*[अंतरराष्ट्रीय]*
१- रिओ ऑलिम्पिकचा दिमाखदार निरोप सोहळा; आता 2020 टोकियो
२- नऊ वर्षांच्या भारतीय मुलीची न्यूयॉर्कमध्ये हत्या
३- आत्महत्त्या करायला निघालेल्या फेल्प्सने जिंकली ऑलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
४- करदात्यांची ‘हंडी’ ३0 सप्टेंबरला !
५- वाढत्या महागाईने रोखले बाजाराचे निर्देशांक
६- जीएसटीमुळे महागाई दर नियंत्रणात
७- केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्यानमारसाठी रवाना
८- भागवतांचे मत मोदींना नसेल मान्य- शिवसेना
९- शारीरिक संबंधांची मागणी भ्रष्टाचाराच्या कक्षेत
१०- ऑलिंपिकचे दडपण पेलण्यात अपयश : ललिता
११- केंद्राच्या तूरडाळीकडे महाराष्ट्राची पाठ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१२- मुंबईजवळ समुद्रात 2 बोटी बुडाल्या
१३- होलोग्रामचे कंत्राट रद्द नव्हे, दुरुस्तीसाठी थांबवले!
१४- भगवान सहाय यांची कृषी खात्यातील फेरनियुक्ती रद्द
१५- कृषीतील पीएच.डी.साठीही सीईटी
१६- पर्यायी मार्गांमुळे एसटी ‘खड्ड्या’त
१७- मोनोचे काम युद्धपातळीवर
१८- सणासुदीच्या काळात महागाईची फोडणी
१९- अकरावीच्या २५% जागा रिक्त
२०- भगवान सहाय यांची कृषी खात्यातील फेरनियुक्ती रद्द
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
२१- दिल्ली; सिनेमा दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार
२२- तेलंगणामध्ये बस कालव्यात कोसळली, 9 जणांचा मृत्यू
२३- मुंबईत खड्ड्यांचा यंदा नवा विक्रम
२४- बीड - गेवराई तालुका गुढ आवाजाने हादरला
२५- कोलकाता; स्कूल बस अपघातात 18 विद्यार्थी जखमी
२६- जिल्हाधिकाऱ्यांनी फुलविली बंगल्यात शेती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२७- रौप्यपदक विजेता पी व्ही सिंधूचं जंगी स्वागत
२८- पहिल्याच लढतीत योगेश्वरचा पराभव
२९- गोपी २५ तर खेताराम २६ व्या क्रमांकावर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही
नंबर Add करा *
====================================
१- रिओ ऑलिम्पिकचा दिमाखदार निरोप सोहळा; आता 2020 टोकियो
२- नऊ वर्षांच्या भारतीय मुलीची न्यूयॉर्कमध्ये हत्या
३- आत्महत्त्या करायला निघालेल्या फेल्प्सने जिंकली ऑलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
४- करदात्यांची ‘हंडी’ ३0 सप्टेंबरला !
५- वाढत्या महागाईने रोखले बाजाराचे निर्देशांक
६- जीएसटीमुळे महागाई दर नियंत्रणात
७- केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्यानमारसाठी रवाना
८- भागवतांचे मत मोदींना नसेल मान्य- शिवसेना
९- शारीरिक संबंधांची मागणी भ्रष्टाचाराच्या कक्षेत
१०- ऑलिंपिकचे दडपण पेलण्यात अपयश : ललिता
११- केंद्राच्या तूरडाळीकडे महाराष्ट्राची पाठ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१२- मुंबईजवळ समुद्रात 2 बोटी बुडाल्या
१३- होलोग्रामचे कंत्राट रद्द नव्हे, दुरुस्तीसाठी थांबवले!
१४- भगवान सहाय यांची कृषी खात्यातील फेरनियुक्ती रद्द
१५- कृषीतील पीएच.डी.साठीही सीईटी
१६- पर्यायी मार्गांमुळे एसटी ‘खड्ड्या’त
१७- मोनोचे काम युद्धपातळीवर
१८- सणासुदीच्या काळात महागाईची फोडणी
१९- अकरावीच्या २५% जागा रिक्त
२०- भगवान सहाय यांची कृषी खात्यातील फेरनियुक्ती रद्द
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
२१- दिल्ली; सिनेमा दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार
२२- तेलंगणामध्ये बस कालव्यात कोसळली, 9 जणांचा मृत्यू
२३- मुंबईत खड्ड्यांचा यंदा नवा विक्रम
२४- बीड - गेवराई तालुका गुढ आवाजाने हादरला
२५- कोलकाता; स्कूल बस अपघातात 18 विद्यार्थी जखमी
२६- जिल्हाधिकाऱ्यांनी फुलविली बंगल्यात शेती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२७- रौप्यपदक विजेता पी व्ही सिंधूचं जंगी स्वागत
२८- पहिल्याच लढतीत योगेश्वरचा पराभव
२९- गोपी २५ तर खेताराम २६ व्या क्रमांकावर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही
नंबर Add करा *
====================================
रौप्यपदक विजेता पी व्ही सिंधूचं जंगी स्वागत
- - ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 22 - रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून भारताला अभिमानाचा क्षण मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचं भारतात आगमन झालं आहे. हैदराबाद विमानतळावर पी व्ही सिंधूचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. भारताला पदक मिळवून देणा-या या आपल्या 'सुवर्ण'कन्येचं स्वागत करण्यासाठी सकाळपासूनच विमानतळाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. स्वागतानंतर पी व्ही सिंधू आणि प्रशिक्षक गोपीचंद यांची विजयी मिरवणूकदेखील काढण्यात आली. विजयी मिरवणूक झाल्यानंतर गछिबोबली स्टेडिअममध्ये सन्मान सोहळा पार पडणार असून तेलंगणा सरकार हा सन्मान करणार आहे.
====================================
'सैराट' सिनेमा दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार
- नवी दिल्ली, दि. 22 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवला असून गुन्हा दाखल केला आहे. ‘सैराट’ चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने आपल्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.पीडित तरुणी जेएनयूमध्ये पीएचडीच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. 'आपल्याला सैराट चित्रपट पाहायचा होता, त्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटवर आपण अनेकांकडे या चित्रपटाबद्दल चौकशी केली होती. आरोपी तरुणाने आपल्याकडे हा चित्रपट आहे, हवा असेल तर हॉस्टेल रुमवर येऊन घेऊन जा असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याने मेसेज करुन पेन ड्राईव्हमधून चित्रपटाची कॉपी घेऊन जाण्यास सांगितलं. त्याच्यासोबत हॉस्टेल रुममध्ये गेल्यावर त्याने पेयातून गुंगीच औषध देऊन बलात्कार केला', अशी माहिती तरुणीने पोलिसांना दिली आहे.पोलिसांनी आरोपी अनमोलवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अनमोल हा ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनचा कार्यकर्ता आहे. मात्र बलात्काराच्या आरोपांनंतर त्याला असोसिएशनमधून काढून टाकण्यात आलं आहे.
====================================
रिओ ऑलिम्पिकचा दिमाखदार निरोप सोहळा
- रिओ दी जानेरो, दि. 22 - ३१व्या ऑलिम्पिक महाकुंभाचा निरोप सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. 16 दिवस चाललेल्या या स्पर्धेची सुरुवात ज्या दिमाखाने करण्यात आली होती त्याच थाटात निरोप सोहळाही पार पाडला गेला. 2020 ऑलम्पिकसाठी टोकियोकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. माराकाना स्टेडियमवर निरोप सोहळा पार पडला. यावेळी उद्घाटनावेळी दाखवण्यात आल्याप्रमाणे पुन्हा एकदा ब्राझिलच्या संस्कृतीची ओळख करुन देणारे परफॉर्मन्स दाखवण्यात आले. भव्यदिव्य निरोप सोहळा पार पडल्यानंतर आठवणी आपल्या सोबत ठेवून सर्व खेळाडूंनी ऑलिम्पिकला निरोप दिला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ‘बाय बाय रिओ’ म्हणत रिओ ऑलिम्पिक संपल्याची घोषणा केली.
====================================
मुंबईजवळ समुद्रात 2 बोटी बुडाल्या
- मुंबई, दि. 22 - समुद्रात दोन मच्छिमार बोटी बुडाल्याची घटना घडली आहे. उत्तरेला 70 नॉटिकल मैल अंतरावर उंबरगावजवळ या बोटी बुडाल्या असून बोटींमधील 15 मच्छिमारांना वाचवण्यात यश मिळालं आहे. रविवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. हिमसागर आणि कृष्ण सागर अशी या बोटींची नावे आहेत. बोटी बुडाल्याची माहिती मिळताच तटरक्षक दलाने बचावकार्यासाठी जहाज पाठवले होते. पण तोपर्यंत स्थानिक मच्छिमारांनी धाडसाने सर्वांची सुटका केली होती.
====================================
तेलंगणामध्ये बस कालव्यात कोसळली, 9 जणांचा मृत्यू
- हैद्राबाद, दि. 22 - तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात खासगी बस पुलावरुन कालव्यात कोसळून अपघात झाला आहे. सोमवारी पहाटे हा अपघात झाला. अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस हैद्राबादहून खम्मम जिल्ह्याकडे चालली असताना हा अपघात झाला. खम्माम जिल्ह्यामधीलच नागार्जूनसागर कालव्यात बस कोसळली आहे.बसमध्ये एकूण 31 प्रवासी प्रवास करत आहे. खम्मम जिल्ह्यातील काकिनाडा येथे बस चालली असताना नागार्जूनसागर कालव्याजवळ पोहोचल्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बसचा अपघात झाला. अपघातानंतर पोलीस आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बस कालव्यात कोसळल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. नऊ जणांचा मृत्यू झाला हा आकडा अजून वाढण्याची भीती आहे.
====================================
होलोग्रामचे कंत्राट रद्द नव्हे, दुरुस्तीसाठी थांबवले!
- जळगाव : बनावट मद्यविक्री रोखण्यास राज्य शासनातर्फे बाटलीवर होलोग्राम वापराचे कंत्राट मुख्यमंत्र्यांनी रद्द केले नसून ते तांत्रिक दुरुस्ती आणि त्याची जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे दिली.ते म्हणाले, बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री असताना बाटलीवर होलोग्राम लावण्याचा निर्णय घेतला होता. परवानाधारक मद्यप्राशन करणाऱ्या इसमाला होलोग्रामद्वारे बनावट मद्य ओळखण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान मोफत देणार होते. यातून मद्याचा काळाबाजार थांबून शासनाच्या तिजोरीत वार्षिक पाच हजार कोटींच्या उत्पन्नाची भर पडणार आहे. होलोग्राम तयार करणारा ठेकेदार व मद्य उत्पादन करणारी कंपनी यांच्यात हा व्यवहार होणार आहे. त्याबदल्यात येणारा खर्च हा संबंधित ठेकेदाराने मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनी मालकाकडून घ्यायचा आहे. मात्र हे तंत्रज्ञान वापराचे जे निकष आहे त्याचे कंत्राट शासनातर्फे काढण्यात आले आहे. या प्रक्रियेत शासनाला एक रुपया द्यायचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
====================================
भगवान सहाय यांची कृषी खात्यातील फेरनियुक्ती रद्द
- मुंबई : असंवेदनशील वर्तनामुळे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या टीकेचे लक्ष्य बनलेले वादग्रस्त सनदी अधिकारी भगवान सहाय यांना अखेर कृषी खात्यातून हद्दपार करण्यात आले आहे. रविवारी सरकारने सहाय यांच्या फेरनियुक्तीचा आदेश मागे घेतला.कृषी खात्यात अप्पर मुख्य सचिव पदावर असताना, भगवान सहाय यांच्यावर असंवेदनशील वर्तनाचा आरोप झाला. कारवार्ईची मागणी करत मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. सहाय यांना १२ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय झाला, परंतु २४ तासही होत नाहीत, तोवर नवा आदेश काढण्यात आला. सुट्टीवरून परतल्यावर सहाय यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त केले जाईल, असा लेखी आदेशच शनिवारी सरकारने काढला होता. सहाय यांना पुन्हा त्याच पदावर नेमल्यास आंदोलनाचा इशाराही कर्मचारी संघटनांनी दिला होता. याची दखल घेत, रविवारी शासनाकडून सुधारित आदेश जारी करण्यात आला आणि कृषी विभागातील फेरनियुक्तीबाबतचा भाग वगळण्यात आला आहे.मात्र, नव्या आदेशात भगवान सहाय सुट्टीनंतर नक्की कोणत्या पदावर रूजू होतील, याचा उल्लेख नाही. कृषी विभागाचे सहसचिव राजेंद्र घाडगे यांच्या मुलाने आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यामुळे घाडगे यांनी घरी जाण्याची परवानगी मागितली होती. सहाय यांनी ती नाकारली होती. त्यानंतर घाडगे यांच्या मुलाने आत्महत्या केली. मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी संबंधित अधिकारी मूळ गावी गेले असता, त्यांच्याकडे रजेच्या अर्जाबद्दल सहाय यांनी जाब विचारला. त्यांच्या या असंवेदनशील वर्तनावर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत नाराजी पसरली आहे.
====================================
मुंबईत खड्ड्यांचा यंदा नवा विक्रम
- मुंबई- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईच्या रस्त्यावर कमी खड्डे असल्याचा दावा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या महापालिका प्रशासनाचे पितळ अखेर उघडे पडले आहे़ पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही शहर व उपनगरातील खड्ड्यांची संख्या ३७०० वर पोहोचली आहे़ सर्वाधिक खड्डे पश्चिम उपनगरांमध्ये असल्याचे दिसून येत आहे़दरवर्षी प्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई खड्ड्यांतच गेली. त्यात एप्रिल महिन्यात उघड झालेल्या घोटाळ्याने रस्त्यांच्या कामांचे बिंग फोडले. तरीही गेल्यावर्षी यापेक्षा अधिक खड्डे होते, असा दावा करीत आपली अब्रू वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न पालिका प्रशासनामार्फत सुरू होता़ मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील खड्ड्यांनी गतवर्षीचा विक्रम मोडला आहे़२०१५ मध्ये या काळात मुंबईच्या रस्त्यांवर तीन हजार ४९१ खड्डे पडले होते़ यंदा तीन हजार ६३८ खड्डे मुंबईच्या रस्त्यांवर पडले आहेत़ यापैकी आता केवळ १५९ खड्डे भरणे शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला आहे़ मात्र या आकडेवारीवरून खड्डे बुजविण्याच्या कामाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे़>उपनगरे खड्ड्यांतवांद्रे ते दहिसरपर्यंत असलेल्या पश्चिम उपनगरातील रस्ते सर्वाधिक खड्ड्यांत असल्याचे दिसून आले आहे़ अंधेरीत ४१५, मालाड-मालवणी ३८९ तर बोरीवलीत ५५१ खड्ड्यांची नोंद झाली आहे़
====================================
कृषीतील पीएच.डी.साठीही सीईटी
- मुंबई- राज्यभरातील विविध कारागृहांत क्षमतेच्या तब्बल सव्वापट कैद्यांना ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव गृहविभागाकडे सादर करण्यात आलेल्या एका अहवालात स्पष्ट झाले आहे. सिद्धदोष बंदी व कच्च्या कैद्यांनी (अंडर ट्रायल) मध्यवर्ती, जिल्हा व उपजिल्हा तुरुंग अक्षरश: तुडुंब भरून गेले आहेत. त्याचा ताण कारागृहातील सुरक्षा अधिकारी व रक्षकांवर पडत आहे. त्यामुळे तुरुंगांतील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे.गेल्या दोन महिन्यांत आॅर्थर रोड जेलसह राज्यातील विविध कारागृहे व सबजेलमध्ये कैद्यांत हाणामारी व आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गृहविभागाकडून कारागृहाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने माहिती घेतली असता, त्या ठिकाणी क्षमतेपेक्षा अतिरिक्त कैदी असल्याची बाब समोर आली. त्याचा परिणाम तेथील सुरक्षेवर होत असल्याचे गृहविभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यात सर्व प्रकारची एकूण ५४ कारागृहे असून, त्या ठिकाणी कैदी ठेवण्याची अधिकृत क्षमता २३ हजार ९४२ इतकी आहे. प्रत्यक्षात मात्र सध्या या ठिकाणी ३०,२३० कैद्यांचा समावेश आहे. टक्केवारीत त्याचे प्रमाण तब्बल १२६ टक्के असून, त्यामध्ये न्यायालयीन बंदी ७३ टक्के आहेत. म्हणजेच ही संख्या सर्वाधिक २२ हजार ६१ एवढी आहे.
====================================
No comments:
Post a Comment