*[अंतरराष्ट्रीय]*
१- पाकिस्तानमधून दाऊदने दिल्या भाच्याला लग्नाच्या शुभेच्छा ?
२- पूर्व टर्कीमध्ये पोलिस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
३- सचिन तेंडुलकरने उस्मानाबादमधील गाव घेतलं दत्तक
४- बस कंडक्टरच्या मुलीने मिळवून दिलं ऑलिम्पिक पदक
५- स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतिदिन
६- काश्मीरमध्ये 60 दहशतवाद्यांची घुसखोरी
७- जवानांनी शत्रूचे प्राण घेऊन देशाची रक्षा करावी - उमा भरती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
८- मुंबईत सोने, चांदी व हिऱ्यांच्या ५० बॅग हस्तगत !
९- राज यांचा पुन्हा मराठी ‘राग’
१०- बेपत्ता महिला पोलिसाचा मृतदेह ठाण्यात
११- ८ तासांत वृद्धेसह चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न
१२- रणथंबोरची राणी 'मछली' वाघीणीचा मृत्यू
१३- रायगड - उरण येथे नौदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१४- कोल्हापूर; किडनी देऊन बहिणीने दिले भावाला जीवनदान
१५- बंगळूरू; कंपनीच्या एमडीने 'बर्थ डे' गिफ्टमध्ये मागितले 'सेक्स'
१६- वाशीम; शेतात शौचाला गेल्यास अपमान होईल - शेतक-याने लावला जाहीर फलक
१७- मुंबई : मिलन सबवेजवळ कारचा भीषण अपघात, ५ ठार
१८- हिरानंदानी रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांना जामिन मंजूर
१९- शिमला येथे घर कोसळून दोघांचा मृत्यू तर पाच जखमी
२०- मुखेड (नांदेड) : वसतिगृहात बोगस विद्यार्थी दाखवून अनुदान लाटले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२१- आँखे 2 चित्रपटाची 'झकास' स्टारकास्ट, अमिताभ आणि अनिल कपूर एकत्र
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
==========================================

बस कंडक्टरच्या मुलीने मिळवून दिलं ऑलिम्पिक पदक
- - ऑनलाइन लोकमतरिओ दी जानेरो, दि. 18 - रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवत 125 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याचं तिकीट देणा-या पैलवान साक्षी मलिकचे वडील दिल्लीत बस कंडक्टर आहेत. ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत कोणत्याही महिला पैलवानाने पदक जिंकलेलं नाही. साक्षी मलिक पदक जिंकणारी पहिलीची भारतीय महिला पैलवान ठरली आहे. सोबतच साक्षी मलिकचं पदक भारताचं कुस्तीतलं पाचवं पदक ठरलं आहे. पण अनेकांना माहित नसेल की, साक्षी मलिक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे.साक्षी मलिक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी असून तिचे वडील सुखबीर मलिक दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये (डीटीसी) कंडक्टरची नोकरी करतात. तर साक्षीची आई सुदेश मलिक या रोहतक येथे अंगणवाडी सुपरवाझर आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल पण कांस्यपदक जिंकणा-या साक्षीला तिच्या आईने पैलवानी करण्यापासून विरोध केला होता. साक्षीने पैलवान होऊ नये अशी तिच्या आईची इच्छा होती. पैलवानाची बुद्धीमत्ता कमी असते, तिथे बुद्धीचा वापर होत नाही अशी त्यांची समजूत असल्याने त्यांनी हा विरोध केला होता.
- ==========================================
किडनी देऊन बहिणीने दिले भावाला जीवनदान
- सतीश नांगरेशित्तूर वारूण (जि. कोल्हापूर) --बहीण-भावाच्या नात्यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक कथा आपण आजवर कथा-कादंबऱ्या, नाटिका, चित्रपटाच्या माध्यमातून वाचल्या-ऐकल्या अन् पाहिल्याही. अशीच बहीण-भावाच्या नाते-संबंधातील पैलू उलगडणारी एक प्रेरणादायी गोष्ट घडली आहे. लष्करात जवान असलेल्या भावाला किडनी देऊन बहिणीने जीवनदान दिले आहे. भाऊ सुभाष माने आणि बहीण प्रेमाताई प्रकाश माने यांच्या अनोख्या नात्याची ही कहाणी आहे.सुभाष महिपती माने हे खुजगाव (ता. शिराळा, जि. सांगली) या गावचे आहेत. आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा त्यांचा परिवार. त्यांना एक मुलगा आहे. वयाच्या २१ व्या वर्षी ते भारतीय सैन्यदलामध्ये दाखल झाले. गेली १४ वर्षे ते भारतीय सैन्यदलामध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत. सध्या ते युनिट ८ महार सिक्कीम येथे कार्यरत असून, ३१ डिसेंबर २०१५ ला केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे कळले. किडनी प्रत्यारोपण करणे गरजेचे असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.अशावेळी त्यांची बहीण प्रेमाताई या आपल्या भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. अर्थात त्यांना हे बळ दिले ते त्यांच्या पतीने. कारण अवयवदान किंवा किडनीदानविषयी समाजामध्ये अजूनही कितीतरी गैरसमज असताना किडनी दानाचे धाडस करणे ही गोष्ट सोपी नव्हे. शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथील प्रकाश तुकाराम माने यांच्याशी प्रेमाताई यांचा सतरा वर्षांपूर्वी विवाह झाला. प्रेमाताई यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालेलं आहे. सध्या त्यांचे वय ३० वर्षे असून, या दाम्पत्यास दोन मुले आहेत. मुलगा आठवीत, तर मुलगी सहावीत शिकते. प्रकाश यांना शेती अगदी नावापुरतीच आहे. त्यांचा फूटवेअरचा व्यवसाय असला तरी घरची परिस्थिती तशी साधारणच आहे.
- ==========================================
सचिन तेंडुलकरने उस्मानाबादमधील गाव घेतलं दत्तक
- परंडा, दि. 18 - साधारणपणे पाच हजार लोकसंख्या असलेल्या डोंजा या गावाचे येणाऱ्या काळात रूपडे बदलणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. एकेकाळी आपल्या धडाकेबाज खेळीने क्रिकेटचे मैदान गाजविलेल्या खासदार सचिन तेंडुलकरने सासंद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत हे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे डोंजा ग्रामस्थांच्या आशा उंचावल्या आहेत.केंद्र शासनाच्या वतीने सांसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे. सदरील योजनेअंतर्गत खासदारांनी एकेक गाव दत्तक घेवून संबंधित गावाचा चौफेर विकास करणे अपेक्षित आहे. सदरील योजनेअंर्तत क्रिकेटचा देव आणि सध्या खासदार असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी यापूर्वी म्हणजेच पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील गाव दत्तक घेतले होते. आंध्र प्रदेशातील गाव दत्तक घेतल्याने अनेकांनी टीका करून महाराष्ट्रातील गाव दत्तक घेण्याबाबत सूचित केले होते.
- ==========================================
कंपनीच्या एमडीने 'बर्थ डे' गिफ्टमध्ये मागितले 'सेक्स'
- ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. १८ - 'बर्थ डे' गिफ्ट म्हणून कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाने महिला सीईओकडे सेक्सची मागणी केल्याची घटना बंगळुरुमध्ये समोर आली आहे. पीड़ित महिला हेल्थकेअर कंपनीची सीईओ असून, आरोपी ब्राईस जॉन कंपनीचा एमडी आहे. बंगळुरुच्या बीटीएम सेकंड स्टेज रोडवर या कंपनीचे कार्यालय आहे.बर्थ डे गिफ्ट म्हणून संपूर्ण दिवस रुममध्ये घालवण्याचा प्रस्ताव ब्राईसने माझ्यासमोर ठेवला. त्याने मला विवस्त्र करण्याची धमकीही दिली तसेच कार्यालय आणि लिफ्टमध्ये मला अत्यंत वाईट वागणूक दिली असा पीडित महिलेने आरोप केला आहे. तिने आरोपी विरोधात बोमानाहाली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला.मी कामावर रुजू झाल्यापासून लैंगिक सुखासाठी ब्राईसने आपला छळ चालवला होता असे तिने तक्रारीत म्हटले आहे. ब्राईसने अनेकदा मला अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला ज्यावर मी आक्षेप घेतला. हेल्थकेअर कंपनीत पीडित महिलेचीही गुंतवणूक आहे.
- ==========================================
शेतात शौचाला गेल्यास अपमान होईल - शेतक-याने लावला जाहीर फलक
- ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. १८ - स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत शासनाच्यावतीने शौचालयाबाबत जनजागृती करुन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात असतानाही काही गावांतील नागरिक आजही उघडयावर शौचास जात आहे. रिसोड तालुक्यातील हराळ येथील एका शेतक-याने तर चक्क कंटाळून शेतासमोर ‘ शौचाला पुढे जावू नये अपमान होईल’ असे फलकच लावून दिले आहे. या फलकाची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमाव्दारे एकीकडे जिल्हयात उघडयावर शौचास बसू नये याकरीता उपाय योजना, जनजागृती पर्यायी दंड सुध्दा आकारण्यात येत आहे. एवढे करुन सुध्दा काही गावातील नागरिक याला बगल देत आपली दिनचर्या उघडयावर उरकत आहेत. रिसोड तालुक्यातील हराळ येथील एका शेतकºयाचे शेत गावानजिक असल्याने अनेकजण त्यांच्या शेताकडे शौचास जातात. वारंवार सांगूनही कोणीच ऐकत नसल्याने अखेर त्या शेतकºयाने चकक एका झाडावर फलक लावून एकप्रकारे अपमान करण्याचा इशाराचं दिला आहे. जिल्हा परिषदेच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या मोहीमेंतर्गंत या गावाला भेट देवून जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
- ==========================================
No comments:
Post a Comment