Monday, 8 August 2016

नमस्कार लाईव्ह ०८-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- सर्व्हेः तासंतास विचारात गुंतलेलेच हुशार असतात 
२- पाकिस्तानच्या क्वेटामधील रुग्णालयात बॉम्बस्फोट, 15 मृत्यूमुखी 
३- तुर्की जनता बंड मोडून काढण्यास सक्षम:एर्दोगन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
४- गोळी झाडायची तर माझ्यावर, दलितांवर नको, मोदींची तंबी 
५- बुरहानच्या खात्म्यानंतर काश्मीरमधील हिंसाचारात 3,300 जवान जखमी 
६- जीएसटी विधेयक मंजुरीसाठी आज पुन्हा लोकसभेत 
७- काश्मीरमध्ये चकमकीत 2 जवान शहिद, 1 दहशतवादी ठार 
८- काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणं माहित असूनही जवान असहाय्य 
९- दहशतवादी सलाहुद्दीनची भारताला आण्विक युद्धाची धमकी 
१०- काश्‍मिरी आता तडजोड करणार नाहीत: हिज्बुल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
११- अण्णा हजारेंनी काळ्या पैशांविरुद्ध पुन्हा रणशिंग फुंकलं! 
१२- मुंबईत ‘मेट्रो-7’चं काम सुरु, अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व दरम्यान धावणार मेट्रो 
१३- टेमघर धरणाप्रश्नी दोषींवर कारवाई करणारच : महाजन 
१४- शिक्षकांसाठी आमदाराने नाकारली पगारवाढ 
१५- गाय फक्त दूध देते;मोदींना आता कळले: लालु 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१६- मिरज बलात्कार प्रकरण : आरोपी अमित कुरणे अटकेत 
१६- बीड; महिन्याला लाखोंचं उत्पन्न देणारा शेख बंधुंचा अत्याधुनिक पोल्ट्री फार्म 
१७- नागपूर; ओबीसींना अॅट्रॉसिटीतून वगळा : नाना पटोले 
१८- कोल्हापूरात डॉल्बी लावणाऱ्यांची आता गय नाही 
१९- कृष्णा-भीमा खोऱ्यातील पाणीसाठा 77 टक्के 
२०- जम्मू काश्मीर - माछिल सेक्टरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद 
२१- जम्मूच्या गोरखा नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, 12 जखमी. 
२२- जालना; दोन सख्ख्या भावांचा विहीरीत पडून मृत्यू.
२३- तेलंगणा; संशयित दहशतवादी चकमकीदरम्यान ठार 
२४- अकोला - चोंडी येथील निर्गुणा धरण 100% भरले. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२५- रिओ ऑलिम्पिक : भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची फायनलमध्ये धडक 
२६- अहमदनगर; डोक्यात दगडी पाटा टाकून आईकडून तरुण मुलीची हत्या 
२७- मायकल फेल्प्सची 19व्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाची कमाई 
२८- रिओ ऑलिम्पिक: सायकलपटूचा अपघात, पाठीचा कणा फ्रॅक्चर 
२९- जेठालाल, भिडेच्या तारक मेहताने ओलांडला २ हजार एपिसोडचा टप्पा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
================================================

अण्णा हजारेंनी काळ्या पैशांविरुद्ध पुन्हा रणशिंग फुंकलं!

अण्णा हजारेंनी काळ्या पैशांविरुद्ध पुन्हा रणशिंग फुंकलं!
अहमदनगर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काळ्या पैशांविरुद्ध पुन्हा रणशिंग फुंकलं आहे. राजकीय पक्ष, अधिकारी आणि माफियांच्या युतीतून काळा पैसा येतो. त्यामुळे काळ्या पैशाच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी जनसंसद मजबूत करण्याचं आवाहन अण्णांनी केलं आहे.

संविधान मोर्चा आणि भारतीय जनसंसद जनजागृती अभियनात ते बोलत होते. माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत, विजय पांढरे, अशोक सब्बन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थित जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली. लवकरच काळ्या पैशाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे.

काळा पैसा देशाच्या विकासातील मोठा अडसर आहे. त्यामुळे जनआंदोलनासाठी संघटन उभारण्याची गरज अण्णांनी व्यक्त केली. त्याचबरोबर काळा पैसा रोखण्यासाठी हजाराच्या आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद कराव्यात आणि नागरिकांना एक लाखापेक्षा जास्त  रक्कम जवळ बाळगण्यास मनाईची मागणी अण्णांनी केली. त्याचबरोबर केवळ बँकिंग व्यवहारास प्राधान्य देण्याची मागणीही अण्णांनी केली आहे.

================================================

मिरज बलात्कार प्रकरण : आरोपी अमित कुरणे अटकेत

मिरज बलात्कार प्रकरण : आरोपी अमित कुरणे अटकेत
सांगली मिरजमधील बलात्कार पीडित तरुणीच्या आत्महत्येनंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपी अमित कुरणेसह त्याच्या आई-वडिलांनाही ताब्यात घेतलं आहे. अमित कुरणेविरोधात पीडितेनं बलात्काराची तक्रार दिली होती.
अमित कुरणेविरोधात तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. उलट तक्रारीनंतर पीडित महिलेवरच पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. या सर्वाला कंटाळून काल पीडितेनं थेट आरोपी अमित कुरणेच्या घरातच स्वतःला गळफास लावून घेतला आणि मृत्यूपर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत आपण अमितमुळे आत्महत्या करत असल्याचं लिहून ठेवलं.


================================================

रिओ ऑलिम्पिक : भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची फायनलमध्ये धडक

रिओ ऑलिम्पिक : भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची फायनलमध्ये धडक
रिओ दी जनैरो : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं फायनल गाठून नवा इतिहास घडवला आहे. दीपा कर्माकरनं व्हॉल्ट प्रकारात 14.850 गुणांची कमाई करुन आठवं स्थान मिळवलं आणि फायनलमधील आपलं स्थानही पक्क केलं.

दीपानं व्हॉल्ट प्रकारात पहिल्या प्रयत्नातच 15.100 गुणांची कमाई केली. तर दुसऱ्या प्रयत्नात दीपानं 14.600 गुणांची वसुली केली.

================================================

डोक्यात दगडी पाटा टाकून आईकडून तरुण मुलीची हत्या

डोक्यात दगडी पाटा टाकून आईकडून तरुण मुलीची हत्या
अहमदनगर डोक्यात दगडी पाटा टाकून आईनं तरुण मुलीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. कौटुंबिक वादातून हत्येचा संशय व्यक्त केला जातो आहे.

बोल्हेगाव परिसरात दुपारी कौटुंबिक कारणातून माय लेकींच्यात वाद झाला. दुपारी वडील आणि भाऊ दोघंही घराबाहेर होते. त्यावेळी दोघींच्यात कडाक्याचा वाद झाल्यानं उषा कोतेनं  मोनिकाच्या डोक्यात पाटा घातला. गंभीर दुखापत झाल्यानं मोनिकाचा मृत्यू झाला.

बुरहानच्या खात्म्यानंतर काश्मीरमधील हिंसाचारात 3,300 जवान जखमी

बुरहानच्या खात्म्यानंतर काश्मीरमधील हिंसाचारात 3,300 जवान जखमी
श्रीनगर : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारात आतापर्यंत जवळपास 3,300 जवान जखमी झाले आहेत. मागच्याच महिन्यात 8 जुलै रोजी चकमकीदरम्यान बुरहान वानीला कंठस्नान घालण्यात आलं होतं.

जुलै 2016 पासून जम्मू-काश्मीर पोलिस आणि पॅरामिलिटरी फोर्सचे 3,329 जवान शांतता आणि सुव्यवस्था राखताना जखमी झाले आहेत. यात काही जवानांना गंभीर दुखापतही झाली आहे, असं पोलिस दलाच्या प्रवक्त्याने सांगितलं. बुरहान वानीच्या खात्म्यानंतर 1,109 हिंसक आंदोलनं झाली, यात पोलिस दलातील 2 जवान शहीद झाले.

बुरहान वानी हा अतिरेकी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. बुरहान वानी वयाच्या पंधराव्या वर्षीच दहशतवादी बनला होता. त्याचा मोठा भाऊ खालिद मुजफ्फरही दहशतवादी होता, ज्याला मागच्याच वर्षी मारण्यात सुरक्षादलांना यश आलं होतं. मात्र बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार भडकला होता.



================================================

मुंबईत ‘मेट्रो-7’चं काम सुरु, अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व दरम्यान धावणार मेट्रो

मुंबईत ‘मेट्रो-7’चं काम सुरु, अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व दरम्यान धावणार मेट्रो
मुंबई मुंबईतील अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या ‘मेट्रो-7’च्या कामाला आजपासून एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. या मार्गावरील तीन ठिकाणी बॅरिकेडिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

हब मॉल ते आरे फ्लायओव्हर, पठाणवाडी ते पुष्पा पार्क आणि मेट्रो मॉल ते देवीपाडा अशा तीन विभागात या प्रकल्पाचं काम करण्यात येणार आहे. पुढील 10 ते 12 दिवस हे बॅरिकेडींगचं काम सुरु राहणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकांचं सहकार्य मिळाल्यास वेळेतच हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी प्रशासनाला आशा आहे. मुंबईकरांची वेळ आणि इंधन वाचवण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.

================================================

महिन्याला लाखोंचं उत्पन्न देणारा शेख बंधुंचा अत्याधुनिक पोल्ट्री फार्म

महिन्याला लाखोंचं उत्पन्न देणारा शेख बंधुंचा अत्याधुनिक पोल्ट्री फार्म
बीड : निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारभावाचा आवमेळ यामुळे शेती आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. त्यामुळे शेतीकरी पूरक व्यवसायाला पसंती देतात. याच पूरक व्यवसायातून अत्याधुनिक पोल्ट्री फार्म उभारणारे उच्चशिक्षित शेख बंधू आज यातील आयकॉन बनले आहेत.

शेख वसिम, शेख रौफ, शेख अब्दुल या तीन बंधुंनी बीड जिल्ह्यातील छोट्याशा नेकनूर गावात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन पोल्ट्री फार्म बनवला. या फार्ममध्ये 25 हजार पक्षी आहेत. पोल्ट्रीच्या ऑटोमायझेशनमुळे अवघ्या तीन मिनिटात 25 हजार पक्षांना खाद्य दिलं जातं आहे.

10 हजार पक्ष्यांपासून सुरु केलेल्या या पोल्ट्री फार्ममध्ये आज 25 हजार पक्षी आहेत. मात्र ऑटोमायझेशन पद्धतीमुळे पक्षांची निगा राखणं सोप्पं झालं आहे. चिक्स पक्षांना ठेवण्यासाठी अद्ययावत कम्पार्टमेन्ट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे पक्ष्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि वाढ चांगली होते.

कसा आहे शेख बंधुंचा अत्याधुनिक पोल्ट्री फार्म?
– 5 एकरावर 50 बाय 300 चे दोन शेड
– 25 हजार चिक्स पक्षांसाठी 50 बाय 250 चे एक शेड
– 75 हजार पक्षी बसतील एवढी क्षमता
– प्रत्येक पक्षासाठी 500 रुपये खर्च
– प्रत्येक पक्षी वर्षात 330 ते 340 अंडी देतो
– एका दिवसाला लेअर फार्ममधून 25 हजार अंडींचं उत्पादन

शेतीतून मिळणारं उत्पन्न कमी असल्याने शेख बंधुंना शेती पूरक व्यवसाय करण्याची संकल्पना सुचली. एक भाऊ व्हेटरनरी डॉक्टर असल्याने त्यांना या व्यवसायात जास्त अडचणी आल्या नाहीत. शेतीपूरक या व्यवसायातून शेख बंधुंना लाखोचं उत्पन मिळत आहे.

================================================

ओबीसींना अॅट्रॉसिटीतून वगळा : नाना पटोले

ओबीसींना अॅट्रॉसिटीतून वगळा : नाना पटोले
नागपूर : अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याने ओबीसींना या कायद्यातून वगळा, अशी मागणी भाजप खासदार नाना पटोले यांनी केली आहे. नागपुरात ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमात पटोले बोलत होते.

“अॅट्रॉसिटी कायदाच्या गैरवापराचा सर्वाधिक परिणाम ओबीसींवर झाला आहे. दलित व्यक्तीवर अत्याचार केल्याचा आरोप झाल्यास ओबीसीवर अॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाई करु नका, अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. यासंदर्भात दलित संघटनांशी बोलण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

दरम्यान, जे दलितांवर खरोखर अन्याय करतात त्यांना फाशीसारखी कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अॅट्रॉसिटी कायद्याच्या पुनर्विचाराची मागणी केली होती. या मागणीला दलित संघटनांनी कडाडून विरोध केला होता.

================================================

गोळी झाडायची तर माझ्यावर, दलितांवर नको, मोदींची तंबी


गोळी झाडायची तर माझ्यावर, दलितांवर नको, मोदींची तंबी
हैदराबाद : गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, दलितांवर नको, असं भावनिक आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. दलितांना त्रास देण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचं मोदींनी बजावलं आहे.

दलितांवर हल्ला न करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रविवारी हैदराबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. काल गो-रक्षेच्या मुद्यावरुन मोदींनी खडसावलं असतानाच आज दलितांवर होणाऱ्या अत्याचारावर मोदींनी जोरदार टीका केली आहे.

बनावट गोरक्षकांपासून सावध राहण्याचा इशारा मोदींनी दिला. हे ढोंगी आणि बनावट गोरक्षक समाज आणि देशात दुफळी माजवू पाहत आहेत. अशा व्यक्तींना दंड ठोठावण्याचा सल्ला पंतप्रधानांनी संबंधित राज्यांना दिला आहे. पशुधन ही देशाची संपत्ती असून गोरक्षणाच्या नावाखाली समाजात तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचंही ते म्हणाले.

11 जुलै रोजी गुजरातमधील उनामध्ये गाईचं मांस बाळगल्याच्या संशयावरुन दलित तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर काल पहिल्यांदाच मोदींनी मौन सोडलं.

================================================

सर्व्हेः तासंतास विचारात गुंतलेलेच हुशार असतात

सर्व्हेः तासंतास विचारात गुंतलेलेच हुशार असतात
नवी दिल्लीः शारीरिक स्वरुपात कमी क्रियाशील असणारे आणि नेहमी विचारात गुंतलेले लोक जास्त हुशार असतात. अर्थात अशा लोकांची आयक्यू लेव्हल जास्त असते, असा समज आहे. अमेरिकेच्या एका संशोधनामुळे हा समज खरा ठरण्यास बळ मिळालं आहे.


अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका विद्यापीठात हे संशोधन करण्यात आलं. संशोधकांनी संशोधनासाठी 30-30 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार केला. एका ग्रुपमध्ये सतत विचारात हरवलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता, तर दुसऱ्या ग्रुपमध्ये कमी विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

================================================

जीएसटी विधेयक मंजुरीसाठी आज पुन्हा लोकसभेत

जीएसटी विधेयक मंजुरीसाठी आज पुन्हा लोकसभेत

नवी दिल्ली : बहुप्रतिक्षीत जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर विधेयक आज लोकसभेत पुन्हा सादर होणार आहे. या विधेयकाला राज्यसभेने मंजुरी दिली होती. जीएसटीवर होणाऱ्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत.


जीएसटी विधेयकाला बुधवारी राज्यसभेत मंजुरी देण्यात आली. या विधेयकात बऱ्याच दुरुस्त्याही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विधेयक लागू करायचे असेल तर त्याला लोकसभेतही मान्यता आवश्यक आहे. दरम्यान राज्यसभेतील जीएसटीवरील चर्चेदरम्यान नरेंद्र मोदी उपस्थित नसल्याने विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोलही केला होता. त्यामुळे आज लोकसभेत पंतप्रधान चर्चेत भाग घेणार आहेत.



लोकसभेच्या मान्यतेनंतर हे विधेयक स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर 30 दिवसांमध्ये या विधेयकाबाबत सर्व राज्यांची संमती घेतली जाईल. जीएसटी विधेयक राज्यांशी निगडित असल्याने किमान 50 टक्के राज्यांची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र 29 पैकी 13 राज्यांमध्ये भाजपचं सरकार असल्याने या विधेयकाचा मार्ग मोकळा असेल.

================================================

मायकल फेल्प्सची 19व्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाची कमाई

मायकल फेल्प्सची 19व्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाची कमाई
रिओ दी जानेरो : अमेरिकेचा विश्वविक्रमवीर जलतरणपटू मायकल फेल्प्स आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. फेल्प्सचा समावेश असलेल्या अमेरिकेच्या संघाने फोर बाय हंड्रेड फ्रीस्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

मायकल फेल्प्ससह कॅलेब ड्रेसेल, रायन हेल्ड आणि नॅथन अॅड्रियनचा अमेरिकेच्या संघात समावेश होता.

मायकल फेल्प्सचं ऑलिम्पिकमधलं आजवरचं हे 19वं सुवर्णपदक ठरलं. फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये एकूण 23 पदकांची कमाई केली आहे.

फेल्प्सने त्याच्या पहिल्याच म्हणजे अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकाची कमाई करुन विक्रम रचला होता. त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिक 8 सुवर्णपदक खिशात टाकले होते. यानंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक आणि आताच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 1 सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

================================================

रिओ ऑलिम्पिक: सायकलपटूचा अपघात, पाठीचा कणा फ्रॅक्चर

रिओ ऑलिम्पिक: सायकलपटूचा अपघात, पाठीचा कणा फ्रॅक्चर
रिओ दी जनैरो रिओ ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अपघातांची मालिका सुरु राहिली. नेदरलँड्सची सायकलपटू अनेमिक वॅन व्लूटेनला शर्यतीतदरम्यान अपघात झाला. यात तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झालं आहे.

I am now in the hospital with some injuries and fractures, but will be fine. Most of all super disappointed after best race of my career.

अनेमिकला सध्या आयसीयूत दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे

================================================

टेमघर धरणाप्रश्नी दोषींवर कारवाई करणारच : महाजन

पुणे : टेमघर धरणाच्या सुरक्षेसंदर्भात कायदे विभागाला चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘माझा’ला दिली आहे. काल टेमघर धरणाची पाहणी केल्यानंतर धरणाला कोणताही धोका नसल्याचं वक्तव्य महाजन यांनी केलं होतं.


त्यांच्या वक्तव्यावर टीका होताच धरणाच्या सुरक्षेसंदर्भात कोणताही यू-टर्न घेतला नसल्याचं महाजन यांनी म्हटलं. शिवाय लवकर दोषींवर कारवाई करु असं आश्वासनही महाजन यांनी दिलं आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातल्या ओढे नाले, उपनद्यांच्या सर्वेक्षणाचेही आदेशही गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

टेमघर धरणाच्या भिंतीमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असली तरी धरणाला मोठा धोका नाही, असा अजब तर्क जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लावला होता. धरणाच्या भिंतीतून होणाऱ्या पाणीगळतीची बातमी ‘एबीपी माझा’नं दाखवल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टेमघर धरणाची पाहणी केली होती.

================================================

पाकिस्तानच्या क्वेटामधील रुग्णालयात बॉम्बस्फोट, 15 मृत्यूमुखी

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील बलूचिस्तानची राजधानी क्वेटामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहे. एका सरकारी रुग्णालयात हा स्फोट झाला. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गोळीबारानंतर बॉम्बस्फोट झाल्याचं कळतं. घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. बॉम्बस्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शिवाय हा हल्ल्याची जबाबदारी अजून कोणीही स्वीकारलेली नाही.

बॉम्बस्फोटाच्या काही तास आधी बलूचिस्तान बार असोसिएशनचे अध्यक्ष बिलाल अनवर कासी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह घेऊन काही वकील सरकारी रुग्णालयात आले होते. त्याचवेळी हा स्फोट झाला. त्यामुळे मृतांमध्ये वकिलांची संख्या सर्वाधिक आहे.

================================================

काश्मीरमध्ये चकमकीत 2 जवान शहिद, 1 दहशतवादी ठार


  • ऑनलाइन लोकमत - 
    श्रीनगर, दि. 8 - कुपवारा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन बीएसएफ जवान शहीद झाले आहेत. चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. बीएसफ आण दहशतवाद्यांमधील चकमक अजूनही सुरु आहे. दरम्यान काश्मीरमधील जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. सलग 31 व्या दिवशी कर्फ्यू सुरु असून शाळा, कॉलेज, पेट्रोल पंप, खासगी कार्यलयांसह महत्वाची ठिकाणे बंद आहेत.
================================================

काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणं माहित असूनही जवान असहाय्य

  • First Published :08-August-2016 : 12:17:47

  • ऑनलाइन लोकमत - 
    श्रीनगर, दि. 8 - काश्मीर खो-यातील हिंसा, लोकांचा वाढत असलेला रोष आणि लष्करी बळाचा वापर करण्यावरुन सुरु असलेल्या वादामुळे दक्षिण काश्मीर परिसरात पोलीस आणि सेना हतबल झाली आहे. पोलीस आणि लष्करासमोर खूप सारी आव्हानं आहेत. हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वानीचा खात्मा केल्यापासून खो-यामधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. इतकंच नाही तर दहशतवाद विरोधी मोहिमांनाही जबर धक्का बसला आहे. 
    'लोकांच्या जमावात लपून उपस्थित राहणा-या दहशतवाद्यांची आमच्याकडे माहिती आहे. मात्र सद्यपरिस्थितीत आम्ही काहीच करु शकत नाही', असं खो-यात तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा दलांनी सांगितलं आहे. खो-यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपले सुरु असलेले प्रयत्न यशस्वी होणार नाहीत याची भीतीही त्यांना आहे. काश्मीरमध्ये मिळत असलेल्या समर्थनामुळे गेल्या काही दिवसांत दक्षिण काश्मीरमधील अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी सभा आयोजित केल्या होत्या अशी सुत्रांची माहिती आहे. 

================================================

जेठालाल, भिडेच्या तारक मेहताने ओलांडला २ हजार एपिसोडचा टप्पा



  • मुंबई, दि. ८ - 'गोकुळधाम' सोसायटी म्हणून प्रेक्षकांना माहिती असलेल्या सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उलट चष्मा' या लोकप्रिय हिंदी मालिकेने दोन हजार एपिसोडचा टप्पा पार केला आहे. त्यामुळेच आजही या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. अय्यर, सोढी, मेहता, भिडे, गडा ही कुटुंब प्रेक्षकांना आपल्यातलीच एक वाटतात. प्रेक्षकांना खळखळून हसवताना या मालिकेने नेहमीच आपले सामाजिक भान जपले आहे. 
    देशातील फक्त ही सर्वाधिक काळ चाललेली विनोदी मालिका नसून,  सर्वाधिक एपिसोड पूर्ण करणारी मालिका आहे. आज आमच्या वाहिनीवर ही मालिका सुरु आहे ही अभिमानाची बाब आहे. हा एक सुखद प्रवास आहे असे सब टीव्हीचे बिझनेस हेड अनूज कपूर यांनी सांगितले. 
    काहीशे एपिसोडचा टप्पा पार केल्यानंतर मालिकेचा वेग मंदावतो. प्रेक्षकांची रुची कमी होते. पण हजार एपिसोडचा टप्पा पार केल्यानंतरही प्रेक्षकांची या मालिकेतील रुची अजिबात कमी झालेली नाही. या मालिकेचे सुरुवातीला प्रसारीत झालेले भाग आजही प्रेक्षकांना खिळवून ठेवतात हे या मालिकेचे यश आहे. २८ जुलै २००८ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारीत झाला त्यानंतर आज आठवर्ष ही मालिका आपला प्रेक्षक टिकवून आहे. 

================================================

शिक्षकांसाठी आमदाराने नाकारली पगारवाढ



  • मुंबई, दि. ६ -  आमदारांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये घसघशीत वाढ करणारे  विधेयक शुक्रवारी विधासभेत मंजूर करण्यात आल्याने त्यांचे वेतन सुमारे दीड ते दोन लाखांच्या घरात गेले आहे. राज्यातील समस्येवर सभागृहात विविध मुद्यावर एकमेकांविरोधात आक्रमकपणे उभा राहणाऱ्या आमदारांनी आपल्या वेतन वाढीचे विधेयक मात्र, अवघ्या काही क्षणातच एकमताने मंजूर केले.  राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना आमदारांनी मात्र घसघशीत वेतनवाढ करून घेतल्याने राज्यातील नागरिकांमध्ये संतप्त वातावरण असतानाच एका आमदाराने मात्र ही पगारवाढ चक्क नाकारली आहे. रामनाथ मोते असे त्यांचे नाव असून ते शिक्षकांचा लोकप्रतिनिधी म्हणून विधीमंडळात प्रतीनिधीत्व करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून ही वेतनवाढ नाकारली आहे. 
================================================

दहशतवादी सलाहुद्दीनची भारताला आण्विक युद्धाची धमकी



  • इस्लामाबाद, दि. 8 - हिजबूल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा प्रमुख सलाहुद्दीनने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मीर मुद्यावरुन सलाहुद्दीनने भारताविरोधात आण्विक युद्धाची धमकी दिली आहे. काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वानीचा खात्मा केल्यानंतर सुरु असलेला हिंसाचार सुरु राहावा यासाठी गेले काही दिवस पाकिस्तान आणि पाकिस्तानचं समर्थन मिळालेले दहशतवादी भडकाऊ वक्तव्य करत आहेत. 
    'काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी राजकीय, नैतिक आणि राज्यघटनेने समर्थन देण्यासाठी पाकिस्तान बांधील आहे.  आणि जर पाकिस्तानने समर्थन दिलं तर दोन्ही देशांमध्ये आण्विक युद्ध होण्याची चांगली संधी आहे. काश्मीर मुद्द्यावरुन चौथे युद्ध होईल असा माझा अंदाज आहे. तसं झाल्यास काहीही झालं तरी तडजोड करणार नाही', असा दावा सलाहुद्दीनने केला आहे. 
    'पाकिस्तान किंवा जगाने पाठिंबा देवो अथवा नाही, संयुक्त राष्ट्राने त्यांचं कर्तव्य पार पाडो अथवा नाही...काश्मीरमधील जनतेने रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याकडे सशस्त्र जिहाद हाच एकमेव पर्याय आपल्याकडे आहे या निष्कर्षावर काश्मिरी जनता पोहोचली आहे', असं सलाहुद्दीन बोलला आहे.

================================================

No comments: