*[अंतरराष्ट्रीय]*
१- दुबई विमान दुर्घटना - एका फायर फायटरचा मृत्यू
२- लंडनमध्ये भर रस्त्यात दिसेल त्याला भोसकलं, एका महिलेचा मृत्यू
३- मध्य लंडनमध्ये चाकू हल्ल्यात महिलेचा मृत्यू, सहा जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
४- GST विधेयक बहूमतांने मंजूर, करप्रणाली सुरळीत होणार
५- काय आहे GST विधेयक? जीएसटीबद्दल सर्व काही
६- यापुढे वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट दंड
७- अंर्जेल येथील समुद्र किना-यावर एक मृतदेह सापडला, महाड अपघातातील एसटी चालकाचा मृतदेह असल्याची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
८- अखेर महाडमधील शोधकार्याला पहिलं यश!
९- महाड दुर्घटना: केंबुर्ली नदीकाठी तिसरा मृतदेह
१०- सावित्री नदीत शोधकार्य सुरु, चुंबकाला लोखंडी वस्तू चिकटली
११- औरंगाबादमध्येही NDRF चं बचावकार्य, पुरात अडकलेल्यांना वाचवलं
१२- देवदूत... काळरात्री शेकडों जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!
१३- महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री
१४- जयदेव - उद्धव यांच्या भांडणात मला पडायचं नाही - राज ठाकरे
१५- अनधिकृत बांधकाम अधिकृत केल्यानं पूरस्थिती - राज ठाकरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१६- बँकेत 40 लाखांचा दरोडा, 5 तासांच्या थरारानंतर चोरटे जेरबंद
१७- महाड दुर्घटनेत दोन बहिणींसह कुटुंबातले चौघे बेपत्ता
१८- महाड दुर्घटनेत तवेरा कारमधील आठ जण बेपत्ता
१९- माळशेज घाट पुढील २४ तास बंदच, दरड हटवण्यात अडथळे
२०- सावित्रीच्या वेगवान प्रवाहात जवानांची बोट उलटली
२१- ठाण्याच्या घोडबंदर रोडवर आला अजगर
२२- औरंगाबाद; वाळूज येथील ड्रिमलाईन हाँटेलला आग
२३- बिहार कटीहारमध्ये सात वर्षाच्या मुलाचे अपहरण
२४- जळगाव- पोलीस ठाण्यातून चोरटा फरार, दोन पोलीस निलंबित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२५- विंडीजच्या रोस्टन चेसने भारताचा विजय हिरावला
२६- चांगल्या कामाला सकारात्मक साथ मिळते: मकरंद अनासपुरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
=========================================

कार्य आटोपून परतणाऱ्या कुटुंबियांवर अनाहूत संकट आलं. आईला सोडण्यासाठी घरी गेलेल्या अविनाश मालपचाही शोध लागत नाही. हातात फोटो घेऊन सावित्रीच्या तीरावर हतबलपणे एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहणाऱ्या पोराचे डोळे वडिलांना शोधत आहेत.
मंगळवारी रात्री जयगड गाडीत बसलेले धोंडू कोकरेही बेपत्ता आहेत. बसचे ड्रायव्हर गोरक्ष सीताराम मुंडे यांची फक्त बॅग मिळाली आहे. पण त्यांचा शोध अजूनही लागलेला नाही. त्यामुळे नातेवाईकांचा रोष पुरेसा बोलका आहे.

महाड दुर्घटना: केंबुर्ली नदीकाठी तिसरा मृतदेह
महाड (रायगड) : दुथडी भरून वाहणाऱ्या महाडच्या सावित्री नदीमध्ये आज पुन्हा शोधकार्याला सुरूवात झाली आहे. रात्रभर सुरु असलेला पाऊस आणि अंधार यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. पण आज सकाळपासूनच एनडीएरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डनं सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.
LIVE UPDATE : आंजर्ल्याजवळचा मृतदेह बसचालक एस.एस कांबळेंचा,तर केंबुर्ली, हरिहरेश्वरजवळही प्रत्येक 1 मृतदेह, आतापर्यंत एकूण 3 मृतदेह सापडले.
=========================================
सावित्री नदीत शोधकार्य सुरु, चुंबकाला लोखंडी वस्तू चिकटली
रायगड: दुथडी भरून वाहणाऱ्या महाडच्या सावित्री नदीमध्ये आज पुन्हा शोधकार्याला सुरूवात झाली आहे. रात्रभर सुरु असलेला पाऊस आणि अंधार यामुळे शोधकार्य काल संध्याकाळी सहाच्या सुमारास थांबवण्यात आलं होतं. पण आज सकाळपासूनच एनडीएरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डनं सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.
चुंबकाला काय चिकटलं?
सावित्री नदीवरचा पूल कोसळून मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोन एसटीसह सात ते आठ वाहनं बुडाली आहेत. मात्र शोधकार्य अंधुक प्रकाशामुळे थांबवल्यानंतर चुंबकाच्या साहाय्याने एक वस्तू सापडल्याचं सांगण्यात येत आहे. नदीपात्रातील ही लोखंडी वस्तू एखादं वाहन आहे की दुसरी काही वस्तू हे अद्याप समजू शकलेलं नाही. अंधार झाल्यानं काल ही वस्तू बाहेर काढता आली नाही. त्यामुळं पोलीस आणि बचाव पथकानं चुंबक नदीपात्रात लोखंडी वस्तूला तसंच ठेवलं आहे. आज सकाळी जाळी लाऊन ही वस्तू बाहेर काढली जाईल.
=========================================
औरंगाबादमध्येही NDRF चं बचावकार्य, पुरात अडकलेल्यांना वाचवलं
औरंगाबाद: औरंगाबादमध्ये गोदावरीच्या पुरात अडकलेल्या १७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यात आल्यानं या पुरात जवळपास ४० जण अडकलेत. यानंतर एनडीआरएफच्या 25 जवानांच्या तुकडीचं सकाळपासून बचावकार्य सुरु झालं आहे. यामध्ये शिंदे वस्तीतून 17 जणांना पुरातून बाहेर काढण्यात आलं आहे.
वैजापूर तालुक्यातील 12 गावांना पाण्याचा वेढा पडला असून त्यांचा संपर्क तुटला आहे. तसेच वैजापूर-श्रीरामपूर महामार्ग पाण्याखाली गेला आहे.
वगावातील 50 ते 60 घर पाण्याखाली आहेत. 50 कुटुंब आणि 250 नागरिकांना वारी जिल्हा परीषद शाळेत हलवण्यात आलं आहे. 12 गावातील 3 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
पावसाच्या पाण्यात शिंदे वस्ती, सरलाबेट आणि सय्यद वस्ती मिळून 400 लोक अडकले आहेत. एनडीआरएफच्या जवानांच एक पथक पुण्याहुन औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे.
=========================================
काय आहे GST विधेयक? जीएसटीबद्दल सर्व काही
मुंबई : बहुप्रतिक्षीत वस्तू आणि सेवा अर्थात जीएसटी विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे. मोदी सरकार यासाठी आग्रही होतं पण काँग्रेसच्या विरोधामुळे हे विधेयक रखडलं होतं. काल राज्यसभेत 203 मतांनी हे विधेयक मंजूर झालं. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे संपूर्ण देशात एकच करपद्धती लागू होणार आहे.
काय आहे जीएसटी?
जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून, व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिलं जात आहे. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही.
या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे.
=========================================
बँकेत 40 लाखांचा दरोडा, 5 तासांच्या थरारानंतर चोरटे जेरबंद
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगावमध्ये बुधरावी भरदिवसा दरोड्याचा थरार पाहायला मिळाला. स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या गाडीतून 40 लाख रुपये घेऊन चोरटे फरार झाले. बँकेच्या कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला करत चोरट्यांनी धूम ठोकली.
बँकेच्या कर्मचारी अश्विनी जायभाय यांनी प्रसंगावधान दाखवत पोलिसांनी फोन लावला. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करत स्थानिकांनी मदतीचं आवाहन केलं. पोलिस आणि ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने चोरट्यांनी दगडफेक आणि गोळीबार केला. पण, पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या चपळाईने चोरट्यांना पकडलं आणि 5 तासांच्या थरारानंतर चोरट्यांना जेरबंद करण्यात आलं.
=========================================
लंडनमध्ये भर रस्त्यात दिसेल त्याला भोसकलं, एका महिलेचा मृत्यू
लंडन : इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये भर रस्त्यात एका व्यक्तीने लोकांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहे.
पोलिसांनी रसल स्क्वेअरमध्ये एका व्यक्तीला अटक केली आहे.
रसल स्क्वेअरवर एक पुरुष चाकूने नागरिकांवर हल्ला करत असून त्याने काही लोकांना जखमी केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस अम्ब्युलन्ससह घटनास्थळी दाखल झाले.
हा दहशतवादी हल्ला आहे का, याचीही चाचपणी पोलिस करत आहेत. हल्ल्यानंतर घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
=========================================
अखेर महाडमधील शोधकार्याला पहिलं यश!
महाड (रायगड): महाडमधल्या पूल दुर्घटनेतील शोधकार्य अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आलं असलं तरी चुंबकाच्या साहाय्याने एक वस्तू सापडल्याचं समजतं आहे. नदीपात्रातील ही लोखंडी वस्तू एखादं वाहन आहे की दुसरी काही वस्तू हे अद्याप समजू शकलेलं नाही.
सावित्री नदीवरचा पूल कोसळून दोन एसटींसह सात ते आठ वाहनं बुडाल्यानंतर चुंबकाच्या साहाय्यानं वाहनांचा शोध सुरु आहे. ज्यात नदीपात्रात एक लोखंडी वस्तू सापडल्याचं कळतं आहे. मात्र, अंधार झाल्यानं ही वस्तू बाहेर काढणं अशक्य झालं. त्यामुळं पोलीस आणि बचाव पथकानं चुंबक नदीपात्रात लोखंडी वस्तूला तसंच ठेवलं आहे. उद्या सकाळी जाळी लावून ही वस्तू बाहेर काढली जाईल.
अर्थात चुंबकाला चिकटलेली वस्तू कुठली कार आहे, किंवा एसटी बस किंवा आणखी काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
दरम्यान, शक्तीशाली चुंबकाच्या मदतीनं सावित्रीत नदीमध्ये बुडालेल्या वाहनांचा शोध घेण्यात येतो आहे. नदीचा प्रवाह जास्त असल्यामुळं पाणबुड्याच्या मदतीनं शोध घेणं जवळपास कठीण आहे. अशा वेळी बचाव पथकाकडून चुंबकाच्या मदतीनं वाहनांचा शोध घेतला जातो.
=========================================
विंडीजच्या रोस्टन चेसने भारताचा विजय हिरावला
जमैका : आधी पावसाची साथ आणि मग रोस्टन चेसच्या झुंजार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने जमैका कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवलं.
खरंतर या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या दिवशी सहा विकेट्सची आवश्यकता होती. पण 4 बाद 48 धावांवरुन खेळण्यास सुरुवात करण्याऱ्या विंडीजच्या खेळाडूंनी पाचव्या दिवशी अगदी चिकाटीने फलंदाजी केली. विंडीजच्या रोस्टन चेसने 269 चेंडूंत पंधरा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 137 धावांची खेळी उभारली. रोस्टन चेसचं कसोटी कारकीर्दीतलं हे पहिलंच शतक ठरलं. चेसने केवळ आपलं शतकंच पूर्ण केलं नाही, तर तीन महत्त्वाच्या भागीदारी रचून विंडीजला सुस्थितीत नेलं.
रोस्टन चेस आणि जर्मेन ब्लॅकवूडने पाचव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी उभारली. मग चेसने शेन डॉवरिचच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 144 धावांची आणि जेसन होल्डरच्या साथीने सातव्या विकेटसाठी 103 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या तोंडातून विजयाचा घास खेचून काढला.
पावसाच्या व्यत्ययामुळे या कसोटीच्या चौथ्या दिवशी केवळ 15.5 षटकांचाच खेळ झाला होता.
=========================================
GST विधेयक बहूमतांने मंजूर, करप्रणाली सुरळीत होणार
नवी दिल्ली: राज्यसभेत तब्बल १६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जीएसटीमध्ये घटनात्मक बदल करण्यासाठीच्या विधेयकावर चर्चा होऊन एकूण ४ दुरूस्त्यांनी हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत यावर चर्चेला प्रारंभ केला. या विधेयकाला जयललितांच्या अन्नाद्रमुकने तीव्र विरोध दर्शवत, राज्यसभेतून सभात्याग केला. यानंतर यावर जोरदार चर्चा होऊन २०३ मतांनी हे विधेयक मंजूर झाले आहे.
या विधेयकाच्या मंजूरीनंतर जीएसटीचे दर १७ ते २० टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
=========================================
देवदूत... काळरात्री शेकडों जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!
महाड (रायगड): महाडच्या सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानं काल रात्री दोन बस वाहून गेल्या. यातील बरेच प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत. पण ही दुर्घटना झाली त्याचवेळी शेकडो जणांचा जीव वाचविण्यासाठी देवदूत मात्र धावून आला.
हो देवदूतच… बसंत कुमार नावाच्या पठ्ठ्यानं समयसूचकता दाखवून शेकडो जणांचे जीव वाचवले.
महाडचा ब्रिटीशकालीन पूल जिथं सुरु होतो, त्याला चिटकून बसंत कुमारचं गॅरेज आहे. पंक्चर काढणं, हायवेवर वाहनं बंद पडली तर त्यांच्या मदतीला धावणं हे त्याचं नित्याचं काम.
काल हाच बसंतकुमार काळ्यामिट्ट अंधारात धावून आला. गॅरेजमधूनच त्यानं दोन बसेस पुलासकट नदीत वाहून गेल्याचं पाहिलं. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. पण त्यातूनही स्वत:ला सावरत तो रस्त्यावर आला.
उरलेल्या वाहनांना त्यानं पुढं जाऊच दिलं नाही. एकदा विचार करा, जर बसंतकुमार रस्त्यावर उभा राहिला नसता तर? अजून किती जणांना जलसमाधी मिळाली असती.
बसंत कुमारनंच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पण काळ्यामिट्ट अंधारात आणि तुफान कोसळत्या पावसात जिथं फूटभर अंतरावरचा माणूस दिसत नव्हता, पण तरीही त्या काळरात्री बसंत शेकडो जणांसाठी देवदूतासारखा धधावून आला.
सकाळपर्यंत बसंत कुमार घटनास्थळावरच होता. एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाला त्यानं घटनेची माहिती दिली आणि त्यानुसारच शोधकार्यही सुरु करण्यात आलं. सावित्री प्रचंड खवळली आहे, पाण्याला इतका जोर असल्यानं पात्रात पडलेली वाहनं कुठवर गेली असतील हे सांगणं कठीण आहे.
लोक देव शोधण्यासाठी मंदिर, मुर्ती आणि दर्ग्यांकडे धाव घेतात. पण देव अशाच बसंत कुमारसारख्या लोकांच्या रुपानं तुमच्यासाठी धावून येतो.
=========================================
महाड दुर्घटनेत दोन बहिणींसह कुटुंबातले चौघे बेपत्ता
मुंबई : सावित्रीच्या पात्रातल्या अपघाताच्या बातम्यांवरुन बैकर आणि बलेकर कुटुंबियांच्या नजरा हटत नाहीत. कारण बेपत्ता झालेल्या एसटीमध्ये या दोन कुटुंबातले चौघे प्रवास करत होते. दीपाली बलेकर आणि स्नेहल बैकर या दोन बहिणींसह सुनील बैकर, अनिस बलेकर आणि अविनाश मालप अजूनही बेपत्ता आहेत.
कार्य आटोपून परतणाऱ्या कुटुंबियांवर अनाहूत संकट आलं. आईला सोडण्यासाठी घरी गेलेल्या अविनाश मालपचाही शोध लागत नाही. हातात फोटो घेऊन सावित्रीच्या तीरावर हतबलपणे एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहणाऱ्या पोराचे डोळे वडिलांना शोधत आहेत.
मंगळवारी रात्री जयगड गाडीत बसलेले धोंडू कोकरेही बेपत्ता आहेत. बसचे ड्रायव्हर गोरक्ष सीताराम मुंडे यांची फक्त बॅग मिळाली आहे. पण त्यांचा शोध अजूनही लागलेला नाही. त्यामुळे नातेवाईकांचा रोष पुरेसा बोलका आहे.
राजापूर-बोरीवली या बसमध्ये विरारचे 55 वर्षीय मंगेश कातकर सुद्धा प्रवास करत होते. ते काल बोरीवलीला येण्यासाठी निघाले होते.
55 वर्षीय मंगेश कातकर यांच्या बेपत्ता होण्यानं कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
55 वर्षीय मंगेश कातकर यांच्या बेपत्ता होण्यानं कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
=========================================
महाड दुर्घटनेत तवेरा कारमधील आठ जण बेपत्ता
महाड (रायगड) : महाडच्या दुर्घटनेत गुहागरहून मुंबईकडे निघालेली तवेरा कार बेपत्ता झाल्याची माहिती आहे. या तवेरातून प्रवास करणारे आठ जणही बेपत्ता झाले आहेत.
=========================================
यापुढे वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट दंड
नवी दिल्ली: वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्यास यापुढे तुम्हाला दहापट जास्त दंड भरावा लागणार आहे. कारण वाहतूक अधिनियमन कायद्यातील सुधारणांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
यापुढे तुम्ही वाहन चालक परवान्याशिवाय गाडी चालवताना आढळलात तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड ठोठावला जाईल. तर दारु पिऊन गाडी चालवताना आढळला तर 2 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
हेल्मेटशिवाय गाडी चालवली तर शंभर रुपये नाही तर एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही वाहतुकीचे नियम तोडले तर तुम्हाला जास्तीचा दंड भरावा लागणार आहे.
=========================================
महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री
महाड (रायगड): महाड पूल दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करु अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुर्घटनास्थळी मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी भेट दिली. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते.
एनडीआरएफच्या टीमची शोधमोहीम जोरदार सुरु आहे. हे शोधकार्य सुरु राहिल. शोधकार्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. ही सगळी घटना पाहता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यासाठी सक्षम अधिकारी नेमण्यात येतील. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
राज्यातील अशाप्रकारच्या पुलांचं ऑडिट करण्यात येईल. ही घटना घडू नये यासाठी काय प्रयत्न केले गेले होते? याचीही माहिती घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
=========================================
चांगल्या कामाला सकारात्मक साथ मिळते: मकरंद अनासपुरे
नांदेड: नाम संस्थेने संपूर्ण मराठवाड्यात 562 किलोमीटर लांबीचे काम केलं. त्यात पावसानेही चांगली साथ दिली. त्यामुळे चांगल्या कामाला सकारात्मक साथ मिळते असे आम्हाला वाटते. अशी प्रतिक्रिया मकरंद अनासपुरे दिली आहे.
नाम संस्थेनं संपूर्ण मराठवाड्यात 562 किलोमीटर लांबीचं काम केलं. त्यातच पावसानंही साथ दिल्यानं मोठ्या प्रमाणात जलसाठा होताना दिसतो आहे. चांगल्या कामाला सकारात्मक साथ मिळते. असं सांगत मकरंद अनासपुरेंनी समाधान व्यक्त केलं आहे. कंधार इथं आमदार प्रताप चिखलीकर यांच्या वाढदिवस कार्यक्रमाच्या निमित्तानं ते बोलत होते.
कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पाठीशी नाम संस्था कायमच उभी असेल कारण आम्ही समाजाचे देणे लागतो याची आम्हाला जाणीव आहे. असंही मकरंद म्हणाले
=========================================
माळशेज घाट पुढील २४ तास बंदच, दरड हटवण्यात अडथळे
मुरबाड: कल्याण-अहमनगर रोडवरील माळशेज घाट गेल्या 24 तासांपासून बंद आहे. काल रात्री दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर पुण्याकडे जाणारी वाहतूक मुरबाड कर्जतमार्गे वळवण्यात आली आहे.
दरड कोसळल्यानं नाशिककडे जाणारी वाहतूक शहापूर कसारामार्गे वळवण्यात आली आहे. मुंबईकडे भाजीपाला घेऊन येणारी वाहनं घाटात अजूनही उभी आहेत.
मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळं दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळं माळशेज घाट आणखी 24 तास बंद राहणार असल्याची माहिती मुरबाडच्या तहसीलदारांनी दिली आहे.
=========================================
सोलापुरात पशुहत्या करण्यास विरोध करणाऱ्या कुटुंबावर बहिष्कार
- सोलापूर, दि. ४ - सोलापूर येथील मार्डी गावात मरीआई-लक्ष्मीआईच्या यात्रेत पशुहत्या करण्यास विरोध करणाऱ्या तरुणांसह कुटुंबावर बहिष्कार घातला आहे. रमेश बापूराव पाटोळे असे या तरुणाचे नाव असून गावकऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले आहे. वाळीत टाकल्यामुळे त्यांच्यावर गावकऱ्यांनी पीठ, मीठ, पाणी अशा गोष्टींचा बहिष्कार घातल्याचे समोर येऊ लागले आहे. या कुटुंबात बापूराव, राहीबाई, महेश, रमेश आणि वहिनी असे पाच सदस्य आहेत. समाजाकडून आपल्या कुटुंबाची होणारी फरफट थांबविण्यासाठी रमेशने पोलीस ठाण्यात आपल्या समाजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावात येथील प्राथमिक शाळेजवळ मरीआई-लक्ष्मीआईचे मंदिर आहे. गटारी अमावस्येला येथे यात्रा भरते. यावेळी मोठ्या प्रमाणात पशुंचा बळी दिला जातो. हे थांबण्यासाठी रमेशने सन २०१४ मध्ये पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दिला होता. त्यावेळी येथील यात्रेत पशुहत्या थांबली. मात्र, संपूर्ण दलित समाजाने रमेशच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याच्या निर्णय घेतला.
=========================================
जयदेव - उद्धव यांच्या भांडणात मला पडायचं नाही - राज ठाकरे
- नाशिक, दि. 04 - उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्या भांडणात मला पडायचं नाही असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे भेटीवर बोलण्यास नकार दिला. राज ठाकरे नाशिमकधील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनधिकृत बांधकामं अधिकृत केल्यामुळे पूरपरिस्थिती आल्याची टीका केली आहे. गोदावरी नदीकाठचं सगळंच उद्ध्वस्त झालं आहे. गोदापार्कबद्दल रिलायन्सशी बोलणार असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे.महाड दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे. देशात माणसं मरण्याची किंमत राहिलेली नाही. ब्रिटिशांना काळजी आहे, मात्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली
=========================================
सावित्रीच्या वेगवान प्रवाहात जवानांची बोट उलटली
- महाड, दि. ४ - महाडच्या सावित्री नदीमध्ये शोधकार्यामध्ये गुंतलेल्या एनडीआरएफच्या जवानांची बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. सावित्री नदीमधील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ही बोट कलंडली. महाबळेश्वर आणि महाडमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरु राहिल्याने सावित्रीच्या पाण्याची पातळी कमी झालेली नाही.
=========================================
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर आला अजगर
- ऑनलाइन लोकमतठाणे, दि. ४ - ठाण्याच्या घोडबंदर रोडवरुन बुधवारी रात्री भल्यामोठया अजगराने प्रवास केला. त्यामुळे काहीकाळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरुन जाणा-या करण अहिरे यांच्या नजरेस सर्वप्रथम हा अजगर पडला.नागपूरहून दुचाकीवरुन आलेले अहिरे आणि त्यांचे मित्र ठाण्याच्या दिशेने जात असताना घोडबंदर रोडवर अजगराची हालचाल अहिरे यांच्या नजरेस पडली. अहिरे आणि त्यांचे मित्र तात्काळ बाईक थांबवून अजगराजवळ गेले. महामार्गावरील कोणत्या वाहनाखाली हा अजगर येऊ नये यासाठी अहिरे आणि त्यांच्या मित्रांनी काही वेळ वाहतुकीचे व्यवस्थापन करीत अजगराला सुरक्षित मार्ग करुन दिला.महामार्ग ओलांडून तो अजगर संजय गांधी राष्ट्रीय अभयरण्यात सुखरूप निघून गेला. जवळपास अडीच ते तीन फूटांचा तो अजगर होता असे करण अहिरे यांनी सांगितले. अहिरे श्वान प्रशिक्षक होते.
=========================================
No comments:
Post a Comment