Wednesday, 10 August 2016

नमस्कार लाईव्ह १०-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- दक्षिण चीन समुद्राच्या वादात भारतानं लुडबूड करू नये, चीनचा इशारा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- गोदामांमधील कांदा सरकार बाजारभावानं खरेदी करणार 
३- 70 खोल्या, डिजीटल लायब्ररी, वायफाय; भाजप बनवणार हायटेक मुख्यालय 
४- भोपाळ; जेव्हा पंतप्रधान मोदींचा ताफा अडवला जातो.. 
५- काश्मीरच्या मुद्द्यावर मोदी का नाही बोलत, आझाद यांचा मोदींना सवाल 
६- २.२६ कोटी करदात्यांनी भरले प्राप्तिकराचे ई-रीटर्न 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- पगारवाढ नाकारुन चमकोगिरी करणाऱ्या आमदारांचं पितळ उघड 
८- किडनी रॅकेट : हिरानंदानी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती 
९- काळ्या यादीतील ठेकेदारांची कंत्राटं अखेर मुंबई महापालिकेकडून रद्द 
१०- मुंबई विमानतळाजवळची 'ती' इमारत तोडा, हायकोर्टाचे आदेश 
११- 'आकाशवाणी पुणे'चा वृत्तविभाग तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय 
१२- खाण मुद्यावरून गोवा विधानसभेत गदारोळ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- पुणे; धुमाळविरुद्ध आणखी एका बिल्डरची तक्रार, रश्मी शुक्लांची गुपचिळी 
१४- आर्ची आणि परशाला घर देणाऱ्या सुमन आक्काला म्हाडाचं घर 
१५- अलपुझा; खा. ज्योतिरादित्य शिंदेंच्या वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू 
१६- तरुणांनी लोकलखाली आत्महत्या करणाऱ्या महिलेला वाचवलं 
१७- किडनी रॅकेट - हिरानंदानी हॉस्पिटलच्या ५ डॉक्टरांना पोलिस कोठडी 
१८- सावित्री पूल दुर्घटना - बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक प्रशासनावर नाराज 
१९- महिला खासदारावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल 
२०- दलित अल्पवयीन मुलीला पुजाऱ्याकडून मारहाण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- राखी सावंतच्या आंगोपांग झळकले मोदी 
२२- तुमचा सेल्फी आता पोस्टाच्या तिकिटावर 
२३- सलमानचा 'सुलतान' तीनशे कोटींच्या पुढे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=========================================

पगारवाढ नाकारुन चमकोगिरी करणाऱ्या आमदारांचं पितळ उघड

पगारवाढ नाकारुन चमकोगिरी करणाऱ्या आमदारांचं पितळ उघड
मुंबई : पगारवाढ म्हटलं की आता आमदारांच्या अंगावर काटा येऊ लागला आहे. कारण शेतकरी, बेरोजगार तरुण, विनाअनुदानित शिक्षक, टंकलेखक दोन-चार रुपये हातात मिळावेत म्हणून झगडत आहेत. आणि दुसरीकडे नेते हजारो रुपयांची पगारवाढ घेऊन फुगू लागले आहेत. मात्र या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर नेत्यांनी पगारवाढीला नकार दिला. पण ती केवळ चमकोगिरी असल्याचं उघड झालं आहे. कारण कायद्यात पगारवाढ नाकारण्याची तरतूदच नसल्याचं समोर आलं आहे.

श्रीकांत देशपांडे, कपिल पाटील, विक्रम काळे आणि रामनाथ मोते हे आहेत महाराष्ट्रातील चमको आमदार. अधिवेशन संपायला तास उरला असताना सर्वपक्षीयांनी एकमुखानं वेतनवाढीचं विधेयक पारीत केलं.

त्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या संतापानं आमदार हादरले, आणि केवळ दिखाऊपणासाठी त्यांनी आपण वेतनवाढ नाकारत असल्याचं राणा भीमदेवी यांनी थाटात जाहीर केलं. मात्र प्रत्यक्षात आमदारांना वेतनवाढ नाकारण्याचा हक्क नसल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्र विधीमंडळ सदस्य वेतन आणि भत्ते कायदा 1956 प्रमाणे आमदारांना वेतन आणि भत्ते मिळतात. वेतनवाढ आधी मंत्रिमंडळात नंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारीत होते आणि राज्यपालांच्या सहीनं कायद्यात रुपांतरीत होते. अर्थात कायदा सर्वांसाठी लागू होतो, त्यामुळे वेतन आणि भत्त्यांमध्ये असमानता करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक आमदाराच्या खात्यात कायद्यानुसार वेतनवाढीनुसार पैसे जमा होणार यात शंका नाही.

=========================================

किडनी रॅकेट : हिरानंदानी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती

किडनी रॅकेट : हिरानंदानी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती
मुंबई : किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयाला राज्य सरकारने दणका दिला आहे. या रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती देण्यात आली आहे.

दरम्यान, हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेट प्रकरणात आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे. आज या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अटक केलेल्यांमध्ये रुग्णालयाच्या सीईओंसह वैद्यकीय संचालकाचाही समावेश आहे.

सीईओ डॉ. सुजीत चॅटर्जी, डॉ. अनुराग नाईक, मुकेश शेटे, मुकेश शाह, प्रकाश शेट्टी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.


=========================================

किडनी रॅकेट : हिरानंदानी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती

किडनी रॅकेट : हिरानंदानी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती
मुंबई : किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयाला राज्य सरकारने दणका दिला आहे. या रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती देण्यात आली आहे.

दरम्यान, हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेट प्रकरणात आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे. आज या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अटक केलेल्यांमध्ये रुग्णालयाच्या सीईओंसह वैद्यकीय संचालकाचाही समावेश आहे.

सीईओ डॉ. सुजीत चॅटर्जी, डॉ. अनुराग नाईक, मुकेश शेटे, मुकेश शाह, प्रकाश शेट्टी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

=========================================

धुमाळविरुद्ध आणखी एका बिल्डरची तक्रार, रश्मी शुक्लांची गुपचिळी

धुमाळविरुद्ध आणखी एका बिल्डरची तक्रार, रश्मी शुक्लांची गुपचिळी
पुणे : 25 लाखांची खंडणी मागूनही रश्मी शुक्ला यांच्या आशीर्वादामुळे सुशेगाद असलेल्या पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळचे नवनवे कारनामे उजेडात येऊ लागले आहेत. 2012 मध्ये धनंजय धुमाळनं एटीएसमध्ये असताना अजय चौधरी नावाच्या बिल्डरचाही पैशासाठी छळ केल्याचा आरोप आहे.

भांडारकर रस्त्यावर राहणाऱ्या चौधरींच्या घरावर अपरात्री छापा टाकून धुमाळनं तुमचे दाऊदशी संबंध आहेत, असा आरोप केला. तसंच शिवीगाळ करत पैशांची मागणी केली.  या सगळ्या प्रकाराविरोधात चौधरी यांनी न्यायालयात दाद मागितली.


त्यानंतर धुमाळवर गुन्हाही दाखल झाला होता. मात्र त्याची चौकशी झाली नाही. विशेष म्हणजे रविंद्र बऱ्हाटे यांनीही धुमाळनं आपल्याला पैशांसाठी धमकावल्याचा दावा केला आहे. एटीएसच्या कार्यालयात बोलावून धुमाळनं पैशांसाठी छळ केल्याचं बऱ्हाटेंचं म्हणणं आहे.

=========================================

आर्ची आणि परशाला घर देणाऱ्या सुमन आक्काला म्हाडाचं घर


आर्ची आणि परशाला घर देणाऱ्या सुमन आक्काला म्हाडाचं घर
मुंबई : मुंबईकरांची स्वप्नपूर्ती करणाऱ्या म्हाडाने आज 972 जणांना हक्काचं घर दिलं आहे. लॉटरीपद्धतीने भाग्यवान विजेत्या 972 जणांना मुंबईत विविध ठिकाणी घर मिळालं. यामध्ये सैराट सिनेमात आर्ची आणि परशाला हैदराबादमध्ये घर देणाऱ्या सुमन आक्कालाही म्हाडाची लॉटरी लागली आहे.

अभिनेत्री छाया कदम यांना म्हाडाचं घर लागलं आहे. कलाकार कोट्यातून त्यांना प्रतिक्षानगर, शीव परिसरात घर मिळालं आहे.

सैराट सिनेमात छाया कदम यांनी भूमिका साकारली होती. आर्ची आणि परशा जेव्हा हैदराबादला जातात, तेव्हा सुमन आक्का त्यांना राहायला घर देते. आज त्याच ‘सुमन आक्का’ला म्हाडाची लॉटरी लागली आहे.

छाया कदम यांच्याशिवाय अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांनाही म्हाडाचं घर मिळालं आहे.


=========================================

काळ्या यादीतील ठेकेदारांची कंत्राटं अखेर मुंबई महापालिकेकडून रद्द

काळ्या यादीतील ठेकेदारांची कंत्राटं अखेर मुंबई महापालिकेकडून रद्द
मुंबई : 352 कोटींचा रस्ते घोटाळा करुन मुंबईला खड्ड्यात घालणाऱ्या कंत्रादारावर मेहरबान झालेल्या पालिकेला अखेर हायकोर्टाच्या झटक्यानंतर जाग आली आहे. मुंबई पालिकेनं काळ्या यादीतील सगळ्या कंत्राटदारांची कामं आज रद्द केली आहेत.

स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यात आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्ट, जे कुमार कन्स्ट्रक्शन यांची नावं आहेत. आरपीएस इन्फ्रा आणि जे कुमारकडे हँकॉक पुलासह यारी रोड, मिठी नदी आणि विक्रोळी उड्डाणपूलाचं काम दिलं होतं. आता ही कंत्राटं रद्द झाल्यामुळे नव्यानं निविदा काढून पुन्हा कंत्राटं बहाल करावी लागणार आहेत.

=========================================

मुंबई विमानतळाजवळची 'ती' इमारत तोडा, हायकोर्टाचे आदेश

मुंबई विमानतळाजवळची 'ती' इमारत तोडा, हायकोर्टाचे आदेश
मुंबई : मुंबई विमानतळाजवळ असलेली सायली कंस्ट्रक्शन ही इमारत विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगमध्ये अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे ती इमारत तोडून टाकण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

इमारत तोडून विकासकाविरोधात 48 तासांत एफआयआर दाखल करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. यापूर्वी या विकासकावर कारवाई करण्याबाबत स्थगितीचे आदेश हायकोर्टाने दिले होते. पण आता कोर्टानं स्थगितीचे आदेश मागे घेतल्याने या इमारतीवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

विमानतळाच्या परिसरात उंच इमारतींमुळे विमानसेवेत बाधा येत असल्याने त्यावर कारवाई करण्याबाबत नागरी हवाई वाहतूक प्राधिकरण आणि मुंबई विमानतळ प्राधिकरणानं अशा विकासकांना 2012 पासून 100 पेक्षा जास्त नोटीसेस पाठवल्या आहेत. मात्र नेमकी काय कारवाई केलीत हे स्पष्ट करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे.

=========================================

खा. ज्योतिरादित्य शिंदेंच्या वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

खा. ज्योतिरादित्य शिंदेंच्या वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
अलपुझा : काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे असलेल्या एका वाहनाने वृद्धाला धडक दिल्याचं वृत्त आहे. या धडकेत 65 वर्षीय दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर कोची-अल्लपुझा पट्ट्यातील पुथियाकावू या परिसरात हा अपघात झाला. शिंदे दिल्लीहून कोचीला विमानतळावर उतरले. त्यानंतर चर्थालामध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ते निघाले होते. अपघातावेळी शिंदेंसोबत गाडीत तीन काँग्रेस कार्यकर्ते होते, तर चालक गाडी चालवत होता.

अपघातानंतर ज्योतिरादित्य यांनी ट्वीट करुन शोक व्यक्त केला आहे. ‘हादरुन गेलो… कोचीन आणि अलेप्पी दरम्यान दुर्दैवी अपघात. रुग्णालयात नेण्याची तात्काळ व्यवस्था केली. पीडित कुटुंबाच्या भेटीला जात आहे’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

=========================================

गोदामांमधील कांदा सरकार बाजारभावानं खरेदी करणार

गोदामांमधील कांदा सरकार बाजारभावानं खरेदी करणार
मुंबई : कांदाप्रश्नावर नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे गोदामांमध्ये पडून राहिलेला कांदा केंद्र आणि राज्य सरकार 50-50 टक्के बाजारभावाप्रमाणे खरेदी करणार आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी ही माहिती दिली.

आज कृषीमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आणि इतर नेत्यांमध्ये आज दिल्लीत बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, सरकारने हा निर्णय जरी घेतला असला तरीही बहुतांश तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा आता सडायला लागला आहे. त्यातचं आडतबंदीमुळे झालेला संप आणि पावसाच्या फटक्यामुळे कांद्याचा बाजारभावही उतरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा किती फायदा होतो, हे पहावं लागणार आहे.

=========================================

तरुणांनी लोकलखाली आत्महत्या करणाऱ्या महिलेला वाचवलं

तरुणांनी लोकलखाली आत्महत्या करणाऱ्या महिलेला वाचवलं
मुंबईः किरकोळ कारणाने झालेल्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला दोन कॉलेज युवकांनी सुखरुप वाचवलं. विक्रोळी रेल्वेस्थानकात काल दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली.


नाझीया सय्यद ही महिला काल प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या रुळावरुन पायी चालत येत होती. याचवेळी समोरुन गाडी येत असल्याचं पाहूनही नाझीया रुळावरुन हटली नाही. हा प्रकार सुरु असताना स्टेशनवरच्या महिलांनी तिला हटवण्याचा प्रयत्न केला.


महिला पोलिस सुमित्रा पडवी आणि दोन कॉलेज युवकांनी रुळांवर उतरुन नाझीयाला गाडीच्या समोरुन ओढलं आणि तिचा जीव वाचवला. नाझीयाचा 15 दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. त्यातचं आईसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन नाझीयाने हे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. पण पोलिस आणि कॉलेज युवकांच्या प्रसंगावधानामुळे हा अपघात टळला.

70 खोल्या, डिजीटल लायब्ररी, वायफाय; भाजप बनवणार हायटेक मुख्यालय

70 खोल्या, डिजीटल लायब्ररी, वायफाय; भाजप बनवणार हायटेक मुख्यालय
नवी दिल्ली : दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय मार्गावर भाजपचं नवीन मुख्यालय उभारलं जाणार आहे. 18 ऑगस्ट रोजी एका भव्य कार्यक्रमात मुख्यालयाचं भूमीपूजन केले जाणार आहे.

नितीन गडकरी यांनी या मुख्यालयाचा प्रस्ताव मांडला होता. या मुख्यालयासाठी दोन वेळा आराखडा बनवण्यात आला आहे. पण पक्षाच्या कार्यकारणीला हे दोन्ही आराखडे पसंतीस उतरले नव्हते. आता नवीन बनवलेल्या आराखड्याला पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला आहे.

दीनदयाळ मार्गावरील या भाजप मुख्यालयात 70 खोल्या असतील. या मुख्यालयाला दोन विंग असतील. मुख्यालयात पक्षाध्यक्ष, नेते आणि खासदारांसाठी विशेष कक्ष असेल. 8000 चौरस मीटरवर या दोन इमारती उभारल्या जाणार आहेत. याशिवाय 2 सभागृहही असतील, ज्यांची आसन क्षमता 450 असेल. आठ कॉन्फरन्स रुम्सही या मुख्यालयात असतील, ज्यात व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधाही दिली जाईल.

=========================================

जेव्हा पंतप्रधान मोदींचा ताफा अडवला जातो..


जेव्हा पंतप्रधान मोदींचा ताफा अडवला जातो..
भोपाळः पंतप्रधान मोदी यांनी क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावी ’70 साल आझादी, याद करो कुर्बानी’ कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी चंद्रशेखर आझाद यांच्या स्मारकाकडे जाताना मुस्लीम बहुल भागात मोदींचा ताफा अचानक अडवण्यात आला आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणांचा नारा सुरु झाला.


मोदींच्या नाऱ्याने परिसर दुमदुमला होता. जमावाची गर्दी पाहता मोदींच्या ताफ्यातील अधिकाऱ्यांनी जमावाला हटवण्याचे प्रयत्न केले. या घोषणांनी मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेचे कान चांगलेच टवकारले.  मात्र जमावाला वेळीच हटवण्यात आलं.


मोदींनी देखील आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची इच्छा पूर्ण केली. ताफा थांबताच गाडीतून उतरुन लोकांची प्रत्यक्ष भेट घेतली. दरम्यान अचानक जमाव रस्त्यावर आल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं होतं.

=========================================

'आकाशवाणी पुणे'चा वृत्तविभाग तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय

'आकाशवाणी पुणे'चा वृत्तविभाग तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय
पुणे/नवी दिल्ली : केंद्रीय माहिती-प्रसारण खात्याने आकाशवाणी पुणेचा प्रादेशिक वृत्तविभाग तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साहजिकच पुणेकरांमध्ये या निर्णयाविरोधात संतापाची लाट आहे.

मनसेनेही या निर्णयाविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. आश्चर्य म्हणजे पुणे आकाशवाणीच्या वृत्तविभागातील केवळ दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे हा बंदीचा घाट घातल्याचं समजतं.

पुणे आकाशवाणीचा वृत्तविभाग हा राज्यातील सर्वात जुना आणि मोठा विभाग आहे. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी काम करुन आकाशवाणीच्या बातमीपत्राची परंपराही जोपासली आहे.

आकाशवाणीवर सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी लागणाऱ्या प्रादेशिक बातम्या आजही खेड्यापाड्यात ऐकल्या जातात. हे बातमीपत्र पुणे आकाशवाणीच्या वृत्तविभागाद्वारेच तयार केलं जातं. त्यामुळे इतका मोठा वृत्तविभाग बंद करण्याआधी त्यावर साधी चर्चाही न झाल्याने अनेकांना हा निर्णय बुचकळ्यात टाकणारा आहे.

=========================================

No comments: