[अंतरराष्ट्रीय]
१- वॉशिंग्टन; नव-याला परत मिळवण्यासाठी 'तिने' पोटच्या मुलीवर केला विषप्रयोग
२- लंडन; पुस्तके वाचाल, तर अधिक जगाल - एक अहवाल
३- इराणच्या अणू शास्त्रज्ञाला गुप्तरीत्या फाशी?
४- 'सार्क':भारतीय पत्रकारांनाही अपमानास्पद वागणूक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- काश्मीर: बुरहान वनीचे वडिल आंदोलनात
६- सर्वांत वेगवान मॅग्लेव्ह ट्रेन भारतात धावणार?
७- दिल्लीमध्ये दरदिवशी चार महिलांवर बलात्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- १४ महापालिकांमध्ये गगनचुंबी इमारतींना मुभा
९- परभणीतून आणखी एक आयसिस संशयित ताब्यात
१०- टेमघरच्या पाणीगळतीने धरणाला धोका नाही : गिरीश महाजन
११- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानींचा शपथविधी संपन्न
१२- उस्मानाबादमधील बलात्कार पीडितेचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा- शरद पवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा चारवर
१४- खडकवासला धरणातील पाणीसाठा 97 टक्के
१५- ‘जीएसटी’मधून मुंबईला वगळण्यात यावे - महापौर स्नेहल आंबेकर
१६- सांगली- बलात्कार पीडित महिलेची आत्महत्या
१७- उत्तराखंड- राज्यात पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
१८- परभणी : शहरात बालगृहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार
१९- नाशिक सातपुर- अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारात गोळी घालून एकाचा खून.
२०- आसाम कोक्राझारमध्ये जिथे दहशतवादी हल्ला
२१- उत्तरप्रदेशात चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- विराट कोहलीकडून ऑलिम्पिकपटूंना आगळंवेगळं प्रोत्साहन
२३- रिओ ऑलिम्पिक - पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
२४- 'रुस्तम' पाहिल्यानंतर लग्न मोडणार नाहीत - अक्षय कुमार
२५- माझ्यावर टीका करणे अधिक सोपे - पेस
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==========================================

पाहणी केल्यानंतर या धरणाला फार मोठा धोका नसल्याचं प्रमाणपत्रं महाजन यांनी देऊन टाकलं. त्यामुळे जलसंपदामंत्री महाजन कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणाच्या गळतीमुळे निर्माण झालेले प्रवाह पाहिल्यानंतर टेमघरला तडे तर गेले नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झालेल्या आनंदीबेन पटेल यांच्या नजीकच्या मानल्या जाणाऱ्या नऊ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर पाटीदार समाजातील नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे.
भाजप अध्यक्ष अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, डॉ. हर्ष वर्धन यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरही उपस्थित होते.

परभणीतून आणखी एक आयसिस संशयित ताब्यात
परभणी : परभणी जिल्ह्यातून आणखी एका आयसिस संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. इस्लामिक दहशतवादी संघटना आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन 24 वर्षीय शेख इकबाल शेख कबीर अहमद या तरुणाला एटीएसने ताब्यात घेतले आहे. परभणी शहरातील मदिना नगर भागात एटीएसने ही कारवाई केली.
याआधीही आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन परभणीतून दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. शाहीद खान आणि नासिरबेन असं याआधी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत. या दोघांच्या चौकशीनंतर परभणीत एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, शाहीद, नासिरबेन आणि शेख इकबाल शेख कबीर अहमद हे तिघेही मित्र आहेत. शेख इकबाल शेख कबीर अहमदवरील कारवाईला एटीएसनेही दुजोरा दिला आहे
==========================================
भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा चारवर
LIVE UPDATE : आणखी एक मृतदेह बाहेर काढला, मृतांचा आकडा 4 वर
LIVE UPDATE : मृतांची संख्या 3 वर, ढिगाऱ्याखाली आणखी 5 जण अडकल्याची भीती
LIVE UPDATE : भिवंडीत 206 इमारती धोकादायक, 17 इमारती अत्यंत धोकादायक – स्थानिक आमदार रुपेश म्हात्रे
LIVE UPDATE : मृतांची संख्या 2 वर, ढिगाऱ्याखाली 6 ते 7 जण अडकल्याची भीती
LIVE UPDATE : अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल
==========================================
टेमघरच्या पाणीगळतीने धरणाला धोका नाही : गिरीश महाजन
पुणे : टेमघर धरणाच्या भिंतीमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असली तरी धरणाला मोठा धोका नाही, असा अजब तर्क जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लावला आहे. धरणाच्या भिंतीतून होणाऱ्या पाणीगळतीची बातमी ‘एबीपी माझा’नं दाखवल्यानंतर काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टेमघर धरणाची पाहणी केली होती.
पाहणी केल्यानंतर या धरणाला फार मोठा धोका नसल्याचं प्रमाणपत्रं महाजन यांनी देऊन टाकलं. त्यामुळे जलसंपदामंत्री महाजन कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणाच्या गळतीमुळे निर्माण झालेले प्रवाह पाहिल्यानंतर टेमघरला तडे तर गेले नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.
गिरीश महाजन यांच्या माहितीनंतर टेमघरच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करु नका असा सल्ला जलतज्ज्ञ विजय पांढरे यांनी दिला आहे. त्यामुळे महाजन यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
==========================================
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानींचा शपथविधी संपन्न
गांधीनगर : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी विजय रुपानी यांनी आज शपथ घेतली, नितीन पटेल यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झालेल्या आनंदीबेन पटेल यांच्या नजीकच्या मानल्या जाणाऱ्या नऊ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर पाटीदार समाजातील नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे.
राज्यपाल ओ पी कोहली यांनी 60 वर्षीय रुपानींना पदाची शपथ दिली. रुपानींव्यतिरिक्त उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि सात अन्य कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. एकूण 16 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. गुजरातच्या मंत्रिमंडळात सध्या 25 मंत्र्यांचा समावेश आहे.
भाजप अध्यक्ष अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, डॉ. हर्ष वर्धन यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरही उपस्थित होते.
==========================================
विराट कोहलीकडून ऑलिम्पिकपटूंना आगळंवेगळं प्रोत्साहन
मुंबई : रिओ ऑलिम्पिक 2016 साठी 119 खेळाडूंचा संघ रवाना झाला आहे. या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
एका स्पोर्ट्स ड्रिंकच्या जाहिरातीमध्ये विराटने सर्व ऑलिम्पिकपटूंना प्रोत्साहन दिलं आहे. रिओमध्ये भारताची मान उंचावण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
ज्या देशात क्रिकेट कोट्यवधी लोकांच्या रक्तात धावत आहे, त्याच देशात काही खेळाडू असेही आहेत ज्यांच्या जिद्दीला तोड नाही, असं विराटने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ :
==========================================
रिओ ऑलिम्पिक - पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
- ऑनलाइन लोकमतरिओ दी जानेरो, दि. ७ - रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. अमेरिका आणि जापानने सर्वाधिक पाच पदके जिंकली असली तरी, ऑस्ट्रेलियाने दोन सुवर्ण आणि एक कास्य अशी तीन पदके मिळवून पदक तालिकेत पहिले स्थान मिळवले.ऑस्ट्रेलियाने जलतरणात दोन सुवर्ण आणि तिरंदाजीत एक कास्यपदक मिळवले. त्याखालोखाल हंगेरीने दोन सुवर्णपदके मिळवली. अमेरिकेने जलतरणात तीन आणि तिरंदाजीत एक रौप्यपदक मिळवले. वर्जिनिया थ्राशरने दहा मीटर एअर रायफलमध्ये अमेरिकेसाठी पहिले सुवर्णपदक मिळवले.दक्षिण कोरियाने तिरंदाजीमध्ये एक सुवर्ण आणि ज्युडोमध्ये एक रौप्य पदक मिळवून चौथे स्थान मिळवले. जापानने जलतरणात एक सुवर्ण वेटलिफ्टिंग, जलतरणात प्रत्येकी एक आणि ज्युडोमध्ये दोन कास्यपदक जिंकून पाचवे स्थान मिळवले.
==========================================
'रुस्तम' पाहिल्यानंतर लग्न मोडणार नाहीत - अक्षय कुमार
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ७ - आपल्या आगामी 'रुस्तम' चित्रपटाचा विषय पूर्णपणे वेगळा असून महिलांना आवडेल असा हा विषय आहे. या चित्रपटामुळे घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल. लोकांची लग्ने मोडणार नाहीत असा विश्वास 'रुस्तम'च्या प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केला.हा विषय पूर्णपणे वेगळा असून, ख-या आयुष्यात घडलेल्या घटनेवर ही कथा आधारीत आहे. या निमित्ताने प्रथमच पारसी नौदल अधिका-याची व्यक्तीरेखा पडद्यावर साकारणार आहे असे अक्षयने सांगितले. या चित्रपटातून कुठली एक गोष्ट तुला घ्यायला आवडेल या प्रश्नावर अक्षयने हा चित्रपट भरपूर काही देणारा आहे असे उत्तर दिले.हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांचे घटस्फोट कमी होतील. अनेकांचे वैवाहीक आयुष्य वाचेल असे अक्षयने सांगितले. विवाहबाह्य संबंधांवर या चित्रपटाचे कथानक आधारीत आहे. नौदलात अधिकारी असणा-या अक्षय कुमारला जेव्हा पत्नी आपल्या पाठिमागे फसवणूक करत असल्याचे समजते. तेव्हा तो पत्नीच्या प्रियकराची हत्या करतो.
==========================================
१४ महापालिकांमध्ये गगनचुंबी इमारतींना मुभा
- मुंबई : राज्यातील १४ ड वर्ग महापालिकांमध्ये १५ मजली इमारती उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसेच, या महापालिकांमध्ये पहिल्यांदाच हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला मोठी चालना मिळेल. या सर्व महापालिकांसाठी एकसमान विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) लागू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शानिवारी मंजुरी दिली.या महापालिकांमध्ये परभणी, लातूर, जळगाव, अहमदनगर, धुळे, चंद्रपूर, सोलापूर, सांगली-मिरज, मालेगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड-वाघाळा, अकोला, अमरावती यांचा समावेश आहे. आतापर्यंत या महापालिकांमध्ये वेगवेगळे डीसीआर होते. त्यामुळे सुसुत्रता नव्हती.
==========================================
नव-याला परत मिळवण्यासाठी 'तिने' पोटच्या मुलीवर केला विषप्रयोग
- वॉशिंग्टन, दि. ७ - सोडून गेलेल्या नव-याला परत मिळवण्यासाठी एका निदर्यी महिलेने आपल्या १७ महिन्यांच्या मुलीवर मीठाचा विषप्रयोग केला. ज्यामध्ये मुलीचा मृत्यू झाला. अमेरिकेतील स्पारटानबर्ग शहरात ही घटना घडली. किमबर्ली मार्टीन्स असे आरोपी महिलेचे नाव आहे.तिने पीयटॉन या आपल्या १७ महिन्याच्या मुलीवर मीठाचा विषप्रयोग केला. किमबर्लीला सोडून गेलेल्या नव-याला कुठल्याही परिस्थिती आपल्या आयुष्यात परत आणायचे होते. त्यासाठी तिने नव-याचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कृत्य केले. ज्यामध्ये निष्पाप १७ महिन्यांच्या मुलीला आपल्या प्राणास मुकावे लागले.किमबर्लीने पीयटॉनला चमच्याने मीठ भरवले त्यानंतर तिला पेय पाजले. पीयटॉनच्या रडण्याच्या आवाजाने मला रविवारी जाग आली. ती तापाने फणफणत होती. तिला लगेच रुग्णालयात दाखल केले असे किमबर्लीने पोलिसांना सांगितले. पीयटॉन उपचारांना प्रतिसाद देत नव्हती.डॉक्टरांनी तिला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवले होते. अखेर बुधवारी तिचा मृत्यू झाला. किमबर्लीची बहिण टीफअॅनी लिझरने किमबर्लीवरचे आरोप फेटाळून लावले. किमबर्ली असे कधी करु शकत नाही. ती अत्यंत चांगली आई आहे असे तिने सांगितले. गुन्हा सिद्ध झाल्यास किमबर्लीला २० वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
==========================================
पुस्तके वाचाल, तर अधिक जगाल
- लंडन : पुस्तक वाचनामुळे ज्ञानात भर पडते हे तुम्ही ऐकले असेल; परंतु पुस्तक वाचनाचा आणखी एक फायदा समोर आला आहे. तो समजल्यानंतर एरवी पुस्तक समोर येताच डुलकी लागणारे महाभागही नित्यनेमाने त्यांचे वाचन करू लागतील. चांगल्या पुस्तकाचे तल्लीनतेने वाचन करण्याने आयुष्य वाढते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.
येल विद्यापीठाने हा अभ्यास केला. अभ्यासकांनी ३५०० हून अधिक महिला तसेच पुरुषांचे आरोग्य आणि त्यांच्या सवयींचा सलग १२ वर्षे अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. चांगली कथा वाचल्याने मेंदू सक्रीय राहून तणावापासूनही मुक्ती मिळते, असे अमेरिकन संशोधकांना आढळून आले आहे. दररोज ३० मिनिटे वाचन करण्याची सवयही उपयुक्त ठरू शकते. दैनिके व नियतकालिकांपेक्षा पुस्तक वाचनाने बुद्धी अधिक सक्रीय रहाते आणि त्यामुळे आयुष्य वाढते, असे या संशोधकांनी सांगितले. अभ्यासाच्या प्रारंभी किमान ५० वर्षे वयाच्या लोकांना तुम्ही पुस्तके, वृत्तपत्रे व नियतकालिकांचे नियमित वाचन करता का, करत असल्यास वाचनाला किती वेळ देता, तुमचे आरोग्य कसे आहे आणि तुम्ही विद्यापीठात शिक्षण घेतले आहे काय, यासारखे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. या अभ्यासात वाचन करणाऱ्या लोकांच्या तुलनेत वाचनाची आवड असणारे लोक अधिक काळ जगल्याचे आढळले. या अभ्यासाचे निष्कर्ष सोशल सायन्स अॅण्ड मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. अभ्यासादरम्यान पुस्तकांचे वाचन करणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण इतरांच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांनी कमी राहिले. वेगवेगळ््या शैलीचे पुस्तक वाचण्याचा वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. यापूर्वीच्या एका संशोधनात पुस्तक स्क्रीनवर वाचण्याऐवजी कागदावर आणि शाहीने लिहीलेला मजकूर वाचणे अधिक फायद्याचे असते, असे आढळले होते. (वृत्तसंस्था)संशोधक बेक्का लेवी यांनी सांगितले की, ६५ वर्षांहून अधिक वयाचे लोक दररोज साडेचार तास टीव्ही पाहतात. हा वेळ पुस्तक वाचनात व्यतित करणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरू शकते. दैनंदिन सवयींत पुस्तक वाचनाला समावेश करणे फायद्याचे आहे.
==========================================
No comments:
Post a Comment