Wednesday, 24 August 2016

नमस्कार लाईव्ह २४-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- थायलंड पुन्हा बॉम्बस्फोटानं हादरलं, एकाचा मृत्यू, 30 जखमी
२- पाकमध्ये मोदींविरोधात ठराव संमत
३- 25 वर्षांपूर्वी आज झाला इंटरनेटचा जन्म
४- दाऊद पाकिस्तानातच युनोकडून शिक्कामोर्तब
५- लाहोरमधल्या ऐतिहासिक रेड लाइट एरियाला ई-कॉमर्समुळे ग्रहण
६- पाकिस्तानमध्ये न्यूज चॅनेलवर हल्ला, एकाचा मृत्यू
७- चक्रीवादळामुळे जपानमध्ये ४०० हून अधिक उड्डाणे रद्द
८- जगातील टॉप 10 श्रीमंत देशांची यादी, भारताचा नंबर....! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
८- भारतीय नौदलाच्या स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती झाली लीक 
९- साक्षी, सिंधूच्या पदव्या दाखवा - केजरीवालांची मागणी  
१०- पाणबुडी प्रकरणाची चौकशी करतो: पर्रीकर
११- छत्तीसगडमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
१२- शारदा गैरव्यवहार: नलिनी चिदंबरम यांना समन्स
१३- भारताच्या पाणबुड्यांसंदर्भातील माहिती लीक...
१४- काश्मीरचा ज्वालामुखी कधीही फुटेल- अँटनी
१६- इटलीला भूकंपाचा जोरदार धक्का
१७- कौटुंबिक पाठबळामुळे खेळाला मिळाली गती
१८- रोहित वेमुला दलित नव्हता;अहवालात माहिती
१९- 'अल्लाहू अकबर' म्हणत महिलेसह दोघांवर हल्ला
२०- साक्षी मलिकचे दिल्लीत जोरदार स्वागत
२१- गाय हिंदूसह मुस्लिमांचीही माता- शंकराचार्य
२२- राज्याला तेलंगणची ‘वेसण’
२३- मुख्यमंत्रिपदाचा मुकुट कोण परिधान करणार?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
२४- वाई हत्याकांडातील मृतांचा आकडा थांबेना, संतोष पोळकडून सातव्या हत्येची कबूली 
२५- हिंदुस्थानात येण्यासाठी लढा देणारे बलुची नेतेही स्वातंत्र्य योद्धे - उद्धव ठाकरे 
२६- लग्नात 100 हून जास्त लोक आल्यास पोलीस करणार पाहुणचार 
२७- गणेशोत्सवात शाळांना 5 दिवस सुट्टी द्या: मनसे 
२८- मुंबई मनपा शाळेत योग आणि सूर्यनमस्काराची सक्ती 
२९- मुंबई पालिकेचा विकास आराखडा लांबणीवर
३०- महाराष्ट्राला १३.८ टीएमसी पाणी
३१- मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार बंधनकारक
३२- आता दहीहंडीच्या ‘साहसा’वर गंडांतर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
३३- पुणे; मुलींचं अपहरण नव्हे, कंटाळा आल्याने फिरायला गेल्याचं उघड 
३४- मिरारोड; पतीकडून पैसे उकळण्यासाठी पत्नीने रचला स्वत:च्याच अपहरणाचा डाव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
३५- सलमान चित्रपटात माकडासारखं नाचतो - सपना भवना  
३६- तेलगळतीमुळे झाला कोट्यवधींचा दंड!
३७- कंपनी विक्रीतून मुंबईतील बंधू झाले 'अब्जाधीश'
३८- विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्स घसरला
३९- महागाई नियंत्रण, आर्थिक वृद्धीत समन्वय हवा
४०- ३ लाखांवरील रोख व्यवहार होणार बंद
४१- व्होडाफोन, एअरटेल वापरू नका - रिलायन्सची कर्मचाऱ्यांना सूचना
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 

8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
==================================

भारतीय नौदलाच्या स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती झाली लीक



  • नवी दिल्ली, दि. २४ - भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची गोपनीय व संवेदनशील माहिती लीक झाल्याने एकच खळबळ माजली आहे. फ्रान्समधील 'डीसीएनएस' या पाणुबड्यांची बांधणी करणाऱ्या कंपनीची तब्बल २२,००० पानांची कागदपत्रे लीक झाल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. चिंतेची बाब म्हणजे,  त्या कागदपत्रांमध्ये भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दल गुप्त माहितीचा समावेश असल्याचे समजते. याप्रकरणी नौदलाने निवेदन जारी केले असून ही गुप्त माहिती भारतातून नव्हे तर परदेशाून लीक झाल्याचे प्रथमदर्शी निष्पन्न झाले आहे अशी माहिती दिली आहे. 
    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ' डीसीएनएस' या कंपनीला एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियासाठी १२ पाणबुड्यांच्या डिझायनिंगचे कंत्राट मिळाले होते. त्यामध्ये पाणबुडीचे सेन्सर्स, युद्ध व्यवस्थापन यंत्रणा, टॉर्पेडो (पाणतीर) प्रक्षेपण प्रणाली तसेच पाणबुडीतील संपर्क व दिशादर्शन प्रणाली याचा समावेश आहे. 
    दरम्यान भारतीय नौदलातील 'स्कॉर्पिअन' प्रकारातील 'कलावरी' या पहिल्या पाणबुडीची मे २०१६ मध्ये समुद्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली व  ती लौकरच नौदलात दाखल होणार आहे. त्याशिवाय येत्या २० वर्षांत, अशाच प्रकारच्या ६ 'स्कॉर्पिअन' पाणबुड्या भारतीय नौदलात दाखल होणार असल्याचे समजते. 
    स्कॉर्पिअन पाणबुडीची नेमकी कोणती माहिती उघड झाली आहे याची माहिती नौदल प्रमुखांना घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  रात्री 12 वाजता मला याची माहिती मिळाली होती, याप्रकरणी पूर्ण 100 टक्के माहिती लीक झालेली नाही. मात्र आपल्याशी (भारतीय नौदलाशी) संबंधित किती माहिती उघड झाली आहे हे प्रथम पाहावं लागेल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले. 
==================================

वाई हत्याकांडातील मृतांचा आकडा थांबेना, संतोष पोळकडून सातव्या हत्येची कबूली

  • First Published :24-August-2016 : 10:15:00Last Updated at: 24-August-2016 : 10:05:49

  • - ऑनलाइन लोकमत 
    सातारा, दि. 24 - वाई हत्याकांड प्रकरणाने पोलीस प्रशासनासह संपुर्ण महाराष्ट्र हादरुन गेला असताना अजून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. क्रूरकर्मा आरोपी डॉक्टर संतोष पोळनं आणखी एक हत्या केली असल्याची म्हणजे सातवा खून केल्याची कबुली दिली आहे. संतोष पोळच्या या धक्कादायक माहितीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. नेमके अजून किती मृतदेह बाहेर निघणार आहेत याचा पोलिसांनाही अंदाज लागेना झाला आहे. पोलीस तपास सुरु असून या  प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.
    सहा हत्या करुन क्रूरतेची परिसीमा गाठण-या संतोष पोळने सातव्या हत्येची कबुली दिली आहे. घोटवडेकर रुग्णालयातील वॉर्डबॉय तुषार जाधवचा आपण खून केल्याची आता संतोष पोळने दिली आहे. इंजेक्शन देऊन वॉर्डबॉय तुषार जाधव याची हत्या करण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून सातारा जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच तुषार जाधवचा मृत्यू झाला होता. याच घोटवडेकर रुग्णालयात संतोष पोळ अतिदक्षता विभागात होता.
==================================

साक्षी, सिंधूच्या पदव्या दाखवा - केजरीवालांची मागणी


  • योगेश मेहेंदऴे, ऑनलाइन लोकमत
    हैदराबाद व विजयवाडासह संपूर्ण भारत सिंधूच्या ऑलिंपिक रौप्य पदकाचा आनंद साजरा करत असताना, अरविंद केजरीवालांनी पी. व्ही. सिंधूच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सिंधू ही केवळ एक खेळाडू नसून भारत पेट्रोलियममध्ये असिस्टंट स्पोर्ट्स मॅनेजर या पदावर कार्यरत होती, आणि ऑलिंपिकमधल्या पराक्रमानंतर भारत पेट्रोलियमने  सिंधूला डेप्युटी स्पोर्ट्स मॅनेजर अशी बढती दिली आहे. केजरीवालांनी सिंधूला मुळात नोकरीच कुठल्या शैक्षणिक पात्रतेसाठी दिली, असा सवाल विचारला आहे. भारत पेट्रोलियमला पाठवलेल्या पत्रामध्ये केजरीवालांनी एका सुशिक्षित आम आदमीची नोकरी हिसकावून घेतली असल्याचा आरोप केला असून सिंधूच्या पदव्या जाहीर कराव्यात, अशी मागणी कंपनीकडे केली आहे.
    या उच्च पदाच्या नोकऱ्या करण्यासाठी भारतातले युवक युवती अहोरात्र अभ्यास करून पदव्युत्तर शिक्षण, एमबीए आदी परीक्षा उत्तीर्ण होतात, मात्र सिंधू साधी पदवीधारक तरी आहे का ? असा सवाल या निमित्तानं केजरीवालांनी विचारला आहे.
    केवळ सिंधूच नाही, तर रेल्वेने नोकरी दिलेली व ऑलिंपिक कास्य पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिचेही शिक्षण काय आहे, आणि कुठल्या शैक्षणिक अर्हतेच्या आधारे रेल्वेने तिला नोकरी दिली असा प्रश्न केजरीवालांनी उपस्थित केला आहे.

==================================

लग्नात 100 हून जास्त लोक आल्यास पोलीस करणार पाहुणचार


  • - ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 24 - तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करत असाल आणि त्यासाठी पाहुण्यांची यादी तयार करत आहात तर 100 हून जास्त पाहुण्यांना आमंत्रित करणं तुमच्या अडचणी वाढवू शकतं. राज्य सरकारने एक अशा प्रकारच्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे ज्यामुळे सत्यनारायण पूजा, वाढदिवसाची पार्टी, लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये विघ्न येऊ शकतं. या मसुद्याचं कायद्यात रुपांतर झाल्यास 100 हून जास्त पाहुण्यांना आमंत्रित करताना पोलिसांची परवानगी घेणं अनिवार्य असणार आहे.
    महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सेक्युरिटी अॅक्टचं जर कायद्यात रुपांतर झालं तर अशा कार्यक्रमांमध्ये 100 हून जास्त लोकांना आमंत्रित करण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. विना परवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्यास किमान तीन वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड आकारला जाणार आहे. तशी तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे.
    सरकारने या मसुद्यावर तज्ञ आणि सामान्यांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 19 ऑगस्टला हा मसुदा सरकारी वेबसाईटवर जारी करण्यात  आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित असलेल्या गृह मंत्रालयाने हा मसुदा तयार केला आहे. विरोधी पक्षांनी मात्र या प्रस्तावित कायद्याला विरोध केला आहे. काळा कायदा उल्लेख करत काँग्रेस - राष्ट्रवादीने हा मुसदा मागे घेण्याची मागणी केली आहे. 

==================================

हिंदुस्थानात येण्यासाठी लढा देणारे बलुची नेतेही स्वातंत्र्य योद्धे - उद्धव ठाकरे



  • मुंबई, दि. 24 - 'काश्मीरमध्ये मारले गेलेले व हिंसाचार करणारे लोक पाकिस्तानच्या दृष्टीने स्वातंत्र्यसैनिक असतील, तर मग हिंदुस्थानात येण्यासाठी लढा देणारे बलुची नेतेही स्वातंत्र्य योद्धेच आहेत असे आम्ही मानतो. पंतप्रधानांचे यावर काय म्हणणे आहे?', असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारला आहे. 
    'कश्मीरात वातावरण सुधारायचे असेल तर हुरियतवाले व पाकिस्तानबरोबर चर्चा व्हावी, असे जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना वाटते. हे काही बरोबर नाही. रस्त्यावर उतरणार्‍यांना कायद्याचा व पोलिसांचा धाक नाही व लष्करावर दगड मारणे हे राष्ट्रप्रेम नाही', असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 
==================================

ग्न, बर्थडे, पूजेसाठी पोलीस परवानगी अनिवार्य? सरकार नव्या कायद्याच्या तयारीत

लग्न, बर्थडे, पूजेसाठी पोलीस परवानगी अनिवार्य? सरकार नव्या कायद्याच्या तयारीत
मुंबई: यापुढे लग्न, वाढदिवस, पूजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे. कारण अशा समारंभासाठी राज्य सरकार नवी नियमावली आणण्याचा तयारीत आहे. अशा कार्यक्रमांना तुम्हाला जर 100 पेक्षा जास्त पाहुण्यांना एकत्रित बोलवायचं असेल तर पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक आहे.

राज्य सरकारनं अशा प्रकारच्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. विनापरवानगी कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांवर 3 वर्ष तुरूंग आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे.

अंतर्गत सुरक्षेच्या बळकटीचं कारण देत सरकारनं या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


==================================

'त्या' मुलींचं अपहरण नव्हे, कंटाळा आल्याने फिरायला गेल्याचं उघड

'त्या' मुलींचं अपहरण नव्हे, कंटाळा आल्याने फिरायला गेल्याचं उघड
राज्यातील नि:शस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तब्बल 52 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह खात्याकडून या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे: हडपसरमधील बेपत्ता विद्यार्थीनी प्रकरणात ट्विस्ट आला आहे. कारण कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनीनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर, या मुली आता स्वत:च कंटाळा आल्याने फिरायला गेल्याचं उघड झालं आहे. तसंच या मुली तुळजापूर इथं सुरक्षीत असल्याचंही समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?
हडपसर येथील एका महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनी कॉलेजला जातो असं सांगून मंगळवारी सकाळी घरातून बाहेर पडल्या. मात्र त्या घरी न परतल्याने या विद्यार्थिनींच्या पालकांनी हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन घेतला.

==================================

गणेशोत्सवात शाळांना 5 दिवस सुट्टी द्या: मनसे

गणेशोत्सवात शाळांना 5 दिवस सुट्टी द्या: मनसे
मुंबई: गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं शाळांना 5 दिवसांची सुट्टी देण्याची मागणी केली आहे.

काल मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाकडे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. पण गणेशोत्सवात शाळांना सुट्टी द्यायची की नाही हा निर्णय शाळांवर अवलंबून असेल असं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.

अनेक शाळांमधील विद्यार्थी गणेशोत्सवासाठी गावाला जात असतात, यादरम्यान त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये याकरिता शाळांनी गणपतीच्या दिवसात सुट्टी द्यावी अशी मागणी मनविसेने केली आहे.

दरम्यान, बऱ्याच शाळांना गणपती उत्सावादरम्यान एक दिवसाची सुट्टी दिली जाते. यासाठीच मनसेनं शाळेंना पाच दिवस सुट्टी देण्याची मागणी केली आहे.


==================================

जगातील टॉप 10 श्रीमंत देशांची यादी, भारताचा नंबर....!

जगातील टॉप 10 श्रीमंत देशांची यादी, भारताचा नंबर....!
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत देशांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत भारताचंही स्थान आहे.  भारत सध्या सातव्या स्थानावर असून, भारताकडे 5600 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.

‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालानुसार श्रीमंत देशांच्या यादीत भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इटलीच्याही पुढे आहे.
जगातील सर्वात श्रीमंत देशाचा मान अमेरिकेला मिळाला असून त्याची संपत्ती 48,900 अब्ज डॉलर एवढी आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनची संपत्ती 17,400 अब्ज डॉलर आहे, तर 15,100 अब्ज डॉलरसह जपान तिसऱ्या स्थानावर आहे.

या यादीत ब्रिटनचा चौथा क्रमांक लागला असून त्याची संपत्ती 9200 अब्ज डॉलर इतकी आहे, तर 9100 अब्ज डॉलर संपत्तीसह जर्मनी पाचव्या स्थानावर आहे. सहाव्या स्थानावरील फ्रान्सची संपत्ती 6600 अब्ज डॉलर एवढी आहे.

या श्रीमंत देशांची यादी बनवताना फक्त नागरिकांच्या संपत्तीचा विचार न करता, देशातील सर्व प्रकारच्या स्थावर मालमत्ता, रोख रक्कम आणि व्यावसायिक उत्पन्नाचा विचार करण्यात आला आहे. तसंच यात सरकारी फंडांचा विचार करण्यात आलेला नाही.
==================================

सलमान चित्रपटात माकडासारखं नाचतो - सपना भवना 

''सलमान चित्रपटात माकडासारखं नाचतो''
मुंबई: प्रसिद्ध टीव्ही रिऑलिटी शो ‘बिग बॉस’ची एक्स कंटेस्टंट आणि वांद्रामधील Mad o Wot  सलूनची मालकीण हेअर स्टाईलिस्ट सपना भवनानीने बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानला लक्ष्य केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने खराब चित्रपटात सलमान खान माकडासारखं नाचतो, तसेच लोकांचा चुकीच्या पद्धतीने वापर करतो, अशी टीका केली आहे.

सलमानच्या चाहत्यांकडून बलात्काराची धमकी
सपनाने हिंदूस्थान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलखतीत सलमानला लक्ष्य केले आहे. या मुलाखतीवेळी तिने ‘बिग बॉस’ शोनंतर सलमानवर टीका केल्याने, त्याच्या चाहत्यांकडून जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी मिळाल्याचे सांगितले.

सलमान लोकांचा अपमान करतो
याशिवाय सपनाने या मुलाखतीत बिग बॉस हा फालतू कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे. ”हा एक असा शो आहे, ज्यामध्ये कार्यक्रमाचा सूत्रसंचालक लोकांचा अपमान करतो,” असे ती म्हणाली. विशेष म्हणजे ती इतकेच म्हणून थांबली नाही, तर सलमानचे अनुकरण करणाऱ्या कलाकारांनाही तिने लक्ष्य केले आहे. ”ही मंडळी त्याची देवाप्रमाणे पूजा करतात. कारण त्याच्या कोणत्याही चित्रपटात काम मिळू शकेल. पण सलमान त्याच फालतू चित्रपटात माकडासारखं नाचतो.”
==================================

पतीकडून पैसे उकळण्यासाठी पत्नीने रचला स्वत:च्याच अपहरणाचा डाव

पतीकडून पैसे उकळण्यासाठी पत्नीने रचला स्वत:च्याच अपहरणाचा डाव

पतीकडून पैसे उकळण्यासाठी पत्नीने रचला स्वत:च्याच अपहरणाचा डाव

मीरा रोड: पतीकडून 10 लाख रुपये उकळण्यासाठी पत्नीने स्वतःच्याच अपहरणाचा डाव रचल्याची घटना मीरा रोडमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे टीव्हीवरील क्राईम सिरिअल पाहून प्रियंका शुक्ला या 35 वर्षीय महिनेने हे कृत्य केल्याची माहिती मिळते आहे.

प्रियंका शुक्ला ही पेशानं शिक्षिका आहे. दरम्यान याआधीही प्रियंकाने असाच बनाव आखला होता. त्यावेळी या महिलेने चिठ्ठीद्वारे आपल्या मुलाला ठार मारण्याच्या बहाण्याने नवऱ्याकडून ८० हजार रुपये उकळले होते.

रविवार २० ऑगस्ट रोजी प्रियंका शुक्लानं आपलं अपहरण झाल्याचा बनाव रचला. आपल्याच मोबाईल फोनवरून तिनं आपल्याच पतीला ‘तुमच्या पत्नीला किडनॅप करण्यात आलं आहे.’ असा  मॅसेज पाठवला आणि त्यासोबत तिचा तोंड बांधलेला फोटोही पाठवला.

पत्नी सुखरुप पाहिजे असेल तर दहा लाख रुपये घेऊन ये. असा मॅसेजही पतीला पाठवला. यानंतर पतीने काशिमिरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखत सहा विशेष पथकं तयार केली. मोबाईलचे लोकेशन घेत काश्मिरा पोलिसांनी खार, भांडुप, कल्याण, कर्जत, मुंबई या परिसरात तपासही सुरु केल. अखेर एका रेल्वे स्थानकावर ती सीसीटीव्हीत दिसली आणि हा बनाव असल्याचा पोलिसांना सुगावा लागला. मिरा रोड रेल्वे अखेर पोलिसांच्या एका पथकाने प्रियंकाला पकडले. खोटे बनाव रचून पैसे उकळणाऱ्या या महिलेला अटक करण्यात आली आहे.
==================================

मुंबई मनपा शाळेत योग आणि सूर्यनमस्काराची सक्ती

मुंबई मनपा शाळेत योग आणि सूर्यनमस्काराची सक्ती
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता योग आणि सूर्यनमस्कार बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबई मनपाच्या सभागृहात भाजपने मांडलेल्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी मिळाली आहे.

दुसरीकडे मुस्लिम धर्मात सूर्याला नमस्कार केला जात नाही. त्यामुळे सूर्यनमस्काराची सक्ती करण्यास समाजवादी पक्षाने विरोध केला आहे.

तसंच, मनसे आणि काँग्रेसने विद्यार्थ्यांना याची सक्ती न करता योग तसंच सूर्यनमस्कार ऐच्छिक करावा, अशी मागणी केली आहे. मात्र, शिवसेनेने भाजपला पाठिंबा देत बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करुन घेतला.

==================================

No comments: