Sunday, 28 August 2016

नमस्कार लाईव्ह २८-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- रात्रीच का करीत नाही स्मार्टफोन चार्ज?
२- जीम योंग पुन्हा अध्यक्षपदी?
३- सौरमालेबाहेर ‘पृथ्वी’!
४- अफगाण हल्ल्याचा पाकवर संशय
५- स्कॉर्पिन पाणबुड्यांची माहिती लीक झाली नसून चोरीला गेली
६- 'ढाका' हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलिसांच्या चकमकीत ठार
७- पाकने काश्मीरमधील परिस्थिती बिघडवली-मुफ्ती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
८- इस्त्रोकडून स्क्रॅमजेट इंजिनची चाचणी यशस्वी 
९- सिंधूने केली महाकाली मंदिरात पुजा 
१०- बेपत्ता ‘जय’ वाघाचा तपास सीआयडीकडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
११- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आता 'ड्रोन'ची नजर 
१२- खड्ड्यांमुळे गणेश मूर्तीकारही हवालदिल
१३- कचराकुंड्यांची खरेदी लांबणीवर
१४- वैमनस्यातून मुलाला लिफ्टमध्ये कोंडले
१५- अतिक्रमणावर उत्सवानंतर हातोडा?
१६- दरवर्षी साहित्य संमेलन भरवण्याची गरज काय?
१७- आयोजक, गोविंदांच्या भेटीला राज आज ठाण्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१८- 'एक्सप्रेस वे' वर अपघात शिवनेरीची ट्रकला धडक 
१९- कानपूरमध्ये महिलेवर बलात्कार, ऍसिड फेकले 
२०- कोल्हापूर:डॉल्बीच्या विसर्जनाचा वज्रनिर्धार 
२१- कर्वे रस्त्यावर 'पॉर्न'मुळे ट्रॅफिक जाम! 
२२- हिमाचल प्रदेशला भूकंपाचा सौम्य धक्का
२३- संगणक कौशल्ये वाढवण्याची एक संधी 
२४- पुलवामा: गोळीबारात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
२५- हेअर कटिंग नव्हे 'हेअर सेटिंग' 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२६- शेवटच्या चेंडूवर विंडीज ‘चॅम्पियन’ 
२७- सरफराजचे शतक व्यर्थ
२८- मेस्सीची निवृत्ती ही ‘नौटंकी’ : मॅरेडोना
२९- बॉक्सर्सच्या पराभवासाठी मी जबाबदार : कोच संधू
३०- ऐतिहासिक विजयात अडथळा नाही - सेरेना विलियम्स
३१- मुंबई क्रिकेटचा देदिप्यमान वारसा विसरू नका
३२- रिक्षाचालकाने घेतली लेकीसाठी लाखांची रायफल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

===========================================

इस्त्रोकडून स्क्रॅमजेट इंजिनची चाचणी यशस्वी



  • ऑनलाइन लोकमत 
    श्रीहरीकोटा, दि. २८ -  भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने रविवारी पहाटे आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावर स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली. स्क्रॅमजेट इंजिन वातावरणातील ऑक्सिजनच्या मदतीने इंजिनातील इंधन प्रज्वलित करते. 
     
    पूर्नवापरायोग्य आरएलव्ही यानामध्ये स्क्रॅमजेट इंजिन उपयोगात आणता येईल असे वैज्ञानिकांनी सांगितले. सकाळी सहाच्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली. यानाच्या पारंपारीक इंजिनामध्ये इंधन आणि ऑक्सिडायजर दोन्ही असते. 
     
    इथे स्क्रॅमजेट इंजिनमध्ये वातावरणातील ऑक्सिजन यानातील इंधन प्रज्वलित करण्यासाठी  ऑक्सिडायजरचे काम करणार आहे. सकाळी सहा वाजता ही चाचणी घेण्यात आली. स्क्रॅमजेटमुळे प्रक्षेपण खर्च आणखी कमी होणार आहे. आता आरएलव्ही यानामध्ये स्क्रॅमजेट इंजिनाची चाचणी घेण्यात येणार आहे. 
===========================================

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आता 'ड्रोन'ची नजर



  • लोणावळा, दि. २८-  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लेनची शिस्त मोडणे, अतिवेगाने वाहने चालविणे आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणाऱ्यांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची २४ तास नजर राहणार आहे. द्रुतगती मार्गावर शिस्त लावण्यास ४ ठिकाणी ड्रोन कॅमेरे बसविण्याचे प्रात्यक्षिक शनिवारी घेण्यात आले. या वेळी लेनची शिस्त मोडणाऱ्या काही अवजड वाहनांविरोधात कारवाई केली.
    द्रुतगती महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात लेन कटिंग करणाऱ्या, अतिवेगाने वाहने चालविणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी चार ठिकाणी ड्रोन कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचे पहिले प्रात्यक्षिक व सर्वेक्षण महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महामार्ग पोलीस निरीक्षक अजय बारटक्के, सुधीर अस्पत, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम जोशी, एम. आर. काटकर यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. (प्रतिनिधी)
    एका ड्रोनची चार किलोमीटर नजर
    नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र, व्हिडीओ क्लिप व त्या वाहनांचा नंबर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे टिपली जाऊन ती माहिती महामार्ग पोलिसांना देतील. त्या वाहनांच्या छायाचित्राची प्रत संबंधित वाहन चालकाला देऊन कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईच्या ठिकाणांमध्ये पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खालापूर टोलनाका, तर उलट जाणाऱ्या वाहनांसाठी उर्से टोलनाक्याचा समावेश आहे. बेशिस्त वाहनांवर नजर ठेवण्यासाठी चार ठिकाणी ड्रोन कॅमेरे असणार आहे. यामध्ये खंडाळा घाट परिसर, खोपोली एक्झिट ते फूड मॉल, कामशेत बोगदा ते उर्से टोलनाका, खालापूर टोलनाका ते पनवेल परिसर यांचा समावेश आहे. एक कॅमेरा चार किलोमीटर हालचालींवर नजर ठेवणार आहे.
    drone

===========================================

'एक्सप्रेस वे' वर अपघात शिवनेरीची ट्रकला धडक



  • मुंबई, दि. २८ - मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर तळेगाव टोलनाक्याजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने चाललेल्या शिवनेरी बसने मागच्याबाजूने ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. मध्यरात्री ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. 
     
    तळेगाव टोलनाक्याच्या पुढे शिवनेरीने ट्रकला धडक दिली. जखमींना निगडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक्सप्रेस वे वरील वाढते अपघात रोखण्यासाठी ड्रोन कॅमे-याची मदत घेण्यात येणार आहे. शनिवारीच एक्सप्रेस वे वर ड्रोनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. 
===========================================

शेवटच्या चेंडूवर विंडीज ‘चॅम्पियन’


  • फ्लोरिडा : शेवटच्या चेंडूवर दोन धावा... अशी उत्कंठावर्धक स्थिती असताना स्ट्राईकवरील महेंद्रसिंह धोनीचा फटका शॉर्ट थर्डमॅनवर उभ्या असलेल्या सॅम्युअल्सच्या हातात विसावला अन् वेस्ट इंडिजने ‘ब्राव्हो चॅम्पियन’चा जल्लोष केला. दुसरीकडे, टी-२० क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान दुसरे शतक ठोकणाऱ्या राहुलच्या शानदार खेळीवर पाणी फेरले. राहुलने ५१ चेंडूंत पाच षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने नाबाद ११० धावा केल्या. त्याने रोहित शर्मासोबत ८९ तर धोनीसोबत सातव्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. असे असतानाही वेस्ट इंडिजच्या २४६ धावांचा पाठलाग करताना भारताने ४ बाद २४४ धावांपर्यंत मजल मारली. राहुलने केवळ ४६ चेंडूंत शतक पूर्ण केले.
    शेवटच्या पाच षटकांत भारताला ६४ धावांची गरज होती. धोनीने रसेलच्या गोलंदाजीवर षटकारासह १७ व्या षटकांत भारताचे द्विशतक पूर्ण केले. त्यानंतर राहुलने रसेलच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत शतक पूर्ण केले. भारताला शेवटच्या षटकात आठ धावांची आवश्यकता होती. अशा वेळी पहिल्या चार चेंडंूवर चार धावा मिळाल्या. पाचव्या चेंडूवर दोन तर शेवटच्या चेंडूवर धोनी बाद झाला. त्याआधी, सलामीवीर एव्हिन लुईसच्या (१०० धावा, ४९ चेंडू, ५ चौकार, ९ षटकार) वेगवान शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ६ बाद २४५ धावांची विक्रमी मजल मारली होती. लुईसने कारकिर्दीत प्रथमच शतकी खेळी केली. विंडीजच्या डावात जॉन्सन चार्ल्सचे (७९ धावा, ३३ चेंडू, ६ चौकार, ७ षटकार) योगदानही उल्लेखनीय ठरले. भारतातर्फे रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. लुईसचे टी-२० क्रिकेट इतिहासातील हे पाचवे वेगवान शतक ठरले. लुईसने चार्ल्ससोबत सलामीला शतकी भागीदारी केली.
===========================================
  • न्यूयॉर्क : रात्री, झोपण्यापूर्वीच तुम्ही स्मार्टफोन चार्जिंगसाठी का ठेवत नाही? कदाचित फोन जास्त गरम होण्याची भीती वाटते का? बॅटरी खराब होण्याचा धोका वाटतो का? या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे यातील तज्ज्ञांनीच आता दिली आहेत. त्यामुळे रात्री स्मार्टफोन चार्जिंग करताना आता कुठलीही शंका बाळगण्याचे कारण नाही. स्मार्टफोन हे खऱ्या अर्थाने स्मार्ट आहेत. चार्जिंग होताना कुठे थांबायचे ्रफोनला कळते.35 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानच बॅटरीला नुकसान पोहोचवू शकते, अशी माहिती अ‍ॅपल कंपनीच्या वेबसाईटवर आहे.
    >कारण काय?
    स्मार्टफोन रात्रीच चार्ज केला, तर सकाळी बॅटरी फुल्ल राहते; पण रात्री फोन चार्ज करावा की नाही, याबाबत साशंकता आहे.
    स्मार्टफोन दोन वर्षांपेक्षा अधिक चालणार नाही, असे गृहीत धरूनच अनेक जण हा फोन वापरत असतात. त्यामुळे बॅटरीत काही समस्या निर्माण झाली, तर त्याकडे दुर्लक्ष करून नव्या फोनबाबत उत्कंठा सुरू होते.
    >फोन गरम होण्याची भीती अधिक
    रात्री फोन चार्ज न करण्याचे अनेक जणांचे हेच कारण आहे की, फोनला काही नुकसान होऊ नये. फोन अधिक गरम होण्याची शक्यता त्यांना वाटते.
    >फोनमध्ये लिथियम
    बॅटरी असते. बॅटरीमध्ये ओव्हरचार्जिंगचा धोका नसतो. आयफोन आणि अ‍ॅण्ड्राईड फोनमध्ये एक चिप बसविलेली असते. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नसते.
    - इदो कॅम्पोस,
    अँकर कंपनीचे प्रवक्ते
    >बहुतांश स्मार्टफोन कंपन्या हे नव्या बॅटरी वापरतात. ज्यात असे तंत्रज्ञान असते की, चार्जिंगची प्रक्रिया ही जलदगतीने होते. हे तंत्रज्ञान असे आहे की, चार्जर ज्या प्रमाणात विजेचा पुरवठा करते त्या प्रमाणात फोन चार्जिंग अ‍ॅडजेस्ट करून घेतो. - हतेम झेईन, ओसिया कंपनी
==============================================

सौरमालेबाहेर ‘पृथ्वी’!

  • First Published :26-August-2016 : 06:00:00Last Updated at: 26-August-2016 : 06:54:38

  • लंडन : शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारखा जीवसृष्टीला पोषक वातावरण असलेला ग्रह शोधला आहे. या ग्रहाचे तापमान त्याच्या पृष्ठभागावर पाणी द्रव स्वरूपात अस्तित्वात राहू शकेल, एवढेच आहे. त्यामुळे आपल्या सौरमालिकेच्या बाहेर या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे.
    खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाला या ग्रहाचे पुरावे मिळाले आहेत. हा ग्रह प्रॉक्सिमा सेंताउरी ताऱ्याला प्रदक्षिणा घालतो. तो डोळ्यांनी दिसत नसला, तरी आपल्यापासून केवळ ४.२ प्रकाश वर्षे (जवळपास २५ खर्व मैल) अंतरावर आहे. हा ग्रह आमच्या सूर्याच्या सर्वात जवळील ताऱ्याला प्रदक्षिणा घालत आहे. त्यामुळे जीवनासाठी पोषक वातावरण आपल्याजवळच उपलब्ध असल्याचे संकेत आहेत.
    या ग्रहाला ‘प्रॉक्सिमा बी’ असे नाव देण्यात आले असून, तो ११ दिवसांत आपली प्रदक्षिण पूर्ण करतो. हा ग्रह आमच्या पृथ्वीहून थोडा मोठा आहे. तो गुरूसारखा वायूचा गोळा नाही, तर पृथ्वीसारखा खडकाळ आहे. तो त्याच्या ताऱ्यापासून एवढ्या अंतरावर आहे की, त्याच्या पृष्ठभागावर पाणी द्रव स्वरूपात अस्तित्वात राहू शकते. त्यामुळे या ग्रहावर वातावरण असण्याची शक्यता आहे. हे संशोधन नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
  • =================================================

No comments: