Thursday, 25 August 2016

नमस्कार लाईव्ह २५-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- इटलीत भूकंपाचा कहर, २४७ जणांचा मृत्यू तर ३६८ जखमी
२- बलुचिस्तानमध्ये फडकला तिरंगा, अकबर बुगतींसह मोदींचा फोटो झळकला
३- इटालीमध्ये भूकंपात १२० मृत्युमुखी; कोसळली अनेक घरे
४- काबूलमध्ये अमेरिकन विद्यापीठावर दहशतवादी हल्ला
५- जगातील सर्वात मोठे विमान चाचणीच्यावेळी कोसळले
​६- ‘पोकेमॉन गो’ची क्रेझ उतरली
७- म्यानमारमध्ये भूकंप; पूर्व भारत हादरला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
८- पूरग्रस्त बिहारमध्ये NDRF च्या होडीमध्ये मुलाचा जन्म
९- गुजरात दंगलीसाठी पंतप्रधान मोदीच जबाबदार - हार्दिक पटेल
१०- सय्यद अहमद यांच्या घरी गेली 28 वर्ष साजरी होत आहे जन्माष्टमी
११- स्मृती इराणींना नाकारण्यात आली होती पहिली नोकरी
१२- तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाचे मुबई- न्यूयॉर्क विमान ताजिकिस्तान येथे वळवण्यात आले. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१३- दहीहंडीच्या २० फूट उंचीच्या नियमाची 'ऐशीची तैशी' 
१४- दहीहंडी खेळताना 14 गोविंदा जखमी 
१५- 'मी कायदा मोडणार' - मनसे
१६- सीएसटी येथील टाइम्स इमारतीमध्ये आग 
१६- हिंदुस्थानात हिंदूंनी सण-उत्सव साजरे करणं अपराध - उद्धव ठाकरे 
१७- अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली दडपशाही? 
१८- हिंसाचारामुळे काश्मिरातील व्यवसायाचे ६ हजार कोटींचे नुकसान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१९- पुण्यात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 
२०- छत्तीसगड; दोन महिला नक्षलवाद्यांना अटक 
२१- बीड; शिक्षकाने विद्यार्थ्याला चार दिवस मारहाण करून बाथरूममध्ये ठेवले कोंडून 
२२- ठाणे - मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 
२३- मुंबई : दुपारी 1 पर्यंत १९ मोठ्या तर ११८ छोट्या हंडया फोडण्यात आल्या 
२४- कोल्हापूरः राधानगरी तालुक्यातील तुळशी धरण सहा वर्षांनी भरले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२५- कश्यपनेही सोडली गोपीचंद यांची अकादमी
२६- टी-२०चा खेळावर वाईट परिणाम
२७- क्वीन्स ओव्हलचे मैदान खराब होते
२८- रिलायन्स जिओविरुद्ध पंतप्रधानांकडे तक्रार 
२९- शुद्धीकरण उद्योगास सोने तस्करीचे ग्रहण 
३०- बोल्ट-जेडीने सेक्ससाठी घेतला 'गुगल ट्रान्सलेट'चा आधार
३१- राज्य सरकारकडून पुरस्कारात दुर्लक्ष
३२- साक्षीच्या स्वागताचा जल्लोष
३३- लिएंडर पेस-बॅगेमॅन उपांत्यपूर्व फेरीत!
३४- 100 जणांचा ग्रुप बनवला तर व्हॉट्स अॅप अॅडमिनला होणार अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 

8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

======================================

दहीहंडीच्या २० फूट उंचीच्या नियमाची 'ऐशीची तैशी'

  • First Published :25-August-2016 : 10:50:00Last Updated at: 25-August-2016 : 11:35:28

  • ऑनलाइन लोकमत
    ठाणे, दि. २५ - दहीहंडीची उंची २० फूट ठेवण्याचा आणि बालगोविंदांना बंदीचा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. मात्र हा नियम गोविंदा मंडळांनी पायदळी तुडवल्याचे चित्र राज्यभरात दिसत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व नियम पायदळी तुडवत ठाण्यात ४० फूटांवर दहीहंडी बांधली आहे. नौपाडा येथे रचलेल्या या हंडीला 'कायदाभंग' असं नाव देण्यात आले असून ९ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेने ११ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पारंपरिक पद्धतीनेच नऊ थरांची हंडी लावण्याचा निर्धार व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. 
======================================

100 जणांचा ग्रुप बनवला तर व्हॉट्स अॅप अॅडमिनला होणार अटक

  • First Published :25-August-2016 : 15:40:00Last Updated at: 25-August-2016 : 15:45:22

  • योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
    भलेही, व्हॉट्स अॅपने 256 जणांचा ग्रुप करण्याची सोय दिलेली असो, 100 किंवा त्यापेक्षा जास्त मेंबर्सचा ग्रुप बनवला तर ग्रुप अॅडमिनला अटक करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सायबर अॅक्ट हा नवीन कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव असून विशेषत: व्हॉट्स अॅपच्या वापरावर बंधने येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रस्तावित कायद्याचा मसूदा तयार असून त्यातील काही तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.
    - व्हॉट्स अॅपचा ग्रुप बनवताना, पोलीसांची परवानगी घेणे बंधनकारक असेल.
    - एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त 99 मेंबर्स सामील करून घेता येतील. त्यापेक्षा जास्त सदस्य केल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास.
    - प्रत्येक ग्रुपमध्ये पोलीसांचा एक प्रतिनिधी सदस्य करून घ्यावा लागेल, आणि त्याच्या नेटपॅकचा खर्च अॅडमिनला करावा लागेल.
    - जर अॅडमिन राहत असलेल्या क्षेत्राबाहेरील सदस्य ग्रुपचा भाग असतील, तर त्या सदस्यांनी त्यांच्या क्षेत्रातल्या पोलीस ठाण्यातून ना हरकत प्रमाणपत्र आणणं बंधनकारक आहे.
======================================

पुण्यात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

  • First Published :25-August-2016 : 13:00:00Last Updated at: 25-August-2016 : 15:06:07

  • - ऑनलाइन लोकमत 
    पुणे, दि. 25 - पुण्यात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डेक्कन पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सेक्स रॅकेट चालवणारी ही महिला उझबेकिस्तानमधील असून पुण्यात सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.
    पोलिसांना डेक्कन परिसरात फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. पोलीस आरोपी महिलेची चौकशी करत असून अजून कोण यामध्ये सहभागी आहेत याची माहिती घेत आहे. 
    पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सेक्स रॅकेट उघडकीस आली आहेत. याआधी 11 ऑक्टोबर 2013 रोजी दोन उझबेकिस्तानमधील मुलींना पोलिसांनी अटक केली होती. तसंच काही दिवसांपूर्वीच पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी देशपांडेलाही पोलिसांनी अटक केली होती. 

======================================

दहीहंडी खेळताना 14 गोविंदा जखमी

  • First Published :25-August-2016 : 14:10:00Last Updated at: 25-August-2016 : 16:04:58

  • - ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 25 - दहीहंडी खेळताना 20 फुटांहून जास्त उंच हंडी न लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतानाही अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन करत दहीहंडी खेळली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने 20 फुटांपेक्षा अधिक उंची आणि 18 वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीत बंदी घातली आहे. दरम्यान दहीहंडी खेळताना 14 गोविंदा जखमी झाले असून त्यांना मुंबईतील वेगवेगळया रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 




======================================

No comments: