*[अंतरराष्ट्रीय]*
1- स्विसमध्ये ट्रेनमधील प्रवाशांवर माथेफिरुने केला हल्ला, 7 जण जखमी
2- आझादी का जश्न काश्मीर के लिये: पाकिस्तान
3- 2000 सीरियन लोकांचे ‘इसिस’कडून अपहरण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
4- पूंछमध्ये ग्रेने़ड हल्ला, काश्मीरात तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न
5- कंगनाचा स्वातंत्र्यदिनासाठी खास व्हिडीओ 'लव्ह युअर कंट्री'
6- पाकच्या ताब्यातून काश्मीर मुक्त करू ! - राज्यमंत्री जितेंद्र सिंग
7- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज
8- तूर्तास होणे नाही कृत्रिम पावसाचा प्रयोग
9- सरकारी व्हिडिओमध्ये पाकच्या विमानावर तिरंगा!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
10- सावित्री नदीत बेपत्ता तवेराचा शोध, दोन मृतदेह सापडले
11- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी
12- दुरुन महान वाटणारे प्रत्यक्षात लहान, गडकरींचं सूचक वक्तव्य
13- पुणेकर घेत आहेत पार्टी, शॉपिंगसाठी कर्ज !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
15- मुंबई सेंट्रल परिसरात स्लॅब कोसळून कामगाराचा मृत्यू
16- खड्ड्यात बाईक आदळून टिटवाळ्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू
17- मुंबई सेंट्रल येथील ‘मेहेर व्हिला’ या इमारतीचा स्लॅब कोसळला
18- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक सुमारे १२ तासानंतर सुरळीत
19- अहमदाबाद - आध्यात्मिक गुरु प्रमुख स्वामी महाराज यांचं निधन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
20- अभिनेता सुनील शेट्टी ट्विटरवरून चाहत्यांच्या भेटीला
21- कोहलीच्या टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ऐतिहासिक विजय
22- ललिता बाबर ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत
23- आर्ची-परशा, नागराजचे पुतळे लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये
24- भारताचा वेस्ट इंडिजवर २३७ धावांनी विजय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
===============================================

दुर्घटना घडल्यानंतर तेराव्या दिवशी MH04 GD 7837 या क्रमांकाच्या तवेराचा शोध लागला आहे. घटनास्थळापासून 300 मीटर अंतरावर गाडीचे अवशेष सापडले. तवेरा गाडीमध्ये आठ प्रवासी असल्याची माहिती होती. त्यापैकी काही प्रवाशांचे मृतदेह आधीच हाती लागले होते.

सध्या अडकलेली वाहनं बाजूला घेऊन एक लेन सुरु करण्यात आली आहे. मात्र संथ गतीने वाहतूक सुरु असून ती पूर्वपदावर येण्यास आणखी वेळ लागणार आहे.
सलग सुट्ट्यांमुळे अनेक प्रवाशांनी बाहेरगावी विकेंड साजरा करण्याचा बेत आखला आहे. त्यामुळे शनिवारपासूनच मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. आता सलग दुसऱ्या दिवशी एक्स्प्रेस वे वर खोळंबा झालेला पाहायला मिळत आहे.

आपले राजकीय अनुभव मांडताना गडकरींनी अनेक उदाहरणं दिली. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक जण भेटतात. त्यांना भेटल्यावर लक्षात येतं की, जे दुरुन मोठे वाटतात ते मुळात खूप लहान असतात. दिल्लीतील राजकारणाच्या बाबतीतलं गडकरींचं विधान नेमकं कुणाबद्दल होतं हे गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान या शिबिराला गडकरींसोबत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनीही हजेरी लावली होती. प्रत्येक जण शिवाजी व्हायला नको, अनेकांना मावळेही बनावं लागतं, कारण राज्य मावळ्यांनीच टिकवलं होतं असं सांगून नाना पाटेकर यांनी आदिवासी भागातील शिक्षकांना प्रोत्साहन दिलं.

पूंछच्या बस स्टँडवर झालेल्या हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत. पूंछमध्ये दहशतवादी संघटना आयसिस आणि पाकिस्तान जिंदाबाद अशा चिठ्ठ्या सापडल्या. मोदींच्या वक्तव्यानंतर चवताळलेल्या आयएसआयकडून काश्मीरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आयएसआयनं हुर्रियत कॉन्फरन्स आणि सरकारी कार्यालयांना 15 ऑगस्ट हा काळा दिवस साजरा करण्याचे आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान 15 ऑगस्टपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतानं पहिल्यांदाच विंडीजमधल्या एकाच कसोटी मालिकेत दोन सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. या सामन्यात भारतानं विंडीजला विजयासाठी 346 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करुन विंडीजचा अख्खा डाव 108 धावांवर गुंडाळला.
भारतासाठी मोहम्मद शमीनं अवघ्या 15 धावांच्या मोबदल्यात विंडीजच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. विंडीजकडून डॅरेन ब्राव्होनं एकाकी झुंज देत 59 धावांची खेळी केली.
याआधी भारतानं आपला दुसरा डाव सात बाद 217 धावांवर घोषित केला होता. विशेष म्हणजे या सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिल असं वाटत होतं. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपली कामगिरी अधिक उंचावली आणि सामन्यासह मालिकाही आपल्या खिशात टाकली.

ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ललिता महाराष्ट्राची पहिलीच अॅथलीट ठरली आहे. ललितानं प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या शर्यतीत 9 मिनिटं आणि 19.76 सेकंदांची वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम रचला.
ललितानं जगभरातल्या एकूण 52 धावपटूंमध्ये सातवं स्थान मिळवलं. त्यामुळेच ललिताचा अंतिम फेरीतला प्रवेश निश्चित झाला. तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीची अंतिम फेरी 15 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार रात्री पावणेआठ वाजता खेळवली जाईल.

एचडीएफसी बँकेत असिस्टंट मॅनेजरपदावर कार्यरत असलेले विजय केंद्रे रात्री 7.45 च्या सुमारास कामावरुन घरी परतत होते. यावेळी भिवंडी बायपास कोन रोडला त्यांची बाईक खड्ड्यात आदळली. त्यामुळे त्यांचा तोल गेला. त्याचवेळी मागून येणारा गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक त्यांच्या डोक्यावरुन गेला.
विजय यांच्या पश्चात 13 वर्षांचा मुलगा आणि पत्नी असं कुटुंब आहे. ही दुर्दैवी घटना रस्त्यावरील खड्डयांमुळे घडली असल्याचं विजयच्या नातेवाईकांकडून बोललं जात आहे. या घटनेला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे, रस्त्यावरील खड्डे वेळेवर बुजवले असते तर आज विजयला आपला जीव गमवावा लागला नसता, आता तरी प्रशासनाने रस्त्यावर असणारे खड्डे बुजवावेत अशी मागणी स्थानिक करत आहेत.

लोणावळ्यातील सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम मध्ये दिसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जवाहरलाल नेहरु, शरद पवार, अण्णा हजारे, सुपरस्टार अमिताभ बच्चन, रजनीकांत, आशा भोसले, कपिल देव यासारख्या देश विदेशातील सेलिब्रेटींचा समावेश होता. मात्र आता या रांगेत सर्वांना झिंगाट करुन सोडणारी सैराट जोडी आर्ची-परशा आणि सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळेही यांच्यासोबत दिसणार आहेत.
म्युझियममध्ये येणाऱ्या पर्यटकांनी सैराट आल्यापासून आर्ची-परशा आणि नागराज मंजुळे यांचे पुतळे उभारावेत, या मागणीने सुनील कंडलूर यांना अक्षरशः भंडावून सोडलं. पर्यटकांच्या या मागणीमुळे सैराट झालेल्या सुनील यांना आर्ची-परशा आणि नागराज हे कोण आहेत याचा गंध नसताना देखील त्यांच्या मेणाचे पुतळे बनविण्याचा त्यांचा ध्यास घेतला. त्यानंतर आर्ची-परशा आणि नागराज यांच्याशी सुनील यांनी संपर्क साधला. या तिघांनी मेणाच्या पुतळ्यासाठी तयारी दर्शवली. आता तिघांचे मोजमाप घेऊन पुतळे तयार करायला सुरुवात झाली आहे.
लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये आर्ची-परशा आणि नागराजचे पुतळे उभारले जाणार म्हटल्यावर त्यांचे पुतळे कसे असणार याची पर्यटकांना उत्सुकता लागली आहे. अनेकांना सेल्फी काढण्याची घाई लागली आहे.

सावित्री नदीत बेपत्ता तवेराचा शोध, दोन मृतदेह सापडले
महाड : महाड दुर्घटनेत सावित्री नदीच्या पात्रात बुडालेल्या अपघातग्रस्त तवेरा कारचाही अखेर शोध लागला आहे. तवेरा बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून कारमध्ये दोन मृतदेह सापडल्याची माहिती आहे.
दुर्घटना घडल्यानंतर तेराव्या दिवशी MH04 GD 7837 या क्रमांकाच्या तवेराचा शोध लागला आहे. घटनास्थळापासून 300 मीटर अंतरावर गाडीचे अवशेष सापडले. तवेरा गाडीमध्ये आठ प्रवासी असल्याची माहिती होती. त्यापैकी काही प्रवाशांचे मृतदेह आधीच हाती लागले होते.
मंगळवारी 2 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्यांनी पोलादपूरमध्ये जेवण केलं होतं. तोपर्यंत प्रवाशांशी संपर्क झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. मात्र त्यानंतर तवेरातील प्रवाशांशी संपर्क तुटला होता.
===============================================
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी
पिंपरी-चिंचवड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पुन्हा वाहतुक कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ दोन अवजड वाहन बंद पडल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सध्या अडकलेली वाहनं बाजूला घेऊन एक लेन सुरु करण्यात आली आहे. मात्र संथ गतीने वाहतूक सुरु असून ती पूर्वपदावर येण्यास आणखी वेळ लागणार आहे.
सलग सुट्ट्यांमुळे अनेक प्रवाशांनी बाहेरगावी विकेंड साजरा करण्याचा बेत आखला आहे. त्यामुळे शनिवारपासूनच मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. आता सलग दुसऱ्या दिवशी एक्स्प्रेस वे वर खोळंबा झालेला पाहायला मिळत आहे.
===============================================
मुंबई सेंट्रल परिसरात स्लॅब कोसळून कामगाराचा मृत्यू
मुंबई : मुंबई सेंट्रल परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. शनिवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला.
मराठा मंदिर सिनेमागृहाजवळ मेहेर व्हिला या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. इमारतीखाली उभ्या असलेल्या कमलुद्दीन अन्सारी या कामगारावर स्लॅब कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
एक कामगार या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
===============================================
कंगनाचा स्वातंत्र्यदिनासाठी खास व्हिडीओ 'लव्ह युअर कंट्री'
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने एका व्हिडीओच्या माध्यमातून भारतीय सेनेला मानवंदना दिली आहे. ‘लव्ह युअर कंट्री’ शीर्षकाखालील हा व्हिडीओ शुक्रवारी युट्यूबवर शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये बलात्कार, स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, हुंडाबळी यांसारख्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
हा व्हिडीओ तीन मिनिटांचा आहे. या व्हिडीओतील गाणं सिद्धार्थ शर्मा, पियूष वासनिक आणि यश चौहान यांनी गायलं असून कंगना ‘डू यू वोट’ असा प्रश्न विचारताना दिसत आहे.
यापूर्वी कंगना दुसऱ्या पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या एका व्हिडीओमध्ये दिसली होती. या व्हिडीओमध्ये तिने लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता.
===============================================
अभिनेता सुनील शेट्टी ट्विटरवरून चाहत्यांच्या भेटीला
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या चाहत्यांसाठी ट्विटर अकाऊंट काढलं आहे. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर सिनेजगतात पुनरागमन करणारा सुनील शेट्टी आता ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणार आहे.
“ट्विटर हा आपला आवाज आहे आणि चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोत्तम माध्यमांपैकी एक आहे. मी दोन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करत आहे.” असं या 55 वर्षीय अभिनेत्यानं सांगितलं आहे.
===============================================
दुरुन महान वाटणारे प्रत्यक्षात लहान, गडकरींचं सूचक वक्तव्य
नागपूर : जे दुरुन महान वाटतात, ते प्रत्यक्षात खूप लहान असतात, असं मिष्किल वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपुरातील लक्ष्मणरावर मानकर ट्रस्टच्या एकल विद्यालयात शिक्षकांच्या शिबिरात ते बोलत होते.
आपले राजकीय अनुभव मांडताना गडकरींनी अनेक उदाहरणं दिली. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक जण भेटतात. त्यांना भेटल्यावर लक्षात येतं की, जे दुरुन मोठे वाटतात ते मुळात खूप लहान असतात. दिल्लीतील राजकारणाच्या बाबतीतलं गडकरींचं विधान नेमकं कुणाबद्दल होतं हे गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान या शिबिराला गडकरींसोबत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनीही हजेरी लावली होती. प्रत्येक जण शिवाजी व्हायला नको, अनेकांना मावळेही बनावं लागतं, कारण राज्य मावळ्यांनीच टिकवलं होतं असं सांगून नाना पाटेकर यांनी आदिवासी भागातील शिक्षकांना प्रोत्साहन दिलं.
===============================================
पूंछमध्ये ग्रेने़ड हल्ला, काश्मीरात तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न
पूंछ : जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू-काश्मीरचाच भाग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडसावून सांगितल्यानंतर हा हल्ला झाला आहे.
पूंछच्या बस स्टँडवर झालेल्या हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत. पूंछमध्ये दहशतवादी संघटना आयसिस आणि पाकिस्तान जिंदाबाद अशा चिठ्ठ्या सापडल्या. मोदींच्या वक्तव्यानंतर चवताळलेल्या आयएसआयकडून काश्मीरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आयएसआयनं हुर्रियत कॉन्फरन्स आणि सरकारी कार्यालयांना 15 ऑगस्ट हा काळा दिवस साजरा करण्याचे आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान 15 ऑगस्टपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
===============================================
कोहलीच्या टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ऐतिहासिक विजय
सेंट ल्युसिया : टीम इंडियानं सेंट ल्युसिया कसोटीत वेस्ट इंडिजवर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारतानं विंडीजचा 237 धावांनी धुव्वा उडवून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारतानं पहिल्यांदाच विंडीजमधल्या एकाच कसोटी मालिकेत दोन सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. या सामन्यात भारतानं विंडीजला विजयासाठी 346 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करुन विंडीजचा अख्खा डाव 108 धावांवर गुंडाळला.
भारतासाठी मोहम्मद शमीनं अवघ्या 15 धावांच्या मोबदल्यात विंडीजच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. विंडीजकडून डॅरेन ब्राव्होनं एकाकी झुंज देत 59 धावांची खेळी केली.
याआधी भारतानं आपला दुसरा डाव सात बाद 217 धावांवर घोषित केला होता. विशेष म्हणजे या सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिल असं वाटत होतं. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपली कामगिरी अधिक उंचावली आणि सामन्यासह मालिकाही आपल्या खिशात टाकली.
===============================================
ललिता बाबर ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत
रिओ दि जनैरो : महाराष्ट्राच्या ललिता बाबरनं रिओ ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर तिरंगा डौलानं फडकवत ठेवला आहे. ललितानं तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ललिता महाराष्ट्राची पहिलीच अॅथलीट ठरली आहे. ललितानं प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या शर्यतीत 9 मिनिटं आणि 19.76 सेकंदांची वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम रचला.
ललितानं जगभरातल्या एकूण 52 धावपटूंमध्ये सातवं स्थान मिळवलं. त्यामुळेच ललिताचा अंतिम फेरीतला प्रवेश निश्चित झाला. तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीची अंतिम फेरी 15 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार रात्री पावणेआठ वाजता खेळवली जाईल.
===============================================
खड्ड्यात बाईक आदळून टिटवाळ्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू
कल्याण : खड्ड्यात बाईक आदळल्यामुळे एका 34 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना कल्याणजवळच्या टिटवाळा परिसरात घडली आहे. विजय केंद्रे असं मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे.
एचडीएफसी बँकेत असिस्टंट मॅनेजरपदावर कार्यरत असलेले विजय केंद्रे रात्री 7.45 च्या सुमारास कामावरुन घरी परतत होते. यावेळी भिवंडी बायपास कोन रोडला त्यांची बाईक खड्ड्यात आदळली. त्यामुळे त्यांचा तोल गेला. त्याचवेळी मागून येणारा गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक त्यांच्या डोक्यावरुन गेला.
केंद्रेंच्या हेल्मेटचा चक्काचूर होऊन त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यात विजय यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असणारा मित्र बाजूला फेकला गेल्यामुळे किरकोळ जखमी होऊन बचावला.
विजय यांच्या पश्चात 13 वर्षांचा मुलगा आणि पत्नी असं कुटुंब आहे. ही दुर्दैवी घटना रस्त्यावरील खड्डयांमुळे घडली असल्याचं विजयच्या नातेवाईकांकडून बोललं जात आहे. या घटनेला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे, रस्त्यावरील खड्डे वेळेवर बुजवले असते तर आज विजयला आपला जीव गमवावा लागला नसता, आता तरी प्रशासनाने रस्त्यावर असणारे खड्डे बुजवावेत अशी मागणी स्थानिक करत आहेत.
===============================================
आर्ची-परशा, नागराजचे पुतळे लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये
पिंपरी-चिंचवड : सैराट चित्रपटामुळे आर्ची-परशा आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची ख्याती अवघ्या देशभरात पसरली आहे. देश-विदेशातील राजकीय मंडळी, समाजसेवक, कलाकार आणि खेळाडूंनीही त्यांचं कौतुक केलं आहे. मात्र या गाजलेल्या जोडीचा चक्क मेणाचा पुतळा पाहायला मिळणार आहे.
लोणावळ्यातील सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम मध्ये दिसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जवाहरलाल नेहरु, शरद पवार, अण्णा हजारे, सुपरस्टार अमिताभ बच्चन, रजनीकांत, आशा भोसले, कपिल देव यासारख्या देश विदेशातील सेलिब्रेटींचा समावेश होता. मात्र आता या रांगेत सर्वांना झिंगाट करुन सोडणारी सैराट जोडी आर्ची-परशा आणि सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळेही यांच्यासोबत दिसणार आहेत.
म्युझियममध्ये येणाऱ्या पर्यटकांनी सैराट आल्यापासून आर्ची-परशा आणि नागराज मंजुळे यांचे पुतळे उभारावेत, या मागणीने सुनील कंडलूर यांना अक्षरशः भंडावून सोडलं. पर्यटकांच्या या मागणीमुळे सैराट झालेल्या सुनील यांना आर्ची-परशा आणि नागराज हे कोण आहेत याचा गंध नसताना देखील त्यांच्या मेणाचे पुतळे बनविण्याचा त्यांचा ध्यास घेतला. त्यानंतर आर्ची-परशा आणि नागराज यांच्याशी सुनील यांनी संपर्क साधला. या तिघांनी मेणाच्या पुतळ्यासाठी तयारी दर्शवली. आता तिघांचे मोजमाप घेऊन पुतळे तयार करायला सुरुवात झाली आहे.
लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये आर्ची-परशा आणि नागराजचे पुतळे उभारले जाणार म्हटल्यावर त्यांचे पुतळे कसे असणार याची पर्यटकांना उत्सुकता लागली आहे. अनेकांना सेल्फी काढण्याची घाई लागली आहे.
No comments:
Post a Comment