*[अंतरराष्ट्रीय]*
१- कॅन्सर पीडित मुलाच्या उपचारासाठी त्याने विकलं रिओमध्ये जिंकलेलं 'सिल्व्हर मेडल'
२- अफगाण हल्ल्याचा पाकवर संशय
३- सौरमालेबाहेर ‘पृथ्वी’!
४- जीम योंग पुन्हा अध्यक्षपदी?
५- स्कॉर्पिन पाणबुड्यांची माहिती लीक झाली नसून चोरीला गेली
६- इटलीत भूकंपाचा कहर, २४७ जणांचा मृत्यू तर ३६८ जखमी
७- बलुचिस्तानमध्ये फडकला तिरंगा, अकबर बुगतींसह मोदींचा फोटो झळकला
८- इटालीमध्ये भूकंपात १२० मृत्युमुखी; कोसळली अनेक घरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
९- देश - काल - स्थिती : काश्मीर प्रश्नातला कळीचा मुद्दा !
१०- पत्नीचा मृतदेह खांद्यावर न्यायला लावणा-या हॉस्पिटलला क्लीन चीट
११- राजन, सुब्रमणियन अमेरिकेने लादले
१२- न्यायालयीन बातमीत आमची नावे नकोत!
१३- रेल्वे स्टेशनवर आता फेसबुककडूनही वाय-फाय
१४- संतप्त मेहबूबा मुफ्तींनी पत्रकार परिषद संपविली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१५- राज्यातील 1000 गावांच्या विकासासाठी उद्योजक-सेलिब्रिटी एकवटले
१६- एसीमध्ये बसून बोलायला काय जातं?, राम कदमांची राज ठाकरेंवर टीका
१७- रोईंगपटू दत्तू भोकनळची गावात जंगी मिरवणूक
१८- प्लास्टिक पिशव्यांपासून रस्ता बनवला, अमरावतीतील विद्यार्थ्यांचा यशस्वी प्रयोग
१९- लखनऊ; CCTV : माता न तू वैरिणी, चिमुकल्याला बेदम मारहाण
२०- प्रख्यात निवेदक भाऊ मराठे यांचे निधन
२१- अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली महाराष्ट्रात आणीबाणीचा आधुनिक प्रयोग - उद्धव ठाकरे
२२- स्वप्नील खोबरेकरचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
२३- ग्रामविकासाची फुटली हंडी!
२४- रेल्वेच्या सर्व प्रवाशांना आता अंथरूण-पांघरूण
२५- गोविंदा पथकांनी न्यायालय आणि पोलिसांचे आदेश केले भंग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
२६- करणी, जादूटोणाच्या संशयातून मावशीच्या पतीची कुऱ्हाडीनं हत्या
२७- ठाणे; सहाव्या थरावरुन पडल्याने गोविंदा गंभीर जखमी
२८- आर्ची-परशाच्या चाहत्यांना पिंपरीत लाथा-बुक्यांचा चोप
२९- दहीहंडीत 'सैराट'ची टीम, आर्ची-परशाला पाहण्यासाठी तुफान गर्दी
३०- ठाण्यात 16 दहीहंडी पथकांवर गुन्हा दाखल
३१- सांगली; शौचालय नाही, तर वीज,पाणी, रेशन बंद, सांगली पालिकेचा दणका
३२- मुंबईत अनेक ठिकाणी मनोरे कोसळले, 126 गोविंदा जखमी
३३- साहेबांवर 92 गुन्हे, माझ्यावर एक गुन्हा दाखल केल्यानं मला काय फरक पडतो'
३४- मला तुम्हाला भेटायचंय, साक्षी मलिकच्या विनंतीला विरुचं हटके उत्तर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
३५- कसोटीमध्ये अव्वल क्रमांकावर आल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा रडीचा डाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
=======================================
नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय हे अॅप सुरु केलं आहे. या अॅपवरुन तुम्ही क्षणार्धात पैसे पाठवू शकाल.
एखाद्या एटीएम कार्डाप्रमाणे या अॅपचा वापर करता येणार आहे. रक्कम ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेत ग्राहकाला आपल्या खात्याच्या माहितीऐवजी आपलं युजरनेम शेअर करावं लागणार आहे.
त्यामुळे आगामी काळात यूपीआय अॅपद्वारे डिजीटल बँकींग करणं अधिक सोपं होणार आहे.
*तुम्ही ज्यांना पैसे पाठवणार आहात, त्यांचा UPI ID (अप डाऊनलोड केल्यानंतर मिळेल) किंवा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर असेल, तर तुम्ही स्मार्टफोनद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकाल.
*सध्या देशभरातील 21 बँकांनी ही सुविधा सुरु केली आहे.
*या अपद्वारे एका दिवसात 50 रुपयांपासून 1 लाखांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करु शकता.

सैराट ढापला का? निर्मात्यांची चौकशी करा : कोर्ट
मुंबई : सैराट सिनेमाच्या निर्मात्यांची चौकशी करण्याचे आदेश पनवेल न्यायालयाने कामोठे पोलिसांना दिले आहेत. सैराट सिनेमाची कथा आपल्या बोभाटा कादंबरीवर बेतल्याचा दावा लेखक नवनाथ माने यांनी न्यायालयात केला होता. त्यानंतर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
सैराट चित्रपटाच्या निर्मात्यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग केला आहे का, याची चौकशी आता होणार आहे. याप्रकरणाची चौकशी करुन 30 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.
बोभाटाचे लेखक नवनाथ उर्फ नाथ माने यांनी निर्माती कंपनी एस्सेल ग्रुपने कॉपीराईट हक्काचा भंग केल्याचा आरोप केला आहे.
नाथ माने यांचा दावा
‘बोभाटा’ या आपल्या कादंबरीवरुन नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ चित्रपटाची कथा ढापल्याचा आरोप माने यांनी पनवेल कोर्टात केला आहे. फसवणूक आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्मात्यांसह सात जणांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी नाथ मानेंनी न्यायाधीशांकडे केली आहे.
माने सध्या कामोठे परिसरात राहत असून मूळ साताऱ्यातील माण तालुक्यातल्या धकटवाडीचे आहेत. 2010 मध्ये त्यांनी ‘बोभाटा’ कादंबरी लिहिली होती. सुप्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांनी या कादंबरीची प्रस्तावना लिहिली आहे. एका खेडेगावातील आंतरजातीय प्रेमसंबंधांची कथा या कादंबरीत चितारण्यात आली आहे.
नाथ माने यांना आपल्या कादंबरीवर चित्रपट काढायचा होता. झी टॉकिज आणि एस्सेल ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचा दावाही त्यांनी न्यायालयात केला आहे. मात्र वारंवार इमेलद्वारे संपर्क साधूनही कोणताच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी कोर्टाचं दार ठोठावल्याचं म्हटलं आहे.
=======================================
हाजी अली दर्गा महिला प्रवेशाबाबत आज हायकोर्टात फैसला
मुंबई: हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशाबाबत आज हायकोर्टात फैसला होणार आहे. हाजी दर्ग्यातल्या मजारजवळ महिलांना प्रवेशास बंदी आहे. पुरुषांप्रमाणं महिलांनाही दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी, डॉ. नुरजा नियाज आणि इतर संघटनांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.
याआधी शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारता येणार नाही, असा निकाल हायकोर्टानं दिला आहे. त्यामुळं आता हाजीअली संदर्भातही असाच निर्णय देऊन महिलांनाही प्रवेश मिळणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच पोलीस बंदोबस्तात हाजी अली दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं होतं. जिथपर्यंत महिलांना प्रवेश आहे तिथपर्यंतच तृप्ती देसाईंना प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे मजारपर्यंत महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी आपला लढा सुरू राहणार असल्याचंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं होतं.
हाजी अली दर्ग्यात सध्या महिलांना विशिष्ट मर्यादेपर्यंतच प्रवेशाची परवानगी आहे. मजार-ए-शरीफमध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मात्र, पुरूषांच्या बरोबरीने महिलांनाही त्याठिकाणी प्रवेश द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्याच प्रकरणावर हायकोर्ट आपला निकाल सुनावणार आहे.
=======================================
कोपर्डी बलात्काराचा निषेध, उस्मानाबादेत मोर्चाचं आयोजन
उस्मानाबाद : नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ उस्मानाबादमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे.
मराठा समाजाच्यावतीने सकाळी 11 वाजता हा मोर्चा काढला जाणार आहे. संयोजकांनी गेल्या पंधरा दिवसात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मोर्चाचा प्रसार केला आहे.
शिक्षकांनी प्रत्येक गावी जावून मोर्चात सहभागी होण्याच अवाहन केलं आहे. डॉक्टर, प्राध्यापक मोर्चात सहभागी होणार आहेत. याशिवाय सर्वपक्षीय मराठा नेते मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
संयोजकांनी केलेली तयारी लक्षात घेता, मोर्चासाठी पोलिसांनी 800 पोलीस, 75 अधिकारी, एसआरपीएफच्या दोन तुकड्या शहरात तैनात केल्या आहेत. तसंच प्रशासनाने शहरातल्या शाळांना सुट्टी दिली आहे.
यापूर्वी औरंगाबादमध्येही कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत मराठा समाजानं भव्य मूक मोर्चा काढला होता.
=======================================
कृषी विमा लाटण्यासाठी बोगसगिरी, 178 कोटी रुपये रोखले
उस्मानाबाद : सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विम्याची योजना सुरु केली खरी, मात्र योजनेचे फायदे पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांनी बनावट दस्तावेज दाखवल्याचं उघड झालं आहे.
त्यामुळे राज्यातील 5 लाख 7 हजरा 656 शेतकऱ्यांची 178 कोटी 39 लाख रुपयांची विमा रक्कम रोखण्यात आली आहे.
यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्वाधिक साडे चार लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्या खालोखाल 23 हजार 108 शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या उस्मानाबादचा नंबर आहे.
अनेकांनी शेतजमीन नसतानाही विम्याचे पैसे भरले आहेत. तर काही महाभागांनी असलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र दाखलं आहे. काही ठगांनी तर एकाच क्षेत्राची नोंदणी अनेक बँकांमध्ये केली आहे. त्यामुळे आता गावनिहाय तपासणी सुरु झाली आहे.
=======================================
व्हॉट्सअॅपचं अनोखं पाऊल, तुमचा नंबर फेसबूकशी शेअर करणार
मुंबई : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप लवकरच तुमच्या मोबाईल नंबरबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. व्हॉट्सअॅप तुमचा मोबाईल नंबर सहकारी कंपनी फेसबूकसोबत शेअर करणार आहे. फेसबूकच्या माध्यमातून जास्तीत जास्त जाहिराती व्हॉट्सअॅप युझर्सपर्यंत पोहोचतील, हा त्यामगचा हेतू आहे.
या जाहिराती फेसबूकवर असतील, त्याचा व्हॉट्सअॅप जाहिरातींशी काहीही संबंध नसेल, असा कंपनीचा दावा आहे.
मात्र हे पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉट्सअॅपला जगभरातील हजारो कोटी युझर्सचा डेटा कसा सुरक्षीत राहिल, हा विश्वास देणं आवश्यक आहे.
तुमचा नंबर फेसबूकशी शेअर करायचा की नाही, असा पर्याय व्हॉट्सअॅपद्वारे युझर्सना एका मर्यादित काळासाठी विचारला जाईल.
फेसबूकशी तुमचा नंबर शेअर केला, तरीही तो अत्यंत सुरक्षीत असेल, अशी ग्वाही व्हॉट्सअॅपने दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या मते, ” मोबाईल नंबर शेअर केल्यामुळे फेसबूक मॅपिंगद्वारे फ्रेन्ड सजेशन आणखी उत्तम होईल. तसंच जास्तीत जास्त जाहिरातीही पोहोचतील”.
तसंच आमचा व्यवसाय आमच्या करारबद्ध ग्राहकांपर्यंत कसा पोहोचता येईल, याचीही आम्ही चाचपणी करत आहोत, असंही व्हॉट्सअपने म्हटलं आहे.
बँक ट्रँझक्शन, विमानाचं वेळापत्रक यासारखी माहिती नोटिफिकेशनद्वारे मिळेल.
युझर्सची डोकेदुखी वाढणार?
व्हॉट्सअॅप व्यवसाय वाढीसाठी नवी आयडिया आणली असली, तर युझर्सना मात्र ती फारशी आवडेल यात शंका आहे. कारण प्रत्येक युझर्सला आपला डेटा सुरक्षीत राहावा हीच भावना असते. त्यातच आता नंबर थेट फेसबूशी जोडला जात असल्याने ही भावना आणखीनच वाढेल.
=======================================
UPI अॅप, मोबाईलवरुन पैसे ट्रान्सफर करणं आणखी सोपं!
मुंबई: जर तुम्हाला तुमच्या मित्राच्या किंवा कोणाच्याही अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील, तर आता त्याचा अकाऊंटनंबर विचारण्याची गरज नाही. तुम्ही केवळ तुमच्या स्मार्टफोनवरुन पैसे ट्रान्सफर करु शकता.
नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय हे अॅप सुरु केलं आहे. या अॅपवरुन तुम्ही क्षणार्धात पैसे पाठवू शकाल.
आरबीआयने युनिफाईड पेमेंट सिस्टीम नावाच्या प्रणालीला आपला हिरवा कंदील दिला आहे. यानुसार ग्राहकांना आपल्या स्मार्टफोनवर UPI हे अॅप डाऊनलोड करुन, याद्वारे विविध बँकांमधली खात्यात रक्कम ट्रान्सफर करता येणार आहे.
एखाद्या एटीएम कार्डाप्रमाणे या अॅपचा वापर करता येणार आहे. रक्कम ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेत ग्राहकाला आपल्या खात्याच्या माहितीऐवजी आपलं युजरनेम शेअर करावं लागणार आहे.
त्यामुळे आगामी काळात यूपीआय अॅपद्वारे डिजीटल बँकींग करणं अधिक सोपं होणार आहे.
पैसे कसे पाठवायचे?
*यूपीआय अप गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन स्मार्टफोनवर इन्स्टॉल करावं लागले. त्यानंतर तुमचं बँक अकाऊंट आणि आधार नंबरशी ते जोडावं लागेल.
*यूपीआय अप गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन स्मार्टफोनवर इन्स्टॉल करावं लागले. त्यानंतर तुमचं बँक अकाऊंट आणि आधार नंबरशी ते जोडावं लागेल.
*तुम्ही ज्यांना पैसे पाठवणार आहात, त्यांचा UPI ID (अप डाऊनलोड केल्यानंतर मिळेल) किंवा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर असेल, तर तुम्ही स्मार्टफोनद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकाल.
*सध्या देशभरातील 21 बँकांनी ही सुविधा सुरु केली आहे.
*या अपद्वारे एका दिवसात 50 रुपयांपासून 1 लाखांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करु शकता.
=======================================
लखनऊ; CCTV : माता न तू वैरिणी, चिमुकल्याला बेदम मारहाण
बरेलीतील सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या दीपक चतुर्वेदी यांनी चार वर्षापूर्वी पूनमसोबत लग्न केलं.
लखनऊ : आईने आपल्या दीड वर्षाच्या चिमुरड्याला निर्दयीपणे मारल्याची दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. उत्तर प्रदेशातील बरेलीतील एका महिलेने हे क्रूर कृत्य केलं.
दीड वर्षाच्या या बाळाचं नाव वेदांत चर्तुवेदी असं आहे. बरेलीतील सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या दीपक चतुर्वेदी यांनी चार वर्षापूर्वी पूनमसोबत लग्न केलं. दीड वर्षांपूर्वी वेदांतचा जन्म झाला. वेदांतचे वडील दीपक चर्तुवेदी यांनी त्यांची बायको पूनमवर निदर्यीपणे आपल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप केलाय.
सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत, दीपक यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारदेखील केली आहे. दरम्यान नवऱ्यानेच वेडं होण्याचं औषध दिल्यामुळे हे कृत्य केल्याचा खुलासा वेदांतला चोप देण्याऱ्या महिलेने केलाय.
=======================================
No comments:
Post a Comment