*[अंतरराष्ट्रीय]*
१- जर्मनीः कोलोन शहरातील सेंटरमध्ये गोळीबार तसेच चाकू हल्ला
२- अफगाणिस्तानः काबूलमधील अमेरिकेच्या दूतावासाजवळ बॉम्बस्फोट
३- न्यूयॉर्कमधील जेएफके विमानतळावर गोळीबार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
४- श्रीनगरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवादी हल्ला
५- सरकारची नव्हे, देशाची इमेज महत्त्वाची : मोदी
६- पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
७- स्वतंत्र रेल्वे बजेट पुढील वर्षापासून बंद होणार
८- मेट्रो बंद, हवेतच ड्रोन उडवण्याची तयारी, लाल किल्ल्यावर सुरक्षा कशी आहे?
९- प्रत्येक भारतीयाने घ्यावी सुराज्याची जबाबदारी - मोदी
१०- जम्मू-काश्मीरः उरी सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
११- आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या पोस्टमनसाठी सरकारकडून प्रयत्न - पंतप्रधान मोदी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१२- जलयुक्त शिवारामुळे 4 हजार गावं दुष्काळमुक्त : मुख्यमंत्री
१३- केरळमधल्या तरुणाने बनवला अनोखा आयर्नमॅन सूट
१४- मुंबईत सैराट फेम आर्चीच्या हस्ते ध्वजारोहण
१५- कोल्हापूर शहराची लवकरच हाद्दवाढ होणार - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
१६- महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये झाले झेंडावंदन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१७- एका गणवेशासाठी ‘तिने’ जीव दिला, नांदेडमधील धक्कादायक घटना
१८- नागपूर : भाजपा नेते मुन्ना यादव यांच्या मुलाचा स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीत धिंगाणा
१९- यवतमाळ; भरधाव दुचाकी उभ्या ट्रकवर आदळून दोन ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२०- देशवासियांनो मला माफ करा - दीपा कर्माकर
२१- जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचं कांस्यपदक हुकलं, चौथ्या स्थानावर
२२- सह्याद्रीच्या लेकीनं राखली हिमालयाची शान
२३- स्वातंत्र्य दिनानिमित्त बीएसएनएलची बंपर ऑफर
२४- अन ऑलिम्पिकमध्ये वाहिले 'प्रेमाचे वारे'...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
=====================================
मुंबईतील भांडूपमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त रात्री बारा वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. अनेक समारंभात प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थिती लावणाऱ्या रिंकू राजगुरुने या ध्वजवंदनालाही हजेरी लावली.
भांडुपमध्ये मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पाडला. सैराटची जनसामान्यांतली क्रेझ पाहता यंदाचं ध्वजारोहण रिंकू राजगुरुच्या हस्ते करण्यात आलं.
अवघ्या 0.15 गुणांनी दीपाला कांस्यपदकाने हुलकावणी दिली. दीपानं व्हॉल्ट प्रकारात 15.066 गुणांची कमाई करुन चौथं स्थान मिळवलं. स्वित्झर्लंडच्या गिलिया स्टेनग्रुबरनं 15.216 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली.
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात दीपानं पहिल्या प्रयत्नात सुकाहारा व्हॉल्ट सादर केला आणि 14.866 गुण मिळवले. दुसऱ्या प्रयत्नात दीपाच्या प्रोडुनोव्हा व्हॉल्टला पंचांनी 15.266 गुण दिले. दीपानं एकूण 15.066 गुणांसह चौथं स्थान मिळवलं. दीपानं चौथं स्थान मिळवलं तेही अमेरिकेची स्टार जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स आणि रशियाची मारिया पासेका यांसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात.

श्रीनगरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवादी हल्ला
श्रीनगर : एकीकडे देशभरात 70 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना, दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. नौहट्टा परिसरात दशतवद्यांनी जवानांना लक्ष्य केलं. अतिरेक्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात सीआरपीएफचे सात जवान जखमी आहे. तर एका जवानांनी एका अतिरेक्याचा खात्मा केला आहे.
एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.
दुसरीकडे काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी सीमेवरुन घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.
दरम्यान, हिंसाचारामुळे मागील 38 दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातील अनेक जिल्ह्यात कर्फ्यू आहे.
=====================================
सरकारची नव्हे, देशाची इमेज महत्त्वाची : मोदी
नवी दिल्ली : सरकारची नव्हे, देशाची इमेज महत्त्वाची आहे. कोणत्याही दहशवादासमोर झुकणार नाही. पाकिस्तानातील पेशावरच्या शाळेवर हल्ला झाला, तेव्हा भारताची प्रत्येक शाळा रडली होती, प्रत्येक विद्यार्थी दु:खात होता. मात्र तरीही तिकडे दहशतवाद ‘ग्लोरीफाय’ केला जात आहे. पण पाकिस्तानमधीलच बलुचिस्तानचे लोक जेव्हा भारताच्या पंतप्रधानांचे आभार मानतात, तेव्हा तो सव्वाशे कोटी जनतेचा सन्मान आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं.
दहशवादाला थारा नाही
स्वतंत्र भारतात हिंसा आणि अत्याचाराला अजिबात थारा नाही. हा देश दहशतवाद, नक्षलवाद, माओवादासमोर झुकणार नाही. सर्वांनी सामान्य, आनंदी आयुष्य जगावं, यासाठी विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं, असं आवाहन मोदींनी केलं.
बलुचिस्तानात भारताचे आभार
यावेळी मोदी म्हणाले, पाकिस्तानातील बलुचिस्तानातील जनता भारतीय पंतप्रधानांचे आभार मानत आहेत. मात्र हा सव्वाशे कोटी जनतेचा सन्मान आहे, असं मोदी म्हणाले.
=====================================
देशवासियांनो मला माफ करा - दीपा कर्माकर
रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये अवघ्या 0.15 गुणांनी पदक हुकलेल्या, भारताची स्टार जिमनॅस्ट दीपा कर्माकरने देशवासियांची माफी मागितली आहे.
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात दीपानं कमालीची कामगिरी बजावून चौथ्या स्थान मिळवलं. पण तीचं कांस्यपदक थोडक्यात हुकल्याने दीपाने ट्विट करून सर्वांची माफी मागितली आहे.
रिओमध्ये सुरू असलेल्या 31व्या ऑलिम्पिक स्पर्धेत दीपा कर्माकर भारताचं प्रतिनिधित्व करत होती. चौथ्या स्थानावर राहूनही तिने इतिहास रचला आहे. पण तिच्या मनातली खंत तिने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.
Sorry to 1.3 billions peoples i can't make it possible. But tried hard to do so. If possible forgive me!
=====================================
पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
नवी दिल्ली: स्वातंत्र दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर पंतप्रधान मोदी देशाला संबोधून भाषण करत आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लाल किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर चिघळलेली परिस्थिती लक्षात घेता यंदा लाल किल्ल्यावर विशेष सुरक्षा ठेवण्यात आली आहे. यावेळी एअर बलून उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मेट्रो आणि दिल्लीतील महत्वाचे रस्तेदेखील बंद करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांचे 5000 जवान लाल किल्ल्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहेत. तर हवाई हल्ला निष्प्रभ करण्यासाठी अँटी एअरक्राफ्ट गन्सही तैनात ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय हजारो सीसीटीव्हीची नजर कार्यक्रमातील उपस्थितांवर असणार आहे.
=====================================
जलयुक्त शिवारामुळे 4 हजार गावं दुष्काळमुक्त : मुख्यमंत्री
मुंबई : जलयुक्त शिवार योजनेमुळे 4 हजार गावं दुष्काळमुक्त झाली आहेत. तसंच गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांना 9 हजार कोटींपेक्षा जास्त मदत दिल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितलं. ते मुंबईत बोलत होते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मंत्रालयात ध्वजारोहण झालं. त्यानंतर देवेंद्र फडवणीस यांनी राज्याच्या प्रगतीचा आढावा वाचून दाखवला.
=====================================
केरळमधल्या तरुणाने बनवला अनोखा आयर्नमॅन सूट
मुंबई : केरळमधील एका विद्यार्थ्याने आयर्नमॅनचा सूट बनवला आहे. कालिकत विद्यापीठात शिकणाऱ्या विमल गोविंद मणीकंदनने हा सूट बनवला आहे. विमल एमईएस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असून, तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे.
विमलने बनवलेला हा सूट जवळपास 100 किलोचा असून 150 किलोपर्यंत वजन उचलू शकतो. या आयर्नमॅनच्या सूटला बॅटरी आणि पॉवर हायड्रोलिक्सद्वारे मजबूत बनवण्यात आलं आहे. या सूटसाठी विमलला 51 हजार रूपये खर्च आला आहे.
विमलला हॉलिवूड फिल्म आयर्नमॅन पाहून हा सूट बनवण्याची प्रेरणा मिळाली आहे.
विमलला भारतीय सैन्यासाठी अशाप्रकारचे सूट बनवण्याची इच्छा आहे. तसंच या प्रकारचा कमी वजनातील सूटही तो लवकरच बनवणार आहे.
=====================================
मेट्रो बंद, हवेतच ड्रोन उडवण्याची तयारी, लाल किल्ल्यावर सुरक्षा कशी आहे?
मेट्रो बंद, हवेतच ड्रोन उडवण्याची तयारी, लाल किल्ल्यावर सुरक्षा कशी आहे?
A
नवी दिल्ली : देशभरात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन देशाला संबोधित केलं.
स्वांतत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकटो सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. एकट्या लाल किल्ल्यावर सुरक्षा कवच उभं केलं आहे.
१. लाल किल्ल्यावर दिल्ली पोलिसांचे ५००० जवान तैनात आहेत.
२. एनएसजी कमांडोंची एक तुकडी अंतर्गत सुरक्षा (इनर लेवल सिक्युरिटी)साठी आहे.
३. स्पेशल अँटी एअरक्राफ्ट गन्स- हवेतून येणारा कुठलाही अडथळा जसं की ड्रोन किंवा इतर प्रोजेक्टाईल्स उडवण्यासाठी सज्ज
४. लाल किल्ल्याच्या परिसरात राहणाऱ्या 9 हजार नागरिकांची ए टू झेड माहिती सुरक्षा दलांनी गोळा केली आहे.
५. लाल किल्ल्याच्या समोरच्या बिल्डिंगवर पॅरा मिलिटरीचा पहारा आहे.
६. लाल किल्ल्याच्या दिशेनं उघडणाऱ्या 605 बाल्कनी, 104 खिडक्यांवर पॅराग्राफिक फोटोग्राफीनं नजर
७. पंतप्रधान मोदी लाल किल्ला परिसरात असेपर्यंत या परिसरातल्या सगळ्या मेट्रो स्टेशनची वाहतूक बंद
८. लाल किल्ल्याजवळची कोणतीही हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ३ हजार झाडंही मार्क आऊट केली आहेत.
९. २०० सीसीटीव्ही, ६० श्वान, ३ कंट्रोल रूम्स तैनात आहेत.
१०. पंतप्रधान लोकांमध्ये अचानकपणे मिसळल्यास ऑन द स्पॉट उपायांसाठी विशेष सराव
=====================================
मुंबईत सैराट फेम आर्चीच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई : अवघ्या देशभरात 70 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतही सैराट फेम आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला.
मुंबईतील भांडूपमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त रात्री बारा वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. अनेक समारंभात प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थिती लावणाऱ्या रिंकू राजगुरुने या ध्वजवंदनालाही हजेरी लावली.
भांडुपमध्ये मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पाडला. सैराटची जनसामान्यांतली क्रेझ पाहता यंदाचं ध्वजारोहण रिंकू राजगुरुच्या हस्ते करण्यात आलं.
=====================================
जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचं कांस्यपदक हुकलं, चौथ्या स्थानावर
फोटो : ऑल इंडिया रेडियो
रिओ दि जनैरो : भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचं रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक थोडक्यात हुकलं. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात दीपानं कमालीची कामगिरी बजावून चौथ्या स्थानावर झेप घेतली.
अवघ्या 0.15 गुणांनी दीपाला कांस्यपदकाने हुलकावणी दिली. दीपानं व्हॉल्ट प्रकारात 15.066 गुणांची कमाई करुन चौथं स्थान मिळवलं. स्वित्झर्लंडच्या गिलिया स्टेनग्रुबरनं 15.216 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली.
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात दीपानं पहिल्या प्रयत्नात सुकाहारा व्हॉल्ट सादर केला आणि 14.866 गुण मिळवले. दुसऱ्या प्रयत्नात दीपाच्या प्रोडुनोव्हा व्हॉल्टला पंचांनी 15.266 गुण दिले. दीपानं एकूण 15.066 गुणांसह चौथं स्थान मिळवलं. दीपानं चौथं स्थान मिळवलं तेही अमेरिकेची स्टार जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स आणि रशियाची मारिया पासेका यांसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात.
=====================================
सह्याद्रीच्या लेकीनं राखली हिमालयाची शान
मुंबई : साताऱ्याच्या ललिता बाबरनं रिओ ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर्स स्टीपलचेसची फायनल गाठून भारताची खरोखरच शान राखली. रिओ ऑलिम्पिकच्या ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात एकामागोमाग एक भारतीय अॅथलिट्स लाजिरवाणी कामगिरी बजावत असताना ललितानं मात्र देशाची शान राखली आणि म्हणूनच ललिता बाबरच्या कामगिरीनं महाराष्ट्राचीही मान उंचावली आहे.
साताऱ्याच्या मोही गावातल्या ललिता बाबरच्या कामगिरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिनं स्टीपलचेसची फायनल गाठताना नवा राष्ट्रीय विक्रमही रचला. बीजिंगमधल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत स्टीपलचेसची फायनल गाठताना ललितानं नऊ मिनिटं 27.86 सेकंदांची वेळ दिली होती. तीच ललिताची आजवरची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती. त्यानंतर सुधासिंगनं नऊ मिनिटं आणि 26.55 सेकंदांची वेळ देऊन राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर जमा केला होता. पण रिओच्या ट्रॅकवर ललितानं नऊ मिनिटं 19.76 सेकंद ही नवा राष्ट्रीय विक्रम देणारी वेळ देऊन स्टीपलचेसची अंतिम रेषा पार केली. स्टीपलचेस शर्यतीत उतरलेल्या 52 जणींमध्ये तिनं दिलेली वेळ ही सातव्या
क्रमांकाची ठरली.
क्रमांकाची ठरली.
=====================================
एका गणवेशासाठी ‘तिने’ जीव दिला, नांदेडमधील धक्कादायक घटना
नांदेड : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गरिबीचं भीषण वास्तव चव्हाट्यावर आणणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे. गणवेश नसल्यामुळं शिक्षिकेनं शाळेतून बाहेर काढलेल्या विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे.
13 वर्षीय संध्या सोनकांबळे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव असून, नांदेडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली.
संध्या सोनकांबळे ही विद्यावर्धिनी शाळेची विद्यार्थिनी होती. आठवीच्या वर्गात शिकणारी संध्या काल शाळेत गणवेश घालून गेली नाही. त्यामुळं वर्गशिक्षिका मनिषा पिंगळकर यांनी संध्याला वर्गातून बाहेर काढलं. हा अपमान जिव्हारी लागल्यामुळं संध्यानं गळफास लावून आत्महत्या केली.
या प्रकरणी संध्याच्या कुटुंबीयांनी शिक्षिका पिंगळकरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
=====================================
स्वतंत्र रेल्वे बजेट पुढील वर्षापासून बंद होणार
नवी दिल्ली : रेल्वे बजेट हे अर्थसंकल्पाचाच भाग बनवण्याची शिफारस केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे गेल्या ९२ वर्षांपासूनच्या परंपरेला आता पूर्णविराम मिळणार आहे.
रेल्वे बजेट हा अर्थसंकल्पाचाच भाग बनवण्याची शिफारस केंद्रीय रेल्वे मंत्रायाकडून अर्थ मंत्रालयाला करण्यात आली होती. ती शिफारस अर्थमंत्रालयानं स्वीकारली आहे. त्यामुळं अर्थ बजेटमध्येच रेल्वेच्या बजेटचा समावेश असणार आहे.
आता रेल्वे अर्थ संकल्पाचा समावेश सर्वसाधारण बजेटमध्ये अंतर्भाव कसा करावा, यासाठी एक पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली असून त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून रेल्वेचे स्वतंत्र बजेट मांडलं जाणार नाही. आजपर्यंत रेल्वे विभाग स्वतंत्र बजेट मांडत असल्यानं या बजेटला ९२ वर्षांची परंपरा होती. पण आताही परंपरा संपुष्टात येणार असून, सुरेश प्रभू हे रेल्वेचं शेवटचं स्वतंत्र बजेट सादर करणारे रेल्वेमंत्री ठरलेत.
=====================================
स्वातंत्र्य दिनानिमित्त बीएसएनएलची बंपर ऑफर
मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर बीएसएनएनएलनं आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर देऊ केली आहे. उद्या तुम्ही लँडलाईनवरून कोणत्याही कंपनीच्या मोबाईलवर कॉल केला, तर त्यासाठी तुम्हाला कोणतंही बिल आकारलं जाणार नाही आहे.
उद्या 15 ऑगस्ट रोजी कोणत्याही मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या क्रमाकांवर तुम्ही तुमच्या लँडलाईनमार्फत हवं तितकं वेळ अगदी मोफत बोलू शकणार आहात. विशेष म्हणजे, ही ऑफर केवळ उद्यापुरतीच नाही, तर यापुढच्या प्रत्येक रविवारी लागू असणार आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली.
बीएसएनएल ही भारतातली एक अग्रणी सेवा आहे. त्यामुळे या योजनेचा अनेकांना फायदा होणार आहे.
=====================================
No comments:
Post a Comment