Thursday, 4 August 2016

नमस्कार लाईव्ह ०४-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- भारतातून दुबईला जाणारी विमाने रद्द 
२- पाकमधील 'कुराण'संदर्भातील पुस्तकात त्रुटी 
३- पाकिस्तानसाठीचा निधी अमेरिकेने रोखला... 
४- नियमानुसारच पाकला अणुभट्ट्या देणार: चीन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- पंकज भुजबळांना अंतरिम जामीन मंजूर 
६- महाड दुर्घटना - मॅग्नेट सर्च ऑपरेशन मध्ये क्रेनचा वापर 
७- दहशतवादाच्या मुद्यावर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं 
८- विमान अपघातावेळी जीव वाचवण्याऐवजी प्रवाशांची सामान घेण्याची घाई 
९- पंजाबसाठी 'आप'ची पहिली यादी प्रसिद्ध 
१०- खुल्या वर्गाचे आरक्षण न्यायालयाकडून रद्द 
११- प. बंगालमध्ये हवाई दलाचे विमान कोसळले 
१२- दहशतवाद्यांचे उदात्तीकरण थांबवा - राजनाथ सिंह 
१३- देशात 40 कोटी कुशल मनुष्यबळ निर्मितीचे लक्ष्य 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- महाड दुर्घटना - सावित्रीचा रुद्रावतार; तेरा मृतदेह हाती 
१५- महाड पूल दुर्घटना : कोणाचा मृतदेह कुठे सापडला 
१६- ब्रिटीशांना काळजी, फडणवीसांना नाही, राज ठाकरेंची टीका 
१७- महाड दुर्घटना; एसटीतील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी नोकरी किंवा १० लाखांची राज्य सरकारची मदत 
१८- सरकारला माणसांच्या जीवाचे मोल नाही- राज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- पिंपरी; कॉलेजमध्ये लेक्चर बंक कराल, तर थेट पालकांना मेसेज 
२०- नांदेड; परिचारिका महिलेने गोदावरीत उडी मारून दिला जीव 
२१- नांदेड; स्वारातीमचा सेवक अडकला विनयभंगाच्या प्रकरणात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- नोएडामध्ये राम-रावण मंदिराची एकत्र स्थापना 
२३- दीपिका पादूकोण बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री! 
२४- सुपरस्टार रजनीकांत यांचं ट्विटर अकाऊंट हॅक 
२५- पिपली लाईव्ह’च्या सह-दिग्दर्शकाला सात वर्षाचा तुरुंगवास 
२६- पहिला सामना रिकाम्या स्टेडियमसमोर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
==========================================

महाड दुर्घटना: 4 महिला आणि 4 पुरुषांचे मृतदेह सापडले

LIVE : महाड दुर्घटना: 4 महिला आणि 4 पुरुषांचे मृतदेह सापडले
महाड (रायगड) : दुथडी भरून वाहणाऱ्या महाडच्या सावित्री नदीमध्ये आज पुन्हा शोधकार्याला सुरूवात झाली आहे. रात्रभर सुरु असलेला पाऊस आणि अंधार यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. पण आज सकाळपासूनच एनडीएरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डनं सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

LIVE UPDATE : एसटीतून प्रवास करणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा

LIVE UPDATE : 8 मृतदेह सापडले, 4 महिला, 4 पुरुषांचे मृतदेह, 2 महिला मृतदेहांची ओळख अस्पष्ट

LIVE UPDATE : घटनास्थळीच सातवा मृतदेह सापडला. आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांमध्ये 4 महिला आणि 3 पुरुषांचे मृतदेह

LIVE UPDATE : आतापर्यंत सहा मृतदेह हाती, आवेश चौगुलेचा मृतदेह सापडला

LIVE UPDATE : नौदलाच्या जवानांना आणखी दोन मृतदेह दिसले, मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

तब्बल 40 तास उलटल्यानंतर सावित्री दुर्घटनेतील 4 मृतदेह हाती  लागले आहेत, तर दोन मृतदेह बचाव पथकाच्या नजरेस पडले आहेत. हे दोन्हीही मृतदेह दादली परिसरात आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम एनडीआरएफचे जवान करत आहेत.

==========================================

महाड पूल दुर्घटना : कोणाचा मृतदेह कुठे सापडला

महाड पूल दुर्घटना : कोणाचा मृतदेह कुठे सापडला ?
महाड (रायगड) : महाडच्या सावित्री नदीमध्ये आज पुन्हा शोधकार्याला सुरुवात झाली आहे. सकाळपासून दुर्घटनेत बळी पडलेल्या तिघांचे मृतदेह हाती आले आहेत. यामध्ये एका पुरुषाचा आणि दोन महिलांचा समावेश आहे.


LIVE : महाड दुर्घटना: केंबुर्ली नदीकाठी तिसरा मृतदेह



पहिला मृतदेह : जयगड-मुंबई एसटीचे चालक एस. एस. कांबळे (पुरुष)
अंगावर खाकी वर्दी आणि बॅच क्रमांक सापडल्यानं मृतदेहाची ओळख पटली
कधी सापडला? : गुरुवारी सकाळी (तब्बल 36 तासांनी)
कुठे सापडला? : घटनास्थळापासून 130 किमी अंतरावर आंजर्ल्याजवळ


महाड दुर्घटनेत तवेरा कारमधील आठ जण बेपत्ता



दुसरा मृतदेह : शेवंती मिरगळ (वय अंदाजे 65 वर्ष) (महिला)
गुहागरमधून मुंबईकडे जाणाऱ्या तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्या नऊ जणांपैकी महिला प्रवासी
कधी सापडला? : गुरुवारी सकाळी (तब्बल 36 तासांनी)
कुठे सापडला? : सावित्री नदी पुलापासून अंदाजे 80 ते 90 किमीवर हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर


तिसरा मृतदेह : संपदा वझे (वय अंदाजे 35 ते 45 वर्ष) (महिला)
गुहागरमधून मुंबईकडे जाणाऱ्या तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्या नऊ जणांपैकी महिला प्रवासी
कधी सापडला? : गुरुवारी सकाळी (तब्बल 36 तासांनी)
कुठे सापडला? : सावित्री नदी पुलापासून अंदाजे 5 ते 7 किमीवर केंबुर्ली नदीकाठी


चौथा मृतदेह : 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह (पुरुष)
कधी सापडला? : गुरुवारी दुपारी (तब्बल 38 तासांनी)
कुठे सापडला? : 8 ते 10 किमी अंतरावर सावित्री नदी किनाऱ्यावर दादली भागात


पाचवा मृतदेह : आवेश चौगुलै (पुरुष)
आवेशच्या पासपोर्टची इन्क्वायरी होती, त्यासाठी आसिफ चौगुले आणि आवेश चौगुले हे मामा-भाचे राजापूर-बोरीवली एसटीने मुंबईला चालले होते. हे दोघही चिपळूनचे रहिवासी आहेत.
कधी सापडला? : गुरुवारी दुपारी (तब्बल 40 तासांनी)

Mahad Avesh Chaugule
—————————————————————————————————————————–


सहावा मृतदेह : पांडुरंग घाग (पुरुष)
कधी सापडला? : गुरुवारी दुपारी (तब्बल 40 तासांनी)

Mahad Pandurang Ghag

—————————————————————————————————————————–

सातवा मृतदेह : महिलेचा मृतदेह
कुठे सापडला : घटनास्थळाजवळ
कधी सापडला? : गुरुवारी दुपारी (तब्बल 42 तासांनी)



आठवा मृतदेह : महिलेचा मृतदेह
कुठे सापडला : महाड शहर परिसरात विसावा हॉटेलजवळ महिलेचा मृतदेह आढळला
कधी सापडला? : गुरुवारी दुपारी (तब्बल 42 तासांनी)
==========================================

ब्रिटीशांना काळजी, फडणवीसांना नाही, राज ठाकरेंची टीका

ब्रिटीशांना काळजी, फडणवीसांना नाही, राज ठाकरेंची टीका
नाशिक : महाडमधील पूल दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार असल्याचा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ब्रिटीशांना काळजी आहे, मात्र फडणवीस सरकारला नाही, असा टोलाही राज यांनी लगावला. देशात माणसं मरण्याची किंमत राहिलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया महाड दुर्घटनेवर राज ठाकरेंनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. सगळा गोदाकाठ उद्ध्वस्त झाला, तिथे गोदापार्कचं काय? असा सवाल करत गोदापार्क बाबत रिलायन्सशी बोलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा मूर्खासारखा निर्णय घेतल्यामुळे पूरस्थिती गंभीर झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.


कधी कधी वाटतं हा देश बीओटीवर देवून टाकावा. फडणवीस अजून विरोधीपक्षांच्या भूमिकेतून बाहेर आलेले नाही, सत्ता हातात आहे तर विदर्भाचा अनुशेष भरुन काढा, राज्यातल्या इतर समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी विदर्भाचा मुद्दा काढतात, फक्त वेळकाढूपणा करण्यासाठी असे उद्योग करतात, अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकार जनतेला मूर्ख बनवत आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप सर्व एकत्र आहेत या शब्दांत राज यांनी सरकारवर निशाणा साधला.

मला उद्धव आणि जयदेव यांच्या भांडणात पडायचं नाही, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. जे बोललो ते खरं आहेच. कोर्टात जायची मला सवय आहे, असं मिष्किल वक्तव्यही त्यांनी केलं.
==========================================

नोएडामध्ये राम-रावण मंदिराची एकत्र स्थापना

नोएडामध्ये राम-रावण मंदिराची एकत्र स्थापना
ग्रेटर नोयडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये येत्या 11 ऑगस्ट रोजी रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. या मंदिरात लंकेश रावणासह राममंदिरही बांधले जाणार आहे. या दोन्ही मूर्तींची स्थापना 11 ऑगस्टला ग्रेटर नोएडामधील बिसरख धाममध्ये करण्यात येणार आहे. राम आणि रावणाचे एकच मंदिर असण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा मंदिर प्रशासनाने केला आहे.

या मंदिराचे बांधकाम गेल्या 5 वर्षांपासून  मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष अशोकानंदजी महाराज यांनी सांगीतलं. आता मूर्तींचं कामही पूर्ण झाल्यामुळे 11 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.

या मंदिरात गणपती, राम परिवार मंदिर, राधाकृष्ण मंदिर, दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर, शनि मंदिर, आदी मंदिरांचाही समावेश असेल. ऋषी विश्रवा यांच्या तपश्चर्येचे ठिकाण आणि रावणाच्या जन्मस्थानी रावणाचे हे भव्य मंदिर बांधले जाईल.


==========================================

दीपिका पादूकोण बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री!

दीपिका पादूकोण बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री!
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने तिच्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे. आगामी ‘पद्मावती’ या सिनेमासाठी दीपिकाला तब्बल 12.65 कोटी रुपये मानधन म्हणून देण्यात आले आहेत. यासोबतच 10 कोटींचा आकडा पार करणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री बनली आहे.

‘रामलीला’साठी दीपिकाला एक कोटी रुपये मानधन मिळालं होतं. त्याच्या दोन वर्षांनंतर ‘बाजीराव मस्तानी’साठी तिने सात कोटी रुपये आकारले होते. आता ‘पद्मावती’साठी तिने 12.65 कोटी रुपये घेतले आहेत.

पुढील महिन्यापासून ‘पद्मावती’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. तर ‘ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ झँडर केज’ हा तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रिपल एक्समध्ये दीपिका विन डिझेलसोबत दिसणार आहे.

==========================================

सुपरस्टार रजनीकांत यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

सुपरस्टार रजनीकांत यांचं ट्विटर अकाऊंट हॅक
चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. मात्र काही वेळाने ट्विटर हॅण्डल पुन्हा प्राप्त केल्याची माहिती त्यांची मुलगी ऐश्वर्याने दिली आहे.

ऐश्वर्याने ट्वीट केलं होतं की, “सुपरस्टार रजनी अप्पाचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. मात्र आता ते पुन्हा मिळवलं आहे. तुम्हा सर्वांचे आभार, आता सगळं ठीक आहे.”

रजनीकांत यांच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय अभिनेता सुपरस्टार रजनीकांत यांचं अकाऊंट काल हॅक केलं होतं. याबाबत पोलिसांत औपचारिक तक्रार दाखल केलेली नव्हती.

==========================================

कॉलेजमध्ये लेक्चर बंक कराल, तर थेट पालकांना मेसेज

कॉलेजमध्ये लेक्चर बंक कराल, तर थेट पालकांना मेसेज
पिंपरी : महाविद्यालयात लेक्चर बंक करुन मुलींची छेडछाड करण्याची जणू फॅशनच निघाली आहे. अशा टवाळखोरांना जरब बसवताना कॉलेज प्रशासनाची दमछाक होते. पिंपरी चिंचवडमधील प्रतिभा महाविद्यालयाने मात्र यावर जालीम उपाय शोधला आहे. लेक्चर बंक करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या थेट पालकांनाच मेसेज जाणार आहे.

लेक्चर बंक करणाऱ्या विद्यार्थ्यांना धडा शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन थेट पालकांच्या कानावर पाल्यांचे प्रताप घातले जाणार आहेत. बारकोड स्कॅनर मशिन प्रतिभा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन हजार विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे. हे बारकोड म्हणजे एक प्रकारचं आयकार्ड आहे.

विद्यार्थ्यांना हे बारकोड असलेलं आयकार्ड घेऊन लेक्चरला बसणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या आयकार्डवरील बारकोड या मशीनद्वारे स्कॅन करुन विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. त्यानंतर तो सर्व डाटा महाविद्यालयाने बनवलेल्या सॉफ्टवेअरमध्ये घेतला जातो आणि गैरहजर विध्यार्थ्यांच्या पालकांना त्यांचा मुलगा किंवा मुलगी लेक्चरला बसला नसल्यास, त्याची माहिती एसएमएसद्वारे कळवली जाते.


==========================================

दहशतवादाच्या मुद्यावर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं


  • ऑनलाइन लोकमत - 
    इस्लामाबाद, दि. 04 - हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वानीला शहीद घोषित केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला चांगलंच फटकारलं. दहशतवाद्यांचं शहीद म्हणून उदात्तीकरण करु नये असं राजनाथ सिंह बोलले आहेत. इस्लामाबादमध्ये सार्क परिषदेत बोलताना राजनाथ सिंह यांनी दहशतवादावर आपली भुमिका मांडत असताना पाकिस्तानला त्यांच्याच देशात उभं राहून फटकारलं आहे.
    'चांगला किंवा वाईट दहशतवाद नसतो, दहशतवाद हा दहशतवादच असतो. फक्त दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करुन फायदा नाही, तर दहशतवादाला पाठिंबा देणा-या संस्था, व्यक्ती आणि देशांविरोधातही कारवाई केली पाहिजे', असं मत राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे. 

==========================================

विमान अपघातावेळी जीव वाचवण्याऐवजी प्रवाशांची सामान घेण्याची घाई

  • ऑनलाइन लोकमत - 
    दुबई, दि. 04 -  एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात होत असताना काही प्रवाशी आपला जीव वाचवण्याची घाई करण्यापेक्षा सामानाची जास्त काळजी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होऊ लागला आहे. तिरूअनंतपुरम येथून दुबईला निघालेल्या एमिरेट्स एअरलाइन्सच्या बुधवारी विमानाचा दुबई विमानतळावर अपघात झाला. अपघात भीषण होता मात्र सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या विमानात २७५ प्रवासी आणि क्रू-मेंबर होते.
    विमान अपघात होत असताना विमानामधील एक व्हिडिओ सध्या फेसबूकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रवासी लॅपटॉप म्हणून ओरडताना दिसत आहे. परिस्थितीचं भान नसलेले हे प्रवासी आपलं सामान जाग्यावर आहे की नाही ? हे पाहण्यासाठी धाव घेत असल्याचंही दिसत आहे. विमानातील क्रू प्रवाशांना आपातकालीन मार्गाचा वापर करुन बाहेर पडण्यासाठी सांगत होते. कर्मचारी आपलं सामान विसरुन बाहेर उडी मारण्याचं आवाहन करत असतानाही प्रवासी मात्र दुर्लक्ष करत असल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतं आहे. 


  • महाड दुर्घटना - मॅग्नेट सर्च ऑपरेशन मध्ये 'या' क्रेनचा वापर


    • ऑनलाइन लोकमत 
      महाड, दि. ४ - सावित्री नदीतील एनडीआऱएफच्या मॅग्नेट सर्च ऑपरेशन मध्ये एसटी बसचे अवशेष निष्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली असून, लोहचुंबकास चिकटलेले ते अवजड अवशेष नदिच्या पूराच्या पाण्या बाहेर काढण्याकरीता महाकाय क्रेन राजेवाडी येथे पाचारण करण्यात आली आहे. 
      निष्पन्न होत असलेले अवशेष एसटी बसचे आहेत वा अन्य या बाबत सध्या खातरजमा करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. राजेवाडी येथे बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी नदी किनारी केली आहे.
==========================================

No comments: