Tuesday, 9 August 2016

नमस्कार लाईव्ह ०९-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ७०० भटक्या कुत्र्यांची पाकमध्ये हत्या 
२- राष्ट्राध्यक्ष ओबामांची मुलगी करतेय वेटरचे काम 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- आसाराम बापूंचा जामीन अर्ज फेटाळला 
४- रेप तो चलतेही रहेते है: रेणुका चौधरी 
५- मुलांच्या हातात लॅपटॉप असायला हवा, त्या वयात शस्त्र - मोदी 
६- काश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदींनी मानले काँग्रेसचे आभार 
७- आरबीआय गर्व्हनर म्हणून अनुभव खूपच उत्तम होता - रघुराम राजन 
८- रघुराम राजन जाहीर करणार शेवटचे पतधोरण 
९- आमदार यांच्यानंतर आता नगरसेवकांना सातपट वेतन वाढीचा प्रस्ताव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- गडकरींच्या वाड्यावर विदर्भवाद्यांचा मोर्चा, अणेंच्या गैरहजेरीची चर्चा 
११- महाड पूल दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- सोलापूर; प्रवाशांवर टाकली मिरची पूड,चालकाच्या डोक्‍याला पिस्तूल! 
१३- ठाणे; मुलगा लक्ष देत नाही म्हणून सासूने केली सूनेची हत्या 
१४- बिहार; इलेक्ट्रिक पोलला ट्रकनं जोरदार धडक; पोल कोसळून 4 मुलांचा मृत्यू, दोघे जखमी 
१५- वाशिम; जिल्ह्यातील ६२ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- रोईंगमध्ये दत्तू भोकनलचे आव्हान संपुष्टात 
१७- ऑलंम्पिकमध्ये नातवाने मेडल जिंकले, आनंदात आजीचा मृत्यू? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=========================================

गडकरींच्या वाड्यावर विदर्भवाद्यांचा मोर्चा, अणेंच्या गैरहजेरीची चर्चा

गडकरींच्या वाड्यावर विदर्भवाद्यांचा मोर्चा, अणेंच्या गैरहजेरीची चर्चा
नागपूर : स्वतंत्र विदर्भाची मागणी करत नागपुरात भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर विराट मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनामध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता.

त्यामुळे गडकरींच्या निवासस्थानी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विदर्भवाद्यांनी केलेल्या या आंदोलनात कट्टर विदर्भवादी श्रीहरी अणे यांनी मात्र हजेरी लावली नाही. खासगी कामानिमित्त ते नागपूर बाहेर असल्याची कळतं.

भाजप नेत्यांच्या घरासमोरील आंदोलनात श्रीहरी अणेंच्या अनुपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

=========================================

''मुलांच्या हातात लॅपटॉप असायला हवा, त्या वयात शस्त्र दिली जात आहेत''

''मुलांच्या हातात लॅपटॉप असायला हवा, त्या वयात शस्त्र दिली जात आहेत''
भोपाळ(मध्य प्रदेश): मुलांच्या हातात लॅपटॉप असायला हवा, त्या वयात शस्त्र हातात दिली आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील अशांततेच्या मुद्द्यावरुन खंत व्यक्त केली. काश्मीरमधील अशांततेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गंभीर विषय बनला आहे.


पंतप्रधान मोदी यांनी क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावी ’70 साल आझादी, याद करो कुर्बानी’ कार्यक्रमाची सुरुवात केली. मोदींनी यावेळी बोलताना काश्मीरमधील भीषण वास्तव मांडलं. तसंच काश्मीरचा विकास करण्यासाठी केंद्र लागेल ती सर्व प्रकारची मदत देण्यास तयार आहे, असंही सांगितलं.


=========================================

महाड पूल दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका

महाड पूल दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका
मुंबईः महाड पूल दुर्घटनेसंदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यांनी पुलाचं स्ट्रक्चरल ऑडीट केलं त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी याचिका सामाजिक कार्यकर्ते प्रणय सावंत यांनी केली आहे.


महाड दुर्घटनेनंतर शोधकार्य करण्यासाठी लागलेला सर्व खर्च जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा, असंही सावंत यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे.


रात्रीच्या काळ्यामिट्ट अंधारात सावित्री नदीच्या पोटात गडप झालेल्यांचा शोध अद्याप सुरु आहे. पावासामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. 

=========================================

काश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदींनी मानले काँग्रेसचे आभार



  • नवी दिल्ली, दि. ९ - काश्मीर खो-यात सुरु असलेल्या हिंसक विरोध प्रदर्शनावर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी आपले मौन सोडले. काश्मीरमधल्या परिस्थितीवर संयम दाखवल्याबद्दल काँग्रेसचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभार मानले. काश्मीरमधली परिस्थिती हाताळताना सर्वांनीच समजूतदारपणा, परिपक्वता दाखवली यासाठी मी काँग्रेसचेही आभार मानतो असे मोदी म्हणाले. 
    ज्या मुलांनी हातात लॅपटॉप, क्रिकेट बॅट पकडली पाहिजे त्या हातात आज भिरकावण्यासाठी दगड आहेत. प्रत्येक भारतीयाचे काश्मीवर प्रेम आहे.  प्रत्येक भारतीयाला जे स्वातंत्र्य आहे तेच स्वातंत्र्य काश्मीरमधल्या प्रत्येक नागरीकाला आहे. देशातील अन्य भागातील मुलांसारखेच आम्हाला काश्मीरमधल्या युवकांचे उत्तम भविष्य हवे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात सभेमध्ये ते बोलत होते. 
=========================================

रोईंगमध्ये दत्तू भोकनलचे आव्हान संपुष्टात



  • रिओ दी जानेरो , दि. ९  -रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथ्या दिवसाची सुरुवातही भारतासाठी निराशाजनक झाली आहे. रोईंगमध्ये भारताचे एकमेव आशास्थान असलेले दत्तू भोकनल उपांत्यफेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला. रोईंगच्या सिंगल स्कल्स प्रकारात दत्तू भोकनल उपांत्यफेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला. 
    उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या दत्तूला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. रोईंगमध्ये दत्तू एकमेव भारताचे आशास्थान होते. 
    पहिल्या दिवशी पहिल्याच हिटमध्ये दत्तूने ७ मिनिटे २१.६७ सेकंद अशी वेळ नोंदवित तिसरे स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. टीम हिटमध्ये पहिल्या तीन स्थानांवर राहणा-या रोव्हर्सना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळते.
=========================================

मुलगा लक्ष देत नाही म्हणून सासूने केली सूनेची हत्या



  • ठाणे, दि. ९ - मुलगा बायकोकडे जास्त लक्ष देतो म्हणून संतापलेल्या आईने सुनेची आणि तिच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंब्र्यामध्ये घडली. राशिदा अकबाराली वासानी असे आरोपी महिलेचे नाव आहे. राशिदाने सून सलमा (२४) आणि तिची आई शमीम शेखला (५४) यांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले. 
    जेवण घेतल्यानंतर गुंगीच्या औषधामुळे दोघींना गाढ झोप लागली. त्यानंतर राशिदने घरातील धारदार शस्त्राने दोघींचा गळा चिरला व कान कापले असे पोलिस निरीक्षक सुखदा नारकर यांनी सांगितले. हत्या करुन राशिदाने पोलिस स्थानकात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. 
=========================================

No comments: