[अंतरराष्ट्रीय]
१- हॉकिंग यांच्या सिद्धान्ताचे प्रयोगशाळेत निरीक्षण
२- बलुचिस्तानवर बोलून मोदींनी धोक्याची सीमारेषा ओलांडली- पाकिस्तान
३- तुर्कस्थानमध्ये कारबॉम्बचा स्फोट, 3 जणांचा मृत्यू, 120हून अधिक जखमी
४- देशात 2020 पर्यंत 73 कोटी इंटरनेट यूझर्स, चीननंतर भारताचा नंबर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- 'शोभा डें'ना उत्तर देण्यासाठी अमिताभ काढणार सिंधूसोबत सेल्फी
६- सुरेश प्रभूसाहेब, तुमच्यापेक्षा लालूप्रसाद यादव परवडले की हो!
७- सुट्टी नाकारणाऱ्या भगवान सहाय यांना सक्तीची रजा?
८- डॉ. संतोष पोळला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
९- विजय मल्ल्यांच्या सहा हजार कोटींच्या संपत्तीवर ईडी टाच आणणार?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- वाई हत्याकांड - आरोपी संतोष पोळकडून पोलिसांना 'ग्रँड सॅल्यूट'
११- टिटवाळ्यातील बाप्पा निघाले सातासमुद्र पल्याड
१२- मुंबई : आ. विष्णू वाघ यांची प्रकृती चिंताजनक
१३- टेमघर गळती: 'महाजनांकडून अविनाश भोसलेंना वाचवण्याचा प्रयत्न'
१४- दहीहंडी मुद्यावर कोर्टाच्या निर्णयाविरोधात जाण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
१५- राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर गोळीबार
१६- काश्मीरमधील दहशतवाद्यांशी लढण्यासाठी चिमुरडा घरातून पळाला
१७- पनवेलमध्ये 2 कोटींचा दारूचा साठा जप्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- जळगावात 'नायक'ची प्रचिती, बारावीची विद्यार्थिनी 1 दिवस सरपंचपदी!
१९- अकोला; म्हणून चोरट्यांनी भिंतीवर लिहिलं, 'चुकीबद्दल माफ करा, सॉरी, आय लव्ह यू'
२०- नाशिक; इगतपुरीत चिमुरड्याचे पुरलेले अवशेष सापडले, नरबळीचा संशय
२१- नांदेड- जुन्या भांडणातून नांदेड शहरात गोळीबार
२२- छत्तीसगड - कोडगाव जिल्ह्यात नऊ नक्षलवाद्यांनी केलं पोलिसांसमोर आत्मसमर्पण
२३- मुंबईत भरधाव होंडा सिटी कार झाडावर आदळून चौघांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- देशासाठी पदक मिळवायचं स्वप्न निर्दयपणे हिसकावण्यात आलं - नरसिंग यादव
२५- ‘सुवर्ण’खेळीसाठी सिंधूला देशभरातून शुभेच्छा, सामन्याची वेळ बदलली
२६- सरावासाठी दररोज 56 किमी प्रवास, पीव्ही सिंधूच्या जिद्दीची कहाणी
२७- रिओ - गोल्फमध्ये अदिती अशोककडून पदकाची आशा
२८- ट्रोल करणा-या 'त्या' चाहत्याला सायनाने केले 'स्मॅश'...
२९- पदक जिंकल्यानंतर सगळं जग सुंदर वाटतं आहे: साक्षी मलिक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================








१- हॉकिंग यांच्या सिद्धान्ताचे प्रयोगशाळेत निरीक्षण
२- बलुचिस्तानवर बोलून मोदींनी धोक्याची सीमारेषा ओलांडली- पाकिस्तान
३- तुर्कस्थानमध्ये कारबॉम्बचा स्फोट, 3 जणांचा मृत्यू, 120हून अधिक जखमी
४- देशात 2020 पर्यंत 73 कोटी इंटरनेट यूझर्स, चीननंतर भारताचा नंबर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- 'शोभा डें'ना उत्तर देण्यासाठी अमिताभ काढणार सिंधूसोबत सेल्फी
६- सुरेश प्रभूसाहेब, तुमच्यापेक्षा लालूप्रसाद यादव परवडले की हो!
७- सुट्टी नाकारणाऱ्या भगवान सहाय यांना सक्तीची रजा?
८- डॉ. संतोष पोळला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
९- विजय मल्ल्यांच्या सहा हजार कोटींच्या संपत्तीवर ईडी टाच आणणार?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- वाई हत्याकांड - आरोपी संतोष पोळकडून पोलिसांना 'ग्रँड सॅल्यूट'
११- टिटवाळ्यातील बाप्पा निघाले सातासमुद्र पल्याड
१२- मुंबई : आ. विष्णू वाघ यांची प्रकृती चिंताजनक
१३- टेमघर गळती: 'महाजनांकडून अविनाश भोसलेंना वाचवण्याचा प्रयत्न'
१४- दहीहंडी मुद्यावर कोर्टाच्या निर्णयाविरोधात जाण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
१५- राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर गोळीबार
१६- काश्मीरमधील दहशतवाद्यांशी लढण्यासाठी चिमुरडा घरातून पळाला
१७- पनवेलमध्ये 2 कोटींचा दारूचा साठा जप्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- जळगावात 'नायक'ची प्रचिती, बारावीची विद्यार्थिनी 1 दिवस सरपंचपदी!
१९- अकोला; म्हणून चोरट्यांनी भिंतीवर लिहिलं, 'चुकीबद्दल माफ करा, सॉरी, आय लव्ह यू'
२०- नाशिक; इगतपुरीत चिमुरड्याचे पुरलेले अवशेष सापडले, नरबळीचा संशय
२१- नांदेड- जुन्या भांडणातून नांदेड शहरात गोळीबार
२२- छत्तीसगड - कोडगाव जिल्ह्यात नऊ नक्षलवाद्यांनी केलं पोलिसांसमोर आत्मसमर्पण
२३- मुंबईत भरधाव होंडा सिटी कार झाडावर आदळून चौघांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- देशासाठी पदक मिळवायचं स्वप्न निर्दयपणे हिसकावण्यात आलं - नरसिंग यादव
२५- ‘सुवर्ण’खेळीसाठी सिंधूला देशभरातून शुभेच्छा, सामन्याची वेळ बदलली
२६- सरावासाठी दररोज 56 किमी प्रवास, पीव्ही सिंधूच्या जिद्दीची कहाणी
२७- रिओ - गोल्फमध्ये अदिती अशोककडून पदकाची आशा
२८- ट्रोल करणा-या 'त्या' चाहत्याला सायनाने केले 'स्मॅश'...
२९- पदक जिंकल्यानंतर सगळं जग सुंदर वाटतं आहे: साक्षी मलिक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================
वाई हत्याकांड - आरोपी संतोष पोळकडून पोलिसांना 'ग्रँड सॅल्यूट'
- सातारा, दि. 19 - एकापाठोपाठ तब्बल सहाजणांची निर्घृण हत्या करणा-या आरोपी डॉक्टर संतोष पोळला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. त्याने पोलिसांसमोर आपण केलेल्या गुन्ह्यांची कबुलीदेखील दिली आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी पळवाटा शोधत असतात. मात्र आरोपी संतोष पोळने आपल्याला जेरबंद करणा-या पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. पोलिसांना पत्राद्वारे त्यांने अभिनंदन केलं असून पोलीसदेखील आश्चर्य व्यक्त करत आहेत.पोलीस अधीक्षक संदीप पाटील स्वतः चौकशीसाठी गेले असताना संतोष पोळनं त्यांच्याकडे हे पत्र सोपवलं. यामध्ये त्याने पोलीस अधीक्षकांना ग्रॅड सॅल्युट केला आहे. संतोष पोळने लिहिलेल्या पत्रात ' हे सर्व का केलं अस जर तुम्ही विचारलत...तर हा प्रश्न तुमच्याच पोलीस खात्यातील भ्रष्ट अधिका-यांना आणि मुर्दाड समाजाला विचारण्याची गरज आहे', असं म्हटलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि वाई पोलीस ठाण्याचे प्रमुख विश्वास वेताळ यांनी हा गुन्ह्याचा छडा लावल्याचंही पोळ याने लिहिलं आहे. पोळने पत्रात विश्वास वेताळ यांचं कौतुकही केलं आहे.
======================================
'शोभा डें'ना उत्तर देण्यासाठी अमिताभ काढणार सिंधूसोबत सेल्फी
- मुंबई, दि. 19 - रिओ ऑलिम्पिकमध्ये जपानच्या ओकुहारा नोझोमीवर पराभव करत सिंधूने भारतासाठी पदक निश्चित केले आहे. अंतिम सामन्यासाठी तिला देशभरातून शुभेच्छा मिळत आहेत, सोबतच कौतुकाचादेखील वर्षाव होत आहे. यावेळी खेळाडूंवर टीका करणा-या शोभा डे यांच्यावर सोशल मीडियावरुन टीकेचा सूर उमटला आहे. बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चनदेखील यामध्ये मागे नाहीत. त्यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून पी व्ही सिंधूचं कौतूक करत शोभा डे यांना चांगलाच टोमणा मारला आहे.'तुम्ही मोकळ्या हाती नाही, पदक घेऊन परत येत आहात...आणि आम्हाला तुमच्यासोबत 'सेल्फी' काढायची इच्छा आहे', असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. अमिताभ यांनी शोभा डेंना उद्धेशून सेल्फीचा उल्लेख केला आहे हे स्पष्ट आहे. कारण काही दिवसांपुर्वी शोभा डे यांनी 'भारतीय संघाचं केवळ एकच लक्ष्य आहे. रिओला जा, सेल्फी काढा आणि खाली हात परत या. हा संधी आणि पैशांचा अपव्यय आहे', असं ट्विट केलं होतं.
======================================
देशासाठी पदक मिळवायचं स्वप्न निर्दयपणे हिसकावण्यात आलं - नरसिंग यादव
- नवी दिल्ली, दि. १९ - भारताचा मल्ल नरसिंग यादवचा पहिला सामना काही तासांवर येऊ ठेपला असताना क्रीडा लवादाने त्याच्यावर ४ वर्षांची बंदी घालून त्याचे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या स्वप्नांवर विरजण घातले आहे. ' देशासाठी पदक मिळवण्याचं माझं स्वप्नं होतं, पण ते निर्दयीपणे हिसकावण्यात आलं' अशा शब्दांत उद्विग्न नरसिंगने भावना व्यक्त केली.जेएसडब्ल्यू स्पोर्टस या स्पॉन्सरद्वारे नरसिंगने आपले म्हणणे मांडले आहे. ' माझ्यावरील बंदीच्या निर्णयामुळे मी उध्वस्त झालो आहे, असे म्हणणे फारच सौम्य ठरेल. गेल्या दोन महिन्यात मला बरेच काही सोसावे लागले, मात्र असे असतानाही मी खचून गेलो नाही. देशाचा मान राखण्यासाठी लढणे आणि (ऑलिम्पिक) स्पर्धेत पदक मिळवून अभिमानाने देशाची मान उंचावणे हे एकच ध्येय समोर ठेऊन मी लढत होतो. मात्र आता माझ्या सामन्याला अवघे १२ तास उरलेले असतानाच( बंदीच्या निर्णयामुळे) देशाला पदक जिंकून देण्याचे माझे स्वप्न अतिशय निर्दयीपणे हिसकावण्यात आले आहे. पण माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मी काही करण्यास तयार आहे' असे नरसिंगने म्हटले आहे.
======================================
सुरेश प्रभूसाहेब, तुमच्यापेक्षा लालूप्रसाद यादव परवडले की हो!
- शिवसेनेमधून नरेंद्र मोदींनी तुम्हाला अक्षरश: पळवलं आणि भाजपात आणून रेल्वेमंत्री केलं तेव्हा लाखो मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्या आनंदाची तुलना परकीयांच्या राजवट जाऊन स्वकीयांची सत्ता आल्यावर नेटिव्हांना झालेल्या आनंदाशीच होऊ शकते. पण, अत्यंत खेदानं सांगावं लागतंय की, ज्याप्रमाणे काँग्रेसवर ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचारांपेक्षा, भाजपावर काँग्रेसने केलेले अत्याचार गहीरे होते ही जी काही माननीय पंतप्रधानांची भावना आहे, तीच भावना सर्वसामान्य प्रवासी मुंबईकरांची तुमच्याबाबत आहे.बदलापूरकर म्हणजे, कुणाच्या अध्यात मध्यात नसलेले आणि मुंबईच्या महागाईने शहराबाहेर हाकलले गेलेले सभ्य मध्यमवर्गीय. प्रचंड उकाड्याच्या मुंबईत दिवसभर झटावं आणि झोपायला थंड हवेच्या बदलापूरात जावं, रविवारी चिखलोली नाही तर कोंडेश्वरला पोराबाळांना घेऊन फिरावं आणि पुन्हा सोमवारी लोकल पकडून मुंबईच्या पोटात शिरावं हा शिरस्ता. अशा मवाळ बदलापूरकरांनी तुमच्या जाचाला कंटाळून तब्बल सहा तास रेल्वे रोखून धरली, हा तुमच्यासाठी बोध घेण्याचा विषय आहे.
======================================
टिटवाळ्यातील बाप्पा निघाले सातासमुद्र पल्याड
- टिटवाळा, दि. १९ - बाप्पा घरी येणार हा आनंद काही वेगळाच असतो , बाप्पांच्या या आगमनासाठी संपूर्ण घरदार तयारीला लागते. मात्र टिटवाळ्यातील भाई गोडांबे यांच्या घरून बाप्पा जाणार म्हणून सर्व घरदार आनंदले आहे , तयारीला लागले आहे. याचे कारण ही तसेच आहे. कारण यांच्याकडील बाप्पा थेट सातासमुद्र पल्याड अमेरिका, इंग्लंड व दुबईला निघाले आहेत.गणेशोत्सव आता अवघ्या पंचवीस दिवसांवर येऊन ठेवल्याने गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात लगबग वाढल्याचे चित्र सध्या गणपतीच्या कारखान्यात पहावयास मिळते.टिटवाळ्यातील सामान्य कुटुंबातील भाई गोडांबे हे 1974 पासून येथील गणपती मंदीरा मागे "आर्शीवाद कलाकेंद्र " नावाचा गणेश मूर्ती बनविण्याचा कारखाना चालवितात. या कलाकेंद्राची प्रसिद्धी ठाणे - मुंबईसह हळूहळू महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचली. त्यामुळेच येथील बाप्पांना दुबई, अमेरिका, इंग्लंडसह भारतातील हैदराबाद, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि ठाणे - मुंबई लगतच्या उपनगरात मागणी वाढली आहे.गेली 50 ते 55 वर्षांपासून हा व्यवसाय मी आपल्या परिवारासह करित असल्याचे गोडांबे यांनी सांगितले. श्रीकृष्ण, विष्णू, स्वामी समर्थ, छत्रपती शिवराय, शंकर भगवान, टिटवाळ्यातील सिध्दिविनायक आधी गणेश मुर्तीसह मराठमोळ्या थाटातील फेटा घातलेली व दागिन्यांनी मढविलेल्या मूर्त्या या ठिकाणी पहायला मिळतात. केवळ फोटो पाहून हुबेहुब श्रींच्या (गणेशाच्या ) मूर्ती तयार करणे हीदेखील एक कारागीरांच्या कलेतील खासियत असल्याने भारतासह परदेशातूनदेखील येथील मूर्तीना सतत मागणी आहे.पाच ते सहा इंचापासून ते एक दीड फूट उंचीच्या मूर्ती परदेशी पाठविल्या जातात. अमेरिका व इतर ठिकाणी भारतीय लोक वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणी त्यांचे अखिल भारतीय महाराष्ट्रीय मंडळ आहे. त्याच नावाने मूर्ती बुकिंग करुन अमेरिका, दुबई व इतर ठिकाणी पोहचविल्या जातात. हजार अकराशे रुपयांनी खरेदी केलेली मूर्ती परदेशी पोहचेपर्यंत तिची किंमत चार ते पाच हजार रूपयांपर्यत जाते. यंदा साडेतीनशे ते चारशेच्या आसपास मूर्ती परदेशी गेल्याचे महेंद्र गोडांबे यांनी सांगितले.
======================================
मुंबई : आ. विष्णू वाघ यांची प्रकृती चिंताजनक
- मुंबई, दि. १९ - सांत आंद्रे मतदारसंघाचे भाजपचे आमदार, नामवंत साहित्यिक, फर्डे वक्ते तथा उपसभापती विष्णू वाघ यांची प्रकृती चिंताजनक आहे. वाघ यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली असून मेंदूचे कार्यान्विकरण पूर्ववत होणे गरजेचे असल्याने त्यांना गोव्याहून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत.छातीत दुखू लागल्याने वाघ यांना सोमवारी हे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) दाखल करण्यात आले होते. इस्पितळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आठ मिनिटे त्यांचे हृदय बंद पडले होते. गोमेकॉतील डॉक्टरांनी प्रयत्न करून हृदय कार्यान्वित केले. त्यांच्या मूत्रपिंडाचे कार्यही मंदावले होते. तथापि, गेल्या तीन दिवसांत त्यांचे हृदय व मूत्रपिंड कार्यान्वित झाले; पण मेंदू कार्यान्वित झाला नाही. त्यामुळे वाघ यांना मुंबईतील हिंदुजा इस्पितळात हलविण्यात आले.
======================================
‘सुवर्ण’खेळीसाठी सिंधूला देशभरातून शुभेच्छा, सामन्याची वेळ बदलली
रिओ दी जनैरो : रिओ ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूने भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं आहे. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-10 असा धुव्वा उडवून बॅडमिंटनमधल्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारली. संध्याकाळी साडेसात वाजता होणारा सामना आता संध्याकाळी 6.55 वाजता होणार आहे.
सिंधूच्या या कामगिरीमुळं रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आता एक सुवर्ण किंवा एक रौप्यपदक जमा होणार, हे आता निश्चित झालं आहे. त्यामुळं ऑलिम्पिकच्या इतिहासात पदक जिंकणारी सिंधू ही भारताची दुसरी बॅडमिंटनपटू ठरेल.
2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालनं कांस्यपदकाची कमाई केली होती. दरम्यान, महिला एकेरीच्या फायनलमध्ये सिंधूचा मुकाबला स्पेनच्या कॅरोलिना मरिनशी होईल. मरिननं चीनच्या ली शुरेईला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
======================================
सरावासाठी दररोज 56 किमी प्रवास, पीव्ही सिंधूच्या जिद्दीची कहाणी
मुंबई : पीव्ही सिंधूने आज भारतीय बॅडमिंटनला नव्या शिखरावर नेलं आहे. अपार कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरच सिंधू आज ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचू शकली. जाणून घेऊयात भारतीय बॅडमिंटनच्या या नव्या नायिकेची कहाणी….
“रिओमधून पदक घेऊनच येईन”
रिओमधून पदक घेऊनच येईन, ऑलिम्पिकला रवाना होण्याआधी पीव्ही सिंधूने आपले इरादे स्पष्ट केले होते. वयाच्या आठव्या वर्षापासून सिंधूने ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पाहिलं आणि ते आता पूर्णही केलं आहे.
व्हॉलीबॉलपटू दाम्पत्याची कन्या : पीव्ही सिंधू
पुसराला वेंकट सिंधूची आणि तिच्या आई-वडिलांची पंधरा वर्षांची तपश्चर्य़ा आज फळाला आली आहे. पीव्ही रमण आणि पी विजया या भारताच्या माजी व्हॉलीबॉलपटूंची सिंधू ही कन्या. त्यामुळं सिंधूला घरातूनच खेळाचं बाळकडू मिळालं. 2001 साली पुलेला गोपीचंदनं ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेला विजय पाहून सिंधूला बॅडमिंटन खेळण्याची प्रेरणा मिळाली.
======================================
जळगावात 'नायक'ची प्रचिती, बारावीची विद्यार्थिनी 1 दिवस सरपंचपदी!
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अनिल कपूरच्या नायक सिनेमाची प्रचिती आली. ज्याप्रमाणे नायक सिनेमात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, तसंच चिंचोली पिंपरी गावात एक मुलगी एका दिवसासाठी सरपंच झाली.
एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असताना तिकडे, जळगावमध्ये मात्र महिलांच्या सन्मानार्थ अनोखं चित्र पाहायला मिळालं.
बारावीमध्ये 90 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनीला एक दिवसासाठी थेट सरपंचपदी बसवण्यात आलं.
महिलांचा सन्मान वाढावा, म्हणून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंपरी ग्राम पंचायतीने, हा अभिनव उपक्रम राबवला.
======================================
सुट्टी नाकारणाऱ्या भगवान सहाय यांना सक्तीची रजा?
मुंबई : कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यासंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कृषी विभागातील सहसचिव राजेंद्र घाडगे यांना घरी जाण्यापासून रोखल्याने त्यांच्यावर ही कारवाई होण्याची शक्यता आहे.
कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं. भगवान सहाय यांची बदली करा किंवा आमची बदली करा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यावर दोन्ही बाजू ऐकून घेतली जाणार असून मुख्य सचिव आजच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
घाडगेंची सुट्टी नाकारली, घरी मुलाने आत्महत्या केली
राजेंद्र घाडगे यांना त्यांच्या मुलाने फोन करुन घरी बोलावलं. घाडगे यांचा मुलगा नैराश्यात होता. घरी न आल्यास आत्महत्या करण्याची धमकीही घाडगेंच्या मुलाने त्यांना दिली होती. मात्र, भगवान सहाय यांनी घाडगेंना घरी जाण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे घाडगे मुलाच्या बोलावण्यानंतरही घरी जाऊ शकले नाहीत. त्यामुळे मुलाने आत्महत्या केल्याचं समजतं आहे.
======================================
माझं स्वप्न क्रूरपणे मोडलं: नरसिंग यादव
रिओ दी जेनेरिओ: भारताचा पैलवान नरसिंग यादवचं रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न अखेर भंगलं आहे. कारण क्रीडा लवादानं नरसिंग यादववर चार वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळं नरसिंग यादव ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही.
या सर्व प्रकारानंतर पहिल्यांदाच नरसिंगची प्रतिक्रिया आली आहे. नरसिंग म्हणाला की, ‘क्रीडा लवादच्या निर्णयानं मी पूर्णपणे कोलमडून गेलो आहे. मागील दोन महिन्यापासून मी बरंच काही सहन केलं. पण देशासाठी खेळायचं या एकाच ध्येयानं मी तग धरुन होतो. पण माझ्या पहिल्या बाउटआधी अवघ्या 12 तासांपूर्वी देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं माझं स्वप्न क्रूरपणे मोडलं.
नरसिंगनं आपले प्रायोजक जेएसडब्ल्यू स्पोर्टसद्वारे याविषयी स्पष्टीकरण जारी केलं. ‘मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी मी सारं काही करेन. माझ्या हातात आता तेवढंच शिल्लक आहे.’ यासंबंधी आणखी काही पुरावे मिळाल्यास निर्णयावर समीक्षा करणारी याचिका दाखल करता येऊ शकते. असंही या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.
‘नरसिंग निर्दोष आहे आणि आम्ही त्याच्या या लढाईमध्ये त्याच्यासोबत आहोत.’ असं जेएसडब्ल्यूकडून स्पष्ट करण्यात आलं.
======================================
म्हणून चोरट्यांनी भिंतीवर लिहिलं, 'चुकीबद्दल माफ करा, सॉरी, आय लव्ह यू'
अकोला: ‘चोर’ म्हटलं की मनात येते ती तिरस्कार आणि रागाची भावना. कारण, ते तुमच्या मेहनतीच्या पैशांवर डल्ला मारत असतात. पण, चोरट्यांनीच, चोरी केलेल्या घरच्यांची माफी मागितली असेल तर….
घटना आहे अकोल्यातील. शहरातील रामनगर भागात राहणाऱ्या ए.बी. बेलखेडे यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या कांता महांकाळ यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीच पडले नाही. मग जातांना चोरट्यांनी भिंतीवर घरच्या लोकांची माफी मागणारा संदेश लिहिला. ‘चुकीबद्दल माफ करा, सॉरी, आय लव्ह यू’.
अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ
अकोल्यात सध्या चोरट्यांची अक्षरशः ‘दिवाळी’ सुरु आहे. शहरात दररोज चोरीच्या चार ते पाच घटना घडत आहेत. काल अकोल्यातील रामनगर भागात राहणाऱ्या ए.बी. बेलखेडे यांच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेची चर्चा सध्या शहरात चांगलीच सुरु आहे.
======================================
इगतपुरीत चिमुरड्याचे पुरलेले अवशेष सापडले, नरबळीचा संशय
नाशिक: इगतपुरी तालुक्यात नरबळीच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवगाव शिवारात नवजात बाळाच्या मृतदेहाचे अवशेष आढळल्यानं खळबळ उडाली आहे.
देवगाव शिवारातील वन विभागाच्या जागेत गुरांनी गवत खाताना जमीन उकरली. यादरम्यान, मृत बाळाचे अवशेष एका गुराख्याच्या नजरेला पडले. याच भागात दीड वर्षापूर्वी 4 ते 5 लोकांचा नरबळी देऊन पुरल्याचं उघड झालं होतं.
हा प्रकार लक्षात येताच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तसेच हा प्रकार नरबळीचाच आहे की नाही हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
======================================
टेमघर गळती: 'महाजनांकडून अविनाश भोसलेंना वाचवण्याचा प्रयत्न'
पुणे : टेमघर धरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आल्यानंतर, आम आदमी पक्षाने पुण्यातील इतर धरणांच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे बिल्डर अविनाश भोसलेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आप नेत्या प्रीती मेनन यांनी केला.
टेमघरसह वरसगाव आणि पवना धरणांमधून पाण्याची गळती होत असल्याचा दावा ‘आप’ने केला. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ‘आप’ने यासंदर्भात माहिती दिली.
======================================
No comments:
Post a Comment