[अंतरराष्ट्रीय]
१- लंडन; निस्वार्थी लोकांना वारंवार मिळते सेक्सची संधी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- जीएसटी म्हणजे टॅक्स टेररिझमपासून मुक्ती- नरेंद्र मोदी
३- पीएमओकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचं वेतन जाहीर
४- जीएसटी भ्रष्टाचाराला शून्यावर घेऊन जाणार- नरेंद्र मोदी
५- हिंगोली; आयसिसशी संबंध असल्याचा संशय, जिल्हा परिषद शिक्षक ताब्यात
६- झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदीची शक्यता
७- दलितांवरील हल्ल्याचा संघाकडून निषेध
८- बीपीएल कुटुंबाला कॅशलेस उपचार!
९- मल्ल्यांच्या ६,००० कोटींच्या संपत्तीवर टाच
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- बाळगंगा धरण प्रकरण: एसीबीकडून अजित पवारांना क्लीन चिट नाही
११- सावित्री नदीत मगरींचा वावर, मृतदेह शोधण्यात अडथळे
१२- मेट्रो 2,4ला पंधरा दिवसात मंजुरी, MMRDAच्या अधिकाऱ्यांना विश्वास
१३- मनसे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांना अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- नागपुर; व्यापाऱ्यावर गुंडांचा हल्ला, कारवाईला पोलिसांची दिरंगाई
१४- भिवंडीत पुन्हा एक इमारत कोसळली, दोन जण जखमी
१५- हैदराबाद; पोलिसांच्या चकमकीत कुख्यात गँगस्टर नईमचा खात्मा?
१६- मिरज; ‘जलदूत’ला अखेरचा निरोप
१७- सोलापूर - मोहोळ येथे बेकरीला आग
१८- नाशिक शहरातील पाणी कपात उद्यापासून रद्द
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- 'मोहंजोदारो' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा
२०- रणबीर-कतरिनाचा जग्गा जासूसच्या प्रदर्शनाची तारीख ठरली
२१- रिओ ऑलिम्पिक : नोवाक जोकोविच पहिल्याच फेरीत पराभूत
२२- रिओ ऑलिम्पिक - मायकल फेल्प्सने जिंकलं 19वं सुवर्णपदक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
===========================================

आकाशादित्य लामा नावाच्या व्यक्तीने ‘मोहंजोदारो’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. सिनेमाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांविरोधात कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही याचिका दाखल
करण्यात आली होती.
गोवारीकरांसोबत ‘लगान’, ‘स्वदेस’ सारख्या चित्रपटांसाठी काम केलेले संकलक जसविंदर सलुजा यांना 2001 मध्ये ही कथा आपण सांगितल्याचा आरोप लामा यांनी केला होता. यासंबंधात गोवारीकरांना जाब विचारणारे ईमेलही आपण पाठवल्याचं लामांनी म्हटलं आहे. मात्र त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला.
मुंबई हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी ही याचिका फेटाळली होती. मात्र लामा यांनी कोर्टाच्या त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका डबल बेंचकडे दाखल केली. त्यानंतर ही याचिकाही फेटाळण्यात आली. मोहंजोदारो हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

बाळगंगा धरण प्रकरण: एसीबीकडून अजित पवारांना क्लीन चिट नाही
ठाणे: बाळगंगा धरणाच्या कामाची किंमत शेकडो पटींनी वाढवून कोट्यवधीचा घोटाळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं 10 जणांविरोधात 30 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. विशेष म्हणजे यात तत्कालिन जलसंपदा मंत्री अजित पवार वगळता एफए कन्स्ट्रक्शनचे भागीदार आणि जलसंपदा विभागाच्या 7 अधिकाऱ्यांची आरोपपत्रात नावं आहेत.
दरम्यान, अजित पवार यांची बाळगंगा घोटाळ्यात नेमकी काय भूमिका होती याची चौकशी सुरु असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं म्हटलं आहे. आरोपपत्रात नाव नसलं तरी अजित पवारांना एसीबीकडून क्लीन चिट मात्र देण्यात आलेली नाही.
बाळगंगा धरण घोटाळ्याप्रकरणी 11 जणांविरोधात लाचलुचपत विभागानं ठाणे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्यापैकी 10 जणांविरुद्ध आता आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
===========================================

महाबळेश्वरमध्ये उगम पावलेली सावित्री थेट श्रीवर्धनमध्ये अरबी समुद्राला मिळते. त्यातील महाडच्या विसावा हॉटेलपासून गांधारी नदीपर्यंत मोठ्या प्रमाणात मगरी दिसतात. गेल्या 20 वर्षात मगरींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे हा परिसर ‘मगर प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
आता या मगरींमुळे महाड दुर्घटनेतील इतर मृतदेह मिळण्यात अडचण येत असल्याचं समोर आलं आहे. महाड दुर्घटनेत आतापर्यंत 27 मृतदेह हाती आलेले आहेत.
सावित्री नदीत मगरींचा वावर, मृतदेह शोधण्यात अडथळे
महाड (रायगड) : ज्या सावित्रीच्या पात्रात महाडची दुर्घटना घडली, तिच्यात शेकडो मगरींचा वावर असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. महाड दुर्घटना झाल्यानंतर मदतीला जाणाऱ्या स्थानिकांमध्येही मगरींची भीती असल्याचं दिसून येत आहे.
महाबळेश्वरमध्ये उगम पावलेली सावित्री थेट श्रीवर्धनमध्ये अरबी समुद्राला मिळते. त्यातील महाडच्या विसावा हॉटेलपासून गांधारी नदीपर्यंत मोठ्या प्रमाणात मगरी दिसतात. गेल्या 20 वर्षात मगरींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे हा परिसर ‘मगर प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
आता या मगरींमुळे महाड दुर्घटनेतील इतर मृतदेह मिळण्यात अडचण येत असल्याचं समोर आलं आहे. महाड दुर्घटनेत आतापर्यंत 27 मृतदेह हाती आलेले आहेत.
===========================================
मेट्रो 2,4ला पंधरा दिवसात मंजुरी, MMRDAच्या अधिकाऱ्यांना विश्वास
प्रातिनिधिक फोटो
मुंबई: येत्या 15 दिवसात मेटो 2 ब आणि 4साठी कॅबिनेटची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी दिली आहे.
मेट्रो 2 ब या टप्प्यामध्ये डीएन नगर अंधेरी पश्चिम ते मानखुर्द या मार्गावर मेट्रो धावणार आहे. तर मेट्रो 4मध्ये वडाळा, घाटकोपर ते तीन हात नाका (ठाणे) या मार्गावर मेट्रो धावणार आहे. या दोन्ही मार्गांसाठीचा प्रस्ताव कँबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
येत्या १५ दिवसांत या प्रस्तावाला मंजूरी मिळू शकेल असे संकेत एमएमआरडीएकडून देण्यात आले आहेत.
मंजूरी मिळाल्यानंतर लगेच मेट्रो 2 ब आणि ४ साठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येईल. मुंबई मेट्रोच्या सर्व मार्गांचं काम हे एमएमआरडीएच्या अंतर्गत दिल्ली रेल मेट्रो कॉर्पोरेशनच्या सहकार्यानं होणार. आहे.
===========================================
मनसे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांना अटक
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी खोपकर यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये क्रिकेट खेळल्याप्रकरणी खोपकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. मनपाच्या तक्रारीनंतर अमेय खोपकर यांना अटक करण्यात आली आहे.
===========================================
'मोहंजोदारो' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि नवोदित अभिनेत्री पूजा हेगडे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मोहंजोदारो’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
आकाशादित्य लामा नावाच्या व्यक्तीने ‘मोहंजोदारो’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. सिनेमाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांविरोधात कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही याचिका दाखल
करण्यात आली होती.
गोवारीकरांसोबत ‘लगान’, ‘स्वदेस’ सारख्या चित्रपटांसाठी काम केलेले संकलक जसविंदर सलुजा यांना 2001 मध्ये ही कथा आपण सांगितल्याचा आरोप लामा यांनी केला होता. यासंबंधात गोवारीकरांना जाब विचारणारे ईमेलही आपण पाठवल्याचं लामांनी म्हटलं आहे. मात्र त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला.
मुंबई हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी ही याचिका फेटाळली होती. मात्र लामा यांनी कोर्टाच्या त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका डबल बेंचकडे दाखल केली. त्यानंतर ही याचिकाही फेटाळण्यात आली. मोहंजोदारो हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
===========================================
पीएमओकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचं वेतन जाहीर
नवी दिल्लीः पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेतन माहिती सार्वजनिक केली आहे. माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव भास्कर खुल्बे हे सर्वात जास्त वेतन मिळवणारे अधिकारी आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळातही पीएमओने वेतन माहिती सार्वजनिक केली होती. त्यानंतर माहिती अधिकाराअंतर्गत पीएमओने माहिती प्रसिद्ध केली आहे. सचिव भास्कर खुल्बे यांना पीएमओच्या अधिकाऱ्यांपैकी सर्वाधिक म्हणजे 2 लाख एक हजार रुपये एवढं मासिक वेतन आहे.
===========================================
रणबीर-कतरिनाचा जग्गा जासूसच्या प्रदर्शनाची तारीख ठरली
मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा ‘जग्गा जासूस’ सिनेमा 7 एप्रिल’ 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अनुराग बसू यांचा बर्फीनंतर प्रदर्शित होणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचं चित्रीकरण 6 महिन्यांनी लांबलं आहे.
अनुराग बसू आणि रणबीर कपूर यांच्या शुरू प्रॉडक्शनचा हा पहिलाच सिनेमा असून प्रसिद्ध डिस्ने सिनेमाचा सहनिर्माता आहे.
द जंगल बुकच्या यशानंतर एका वर्षाने आपला दुसरा सिनेमा जग्गा जासूस रिलीज करणार असल्याचं डिस्नेकडून सांगण्यात आलं आहे.
===========================================
नागपुरात व्यापाऱ्यावर गुंडांचा हल्ला, कारवाईला पोलिसांची दिरंगाई
नागपूरः सिताबर्डी भागात व्यापारी पिता-पुत्रावर झालेल्या हल्ल्याविरोधात आज व्यापारांनी कडकडीत बंद पाळला आहे. व्यापाऱ्यांनी अर्धा दिवस आपली दुकानं बंद करुन पोलिसांच्या निष्क्रीयतेविरोधात आपला निषेध नोंदवला. बंदच्या काळात एकही जिवनावश्यक वस्तूंचं दुकान उघड नव्हतं.
प्रसन्न मोदी या व्यापाऱ्यावर दोन दिवसांपूर्वी या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. यावेळी आपल्या वडिलांना वाचवायला गेलेल्या मोदींच्या मुलालाही गुंडानी जोरदार मारहाण केली होती. पण नागपूर पोलिसांनी या गुंडाविरोधात कसलीही कारवाई केली नाही. त्यामुळे सर्व व्यापारी या विरोधात आक्रमक झाले आहेत.
===========================================
आयसिसशी संबंध असल्याचा संशय, जिल्हा परिषद शिक्षक ताब्यात
हिंगोली : आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून हिंगोलीतून एका जिल्हा परिषद शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. रईसुद्दीन सिद्दीकी असं त्याचं नाव असून महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे.
हिंगोलीतील आजम कॉलनीमधून रईसुद्दीन सिद्दीकीला एटीएसने ताब्यात घेतलं. अधिक चौकशीनंतर त्याला अटक होण्याची शक्यता आहे. रईसुद्दीन सिद्दीक मूळचा परभणीचा असून तो सध्या आझम कॉलनीत राहत होता.
===========================================
भिवंडीत पुन्हा एक इमारत कोसळली, दोन जण जखमी
भिवंडीः भिवंडीत इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू होऊन 24 तास उलटत नाहीत, तोवरच आणखी एका इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. नवा बाजार परिसरातील इमारतीचा स्लॅब आज सकाळी कोसळून दोन जण जखमी झाले आहेत.
सुदैवाने या अपघाताची तीव्रता कमी असल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. मात्र या प्रकारानंतर पालिका प्रशासनाने त्वरित इमारतीच्या पाडकामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भिवंडीतील हनुमान टेकडी नावाची दुमजली इमारत काल सकाळी कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला. महापालिकेने ही इमारत अगोदरच धोकादायक म्हणून घोषित केली होती.
===========================================
पोलिसांच्या चकमकीत कुख्यात गँगस्टर नईमचा खात्मा?
हैदराबादः हैदराबादच्या मेहबूबनगरमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत कुख्यात गँगस्टर नईम मारला गेल्याची माहिती आहे. ‘एबीपी माझा’च्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अनेक हत्यांसह तब्बल 100 प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना नईमचा शोध आहे.
दरम्यान, शादनगरच्या मिलिनियम कॉलनीमध्ये नईम लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांनी आरोपींना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं. मात्र यावेळी आरोपींकडून पोलिसांवर जोरदार गोळीबार करण्यात आला.
===========================================
झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदीची शक्यता
मुंबई : वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रसारक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदीची शक्यता आहे. झाकीर नाईकवर दाखल असलेल्या 2005 आणि 2012 च्या गुन्ह्यांना आधारभूत मानून कायदा मंत्रालयाने केंद्र सरकारला या संस्थेवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
गृह मंत्रालयानेही या संस्थेला बेकायदेशीर घोषित करुन त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 1991 पासून झाकीर नाईकची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेवर धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे आणि आयसिसमध्ये लोकांना पाठवण्याचा आरोप करण्यात आला आहे. बंदी आणल्यावर कोणतीही व्यक्ती या संस्थेचा सदस्य होऊ शकणार नाही.
या संस्थेवर कमीत कमी 5 वर्षांसाठी बंदी लादली जाऊ शकते. या दरम्यान संस्थेला कोणत्याही मार्गाने देणग्या स्वीकारता येणार नाही. सरकारने संसदेत या संस्थेविषयी स्पष्टीकरण देताना 55 दहशतवादी झाकीरच्या भाषणांनी प्रेरित असल्याचे सांगितले होते.
===========================================
जीएसटी म्हणजे टॅक्स टेररिझमपासून मुक्ती- नरेंद्र मोदी
- नवी दिल्ली, दि. 8- भाजप सरकारचं बहुप्रतीक्षित वस्तू आणि सेवा कर विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभेत सर्वपक्षीयांचे आभार मानले आहेत. जीएसटी मंजूर झाल्यानं टॅक्स टेररिझमपासून मुक्ती मिळाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.जीएसटी मंजूर होणं म्हणजे भारतातल्या लोकशाहीचा विजय झाल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. जीएसटी म्हणजे केवळ करव्यवस्था नसून एक भारत या भावनेला बळ देणारी व्यवस्था आहे. जीएसटी म्हणजे एका पक्षाचा नाही तर हा लोकशाहीचा विजय आहे. दोन्ही सभागृहांनी खूप विचारमंथन करून जीएसटीला इथपर्यंत आणलं आहे आणि लवकरात लवकर ते मंजूर करून कर रचना सुधारण्यास मदत केल्याचं मत यावेळी नरेंद्र मोदींनी मांडलं आहे.जीएसटीमुळे सर्व प्रकारचे छुपे कर रद्द होतील. टॅक्स क्रेडिटचा प्रवाहही सरळ सोपा राहील. याचा या क्षेत्राला लाभच होईल. जीएसटी १ एप्रिलपासून लागू करण्याचा आपला प्रयत्न आहे. जीएसटी विधेयकाचा ग्राहकांना ख-या अर्थानं फायदा होणार असून, ग्राहक खरा राजा होणार असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. जीएसटीचा सर्वाधिक फायदा हा ग्राहकाला होणार आहे. जीएसटीमुळे देशातली अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासही मदत होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
-GST म्हणजे टॅक्स टेररिझमपासून मुक्ती- जीएसटीमुळे व्यवस्थेत एक पारदर्शकता येणार आहे-जीएसटीमुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागाला विकासात बरोबर आणणं सोपं होणार-जीएसटीमुळे व्यवस्थेत एक प्रकारचा विश्वास निर्माण होईल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल-गरिबांसाठी असलेल्या योजना जीएसटीच्या बाहेर असतील-जीएसटीमुळे गरिबी दूर होण्यास मदत होणार-जीएसटीमुळे बँकांच्या व्यवहारातही पारदर्शकता येणार आहे-जीएसटीमुळे टेक्नॉलॉजीला बळ मिळणार आहे-जीएसटीमुळे टॅक्स चोरीच्या प्रकारांना आळा बसणार आहे-जीएसटीमुळे काळा पैसा साठवता येणार नाही-जीएसटी भ्रष्टाचाराला शून्यावर घेऊन जाणार-जीएसटीमुळे टॅक्स पेअर, टॅक्स कलेक्टर यांच्यामध्ये समन्वय साधला जाणार-राज्यांनी जीएसटी विधेयकाला मंजुरी देणं गरजेचं
===========================================
निस्वार्थी लोकांना वारंवार मिळते सेक्सची संधी
- लंडन, दि. ८ - तुम्ही निस्वार्थी वृत्तीचे आहात का ? तुमचे उत्तर 'हो' असेल तर, तुम्हाला चांगले सेक्सचे सुख मिळेल. आता तुम्ही म्हणाल निस्वार्थी असण्याचा आणि सेक्स सुखाचा काय संबंध ? कॅनडातील गुलेफ आणि निपीसिंग विद्यापीठाच्या संशोधकांनी अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे.या विद्यापीठाच्या संशोधकांनी ८०० लोकांशी चर्चा केली. त्यांचे संबंध आणि प्रवृत्ती संदर्भात जाणून घेतले. मानसशास्त्रा संदर्भातील ब्रिटीश जर्नलमध्ये या अभ्यासाचा निष्कर्ष प्रसिद्ध झाला आहे.जे लोक निस्वार्थीवृत्तीने दुस-याच्या भल्यासाठी काम करतात त्यांना प्रेम प्रकरणात यश मिळते तसेच वारंवार सेक्सची संधी मिळते असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे. स्वार्थी लोकांपेक्षा निस्वार्थी लोकांना सेक्स आणि प्रेम प्रकरणात जास्त यश मिळते असे प्राध्यापक पॅट बारक्ले यांनी सांगितले.
===========================================
दलितांवरील हल्ल्याचा संघाकडून निषेध, विरोधकांचा भाजपला बदनाम करण्याचा डाव
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8- राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं उनामध्ये झालेल्या दलितांवरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. दलितांना होणारी मारहाण ही बेकायदेशीर आणि अमानुष असल्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मांडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विरोधकांकडून भाजपला बदनाम करण्याचा डाव आखला जात असल्याची टीका केली आहे.तसेच दलितांवरील हल्ल्यांना जबाबदार असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणीही यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आली आहे. देशातला जातीय सलोखा बिघडवणा-या ते समाजकंटक कोण आहेत, याचाही केंद्र सरकारनं शोध घ्यावा, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलं आहे.तर कालच विश्व हिंदू परिषदेनं गोरक्षकांकडून दलितांवर होणारे हल्ल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना इशारा दिला आहे. भाजपला या वक्तव्यांचे पडसाद 2019च्या लोकसभा निवडणुकीत असाही इशारा दिला आहे.
===========================================
‘जलदूत’ला अखेरचा निरोप
- मिरज, दि. 08 - मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा करणा-या जलदूत एक्स्प्रेसला सोमवारी अखेरचा निरोप देण्यात आला. गेले चार महिने धावणा-या ‘जलदूत’ला सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.लातूर येथे तीव्र पाणी टंचाईमुळे मिरजेतून रेल्वेला लातूरला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ११ एप्रिलपासून ५० टँकरच्या साहाय्याने दररोज २५ लाख लिटरचा पाणीपुरवठा करण्यात आला. मिरजेतून रेल्वेच्या पाणी योजनेतून दररोज ५० रेल्वे टँकर घेऊन जाणा-या जलदूत एक्स्प्रेसने ११० फेºयांत सुमारे २६ कोटी लिटर पाणी लातूरला पोहोचवले आहे. पावसाळ्यातही लातूरला पाणी टंचाई असल्याने जलदूत एक्स्प्रेसला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र गेले आठवडाभर लातूर परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने जलदूत एक्स्प्रेसने होणारा पाणीपुरवठा सोमवारपासून बंद करण्यात आला. गेले चार महिने दररोज लातूरला जाणा-या जलदूत एक्स्प्रेसची शेवटची खेप सायंकाळी रवाना झाली.
===========================================
रिओ ऑलिम्पिक : नोवाक जोकोविच पहिल्याच फेरीत पराभूत
- ऑनलाइन लोकमतरिओ दि जानेरो, दि. ८ - टेनिस जगतात अव्वल स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचला रिओ ऑलिम्पिकमध्ये मात्र फारशी चमक दाखवता आलेली नसून पहिल्याच फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या पहिल्याच फेरीत जोकोविचला पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन देल पोतरोने जोकोविचचा 7-6 (7/4), 7-6 (7/2) असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. ऑलिम्पिकमधील जोकोविचच्या या पराभवामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
===========================================
रिओ ऑलिम्पिक - मायकल फेल्प्सने जिंकलं 19वं सुवर्णपदक
- ऑनलाइन लोकमत -रिओ दी जानेरो, दि. 8 - अमेरिकेचा विश्वविक्रमवीर जलतरणपटू मायकल फेल्प्सने ऑलिम्पिकमधलं 19वं सुवर्णपदक जिंकलं आहे. मायकल फेल्प्सने आपल्या संघासोबत फोर बाय हंड्रेड फ्रीस्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. या सुर्वणपदकासोबत मायकल फेल्प्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सोबतच फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकांची कमाई 23 पर्यंत गेली आहे.मायकल फेल्प्ससह कॅलेब ड्रेसेल, रायन हेल्ड आणि नॅथन अॅड्रियनचा अमेरिकेच्या संघात समावेश होता. फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये एकूण 23 पदकांची कमाई केली आहे. फेल्प्सने त्याच्या पहिल्याच म्हणजे अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकाची कमाई करुन विक्रम रचला होता. त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिक 8 सुवर्णपदक खिशात टाकले होते. यानंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक आणि आताच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 1 सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
===========================================
बीपीएल कुटुंबाला कॅशलेस उपचार!
- भयंकर आजारांनी ग्रस्त असलेलय गरीब रुग्णांवरील उपचार आता पैशांमुळे अडणार नाहीत. कारण बीपीएल कुटुंबासाठी १ लाखांपर्यंतची कॅशलेस आरोग्य विमा योजना सरकारने आणली असून, ही योजना लवकरच लागू केली जाणार असल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी टाउनहॉल येथील भाषणावेळी केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी गरिबांना केवळ ५० ते ६० रूपय मासिक किंवा ५०० ते ६०० रुपये वार्षिक हप्ता द्यावा लागणार आहे.देशातल्या प्रत्येक कुटुंबाला नाममात्र दरात आरोग्य विमा उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा इरादा असल्याची घोषणा यापूर्वी अर्थमंत्री अरूण जेटलींनी यंदाच्या अर्थसंकल्पात केलीच होती. सहा महिन्यांपासून या योजनेची सर्वसामान्य लोक प्रतिक्षा करीत होते. या योजनेचे तपशील नेमके काय? सर्वसामान्य नागरीकाला त्याचा लाभ कसा मिळेल? याचा तपशील अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून नुकताच हाती आला आहे. त्यानुसार, प्रस्तावित योजनेनुसार दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबातल्या व्यक्तिच्या १ लाखापर्यंतचा उपचार खर्च कॅशलेस पध्दतीनुसार होईल. कॅशलेसची ही सुविधा आधार कार्डाशी संलग्न जनधन योजनेच्या बँक खात्यांमार्फत मिळणार आहे. रुग्णालयात केवळ आधार कार्ड दाखवून आरोग्य विमाधारकाला १ लाख रुपयांपर्यंतचा कॅशलेस उपचार करता येईल. विम्याचा हप्ता (प्रिमियम) दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांसाठी अत्यल्प असेल तर या प्रवर्गात नसलेल्या सामान्य जनांसाठी तो थोडा अधिक असला तरी त्यांनाही परवडणारा असेल. आरोग्य विम्याचा वार्षिक हप्ता साधारणत: ५00 ते ८00 रूपयांपर्यंत असेल. हा हप्ता एकरकमी भरण्याची सोय तर आहेच, याखेरीज ज्यांचे मासिक उत्पन्न कमी आहे अशा नागरिकांना दरमहा ५0 ते ६0 रुपये भरूनही या योजनेचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी १ लाख रुपयांखेरीज अतिरिक्त ३0 हजारांपर्यंतची रक्कम याच प्रिमियमव्दारे उपलब्ध होणार आहे.वार्षिक १२ रुपये व ३३0 रुपयांच्या विम्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दोन्ही यशस्वी विमा योजनांचे मॉडेल आरोग्य विम्यासाठीही वापरण्याचा सरकारचा इरादा आहे. आरोग्य विमा पुरवणाऱ्या कंपन्यांचा प्रशासकीयखर्च कमी करून स्वस्त दराच्या हप्त्यात हा विमा कसा उपलब्ध करून देता येईल, याचा विचारविनिमय सध्या सुरू आहे.
===========================================
मल्ल्यांच्या ६,००० कोटींच्या संपत्तीवर टाच
- मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि अन्य यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्यानुसार नव्याने कारवाई करण्याची तयारी केली आहे. त्यानुसार विजय मल्ल्या यांच्या ६,००० कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणण्यात येणार आहे.बँक कर्ज फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात येणार आहे, तर ईडीने यासाठी ६,००० कोेटी रुपयांच्या संपत्तीची पाहणीही करून ठेवली आहे. मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यानुसार (पीएमएलए) दुसऱ्या टप्प्यात ही कारवाई करण्यात येणार आहे. नोटीस जारी करूनही मल्ल्या हे न्यायालयासमोर हजर झाले नाहीत. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात येणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मल्ल्या आणि त्यांच्या कुटुंबाची चल-अचल संपत्ती आणि शेअर यांची माहिती ईडीने घेतली आहे. मल्ल्यांशिवाय ज्या व्यक्तींची नावे या प्रकरणात आहेत त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाऊ शकते. ही तपास एजन्सी न्यायालयातून मल्ल्यांविरुद्ध ‘फरार व्यक्ती’ असा आदेश मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. हा आदेश पुढे परराष्ट्र मंंत्रालयाला पाठविला जाईल. ईडीने काही महिन्यांपूर्वी पीएमएलएअंतर्गत मल्ल्या यांची १,४११ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
===========================================
No comments:
Post a Comment