Tuesday, 30 August 2016

नमस्कार लाईव्ह ३०-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- किरगिस्तानमधील चीनी दूतावासाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट 
२- अमेरिकेला वापरता येणार भारतीय नौदलाचे तळ 
३- लिट्टेचा नेता प्रभाकरन जिवंत असू शकतो? 
४- मांझीला बहारीनचे पंतप्रधान देणार मदत 
५- लॉस एंजेल्स विमानतळावर गोळीबाराची अफवा 
६- ब्रसेल्समध्ये पोलिस इमारतीत बॉम्बस्फोट 
७- स्तनाच्या कर्करोगावरील उपचार शोधला 
८- १४५ वर्षांच्या गोथोंना जगाचा घ्यायचाय निरोप 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
९- ज्येष्ठांच्या सेवेसाठी केंद्राचे नवे धोरण!
१०- स्कॉर्पिन प्रकरण गंभीरच!
११- ददलानी यांना क्षमा करावी, विजय दर्डा यांचे जैन समाजाला आवाहन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१२- शेतकरी आत्महत्येवरुन उद्धव यांची फडणवीस सरकारवर टीका 
१३- बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला उसळली गर्दी 
१४- मराठी, हिंदू सण संपवण्याचं कारस्थान - राज ठाकरे 
१५- बेस्टला वर्षाला ९०५ कोटींचा तोटा 
१६- मेट्रोतून मांसवाहतूक करण्यास बंदी कायम 
१७- प.रे.ची ‘हार्बर वाहतूक सेवा’ मध्य रेल्वेकडे ?
१८- अर्शीद कुरेशी, रिझवान खानचा ताबा मुंबई पोलिसांकडे 
१९- दहीहंडी अवमान याचिकेवरील सुनावणी २० सप्टेंबरला 
२०- किडनी रॅकेट - पत्राकडे दुर्लक्ष करणे पडले महागात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
२१- गोरेगाव रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड 
२२- दिल्लीत डेंग्यूचा वाढता फैलाव 
२३- तेलंगणा विधानसभेत जीएसटी विधेयक मंजूर 
२४- नाशिक - छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या 
२५- छत्तीसगड; बायानार भागातून ५ किलो आईडी स्फोटके जप्त  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२६- लंडन ऑलिम्पिकसाठी योगेश्वरला मिळणार रौप्यपदक 
२७- मोसमाच्या अखेर भारत अव्वल स्थान पटकावू शकतो - धोनी 
२८- आॅलिम्पियन महिला हॉकी संघाला रेल्वेत करावा लागला खडतर प्रवास 
२९- ...आणि राष्ट्रपतींनी स्टेजच्या खाली येऊन दिला पुरस्कार 
३०- सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार प्रदान 
३१- बीफ खाल्ले म्हणून बोल्टने नऊ सुवर्णपदके मिळवली - भाजप खासदार 
३२- पावसाच्या जोरावर विंडिजने जिंकली मालिका 
३३- विजय मल्ल्या यांनी मुद्दामच दडविली संपत्तीची माहिती!
३४- दोन हजार कोटींचा हवाला घोटाळा?
३५- इन्फोसिसचा टीसीएस फॉर्म्युला !
३६- भारत पूर्वीपेक्षा सध्या अधिक मजबूत स्थितीत
३७- खरिपाच्या मुहुर्तालाच शेतक-यांवर सुलतानी संकट!
३८- उत्पादन येताच पडले शेतमालाचे भाव 
३९- साहित्यिक वि.ग.कानेटकर यांचे निधन. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
======================================

लंडन ऑलिम्पिकसाठी योगेश्वरला मिळणार रौप्यपदक



  • नवी दिल्ली, दि. ३० - रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा पहिल्या फेरीतच पराभव झाला. मात्र त्याआधीच्या २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकसाठी योगेश्वरला रौप्यपदक मिळण्याची शक्यता आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरला कांस्यपदक मिळाले होते. 
     
    २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरच्या ६० किलो वजनी गटात खेळणा-या  रशियाचा बीसीक कुडखोव्हला रौप्यपदक मिळाले होते. मात्र कुडखोव्हचा डोप चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याची पदके काढून घेण्यात आली आहेत. चारवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला आणि दोन ऑलिम्पिक पदके मिळवणा-या कुडखोव्हचा २०१३ मध्ये दक्षिण रशियामध्ये कार अपघातात मृत्यू झाला. 
     
    वाडाने निर्बंध घातलेल्या उत्तेजकांचे कुडखोव्हने सेवन केले होते. जागतिक कुस्ती संघटना आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून अद्याप यासंबंधीची अधिकृत घोषणा झालेली नाही. योगेश्वरला रौप्यपदक मिळाले तर, २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताच्या खात्यावर आणखी एक रौप्यपदक जमा होईल. सुशील कुमारने लंडनमध्ये रौप्यपदक मिळवले होते. 
======================================

शेतकरी आत्महत्येवरुन उद्धव यांची फडणवीस सरकारवर टीका



  • मुंबई, दि. ३० - राज्य आणि केंद्रात सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरुन फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. धाराशीव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य वनमाला चंद्रकांत गायकवाड या महिलेने सावकारी जाचाला कंटाळून विष प्राशन करुन जीवन संपवले. 
     
    धाराशीवच्या वनमालेच्या मृत्यूनंतर तरी कर्जबाजारी शेतकर्‍यांची तडफड सरकारला दिसणार आहे का? आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडणार आहे का? असे सवाल उद्धव यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारले आहेत. 

======================================

बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला उसळली गर्दी



  • बीड, दि. ३० - कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने आज बीड शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी जिल्ह्यातून मोर्चात सहभागी होण्यासाठी येणा-या लोकांची रस्त्यावर अक्षरश: रीघ लागली आहे. 
     
    वाहनांची पार्किंगची व्यवस्था शहराबाहेर करण्यात आलेली असल्याने पार्किगपासून स्टेडियमकडे लोकांची रस्त्यावर गर्दी उसळली आहे. कोपर्डी अत्याचार प्रकरणी आज दुपारी १२ वाजता मराठा क्रांती मुक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकाळपासून बीडकडे येणारी वर्दळ वाढली आहे. 
     
    वाहतूकीचे मार्गही बदलण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या मुकमोर्चासाठी एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असून, पन्नास पोलीस अधिकारी, तीन हजार स्वयंसेवक मदतीला आहेत. काहीवेळात मोर्चाला सुरुवात होणार असून, मोर्चाच्या मार्गावरील दुकाने बंद आहेत. 
======================================

मराठी, हिंदू सण संपवण्याचं कारस्थान - राज ठाकरे



  • मुंबई, दि. ३० - मराठी, हिंदू सण संपवण्याचं कारस्थान सुरु आहे  या आरोपाचा मंगळवारी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. मुंबईत मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. गैरवापर होत असेल तर, अॅट्रोसिटीचा कायदा रद्द करण्याचाही त्यांनी पुनरुच्चार  केला. 
     
    जातिनिहाय कायदे कशाला हवेत ?, आरक्षण आर्थिक निकषांवर हवं असे राज म्हणाले. मुंबईत वाहतूक पोलिसावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत कायद्याचा कुठलाही धाक राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. 
     
    बलात्कार रोखण्यासाठी सौदी अरेबियासारखे कठोर कायद्याची आवश्यकता आहे. कठोर कायदे नसल्यामुळे बलात्काराचे गुन्हे सर्रास घडतात असे ते म्हणाले. दहीहंडी उत्सवासंबंधी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत न्यायालयाच्या निर्णयावर टीका करताना त्यांनी हिंदू सण, उत्सव संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता.   
======================================

अमेरिकेला वापरता येणार भारतीय नौदलाचे तळ



  • वॉशिंग्टन, दि. ३० - परस्परांची जमीन, हवाई हद्द आणि नौदल तळ वापरण्याच्या महत्वाच्या करारावर सोमवारी भारत आणि अमेरिकेने स्वाक्षरी केली. त्यामुळे दोन्ही देशांना आता दुरुस्ती आणि वस्तू पुरवठयासाठी परस्परांचे तळ वापरता येतील. 
     
    हा करार म्हणजे भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे. चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी भारत आणि अमेरिका अधिक जवळ येत चालले आहेत. 
     
    अन्य जवळच्या सहका-यांप्रमाणेच भारता बरोबर संरक्षण व्यापार आणि तंत्रज्ञान शेअरींग वाढवणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव अॅश कार्टर आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कराराची माहिती दिली. या करारामुळे संयुक्त मोहिम, सरावा दरम्यान भारत आणि अमेरिकन नौदलाला परस्परांना मदत करणे अधिक सोपे झाले आहे असे पर्रिकर यांनी सांगितले. 

======================================

No comments: