[अंतरराष्ट्रीय]
१- सोन्याने भरलेली नाझींची 'ती' ट्रेन पोलंडमध्ये ?
२- अमेरिका, युरोपने पाठिंबा द्यावा - बलुचिस्तानातील नेत्यांची मागणी
३- लंडनमध्ये डौलाने फडकला तिरंगा
४- १७०० किमी प्रवास करणा-या आसामच्या हत्तीचा बांगलादेशात मृत्यू
५- ऑस्ट्रिया- धावत्या ट्रेनमध्ये एकानं केला चाकू हल्ला, हल्ल्यात 2 जण जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- भारतात सैन्य घुसवा, हाफिज सईद पुन्हा बरळला
७- 14 सेकंदांहून जास्त वेळ महिलेकडे पाहणे गुन्हा
८- 164 फूट उंचीवर चढून जवानाने फडकावला तिरंगा
९- ३ लाख शेतकऱ्यांनी उतरविला पीकविमा
१०- मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर, ५० बसेसमध्ये वाय-फाय होणार उपलब्ध
१२- छगन भुजबळ नाशिकमधून बेघर, एकमेव निवाराही जप्त
१३- मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली अजित पवारांची भेट
१४- मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने वाचवले 'त्या' कुटुंबाचे छप्पर
१५- रोजंदारी कामगार 'बेस्ट' नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत
१६- जळगावच्या साईबाबा मंदिरात झाली तिस-यांदा चोरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- अमरावती; चिखलदरामध्ये पर्यटकांची जीवघेणी कसरत
१७- वाशीम; जमिनीला मिळाला कवडीमोल दर; धरणही उठले मुळावर
१८- सांगली : महापालिकेतील पदाधिकारी-प्रशासनातील वादामुळे आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन रद्द
१९- अकोला: शोष खड्ड्यात बालक मृत्यू प्रकरणात मनपा आयुक्तांसह अभियंता व जलवर्धन संस्थेवर गुन्हा दाखल
२०- संगमेश्वरजवळ माभाळे येथे दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत.
२१- नागपूर : मोबाईलच्या नावाखाली दगड दिल्याने स्नॅपडीलच्या अधिका-यांविरुद्ध अंबाझरी पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी धरणात पोहण्याचा सराव
२३- भारताची थाळीफेकपटू सीमा पुनियाचे आव्हान संपुष्टात
२४- विकास क्रिशनच्या पराभवाने बॉक्सिंगमध्ये भारताचे आव्हान संपले
२५- महाराष्ट्रकन्या ललिता बाबरचे दहाव्या स्थानी समाधान
२६- समभाग निगडित फंड खाती ८ लाखांनी वाढली
२७- काळा पैसा जाहीर करणाऱ्यांना पोचपावती
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==============================================

भारतात सैन्य घुसवा, हाफिज सईद पुन्हा बरळला
- - ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 16 - जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. 'भारताला धडा शिकवण्यासाठी सैन्य भारतात घुसवा', असं आवाहन त्याने पाकिस्तानला केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये हिंसेमुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्या पार्श्वभुमीवर भारतासोबत युद्ध छेडण्याचे आवाहन हाफिज सईदने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांना केलं आहे.पाकिस्तामधील वृत्तवाहिन्यांनी हाफिज सईदचं वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने जुलैमध्येच भारताला हल्ल्याची धमकी दिली होती.
==============================================
14 सेकंदांहून जास्त वेळ महिलेकडे पाहणे गुन्हा
- नवी दिल्ली, दि. 16 - केरळचे अबकारी आयुक्त ऋषिराज सिंग यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महिलेकडे 14 सेकंदांहून अधिक वेळ पाहिल्यास त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे. यासाठी देशात कोणताही कायदा नाही, अशी खंतही ऋषिराज सिंग यांनी व्यक्त केली आहे. कोचीमध्ये चार्टर्ड अकाऊंटच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.महिलांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मार्शल आर्टही शिकण्याची गरज आहे. ऋषिराज सिंग यांच्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील के. व्ही. धनंजया यांनी टीका केली आहे. सिंग यांचं वक्तव्य कोणताही विचार न करता करण्यात आलं आहे. कारण देशातच नाही तर जगातही असा कोणताच कायदा अस्तित्वात नाही, असं के. व्ही. धनंजया यांनी सांगितलं आहे. महिलांना असुरक्षित वाटणं ही खूपच गंभीर गोष्ट आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत.सिंग यांचं हे वक्तव्य केरळमध्ये अक्षरशः वा-यासारखं पसरलं आहे. केरळ सरकारनंही सिंग यांचं वक्तव्य अत्यंत गांभीर्यानं घेतलं आहे. केरळचे क्रीडा मंत्री जयाराजन यांनी सिंग यांचं हे वक्तव्य त्रासदायक असून, त्यांना लवकरच कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येईल, असं म्हटलं आहे. एखादी बेजबाबदार व्यक्तीच अशा प्रकारचं वक्तव्य करू शकते, असंही जयाराजन म्हणाले आहेत.
==============================================
सोन्याने भरलेली नाझींची 'ती' ट्रेन पोलंडमध्ये ?
- - ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 16 - दुस-या महायुद्धानंतर गायब झालेल्या सोन्याने भरलेल्या नाझींच्या ट्रेनचा आपण शोध लावला असल्याचा दावा पोलंडमधील दोन स्थानिकांनी केला आहे. पोलंडमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी यासंबंधी वृत्त दिलं आहे. दुस-या महायुद्धानंतर सोनं, हि-यांनी भरलेली ट्रेन गायब झाली होती असं म्हटलं जातं. 1945 मध्ये जेव्हा रशियन सैन्य आगेकूच करत होतं तेव्हा ही ट्रेन पोलंडमधील व्रोक्ला शहरात गायब झाली होती असा समज आहे. संशोधकांनी मंगळवारपासून खोदकामाला सुरुवात केली आहे. 35 स्वयंसेवक या खोदकामात मदत करणार आहेत.दक्षिण - पश्चिम पोलंडमधील वकिलांनी माहिती दिली आहे की दोन व्यक्तींनी त्यांच्यांशी संपर्क साधला आहे. त्यांनी या ट्रेनचा शोध लावल्याचा दावा केला आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही व्यक्तींनी ट्रेनमध्ये असलेल्या मुद्देमालामधील 10 टक्के भागीदारी मागितली आहे. विशेष म्हणजे ट्रेनचा शोध लागल्याचा दावा करणा-यांची माहिती आणि ट्रेन हरवल्याची गोष्ट यामधील काही गोष्टींमध्ये साम्य असून तथ्य असण्याची शक्यता आहे.रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार वकिल, लष्कर, पोलीस आणि अग्निशमन दलाशी संबंधित लोक या दाव्यांमधील तथ्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे. वालब्रजिचमधील या ठिकाणी कधीच खोदकाम करण्यात आलेलं नाही. त्यामुळे याठिकाणी काय सापडेल याची कल्पना नसल्याचं एका अधिका-याने सांगितलं आहे.'ट्रेन एका बोगद्यात गायब झाली होती अशी अफवा आहे. त्यामध्ये सोनं आणि धोकादायक गोष्टी होत्या', असं इतिहासकार जोएना लेम्प्रास्का यांनी रेडिओ व्रोक्लाशी बोलताना सांगितलं आहे. 'या परिसरात अगोदरही शोधकार्य करण्यात आलं आहे, मात्र हाती काहीच लागलं नसल्याचंही', त्यांनी सांगितलं आहे.
==============================================
164 फूट उंचीवर चढून जवानाने फडकावला तिरंगा
- - ऑनलाइन लोकमतश्रीनगर, दि. 16 - 15 ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना काश्मीरमध्ये मात्र गेले काही दिवस सुरु असलेल्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारतीय जवानांनी काश्मीरमध्ये केलेल्या ध्वजारोहणामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. देशभरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं मात्र काश्मीरमधील त्राल परिसरात भारतीय जवानाने चक्क 164 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून भारतीय झेंडा फडकवला. याचा व्हिडीओही शूट करण्यात आला आहे.दक्षिण काश्मीरमधील त्राल भागात काही फुटीरतावाद्यांनी पाकिस्तानच्या स्वांतत्र्यदिनाला सुमारे 50 मीटर उंचीच्या या मोबाईल टॉवरवर पाकिस्तानचा झेंडा फडकावला होता. हा झेंडा काढून भारताचा झेंडा फडकवण्यासाठी भारतीय जवानांनी जिवाची बाजी लावली. विशेष म्हणजे भारतीय जवानांनी खात्मा केलेल्या बु-हान वानीचं हे गाव आहे. बु-हान वानीच्या हत्येमुळेच काश्मीर खो-यात अनेक ठिकाणी हिंसाचार सुरु असून अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे.यानंतर राष्ट्रीय रायफल्सच्या सचिन कुमार या जवानाने कमांडिग ऑफिसरकडून पाकिस्तानचा झेंडा हटवून भारतीय झेंडा फडकवण्याची परवानगी मागितली होती.
==============================================

No comments:
Post a Comment