*[अंतरराष्ट्रीय]*
१- अमेरिकन कंपनी भारतात 'F-16' लढाऊ विमानं बनवणार
२- राजनाथ सिंहंचा सार्क परिषदेतून काढता पाय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
३- बेजबाबदार प्रकाश मेहतांची उद्धट उत्तरं, पत्रकाराला धमकी
४- नीता अंबानींच्या खांद्यावर अजून एक जबाबदारी
५- 'हो... माझा संयम सुटला,' अखेर प्रकाश मेहतांकडून माफीनामा
६- मंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्या, नाहीतर हकालपट्टी करा: काँग्रेस
७- सोनियांच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृतीत सुधारणा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
८- महाड दुर्घटना: आतापर्यंत 20 मृतदेह सापडले
९- महाड दुर्घटना : आतापर्यंत सापडलेले मृतदेह आणि त्यांची नावं
१०- पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
११- सरकारनं प्रकाश मेहतांवर कारवाई करावी: धनंजय मुंडे
१२- एसटी चालक कांबळेंचा मृतदेह हाती, मुलगा अद्यापही बेपत्ता
१३- महाराष्ट्र सरकार कर्मदरिद्री, धनराज पिल्लेची टीका
१४- म्हणून राजकारण सोडायची इच्छा होते, पंकजा मुंडेंची उद्विग्नता
१५- भाजपमधूनच मुख्यमंत्र्यांना अस्थिर करण्याचे कारस्थान - उद्धव ठाकरे
१६- शिवरायांचा महाराष्ट्र अखंड राहील- शिवसेना
१७- गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नितीन पटेलांचे नाव निश्चित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१८- मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, रस्ते, रेल्वे वाहतूक उशीराने
१९- महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता बंद, रस्ता दरीत कोसळला
२०- उत्तर प्रदेश; छेडछाड करणाऱ्या तरुणाला महिलेने भर रस्त्यात लाथा-बुक्क्याने तुडवलं!
२१- गिरगावमध्ये तीन मजली इमारत कोसळली
२२- चेन्नई; महिला चालवते स्मशानभूमी
२३- कानपूर; दलित तरुणाचा तुरुंगात मृत्यु; पोलिसांचे निलंबन
२४- महाड: आंबेत येथे तीन मृतदेह सापडले
२५- कुर्ल्यापासून मध्यरेल्वेची वाहतूक बंद
२६- अंधेरीत सखल भागात गुडघाभर पाणी जमा झाले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२७- कोणी घर देता का घर - पेसचा रिओमध्ये सवाल
२८- 'पिपली लाईव्ह'च्या सहदिग्दर्शकाला 7 वर्षांची कैद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
===========================================
पंकजा मुंडेंचं रस्ते घोटाळ्यात नाव आल्यानंतर आज विधानसभेत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न विचारला. जून 2012 मध्ये पंकजा यांच्या सुप्रा मीडिया कंपनीसोबत आरपीएस कंपनीनं भागीदार केलं.

महाड दुर्घटना: आतापर्यंत 20 मृतदेह सापडले
महाड (रायगड) : सावित्री नदीतील शोधमोहीमेच्या तिसऱ्या दिवशी पावसाचा अडथळा निर्माण झाला. मात्र एनडीआरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डने सकाळी नऊच्या सुमारास शोधमोहीमेला सुरुवात केली. तब्बल 59 तासांपासून सावित्रीच्या पात्रात शोधकार्य सुरु आहे.
LIVE UPDATE (11.10 AM) : आतापर्यंत 20 मृतदेह सापडले. आज सकाळपासून सहा मृतदेह हाती लागले आहेत. आंबेत खाडीजवळ 3 तर, दादली पूल, केंबुर्ली आणि वावे गावजवळ प्रत्येकी एक मृतदेह सापडला.
LIVE UPDATE (9.43 AM) : आंबेत खाडीजवळ आणखी तीन मृतदेह आढळल्याची पोलिसांची माहिती, मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. एकूण 17 मृतदेह सापडले.
LIVE UPDATE (9.35 AM) : पावसाचा जोर कमी झाल्यानं तिसऱ्या दिवशीच्या शोधकार्याला सुरुवात, भारतीय नौदलाच्या टीम सावित्रीच्या प्रवाहात उतरल्या
LIVE UPDATE (9.00 AM) : शोधमोहीमेला पुन्हा सुरुवात, एनडीआरएफचं पथक अंतर वाढवून अरबी समुद्रापर्यंत बेपत्ता लोकांचा शोध घेणार
===========================================
महाड दुर्घटना : आतापर्यंत सापडलेले मृतदेह आणि त्यांची नावं
महाड (रायगड) : रात्रीच्या काळ्यामिट्ट अंधारात सावित्री नदीच्या पोटात गडप झालेल्यांचा शोध आज सलग तिसऱ्या दिवशी सुरु आहे. मात्र रात्रीपासूनच्या धुँवाधार पावसाने शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. कालपर्यंत 14 मृतदेह हाती लागले आहे. यात 11 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.
मात्र एकूण 42 जण बेपत्ता असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे बेपत्ता लोकांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. त्याचसोबत नदीत बुडालेल्या 2 एसटी बस आणि तवेरा गाडीचेही अवशेष अजून मिळालेले नाहीत. लोहचुंबकाच्या मदतीनं लोखंडी वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाड दुर्घटनेतील मृतांची नावं
| महाड दुर्घटनेतील दुर्दैवी बळी | कुठे सापडला मृतदेह? | किती अंतरावर? |
| श्रीकांत कांबळे | आंजर्ले | 130 किमी |
| शेवंती मिरगल | हरिहरेश्वर | 80 किमी |
| रंजना वाजे | केंबुर्ली | 80 किमी |
| पांडुरंग घाग | केंबुर्ली | 80 किमी |
| आवेद चौगुले | दादलीपूल | 3 किमी |
| प्रशांत माने | म्हसळा | 40 किमी |
| स्नेहा बैकर | विसावा कॉर्नर | 2.5 किमी |
| प्रभाकर शिर्के | केंबुर्ली | 8 किमी |
| रमेश कदम | वराठी | 10 किमी |
| मंगेश काटकर | आंबेत म्हाप्रळ | 25 किमी |
| सुनील बैकर | आंबेत म्हाप्रळ | 25 किमी |
| अनिश बलेकर | आंबेत म्हाप्रळ | 25 किमी |
| जयेश बने | आंबेत म्हाप्रळ | 25 किमी |
| बाळकृष्ण उरक | केंबुर्ली | 8 किमी |
===========================================
मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, रस्ते, रेल्वे वाहतूक उशीराने
मुंबई : काल थोडीशी उसंत घेणाऱ्या पावसाने आज मुंबईत पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबईतील दादर, परळ आणि वरळीमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, तर बोरिवली, कांदिवली, अंधेरी, वांद्र्यासह ठाणे कल्याण-डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.
पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे वाहतूककोंडीच्या समस्येनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यातच रस्त्यांवर खड्ड्यांची भर आहे. त्यामुळे मुलुंड टोलनाका ते कांजूर, मुलुंड ते घाटकोपर, एलबीएस रोड, जेव्हीएलआर रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकवर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
===========================================
महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता बंद, रस्ता दरीत कोसळला
सातारा : महाबळेश्वर-पोलादपूर घाटातील रस्ता दरीत कोसळल्यानं महाबळेश्वर-पोलादपूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या घाटातील रस्त्यांना भल्या मोठ्या भेगाही पडलेल्या आहेत.
संततधार पावसामुळे महाबळेश्वर-पोलादपूर घाटाची दुरवस्था झाली असून, प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे याकडे लक्ष नाही. या घाटातील रस्ता खचून एक हजार फूट खोल दरीत कोसळल्यानं मोठ्या वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आलेला आहे.
महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागानेही खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरून जाणारी एसटी वाहतूकही बंद केली आहे.
===========================================
बेजबाबदार प्रकाश मेहतांची उद्धट उत्तरं, पत्रकाराला धमकी
महाड: महाड पूल दुर्घटनेप्रकरणी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारलाच गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी धमकावल्याची घटना समोर आली आहे. दुर्घटनेची पाहणी करताना सेल्फी घेण्यात दंग असलेल्या प्रकाश मेहतांनी चक्क साम टीव्हीच्या पत्रकाराला दमदाटी सुरु केली.
काय आहे प्रकरण:
‘मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून कुठलीही माहिती मिळत नाही. लांबून आलेल्या नातेवाईकांची कुठलीही सोय महाडमध्ये का केली नाही?’ असे प्रश्न विचारताच प्रकाश मेहता यांचा पारा चांगलाच चढला. ‘याबाबत माझा पक्ष काय ते बघून घेईल. असं म्हणत त्यांनी पत्रकारालाच दमदाटी सुरु केली.
इतकंच नव्हे तर, त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी दमबाजी करत हे चित्रीकरण थांबवण्यासाठी सामचे पत्रकार मिलींद तांबे यांना धमकावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं एकीकडे लोकांचे जीव गेल्यानंतरही सरकारचा उद्दामपणा आणि धमकावणं सुरुच असल्याचं दिसतं आहे.
===========================================
अमेरिकन कंपनी भारतात 'F-16' लढाऊ विमानं बनवणार
नवी दिल्ली : अमेरिकेत F-16 लढाऊ विमानं बनवणारी आतरराष्ट्रीय कंपनी लॉकहीड मार्टिन कंपनीने भारतात आपले उत्पादन बनवण्यासाठी तयारी दाखवली आहे. याप्रकरणी कंपनीने भारत सरकारशी चर्चा सुरू केली आहे.
दिल्लीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काल मीडियाशी बोलताना सांगितलं की F-16 या लढाऊ विमानांचं उत्पादन कंपनी अमेरिकेतून पूर्ण बंद करणार असून भारतातून निर्यात करणार असल्याचं सांगितलं. कंपनी हा प्रकल्प मेक इन इंडिया अंतर्गत भारतात आणण्याच्या तयारीत आहे.
F-16 जगातील लढाऊ विमानांपैकी एक आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये या कंपनीचा प्लांट असून अमेरिकन हवाईदलासोबतच 35 देश या विमानाचा वापर करतात. पाकिस्तानी हवाईदलही याच विमानाचा वापर करते.
जर या विमानाच्या उत्पादनाला भारत सरकारने परवानगी दिल्यास टेक्सास प्लांटमध्ये F-35 विमानांचं उत्पादन होणार आहे. F-16 फक्त भारतातच तयार होणार असून याची टॅगलाइन फॉर इंडिया, फ्रॉम इंडिया देण्यात आली आहे.
===========================================
छेडछाड करणाऱ्या तरुणाला महिलेने भर रस्त्यात लाथा-बुक्क्याने तुडवलं!
बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : बुलंदशहरमध्ये एका महिलेने छेडछाड करणाऱ्या युवकाला पकडून लाथा-बुक्क्याने तुडवलं. त्यानंतर पोलिसांच्या हवाली केलं.
बुलंदशहर कोर्ट परिसरात तीन तरुणांनी महिलेची छेडछाड केली. या तिघांमध्ये एकाने चेहऱ्याला फडका बांधला होता. महिलेने छेडछाडीला विरोध केल्यानंतर दोघे पळून गेले. मात्र, एका आरोपीला महिलेने पकडून ठेवले आणि भर रस्त्यात तुफान धुलाई केली.
धक्कादायक म्हणजे, ही घटना घडत असताना आजूबाजूला लोकांची गर्दी होती. मात्र, कुणीही महिलेला मदत करण्यासाठी पुढे सरसावला नाही. महिलेने छेडछाड करणाऱ्यांचा विरोध केल्यानंतर पोलीस पुढे आले आणि त्यानंतर उपस्थित लोकही पुढे आले.
बुलंदशहरात सातत्याने असे प्रकार समोर येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
===========================================
पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. आज शेवटच्या दिवशी हेल्मेट सक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणुकही आज होणार आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे प्रकाश मेहतांच्या पत्रकारासोबतच्या उद्दामपणावरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाबाबत सायंकाळी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतील. तसंच विरोधकांच्या वतीनं देखील पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
वेगळा विदर्भ आणि गेले दोन दिवस महाड दुर्घटा यावरुन पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. किंबहुना, वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरुनच अर्ध्याहून अधिक अधिवेशन खर्च झालं. आज शेवटच्या दिवशीही सरकारला घेरण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे.
===========================================
नीता अंबानींच्या खांद्यावर अजून एक जबाबदारी
रिओ दी जानेरो : रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर निवड झाली आहे. गुरूवारी त्यांची ही निवड झाली असून आयओसीमध्ये सदस्यपदी निवडलेल्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. नुकतीच आयओसीकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर भारताच्या सदस्या म्हणून वयाच्या 70 वर्षांपर्यंत राहणार असून त्यांना जून 2016 मध्ये नामांकन देण्यात आलं होतं.
ऑलिम्पिक खेळ सुरू होण्याआधी एक दिवस नीता अंबानी यांची निवड झाली आहे. रिओ दि जानेरोमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या 129 व्या सत्रातील बैठकीत त्यांना हे सदस्यत्व देण्यात आले.
“आयओसीचे सदस्यत्व मिळाल्यामुळे मी खूप खूश आहे. जागतिक पातळीवर भारतीचं वाढतं महत्त्व आणि भारतीय महिलांचा हा सन्मान आहे.” असं त्यांनी सदस्यपद मिळाल्यावर सांगितलं.
===========================================
'हो... माझा संयम सुटला,' अखेर प्रकाश मेहतांकडून माफीनामा
काय आहे प्रकरण:
‘मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून कुठलीही माहिती मिळत नाही. लांबून आलेल्या नातेवाईकांची कुठलीही सोय महाडमध्ये का केली नाही?’ असे प्रश्न विचारताच प्रकाश मेहता यांचा पारा चांगलाच चढला. ‘याबाबत माझा पक्ष काय ते बघून घेईल. असं म्हणत त्यांनी पत्रकारालाच दमदाटी सुरु केली.
इतकंच नव्हे तर, त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी दमबाजी करत हे चित्रीकरण थांबवण्यासाठी सामचे पत्रकार मिलींद तांबे यांना धमकावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं एकीकडे लोकांचे जीव गेल्यानंतरही सरकारचा उद्दामपणा आणि धमकावणं सुरुच असल्याचं दिसतं आहे.
मुंबई: पत्रकारांना धमकी देणाऱ्या प्रकाश मेहतांनी दिलगिरी व्यक्त करत झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. एबीपी माझाच्या ‘माझा विशेष’ कार्यक्रमात ते बोलत होते.
‘माझ्या वागण्यामुळे जर त्या पत्रकाराला वाईट वाटत असेल तर मी त्या पत्रकाराची माफी मागतो. मी काही एवढा मोठा नाही. पण ती संपूर्ण क्लिप त्यांनी दाखवावी. मी मान्य करतो की, त्यावेळी माझा संयम सुटला आणि म्हणून मी चिडलो.’ असं म्हणत प्रकाश मेहता यांनी घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे..
तर, दुसरीकडे मंत्रिमंडळातून मेहतांची हकालपट्टी करा, नाही तर सभागृह चालवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका काँग्रेसनं घेतली आहे.
===========================================
मंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्या, नाहीतर हकालपट्टी करा: काँग्रेस
मुंबई: ‘पत्रकारांना धमकी देणाऱ्या प्रकाश मेहतांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, नाही तर सभागृह चालवू देणार नाही.’ अशी आक्रमक भूमिका काँग्रेसनं घेतली आहे.
‘मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी.’ अशी भूमिका काँग्रेसनं घेतील आहे. तसंच उद्या विधीमंडळात या प्रश्नी आवाज उठवणार असल्याचंही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं.
महाडमध्ये मृतांच्या नातेवाईकांना प्रशासन कुठलीही माहिती देत नाही. त्यामुळं आधीच आप्तस्वकियांना गमावलेल्या नातेवाईकांचा बांध फुटला आहे. आणि याच विषयावर प्रकाश मेहता यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट साम टिव्हीच्या पत्रकाराला धमकी दिली.
इतकंच नाही तर पत्रकाराला मारझोड करण्यासाठी ते कार्यकर्त्यांना चिथावत होते. ही सगळी दृश्यं कॅमेऱ्यात कैद होत असल्याची जाणीव होताच चित्रीकरण बंद करण्यासाठी मेहतांचे कार्यकर्ते थेट पत्रकाराला धक्काबुक्कीही करत होते.
===========================================
सरकारनं प्रकाश मेहतांवर कारवाई करावी: धनंजय मुंडे
मुंबई: ‘रायगडचे पालक मंत्री प्रकाश महेता यांनी पत्रकाराशी आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी सरकारने निवेदन करावं. महेता यांनी दिलगीरी व्यक्त करावी किंवा सरकारने त्यांच्याविरोधात कारवाई करावी.’ अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली आहे.
तर दुसरीकडे, काँग्रेसनेही प्रकाश मेहतांच्या या उद्दाम वागण्यावर आक्षेप घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्री मेहतांवर सत्तेची नशा दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी. तोवर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही. असंही काँग्रेसनं ठणकावून सांगितलं आहे.
महाड पूल दुर्घटनेप्रकरणी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारलाच प्रकाश मेहता यांनी धमकावल्याची घटना समोर आली आहे. दुर्घटनेची पाहणी करताना सेल्फी घेण्यात दंग असलेल्या प्रकाश मेहतांनी चक्क साम टीव्हीच्या पत्रकाराला दमदाटी सुरु केली.
===========================================
एसटी चालक कांबळेंचा मृतदेह हाती, मुलगा अद्यापही बेपत्ता
महाड (रायगड): मुलाला मुंबईच्या कॉलेजात प्रवेश मिळावा म्हणून एस. एस. काबंळे यांनी डेपो मॅनेजरला विनंती करुन मुंबईची ड्युटी मागून घेतली. त्या रात्री मुलालाही त्यांनी सोबत घेतलं. पण त्या काळरात्रीनं घरातल्या कर्त्या पुरुषालाच हिरवून घेतलं. तर कांबळेंचा मुलगा अद्यापही बेपत्ता आहे.
महाड दुर्घटनेत जयगड-मुंबई एसटीचे चालक एस.एस. कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण धक्कादायक बाब म्हणजे या बसमध्ये कांबळेंसोबत त्यांचा 17 वर्षीय धाकटा मुलगा महेंद्र कांबळे हा देखील होता.
महेंद्र मुंबईतील एका कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी जात होता. त्यासाठी कांबळे यांनी डेपो मॅनेजरकडे विनंती करुन मुंबईची ड्युटी मागितली होती. दापोलीतल्या आंजर्लेजवळ कांबळे यांचा मृतदेह सापडला असून महेंद्र अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे.
===========================================
महाराष्ट्र सरकार कर्मदरिद्री, धनराज पिल्लेची टीका
पुणे: भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्लेला आज क्रीडामहर्षी हरीभाऊ साने पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पिल्लेने महाराष्ट्र सरकार कर्मदरिद्री असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रानी उपेक्षा केल्याने, आपण नरेंद्र मोदींनी गुजरातच्या वडोदरा येथे सुरु केलेल्या अकादमीमध्ये दोन वर्षांपासून नवीन हॉकीपटू घडवत असल्याचं सांगितलं.
धनराजनं महाराष्ट्राच्या जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त केली, पण त्याचवेळी राज्य शासनाकडून झालेल्या उपेक्षेवरही टिप्पणी केली. नव्या पिढीचे हॉकीपटू घडवण्यासाठी धनराजला अॅकॅडमी उभारायची होती. पण महाराष्ट्राऐवजी त्याला गुजरातच्या वडोदराची निवड करावी लागली, याबाबत खंत व्यक्त केली.
धनराजची जडणघडण पुण्यातच झाली होती. पुणेकरांनी आणि महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम आपण कधीही विसरू शकणार नाही, असं धनराजनं म्हटलंय. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीची आठवणही धनराजनं कायम ठेवली आहे.
पुण्यातील सन्मान सोहळ्यादरम्यान धनराजला त्याच्या लग्नाविषयी विचारण्यात आलं. तेव्हा धनराजनं हॉकी हेच आपलं पहिलं प्रेम असल्याचं म्हटलं.
===========================================
गिरगावमध्ये तीन मजली इमारत कोसळली
मुंबई: गिरगावमधील सीपी टँकजवळील वासुदेव इमारतीचा काही भाग कोसळून या खाली काही लोक आडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
गिरगावमधील सीपी टँकजवळील वासुदेव या तीन मजली इमारतीचा काही भाग रात्री ९च्या सुमारास कोसळल्याने इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या इमारतीखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्य़ाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.
===========================================
म्हणून राजकारण सोडायची इच्छा होते, पंकजा मुंडेंची उद्विग्नता
मुंबई : सातत्यानं होणाऱ्या आरोपांमुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उद्विग्न झाल्या आहेत. भ्रष्टाचाराबद्दल बिनबुडाचे होणारे आरोप ऐकून कधी कधी राजकारण सोडायची इच्छा होते, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
पंकजा मुंडेंचं रस्ते घोटाळ्यात नाव आल्यानंतर आज विधानसभेत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न विचारला. जून 2012 मध्ये पंकजा यांच्या सुप्रा मीडिया कंपनीसोबत आरपीएस कंपनीनं भागीदार केलं.
===========================================
राजनाथ सिंहंचा सार्क परिषदेतून काढता पाय
नवी दिल्ली: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आयोजित सार्क संमेलानात सहभागी झालेल्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना आपला दौरा अर्ध्यावरच सोडून परतावे लागले. राजनाथ सिंह यांनी दहशतवादवरून खडे बोल सुनावत पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले. पण पाकिस्तानने आपल्या नापाकी कारवायांचे दर्शन घडवल्याने राजनाथ सिंहांनी परिषदेतून काढता पाय घेतला.
राजनाथ सिंह आता संसदेमध्ये पाकिस्तानातील आपल्या सार्क दौऱ्यावेळीच्या नापाकी कारवाईची माहिती देणार आहेत. राजनाथ सिंहांनी केवळ २० तासच पाकिस्तानामध्ये घालवले.
राजनाथ सिंहांच्या भाषणातील ब्लॅक आऊटच्या वृत्ताचे परराष्ट्र खात्याने त्यांचे सार्क संमेलनातील भाषण थांबवले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्क संमेलनात यजमान देशालाच संपूर्ण कव्हरेज दिले जाते, तर इतर देशांच्या भाषणाचा सुरुवातीचा काहीच भाग प्रदर्शित केला जातो.
===========================================
कोणी घर देता का घर - पेसचा रिओमध्ये सवाल
- रिओ डि जेनोरियो, दि. ५ - भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसला रिओ ऑलिम्पिक ग्राममध्ये खराब व्यवस्थेचा फटका बसला आहे. लिएंडरला रिओ मध्ये रहाण्यासाठी खोली मिळालेली नाही. ऑलिम्पिकमध्ये सातवेळा भारताचे प्रतिनिधीत्व करणारा लिएंडर पेस गुरुवारी संध्याकाळी रिओ डी जानेरीयोमध्ये दाखल झाला.इथे जी वागणूक मिळाली त्यामुळे आपण निराश झालो आहोत असे लिएंडरने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. पेसला सध्या राकेश गुप्ता यांची खोली वापरावी लागत आहे. मी सहा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.मला रहाण्यासाठी खोलीही दिलेली नाही. अशा पद्धतीच्या वागणूकीमुळे मी निराश झालो आहे. मी न्यूयॉर्कमध्ये खेळत होतो. तिथे स्पर्धा संपल्यानंतर पहिले विमान पकडून थेट रिओमध्ये दाखल झालो असे लिएंडरने सांगितले.लिएंडरला रोहन बोपन्ना बरोबर रुम शेअर करायची नाही त्यासाठी तो तक्रार करत आहे अशी चर्चा सुरु आहे. पण त्यात तथ्य नाही असे झीशानने सांगितले. तो गुरुवारी संध्याकाळी रिओला पोहोचणार याची मला आणि संयोजकांना माहिती होती असे झीशानने सांगितले.
===========================================
महिला चालवते स्मशानभूमी
- ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. ५ - नोकरीच्या शोधात असणा-या अनेकांना आरामदायी, सुखासीन, सुरक्षित नोकरी मिळावी अशी इच्छा असते. नोकरीची प्रत्येकाची जी कल्पना असते त्यामध्ये स्मशानातील नोकरी कोणलाही आवडणार नाही. महिला तर, अशा ठिकाणी नोकरीची कल्पनाही करणार नाहीत.पण चेन्नईतील एक ३४ वर्षीय हिंदू महिला मागच्या अडीचवर्षापासून शहरातील सर्वात जुने वलानकाडू स्माशनभूमी संभाळत आहेत. प्रवीणा सोलेमॅन असे या महिलेचे नाव आहे. दोन मुलांची आई असणा-या प्रवीणाने मद्रास विद्यापीठातून इंग्लिश लिटरेचर विषयातून पदवी मिळवली आहे. अडीचवर्षांपूर्वी प्रवीणाने वलानकाडू स्मशानभूमीची जबाबदारी घेतली.आता तिथे ती मुख्य प्रशासक आहे. कुठलाही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सरणावर ठेवण्यापूर्वी प्रवीणा स्वत: जातीने सर्व व्यवस्था तपासून घेतात. प्रवीणाने सुरुवातीला हे काम स्वीकारले तेव्हा ते अनेकांना पचनी पडले नव्हते. काही जण चिडवायचे, शेरेबाजी करायचे, सुरुवातीचे दिवस खूप त्रासदायक होते असे प्रवीणाने सांगितले.ज्यांची या स्मशानभूमीवर उपजिविका अवलंबून होती त्यांनी नोकरी जाईल या भितीने आम्हाला अंगावर अॅसिड टाकण्याची धमकी दिली. पहिले तीन महिने खूप कठिण होते. हळहळू त्या लोकांना आमच्यामुळे त्यांच्या नोक-या अडचणीत येणार नाहीत असा विश्वास बसला त्यानंतर सर्व काही सुरळीत झाले असे प्रवीणाने सांगितले.प्रवीणा बारावर्षापासून ज्या एनजीओ बरोबर काम करत होती. त्या एनजीओला वलकानाडू स्मशानभूमी संभाळण्याचे कंत्राट मिळाले. ही स्मशानभूमीची जाग दुर्लक्षित होती. रात्री इथे दारु पिण्यासाठी लोक जमायचे. त्यामुळे पहिली इथली परिस्थिती बदलण्यावर ही जागा सुरक्षित करण्यावर भर दिला. प्रवीणासह दोन महिला स्वयंसेविका इथे काम करु लागल्या.प्रवीणाने जेव्हा करीयर म्हणून ही अनपेक्षित वाट निवडली तेव्हा तिला पतीसह संपूर्ण कुटुंबाने साथ दिली. स्मशानभूमीमध्ये सुधारणा केल्यानंतर लोकांचा दृष्टीकोन आता बदलला आहे.
===========================================
दलित तरुणाचा तुरुंगात मृत्यु; पोलिसांचे निलंबन
| |
-
| |
कानपूर - एका 26 वर्षाच्या दलित तरुणाचा गुरुवारी संशयास्पद अवस्थेत तुरुंगात मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बारा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरोड्याच्या आरोपाखाली गुरुवारी दुपारी कमल वाल्मिकी नावाच्या दलित तरुणाला त्याच्या एका सहकाऱ्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान तुरुंगातच या तरुणाचा मृत्यु झाला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. कमलला मरेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबियांना पोलिस स्थानक प्रमुखाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पोलिसांनी कमलने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. "योगेंद्र सिंह या पोलिस स्थानक प्रमुखासह एकूण 12 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. जर पोलिस कर्मचारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल‘, अशी माहिती मथुरेतील वरिष्ठ पोलिस अधिक्षक शहलभ माथूर यांनी दिली.

शिवरायांचा महाराष्ट्र अखंड राहील- शिवसेना
मुंबई - "महाराष्ट्राच्या विधानसभेत अखंड महाराष्ट्राच्या विरोधात एकही मत पडू नये व माकडांच्या हाती आयतेच कोलीत मिळू नये या मताचे आम्ही आहोत. शिवरायांचा हा महाराष्ट्र अखंड राहील. जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेऊन आपटल्याशिवाय राहणार नाही. "आम्ही अखंड महाराष्ट्राचे व अखंड महाराष्ट्र आमचा‘ हे नाते अतूट आहे‘, अशा शब्दांत शिवसेनेने "सामना‘तील अग्रलेखातून अखंड महाराष्ट्राबद्दलची भूमिका अधोरेखित केले आहे.
"विदर्भातील काहीं असंतुष्ट राजकीय मावळे या प्रश्नी "काव काव‘ करून गोंधळ घालीत असले तरी अशा कावळ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरू दिली नाही. मी अखंड महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री आहे व राहणार अशी ठाम भूमिका त्यांनी मांडल्यामुळे या कावळ्यांची पिसे झडून गेली‘, असे म्हणत ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अस्थिर व अस्वस्थ करण्याचे कारस्थान कोणी पडद्यामागून करीत नाही ना?‘, असा प्रश्न अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
शिवरायांचा महाराष्ट्र अखंड राहील- शिवसेना
शिवरायांचा महाराष्ट्र अखंड राहील- शिवसेना
| |
-
| |
"विदर्भातील काहीं असंतुष्ट राजकीय मावळे या प्रश्नी "काव काव‘ करून गोंधळ घालीत असले तरी अशा कावळ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरू दिली नाही. मी अखंड महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री आहे व राहणार अशी ठाम भूमिका त्यांनी मांडल्यामुळे या कावळ्यांची पिसे झडून गेली‘, असे म्हणत ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अस्थिर व अस्वस्थ करण्याचे कारस्थान कोणी पडद्यामागून करीत नाही ना?‘, असा प्रश्न अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
===========================================

No comments:
Post a Comment