Monday, 29 August 2016

नमस्कार लाईव्ह २९-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २९-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र 


सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[अंतरराष्ट्रीय] 

1- लॉस एंजेल्स विमानतळावर गोळीबाराची अफवा

2- ब्रसेल्समध्ये पोलिस इमारतीत बॉम्बस्फोट

3- स्तनाच्या कर्करोगावरील उपचार शोधला

4- १४५ वर्षांच्या गोथोंना जगाचा घ्यायचाय निरोप

5- पाकिस्तानच्या १३ टीव्ही वाहिन्यांना दंड

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राष्ट्रीय] 

5- संघाच्या नव्या गणवेशावर स्वयंसेवकांच्या उड्या

6- बाबा रामदेव उभारणार विद्यापीठ

7- गणेशोत्सवात घ्या सुराज्याचा नवमंत्र

8- कामगारांचा देशव्यापी संपाचा इशारा

9- जीएसटीसाठी हिवाळी अधिवेशन लवकर

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

10- दहीहंडीवरुन राज यांच्या विरोधात याचिका दाखल 

11- अरुण दातेंच्या मुलाच्या नशिबी भिकाऱ्याचे जिणे 

12- मुंबई पालिकेची आर्थिक स्वायत्तता केंद्राकडे देण्यास विरोध

13- टॅक्सी-रिक्षांचा संप अखेर मागे

14- ई. भारतातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्या

15- हेक्स वर्ल्ड प्रकल्पावर गुंतवणूकदारांची धडक

16- जीएसटीच्या नावाखाली मुंबई तोडण्याचा डाव

17- दुष्काळग्रस्तांचे शहरात स्थलांतर

18- दहीहंडीवरुन राज यांच्या विरोधात याचिका दाखल

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

19- सांगली; राजकीय वादातून दोन गटात हाणामारी

20- दिल्ली- मुसळधार पावसामुळे रामकृष्ण आश्रम रस्त्यावरील मेट्रो स्टेशनजवळ पूरस्थिती

21- पुणे - राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल  

22- उस्मानाबाद - आरोग्य विभागा च्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये जिल्हाभरात 47 बोगस डॉक्टर आढळून आले

23- अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील तलाठ्याला तीन हजार रुपयांची लाच घेताना पकडले

24- मुंबई- दहावीच्या जुलै फेरपरीक्षेचा निकाल उद्या 

25- छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात तीन नक्षलवाद्यांना अटक 

26- बीड - सिव्हिलमधील मेट्रन सरस्वती थोरात यांची तडकाफडकी बदली, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

27- एकताची बालाजी टेलिफिल्मस चित्रपट निर्मिती गुंडाळणार ? 

28- सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार प्रदान

29- बीफ खाल्ले म्हणून बोल्टने नऊ सुवर्णपदके मिळवली - भाजप खासदार

30- पावसाच्या जोरावर विंडिजने जिंकली मालिका

32- सिंधू, साक्षी, दीपाला मिळाली बीएमडब्ल्यू

33- ध्यानचंद हे देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण

34- खरिपाच्या मुहुर्तालाच शेतक-यांवर सुलतानी संकट!

35- उत्पादन येताच पडले शेतमालाचे भाव

36- मंदीच्या वातावरणात सेन्सेक्सची घसरगुंडी

37- कामगारांचा देशव्यापी संपाचा इशारा

38- केंद्राकडून सौर योजनांसाठी १५०० कोटी!

~~~~~~~~~~~~~~~~~~~

जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 

आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.

शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 

संपर्क- 9423785456, 7350625656 

http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html

~~~~~~~~~~~~~~~~~~~

नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

संघाच्या नव्या गणवेशावर स्वयंसेवकांच्या उड्या

  • First Published :29-August-2016 : 15:00:00Last Updated at: 29-August-2016 : 16:03:57

