Tuesday, 2 August 2016

नमस्कार लाईव्ह ०२-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- लिबियातील इस्लामिक स्टेटसच्या तळावर अमेरिकेचे हवाई हल्ले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
2- 'त्या' मायलेकींवर गँगरेप हे राजकीय षडयंत्र : आझम खान 
3- साई संस्थानमध्ये राजकीय नेत्यांच्या वर्णीला विरोध 
4- अबू जुंदालसह 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेप 
5- आंबेडकर भवनासाठी आर्किटेक्टची नियुक्ती 
6- पश्चिम बंगालचं नाव बांगला किंवा बोंगो असं  
7- मोदींच्या मतदारसंघातून कॉंग्रेसचा प्रचार सुरू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
8- मुंबईतले खड्डे बुजवता आले नाही ते विदर्भाचा विकास काय करणार?: श्रीहरी अणे 
9- ठाकरे-वायकरांची कोकणात 900 कोटींची जमीनखरेदी : निरुपम 
10- काँग्रेस-राष्ट्रवादीने अखंड महाराष्ट्र शिकवू नये : शिवसेना 
11- उद्धव ठाकरेंच्या फोननंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक 
12- कन्हैया कुमारला महाराष्ट्र विधानपरिषदेत रोखलं 
13- काँग्रेस - राष्ट्रवादीच्या अशासकीय प्रस्तावाला पाठिंबा देण्यास शिवसेनेचा नकार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
14- बिल्डर अविनाश भोसलेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा 
15- पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरुन मित्राची निर्घृणपणे हत्या 
16- लष्करी अधिकारीच आजाद काश्मिरच्या घोषणा देतो 
17- राधानगरी धरण ९६ टक्के भरले. 
18- सोलापूर : आरपीएफ जवानांचा दारू पिऊन हॉटेलमध्ये धिंगाणा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
19- कंगना राणावत अजूनही ड्रायव्हिंग लायसनच्या प्रतिक्षेत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
======================================

मुंबईतले खड्डे बुजवता आले नाही ते विदर्भाचा विकास काय करणार?: श्रीहरी अणे

मुंबईतले खड्डे बुजवता आले नाही ते विदर्भाचा विकास काय करणार?: श्रीहरी अणे
मुंबई: ‘ज्यांना मुंबईतले खड्डे बुजवता आले नाही ते विदर्भाचा विकास काय करतील’, असा घणघाती सवाल  करीत माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. श्रीहरी अणे ‘माझा विशेष’ कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी स्वतंत्र विदर्भाची आग्रही मागणी करीत सेनेवर बोचरी टीका केली.

श्रीहरी अणेंनी शिवसेनेवर निशाणा साधत वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कसं उत्तरं देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तर दुसरीकडे अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन आज दुसऱ्या दिवशीही विधीमंडळात गदारोळ बघायला मिळाला. अखंड महाराष्ट्र ठेवणं हे शिवसेनेचं कर्तव्य आहे. त्याबद्दल काँग्रेस राष्ट्रवादीनं शिकवू नये अशा शब्दात शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीचा अखंड महाराष्ट्राबद्दलचा प्रस्ताव फेटाळून लावला.

======================================

ठाकरे-वायकरांची कोकणात 900 कोटींची जमीनखरेदी : निरुपम

ठाकरे-वायकरांची कोकणात 900 कोटींची जमीनखरेदी : निरुपम
मुंबई : काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी शिवसेना मंत्री रविंद्र वायकरांवर भ्रष्टाचार आणि जमीन हडपल्याचे आरोप केल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा सनसनाटी आरोप केला आहे. रायगड मुरुड परिसरात मातोश्री आणि वायकर यांनी मिळून
900 कोटींची जमीन खरेदी केल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे.
 
मुरुड परिसरात उद्धव ठाकरे आणि वायकर यांच्या पत्नी मनिषा यांच्या नावे साडेचारशे एकर जमीन खरेदी केली आहे. रविंद्र वायकरांची पत्नी मनिषा वायकर आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी यांच्या नावे रायगडच्या कोलई गावात साडेसहा लाख स्क्वेअर फूट जमीन आहे.
या जमिनीसाठी पैसा कुठून आला याची चौकशी करण्याची मागणी निरुपम यांनी केली आहे. तसंच विजयालक्ष्मी इन्फ्रा कंपनीत वायकर स्वत: संचालक आहेत. हीच कंपनी एसआरए प्रोजेक्टची कामे करत असल्याचं निरुपम यांचं म्हणणं आहे.

======================================

बिल्डर अविनाश भोसलेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा

बिल्डर अविनाश भोसलेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा
पुणे :  प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद झाली आहे.

भोसले यांच्यावर षडयंत्र करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

भोसलेनगरमधील यशवंत घाडगेनगरमधील जमीन संगनमताने फसवणूक करून बळकावल्याचा आरोप अविनाश भोसलेंवर आहे.

सध्या या जागेवर अलिशान एबीआयएल हाऊस या अविनाश भोसले यांच्या कंपनीच कार्यालय आहे.

======================================

काँग्रेस-राष्ट्रवादीने अखंड महाराष्ट्र शिकवू नये : शिवसेना

उद्धव ठाकरेंच्या फोननंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक
मुंबई :  वेगळा विदर्भ विरुद्ध अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक संपली.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पृथ्वीराज चव्हाणांशी फोनवरुन बातचीत केल्यानंतर, सेना मंत्री आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली. 

विधानभवनात रामदास कदम यांच्या दालनात शिवसेना नेते  रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात बैठक झाली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही उपस्थिती लावली.

'त्या' मायलेकींवर गँगरेप हे राजकीय षडयंत्र : आझम खान


======================================

साई संस्थानमध्ये राजकीय नेत्यांच्या वर्णीला विरोध

साई संस्थानमध्ये राजकीय नेत्यांच्या वर्णीला विरोध
शिर्डी : शिर्डी संस्थानच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर मोहन अरोरा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी आणि विश्वस्त मंडळात कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांची नेमणूक करु नका, असे स्पष्ट आदेश कोर्टानं दिले आहेत.

सरकारने कोर्टाच्या आदेशाचा अवमान कसा काय केला? असा सवाल करत सुरिंदर अरोरा कोर्टात गेले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिर्डीच्या नवनियुक्त संस्थानला पार्टी करण्यात आलं आहे.
 
तीन दिवसांपूर्वी शिर्डी मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी नवी मुंबईतील भाजप नेते सुरेश हावरे यांची वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्षपद भाजप नेते चंद्रशेखर कदम यांना सोपवण्यात आलं आहे. यावर अरोरा यांनी आक्षेप घेतला आहे.

कन्हैया कुमारला महाराष्ट्र विधानपरिषदेत रोखलं

कन्हैया कुमारला महाराष्ट्र विधानपरिषदेत रोखलं
मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचं कामकाज पाहण्यासाठी गेलेल्या जेएनयू विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला रोखण्यात आलं आहे. कन्हैया कुमारने प्रवेशासाठीचा पास काढला होता. मात्र त्याला प्रवेश दिलेला नाही.

कन्हैया कुमारने शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा संदर्भ देऊन पास मिळवला होता. मात्र विधानपरिषदेत त्याला प्रवेश दिला नाही. सुरक्षारक्षकांनी त्याला रोखलं.
Kanhaiya_Pass
विधानपरिषदेत सध्या वेगळा विदर्भाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु आहे. या चर्चेसाठी कन्हैया उपस्थित राहणार होता. त्यासाठी दुपारी 12 ते 1 अशी वेळ त्याला देण्यात आली होती. मात्र कन्हैयाला सुरक्षारक्षकांनी रोखलं आहे.

======================================

अबू जुंदालसह 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेप

अबू जुंदालसह 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेप
मुंबई : औरंगाबादमधील 2006 च्या शस्त्रसाठा प्रकरणी दोषी अबू जुंदालसह सात जणांना मरेपर्यंक जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. तर दोघांना 14 वर्षांची जन्मठेप आणि तिघांना आठ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. विशेष मोक्का न्यायालयाने हा निर्णय दिला.

ज्या तिघांना 8 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे, त्यांनी आधीच 10 वर्ष शिक्षा भोगल्याने त्यांची आता सुटका करण्यात येईल.

दरम्यान, प्रकरणात न्यायालयाने 22 दोषींपैकी 11 जणांना दोषी ठरवलं. त्यामध्ये 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अबू जुंदालचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजेत या सर्व दोषींवरील मोक्का हटवण्या आला आहे.

======================================

कंगना राणावत अजूनही ड्रायव्हिंग लायसनच्या प्रतिक्षेत

कंगना राणावत अजूनही ड्रायव्हिंग लायसनच्या प्रतिक्षेत
मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला मुंबईमध्ये ड्रायव्हिंग लायसन मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तिने कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अद्याप वाहतूक शाखेकडून ड्रायव्हिंग लायसन देण्यात आले नाही.

कंगना राणावतने मुंबई आरटीओकडे एका पत्राद्वारे आपले ड्रायव्हिंग लायसन हिमाचल प्रदेशचे असून, ते ट्रान्सफर करून महाराष्ट्राचे मिळावे अशी मागणी केली होती.

बॉलीवूड हंगामा डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, आरटीओने कागदपत्रांची पूर्तता न केल्याने, तिला ड्रायव्हिंग लायसन दिले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कंगनाला तिची योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय, ड्रायव्हिंग लायसन मिळणे अवघड झाले आहे.

दरम्यान, कंगनाच्या प्रवक्त्याने या वृत्ताचे खंडन केले असून, आरटीओकडून अशा कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली नसल्याचे सांगितले आहे. पण, जेव्हा आरटीओ शाखेकडून मागणी केल्यास त्याची पूर्तता करू, असेही त्याने स्पष्ट केले.

======================================

उत्तर प्रदेशात एका बकरीमुळे चौघांचा बळी

उत्तर प्रदेशात एका बकरीमुळे चौघांचा बळी
प्रातिनिधिक फोटो
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये विचित्र घटना घडली आहे. येथील घाटमपूर ठाणे हद्दीतील खिवरा गावात चक्क एका बकरीने चारजणांचा बळी घेतला आहे.

अधिक माहितीनुसार, खिवरा गांवातील एक बकरी विहरीत पडली होती. या बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या किशोर नावाच्या तरुणाने विहरीत उडी घेतली. पण त्या विहरीत पाणी कमी असल्याने  विषारी वायू तयार झाला होता. याने त्याचा मृत्यू झाला.
412-300x227

हे पाहून एका मुलाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी त्या विहरीजवळ गर्दी केली. यातील काहींनी त्याला बाहेर काढण्यासाठी विहरीत प्रवेश केला. मात्र, विहरीतील विषारी वायूची माहिती नसल्याने त्यांचाही मृत्यू झाला.

याची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी मोठ्या कष्टाने हे सर्व मृतदेह बाहेर काढले. स्थानिक पोलिसांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन, शवविच्छेदनासाठी पाठवले. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
======================================

No comments: