Sunday, 14 August 2016

नमस्कार लाईव्ह १३-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानचे दुटप्पी धोरण; पुंछमध्ये गोळीबार 
२- अमेरिकेत बांगलादेशी इमामाची दिवसाढवळ्या हत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- जे. डे दाऊदला माहिती पुरवत असल्याचा छोटा राजनला संशय 
४- पाक राजदूताला 24 तासात परत पाठवा: सेना 
५- वादग्रस्त पोस्टरमुळे योगी आदित्यनाथ अडचणीत 
६- शेतकरी दिन आता तिथीनुसार! 
७- नवज्योतसिंह सिद्धू 'आप'मध्येच जाणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- वाहून गेलेल्या ‘तवेरा’ कारचे अवशेष व दोन मृतदेह आढळले 
९- मुंबई शहरात चिमुकले अजूनही असुरक्षितच 
१०- मराठी माणसांना हद्दपार करण्याचा डाव 
११- वेगळ्या विदर्भाचा आधी अभ्यास करा - सुमित्रा महाजन. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- बीड - धान्य घोटाळा प्रकरणी जिल्हयातील शासकीय गोदामांची होणार चौकशी. 
१३- नांदेड - शिक्षिकेने रागावल्यामुळे 8 वी तील विद्यार्थिनीची आत्महत्या 
१४- अहमदनगर - जिल्हा रुग्णालयात एका कर्मचा-याचा ह्रदयविकाराने मृत्यू 
१५- राजधानी दिल्लीला पुराचा इशारा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- उपांत्य फेरीत सानिया मिर्झा व बोपन्ना पराभूत 
१७- स्ट्रक्चरल आॅडिटने टळेल इमारतीचा धोका... 
१८- २३ सुवर्ण पदके प्राप्त करणारा मायकेल फेल्प्स निवृत्त 
१९- रिओत साईना नेहवालचा पराभव 
२०- अमेरिकेने ऑलिंपिकमध्ये जिंकली 1000 सुवर्ण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
======================================

पाकिस्तानचे दुटप्पी धोरण; पुंछमध्ये गोळीबार

  • First Published :14-August-2016 : 15:17:37

  • Powered By Triangulumपुंछ/वाघा : एकीकडे वाघा सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना (बीएसएफ)मिठाईचे वाटप करायचे, आणि दुसरीकडे पुंछमध्ये गोळीबार करायचा असे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण समोर आले असून, स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी पाकिस्थाने पुंछमध्ये सीमा नियंत्रण रेषेपलीकडून जोरदार गोळीबार व उखळी (मोर्टार)तोफांचा मारा करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लघंन केले. पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून पाकला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
    पुंछमध्ये गोळीबार सुरू असताना पाकिस्तानकडून वाघा सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) मिठाईचे वाटप करण्यात आले. ‘आझादी का जश्न’ म्हणून पाकच्या वतीने बीएसएफच्या जवानांना मिठाईचे वाटप करण्यात आले. स्वत:च्या स्वातंत्र्यदिनी पाकने गोळीबार केल्याच्या वृत्ताला भारताच्या संरक्षण प्रवक्त्यानेही दुजोरा दिला आहे.
======================================

वाहून गेलेल्या ‘तवेरा’ कारचे अवशेष व दोन मृतदेह आढळले

  • First Published :14-August-2016 : 11:05:00Last Updated at: 14-August-2016 : 14:41:44

  • महाड - तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेला रविवारी १२ दिवस पूर्ण झाले. वाहून गेलेल्यांचा शोध घेणाऱ्या भारतीय नौदलाच्या जवानांना कोसळलेल्या पूलापासून ३00 मिटर अंतरावर, एमएच 0४ जीडी ७८३७ या क्रमांकाच्या ‘तवेरा’ कारचे अवशेष सापडले. ४ ते ५ मिटर पाण्याखाली सापडलेल्या या कारच्या अवशेषांबरोबरच दोन मृतदेह सापडल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी सतिष बागल यांनी दिली. शोध पथकाला शनिवारी दुपारी दुसरी बस सापडली होती. 
======================================

उपांत्य फेरीत सानिया मिर्झा व बोपन्ना पराभूत

  • First Published :14-August-2016 : 03:00:00Last Updated at: 14-August-2016 : 06:16:53

  • ऑनलाइन लोकमत
    रिओ, दि. १४ - सानिया मिर्झा आणि रोहण बोपन्ना यांना रिओ ऑलिम्पिक टेनिसच्या मिश्र दुहेरी स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभवला सामोरे जावे लागले. 
    उपांत्य फेरीत सानिया मिर्झा आणि रोहण बोपन्ना या जोडीचा अमेरिकेच्या व्हिनस आणि राजीव या जोडीने २-६, ६-२, १०-३ असा पराभव केला. सानिया मिर्झा आणि रोहण बोपन्ना या जोडीने जर विजय मिळविला असता तर भारताचे एक पदक निश्चित होते. मात्र, आता उपांत्य फेरीत पराभव झाल्यामुळे या जोडीला कांस्य पदक जिंकण्यासाठी खेळावे लागणार आहे. आत्तापर्यंत भारताने आॅलिम्पिक टेनिसमध्ये पेसच्या कांस्याच्या रूपात एकच पदक जिंकले आहे.
    सानिया मिर्झा आणि रोहण बोपन्ना यांनी ऑलिम्पिक टेनिसच्या मिश्र दुहेरीत ब्रिटनची जोडी अ‍ॅण्डी मरे-हिथर वाटसन यांच्यावर सहज विजय नोंदवित ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली होती. 

======================================

पाकच्या ताब्यातून काश्मीर मुक्त करू !

  • First Published :14-August-2016 : 06:24:19

  • घघवाल (पंजाब) : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले एकतृतीयांश काश्मीरही भारताचेच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र
    मोदी यांनी ठणकावून सांगितल्याच्या लगेच दुसऱ्याच दिवशी मूळचे काश्मीरचे असलेले त्यांच्या कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी पाकिस्तानने गिळलेले कामीर मुक्त करण्यासाठी मोदी सरकार आवश्यक ते सर्व काही करेल, अशी ग्वाही शनिवारी दिली. जितेंद्र सिंग यांनी पाकिस्तान सीमेजवळील या गावापासून ‘तिरंगा यात्रा’ सुरू केली आणि पाकिस्तानने बेकायदा बळकावलेले काश्मीर मुक्त करण्यासाठी रीतसर चळवळ सुरू करण्याचा संदेश दिला.
    येथून कथुआ येथे ‘तिरंगा यात्रा’ रवाना करताना जितेंद्र सिंग म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यातील एक लढाई अद्यापही बाकी आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त करून त्यांचे भारताशी पुनर्मिलन घडविणे यासाठी ही लढाई असेल. (वृत्तसंस्था)
    यात्रेचे ठिकाण महत्त्वाचे
    या यात्रेसाठी निवडलेले घघवाल हे ठिकाण त्याचे भौगोेलिक स्थान व तेथून दिला जाणारा संदेश या दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे आहे. हे गाव सांबा आणि कथुआ या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. गेल्या दोन वर्षांत या दोन्ही जिल्ह्यांत पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्यांकडून दहशतवादी हल्ले झालेले आहेत.
    पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादसह कोटली व तेथील इतर भागांत भारताचा तिरंगा फडकेल तेव्हाच ‘तिरंगा यात्रे’ची खरी सांगता होईल, असे सांगून ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी औपचारिक व निरंतर चळवळ उभी करण्याचा संदेश येथून निघत असलेल्या यात्रेतून जाण्याची गरज आहे.

======================================

No comments: