Saturday, 6 August 2016

नमस्कार लाईव्ह ०६-०८-२०१६ चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- फ्रान्समधील बारमध्ये लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू 
२- पहिल्या खासगी चांद्रवारीस हिरवा कंदील! 
३- बराक ओबामा हे अध्यक्षपदासाठी ‘लायक नाहीत’ ते ‘भयानक अध्यक्ष’ - डोनाल्ड ट्रम्प  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
४- पुस्तकामुळे पत्रकार जे. डे यांची हत्या, सीबीआयचा  आरोपत्रात दावा 
५- राणेंनी नियमित केलेले भूखंड नियमबाह्यच - सर्वोच्च न्यायालय 
६- दहशतवादाच्या समर्थकांना वेगळे पाडा - राजनाथसिंह 
७- दूध भेसळखोरांना आजन्म कारावासाची शिक्षा द्या - सर्वोच्च न्यायालय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
८- महाड दुर्घटना: आणखी दोन मृतदेह सापडले 
९- 1 मेपर्यंत संपूर्ण मुंबईत वायफाय, मुख्यमंत्र्यांची विधानभवनात घोषणा 
१०- गुजरातचे नवे मुख्यमंत्री विजय रुपानी, रविवारी शपथविधी 
११- म्हाडाच्या पात्र अर्जांची यादी जाहीर, 10 ऑगस्टला घरांसाठी सोडत 
१२- कोल्हापूर - रत्नागिरीहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक ठप्प 
१३- पुण्यातील पर्यटनाची ठिकाणं शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद राहणार. 
१४- नांदेड - १०८ अॅम्ब्युलन्स सेवेच्या ५० डॉक्टरांनी दिले राजीनामे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१५- मावळ तालुक्यातील पवनानगर-आपटी पूल वाहून गेला 
१६- कोल्हापूरच्या महापौरांवर टांगती तलवार, जातवैधता पडताळणीचे हायकोर्टाचे आदेश 
१७- ठाणे; जिल्ह्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करा’-सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे 
१८- वैष्णोदेवी मंदिराजवळ भूस्खलन, तीन यात्रेकरुंचा मृत्यू 
१९- मध्यप्रदेश - कारने स्कूल व्हॅनला दिलेल्या धडकेत 24 विद्यार्थी जखमी  
२०- कोयना धरणात 82.68 टीमएमसी पाणी 
२१- राधानगरी धरणाचे सर्व सात दरवाजे उघडले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२२- रिओ ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला दिमाखात सुरुवात 
२३- पैलवान नरसिंग यादवचं ऑलिम्पिक वारी जवळपास निश्चित 
२४- मायक्रोमॅक्सचा नवा कॅनव्हास यूनिट 4 प्लस लाँच 
२५- मारूती सुझुकी पाठोपाठ हुंदाई कारच्या किंमतीतही वाढ 
२६- सुपरस्टार रजनीकांतला भिकारी समजून दिली १० रुपयांची नोट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
=========================================

महाड दुर्घटना: आणखी दोन मृतदेह सापडले

LIVE : महाड दुर्घटना: आणखी दोन मृतदेह सापडले
महाड (रायगड) सलग चौथ्या दिवशी सावित्रीच्या पात्रात शोधकार्याला सुरुवात झाली आहे. नौदल आणि एनडीआरएफला सावित्री नदीत एका कारचे अवशेषही सापडले आहेत. तसंच यासोबत एक चटई आणि इतर सामानही हाती लागलं आहे.

दरम्यान, गाडीचे अवशेष तवेरा कारचे असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, त्याला अजूनही दुजोरा मिळालेला नाही. शिवाय, बरसत असलेल्या पावसामुळं शोधकार्यात मोठे अडथळे येत असल्याचं चित्र आहे.

LIVE UPDATE (9.50 AM) : महाड परिसरात पावसाचा जोर वाढला, शोधकार्यात व्यत्यय येण्याची शक्यता
LIVE UPDATE (9.31 AM) :  म्हाप्रळच्या खाडीत 24 वा मृतदेह सापडला, तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्या दिनेश कांबळीचा मृतदेह हाती

LIVE UPDATE (9.24 AM) : आंबेतच्या खाडीत स्थानिक मच्छिमारांना 23 वा मृतदेह सापडला

=========================================

1 मेपर्यंत संपूर्ण मुंबईत वायफाय, मुख्यमंत्र्यांची विधानभवनात घोषणा

1 मेपर्यंत संपूर्ण मुंबईत वायफाय, मुख्यमंत्र्यांची विधानभवनात घोषणा
मुंबई: लवकरच मुंबईकरांना पोकीमोन गो खेळण्यासाठी आणि मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यासाठी नेट पॅकवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण 1 मे 2017 पर्यंत संपूर्ण मुंबईला वाय-फाय हॉटस्पॉट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे.

ज्या प्रमाणे संपूर्ण मुंबईत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं नेटवर्क उभारलं त्या प्रमाणे मुंबईत 1200 ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट तयार करण्यात येणार आहेत. 1200 पैकी 500 वायफाय हॉटस्पॉट 1 नोव्हेंबरपर्यंत उलब्ध होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पुढच्या वर्षी मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची वायफाय नेटवर्कची घोषणा महत्त्वाची मानली जाते आहे.


=========================================

रिओ ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला दिमाखात सुरुवात

रिओ ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला दिमाखात सुरुवात
रिओ (ब्राझिल) रिओ ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला अगदी दिमाखात सुरुवात झाली. रिओच्या ऐतिहासिक माराकाना स्टेडियमवर तब्बल 78 हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम रंगतो आहे. यावेळी ब्राझिलच्या संस्कृतीची ओळख करुन देणारं, तसेच पर्यावरण संरक्षणाच्या जनजागृतीचं सादरीकरण करण्यात आलं.

ऑलिम्पिक सोहळ्याच्या उद्घाटन सोहळ्याला थ्री-डी इफेक्टचाही साज चढला. ब्राझिलच्या विकासाची सुरुवात ते त्यांचा आतापर्यंतचा प्रवास याचं वर्णन थ्री-डी इफेक्टमधून करण्यात आलं.

माणसांकडून निसर्गाचा कसा ऱ्हास होतोय याचंही सादरीकरण यावेळी करण्यात आलं. सिटी ऑफ गॉड, कॉन्स्टंट गार्डनर यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांचे ब्राझिलियन दिग्दर्शक फर्नांडो मिरालेस यांनी या सोहळ्याचं दिग्दर्शन केलं.

ब्राझिलची प्रसिद्ध मॉडेल जिसेल बुंडचेन यावेळी रॅम्पवर उतरली. जिसेल बुंडचेनचं आगमन होताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरु झाला.

=========================================

मावळ तालुक्यातील पवनानगर-आपटी पूल वाहून गेला

मावळ तालुक्यातील पवनानगर-आपटी पूल वाहून गेला
पुणे: मावळ तालुक्यातील पवनानगरकडून आपटी आणि गेवेंडे या गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेला आहे. ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पूल उखडला आहे. यात आपटी आणि गेवंडे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.

याच परिसरात आलेल्या पर्यटक सुरक्षित असून त्यांची वाहनेदेखील यामुळे अडकली आहेत. उद्याच या पुलाचे काम हाती घेणार असल्याचं मावळचे तहसीलदार शरद पाटील यांची माहिती.

गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने त्याचा फटका मावळ तालुक्याला बसला आहे. सकाळीच या भागातील दोन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पण आपटी गेवेंडीकडे जाणारा पूल पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला आहे.

मात्र, संततधार पावसाने पवना धरणाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत असून धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

=========================================

गुजरातचे नवे मुख्यमंत्री विजय रुपानी, रविवारी शपथविधी

गुजरातचे नवे मुख्यमंत्री विजय रुपानी, रविवारी शपथविधी
अहमदाबाद: आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रविवारी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे. खरं तर दिवसभर मुख्यमंत्रिपदासाठी नितीन पटेल यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, ऐनवळी भाजपनं धक्का देत विजय रुपानी यांच्या नावाला पसंती दिली. येत्या वर्षभरात गुजरातमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे रुपानी भाजपला यश मिळवून देणार का प्रश्न आहे.


=========================================

पैलवान नरसिंग यादवचं ऑलिम्पिक वारी जवळपास निश्चित

पैलवान नरसिंग यादवचं ऑलिम्पिक वारी जवळपास निश्चित
मुंबई: भारताचा पैलवान नरसिंग यादवला रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ऑलिम्पिकच्या अधिकृत वेबसाईटवर भारतीय पथकात नरसिंगच्या नावाचा समावेश झाला आहे.

डोपिंगप्रकरणी नाडानं नरसिंगला क्लीनचिट दिल्यावर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या कुस्तीच्या जागतिक संघटनेनंही नरसिंगच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागाला हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीनं नरसिंगविषयी आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही.

सोमवारीच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं नरसिंगला डोपिंगप्रकरणी क्लीन चिट दिली होती. त्या निर्णयाची माहिती भारतीय कुस्ती महासंघानं लगेचच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगला पत्राद्वारे कळवली होती आणि नरसिंगच्या सहभागाविषयी पुनर्विचार करण्याची विनंती केली होती.

=========================================

पुस्तकामुळे पत्रकार जे. डे यांची हत्या, सीबीआयचा  आरोपत्रात दावा

पुस्तकामुळे पत्रकार जे. डे यांची हत्या, सीबीआयचा  आरोपत्रात दावा
मुंबई: ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांनी गुन्हेगारीवर लिहिलेल्या पुस्तकामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने त्यांची हत्या केल्याचा दावा करणारे आरोपपत्र सीबीआयने शुक्रवारी विशेष न्यायालयात सादर केले. विशेष म्हणजे, या हत्येचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या यादीतील साक्षीदार रवी राम यालाही सीबीआयच्या आरोपपत्रात दोषी ठरवण्यात आले आहे.

आरोपपत्रात राजनसह इतर आरोपींवर हत्या, हत्येचा कट, शस्त्र प्रतिबंधक कायदा व मोक्का अंतर्गत आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपपत्रात 41 साक्षीदारांचे जबाब आहेत.

11 जून 2011 रोजी जे. डे यांची पवई येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या राजनच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा करत, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार जिग्ना वोरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरूण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी, पॉलसन जोसेफ व दिपक सिसोडीया यांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते.

छोटा राजनविरोधात महाराष्ट्रात 70 गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये जे. डे यांच्या हत्येचाही समावेश आहे. राजनचा ताबा सीबीआयकडे असल्याने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आले व तशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.

=========================================

म्हाडाच्या पात्र अर्जांची यादी जाहीर, 10 ऑगस्टला घरांसाठी सोडत

म्हाडाच्या पात्र अर्जांची यादी जाहीर, 10 ऑगस्टला घरांसाठी सोडत
मुंबई : मुंबईकरांच्या स्वप्नातलं घर अर्थात म्हाडाच्या लॉटरीसाठी लाखो जणांनी अर्ज केले आहेत. आज तात्पुरत्या पात्र अर्जांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 69 अर्ज तात्पुरते अपात्र ठरले आहेत.

अपात्र ठरलेल्या अर्जदारांना 8 ऑगस्ट 2016 दुपारी 1.00 वाजेपर्यंत अर्जातील त्रुटी सुधारुन अर्ज पुन्हा जमा करता येणार आहे.

म्हाडाच्या लॉटरीसाठी एकूण 1,69,702 जणांनी अर्ज केला होता. मात्र, 1,25,219 जणांनी त्यासाठी आवश्यक अनामत रक्कम भरली होती. त्यातील 69 जणांचे अर्ज तात्पुरते अपात्र ठरले आहेत.

म्हाडानं मुंबई विभागातल्या 972 घरांसाठी 22 जून 2016 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. आलेल्या लाखो अर्जांची छाननी करुन अपात्र अर्जाची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. आता
पात्र अर्जांची अंतिम यादी ही 8 ऑगस्ट 2016 दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येईल.
दरम्यान, एकीकडे रियल इस्टेट बाजार मंदावला असला तरीही दुसरीकडे म्हाडाच्या घरांसाठी मोठी पसंती पाहायला मिळते आहे.

=========================================

कोल्हापूरच्या महापौरांवर टांगती तलवार, जातवैधता पडताळणीचे हायकोर्टाचे आदेश

कोल्हापूरच्या महापौरांवर टांगती तलवार, जातवैधता पडताळणीचे हायकोर्टाचे आदेश
मुंबई: कोल्हापूरच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्या जात वैधता दाखल्याची पडताळणी पुन्हा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीला शुक्रवारी दिले. न्यायमूर्ती शंतनू केमकर व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. त्यानुसार येत्या सहा आठवड्यात समितीला महापौर रामाणे यांच्या जातीच्या दाखल्याची वैधता तपासायची आहे.

महापौर अश्विनी रामाणे, संदीप नेजदार, सचिन पाटील, निलेश देसाई, दिपा मगदुम, वृषाली कदम व संतोष गायकवाड या नगरसेवकांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवले. त्यानंतर पालिका आयुक्तांनी या नगरसेवकांचे पद रद्द केले. याविरोधात या नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

मे महिन्यात सुट्टीकालीन न्यायालयाने या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानंतर वरील खंडपीठासमोर या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली. जात वैधतेचे सर्व अधिकृत पुरावे दिले होते. तरीही समितीने जातवैधता अवैध ठरवली. हे गैर आहे. समितीचा निकाल नगरसवेकांना मिळण्याआधीच पालिका आयुक्तांनी नगरसेवक पद रद्द केले. तेव्हा ही कारवाई रद्द करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

=========================================

मायक्रोमॅक्सचा नवा कॅनव्हास यूनिट 4 प्लस लाँच

मायक्रोमॅक्सचा नवा कॅनव्हास यूनिट 4 प्लस लाँच
नवी दिल्ली: मायक्रोमॅक्सने कॅनव्हास सिरीजमधील आपला नवा स्मार्टफोन कॅनव्हास यूनिट 4 प्लस भारतात लाँच केला आहे. याची किंमत फक्त 7,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ग्रे, सिल्व्हर कलरच्या व्हॅरिएंटसोबत बाजारात लाँच करण्यात आला आहे. इंडस ऑपरेटिंग सिस्टिमच्या सहाय्याने या स्मार्टफोनमध्ये देशभरातील १२ प्रादेशिक भाषा या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये यामध्ये होम बटनसोबतच फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे. यूनाइट 4 प्लसमध्ये 5 इंचाची स्क्रिन देण्यात आली असून, त्याची रिझॉल्यूशन कपॅसिटी 720 x 1280 पिक्सल आहे. तसेच यामध्ये 1GHz क्वार्ड कोर मीडियोटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच 2 जीबी रॅम देण्यात आली आहे.

या नव्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रिअर ऑटोफोकस कॅमेरा, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आलेला आहे. फोनमध्ये 16 जीबी इंटरनल मेमरी असून, ती 64 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. कनेक्टिव्हीटीसाठी यामध्ये 4G LTE, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, मायक्रो यूएसबी, प्रॉक्जिमिटी सेंसर, एम्बिएंट सेंसरसारखे ऑप्शन देण्यात आले आहेत.

=========================================

मारूती सुझुकी पाठोपाठ हुंदाई कारच्या किंमतीतही वाढ

मारूती सुझुकी पाठोपाठ हुंदाई कारच्या किंमतीतही वाढ
नवी दिल्ली: मारूती सुझुकी पाठोपाठ हुंदाई मोटर्सनेही आपल्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. हुंदाईने आपल्या सर्व मॉडेलच्या किंमतीत 3000 ते 20,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हे वाढीव दर 16 ऑगस्ट 2016 पासून लागू होणार आहेत.

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ, आणि आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या किमतीत अवमुल्यन झाल्याने कंपनीने कारच्या किंमतीत वाढ करण्याचा हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर हुंदाईच्या हॅचबॅक कारमधील इयॉन आणि आय 10च्या किमतीत 3000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर देशातील सर्वात महाग कार प्रिमियम एसयूव्ही सेंटा-फेच्या किंमतीत 20,000नी वाढ केली आहे.

हुंदाई चालू वर्षी दोन नव्या कार बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. यातील नवीन एलांट्रा आणि एलीट आय-20चे अॅटोमॅटिक व्हॅरिएंटचाही समावेश आहे. या दरवाढीमुळे बाजारात नव्या येणाऱ्या कारच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.


=========================================

रिओ ऑलिम्पिकची शानदार सुरुवात



  • रिओ (ब्राझिल), दि. 6 - ब्राझीलच्या रिओ दी जानिरो येथे ३१व्या ऑलिम्पिक स्पर्धेची दिमाखात सुरुवात झाली आहे. भव्यदिव्य उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर अधिकृतपणे स्पर्धेला सुरुवात झाली आहे. रिओच्या ऐतिहासिक माराकाना स्टेडियमवर तब्बल 78 हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ब्राझिलच्या संस्कृतीची ओळख करुन देणारं, तसेच पर्यावरण संरक्षणाच्या जनजागृतीचं सादरीकरण करण्यात आलं. ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यात अभिनव बिंद्रानं ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचं नेतृत्त्व केलं. 
    डोपिंग स्कँडलमुळे भारतीयांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले, तरीही ऑॅलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अधिकाधिक पदकांच्या अपेक्षा सव्वाशे कोटी भारतीय बाळगून आहेत. लंडनच्या सहा पदकांच्या तुलनेत यंदा दुप्पट पदके भारताला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
=========================================

सुपरस्टार रजनीकांतला भिकारी समजून दिली १० रुपयांची नोट


  • ऑनलाइन लोकमत
    चेन्नई, दि. ०५ - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचे करोडो चाहते आहते. मात्र रजनीकांत चित्रपटात जितके फॅशनेबल दिसतात त्याच उलट ख-या आयुष्यात ते अगदी साधे राहतात. त्यांचं हेच साधेपण त्यांच्या चाहत्यांना भावतं, त्यामुळेच त्यांच्याबद्दल फक्त प्रेम नाही आदरही व्यक्त केला जातो. मात्र रजनीकांत हे इतके साधे राहतात की, कधी कधी त्यांना ओळखणं कठीण होऊन जातं. असाच काहीसा प्रकार घडला जेव्हा रजनीकांत एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराबाहेर विश्रांतीसाठी बसले असताना रजनीकांत यांना चक्क भिकारी समजून एका महिलेनं १० रुपयांची नोट दिली. 
    काही दिवसांपूर्वी रजनीकांत एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर मंदिराजवळच विश्रांती घेण्यासाठी ते बसले होते. त्यादरम्यान, एक महिला तेथून जात असताना तिने रजनीकांत यांना भिकारी समजून १० रुपयांची नोट दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रजनीकांत यांनी एकही शब्द न बोलता हसतमुखाने ती नोट स्विकारली. 
  • नोट घेतल्यानंतर रजनीकांत आपल्या गाडीकडे गेले असता, महिलेला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिच्या लक्षात आले की,  ही व्यक्ती  कोणी भिकारी नसून सुपरस्टार रजनीकांत आहेत. महिलेने थेट गाडीकडे धाव घेत रजनीकांत यांची माफी मागितली. यावर रजनीकांत यांनी दिलेलं उत्तर ऐकल्यावर हा माणूस एवढा मोठा सुपरस्टार का आहे हे कळते. 'जे काही झाले  चांगलेच झाले. कारण, देव मला आपल्याकडून वेळोवेळी हेच सांगत आहे की, आपले पाय नेहमीच जमिनीवर असले पाहिजेत. माझी खरी ओळख ही सुपस्टार नाही, तर सामान्य माणसासारखीच आहे', असं उत्तर देऊन रजनीकांत निघून गेले.
    दरम्यान, ही माहिती खुद्द त्या महिलेनं दिली असून तिचे नाव डॉ. गायत्री आहे. तिने लिहिलेल्या एका पुस्तकात या संदर्भाचा उल्लेख केला आहे. 
=========================================

फ्रान्समधील बारमध्ये लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू


  • ऑनलाइन लोकमत - 
    पॅरिस, दि. 06 - बारमध्ये लागलेल्या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नॉरमँडी येखील कुबा लिबरे क्लबमध्ये ही आग लागली होती. अपघाताने ही आग लागली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. 
    बारमध्ये काही तरुण वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. त्यावेळी मध्यरात्री ही आग लागली असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी दिलं आहे. नॉरमँडी येथे आठवड्याभरात घडलेली ही दुसरी दुर्घटना आहे. काही दिवसांपुर्वी इसीसशी संबंधित दोन हल्लेखोरांनी धर्मोपदेशकाची हत्या केली होती. तसंच काही जणांना ओलीस ठेवलं होतं. पोलिसांनी या हल्लेखोरांना ठार केलं होतं.
=========================================

राणेंनी नियमित केलेले भूखंड नियमबाह्यच


  • अहमदनगर : येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील १६८ भूखंडांचे झालेले बेकायदा वाटप नियमित करण्याचा तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नियमबाह्य ठरविला़ त्याचबरोबर हा निर्णय राज्यातील सर्व उद्योगांना लागू राहणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे़
    नागापूर औद्योगिक वसाहतीतील १६८ भूखंडांचे झालेले बेकायदा वाटप उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले होते. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उद्योजकांच्या आमी संघटनेसह तीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी़ एस़ ठाकूर व चंद्र खानवीलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला़ या भूखंडांवर उद्योजकांनी बांधकामे केली असून, सध्या या जागेवर कारखाने सुरू आहेत़ भूखंड ताब्यात घेण्याचा खंडपीठाचा निर्णय न्यायमूर्तींनी कायम केल्याने नगरच्या उद्योगक्षेत्रात खळबळ उडाली आहे़
    औद्योगिक वसाहतीतील भूखंड वाटपासंदर्भात अजित महांडुळे, विष्णू ढवळे, रुपेश पानसंबळ आणि सोमनाथ कराळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जुलै २०१३ मध्ये याचिका दाखल केली होती़ याचिकेची सुनावणी सुरू असतानाच आमी संघटनाही यात सहभागी झाली़ दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाचे न्या़ एस़ एस़ शिंदे व न्या़ एस़ एस़ संगीतराव पाटील यांच्या खंडपीठाने भूखंडांचे झालेले वाटप नियमबाह्य ठरवित रद्द केले़ एवढेच नव्हे तर भूखंड ताब्यात घेवून त्याचा लिलाव करावा व निविदा पध्दतीने पुन्हा वाटप करा व भूखंड वाटप करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले़ उद्योजकांनी बचावासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली़ तीन वेगवेगळ्या याचिका यासंदर्भात उद्योजकांनी न्यायालयात दाखल केल्या़ त्यावर न्यायामूर्ती पी़ एस़ ठाकूर व चंद्र खानविलकर यांच्या खंडपीठासमोवर सुनावणी झाली़ न्यायमूर्तींनी वाटप नियबाह्यच असल्यावर शिक्कामोर्तब करत भूखंड ताब्यात घेण्याचा निर्णय कायम ठेवला़ याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील नितीन गवारे यांनी बाजू मांडली़ तर आमी संघटनेच्या वतीने अभिषेक सिंघवी, श्याम दिवाण, इतर उद्योजकांच्या बाजूने शेखर नाफाडे, जयंत भूषण आणि कामगारांची बाजू सुधाकर देशमुख यांनी मांडली़

=========================================

जिल्ह्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करा’


  • ठाणे : महाड येथील सावित्री नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व छोट्यामोठ्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. युद्धपातळीवर सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून आवश्यक डागडुजी आणि सक्षमीकरणाची कामे हाती घेण्याचे आदेश त्यांनी अधीक्षक अभियंता नाना पवार यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे, रेल्वेवरील उड्डाणपुलांचे आॅडिट करण्यासंदर्भात मध्य रेल्वेलाही पत्र पाठवले आहे.
    ठाणे जिल्ह्यात ठाणे खाडी, उल्हास नदी, वालधुनी तसेच काळू नदीवर पूल आहेत. तसेच, उड्डाणपूल आणि रेल्वेवरील उड्डाणपुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महाड येथील दुर्घटना घडल्यानंतर शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. कळवा येथील ठाणे खाडीवरील जुना पूल खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
    स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुलांची दुरुस्ती करण्याकरिता निधी कमी पडू
    दिला जाणार नाही, तसेच जे पूल अत्यंत जुने व जीर्ण अवस्थेत असतील, ते बंद करून त्याजागी नवे पूल बांधण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
=========================================

दहशतवादाच्या समर्थकांना वेगळे पाडा


  • इस्लामाबाद : दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे उदात्तीकरण थांबवा, अशा स्पष्ट शब्दांत भारताने गुरुवारी पाकिस्तानला समज देताना दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करून त्यांना वेगळे पाडले पाहिजे, असे आवाहन केले.
    भारत- पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर काहीही हातचे न राखता गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवादाचा केवळ निषेध पुरेसा नाही. चांगला आणि वाईट दहशतवाद असा काही नसतो, असे स्पष्ट केले. राजनाथ सिंह यांनी येथे भरलेल्या सातव्या सार्क देशांच्या अंतर्गत मंत्र्यांच्या परिषदेत दहशतवाद हा या विभागाला सतत फार मोठे आव्हान असल्याचे सांगितले.
    हिंदी भाषेत केलेल्या भाषणात राजनाथ सिंह म्हणाले की,‘‘केवळ दहशतवादी किंवा दहशतवाद्यांच्या संघटना यांच्याविरुद्धच कठोर कारवाई व्हायला हवी असे नाही तर दहशतवादाला ज्या व्यक्ती, संघटना आणि देश पाठिंबा देतात त्यांच्यावरही ती झाली पाहिजे.’’ कोणत्याही देशाकडून दहशतवादाचे उदात्तीकरण करणे आणि त्याला आश्रय दिला जाणार नाही याची खात्री असली पाहिजे, अशा शब्दांत सिंह यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कान टोचले.
    काश्मीरमध्ये ८ जुलै रोजी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वनी मारला गेला त्याचे वर्णन शरीफ यांनी ‘हुतात्मा’ या शब्दांत केले होते. एका देशाचा दहशतवादी हा दुसऱ्या
    देशाचा हुतात्मा किंवा स्वातंत्र्यसैनिक असू शकत नाही. मी संपूर्ण मानवजातीसाठी म्हणतो की दहशतवाद्यांना हुतात्मा म्हणू नका. जे दहशतवाद्यांना पाठिंबा देतात त्यांना वेगळे पाडा, असेही राजनाथ सिंह म्हणाले. 
=========================================

पहिल्या खासगी चांद्रवारीस हिरवा कंदील!


  • वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या उद्योजकाने स्थापन केलेल्या ‘मून एक्स्प्रेस’ कंपनीला पुढील वर्षी चंद्रावर यान पाठवून तेथे उतरण्यास अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे नव्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा पृथ्वीवरील आर्थिक भरभराटीसाठी शोध घेऊन त्याचा विकास करण्याची व्यावसायिक कवाडे खासगी उद्योजकांनाही खुली झाली आहेत.
    आजवर जगातील अनेक देशांनी केलेल्या चांद्रसफरी व त्याही पलीकडच्या अंतराळ वाऱ्या आणि त्यासंबंधीचे संशोधन फक्त सरकारी संस्थापुरते मर्यादित होते. काही मोजक्या खाजगी अंतराळ सफरीही याआधी केल्या गेल्या. पण त्या पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा ओलांडून पुढे गेल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर ‘मून एक्स्प्रेस’ला परवानगी देण्याचा अमेरिकी सरकारचा धोरणात्मक निर्णय ऐतिहासिक व पथदर्शी आहे. पुढील वर्षी त्यांचे यांत्रिक अंतराळयान (रोबोटिक) चंद्रावर पाठवून तेथे उतरविण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे ‘मून एक्स्प्रेस’ने एका प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर केले.
    व्यापारी दृष्टीने अंतराळाचा शोध घेणे व त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे या प्रमुख उद्देशाने ‘मून एक्स्प्रेस’ कंपनीची स्थापना झाली आहे. भारतीय
    वंशाचे नवउद्योजक नवीन जैन, अंतराळ भविष्यवेत्ते डॉ. बॉब रिचर्डस आणि सतत नवनवे उद्योग काढणारे
    कृत्रिम प्रज्ञा व अंतराळ तंत्रज्ञान
    या क्षेत्रातील गुरु डॉ. बार्नी पेल यांनी मिळून सन २०१० मध्ये या
    कंपनीची स्थापना केली.
    कंपनीने पुढील वर्षाच्या चांद्रवारीसाठी ८ एप्रिल रोजी अर्ज केला होता.
    अमेरिकी सरकारच्या संस्थांनी त्याची छाननी करून कंपनीला या सफरीसाठी परवानगी दिली. या सफरीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘स्पेसशीप टू’ या अंतराळयानास परवाना दिला जाणे अपेक्षितच होते; परंतु ते चंद्रावर उतरविण्याची परवानगी मिळणे ही मोठी व्यापारी क्रांती मानली जात आहे.
    पुढील वर्षी सुटकेसच्या आकाराचे लॅण्डर दोन आठवड्यांसाठी चंद्रावर पाठविण्यात येईल.
    या मोहिमेद्वारे पृथ्वीच्या आर्थिक कक्षा रुंदावण्याबरोबरच अंतराळ तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन आणि विकासाची क्षितिजेही विस्तारणार आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.
    या परवानगीने आता इतर व्यावसायिक अंतराळ मोहिमांचा मार्गही खुला होणार आहे. (वृत्तसंस्था)
    >कोण आहेत नवीन जैन?
    ‘मून एक्स्प्रेस’चे सहसंस्थापक नवीन जैन हे नवउद्योजक आहेत. इन्फोस्पेस, इनोम आणि मून एक्स्प्रेस अशा कंपन्यांचे संस्थापक व सीईओ राहिलेले आहेत. उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात ६ सप्टेंबर १९५९ रोजी जन्मलेल्या नवीन यांनी आयआयटी रुरकीमधून शिक्षण
    पूर्ण केले. त्यानंतर जमशेदपूर येथील एक्सएलआरआय स्कूल आॅफ बिझनेस अ‍ॅण्ड ह्यूमन रिसोर्सेसमधून १९८२मध्ये एमबीए केले. १९८३मध्ये नवीन यांचा बिझनेस एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत अमेरिकी बाजारपेठेशी परिचय झाला. त्यानंंतर त्यांनी व्यावसायिक भरारी घेतली व आता तर ते अंतराळाला गवसणी घालायला निघाले आहेत.
    1967 सालच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार, अंतराळ मोहिमेत गैरसरकारी संस्था सहभागी नाही ना, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अमेरिकेवर आहे. आताही परवानगी देताना अमेरिकी सरकारने अनेक नियम आखून दिले आहेत. ते चंद्र, धूमकेतू व मंगळाच्या व्यावसायिक मोहिमांना लागू असतील.
    >‘मून एक्स्प्रेस’साठी आकाश ही मर्यादा नसून, अधिक पुढची झेप घेण्यासाठीचे लॉन्चपॅड आहे. पृथ्वीवर मानवाने टिकून राहण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी अमर्याद भवितव्याची खात्री करण्यासाठी अंतराळात झेपावणे हाच मार्ग आहे. नजीकच्या भविष्यात बहुमोल अशी नैसर्गिक साधनसंपत्ती, किंमती धातू आणि चंद्रावरील दगड पृथ्वीवर आणण्याचे आमचे स्वप्न आहे.
    -नवीन जैन, सहसंस्थापक व अध्यक्ष, मून एक्स्प्रेस
    मून एक्स्प्रेस २०१७ च्या मोहिमेला अमेरिकन सरकारने परवानगी देणे हे खूपच महत्त्वाचे पाऊल आहे. पृथ्वीच्या कक्षेबाहेर व्यावसायिक अंतराळ मोहिमा राबविण्यासाठी खाजगी क्षेत्राला आता नवे आकाश खुले झाले आहे. पृथ्वीच्या आठव्या खंडावर म्हणजेच चंद्रावर संशोधन करण्यास आता आम्ही सज्ज झालो आहोत. त्याचा फायदा संपूर्ण मानवजातीला होणार आहे.
    -डॉ. बॉब रिचर्डस,
    अंतराळ भविष्यवेत्ते
=========================================

बराक ओबामा हे अध्यक्षपदासाठी ‘लायक नाहीत’ ते ‘भयानक अध्यक्ष’ - डोनाल्ड ट्रम्प 


  • वॉशिंग्टन : बराक ओबामा हे अध्यक्षपदासाठी ‘लायक नाहीत’ ते ‘भयानक अध्यक्ष’ आहेत. त्यांचे अध्यक्ष असणे हे ‘अरिष्ट’ असून ते अमेरिकेच्या इतिहासात बहुधा ‘सर्वात वाईट अध्यक्ष’ ठरतील, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक लढवत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिले.
    तत्पूर्वी, मध्यपूर्वेत,सिरियामध्ये काय घडलेय ते तुम्ही बघा.
    त्यांचा (ओबामा) अविर्भाव असा की बघा मी जिंकणारच, असे ट्रम्प म्हणाले. 
=========================================

दूध भेसळखोरांना आजन्म कारावासाची शिक्षा द्या - सर्वोच्च न्यायालय


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 6- दुधाशिवाय आपण एकही दिवस राहू शकत नाही. लहान मुलांसाठी तर हे दूध म्हणजे पूर्णान्न आहे. मात्र या दुधात भेसळ होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सर्वोच्च न्यायालयानं याची गंभीर दखल घेतली असून कडक शिक्षा देण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. दुधभेसळ करणा-यांना देण्यात येणारी 6 महिन्यांची शिक्षा आणि दंड पुरेसं नसूल त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा दिली तरी हरकत नाही असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. 
     सर्वोच्च न्यायालयातील मुख्य खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत न्यायमूर्तींनी व्यक्त केलं आहे. भेसळयुक्त दूध वाढत्या वयातील मुलांच्या शरीरिक प्रक्रियांवर परिमाण करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

=========================================

No comments: