नमस्कार लाईव्ह २९-०८-२०१६चे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[अंतरराष्ट्रीय]*
1- 'एव्हरेस्ट' सर केल्याचा खोटा दावा करणा-या पुण्यातील दांपत्यावर नेपाळमध्ये १० वर्षांची बंदी
2- ब्रसेल्समध्ये पोलिस इमारतीत बॉम्बस्फोट
3- स्तनाच्या कर्करोगावरील उपचार शोधला
4- १४५ वर्षांच्या गोथोंना जगाचा घ्यायचाय निरोप
5- पाकिस्तानच्या १३ टीव्ही वाहिन्यांना दंड
6- 'ढाका' हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलिसांच्या चकमकीत ठार
7- लॉस एन्जल्स विमानतळावर गोळीबार नाही-पोलिस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
8- मेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी आजपासून भारत दौऱ्यावर
9- अंबरनाथमध्ये गोमांस विक्री
10- बाबा रामदेव उभारणार विद्यापीठ
11- गणेशोत्सवात घ्या सुराज्याचा नवमंत्र
12- कामगारांचा देशव्यापी संपाचा इशारा
13- जीएसटीसाठी हिवाळी अधिवेशन लवकर
14- 'बीफ' खाऊन बोल्टने जिंकली 9 सुवर्ण- भाजप नेते
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
15- 100 जणांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपला प्रतिबंध', हे होतं विडंबन
16- २ सप्टेंबरला शाळा, महाविद्यालये बंद
17- मुंबई पालिकेची आर्थिक स्वायत्तता केंद्राकडे देण्यास विरोध
18- टॅक्सी-रिक्षांचा संप अखेर मागे
19- ई. भारतातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्या
20- हेक्स वर्ल्ड प्रकल्पावर गुंतवणूकदारांची धडक
21- जीएसटीच्या नावाखाली मुंबई तोडण्याचा डाव
22- दुष्काळग्रस्तांचे शहरात स्थलांतर
23- ओबीसी ‘क्रीमी लेयर’ मर्यादा ८ लाख होणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
24- नगरमध्ये शिक्षकांची फ्री स्टाईल!
25- गावकऱ्यांनी अनुभवला साप-मुंगसाचा "खेळ'
26- काश्मीर खोऱ्यात संचारबंदी 51 दिवसांनंतर शिथिल
27- ठाणे; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
28- नागपूरवरून भाजीपाला घेऊन येणा_या ट्रकला धडक; एक ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
29- पावसाच्या जोरावर विंडिजने जिंकली मालिका
30- सिंधू, साक्षी, दीपाला मिळाली बीएमडब्ल्यू
31- ध्यानचंद हे देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण
32- मंदीच्या वातावरणात सेन्सेक्सची घसरगुंडी
33- कामगारांचा देशव्यापी संपाचा इशारा
34- केंद्राकडून सौर योजनांसाठी १५०० कोटी!
35- टॅक्सी चालकांच्या प्रश्नासाठी समिती
36- कांद्याचे भाव सावरण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन
37- पेप्सिकोचा धोनीशी 11 वर्षे जुना करार रद्द
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
====================================
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[अंतरराष्ट्रीय]*
1- 'एव्हरेस्ट' सर केल्याचा खोटा दावा करणा-या पुण्यातील दांपत्यावर नेपाळमध्ये १० वर्षांची बंदी
2- ब्रसेल्समध्ये पोलिस इमारतीत बॉम्बस्फोट
3- स्तनाच्या कर्करोगावरील उपचार शोधला
4- १४५ वर्षांच्या गोथोंना जगाचा घ्यायचाय निरोप
5- पाकिस्तानच्या १३ टीव्ही वाहिन्यांना दंड
6- 'ढाका' हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलिसांच्या चकमकीत ठार
7- लॉस एन्जल्स विमानतळावर गोळीबार नाही-पोलिस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
8- मेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी आजपासून भारत दौऱ्यावर
9- अंबरनाथमध्ये गोमांस विक्री
10- बाबा रामदेव उभारणार विद्यापीठ
11- गणेशोत्सवात घ्या सुराज्याचा नवमंत्र
12- कामगारांचा देशव्यापी संपाचा इशारा
13- जीएसटीसाठी हिवाळी अधिवेशन लवकर
14- 'बीफ' खाऊन बोल्टने जिंकली 9 सुवर्ण- भाजप नेते
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
15- 100 जणांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपला प्रतिबंध', हे होतं विडंबन
16- २ सप्टेंबरला शाळा, महाविद्यालये बंद
17- मुंबई पालिकेची आर्थिक स्वायत्तता केंद्राकडे देण्यास विरोध
18- टॅक्सी-रिक्षांचा संप अखेर मागे
19- ई. भारतातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्या
20- हेक्स वर्ल्ड प्रकल्पावर गुंतवणूकदारांची धडक
21- जीएसटीच्या नावाखाली मुंबई तोडण्याचा डाव
22- दुष्काळग्रस्तांचे शहरात स्थलांतर
23- ओबीसी ‘क्रीमी लेयर’ मर्यादा ८ लाख होणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
24- नगरमध्ये शिक्षकांची फ्री स्टाईल!
25- गावकऱ्यांनी अनुभवला साप-मुंगसाचा "खेळ'
26- काश्मीर खोऱ्यात संचारबंदी 51 दिवसांनंतर शिथिल
27- ठाणे; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
28- नागपूरवरून भाजीपाला घेऊन येणा_या ट्रकला धडक; एक ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
29- पावसाच्या जोरावर विंडिजने जिंकली मालिका
30- सिंधू, साक्षी, दीपाला मिळाली बीएमडब्ल्यू
31- ध्यानचंद हे देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण
32- मंदीच्या वातावरणात सेन्सेक्सची घसरगुंडी
33- कामगारांचा देशव्यापी संपाचा इशारा
34- केंद्राकडून सौर योजनांसाठी १५०० कोटी!
35- टॅक्सी चालकांच्या प्रश्नासाठी समिती
36- कांद्याचे भाव सावरण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन
37- पेप्सिकोचा धोनीशी 11 वर्षे जुना करार रद्द
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
====================================
'100 जणांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपला प्रतिबंध', हे होतं विडंबन
- काही दिवसांपूर्वी लोकमत ऑनलाइननं '100 जणांचा ग्रुप बनवला तर व्हॉट्स अॅप अॅडमिनला होणार अटक' या मथळ्याखाली दिलेली बातमी हा निव्वळ विनोदाचा भाग होता. अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव कोणताही कार्यक्रम वा समारंभात १०० पेक्षा अधिक लोक एकत्र येणार असल्यास त्याकरिता पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, असा प्रस्ताव राज्य सरकारने मांडला होता. राज्य सरकारने अशा प्रकारच्या मसुदा तयार केला असून त्याचे कायद्यात रुपांतर झाल्यास 100 हून जास्त पाहुण्यांना आमंत्रित करताना पोलिसांची परवानगी घेणं अनिवार्य ठरेल. ही बातमी 'लोकमत'ने गेल्या आठवड्यात दिली होती. '100 जणांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपला प्रतिबंध' हे विडंबन याच बातमीवर बेतलेलं होतं. त्यामुळे ते खरं असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.अनेक वाचकांना हे विडंबन खरे वृत्त वाटत असून अनेक वृत्तपत्रांनीही ते विडंबन जसेच्या तसे बातमीच्या स्वरूपात छापले आहे. मात्र ते केवळ विडंबन होते, त्यामुळे लोकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता त्यापासून दूर राहावे. लोकांचं मनोरंजन व्हावे, यासाठी 'जराशी गंमत' या लोगोनिशी हे विडंबन ऑनलाइन लोकमतनी 25 ऑगस्ट 2016 रोजी छापण्यात आलं होतं. मात्र तो केवळ विनोदाचा भाग होता."सत्तेत असलेले राजकारणी, पोलीस, सरकारी अधिकारी, महिला तसेच कुठल्याही विशिष्ट समुदायावर जोक अथवा व्यंगचित्रे टाकण्यास बंदी असेल. याचे उल्लंघन केल्यास ती पोस्ट टाकणाऱ्या मेंबरला व ग्रुप अॅडमिनला प्रत्येक कार्टून अथवा जोकमागे 10 उठाबशा काढाव्या लागतील" हे निव्वळ विडंबन केलं होतं. सरकारने अशा प्रकारचा कोणताही मसुदा प्रस्तावित केला नाही. महाराष्ट्र सायबर अॅक्ट '100 जणांचा ग्रुप बनवला तर व्हॉट्स अॅप अॅडमिनला होणार अटक' अशा प्रकारचा कोणताही कायदा लागू करण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे अशा वृत्तावर वाचकांनी विश्वास ठेवू नये.जागरूक वाचकांनी हे विडंबन हलक्या-फुलक्या पद्धतीनं घ्यावे आणि याबाबतीतील अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन ऑनलाइन लोकमत तुम्हाला करत आहे.
====================================
'एव्हरेस्ट' सर केल्याचा खोटा दावा करणा-या पुण्यातील दांपत्यावर नेपाळमध्ये १० वर्षांची बंदी
- ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २९ - जगातील सर्वोच्च 'माऊंट एव्हरेस्ट शिखर' सर केल्याचा दावा करणा-या पुण्यातील दिनेश व तारकेश्वरी राठोड या दांपत्यावर नेपाळमध्ये १० वर्षांदी बंदी घालण्यात आली आहे. राठोड दांपत्याने एव्हरेस्ट शिखर केल्याचा खोटा दावा केला असून खोटी माहिती दिल्याचे सांगत नेपाळ सरकारने त्यांच्यावर १० वर्षआंची बंदी घातली आहे.शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात दिनेश टी. राठोड (३०) व तारकेश्वरी भालेराव -राठोड (३०) हे कार्यरत आहेत. २००६ साली ते शहर पोलिस दलात रूजु झाले. तारकेश्वरी या राष्ट्रीय फुटबॉलपटू असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटेपटू देखील आहे. तर दिनेश हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटे व किकबॉक्सिंगपटू आहेत. या दोघांचा २००८ साली प्रेमविवाह झाला. आपल्या एव्हरेस्टच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. दुस-या प्रयत्नात जुन महिन्यात आपण हे शिखर सर केल्याचा दावा त्यांनी केला, तसेच एव्हरेस्टवरील काही फोटोही शेअर केले.मात्र त्यांचा हा दावा खोटा असून त्यांनी एव्हरेस्टवर कोणतीही चढाई केलेली नाही. तसेच पुण्यातील एका फोटोग्राफरकडून त्यांनी मॉर्फ केलेले (नकली) फोटो सादर केल्याचे उघड झाले आहे. एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल सादर करण्यात आलेली कागदपत्रेही खरी नसून ती बनावट असल्याचे समोर आले असून नेपाळ सरकारने त्यांचे पितळ उघडे पाडत त्यांच्यावर बंदी घातली आहे.दरम्यान हा प्रकार पोलिस दल व देशाची इमेज बिघडवणारा असल्याचे पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांनी म्हटलं आहे. या कारस्थाप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही शुक्लांनी दिले आहे.
====================================
ब्रसेल्समध्ये पोलिस इमारतीत बॉम्बस्फोट
- ब्रसेल्स, दि. २९ - बेल्जिमयची राजधानी ब्रसेल्स शहर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले. ब्रसेल्सच्या क्रिमीनोलॉजी इन्स्टिट्युटमध्ये बॉम्बस्फोट झाला. बेल्जियमच्या स्थानिक वेळेनुसारी दुपारी २.३०च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला.या स्फोटात अद्यापपर्यंत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. क्रिमीनोलॉजी इन्स्टिट्युटच्या कार पार्कींगच्या भागात हा स्फोट झाला. एक ते दोन संशयितांनी येथील प्रयोगशाळेजवळ स्फोट घडवून आणला.
====================================
अंबरनाथमध्ये गोमांस विक्री
- अंबरनाथ : अंबरनाथच्या उलनचाळ या वस्तीत अनधिकृतपणे कत्तलखाना उभारून गोवंशातील चोरलेल्या प्राण्यांची हत्या करण्याचा तसेच मांसविक्रीचा व्यवसाय पोलिसांनी रविवारी छापा टाकून उघडकीस आणला.अंबरनाथ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सकाळी छापा टाकला, तेव्हा त्यांच्यासमोरच हे कृत्य सुरू होते. पोलिसांनी लागलीच आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मनसेच्या शहर उपाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खातरजमा करण्यासाठी मांसाचे तुकडे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.मनसेचे शहर उपाध्यक्ष युसुफ काशीद शेख (४५) यांचा या घटनेशी थेट संबंध असल्याचे उघड झाले. जेथे प्राण्यांची हत्या करण्यात येत होती, तो गाळा आणि तेथे काम करणारे सर्व कामगार हे शेख यांचेच होते. शेख यांचा मांसविक्रीचा व्यवसाय असल्याने त्यांच्यावर यापूर्वीही अनेकवेळा गोवंशाच्या मांसविक्रीचा आरोप झाला होता. पण, पुरावे नव्हते. यावेळी मात्र थेट पुरावे सापडल्याने ते अडचणीत सापडले. प्राण्यांची हत्या करून मांसविक्रीची तयारी जेथे सुरू होती, तेथून शफी इब्राहिम कुरेशी (४०), रियाज मोहमद शेख (३५),अजाद निजामुद्दीन कुरेशी (२६) आणि सज्जाद निजामुद्दीन कुरेशी (३३) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच कत्तलीसाठी वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. या सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ च्या कलम ५ (९) प्रमाणे तसेच आयपीसीच्या ४२९ (३४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. या आरोपींना सोमवारी उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
====================================
नगरमध्ये शिक्षकांची फ्री स्टाईल!
- अहमदनगर : येथील जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची रविवारची सर्वसाधारण सभाही गोंधळ, धक्काबुक्की, हाणामारीच्या परंपरेने गाजली. सभेच्या सुरूवातीपासून सत्ताधारी-विरोधी गटाचे शिक्षक सभासद एकमेकांना भिडले. शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. मद्यधुंद शिक्षकांनी व्यासपीठावर चढून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला.मंजूर, नामंजूरचे फलक झळकवण्यात येत होते. सभेला साधारण तीन हजारांच्या जवळपास शिक्षक होते. त्यात सत्ताधाऱ्यांच्या ७० टक्के सभासदांचा समावेश होता. व्यासपीठावर माईक ताब्यात घेण्यावरून शिक्षकांमध्ये अनेकदा झटापट झाली. व्यासपीठावर चढवण्यावरून शिक्षकांची धक्काबुक्की झाली. सुरुवातीचे दीड तास गोंधळातच गेले.बँकेच्या इतिहासात गुरूमाउली मंडळाने सहा तास सभेचे कामकाज चालवत अनेक ठराव घेतले. त्यात कोअर बँकिंग घोटाळा, संचालक मंडळाने केलेल्या सव्वा कोटी रुपयांचा खर्च नामंजूर करण्यासोबत सभासद शिक्षकांना कन्यारत्न झाल्यास बँकेच्या नफ्यातून मुलीच्या नावे ११ हजार रुपयांच्या ठेव पावतीच्या निर्णयांचा समावेश आहे.
====================================
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
- ठाणे : कळव्यातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे स्वप्न दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणावर गुन्हादाखल करण्यात आला. याप्रकरणी अद्यापही त्या तरुणाला अटक केली नसल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.कळवा येथे राहणाऱ्याइब्राम खान याने तरुणीशीफोनवरून ओळख वाढवली. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. याचदरम्यान, त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या राहत्याघरी नालासोपारा आणि त्याच्यामूळ गावी, उत्तर प्रदेशात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. हाप्रकार मागील सहा महिन्यांपासून घडल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी इब्राम याचा शोधसुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
====================================
२ सप्टेंबरला शाळा, महाविद्यालये बंद
- मुंबई : कामगार कायद्यांतील प्रस्तावित कामगारविरोधी बदलांविरोधात केंद्रीय कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये राज्यातील शिक्षक संघटनांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक शाळा आणि महाविद्यालये शुक्रवारी बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विद्यापीठ, महाविद्यालीन शिक्षक, प्राध्यापक संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या एमफुक्टो, बुक्टो या संघटनांनी संपात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारचे शिक्षणविषयक धोरण सर्वसामान्यांविरोधात असल्याने संपात सामील होत असल्याचे बुक्टोचे उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब साळवे यांनी सांगितले. याशिवाय सरकारने हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवले असून, सरकारी आणि अनुदानित शिक्षण व्यवस्थेला अडचणीत आणल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.एमफुक्टो आणि बुक्टोसह अनुदानित, विनाअनुदानित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनेही संपात सामील होणार असल्याचे स्पष्ट केले. अनुदानपात्र शिक्षकांना वेतन मिळावे, म्हणून संघटनांनी २ सप्टेंबरलाच धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला शिक्षक आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या संपात राज्यातील अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि संस्थाचालक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
====================================
====================================
No comments:
Post a Comment