*[राष्ट्रीय]*
1- महाड पूल दुर्घटना : दोन एसटी बसमधील 22 जण बुडाल्याची भीती
2- लोढा समितीच्या शिफारशींबाबत काटजू करणार मार्गदर्शन
3- रोड शोदरम्यान सोनिया गांधी आजारी, पंतप्रधानांकडून विचारपूस
4- अखंड महाराष्ट्रावरून काँग्रेसमध्येच उभी फूट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
5- अखंड महाराष्ट्र ही काळाची गरज: शरद पवार
6- महाड दुर्घटना : चंद्रकांत पाटलांवर खुनाचा गुन्हा नोंदवा : अजित पवार
7- हिलरी क्लिंटन यांच्या विजयाचे श्रेय जयललितांना!
8- केजरीवालांनाही व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा-भाजप
9- आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा मंजूर
10- खडकवासला धरण भरले; पाणी सोडण्यास सुरवात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
11- माळशेज घाटात दरडसत्र सुरूच
12- गोदावरीच्या पुराचं पाणी कोपरगाव शहरात, नागरिकांना हलवलं
13- परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या उस्मानाबादच्या संघर्षकन्या
14- भावजयीवरील प्रेमातून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप
15- पुण्यातील दौंडमध्ये ड्रग्जची फॅक्टरी; 25 कोटींचं ड्रग्ज जप्त, चौघांना अटक
16- पिंपरीत घरगुती वादातून चिमुकलीचा बळी
17- माळशेज घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली, वाहतूक ठप्प
18- मुंबईत इस्टर्न फ्री वे वर कारला आग, जीवितहानी नाही
19- बेपत्ता मुलगी दहा वर्षांनी परतली घरी!
20- तीन महिन्यांत शिक्षा करा; अन्यथा आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
21- जमैका कसोटीत पावसाचा खेळ, भारताचा विजय लांबणीवर
22- आय स्कॅनर, 4GB रॅम, गॅलक्सी नोट सीरीजचा नवा फोन लाँच
23- सलमान खान मागचे शुक्लकाष्ठ सुरुच, राजस्थान सरकारने थोपटले दंड
24- नोकियातून मायक्रोसॉफ्टमध्ये गेलेल्या कॅमेरा एक्स्पर्टची 'घरवापसी'
25- LG चा V20 जगातील Nougat ने लॅस पहिला अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
==========================================

बहिणीसह घराची जबाबदारी निकीतावर आली. पण अवघ्या 13 व्या वर्षी निकितानं मोठा निर्णय घेतला. आधीच परिस्थितीशी झुंजणाऱ्या आजी-आजोबांवर ओझं न होण्याचा. या निर्णयासरशी निकितानं आपलं मूळ घर गाठलं. हा मोठा निर्णय निभावताना निकिताला छोट्या बहिणीच्या शिक्षणाची आबाळ करायची नव्हती. त्यामुळे घरातलं प्रत्येक काम निकितानं आपल्या अंगावर घेतलं आहे.

घटनेच्या दिवशी जितेंद्र देढिया पत्नी बीनासोबत मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी जितेंद्र देढियानं साथीदार नझीन खानच्या मदतीनं पत्नी बिनाची हत्या केली. परळ परिसरात हा सगळा प्रकार घडला होता. सोनसाखळी चोरानं ही हत्या केलाचा बनाव जितेंद्रनं रचला होता.
मात्र पोलिस तपासात त्याचं बिंग फुटलं. पत्नीच्या भावजयीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं. तब्बल सात वर्षांनंतर या हत्या प्रकरणाचा खटला निकाली लागला आहे. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी जितेंद्र देढियाला आणि त्याला मदत केल्या प्रकरणी नझीम खानला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे

या शिफारशींची अंमलबजावणी करण्याविषयी न्यायमूर्ती काटजू यांची समिती बीसीसीआयला मार्गदर्शन करेल. या चार सदस्यीय समितीत न्यायमूर्ती काटजू आणि बीसीसीआयचे विधीज्ञ अभिनव मुखर्जी यांच्यासह दोन अन्य कायदेतज्ञांचा समावेश असेल.
दरम्यान, लोढा समितीच्या शिफारशी लागू होईपर्यंत क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएसनच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनची निवडणूकही रद्द ठरवण्यात आली आहे.

महाड पूल दुर्घटना : दोन एसटी बसमधील 22 जण बुडाल्याची भीती
महाड (रायगड) : सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा एक जूना पूल वाहून गेला आहे. या घटनेत राजापूर-बोरिवली आणि जयगड-मुंबई एसटी बससह 8-10 गाड्या वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. या दोन एसटी बसमध्ये एकूण 22 प्रवासी असल्याची शक्यता आहे.
जयगड-मुंबई बसमधील बेपत्ता प्रवाशांची नावं –
- सुनील महादेव बैकर
- स्नेहा सुनील बैकर
- दिपाली कृष्णा बलेकर
- अनिस संतोष बलेकर
- प्रशांत प्रकाश माने
- धोंडू बाबाजी कोकरे
- अविनाश सखाराम मालप
- सुहानी सुहास बलेकर
राजापूर-बोरीवली बसमधील बेपत्ता प्रवाशांची नावं –
- आतिफ मेनन चौगुले
- आवेद अल्ताफ चौगुले
- बाळकृष्ण बाब्या वरक
- जे. वाणे, श्री. वाघू
महाड पूल दुर्घटनेची भीषणता सांगणारा फोटो :
LIVE UPDATE : मे महिन्यात पाहणी झाली होती, तर पूल पडला कसा?, अजित पवारांचा सवाल
LIVE UPDATE : चंद्रकांत पाटील यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा- अजित पवार
LIVE UPDATE : सावित्री नदीवरचा पूल रात्री 11.30 वाजता कोसळला – चंद्रकांत पाटील
LIVE UPDATE : NDRF च्या चार टीम महाडच्या दिशेने रवाना, प्रत्येक टीममध्ये 40 जवान- चंद्रकांत पाटील
LIVE UPDATE : महाड दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार, अजित पवारांचा आरोप
एनडीआरएफ पुण्यातून टीम रवाना ४० जण रवाना गरज पडली तर आणखी जवान पाठवू.प्रवाह खूप जोरात असल्यानं अडचणी पंतप्रधानांनी दखल घेतलीय केंद्राकडून जी पाहिजे ती मदत पूल नादुरुस्त झाल्यानंतरही त्या ठिकाणी वाहतूक सुरू होती असं कळलं त्याबद्दल महाराष्ट्रातले त्या खात्याचे मंञी जाब विचारतील
LIVE UPDATE : सुरेश प्रभूंच्या आदेशानंतर रेल्वेकडून तातडीने मदत, डॉक्टर आणि बचावदलाच्या जवानाचं पथक घटनास्थळी रवाना
“NDRF ची टीम पुण्यातून रवाना झाली आहे. गरज पडल्यास आणखी जवान पाठवू. प्रवाह खूप जोरात असल्यानं बचावकार्यात अडचणी येत आहेत. पंतप्रधानांनीही दुर्घटनेची दखल घेतली आहे. केंद्राकडून आवश्यक ती मदत केली जाईल. पूल नादुरुस्त झाल्यानंतरही त्यावरुन वाहतूक सुरु होती, असं कळलं आहे. त्याबद्दल महाराष्ट्राचे त्या खात्याचे मंत्री जाब विचारतील” – केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर
==========================================
महाड दुर्घटना : चंद्रकांत पाटलांवर खुनाचा गुन्हा नोंदवा : अजित पवार
मुंबई : महाडमध्ये झालेल्या पूल दुर्घटनेप्रकरणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी घणाघाती मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानच्या पूल वाहून गेला आहे. या पुरात 2 एसटी बसेस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेली असून, यामध्ये 22 जण बुडाल्याची भीत आहे.
याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन दिलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, “या पुलाचं मे महिन्यातच ऑडिट झालं होतं. पूल ब्रिटीशकालीन होता, पण त्याची पाहणी झाली होती. पूल प्रवासासाठी सुरक्षित होता. मात्र हा अहवाल ज्यांनी दिला, त्यांची आता चौकशी करु”
==========================================
माळशेज घाटात दरडसत्र सुरूच
माळशेज घाटात काल रात्री मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. ज्याचा परिणाम वाहतुकीवर होताना दिसतोय.
मुरबाड: माळशेज घाटात पुन्हा दोन-तीन ठिकाणी मध्यम आकाराचे दगड आणि माती रस्त्यावर आली आहे.
काल बोगद्याजवळ दरड कोसळली होती. त्यामुळे नगर, मंचर, नारायणगाव आणि जुन्नरवरून होणारी वाहतूक पुन्हा ठप्प झाली होती. पावसामुळे पुन्हा त्याच ठिकाणी दरड कोसळल्यानं घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.
दरड कोसळल्यामुळे पुणे आणि नगरमधून मुंबईकडे येणाऱ्या भाजीपाला आणि जीवनाआवश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने घाटात अडकली आहेत.
दरम्यान, पावसाचा जोर जास्त असल्यानं दरड हटवणं शक्य नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे आज सकाळी दरड हटवण्याचा कामाला सुरुवात होणार होती, पण सततच्या मुसळधार पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी दरड कोसळत होती.
दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे इतर घाटांमधील दरड कोसळली होती. यात करूळ, आंबोली घाटांचाही समावेश आहे.
==========================================
गोदावरीच्या पुराचं पाणी कोपरगाव शहरात, नागरिकांना हलवलं
कोपरगाव(अहमदनगर): गोदावरीच्या पुराचं पाणी आता कोपरगाव शहरात शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. कोपरगाव शहराला जोडणारा गोदावरी नदीवरील छोटा पुल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकही ठप्प झाली आहे.
नदीच्या किनारी असणाऱ्या अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. शहरात गोदावरीचे पाणी आल्याने कोपरगावात जाणारा मुख्य मार्गही बंद झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
नाशिकमध्ये झालेल्या दमदार पावसाने गोदावरी नदीने रौद्र रुप धारण केलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलं आहे. मात्र पूराचं पाणी नियंत्रणाबाहेर असल्याने ठिकठिकाणी वाहतूकीवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.
==========================================
जमैका कसोटीत पावसाचा खेळ, भारताचा विजय लांबणीवर
जमैका : जमैका कसोटीत पावसाच्या व्यत्ययामुळे टीम इंडियाचा विजय आणखी लांबणीवर पडला आहे. वरुणराजाच्या आगमनामुळे चौथ्या दिवशी केवळ 15 षटकं आणि पाच चेंडूंचाच खेळ होऊ शकला.
चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विंडीजची चार बाद 48 अशी अवस्था झाली असून डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना अजूनही 256 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला विजयासाठी अखेरच्या दिवशी विंडीजच्या सहा विकेट्स काढण्याचं आव्हान असेल.
खरंतर पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ उशिराने सुरु झाला होता. पण भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करुन विंडीजला एकामागून एक चार दणके दिले. मोहम्मद शमीनं दोन, तर ईशांत शर्मा आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक विकेट काढली.
दरम्यान भारताने पहिल्या डावात 9 बाद 500 धावांची मजल मारुन विंडीजवर 304 धावांची आघाडी घेतली होती.
==========================================
आय स्कॅनर, 4GB रॅम, गॅलक्सी नोट सीरीजचा नवा फोन लाँच
नवी दिल्लीः सॅमसंगने गॅलक्सी नोट 7 हा मच अवेटेड स्मार्टफोन लाँच केला आहे. गॅलक्सीचा हा सर्वात स्टायलिश स्मार्टफोन असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी गॅलक्सी नोट 5 हा फोन लाँच करण्यात आला होता. मात्र या फोनला नोट 6 नाव न देता नोट 7 नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये आय स्कॅनर असून डोळ्यांनी फोन उचलता येणार आहे.
गॅलक्सी नोट 7 मध्ये नोट 5 आणि s7 एज या फोनमधील अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. नोट 7 चार देशांमध्ये 19 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. चीनमध्ये या फोनची आजपासून प्री ऑर्डर घेतली जाणार आहे. चीनमध्ये या फोनची किंमत जवळपास 35 हजार रुपये असणार आहे. भारतात हा फोन 11 ऑगस्टला येईल, असा अंदाज लावला जात आहे.
काय आहेत फीचर्स?
- 5.7 इंच आकाराची स्क्रीन
- स्नॅपड्रॅगन 820 चीप क्वालकॉम प्रोसेसर
- 4 GB रॅम
- 64 GB स्टोरेज
- 12/5 मेगापिक्सेल कॅमेरा
- आय स्कॅनर
- 3500mAh क्षमतेची बॅटरी
==========================================
अखंड महाराष्ट्र ही काळाची गरज: शरद पवार
मुंबई: आजवर छोट्या राज्यांची भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रवादीनं अचानकपणे अखंड महाराष्ट्रासाठी उभे राहण्याचा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखंड महाराष्ट्राच्या पाठिशी उभे राहण्याचा आदेश नेते, कार्यकर्त्यांना दिला आहे.
थोड्याच वेळापूर्वी पवारांच्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पवारांनी अखंड महाराष्ट्र ही काळाची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसेच वेगळा विदर्भ हवा असल्यास त्यासाठी जनमत घेणं गरजेचं आहे. कारण की, जनमत घेतल्याशिवाय वेगळ्या विदर्भाची मागणी करणं हा विदर्भावरच अन्याय होईल. असंही पवार म्हणाले.
तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र अखंड महाराष्ट्रावरुनच दोन गट पडले आहेत. अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडण्याच्या तयारीत असलेल्या राणे, विखे आणि कंपनीची तक्रार आपण हायकमांडकडे करणार असल्याचं माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ दोन गटात विभागल्याचं दिसतं आहे.
==========================================
परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या उस्मानाबादच्या संघर्षकन्या
उस्मानाबाद : निकिता आणि पूजा… एक दहावीत तर दुसरी आठवीत… पण या दोघींची कहाणी प्रचंड संघर्षपूर्ण आहे. निकिता 4 वर्षांची असताना वडिलांचं अपघाती निधन झालं. कणखर आईनं दोन्ही लेकींसोबत आई-वडिलांचं घर गाठलं. मोलमजुरी करुन घर चालत होतं. पण तितक्यात नियतीनं दुसरा धक्का दिला. निकिता आठवीत असताना त्यांची आईही गेली.
बहिणीसह घराची जबाबदारी निकीतावर आली. पण अवघ्या 13 व्या वर्षी निकितानं मोठा निर्णय घेतला. आधीच परिस्थितीशी झुंजणाऱ्या आजी-आजोबांवर ओझं न होण्याचा. या निर्णयासरशी निकितानं आपलं मूळ घर गाठलं. हा मोठा निर्णय निभावताना निकिताला छोट्या बहिणीच्या शिक्षणाची आबाळ करायची नव्हती. त्यामुळे घरातलं प्रत्येक काम निकितानं आपल्या अंगावर घेतलं आहे.
बहिणीला शाळेत सोडून परतलेली निकिता पुन्हा कामं आवरुन आपल्या शाळेत जाते. दिवसभर शाळा… तीही आठवड्यातले तीन दिवस… उरलेले चार दिवस ती शेतात राबते. मजुरी करण्यापासून निकितानं बहिणीला दूर ठेवलं. वह्या पुस्तकं हातात धरायच्या वयात पोरीनं खुरपं जवळ केलं. मजुरीमुळे शाळेत खाडे पडू लागले. तिला शाळेतून काढणार असल्याचं शिक्षकांनी ठरवलं, पण पुढे परिस्थिती समजली आणि त्यांनी निर्णयापासून माघार घेतली.
==========================================
भावजयीवरील प्रेमातून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप
मुंबई : विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला मुंबई सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्नी बीनाच्या हत्ये प्रकरणी जितेंद्र देढियाला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
देढियाचा साथीदार नझीम खानलाही पुढचं आयुष्य तुरुंगाच्या चार भिंतीआड काढावं लागणार आहे. 2009 मध्ये घडलेल्या त्या हत्याकांडामुळे संपूर्ण मुंबई हादरली होती.
घटनेच्या दिवशी जितेंद्र देढिया पत्नी बीनासोबत मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी जितेंद्र देढियानं साथीदार नझीन खानच्या मदतीनं पत्नी बिनाची हत्या केली. परळ परिसरात हा सगळा प्रकार घडला होता. सोनसाखळी चोरानं ही हत्या केलाचा बनाव जितेंद्रनं रचला होता.
मात्र पोलिस तपासात त्याचं बिंग फुटलं. पत्नीच्या भावजयीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं. तब्बल सात वर्षांनंतर या हत्या प्रकरणाचा खटला निकाली लागला आहे. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी जितेंद्र देढियाला आणि त्याला मदत केल्या प्रकरणी नझीम खानला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे
==========================================
पुण्यातील दौंडमध्ये ड्रग्जची फॅक्टरी; 25 कोटींचं ड्रग्ज जप्त, चौघांना अटक
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील समर्थ लॅबोरेटरीज या कंपनीवर छापा टाकून कस्टम विभागाने तब्बल 159 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
मेफेड्रोन हायड्रोक्लोराईड असं या अंमली पदार्थाच नाव असून आंतररष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 25 कोटी रुपये आहे. काही दिवसांपूर्वीच ही कंपनी सुरु झाली होती. बंदी असलेला मेफेड्रोन हायड्रोक्लोराईड नावाचा अंमली पदार्थ तयार करुन तो लंडनला पाठवण्यात येत होता.
या एमआयडीसीमध्ये अनेक केमिकल कंपन्या आहेत. मात्र, समर्थ लॅबोरेटरीजने मात्र कोणताही परवाना घेतला नव्हता. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असुन त्यामधे एका विदेशी नागरिकाचा समावेश आहे.
==========================================
पिंपरीत घरगुती वादातून चिमुकलीचा बळी
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये आज पुन्हा एकदा घरगुती वादातून चिमुकल्याला जीव गमवावा लागला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात आईने पोटच्या दोन वर्षीय मुलाची विष पाजून हत्या केली आणि स्वतः विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ती बचावली मात्र निष्पाप चिमुकल्याला जीव गमवावा लागला.
चिखलीच्या कोयनानगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. निशिगंध माळवदकर असे चिमुकल्याचे नाव असून स्वाती माळवदकर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी स्वातीने मुलाच्या खिशात सुसाईड नोट देखील लिहून ठेवली. माझ्यामुळे आपलं घर तुटलं, याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. तुमचे आई-वडील तुम्हाला सोडून जाण्याला मी कारणीभूत असल्यानं मी आत्महत्या करत आहे. माझ्या माघे निशिगंधचे हाल होतील म्हणून मी त्याला ही सोबत घेऊन जात आहे. माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये. असं स्वाती यांनी चिट्ठीत नमूद केलं.
याप्रकरणी निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत. अशीच घटना 23 जुलैला कासारवाडी परिसरात घडली होती. पतीला आनंदात ठेवू शकत नसल्याने पत्नीने सहा वर्षाच्या पोटच्या मुलीचा गळा घोटून हत्या केली आणि स्वतः देखील आत्महत्या केली. पिंपरी चिंचवड शहरात घरगुती वादातून अशा पद्धतीनं दोन चिमुकल्यांना जीव गमवावा लागल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
==========================================
माळशेज घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली, वाहतूक ठप्प
फाईल फोटो
मुरबाड: माळशेज घाटात पुन्हा बोगद्याजवळ दरड कोसळली असून नगर, मंचर, नारायणगाव आणि जुन्नरवरून होणारी वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. पावसामुळे पुन्हा त्याच दरड कोसळल्यानं घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.
दरड कोसळल्यामुळे पुणे आणि नगरमधून मुंबईकडे येणाऱ्या भाजीपाला आणि जीवनाआवश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने घाटात अडकली आहेत.
दरम्यान, पावसाचा जोर जास्त असल्यानं दरड हटवणं शक्य नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे उद्या सकाळीच दरड हटवण्याचा कामाला सुरुवात होईल. काही दिवसांपूर्वीच दरड कोसळण्याची घटना घडली होती.
==========================================
लोढा समितीच्या शिफारशींबाबत काटजू करणार मार्गदर्शन
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांची बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं. बीसीसीआय कार्यकारिणीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत लोढा समितीच्या शिफारशींविषयी चर्चा झाली.
या शिफारशींची अंमलबजावणी करण्याविषयी न्यायमूर्ती काटजू यांची समिती बीसीसीआयला मार्गदर्शन करेल. या चार सदस्यीय समितीत न्यायमूर्ती काटजू आणि बीसीसीआयचे विधीज्ञ अभिनव मुखर्जी यांच्यासह दोन अन्य कायदेतज्ञांचा समावेश असेल.
दरम्यान, लोढा समितीच्या शिफारशी लागू होईपर्यंत क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएसनच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनची निवडणूकही रद्द ठरवण्यात आली आहे.
==========================================
रोड शोदरम्यान सोनिया गांधी आजारी, पंतप्रधानांकडून विचारपूस
नवी दिल्ली: गेल्या 27 वर्षांपासून उत्तर प्रदेशातील सत्तेतून दूर राहिलेल्या काँग्रेसला पुन्हा चार्ज करण्यासाठी आज सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात रोड शो केला. जवळपास सात किलोमीटरचा रोड शो केल्यानंतर सोनिया गांधींची तब्येत अचानक खराब झाली. त्यामुळे त्यांना पुढील सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले.
तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांनी रोड शो मध्येच सोडून, तत्काळ वाराणसी विमानतळाचा मार्ग पकडला. काँग्रेस नेत्यांच्या मते सोनिया गांधी आज रात्री दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
”तब्येत अचानक बिघडल्याने मला वाराणसीतील रोड शो अर्ध्यावरच सोडावा लागला. याचे मला अतिव दु:ख होत असून, मी लवकरच तुमच्या भेटीला पुन्हा येणार असल्याचे,” त्यांनी एक पत्रक काढून सांगितले.
सोनिया गांधींची तब्येत खराब झाल्याची माहिती मिळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्काळ ट्विट करून सोनिया गांधींना लवकर ठिक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
==========================================
अखंड महाराष्ट्रावरून काँग्रेसमध्येच उभी फूट
नागपूर : वेगळ्या विदर्भावर राणे, विखे आणि इतर काँग्रेसचे बडे नेते विधान भवनात मोठे वादळ निर्माण करीत असताना, दुसरीकडे या प्रकरणावरून काँग्रेसचे विदर्भातील नेते विलास मुत्तेमवार यांनी वेगळी चुल मांडली आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून पक्षा अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडेच तक्रार करणार असल्याचे मुत्तेमवार यांनी आज स्पष्ट केले.
वेगळ्या विदर्भावरून नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील आदींनी काँग्रेसविरोधी भूमिका मांडत असल्याची तक्रार सोनिया गांधी यांच्याकडे करणार असल्याचं विलास मुत्तेमवार यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बोलत होते.
काँग्रेसची भूमिका ही वेगळ्या विदर्भाला पाठिंबा देण्याची आहे. पण स्वस्त प्रसिद्धीसाठी राज्यातले नेते अखंड महाराष्ट्राचा ठराव आणण्याची तयारी करत असल्याची टीका मुत्तेमवारांनी केली.
==========================================

इस्टर्न फ्री वेवर रे रोडजवळ संध्याकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास टाटा इंडिगो या कारने अचानक पेट घेतला. आगीमध्ये कार जळून खाक झाली, तर चालक वेळीच कारबाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. कारची आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.
या अपघातानंतर इस्टर्न फ्री वेवर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने सध्या वाहतूक सुरळीत आहे.
मुंबईत इस्टर्न फ्री वे वर कारला आग, जीवितहानी नाही
मुंबई : मुंबईतल्या इस्टर्न फ्री वेवर एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
इस्टर्न फ्री वेवर रे रोडजवळ संध्याकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास टाटा इंडिगो या कारने अचानक पेट घेतला. आगीमध्ये कार जळून खाक झाली, तर चालक वेळीच कारबाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. कारची आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.
या अपघातानंतर इस्टर्न फ्री वेवर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने सध्या वाहतूक सुरळीत आहे.
==========================================

सलमान खान मागचे शुक्लकाष्ठ सुरुच, राजस्थान सरकारने थोपटले दंड
जयपूर : राजस्थान उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता सलमान खानला 1998 मधील जोधपूरच्या काळवीट शिकार प्रकारणात दोन्ही खटल्यांमधून निर्दोष मुक्त केले होते. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राजस्थान सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्याचे संसदीय कार्य आणि विधीमंत्री राजेंद्र राठोड यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. सलमान खान प्रकरणात राज्य सरकारने सर्व निकालपत्राची पडताळणी केल्यानंतर, या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले.
सलमान विरोधात भवाद आणि मथानिया येथे काळवीट शिकार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने 25 जुलै रोजी सुनावणी करताना, सलमानची निर्दोष मुक्तता केली होती.
सलमानने 26/27 सप्टेंबर 1998 रोजी भवादमध्ये आणि 28/29 सप्टेंबर रोजी मथानियामध्ये काळवीट शिकार प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियमचे कलम 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
==========================================
नोकियातून मायक्रोसॉफ्टमध्ये गेलेल्या कॅमेरा एक्स्पर्टची 'घरवापसी'
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोज सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या 2850 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनी सध्या स्मार्टफोन हार्डवेअरच्या बिझनेसवरच लक्ष केंद्रीत करत असल्याचे समजते. तर दुसरीकडे कंपनीमध्ये काम करणारे काही कर्मचाऱ्यांनीही कंपनीला रामराम केला आहे.
एका रिपोर्टनुसार मायक्रोसॉफ्टमध्ये टॉप कॅमेरा एक्स्पर्ट म्हणून कार्यरत असलेल्या Juha Alkarhu ने कंपनीला रामराम करून, नोकियामध्ये पुन्हा घरवापसी केली आहे.
Juha Alkarhu ने नोकियाच्या प्यूर व्यू टेक्नॉलॉजीचा कॅमेरा बनवण्यात मोठी भूमिका निभावली होती. यावेळी Juha Alkarhu नोकियाच्या व्हर्च्यूअल रिअॅलिटी ओजो व्हीआर कॅमेराचे प्रमुख म्हणून काम करणार आहेत.
कंपनीचा ब्रॉण्ड सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू होणाऱ्यांमध्ये Ari Partinen यांचाही समावेश आहे. Ari Partinen यांनी काही दिवसांपूर्वी नोकिया सोडून अॅप्पल सोबत काम करण्यास सुरुवात केली होती.
==========================================
LG चा V20 जगातील Nougat ने लॅस पहिला अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन
मुंबई: LG ही कोरियन कंपनी आपला नवा स्मार्टफोन V20 येत्या सप्टेंबरमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनमध्ये अपकमिंग अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम Nougat 0.7 हे फिचर असेल. हा स्मार्टफोम हे फिचर असलेला जगातील पहिला स्मार्टफोन असणार आहे.
सर्वसाधारणपणे गूगलच्या नेक्सस डिव्हाईसलाच पहिल्यांदा अॅन्ड्रॉइड अपडेट मिळते. मात्र, LG चा V 20 आणि V 10 जगातील अपडेटेड स्मार्टफोन असणार आहेत.
कंपनीने येणाऱ्या काळात या स्मार्टफोनमध्ये आणखीन फिचर्स असतील असे स्पष्ट केले आहे. तसेच हे स्मार्टफोन प्रिमियम सेगमेंटमध्ये फ्लॅगशिपसाठी एक नवी सुरुवात असेल.
LG चा V 20 ड्यूअल डिस्प्ले आणि ड्यूअल फ्रंट कॅमेरासोबत लाँच होणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या फिचरची माहिती दिली नाही. मात्र, काही रिपोर्टनुसार, LG V 20 मध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. ज्याची रिझॉल्यूशन कॉलिटी 1080 x 1920 असेल. या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 820 चिपसेट असेल. तसेच 3/4जीबी रॅमसोबत दोन व्हॉरिएंट 32 GB आणि 64 GBमध्ये असेल. ही रॅम 256 GBपर्यंत वाढवता येऊ शकेल.
==========================================
==========================================
==========================================

No comments:
Post a Comment