  • ऑनलाइन लोकमत
    नागपूर, दि. 29 -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या गणवेशाबाबत संघ स्वयंसेवकांची प्रतिक्षा संपली आहे. मागील आठवड्यात संघ मुख्यालयात गणवेश दाखल झाल्यानंतर त्यांची प्रत्यक्ष विक्री सुरू झालेली आहे. ‘हाफपॅन्ट’ची जागा ‘फुलपॅन्ट’मध्ये घेतल्यामुळे अनेक स्वयंसेवकांमध्ये उत्साह असून यात तरुणांचे प्रमाण जास्त आहे. गणवेशांचे वाटप जरी सुरू झाले असले तरी स्वयंसेवक विजयादशमी उत्सवातच नव्या अवतारात दिसून येणार आहेत, असे संघ पदाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. 
    बदलत्या काळाप्रमाणे संघाच्या गणवेशातदेखील बदल झाले पाहिजे, असा संघवर्तुळात मतप्रवाह होता. संघाने बºयाच विचाराअंती गणवेशामध्ये बदल केला. या वर्षीच मार्च महिन्यात राजस्थान येथील नागौर येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान संघातर्फे याची घोषणा करण्यात आली होती. गणवेशातील खाकी ‘हाफपॅन्ट’च्या ऐवजी तपकिरी रंगाच्या ‘फुलपॅन्ट’चा समावेश करण्यात आला. नवा गणवेश सुरुवातीला संघाकडून तयार करण्यात येईल व केंद्रीभूत पद्धतीने त्याचे वाटप करण्यात येईल, असे ठरले होते. त्यानुसार राजस्थानमधील भिलवाडा येथे ‘टेलर्स’ची ‘टीम’च कामाला लागली होती. नवे गणवेश संघ मुख्यालयात कधी दाखल होती याबाबत स्वयंसेवकांकडून पदाधिका-यांना याची सातत्याने विचारणादेखील होत होती. काही दिवसांअगोदर संघ मुख्यालयात नवी दिल्लीहून नवा गणवेश दाखल झाला.  
  • --------------------------------------------------
  • दहीहंडीवरुन राज यांच्या विरोधात याचिका दाखल


    • ऑनलाइन लोकमत 
      मुंबई, दि. २९ - दहीहंडी उत्सवात २० फूट उंचीचा नियम पाळू नका असं गोविंदा पथकं आणि आयोजकांना आवाहन करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी राज यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 
      येत्या २० सप्टेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालायने दहीहंडीच्या उंचीवर २० फुटाचा निर्बंध घातल्यानंतर राज यांनी पत्रकारपरिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली होती. त्यांनी गोविंदा मंडळ आणि आयोजकांना नियम न पाळण्याचं आवाहन केलं होतं. 
      त्यानुसार ठाण्यात नौपाडामध्ये मनसेने चाळीस फुटाची हंडी बांधली. जोगेश्वरीतल्या जयजवान गोविंदा पथकाने येथे नऊ थरांची सलामी दिली. मुंबईत गल्लोगल्ली दहीहंडीच्या उंचीच्या आणि बालगोविंदांच्या सहभागाच्या नियमांचे उल्लंघन झाले. आता कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी राज यांच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे. 
    • ===================================
    • एकताची बालाजी टेलिफिल्मस चित्रपट निर्मिती गुंडाळणार ?

      • First Published :29-August-2016 : 15:30:27

      • ऑनलाइन लोकमत 
        मुंबई, दि. २९ - अलीकडच्या काळातील बालाजी टेलिफिल्मसचे चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे बालाजी मोशन पिक्चर्स चित्रपट निर्मितीचा व्यवसाय स्थगित करण्याच्या विचारात आहे. ग्रेट ग्रँण्ड मस्ती, क्या सुपर कुल हैं हम ३ हे बालाजीचे चित्रपट फ्लॉप झाले. डिसने इंडिया प्रमाणे बालाजी टेलिफिल्मस चित्रपट निर्मिती बंद करेल अशी इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरु आहे. 
        कंपनीचे सीईओ समीर नायर म्हणाले की, चित्रपट निर्मिती बंद करण्याचा विचार नाही मात्र यापुढे कंपनी चित्रपट निर्मितीचा निर्णय घेताना अधिक काळजीपूर्वक विचार करेल. ग्रेट ग्रँण्ड मस्ती, क्या सुपर कुल हैं हम ३ या चित्रपटांमुळे आमचे नुकसान झाले पण उडता पंजाब आणि अझरमुळे आमचे नुकसान भरुन निघाले असे त्यांनी सांगितले. 
        चेतन भगतच्या 'हाफ गर्लफ्रेंड' कांदबरीवर आधारीत चित्रपटाची निर्मिती सध्या कंपनी करत असून, या चित्रपटाच्या यशावर चित्रपट निर्मितीची पुढची गणिते अवलंबून आहेत. 
      • ===========================================
      • अरुण दातेंच्या मुलाच्या नशिबी भिकाऱ्याचे जिणे

        • First Published :29-August-2016 : 17:45:00Last Updated at: 29-August-2016 : 17:40:59

        • पुणे, दि. 29 - जीवनाला जगण्याची दिशा देणारे गायक अरुण दाते यांच्या मुलाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्यांचा मुलगा संगीत दाते वाकड पुलाच्या खाली भिकाऱ्याचे जिणे जगत आहे. त्यांना आजाराने ग्रासल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. एक चांगल्या घरातील ४८ वर्षीय विषय पुरुष वाकड पुलाखाली गेल्या सहा दिवसांपासून बेवारसरीत्या अन्न-पाण्यावाचून पडून असून, त्याची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलीस नाईक विष्णू नागरे यांना समजली. त्यांनी तात्काळ धाव घेत विचारपूस केली. त्यांना ज्यूस पाजला मात्र ते स्वत:ची ओळख सांगण्यास टाळाटाळ करीत होत.
          अखेर विश्वासात घेतल्यानंतर चार दिवसांनी त्यांनी सांगितले की मी दातेंचा लहान मुलगा संगीत आहे, ही बाब नांगरे यांनी तात्काळ लोकमतला कळविली. लोकमत प्रतिनिधीने हा व्यक्ती खरेच अरुण दाते यांचे सुपुत्र आहेत का, याची खातरजमा करून त्यांची माहिती घेतली त्यांच्या पत्नीशी चर्चा केली.
          संगीत अरुण दाते असे माझे नाव असून, मी दातेंचा लहान मुलगा संगीत आहे, असे ते म्हणतात. मला मोठ्या भावाने वडिलांच्या संपत्तीतून बेदखल केले आहे. सुमारे तीन वर्षांपासून पत्नी आणि मी विभक्त झालो आहोत. माझा वांद्र्यातील फ्लॅट होता. तो नुकताचा विकला आहे. हॉटेल व्यवसायासाठी मसाल्यांची चौकशी करण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. जुनी पेठमध्ये जात असताना अज्ञात वाहनाने मला धक्का दिला अन् मी रस्त्यावरच बेशुद्ध पडलो. माझ्या हातातील बॅग माझा, मोबाईल, पाकीट, चेक बुक, एटीएम, बॅगमधील सर्व कागदपत्रे कोणी तरी चोरली.
          संगीत म्हणाले, "एका रिक्षा चालकाने १०८ ला फोन करून मला मदत केली. ससूनमध्ये दाखल झालो, तिथे २० दिवस उपचार घेतले. अन् त्यानंतर मी तिथून इथपर्यंत कसा आलो हे मला माहीत नसल्याचे सांगतात. मात्र जेव्हा इथे आलो तेव्हा रिक्षातून तिघा-चौघांनी मला बळजबरीने ढकलून इथे टाकल्याने पायाला जखम झाली आहे. त्यामुळे मी जोरजोरात रडत असताना मला एका भिकाऱ्याने चादर आणि अंथरायला दिले." 
        • ===================================


No comments: