Friday, 19 August 2016

नमस्कार लाईव्ह १९-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- अमेरिकेतील पार्कमध्ये 'न्यूड' डोनाल्ड ट्रम्प पाहण्यासाठी गर्दी 
२- हॉकिंग यांच्या सिद्धान्ताचे प्रयोगशाळेत निरीक्षण 
३- बांगलादेशमध्ये इस्लमिक धर्मगुरु झाकीर नाईकची भाषणं दाखवण्यावर  बंदी  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
४- पैलवान साक्षी मलिकला खेलरत्न पुरस्कारानं गौरवणार! 
५- भगवान सहाय यांचं आणखी एक संतापजनक कृत्य 
६- SBIच्या सहयोगी बँका, भारतीय महिला बँकेची विलिनीकरण प्रक्रिया सुरु 
७- देशासाठी पदक मिळवायचं स्वप्न निर्दयपणे हिसकावण्यात आलं - नरसिंग यादव 
८- परराष्ट्र मंत्र्यांमुळे ५ महिन्याच्या बालकाची झाली पित्याशी भेट.. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
९- नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल 
१०- विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची धरपकड 
११- शासकीय आयटीआयला अच्छे दिन! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१२- नाशिक; रंगलेल्या बर्थ डे पार्टीत थरार, बायको आणि तिच्या मित्रावर गोळीबार! 
१३- वसई; प्रेमप्रकरण मुलांचं, मुलीच्या वडिलांकडून मुलाच्या वडिलाची हत्या 
१४- वसईतील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा अखेर उलगडा 
१५- उस्मानाबाद; खड्ड्यांमुळे अर्भक गर्भातच दगावलं, कुटुंबीयांचा आरोप 
१६- पुण्यात मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या अटकेसाठी स्थानिकांचा मोर्चा 
१७- कासारवाडी;  दीड वर्षाच्या बालकाचा गिझरचा शाॅक लागून मृत्यू 
१८- बिहारमधील गोपालगंज येथे विषारी दारू प्यायल्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी १५ पोलीस कर्मचारी निलंबित. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
१९- पैलवान नरसिंह यादववर चार वर्षाची बंदी, ऑलिम्पिकचं स्वप्नं भंगलं 
२०- भारताचं आणखी एक पदक निश्चित, पीव्ही सिंधू फायनलमध्ये 
२१- ऑलिम्पिकमध्ये बोल्टनं रचला इतिहास, 200 मी. शर्यतीत सुवर्णपदक 
२२- पीव्ही सिंधू फायनलमध्ये, महानायकाचा शोभा डेंना टोला 
२३- ऑलिम्पिक महिला कुस्तीत भारताला धक्का, बबिताकुमारी पराभूत 
२४- माझा कट्टा : शोभा डेंच्या त्या ट्विटबाबत आमीर म्हणतो... 
२५- वीरुच्या ट्वीटचा धुमाकूळ, बिग बींचीही दाद 
२६- सोशल मीडियावर कांस्यपदक विजेत्या साक्षीच्या साथीने रक्षाबंधन व्हायरल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

================================

पैलवान नरसिंह यादववर चार वर्षाची बंदी, ऑलिम्पिकचं स्वप्नं भंगलं

पैलवान नरसिंह यादववर चार वर्षाची बंदी, ऑलिम्पिकचं स्वप्नं भंगलं
रिओ दी जेनेरिओ: भारताचा पैलवान नरसिंग यादवचं रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न अखेर भंगलं आहे. कारण क्रीडा लवादानं नरसिंग यादववर चार वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळं नरसिंग यादव ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही.

उत्तेजक सेवनप्रकरणी नरसिंगला नॅशलन अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं क्लीनचिट दिली होती. पण नाडाच्या या निर्णयाचा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडानं विरोध केला. वाडानं नाडाच्या त्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे अपील केलं होतं. अखेर चार तासांच्या चर्चेनंतर क्रीडा लवादानं नरसिंगला चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली.

25 जून आणि 5 जुलै रोजी झालेल्या तपासणीत नरसिंगच्या नमुन्यांत मेटँडिएनोन या स्टेरॉईडचा अंश आढळून आला होता. नरसिंगनं मात्र त्याच्या खाण्यात काहीतरी मिसळण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाडानं नरसिंग यादवला क्लीनचिट दिली होती. पण आपल्याविरोधात कट रचल्याचं नरसिंग यादव क्रीडा लवादासमोर सिद्ध करु शकला नाही. त्यामुळं नरसिंग यावर बंदीची कारवाई करण्यात आली.
================================

रंगलेल्या बर्थ डे पार्टीत थरार, बायको आणि तिच्या मित्रावर गोळीबार!

रंगलेल्या बर्थ डे पार्टीत थरार, बायको आणि तिच्या मित्रावर गोळीबार!
नाशिक: नाशिकमध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. नवऱ्याने बायकोवर आणि तिच्या मित्रावर गोळीबार केल्याची घटना, काल रात्री पाथर्डी फाट्याजवळ म्हाडा कॉलनीत घडली.

दीपक परदेशी असं आरोपीचं नाव असून, कोमल परदेशी आणि नागेश्वर ठाकूर असं गोळीबारात जखमी झालेल्यांची नावं आहेत. काल रात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

काय आहे प्रकरण?
साई रो हाऊसमध्ये दीपक परदेशीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टी ऐन रंगात आली असतानाच, वादावादीला सुरुवात झाली. या वादाचं रुपांतर गोळीबारात झालं. दीपकने त्याची बायको कोमल आणि तिचा मित्र नागेश्वर ठाकूरवर गोळ्या झाडल्या. यामध्ये ते दोघेही जखमी झाले.

गोळीबारानंतर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

================================

प्रेमप्रकरण मुलांचं, मुलीच्या वडिलांकडून मुलाच्या वडिलाची हत्या

प्रेमप्रकरण मुलांचं, मुलीच्या वडिलांकडून मुलाच्या वडिलाची हत्या
मुंबई: प्रेमप्रकरणातून मुलाची किंवा मुलीची हत्या झाल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. मात्र मुलीच्या वडिलांने मुलाच्या वडिलांची हत्या केल्याचा प्रकार वसईत घडला आहे.

काय आहे प्रकरण?
वाकोल्यात राहणाऱ्या महेंद्र सिंह यांच्या मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं. महेंद्र सिंह हे मूळचे बिहारचे. त्यांच्या मुलाचं बिहारमध्ये सिंह यांच्या परिसरातच राहणाऱ्या मुलीवर प्रेम होतं. या प्रेमप्रकरणातून मुलगी आणि सिंह यांचा मुलगा दोघेही विरारला पळून आले होते.

मात्र मुलगी पळून गेल्याचं कळताच, तिच्या वडिलांनी थेट मुंबई गाठून महेंद्र सिंह यांच्या घराकडे धाव घेतली. महेंद्र सिंह यांच्याकडे त्यांनी जाब विचारुन, मुलगी कुठे आहे याबाबत विचारणा केली. मात्र तिचा पत्ता न सांगितल्याने चिडलेल्या मुलीच्या वडिलाने महेंद्र सिंह यांना काहीतरी बहाणा करुन चिंचोटी परिसरात नेलं. तिथे त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली.  हा सर्व थरार 26 एप्रिलला घडला होता.
================================

वसईतील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा अखेर उलगडा

वसईतील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा अखेर उलगडा
वसई (पालघर) : वसईतील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा छडा अखेर वालीव पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मनिष यादव 23 वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे. वसईच्या विद्याविकास शाळेच्या आवारात 3 जुलै रोजी मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलीचे आपल्याच मित्राशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे.

3 जुलै रोजी अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोलिसांना शाळेचा आवारात सापडला होता. तिचं आरोपी मनिष यादववर प्रेम होतं. मात्र ती आपल्याच मित्रांसोबत बोलत असल्याने, दोघांचं अफेअर असल्याचा संशय मनिषला आला. त्याच रागातून त्याने प्रेयसीची हत्या केली.
================================

खड्ड्यांमुळे अर्भक गर्भातच दगावलं, कुटुंबीयांचा आरोप

खड्ड्यांमुळे अर्भक गर्भातच दगावलं, कुटुंबीयांचा आरोप
उस्मानाबाद: उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातल्या बोरवंटी ते मंगरुळ पाटी दरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांनं घात केला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महिलेच्या गर्भातच अर्भक दगावल्याचा आरोप कळंबमधील एका महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सध्या या महिलेवर अंबाजोगाई रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे. दरम्यान, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेच आपल्या बाळाला गमवावं लागल्याचं महिलेच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

दरम्यान, याप्रकरणी कळंबच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला साधारण 25 वर्षाची आहे. 108 रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं महिलेला रुग्णालयात पोहचण्यास वेळ झाला. हे मुख्य कारण असावं. पण रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता आहे. सध्या ही महिला गंभीर आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईसह राज्यभर रस्त्यांवरील खड्ड्यांनं नागरिक हैराण झाले आहे. खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र, आता खड्ड्यांमुळे गर्भाशयातील अर्भकच गमवावं लागल्याची घटना समोर येत आहे.
================================

पुण्यात मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या अटकेसाठी स्थानिकांचा मोर्चा

पुण्यात मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या अटकेसाठी स्थानिकांचा मोर्चा
पुणे : पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करा, या मागणीसाठी स्थानिकांनी मोर्चा काढला. वारजे माळवाडीमधील गोकुळनगर पठार परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना काल संध्याकाळी साडेचार वाजता घडली होती.

घरात शौचालय नसल्याने पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीला घेऊन घराजवळील झुडपात गेली होती. त्यावेळी अज्ञाताने मागून येऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. पीडित मुलगी 14 वर्षांची असून ती शालेय शिक्षण घेत आहेत.

पीडित मुलीवर वारजे माळवाडीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षत अनुजा देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वारजे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
================================

भारताचं आणखी एक पदक निश्चित, पीव्ही सिंधू फायनलमध्ये

भारताचं आणखी एक पदक निश्चित, पीव्ही सिंधू फायनलमध्ये
रिओ दी जनैरो : देशाच्या आणखी एका लेकीने भारताची झोळी पदकाने भरली आहे. पैलवान साक्षी मलिकपाठोपाठ आता बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनेही भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं आहे.

पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या बॅडमिंटन फायनलमध्ये धडक मारणारी सिंधू ही पहिली भारतीय आहे.

सिंधूच्या या कामगिरीमुळे या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आता एक सुवर्ण किंवा एक रौप्यपदक जमा होणार हे निश्चित झालं आहे. बॅडमिंटनमधलं भारताचं हे दुसरं पदक आहे. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालनं कांस्यपदकाची कमाई केली होती.

उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-10 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या या विजयासह भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं.

================================

ऑलिम्पिकमध्ये बोल्टनं रचला इतिहास, 200 मी. शर्यतीत सुवर्णपदक

ऑलिम्पिकमध्ये बोल्टनं रचला इतिहास, 200 मी. शर्यतीत सुवर्णपदक
(AP Photo/Matt Slocum)
जमैका: जमैकन धावपटून उसेन बोल्टनं आपणच वेगाचा बादशाह असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. बोल्टनं सलग तिसऱ्यांदा 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. बोल्टनं 19.78 सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

बोल्टचं यंदाचं दुसरं, तर ऑलिम्पिकमधलं हे आजवरचं आठवं सुवर्णपदक ठरलं. बोल्टनं याआधी 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं आहे. 2008 साली बीजिंगमध्ये आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर्स, 200 मीटर्स आणि फोर बाय हंड्रेड मीटर्स रिलेमध्ये सुवर्णपदकं मिळवली होती.

बोल्ट आता रिओमध्येही 100 आणि 200 मीटरपाठोपाठ फोर बाय हंड्रेड मीटर रिलेतही सुवर्णपदकासाठी प्रयत्न करणार आहे.

================================

पैलवान साक्षी मलिकला खेलरत्न पुरस्कारानं गौरवणार!

पैलवान साक्षी मलिकला खेलरत्न पुरस्कारानं गौरवणार!
रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेली भारताची महिला पैलवान साक्षी मलिकला खेलरत्न हा देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळणार हे निश्चित झालं आहे.

ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूला त्याच वर्षी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळं साक्षी मलिक थेट खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीत दाखल झाली आहे.

साक्षीला आजवरच्या कारकीर्दीत अजूनही अर्जुन क्रीडा पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं नाही. पण केंद्र सरकारचा धोरणात्मक निर्णय लक्षात घेता साक्षी आता थेट खेलरत्न पुरस्काराची मानकरी ठरणार आहे.

दरम्यान, रिओ ऑलिम्पिकमध्येच चौथ्या स्थानावर आलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि एअर पिस्टलच्या फायनलमध्ये धडक मारणारा नेमबाज जीतू राय यांच्या नावांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

================================

पीव्ही सिंधू फायनलमध्ये, महानायकाचा शोभा डेंना टोला

पीव्ही सिंधू फायनलमध्ये, महानायकाचा शोभा डेंना टोला
मुंबई: रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूने धडाकेबाज कामगिरी करुन विजय मिळवल्यानंतर, तिच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून क्रीडा तसेच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी सिंधूचे अभिनंदन केले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही पीव्ही सिंधूचे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन करताना, शोभा डे यांना टोला लगावला आहे.

प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटरवरुन रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडू केवळ सेल्फी काढण्यासाठी जातात, असे ट्वीट केले होते. त्यावर अमिताभ बच्चन यांनी अप्रत्यक्ष टोलेबाजी केली आहे.

आजच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूने विजय मिळवल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी, पीव्ही सिंधू तू रिकाम्या हाती नव्हे तर पदक जिंकूनच मायदेशी परतणार आहेस. आम्ही तुझ्यासोबत ‘सेल्फी’ काढण्यास उत्सुक आहोत, असे ट्वीट बिग बी यांनी केलं आहे.
================================

नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल

नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल
मुंबई : काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार नारायण राणे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नियमित तपासणीसाठी राणेंना रुग्णालयात दाखल केल्याचं समजतं.

या तपासणीत नारायण राणे यांच्या काही चाचण्या केल्या जातील. त्यांनतर त्यांना अॅडमिट करायचं की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल.

================================

भगवान सहाय यांचं आणखी एक संतापजनक कृत्य

भगवान सहाय यांचं आणखी एक संतापजनक कृत्य
मुंबई : कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय से बचाओ, असं म्हणण्याची वेळ सध्या कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांवर आली आहे. कारण मुलाच्या नैराश्याचं कारण दिल्यानंतरही सुट्टी नाकारणाऱ्या सहाय यांनी आणखी एक चीड आणणारा प्रकार केला आहे. मुलाच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या घाडगे यांच्या रजेचा अर्ज कोठे आहे? असा शेरा भगवान सहाय यांनी मारला आहे. त्यामुळे सहाय यांना तातडीने निलंबित करावं अशी मागणी कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सांत्वन नाहीच, उलट शेरा मारला!
मुलाच्या अंत्यविधीला गेलेले राजेंद्र घाडगे कामावर आले नाहीत म्हणून त्यांच्या सहाय्यकाने 16 ऑगस्ट रोजी भगवान सहाय यांना अर्ज पाठवला होता. परंतु घाडगे यांचं सांत्वन करणं दूरच, सहाय यांनी अर्जावर रजेचा अर्ज कोठे आहे?, असा शेरा मारला.

================================

SBIच्या सहयोगी बँका, भारतीय महिला बँकेची विलिनीकरण प्रक्रिया सुरु

SBIच्या सहयोगी बँका, भारतीय महिला बँकेची विलिनीकरण प्रक्रिया सुरु
नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँकेने आपल्या सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेसोबतच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला औपचारिक स्वरूपात मंजूरी दिली आहे. याशिवाय शेअर्सच्या अदालाबदलीचे प्रमाणही निश्चित करण्यात आले आहे.

गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच या बँकांच्या शेअर्सच्या आदलाबदलीचे प्रमाणही निश्चित करण्यात आले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅन्ड जयपूरचे 10 शेअरच्या बदल्यात स्टेट बँकेचे 28 शेअर मिळणार आहेत.

स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या 10 शेअरच्या बदल्यात स्टेट बँकेचे 22 शेअर मिळतील.
================================

ऑलिम्पिक महिला कुस्तीत भारताला धक्का, बबिताकुमारी पराभूत

ऑलिम्पिक महिला कुस्तीत भारताला धक्का, बबिताकुमारी पराभूत
रिओ दी जनैरो : रिओ ऑलिम्पिकमधल्या महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीत भारताच्या बबिताकुमारीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. बबिताकुमारीला या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

53 किलो वजनी गटाच्या लढतीत ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मारियाने बबितावर 5-1 असा विजय मिळवला. त्यामुळे बबिताकुमारीची सुवर्ण किंवा रौप्यपदकासाठी खेळण्याची संधी हुकली.

त्यानंतर मारिया प्रेवोलाराकीनं फायनल गाठण्याची कामगिरी बजावली तर बबिता रिपेचाजमधून ब्राँझपदकासाठी खेळण्याची संधी लाभणार होती. पण मारियाला व्हेनेझुएलाच्या पैलवानाकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. मारियाच्या पराभवासह बबिताचं रिओ ऑलिम्पिकमधलं आव्हान संपुष्टात आलं.

================================

माझा कट्टा : शोभा डेंच्या त्या ट्विटबाबत आमीर म्हणतो...

माझा कट्टा : शोभा डेंच्या त्या ट्विटबाबत आमीर म्हणतो...
मुंबई : इतर देश खेळात पुढे आहेत ते ठिक आहे, पण आम्हीही पुढे जाऊ. भारताचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी खूप कष्ट घेत आहेत. लेखिका शोभा डे यांनी खेळाडूंविषयी केलेलं ट्विट किंवा त्यांच्या मताशी मी सहमत नाही, असं बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान म्हणाला.

आमीर खान आणि सत्यजीत भटकळ यांनी पाणी फौंडेशनच्या कार्याची माहिती ‘माझा कट्टा’वरुन दिली.

यावेळी आमीरला ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आलं. तसंच लेखिका शोभा डे यांनी केलेल्या ट्विटबाबतही प्रतिक्रिया विचारण्यात आली.

शोभा डेंबाबत मी काय बोलू
आमीर म्हणाला, “सोशल मीडियावर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. मात्र भारताचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी खूप कष्ट घेत आहेत. अनेक वर्षांची मेहनत त्यांना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवते. ऑलिम्पिकसाठी पात्र होणं हेच आमच्यासाठी मोठं आहे. हार-जीत तर होत राहते. त्यामुळे शोभा डे यांच्या मताशी मी सहमत नाही. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार”.

================================

वीरुच्या ट्वीटचा धुमाकूळ, बिग बींचीही दाद

वीरुच्या ट्वीटचा धुमाकूळ, बिग बींचीही दाद
मुंबई : टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग आता क्रिकेटच्या मैदानावर नाही तर सोशल मीडियावर तुफान फटकेबाजी करत आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून साक्षी मलिक ही पहिली महिला पैलवान ठरली आहे. साक्षीच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागने शोभा डे यांचा त्याच्या खास शैलीत समाचार घेतला.

शोभा डेंचं ट्वीट
शोभा डे यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची थट्टा उडवली होती. ट्विटरवरुन शोभा डे यांनी भारतीय पथकावर निशाणा साधला होता. भारतीय पथकाचं एकच लक्ष आहे, रिओला जा, सेल्फी काढा आणि रिकाम्या हाती परत या. पैसा आणि संधी वाया घालवा अशा प्रकारचा ट्वीट शोभा डे यांनी केलं होतं. त्यावरुन शोभा डे यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता.
================================

No comments: