत्रकाव्यतिरिक्त एसटीकडून जादा बस सोडण्यात येणार आहेत. या बसही पर्यायी मार्गावरून गेल्यावर प्रवाशांना अधिक भाडे द्यावे लागेल. ज्यादा बस सोडण्याची व्यवस्था मुंबई सेंट्रल, परेल, कुर्ला नेहरूनगर, ठाणे (खोपट) आणि बोरीवली बस स्थानकातून करण्यात आली आहे.1महामार्ग क्रमांक ६६ हा जुना एनएच-१७ म्हणून ओळखला जातो. हा मार्ग मुंबई-पनवेल-पेण- माणगाव-महाड आणि पुढे जातो. मात्र या मार्गाचा वापर न करण्यावरच विचार केला जात आहे.2गणेशोत्सवात कोकणात जाताना सध्याचा महामार्ग क्रमांक ६६ चा वापर केल्यास रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंतचा प्रवास हा १८ ते २0 तासांपर्यंतचा होऊ शकतो. त्यामुळे हा प्रवास टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केला जात आहे.एसटी बसना टोलमधून सूट द्या : गणेशोत्सव काळात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने जाणाऱ्या एसटी बसना राष्ट्रीय व राज्य मार्गावरील टोलमधून सूट मिळावी, अशी मागणी दिवाकर रावते यांनी महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
=====================================
मिहानमधील देखभाल प्रकल्पासाठी एअर इंडियाचा स्पाईस जेटशी करार
- नागपूर : येथील मिहानमधील सेझ प्रकल्पातील विमानांसाठी उभारण्यात आलेल्या मेन्टेनन्स रिपेअर ओव्हरहॉल (एमआरओ) सुविधेचा वापर करण्यासाठी एअर इंडियाने खाजगी विमान वाहतूक कंपनी स्पाईसजेटसोबत करार केला आहे. ही सुविधा एअर इंडियाची आहे.एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे सीईओ एच. आर. जगन्नाथ आणि स्पाईसजेटचे उपाध्यक्ष अरुण कश्यप यांनी यासंबंधीच्या करारावर काल स्वाक्षऱ्या केल्या. एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. कश्यप यांनी सांगितले की, या करारानुसार, स्पाईसजेट आपल्या ताफ्यातील विमाने देखभाल आणि दुरुस्तीसाठी तात्काळ एमआरओ सुविधेत पाठविणार आहे. स्पाईसजेटच्या ताफ्यात ४२ विमाने आहेत. याशिवाय आणखी १00 विमाने खरेदी करण्याची तयारी कंपनीने चालविली आहे. स्पाईसजेटची विमाने आगामी २ महिन्यांच्या आत या सुविधेवर येतील. सध्या स्पाईसजेटची विमाने सध्या हैदराबादेतील जीएमआर सुविधेत जातात.
=====================================
अभियांत्रिकी विद्यार्थिनीची आत्महत्या
- मुंबई : पवई येथे गुरुवारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. सुरभि गुप्ता (२५) असे तिचे नाव आहे. अभ्यासाच्या तणातून तिने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.मूळची चेन्नई येथील रहिवासी असलेली सुरभि ही नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत होती. ती आयसीएम बॅचमध्ये होती. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ती आपल्या रूममेटसह परीक्षेला निघाली. काही तरी विसरले असल्याचे सांगून ती पुन्हा रूमकडे आली. त्यानंतर सातव्या मजल्यावरून उडी घेत तिने आत्महत्या केली. ही बाब अन्य विद्यार्थ्यांना समजताच खळबळ उडाली. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण उघड झाले नसले तरी तिने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
=====================================
हिरानंदानीच्या अन्य रुग्णालयांचीही चौकशी
- मुंबई : हिरानंदानी किडनी रॅकेटप्रकरणात पॅथॉलॉजिस्ट सुविन शेट्टी आणि जनरल सर्जन वीना सेवलीकर यांचा सहभाग असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच हिरानंदानी ग्रुपच्या विविध ठिकाणी असलेल्या रुग्णालयांतील कागदपत्रांची पडताळणी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.हिरानंदानी किडनी रॅकेटच्या राज्यभर पसरलेल्या जाळ्याचा शोध घेण्यास पवई पोलिसांनी सुरुवात केली आहे. याप्रकरणात हिरानंदानी रुग्णालयाच्या सीओईसह ५ डॉक्टरांना अटक होताच त्यांच्याकडे पोलिसांंनी कसून चौकशी सुरू केली आहे. तसेच हिरानंदानी रुग्णालयाशी संलग्न असलेल्या अन्य रुग्णालयांतील कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.याप्रकरणात पाहिजे असलेल्या आरोपींमध्ये पॅथॉलॉजिस्ट सुविन शेट्टी आणि जनरल सर्जन वीना सेवलीकर यांचा समावेश उघड झाला आहे. या दोघांचा पोलीस शोध घेत आहे. त्यांचा जबाब नोंदवून त्यांना या गुन्ह्यांत अटक करण्यात येणार असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.
=====================================
चुकीच्या निकषांमुळे मुलाखती रोखल्या
- मुंबई : राज्याच्या आरोग्य सेवा संचालकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे ‘शॉर्ट लिस्टिंग’ करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने चुकीचे आणि अन्याय्य निकष लावल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) या पदासाठी होऊ घातलेल्या मुलाखती ऐनवेळी रोखल्या आहेत.आयोगाने या पदासाठी १९ फेब्रुवारी रोजी जाहिरात देऊन इच्छुकांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते. त्यानुसार एकूण ४५ जणांचे अर्ज आले. त्यापैकी दोघांना प्रथमदर्शनी अपात्र ठरविले गेले. बाकीच्या ४३ अर्जदारांचे ‘शॉर्ट लिस्टिंग’ करण्यासाठी दोन निकष ठरविले गेले. त्यानुसार ३३ उमेदवारांना अपात्र ठरविले गेले. पात्र ठरलेल्या १० उमेदवारांच्या ८ आॅगस्ट रोजी मुलाखती घेण्यात यायच्या होत्या. मात्र त्याआधीच हे ‘शॉर्ट लिस्टिंग’ व मुलाखतींना आव्हान देणाऱ्या याचिका केल्या गेल्याने पुढील आदेश होईपर्यंत मुलाखती घेऊ नका, असा आदेश ‘मॅट’चे उपाध्यक्ष व न्यायिक सदस्य आर. बी. मलिक यांच्या पीठाने दिला.सध्याचे प्रभारी काम पाहात असलेले डॉ. मोहन आप्पाराव जाधव, डॉ. रत्ना डी. रावखंडे (डॉ. रत्नछाया पांडुरंग शिवदास) व सिव्हिल सर्जन कॅडर ग्रुप ए (डॉक्टर्स) असोसिएशन यांच्यातर्फे त्यांचे अध्यक्ष डॉ. एकनाथ धोंडिबा माले यांनी याचिका केल्या आहेत. लगेच अंतिम सुनावणी घेण्याचे ‘मॅट’ने ठरविले असून १८ आॅगस्ट रोजी युक्तिवाद होईल.
=====================================
मुख्य न्यायाधीशपदी मंजुळा चेल्लूर यांची नियुक्ती
- मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. जे. वाघेला बुधवारी सेवानिवृत्त झाल्यावर गुरुवारी तातडीने या पदावर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर यांची नियुक्ती करण्यात आली. न्या. चेल्लुर २४ आॅगस्टपासून पदभार स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. मुंबई हायकोर्टाच्या १५० वर्षांच्या इतिहासातील त्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश असणार आहेत.विधी व न्याय मंत्रालयाने १० आॅगस्ट रोजी अधिसूचना काढून कोलकता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर यांची बदली मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आल्याचे जाहीर केले.न्या. चेल्लुर या मुंबई उच्च न्यायालयाच्या ४१ व्या मुख्य न्यायाधीश असतील. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश असतील. त्यांच्यापूर्वी १९९४ मध्ये निवृत्त न्या. सुजाता मनोहर यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविले होते. तब्बल २२ वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाला दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश होण्याचा मान चेल्लुर यांना मिळाला आहे. २२ आॅगस्ट रोजी त्यांच्या शपविधी व्हावा, यासाठी उच्च न्यायालयाकडून राज्यपालांना पत्र लिहिण्यात आले आहे.न्या. चेल्लुर यांचा जन्म १९५५ मध्ये कर्नाटकमधील बेल्लरी गावात झाला. त्यांनी १९७७ मध्ये कायद्यात पदवी घेतली. १९८८ मध्ये त्यांनी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी १० वर्षे वकिली केली. २००० मध्ये त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले. तेथून २०१४ मध्ये त्यांची बदली कोलकाता उच्च न्यायालयात करण्यात आली. बेल्लरीमधील त्या पहिल्या महिला वकील आणि परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या पहिल्याच महिला ठरल्या.
=====================================
मायकल फेल्प्सचा भीमपराक्रम, जिंकल 22वं सुवर्णपदक
- ऑनलाइन लोकमत -रिओ दी जानेरो, दि. 12 - ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट अॅथलिट अमेरिकेच्या मायकल फेल्प्सला हरवणं कठीणच नाही तर अशक्य झालं आहे. एकीकडे भारत एका पदकाची आशा करत असताना मायकल फ्लेप्स मात्रने वैयक्तिक चार सुवर्णपदकांची कमाई केली आहे. 200 मी. वैयक्तिक मेडली प्रकारात बाजी मारत मायकल फेल्प्सने अजून एक सुवर्णपदक जिंकलं आहे. फेल्प्सच्या कारकीर्दीतलं 22वं सुवर्णपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे.मायकल फ्लेप्सने सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये 200 मी. वैयक्तिक मेडली प्रकारात बाजी मारली आहे. एकाच खेळात सलग चौथ्यांदा जिंकण्याचा विक्रम करणारा मायकल फ्लेप्स तिसरा खेळाडू ठरला आहे.मायकल फेल्प्सने खेळाच्या या महाकुंभात आतापर्यंत एकूण 26 पदके आपल्या नावे केली आहेत. या पदकांत 22 गोल्डसह दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. 22 सुवर्णपदकांसह 26 पदकांची कमाई करणारा फेल्प्स हा जगातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. फेल्प्स हा पाचव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला आहे.
बिजींग ऑलिम्पिकमध्ये फेल्पसने एकूण आठ सुवर्णपदके मिळवली. लंडन ऑलिंम्पिकमध्ये चार सुवर्ण, दोन रौप्यपदके जिंकली. २००४ सालच्या ग्रीसमधील अथेन्स ऑलिम्पिकमध्ये एकूण आठ पदके मिळवली. त्यात सहा सुवर्णपदकांचा समावेश आहे.
=====================================
सोन्याची मागणी घटली; संप, कठोर नियमांचा फटका
- मुंबई : या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी १८ टक्क्यांनी घटून १३१ टनांवर आली. त्यामुळे जागतिक सुवर्ण परिषदेने यंदाच्या सोन्याच्या मागणीचा अंदाज १२ टक्क्यांनी घटवून ७५0 ते ८५0 टन केला आहे. जागतिक बाजारात मात्र यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी १५ टक्क्यांनी वाढून १,0५0 टनांवर गेली.किमतीतील मोठी वाढ आणि सरकारने कठोर केलेले नियम आणि सराफा व्यापाऱ्यांचा संप यामुळे मागणीत घट झाल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत सोन्याची मागणी १५९.८ टन होती.किमतीचा विचार करता यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी ८.७ टक्क्यांनी घटून ३५,५00 कोटी रुपयांवर आली. गेल्या वर्षी ती ३८,८९0 कोटी रुपये होती.जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील व्यवस्थापक पीआर सोमसुंदरम यांनी सांगितले की, २0१६ च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी १८ टक्क्यांनी घटून १३१ टन झाली. तसेच पहिल्या सहामाहीत ती३0 टक्क्यांनी घटून २४७.४
=====================================
कांद्याला मिळावा १२ रुपये भाव!
- कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ५०-५० टक्के खरेदी करण्याचे ठरविले असले तरी किलोमागे किमान १२ रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा आहे. किमान एवढा भाव मिळाला तरच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राला तसा प्रस्ताव पाठविणे अपेक्षित आहे.आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये भाव भडकण्याच्या शक्यतेने पावसाळ््यापूर्वी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेडने ८५० रुपये क्विंटलने शेतकऱ्यांकडून तब्बल सात हजार मेट्रीक टन कांद्याची खरेदी केली होती. तो माल लासलगाव व पिंपळगावच्या गोदामात काळजीपूर्वक साठवण्यात आला आहे. सर्व खर्च गृहित धरुन या मालाचे १० दिवसांपूर्वी नाफेडने काढलेले मूल्य १,५०० रुपये आहे. नाफेडचे दर प्रमाण मानून शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेल्या कांद्यावरीलसर्व खर्च लक्षात घेता त्यांनाही क्विंटलमागे आता किमान १,२५० रुपये भाव मिळणे अपेक्षित आहे,तरच त्याचा खर्च निघू शकेल,असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
No comments:
Post a Comment