Wednesday, 31 August 2016

नमस्कार लाईव्ह ३१-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- शिकागो; ८३ वर्षीय काकाकुवा पक्ष्याचा मृत्यू 
2- ISIS दहशतवादी अदनानीला अमेरिकेने केलं ठार 
3- १०० वर्षांच्या आजीने मिळविले सुवर्णपदक! 
4- भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण करारावर स्वाक्षरी 
5- पर्युषण पर्वानिमित्त ओबामांकडून शुभेच्छा 
6- भारत-अमेरिकेच्या भागिदारीवरून चीन-पाकला पोटशूळ 
7- भूमध्य सागरातून दोन जुळ्यांसह 6500 शरणार्थींची सुटका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
8- सचिनचं अजून एक स्तुत्य पाऊल, कर्णबधीर शाळेला 40 लाखांचा निधी 
9- पुण्यात तयार होणार फियाटची ‘जीप’ 
10- ‘मोबिविक’चे ‘मोअर दॅन अ वॉलेट’ 
11- रतन टाटा, नीलकेणी आले एकत्र 
12- सेवा, भरती नियमांत बदल करण्याचा आदेश 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
13- बलात्कार प्रकरणात दोषींना पॅरोल नाही - राज्य सरकारचा निर्णय 
14- विलास शिंदेंच्या मृत्यूचे पोलीस कॉलनीत पडसाद, मुख्यमंत्र्यांना घेराव 
15- वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचे निधन, दुचाकीस्वाराने केली होती मारहाण 
16- पुण्यात रिक्षाचालकांकडून ओला कॅबची तोडफोड 
17- ‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश 
18- राज्यातील २३ लाख वाहने बंद 
19- चौदा प्रकल्पांच्या निविदा रद्द 
20- कायम विनाअनुदानित शाळांना दिलासा 
21- मराठा समाज आता अन्याय सहन करणार नाही- नारायण राणे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
22- हरियाणा- फरिदाबादमध्ये डेंग्यूचे दोन संशयित रुग्ण आढळले 
23- कोल्हापूर; इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका पेंटरचा मृत्यू 
24- देशात महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र आघाडीवर 
25- जीएसटीमधून आम्हाला हवी सूट: ई-कॉमर्स कंपन्या
26- 'मन की बात' आता बलुचिस्तानमध्येही
27- 'स्टुटंड ऑस्कर' विजेत्या दिग्दर्शकाची फरपट
28- उत्तर प्रदेश: चहा, नाश्‍त्यासाठी नऊ कोटी खर्च
29- हैदराबादला पावसामुळे सात जण मृत्युमुखी
30- कानाने नव्हे, 'तो' ऐकतो चक्क तोंडाने !
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
31- नशीब, मी अभ्यासात ढ होतो - पुलेला गोपीचंद
32- इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली
33- मल्ल योगेश्वर दत्तच्या पदकाचा रंग बदलणार!
34- जोकोविच, नदाल दुसऱ्या फेरीत
35- बोपन्ना-पेस पुन्हा एकत्र खेळणार 
36- रौप्य पदक न स्वीकारण्याचा योगेश्‍वरचा निर्णय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
--------------------------------------------------------

वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचे निधन, दुचाकीस्वाराने केली होती मारहाण



  • मुंबई, दि. ३१ - डयुटी बजावत असताना दुचाकीस्वाराकडून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांचे बुधवारी दुपारी लिलावती रुग्णालयात निधन झाले.  
     
    वाहतूक पोलिसांकडून सध्या मुंबईतील सगळया वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर एक वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी खार एसव्ही रोडवरील पेट्रोल पंपावर डयुटीवर बजावत असताना   विलास शिंदे यांनी तिथे आलेल्या दुचाकीस्वाराकडे त्याच्या गाडीची माहिती मागितली. 
     
    पण शिंदे यांना माहिती देण्यास दुचाकीस्वाराने नकार दिला. दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यांनी दुचाकीस्वाराला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जायची धमकी दिली. त्यानंतर संतापलेल्या दुचाकीस्वाराने शिंदे यांना मारहाण सुरु केली. तिथे असलेले एक लाकूड उचलून त्याने शिंदे यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. शिंदे रक्ताच्या थारोळयात तिथे कोसळले. ते पाहून भेदरलेला दुचाकीस्वार तिथून पसार झाला. 
--------------------------------------------------------

आणखी एक पोलीस शहीद झाला 



  • मुंबई, दि. 31 - अखेर कायदा तोडणाऱ्या तरूणांच्या बेदम मारहाणीमुळे कॉन्स्टेबल विलास शिंदेंचा मृत्यू झाला. 23 तारखेला आपलं कर्तव्य बजावणाऱ्या शिंदेंची चूक एवढीच होती की त्यांनी हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला हटकलं होतं. त्या मुलानं त्याच्या मोठ्या भावाला बोलावलं आणि शिंदेंना बांबूने मारहाण केली. लीलावतीमध्ये उपचार सुरू असताना, शिंदेंची प्राणज्योत मालवली.
     
    या महानगरीत रोज छोटे छोटे हादसे तर होतच असतात, कित्येक जण प्राणाला मुकतात, आणखी एक गेला तर काय फरक पडतो, भलेही मग तो कायद्याचं रक्षण करणारा पोलीस का असेना? समाजाच्या अशा निर्ढावलेल्या मनोवृत्तीमुळे अत्यंत अडगळीत गेलेल्या या शिंदेंच्या मारहाणीला खऱ्या अर्थाने वाचा फोडली मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी... त्यांनी काल शिंदे यांची रूग्णालयात केवळ भेटच नाही घेतली, तर मुस्लीम तरूण मोठ्या प्रमाणावर कायदे मोडत असल्याचा थेट आरोप केला. राज ठाकरेंच्या भेटीनंतर या मारहाणीला वाचा फुटली आणि हिंदू-मुस्लीम अंगाने त्यावर चर्चा झडायला लागल्या.
--------------------------------------------------------

विलास शिंदेंच्या मृत्यूचे पोलीस कॉलनीत पडसाद, मुख्यमंत्र्यांना घेराव



  • मुंबई, दि. 31 - कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वारावरुन झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस शिपाई विलास शिंदे यांच्या मृत्यूचे पडसाद पोलीस कॉलनीत पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वरळीमधील पोलीस कॉलनीत गेले होते. यावेळी पोलीस कॉलनीतील महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालत रोष व्यक्त केला. 'पोलिसांना न्याय मिळालाच पाहिजे' अशा घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर देण्यात आल्या. आरोपीला जामीन मिळाला नाही पाहिजे अशी मागणीही यावेळी महिलांनी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी मात्र तेथून काढता पाय घेतला.
     
    'ही दुर्देवी घटना असून आम्ही सर्व त्यांच्या दुखात सामील आहोत. सरकारकडून विलास शिंदे यांच्या कुटुंबियांना पुरेपूर मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल', असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलं.
     
    दुचाकीस्वाराकडून झालेल्या मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई विलास शिंदे यांचं बुधवारी निधन झालं. गंभीर जखमी झालेल्या विलास शिंदेंना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. संध्याकाळी सात वाजता त्यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.
--------------------------------------------------------

बलात्कार प्रकरणात दोषींना पॅरोल नाही - राज्य सरकारचा निर्णय




  • मुंबई, दि. ३१ - बलात्कार प्रकरणात तुरूंगवासाची शिक्षा भोगणा-या दोषींची यापुढे पॅरोलवर सुटका होणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने दिला आहे. अ‍ॅड. पल्लवी पूरकायस्थ हत्या करणारा सज्जाद मुघल हा पॅरोलवर असतानाच फरार झाल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 
    वडाळयाच्या भक्ती पार्कमध्ये १६ व्या मजल्यावर रहाणा-या पल्लवीची ९ ऑगस्ट २०१२ रोजी सज्जादने अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली होती. या हत्येविरोधात समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारने जलदगती न्यायालयात हा खटला चालवला. सज्जादला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली व त्याला नाशिक कारागृहात पाठवले.
    सज्जादने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पॅरोलसाठी अर्ज केला होता. विभागीय आयुक्तांनी त्याचा पॅरोल मंजूर केल्यानंतर तो एप्रिलच्या अखेरीस तीस दिवसांसाठी बाहेर आला पण त्यानंतर तो तुरुंगात परतलाच नाही. या प्रकरणी नाशिक पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला.
    सज्जादने ९ ऑगस्टच्या रात्री पल्लवीच्या फ्लॅटचा वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर त्याने पल्लवीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करुन तिची हत्या केली होती.  वडाळ्यातील एका उच्चभ्रू सोसाटीत राहणा-या पल्लवीचा मृतदेह आढळला होता. या घरात पल्लवी तिचा प्रियकर अविक सेनगुप्तासोबत राहत होती. याप्रकरणी पोलिसांनी सज्जादला अटक केली होती. 
    खून, घुसखोरी व विनयभंगाचे आरोप लावण्यात आले होते. पल्लवीवर सज्जादची पहिल्यापासून वाईट नजर होती़ त्या रात्री ती घरात एकटीच होती़ त्या वेळी सज्जादने जाणीवपूर्वक लाइट बंद केले व घरात घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला़ पण तिने प्रतिकार केल्याने सज्जादने तिचा खून केला होता.
--------------------------------------------------------

सचिनचं अजून एक स्तुत्य पाऊल, कर्णबधीर शाळेला 40 लाखांचा निधी



  • नाशिक, दि. 31 - उस्मानाबादेतील डोंजा गाव दत्तक घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने अजून एक स्तुत्य पाऊल उचललं आहे. खासदार सचिन तेंडूलकरने स्थानिक विकास निधीतून, येवल्यातील समता प्रतिष्ठानच्या मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालयाला तब्बल चाळीस लाखांचा निधी दिला आहे.
     
    एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार  येवल्यातील अंगणगाव येथील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी शाळा गेल्या 21 वर्षांपासून कार्यरत आहे. जिल्हयातील ही दुसरीच निवासी शाळा असून, या ठिकाणी 110 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र केवळ 40 विद्यार्थ्यांना शासकीय अनुदान मिळते.  

--------------------------------------------------------

८३ वर्षीय काकाकुवा पक्ष्याचा मृत्यू



  • शिकागो, दि. ३१ - जगातील सर्व पक्ष्यांच्या तुलनेत सर्वाधिक जास्त म्हणजे ८३ वर्षे जगणा-या काकाकुवा या पक्ष्याचा सोमवारी मृत्यू झाला. जगातील सर्वात वयस्कर पक्षी म्हणून काकाकुवा पक्ष्याकडे पाहिजे जात होते.
    शिकागो येथील प्रसिद्ध असलेल्या ब्रूकफिल्ड प्राणिसंग्रहालयात सोमवारी काकाकुवा पक्ष्याचा मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयात काककुवा पक्ष्याला कुकी या नावाने सर्वजण ओळखत होते. लाल व पिवळा तुरा असलेला सफेद गुलाबी रंगाचा कूकी हा अवघ्या एक वर्षाचा असताना ऑस्ट्रेलियातील तारोंगा प्राणिसंग्रहालयातून आणले होते, अशी माहिती ब्रूकफिल्ड प्राणिसंग्रहालयाच्या अधिका-यांनी दिली.
    गेल्या शनिवारी कुकीची अचानक तब्येत खालावली. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. कुकीला वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले होते. यात ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि मोतीबिंदू झाल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले.
    काकाकुवा पक्ष्याबद्दल माहिती...
    काकाकुवा हा सिट्टॅसिडी कुलातील मोठ्या आकाराचा पोपट आहे. हा उष्णकटिबंध प्रदेशांत आढळणारा पक्षी असून याचे शास्त्रीय नाव कॅकॅटोई गॅलेरिटा आहे. या पक्ष्याचे काकाकुवा हे नाव मूळ ‘काकातुआ’ या मलेशियन नावापासून आले आहे. मलेशिया, इंडोनेशिया, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया, न्यूगिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील बर्‍याच बेटांवर हा पक्षी आढळतो. ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियात याच्या अकरा जाती आहेत. त्यापैकी पिवळसर तुरा असलेले पांढर्‍या रंगाचे काकाकुवा पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. 
  • ==================================

No comments: