*[अंतरराष्ट्रीय]*
१- जगभर निनादले भारतीय राष्ट्रगीत
२- काश्मीर मुद्द्यावरील चर्चेसाठी पाकचे भारताला निमंत्रण
३- येमेन; हवाई हल्ल्यांत १० विद्यार्थी ठार
४- नेपाळमध्ये दोन वेगवेगळया बस दुर्घटनांमध्ये ३७ ठार, ४३ जखमी
५- प्युरटो वालार्टा येथील रेस्टॉरन्टमधून एका शस्त्रधारी व्यक्तीने अनेक लोकांचे केले अपहरण
६- दक्षिण पेरूला 5.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का, भूकंपात 4 जणांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
७- गुजरातमध्ये दलितांवर जमावाचा हल्ला, १० जखमी
८- दाऊदच्या भाच्याच्या लग्नावर ‘वॉच’
९- काळा पैसा जाहीर करणाऱ्यांना पोचपावती
१०- महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर
११- सलग तिसऱ्या सप्ताहात निर्देशांकांची वाढती कमान
१२- ...त्यामुळे न्यायाधीश नियुक्तीचा आग्रह: केजरीवाल
१३- काश्मीरमध्ये सलग 39 व्या दिवशीही संचारबंदी
१४- पंतप्रधानांच्या भाषणावर सरन्यायाधीश नाराज
१५- आधार कार्ड लवकरच ऑनलाईन
१६- पाकिस्तान आणि नरकात जाणं एकसारखंच - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१७- बेशिस्त चालकांना दुप्पट ते दहापट दंड
१८- रोजंदारी कामगार 'बेस्ट' नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत
१९- स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनमध्ये 20 टक्के वाढ
२०- प्रत्येक नागरिकासाठी स्वातंत्र्य हवे: राहुल गांधी
२१- रेल्वे 'मालामाल' तरीही तोट्याचे तुणतुणे
२२- पेट्रोल 1 रुपयाने; तर डिझेल 2 रुपयांनी स्वस्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
२३- अहमदनगर: जमिनीच्या वाटणीवरून माजी सैनिकाने केला आईचा खून
२४- चांदवड (नाशिक)-तालुक्यातील दरेगाव येथे दोघांचा धरणात बुडून मृत्यू.
२५- दरड कोसळल्यामुळे हिमालचप्रदेशच्या किनौर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ०५ वर वाहतूक बंद
२६- कर्नाटकात सिद्दागंगा तंत्रज्ञान विद्यालयात पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा देणा-या तीन विद्यार्थ्यांना अटक
२७- मुसळधार पावसामुळे सिमलामधील जनजीवन विस्कळीत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२८- मराठी संगीत रंगभूमीचा वारसा निष्ठेने जपणा-या किर्ती शिलेदार यांचा वाढदिवस
२९- बाळासाहेबांच्या भूमिकेत अक्षयकुमार ?
३०- अस्मिता-अभिचा झाला साखरपुडा
३१- सानिया-बोपण्णा परतले पदकाविना
३२- मला माफ करा - बॉक्सर विकास क्रिशन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
*
============================================
१- जगभर निनादले भारतीय राष्ट्रगीत
२- काश्मीर मुद्द्यावरील चर्चेसाठी पाकचे भारताला निमंत्रण
३- येमेन; हवाई हल्ल्यांत १० विद्यार्थी ठार
४- नेपाळमध्ये दोन वेगवेगळया बस दुर्घटनांमध्ये ३७ ठार, ४३ जखमी
५- प्युरटो वालार्टा येथील रेस्टॉरन्टमधून एका शस्त्रधारी व्यक्तीने अनेक लोकांचे केले अपहरण
६- दक्षिण पेरूला 5.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का, भूकंपात 4 जणांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
७- गुजरातमध्ये दलितांवर जमावाचा हल्ला, १० जखमी
८- दाऊदच्या भाच्याच्या लग्नावर ‘वॉच’
९- काळा पैसा जाहीर करणाऱ्यांना पोचपावती
१०- महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर
११- सलग तिसऱ्या सप्ताहात निर्देशांकांची वाढती कमान
१२- ...त्यामुळे न्यायाधीश नियुक्तीचा आग्रह: केजरीवाल
१३- काश्मीरमध्ये सलग 39 व्या दिवशीही संचारबंदी
१४- पंतप्रधानांच्या भाषणावर सरन्यायाधीश नाराज
१५- आधार कार्ड लवकरच ऑनलाईन
१६- पाकिस्तान आणि नरकात जाणं एकसारखंच - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१७- बेशिस्त चालकांना दुप्पट ते दहापट दंड
१८- रोजंदारी कामगार 'बेस्ट' नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत
१९- स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनमध्ये 20 टक्के वाढ
२०- प्रत्येक नागरिकासाठी स्वातंत्र्य हवे: राहुल गांधी
२१- रेल्वे 'मालामाल' तरीही तोट्याचे तुणतुणे
२२- पेट्रोल 1 रुपयाने; तर डिझेल 2 रुपयांनी स्वस्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
२३- अहमदनगर: जमिनीच्या वाटणीवरून माजी सैनिकाने केला आईचा खून
२४- चांदवड (नाशिक)-तालुक्यातील दरेगाव येथे दोघांचा धरणात बुडून मृत्यू.
२५- दरड कोसळल्यामुळे हिमालचप्रदेशच्या किनौर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ०५ वर वाहतूक बंद
२६- कर्नाटकात सिद्दागंगा तंत्रज्ञान विद्यालयात पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा देणा-या तीन विद्यार्थ्यांना अटक
२७- मुसळधार पावसामुळे सिमलामधील जनजीवन विस्कळीत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२८- मराठी संगीत रंगभूमीचा वारसा निष्ठेने जपणा-या किर्ती शिलेदार यांचा वाढदिवस
२९- बाळासाहेबांच्या भूमिकेत अक्षयकुमार ?
३०- अस्मिता-अभिचा झाला साखरपुडा
३१- सानिया-बोपण्णा परतले पदकाविना
३२- मला माफ करा - बॉक्सर विकास क्रिशन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
*
============================================
बेशिस्त चालकांना दुप्पट ते दहापट दंड
- मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याने, त्याला चाप लावण्यासाठी दंडात मोठी वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. या निर्णयाची १६ आॅगस्टपासून मुंबई वाहतूक पोलिसांकडून कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, वाहन चालकांना दुप्पट ते दहापट दंडाची आकारणी केली जाईल. दुचाकीस्वार विनाहेल्मेट असल्यास ५00 रुपये दंड, तर बेदरकारपणे वाहन चालविल्यास एक हजार रुपये दंडाची आकारणी केली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत तरुणांमध्ये रेसिंगचे प्रमाण अधिक असून, त्याला जरब बसावी, यासाठी तब्बल दोन हजार रुपये दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
मराठी संगीत रंगभूमीचा वारसा निष्ठेने जपणा-या किर्ती शिलेदार यांचा वाढदिवस
- प्रफुल्ल गायकवाडमुंबई, दि. १६ - मराठी संगीत रंगभूमीचा वारसा निष्ठेने जपणा-या स्वरसम्राज्ञी तथा अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा आज (१६ ऑगस्ट) वाढदिवस.कीर्ती शिलेदार ह्या जयराम, जयमाला शिलेदार यांच्या कन्या. आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले. कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४००० हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार आहेत. रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी स्वर ताल शब्द संगती या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून तीनपात्री सौभद्र सादर करतात.
============================================
रोजंदारी कामगार 'बेस्ट' नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १६ - प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी घेणारे बेस्ट प्रशासन मात्र त्यांच्याच सेवेत असलेल्या रोजंदारी कामगारांना बेस्ट सेवा देण्यात अपयशी ठरले आहे. गेली दहा वर्षे नवघणी कामगारांच्या खालोखाल रोजंदारी सेवेत केबल टाकणे, रस्त्यावर खड्डे खणणे आणि तत्सम काम करीत असलेल्या ८६४ कामगारांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कवच देणे तसेच त्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यास बेस्ट उपक्रम कुचराई करत आहे. त्यामुळे आपल्या न्याय मागण्यांसाठी या कामगारांनी आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी गार्हाणे मांडले आहे.बेस्टने प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाच्या प्रत्येक कर्मचार्यावर असते. यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी ते प्रथमवर्ग अधिकार्यांपर्यंत प्रत्येकजण काम चोख बजावत असतो. प्रशासनाच्या सेवेत असलेले कायमस्वरुपी कर्मचार्यांबरोबरच अनुकंपावर तत्वावर काम करणारे हे कामगार आपले काम कुशलतेने करत आहेत. तरीही या कामगारांना प्रशासकीय सेवेत कायम करण्यास प्रशासन दिरंगाई करत आहे. अनुकंपा तत्वावर दहा वर्षांपूर्वी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागात रुजू झाल्यानंतर दररोज शंभर रुपये वेतन या कामगारांना मिळत होते.दहा वर्षांनंतर आता या कामगारांना दररोज ४४६ रुपये वेतन मिळत आहे. विजेची तार टाकताना अपघात झाल्यास या कामगारांना उपचारासाठी आर्थिक मदतही मिळत नाही. आजारपणात सुट्टी घेतल्यास तेवढय़ा दिवसांच्या वेतनाला मुकावे लागते, अशी व्यथा या कामगारांनी व्यक्त केली आहे. कायमस्वरुपी नोकरी मिळेल, या आशेवर असलेल्या या कामगारांवर त्यांचे कुटुंब अवलंबून आहे. मात्र खुला प्रवर्ग आणि अनुसुचित जाती या प्रवर्गाचे आरक्षण यापूर्वी भरण्यात आले असल्याचे उत्तर प्रशासनाकडून दरवेळी मिळत असल्याने हे कामगार हवालदिल झाले आहेत.
============================================
द्मनाभस्वामी मंदिरातून १८६ कोटींच्या सोन्याची चोरी ?
- तिरुअनंतपूरम, दि. १६ - केरळमधील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या स्पेशल ऑडीट रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. विनोद राय समितीने केलेल्या मंदिराच्या ऑडीटमध्ये मंदिर व्यवस्थापनामध्ये मोठया प्रमाणावर आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार असल्याचे समोर आले आहे. या ऑडीटमध्ये मंदिरातील १८६ कोटी रुपयांचे सोने गायब असल्याचे समोर आले आहे.पाच भागांमध्ये हा एकहजार पानी अहवाल असून, सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोंबर २०१५ मध्ये राय समितीला ऑडीटपूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शुद्धीकरणाच्या नावाखाली मोठया प्रमाणावर सोने गहाळ झाले असून, ७६९ सोन्याची भांडी गायब आहेत. ज्याची एकूण किंमत १८६ कोटी रुपये आहे.या आर्थिक गैरव्यवहारांच्या मूळाशी जाण्यासाठी राय यांनी त्यांच्या अहवालात चौकशीची शिफारस केली आहे. शुद्धीकरणामध्ये २.५० कोटी रुपये सोन्याचे नुकसान झाले आहे. मंदिराच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असून, १४.१८ लाख रुपयांच्या सोने आणि चांदीची रजिस्टरमध्ये नोंदणी केलेली नाही. हे बेकायद असल्याचे अहवालात म्हटले आहे.१४ लाख रुपये किंमतीचे चांदीचे बार गायब आहेत. मंदिर व्यवस्थापनाने १९७० मध्ये बेकायदपद्धतीने २.११ एकर जमिनीची विक्री केली. या व्यवहाराच्या कुठल्याही नोंदी नसल्याचे समोर आले आहे.
============================================
बाळासाहेबांच्या भूमिकेत अक्षयकुमार ?
- मुंबई, दि. १६ - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर बनणा-या चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी मी योग्य आहे किंवा नाही हे मी ठरवू शकत नाही असे अक्षय कुमारने म्हटले आहे.रुस्तम चित्रपटाच्या यशानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना अक्षयला बाळासाहेबांची भूमिका करायला आवडेल का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अक्षयने बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी मी फीट बसेन की, नाही हे मी सांगू शकत नाही. चित्रपटाचे जे निर्माते आहेत त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे असे अक्षयने सांगितले.बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी कुठला कलाकार तुला योग्य वाटतो या प्रश्नावर अक्षयने ते मला सांगता येणार नाही असे उत्तर दिले. बाळासाहेब हे लहान व्यक्तीमत्व नाही. बाळासाहेब खूप मोठे होते असे अक्षयने सांगितले. बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी ज्यांच्या नावाचा विचार सुरु आहे त्यामध्ये अक्षयचे एक नाव आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू राहुल आणि सूनबाई स्मिता बाळासाहेबांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करत आहात.
============================================
गुजरातमध्ये दलितांवर जमावाचा हल्ला, १० जखमी
- अहमदाबाद, दि. १६ - गुजरातमध्ये दलितांवर हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार उनामधील रॅली आटोपून घरी परतणा-या दलितांच्या एका गटावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात १० जण जखमी झाले असून काही गाडया जाळण्यात आल्या. उना-भावनहर महामार्गावर सेमतार गावाजवळ सोमवारी ही घटना घडली.सेमतार हे तेच गाव आहे ज्या गावातून दलित कुटुंबाला मारहाण केल्या प्रकरणी तेरा जणांना अटक झाली होती. गृहराज्यमंत्री प्रदीपसीन जाडेजा यांनी कुठलाही हिंसाचार झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. 'हल्लेखोरांनी जय भीम अशी घोषणा दिली. आम्ही या घोषणेला प्रतिसाद देताच त्यांनी हल्ला केला. मी या हल्ल्यातून थोडक्यात बचावलो पण माझा चुलत भाऊ अशोक मारहाणीमध्ये जखमी झाला' असे मावजी सारविया यांनी सांगितले.
============================================
अस्मिता-अभिचा झाला साखरपुडा
- मीनाक्षी कुलकर्णी, ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १६ - मालिका वा चित्रपटात एकमेकांसोबत काम करता करता कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. अमिताभ-जया, धर्मेंद्र- हेमामालिनी, दीपिका-रणवीपर्यंत अनेकजण आपल्या सहकलाकाराच्या प्रेमात पडले आणि कायम एकत्र राहिले. मराठी चित्रपटसृष्टीतही उमेश कामत-प्रिया बापट, सौरभ गोखले- अनुजा साठे, आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकर अशा जोड्या पहायला मिळतात. हे सगळं आत्ता सांगायच कारण म्हणजे रील लाईफमधील एक जोडी आता रिअल लाईफमध्येही जोडीदार बनले आहेत.. ती जोडी म्हणजे मयुरी वाघ आणि पियुष रानडे अर्थात ' अस्मिता-अभि' यांची..'अस्मिता' या मालिकेत खासगी गुप्तहेराची भूमिका निभावणारी मयुरी वाघ आणि त्याच मालिकेत तिच्या पतीची, अभिची भूमिका करणारा पियुष रानडे या दोघांचाही नुकताच साखरपुडा झाला आहे. अस्मिता-अभिची मालिकेतील ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची आणि ख-या आयुष्यातही त्यांची जोडी असावी असंही अनेकांना वाटायचं. मयुरी-पियुषच्या चाहत्यांची ही इच्छा आता खरी झाली असून त्या दोघांनी आता आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे.'अस्मिता' मालिकेत काम करता करता माझी आणि पियुषची ओळख झाली. गेल्या दोन वर्षांपासून एकत्र काम करत आहोत आणि त्याच काळात आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र बनलो. कोणतीही गोष्ट, सिक्रेट, सुख-दु:ख आम्ही एकमेकांशी शेअर करू शकतो. आमची पडद्यावरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते आणि ती प्रत्यक्षातही साकारावी अशी इच्छा अनेकांनी आमच्यासमोर बोलून दाखवली. काही काळानंतर आम्हालाही असं वाटलं की आम्ही एवढे छान मित्र आहोत की एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य एकत्र घालवू शकू. आमच्या घरच्यांशी हा निर्णय डिस्कस केला असता त्यांनीही आनंदाने आम्हाला मान्यता दिली. प्रेमात पडल्याची आणि आपल्याच आवडत्या माणसासोबत पूर्ण आयुष्य घालवता येणार आहे हा विचारच खूप सुखद आहे आणि आम्ही दोघेही खूप खुश आहोत.
============================================
दाऊदच्या भाच्याच्या लग्नावर ‘वॉच’
- अंडरवर्ल्ड डॉन दाइब्राहिमचा भाचा अलिशाह इब्राहिम-पारकरचे मुंबईतील नागपाडा परिसरात लग्न पार पडणार आहे, तर जूहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागत समारंभ होणार आहे. यात दाऊद स्वत: उपस्थित राहणार नाही. मात्र, तो स्काइपद्वारे लग्न पाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या लग्नासाठी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांसह मुंबई पोलिसांची करडी नजर या लग्नावर असणार आहे.नागपाडा येथील गार्डन हॉल अपार्टमेंटमध्ये अलिशाह वास्तव्यास आहे. तो दाऊदची दिवंगत बहीण हसिना पारकरचा लहान मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी डोंगरी परिसरात हसिना पारकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, तर गवळी गँगच्या गँगवारमध्ये अलिशाहचे वडील इब्राहिम पारकर यांची हत्या झाली होती. अलिशाह राहत असलेला फ्लॅट हसिनाच्या नावावर आहे.अलिशाहच्या लग्नपत्रिकेनुसार, १७ आॅगस्ट रोजी त्याचे लग्न पार पडणार आहे. नागपाडा येथील तेली मोहल्ल्यात सकाळी ११ वाजता आयेशा नामक मुलीसोबत त्याचे लग्न होणार आहे. आयेशा एका व्यावसायिकाची मुलगी आहे. त्यानंतर, रात्री ९ वाजता जुहू येथील ट्युलिप स्टार हॉटेलमध्ये स्वागत समारंभ ठेवण्यात आला आहे. लग्नसराईच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी विशेष बंदोबस्त ठेवल्याचे समजते. या सोहळ््यात निमंत्रितांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मीडिया प्रतिनिधींनी आतमध्ये शिरू नये, म्हणून बाउंसरचीहीनेमणूक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
============================================
No comments:
Post a Comment