Sunday, 28 August 2016

नमस्कार लाईव्ह २८-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २८-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र 

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
1- सचिनच्या हस्ते ऑलिम्पिक पदक विजेत्यांना BMW भेट 
2- मातीच्या मुर्त्या बनवा - पंतप्रधान नरेंद्र मोदी 
3- मोठ्या कंपन्यांतील भ्रष्टाचाराचा तपशील ईडीला द्या : सीव्हीसी
4- आता मराठीतही ई-मेल आयडी
5- कापसाचे नवे बीटी वाण आणणार नाही
6- रत्ने, दागिन्यांची निर्यात वाढली
7- पंतप्रधान 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
8- तृप्ती देसाई पोहोचल्या हाजी अली दर्ग्यात 
9- पेव्हर ब्लॉकमुळे बाबासाहेब आंबेडकर मार्ग खड्ड्यात
10- मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालक मध्यरात्रीपासून जाणार संपावर
11- तृप्ती देसाई पोहोचल्या हाजी अली दर्ग्यात
12- खड्ड्यांमुळे गणेश मूर्तीकारही हवालदिल
13- कचराकुंड्यांची खरेदी लांबणीवर
14- आवश्यक आहे तिथे ऍट्रॉसिटी कायद्यात बद्दल करावा लागेल- शरद पवार 
15- दहीहंडी हा मराठी माणसातील एकी दाखवणारा सण- राज ठाकरे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
17- 'एक्सप्रेस वे' वर अपघात शिवनेरीची ट्रकला धडक 
18- वैमनस्यातून मुलाला लिफ्टमध्ये कोंडले  
19- भंडारा; जादूटोणा केल्याच्या संशयावरून 15 ते 16 जणांनी मिळून पती-पत्नीचा केला खून
20- हिमाचल प्रदेशला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी  
21- सिमल्यामध्ये दोन वेगवेगळया स्थळांवरुन दोन मृतदेह सापडले 
22- दिल्लीच्या जामियानगरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
23- शेवटच्या चेंडूवर विंडीज ‘चॅम्पियन’
24- सरफराजचे शतक व्यर्थ
25- मेस्सीची निवृत्ती ही ‘नौटंकी’ : मॅरेडोना
26- बॉक्सर्सच्या पराभवासाठी मी जबाबदार : कोच संधू
27- ऐतिहासिक विजयात अडथळा नाही - सेरेना विलियम्स
28- मुंबई क्रिकेटचा देदिप्यमान वारसा विसरू नका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=======================================

मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालक मध्यरात्रीपासून जाणार संपावर



  • मुंबई, दि. 28 - ओला, उबरवर यांच्या सेवेवर कडक निर्बंध घालावेत, यासाठी आंदोलनाचे शस्त्र उपसूनही सरकार लक्ष देत नसल्याने आता काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या संघटनांसह रिक्षा युनियननंही थेट संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ओला उबर टॅक्सींच्या निर्बंधासह अन्य मागण्यांसाठी मुंबईतल्या मुख्य रिक्षा आणि टॅक्सी संघटनांची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं रिक्षा-टॅक्सी चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. या निर्णयामुळे रिक्षा आणि टॅक्सीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांचा पुढचा आठवडा जिकिरीचा जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. आज मध्यरात्रीपासून जयभगवान रिक्षा-टॅक्सी संघटनेनं संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तर 30 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून मुंबई ऑटोमेन्सच्या रिक्षा आणि टॅक्सी संपावर जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे. दुसरीकडे 31 ऑगस्टपासून बेस्टचे कर्मचारीही संपावर जाणार असल्यानं पुढचा आठवडा हा मुंबईकर प्रवाशांसाठी जिकिरीचा ठरणार आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि बेस्टच्या संपात मुंबईकर वेठीस धरला जाणार आहे.
=======================================

मातीच्या मुर्त्या बनवा - पंतप्रधान नरेंद्र मोदी



  • नवी दिल्ली, दि. २८ - आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा पर्यावरणपूरक अशा इकोफ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.  आपण आपल्या जुन्या परंपरेनुसार चिकणमातीच्या मुर्त्या का बनवत नाही ? मातीच्या मुर्त्यांमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पर्यावरण आणि समुद्राची काळजी घेणे ही सुद्धा एकप्रकारची पूजाच आहे असे मोदींनी सांगितले. 
     
    दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणा-या पीव्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि मराठ मोळया ललिता बाबरचे कौतुक केले. रिओ ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून आपण कोणापेक्षा कमी नाही हे मुलींनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले असे मोदींनी सांगितले.  

=======================================

तृप्ती देसाई पोहोचल्या हाजी अली दर्ग्यात



  • मुंबई, दि. २८ - मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यातील मजार-ए-शरीफ येथे दर्शनावर महिलांना असलेली बंदी उच्च न्यायालयाने हटवल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई रविवारी दुपारी हाजी अली दर्ग्यात पोहोचल्या. मात्र त्यांनी न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केले नाही. 
     
    आता दर्ग्यात महिलांना जेवढया परिसरात प्रवेशाची परवानगी आहे तेवढयाच भागात त्यांचा वावर होता. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने मजार-ए-शरीफ येथे दर्शनावर महिलांना असलेली बंदी घटनाबाह्य ठरवत दर्शनाचा मार्ग मोकळा केला. 
     
    मात्र, हाजी अली दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाला या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे असल्याने उच्च न्यायालयाने या आदेशाला सहा आठवड्यांची स्थगिती दिली. त्यामुळे महिलांना मजार-ए-शरीफ दर्शनासाठी खुले झालेले नाही. शनी शिंगणापूर येथे महिलांच्या प्रवेशाचा लढा यशस्वी केल्यानंतर तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेशाचे आंदोलन हाती घेतले होते. 

=======================================

सचिनच्या हस्ते ऑलिम्पिक पदक विजेत्यांना BMW भेट



  • हैदराबाद, दि. २८ - रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक विजेती कामगिरी करणारी पीव्ही सिंधू आणि साक्षी मलिक यांचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रविवारी कौतुक केले. दोघींसाठी एका चांगल्या प्रवासाची आता सुरुवात झाली आहे. भारतीय खेळासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे असे सचिनने यावेळी सांगितले. 
     
    हैदराबादच्या गोपीचंद बॅडमिंटन अॅकेडमीमध्ये पीव्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि पुलेला गोपीचंद यांचा सन्मान करण्यात आला. सचिनच्या हस्ते या चौघांना बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून देण्यात आली.   
     
    प्रवास आता सुरु होतोय. तो इथेच थांबणार नाही असा मला विश्वास आहे. तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व त्या प्रवासात सहभागी होऊ. तुम्ही आम्हाला आनंद साजरा करायच्या अशाच संधी देत रहालं असे सचिनने यावेळी सांगितले. या क्षणाला संपूर्ण देश आनंदी आहे. अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत असे सचिनने सांगितले. 

=======================================

No comments: