Wednesday, 3 August 2016

नमस्कार लाईव्ह ०३-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- दुबईत विमानाचं क्रॅश लॅण्डिंग, प्रवासी थोडक्यात बचावले 
२- माणसाऐवजी पैसा केंद्रस्थानी मानल्याने जगात दहशतवाद 
३- लिबियातील इस्लामिक स्टेटसच्या तळावर अमेरिकेचे हवाई हल्ले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- आकाशात विमानांची टक्कर टळली, सहा प्रवासी जखमी
५- सुब्रतो रॉय यांचा पॅरोल १६ सप्टेंबरपर्यंत 
६- सेन्सेक्स २६३ अंकांनी घसरला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- महाड पूल दुर्घटना : दोन मृतदेह सापडले, बचावकार्य सुरु 
८- महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं 
९- मुंबई- गोवा महामार्गावरील 21 पैकी 15 पूल ब्रिटीशकालीन 
१०- सोलापूर; रेल्वेच्या खांबाला डोकं आपटून तरुणाचा मृत्यू
११- पुरात वाहून गेलेल्या गाडयांचा चेतक हॅलिकॉप्टरव्दारे शोध 
१२- खडकवासला ९६ टक्के भरले  
१३- महाड दुर्घटना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घटनास्थळाची पाहणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू 
१५- व्हॉटसअॅपवर पोस्ट करण्यासाठी स्विमिंगचा व्हिडीओ, तरूणाचा बुडून मृत्यू
१६- पुण्यातील पाणीकपात रद्द होणार - महापौरांचे आदेश 
१७- सांगली : रस्त्यांवरील खड्डेप्रश्नी महापालिकेसमोर राष्ट्रवादीचा ठिय्या 
१८- दादर टीटी येथे पाईपलाईन फुटली 
१९- लातूर: मोबाईलच्या वापरावरून वडील रागावल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या. 
२०- लातूर,बनशेळकी; तलावात पोहायला गेलेला हैदराबादचा मुलगा बेपत्ता, बुडाल्याचा संशय, 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- खिलाडी अक्षयसाठी दबंग सलमानचे चाहत्यांना आवाहन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=======================================

महाड पूल दुर्घटना : दोन मृतदेह सापडले, बचावकार्य सुरु

LIVE : महाड पूल दुर्घटना : दोन मृतदेह सापडले, बचावकार्य सुरु
महाड (रायगड) : रायगड जिल्ह्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेला 12 तास उलटले आहेत. मात्र, अद्यापही या दुर्घटनेत बेपत्ता झालेले प्रवासी आणि वाहनांचा शोध लागलेला नाही. एनडीआरएफ, नौदल, कोस्टगार्डसह अग्निशमन विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे. नदीत दूरपर्यंत बेपत्ता वाहनं आणि लोकांचा शोध घेतला जातो आहे. मात्र, या दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.

=======================================

महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं

महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?
रायगड/मुंबई रायगड जिल्ह्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेला अनेक तास उलटले आहेत. मात्र, अद्यापही या दुर्घटनेत बेपत्ता झालेले 22 प्रवासी आणि वाहनांचा शोध लागलेला नाही. एनडीआरएफ, नौदल, कोस्टगार्डसह अग्निशमन विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे.

सावित्री नदीत दूरपर्यंत बेपत्ता वाहनं आणि लोकांचा शोध घेतला जात आहे. मात्र, या दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली, याची माहिती मिळू शकलेली नाही.

सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?
रायगडमधल्या सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल काल रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहनंही वाहून गेली.

त्यामुळे या दुर्घटनेत २० ते २५ जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे. वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.

महाड आणि पोलादपूर या दोन शहरांना जोडणारा हा ब्रिटीशकालीन पूल होता.

साधारणपणे १०० वर्षापासून या पुलावरुन वाहतूक सुरु होती. कोकणहून मुंबईकडे येणारी वाहनं या पुलावरुन जायची. मात्र, पुलाची दुरावस्था आणि गेल्या ३ दिवसांपासून कोकणात सुरु असणारा पाऊस यामुळे हा पूल मध्यरात्री वाहून गेला.


=======================================

मुंबई- गोवा महामार्गावरील 21 पैकी 15 पूल ब्रिटीशकालीन

मुंबई/रत्नागिरी रायगडमधल्या सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल काल रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहनंही वाहून गेली.

त्यामुळे या दुर्घटनेत २० ते २५ जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे. वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.

ब्रिटीशांनी बांधलेला हा पूल सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा जुना होता. हा पूल वापरण्यास असुरक्षीत आहे, असं पत्र दोन वर्षांपूर्वीच ब्रिटीशांनी पाठवल्याचा दावा काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.

दुसरीकडे मुंबई- गोवा महामार्गावरील सर्व पुलांचं ऑडिट करण्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या महामार्गावर एकूण 21 पूल आहेत, त्यापैकी 15 पूल हे ब्रिटिशकालीन आहेत.

=======================================

आकाशात विमानांची टक्कर टळली, सहा प्रवासी जखमी

आकाशात विमानांची टक्कर टळली, सहा प्रवासी जखमी
गुवाहाटी : इंडिगो एअरलाईन कंपनीच्या दोन विमानांची आकाशात टक्कर होता होता टळली आहे. मात्र ही विमानं एकमेकांच्या अत्यंत जवळ आल्यामुळे झालेल्या अपघातसदृश प्रकारात सहा प्रवासी जखमी झाले आहेत.

6E-136 गुवाहाटी-चेन्नई आणि 6E-813 मुंबई-गुवाहाटी ही इंडिगोची विमान आकाशात एकमेकांच्या परिघात अत्यंत जवळ आली होती. यावेळी दोन्ही विमानात एकूण 300 जण प्रवास करत होते, त्यापैकी सहा जण जखमी झाले असून यामध्ये दोन एअर हॉस्टेसचाही समावेश आहे. 2 ऑगस्ट 2016 रोजी हा प्रकार घडला. सुदैवाने विमानाने सेफ लँडिंग केलं.

‘मान्सूनमुळे हवेत वादळ निर्माण झालं. त्यामुळे 6E 813 गुवाहाटी-मुंबई विमानाला 250 ते 300 फूट वर जावं लागलं. त्याचवेळी 6E-136 गुवाहाटी-चेन्नई हे विमान जात होतं. पायलटने यावेळी सूचना दिली होती. त्यानंतर चौघा प्रवाशांनी चक्कर आल्याची तक्रार केली, तर दोन एअर हॉस्टेस प्रथोमोपचार घ्यावे लागले.’ अशी माहिती इंडिगोतर्फे देण्यात आली आहे.

=======================================

दुबईत विमानाचं क्रॅश लॅण्डिंग, प्रवासी थोडक्यात बचावले

दुबईत विमानाचं क्रॅश लॅण्डिंग, प्रवासी थोडक्यात बचावले
दुबई : एमिराट्स एअरलाईनच्या प्रवासी विमानाला दुबईमध्ये अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. या विमानात 275 प्रवासी आणि क्रू-मेंबर होते.

EK521 हे विमान भारतातील तिरुअनंतपुरममधून दुबईला निघालं होतं. पण दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँण्ड होत असताना, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता अपघात झाला. यामुळे विमानाचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवाने सगळे प्रवासी सुखरुप आहे.
Dubai_Airport_2
अपघातानंतर विमानाला आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेनंतर काही विमानं माकटॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आली आहेत.
=======================================

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू


=======================================

'डोरेमॉन, शिन चॅनमुळे मुलांना धोका, त्यावर बंदी घाला'


=======================================

रेल्वेच्या खांबाला डोकं आपटून तरुणाचा मृत्यू

रेल्वेच्या खांबाला डोकं आपटून तरुणाचा मृत्यू
सोलापूर : चालत्या रेल्वेत दरवाजाजवळ मोबाईलवर बोलणं एका विद्यार्थ्याला महागात पडलं आहे. कारण सिग्नलच्या खांबाला डोकं आपटून 22 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सोलापुरातील माढा तालुक्यातील वाकाव इथं ही दुर्घटना घडली.

अक्षय चतुर्भूज बारबोले असं या विद्यार्थ्याचं  नाव आहे. तो सोलापुरातील कल्याणनगरचा रहिवासी होता.

काय आहे प्रकरण?
अक्षय बारबोले हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी कुर्डुवाडीला जात होता. हुतात्मा एक्स्प्रेसने तो कुर्डुवाडीकडे निघाला होता. यावेळी वाकाव जवळ तो मोबाईलवर बोलत होता. मात्र त्याला रेंज मिळत नसल्यामुळे तो फोनवर बोलत रेल्वेच्या दरवाजाजवळ आला. मात्र फोनवर बोलण्याच्या  नादात त्याचं डोकं रेल्वे सिग्नलच्या खांबाला जोरात आपटलं. यामुळे तो खाली कोसळला.

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अक्षयला रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर आणलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केलं.

=======================================

व्हॉटसअॅपवर पोस्ट करण्यासाठी स्विमिंगचा व्हिडीओ, तरूणाचा बुडून मृत्यू

व्हॉटसअॅपवर पोस्ट करण्यासाठी स्विमिंगचा व्हिडीओ, तरूणाचा बुडून मृत्यू
हैदराबाद : तेलंगणामधील निझामाबादमध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. व्हॉटसअॅपवर पोस्ट करण्यासाठी व्हिडीओ शूट करताना ही घटना घडली आहे.

निझामाबादमधील श्रीनिवास नावाच्या तरूणाचा या घटनेत मृत्यू झाला असून तो एक्साईज कॉन्स्टेबलची परीक्षाही दिली होती. त्याने तलावात पोहायला उतरताना आपल्या मित्राला मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्यास सांगीतलं होतं. तलावात उडी घेतल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने काही क्षणातच तो बुडू लागला. यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

मागच्या काही दिवसात सेल्फी आणि व्हॉटसअॅपसाठी व्हिडीओ काढताना बऱ्याच लोकांचा बळी गेला आहे. तसेच पोकेमॉन गो गेम खेळतानाही हलगर्जीपणामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

खिलाडी अक्षयसाठी दबंग सलमानचे चाहत्यांना आवाहन

खिलाडी अक्षयसाठी दबंग सलमानचे चाहत्यांना आवाहन
मुंबई : प्रमोशन आणि आपल्या फॅन्सशी संवाद साधण्यासाठी सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करत असतात. नुकतंच बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा “रूस्तम” पाहण्याचे आवाहन आपल्या चाहत्यांना केले आहे.

सलमानने फेसबुक आणि ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा रूस्तम पाहण्यासाठी आपल्या चाहत्यांना भावनिक आवाहनही केले आहे. यात त्याने “आमच्या इंडस्ट्रीच्या रूस्तम-ए-हिंदची फिल्म 12ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. 12 ऑगस्टला जाऊन पाहा फिल्म रुस्तम” असं सांगितलं आहे.

सलमानने हा व्हिडीओ #10daysofRustom या कॅप्शनसह शेअर केला आहे. त्याचे ट्वीट 48 हजारहून जास्त वेळा रिट्वीट केलं असून फेसबुकवर 10 लाखवेळा पाहिला आहे. तसेच 4864 वेळा शेअरही करण्यात आला.
=======================================

No comments: