Tuesday, 30 August 2016

नमस्कार लाईव्ह ३०-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ३०-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय] 
1- भूमध्य सागरातून दोन जुळ्यांसह 6500 शरणार्थींची सुटका
2- अमेरिकेला वापरता येणार भारतीय नौदलाचे तळ
3- लिट्टेचा नेता प्रभाकरन जिवंत असू शकतो?
4- मांझीला बहारीनचे पंतप्रधान देणार मदत
5- लॉस एंजेल्स विमानतळावर गोळीबाराची अफवा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
6- विजय मल्ल्या यांनी मुद्दामच दडविली संपत्तीची माहिती!
7- दोन हजार कोटींचा हवाला घोटाळा?
8- इन्फोसिसचा टीसीएस फॉर्म्युला !
9- भारत पूर्वीपेक्षा सध्या अधिक मजबूत स्थितीत
10- खरिपाच्या मुहुर्तालाच शेतक-यांवर सुलतानी संकट!
11- 2 सप्टेंबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएतनामच्या दौ-यावर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
12- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे - शरद पवार 
13- मुंबईतील कामगार चळवळीचा केंद्रबिंदू कोसळला 
14- बेस्टला वर्षाला ९०५ कोटींचा तोटा
15- मेट्रोतून मांसवाहतूक करण्यास बंदी कायम
16- प.रे.ची ‘हार्बर वाहतूक सेवा’ मध्य रेल्वेकडे ?
17- अर्शीद कुरेशी, रिझवान खानचा ताबा मुंबई पोलिसांकडे
18- दहीहंडी अवमान याचिकेवरील सुनावणी २० सप्टेंबरला
19- किडनी रॅकेट - पत्राकडे दुर्लक्ष करणे पडले महागात
20- सरकारी अनास्थेचा बळी; मोखाड्याच्या सागर वाघ याचा कुपोषणाने मृत्यु 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
20- रुग्णालयाने प्रवेश नाकारला, मुलाने पित्याच्या खांद्यावर सोडले प्राण 
21- आकाशातून असा दिसतो मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे 
22- पुणे - गैरहजर, बडतर्फ कर्मचाऱ्यांना एसटीकडून पुन्हा कामाची संधी 
23- पंढरपूर - सोलापूर महामार्गावर टमटम व स्कॉर्पिओचा अपघात 
24- गाझियाबादमध्ये वादळी वा-यासह मुसळधार पावसाला सुरुवात 
25- औरंगाबाद- जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय 
26- 1500 रुपयांची लाच घेताना खेड न्यायालयातील लिपिकाला रंगेहाथ पकडले 
27- नाशिकच्या तरुणाचे अपहरण करून पुण्यात बळजबरीने विवाह 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
28- आर्चीत दिसली वैजयंतीमाला यांची झलक !  
29- मोसमाच्या अखेर भारत अव्वल स्थान पटकावू शकतो - धोनी 
30- आॅलिम्पियन महिला हॉकी संघाला रेल्वेत करावा लागला खडतर प्रवास 
31- ...आणि राष्ट्रपतींनी स्टेजच्या खाली येऊन दिला पुरस्कार 
32- सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार प्रदान 
33- बीफ खाल्ले म्हणून बोल्टने नऊ सुवर्णपदके मिळवली - भाजप खासदार 
34- पावसाच्या जोरावर विंडिजने जिंकली मालिका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
==================================

    मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे - शरद पवार

  • मुंबई, दि. ३० - अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर दलितांकडून नव्हे, स्थानिक नेतृत्वाकडून होतोय. त्यामुळे अॅट्रोसिटीचा गैरवापर होऊ नये यावर प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे. तीच आमची भूमिका आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सांगितले. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते.

    अॅट्रोसिटी कायदा पूर्णपणे रद्द करा अशी आमची भूमिका नाही. अॅट्रोसिटीचा गैरवापर दलितांनी नव्हे राजकारणासाठी स्थानिक पुढा-यांनी केला असे शरद पवार यांनी सांगितले. सध्या मराठा समाजाचे जे मोर्चे निघत आहेत ते योग्य आहेत, सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे असे पवारांनी सांगितले.
    ओबीसी आरक्षणला धक्का न लावता आर्थिक दृष्टया मागास मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे शरद पवार यांनी सांगितले. मराठवाडयात इसिसशी संबंध असल्याच्या संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे असल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील मुस्लिम संघटनांनी आधीच इसिसचा निषेध केला आहे असे शरद पवार यांनी सांगितले.  
==================================
मुंबईतील कामगार चळवळीचा केंद्रबिंदू कोसळला


  • मुंबई, दि. 30 - दक्षिण मुंबईत जुन्या इमारती कोसळणं हे दरवर्षी पावसाळ्यात ठरलेलंच असतं. तशीच एक इमारत मंगळवारी सकाळी कोसळली. त्याचा फारसा धक्का बसला नाही. त्यातही ती आधीच रिकामी करण्यात आली होती, त्यामुळे मनुष्यहानी झाली नाही, हे वाचून बरं वाटलं. मग दुपारी एक निरोप आला... अरे, २0४, राजा राममोहन राय मार्ग ही इमारत कोसळलीय. 
    खरं तर या पत्त्यावरून अगदी मुंबईकरांनाही फारसा बोध होणार नाही. तरीही २0४, राजा राममोहन राय मार्ग ही इमारत कोसळली, हे कळताच धक्का बसला. सलग तीन वर्षं त्या इमारतीत जाणं होतं. ती इमारत म्हणजे मुंबईतील कामगार चळवळीचा केंद्रबिंदू होती. मुंबईतील हॉटेल कामगार, थिएटर कामगार, महापालिका शिक्षक, अग्निशामक दल कर्मचारी, महापालिका नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफ, महापालिका कामगार व कर्मचारी, बेस्ट कामगार, फेरीवाले, गुमास्ता, टॅक्सीवाले या साऱ्यांच्या आंदोलनांचं ते केंद्रच होतं बरीच वर्षं. वास्तविक कामगार चळवळीचं केंद्र गिरगावात हे आश्चर्य वाटण्यासारखं. पण तसं होतं खरं. 
==================================

रुग्णालयाने प्रवेश नाकारला, मुलाने पित्याच्या खांद्यावर सोडले प्राण



  • कानपूर, दि. ३० - ओडिसामध्ये रुग्णालयाने गाडी देण्यास नकार दिल्याने एका आदिवासी व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन घेऊन जावा लागल्याची घटना ताजी असताना आता उत्तरप्रदेशातील एका सरकारी रुग्णालयाच्या असंवेदनशीलतचे उदहारण समोर आले आहे. 
    रुग्णालयाने कोणत्याही प्रकारची मदत न केल्याने अखेर 'त्या' १२ वर्षाच्या मुलाने पित्याच्या खांद्यावरच आपले प्राण सोडले. सुनील कुमार यांचा मुलगा अंश तापाने फणफणत होता. सुनील कुमार त्याला घेऊन कानपूरच्या लाला लजपत राय रुग्णालयात गेले. 
    पण रुग्णालय प्रशासनाने अंशला दाखल करुन घेण्यास नकार देत त्याला बाल रुग्णलायात जाण्यास सांगितले. अंशची प्रकृती नाजूक असूनही रुग्णालयाने रुग्णवाहिका किंवा स्ट्रेचर अशी कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे सुनील कुमार मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने निघाले. मात्र रस्त्यातच अंशने पित्याच्या खांद्यावर प्राण सोडले. 

==================================

आर्चीत दिसली वैजयंतीमाला यांची झलक !



  • मुंबई, दि. ३० - 'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुनं सध्या रसिकांवर मोहिनी घातलीय. ती जिथं जाईल तिथे चाहत्यांचा गराडा तिच्याभोवती जमा होतो. तिच्या फॅन्सना आवरण्यासाठी तर चक्क बाऊन्सर आणि पोलिसांनाही पाचारण करावं लागलंय. रुपेरी पडद्यावरील आर्चीची अशी क्रेझ वाढत असताना एका वाहिनीवरील कार्यक्रमातील तिच्या लूकमुळे वेगळी चर्चा रंगलीय. 
    या कार्यक्रमात परफॉर्मन्समधला आर्चीच्या लूकमध्ये अनेकांना हिंदी चित्रपटसृष्टीच्या ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला यांची झलक दिसली. 'वडकई' या तमिळ सिनेमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या वैजयंतीमाला यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय आणि नृत्यानं रसिकांची मनं जिंकली.  
    दोन दशकांहून अधिक काळ हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणा-या वैजयंतीमाला या प्रसिद्ध नृत्यांगणासुद्धा होत्या. त्यामुळं अभिनयासह त्यांच्या नृत्याचीही कायम चर्चा व्हायची. आता आर्ची अर्थात रिंकूच्या त्या परफॉर्मन्समुळं अनेकांना वैजयंतीमाला यांची झलक दिसलीय. त्यामुळं तिच्यासाठी ही तुलना नक्कीच नवी प्रेरणा देणारी म्हणावी लागेल.

==================================

आकाशातून असा दिसतो मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे



  • लोणावळा, दि. 30-  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लेनची शिस्त मोडणे, अतिवेगाने वाहने चालविणे आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणाऱ्यांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची २४ तास नजर राहणार आहे. द्रुतगती मार्गावर शिस्त लावण्यास ४ ठिकाणी ड्रोन कॅमेरे बसविण्याचे प्रात्यक्षिक शनिवारी घेण्यात आले. या वेळी लेनची शिस्त मोडणाऱ्या काही अवजड वाहनांविरोधात कारवाईदेखील करण्यात आली. मात्र यानिमित्ताने मुंबई - पुणे एक्स्पेस-वे आकाशातून दिसतो कसा हेदेखील पाहण्याची संधी मिळाली. 
    द्रुतगती महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात लेन कटिंग करणाऱ्या, अतिवेगाने वाहने चालविणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी चार ठिकाणी ड्रोन कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचे पहिले प्रात्यक्षिक व सर्वेक्षण महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महामार्ग पोलीस निरीक्षक अजय बारटक्के, सुधीर अस्पत, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम जोशी, एम. आर. काटकर यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. 
==================================

No comments: