Thursday, 11 August 2016

नमस्कार लाईव्ह ११-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- शिकागो; भाग्यवान दाम्पत्य; मृत्यूही त्यांची फारकत करू शकला नाही!  
२- लंडन; IQ टेस्टमध्ये दहा वर्षाच्या मुलानं आइनस्टाइन आणि हॉकिंगला टाकले मागे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
३- RBI गव्हर्नरपदाचा कार्यकाळ वाढवण्यास तयार, पण सरकारशी एकमत नाही: राजन 
४- कायदा तोडण्याची परवानगी कोणताच धर्म देत नाही! 
५- प्रसूती राज विधेयक राज्यसभेत सादर, १२ आठवडयांवरुन २६ आठवडयांच्या रजेचा प्रस्ताव. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
६- किडनी रॅकेट राज्यभर; ६३ कोटींचे व्यवहार
७- भ्रष्ट मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवू
८- ‘आमदारांची वेतनवाढ योग्यच’ - सुधीर मुनगंटीवार
९- शाळांच्या परीक्षेतही ‘सैराट झालं जी...’
१०- मनमाडमध्ये कांद्याचा लिलाव खुल्या पद्धतीने 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
११- कल्याणः लोकलमध्ये दारु पार्टी, प्रकार कॅमेऱ्यात कैद 
१२- नगरमध्ये भाजपच्या शिवाजीराजे धुमाळ यांना मारहाण 
१३- गडचिरोलीतील इंदिरा चौकात स्फोटकांनी भरलेली बॅग सापडल्याने खळबळ 
१४- नागपूर : हॉटेलमधील रबडी खाल्ल्याने १० जणांना विषबाधा 
१५- सोलापूर : फौजदार चावडी पोलिसानी गुटखा पकडला 
१६- अहमदनगर - पुणे महामार्गावर टँकरसाठी चास गाावात रास्तारोको 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
१७- खेळाडूंचा अपमान करणा-या शोभा डेंना सचिन तेंडूलकरचं चोख उत्तर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
============================================

महाड दुर्घटना : बेपत्ता एसटीचं लोकेशन सापडलं

महाड दुर्घटना : बेपत्ता एसटीचं लोकेशन सापडलं
महाड (रायगड) : सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या 9 दिवसानंतर बेपत्ता एसटी बसचा शोध लागला आहे. तब्बल नऊ दिवसानंतर महाड इथे दोन बसेसचे सांगाडे कुठे आहेत याचा माग काढण्यात नेव्हीला यश आलं आहे.

कोसळलेल्या पुलापासून 200 मीटर अंतरावर एसटी असल्याचं सांगण्यात येत आहे. ही एसटी बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली आहे.

============================================

आर्चीला पाहण्यासाठी चाहते 'सैराट', कराड-सोलापूर वाहतूक बंद

आर्चीला पाहण्यासाठी चाहते 'सैराट', कराड-सोलापूर वाहतूक बंद
सांगली : ‘सैराट’ सिनेमातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची क्रेझ अद्यापही कमी झालेलं नाही. बीडपाठोपाठ आता सांगलीच्या विट्यामध्ये याचा प्रत्यय आला. एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी विट्यामध्ये पोहोचलेल्या रिंकूला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

आर्चीची एक झलक पाहण्यासाठी चाहते सैराट झाले आहेत. हे हॉटेल कराड-सोलापूर रस्त्यावर असल्याने हा रस्ताही गर्दीने फुलून गेला आहे. हा रस्ता बंद करुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

दरम्यान, रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी झालेली गर्दी आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. पोलिसांनी उपस्थित चाहत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर हुल्लडबाजी केल्यास लाठीमार करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

============================================

बुलडाण्यात तलाठी पदाच्या 13 जागांसाठी भरती

बुलडाण्यात तलाठी पदाच्या 13 जागांसाठी भरती
बुलडाणा: बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या १३ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबतची माहिती महान्यूज या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 21  ऑगस्ट 2016 आहे. अधिक माहिती www.buldhana.nic.in किंवाhttp://maharecruitment.mahaonline.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करु शकतात. अधिक माहिती www.buldhana.nic.in या वेबसाईटवर उजव्या बाजूला देण्यात आली आहे.

============================================

नाशिकमध्ये खुल्या पद्धतीनं कांदा विक्रीला सुरुवात

नाशिकमध्ये खुल्या पद्धतीनं कांदा विक्रीला सुरुवात
नाशिक : गेल्या महिन्याभरापासून आडतबंदीच्या निर्णयावरुन ठप्प असलेले कांद्याचे लिलाव आज पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. काल पिंपळगाव बाजार समितीत झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत कांद्याचा खुल्या पद्धतीने लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज सकाळपासून मनमाड, लासलगावच्या बाजारपेठेत लिलाव सुरु झाले आहेत.  महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची आडत न स्वीकारता लिलाव झाले आहेत.

दरम्यान, याप्रश्नावर काल नवी दिल्लीत राधामोहन सिंग, नितीन गडकरी, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी केंद्र सरकारनं 50 टक्के कांदा विकत घ्यावा आणि उरलेला 50 टक्के कांदा राज्यानं विकत घ्यावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

============================================

हेश मोतेवारची पत्नी लीना मोतेवारला अटक

महेश मोतेवारची पत्नी लीना मोतेवारला अटक
पुणे : समृद्ध जीवनचे संस्थापक महेश मोतेवारची पत्नी लीना मोतेवारला अटक करण्यात आली आहे. सीआयडीने बुधवारी रात्री ही कारवाई केली. अनेक कंपन्यांमधील गैरव्यवहाराप्रकरणी लीना मोतेवारला अटक केली आहे.

============================================

झाकीर नाईकच्या खात्यावर परदेशातून 60 कोटी


झाकीर नाईकच्या खात्यावर परदेशातून 60 कोटी
मुंबईः इस्लामचा धर्मप्रसारक झाकीर नाईकच्या बँक खात्यावर गेल्या तीन वर्षात परदेशातून 60 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली. नाईकच्या कुटुंबातील 5 सदस्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे.

पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. पोलिसांनी नाईकच्या देवाणघेवाणीबद्दल तपास केला असता ही बाब उघड झाली. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा अहवाल पोलिसांनी नुकताच मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

============================================

पठाणकोट हल्ल्यातील शहीद लेफ्टनंट कर्नलच्या घरावर हातोडा

पठाणकोट हल्ल्यातील शहीद लेफ्टनंट कर्नलच्या घरावर हातोडा
बंगळुरुः पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजन यांच्या घरावर अतिक्रमण हटाव विभागाने हातोडा चालवला आहे. अतिक्रमणामध्ये आलेला भाग अतिक्रमण हटाव अभियानाअंतर्गत तोडण्यात आला आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे निरंजन यांचं कुटुंब संकटात सापडलं आहे.

Niranjan_House.1-300x192 (1)

घरात ज्या खोलीत कर्नल निरंजन राहत होते, तो भागही तोडण्यात आला आहे. त्यामुळे घरासोबतच निरंजन यांच्या आठवणीही पुसल्या गेल्या आहेत, अशी उद्विग्न भावना कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

============================================

सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेण्डसोबत लवकरच लग्नाच्या बेडीत?

सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेण्डसोबत लवकरच लग्नाच्या बेडीत?
मुंबई : बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा लवकरच तिच्या कथित बॉयफ्रेण्ड बंटी सचदेवसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. सोनाक्षी आणि बंटी बऱ्याच दिवसांपासून एकत्र दिसत होते. सुत्रांच्या माहितीनुसार, सोनाक्षी आणि बंटी लवकरच सात फेरे घेणार आहेत.

सोनाक्षी सध्या तिच्या चित्रपटांचं आणि जाहिरातींचं काम आटोपण्याच्या प्रयत्नात आहे, जेणेकरुन तिला तिच्या खाजगी आयुष्याकडे लक्ष देता येईल.

============================================

नागपुरात स्वयंघोषित गोरक्षकाकडून गायींची विटंबना

नागपुरात स्वयंघोषित गोरक्षकाकडून गायींची विटंबना
नागपूर : नागपूरच्या कुही गावातील स्वयंघोषित गोरक्षकाकडून गायींची विटंबना सुरु आहे. इथल्या गोशाळेत जवळपास 100 गायी मरणासन्न अवस्थेत जगत आहेत. धक्कादायक म्हणजे मेलेल्या गायींची थेट तलावात विल्हेवाट लावली जात असल्याचं समोर आलं आहे.

बजरंग दलाचा माजी नेता आणि गोहत्या निवारक प्रचार समितीचा संचालक दत्तूराम जिभकाटेने गोरक्षण नावाचा ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टच्या नावाखाली त्याने अडीच एकर सरकारी जमिनीवर अतिक्रमणही केलं. मात्र आरोग्य आणि चारा-पाण्याच्या समस्येमुळे या गोशाळेत गायी मृत्यूच्या दारात उभ्या आहेत.

============================================

No comments: