*[अंतरराष्ट्रीय]*
1- भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण करारावर स्वाक्षरी
2- पर्युषण पर्वानिमित्त ओबामांकडून शुभेच्छा
3- भारत-अमेरिकेच्या भागिदारीवरून चीन-पाकला पोटशूळ
4- भूमध्य सागरातून दोन जुळ्यांसह 6500 शरणार्थींची सुटका
5- अमेरिकेला वापरता येणार भारतीय नौदलाचे तळ
6- लिट्टेचा नेता प्रभाकरन जिवंत असू शकतो?
7- इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
8- इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली
9- पुण्यात तयार होणार फियाटची ‘जीप’
10- ‘मोबिविक’चे ‘मोअर दॅन अ वॉलेट’
11- रतन टाटा, नीलकेणी आले एकत्र
12- सेवा, भरती नियमांत बदल करण्याचा आदेश
13- टॅक्सीचालक देऊ शकतात सूट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
14- जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र
15- ‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश
16- राज्यातील २३ लाख वाहने बंद
17- चौदा प्रकल्पांच्या निविदा रद्द
18- कायम विनाअनुदानित शाळांना दिलासा
19- जीएसटी आणणा-या सरकारांचा दारुण पराभव झाला - उद्धव ठाकरे
20- जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र
21- सेनेचे ‘थीम पार्क’ बारगळले?
22- नागरी समस्यांबाबत नगरसेवक उदासीनच
23- पश्चिम रेल्वेच्या सेवेत १४ नव्या लोकल फेऱ्या
24- सहा महिन्यांत १0२ दुचाकीस्वार ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
25- हैदराबादमध्ये पावसाचा कहर, चौघांचा मृत्यू
26- ठाणे : महिलेकडे बॉडी मसाजची मागणी करत छळणा-याची तुुरूंगात रवानगी
27- आज रिक्षांचा एकदिवसीय संप, प्रवाशांचे मोठे हाल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
28- ‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश
29- १०० वर्षांच्या आजीने मिळविले सुवर्णपदक!
30- मल्ल योगेश्वर दत्तच्या पदकाचा रंग बदलणार!
31- जोकोविच, नदाल दुसऱ्या फेरीत
32- बोपन्ना-पेस पुन्हा एकत्र खेळणार
33- असे काही झालेच नव्हते....
34- इंग्लंडचा ४४४ धावांचा विक्रम,पाकिस्तानचा १६९ धावांनी पराभव
35- किरण भगतकडून काका पंजाबी झोळी डावावर चितपट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
======================================
1- भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण करारावर स्वाक्षरी
2- पर्युषण पर्वानिमित्त ओबामांकडून शुभेच्छा
3- भारत-अमेरिकेच्या भागिदारीवरून चीन-पाकला पोटशूळ
4- भूमध्य सागरातून दोन जुळ्यांसह 6500 शरणार्थींची सुटका
5- अमेरिकेला वापरता येणार भारतीय नौदलाचे तळ
6- लिट्टेचा नेता प्रभाकरन जिवंत असू शकतो?
7- इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
8- इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली
9- पुण्यात तयार होणार फियाटची ‘जीप’
10- ‘मोबिविक’चे ‘मोअर दॅन अ वॉलेट’
11- रतन टाटा, नीलकेणी आले एकत्र
12- सेवा, भरती नियमांत बदल करण्याचा आदेश
13- टॅक्सीचालक देऊ शकतात सूट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
14- जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र
15- ‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश
16- राज्यातील २३ लाख वाहने बंद
17- चौदा प्रकल्पांच्या निविदा रद्द
18- कायम विनाअनुदानित शाळांना दिलासा
19- जीएसटी आणणा-या सरकारांचा दारुण पराभव झाला - उद्धव ठाकरे
20- जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र
21- सेनेचे ‘थीम पार्क’ बारगळले?
22- नागरी समस्यांबाबत नगरसेवक उदासीनच
23- पश्चिम रेल्वेच्या सेवेत १४ नव्या लोकल फेऱ्या
24- सहा महिन्यांत १0२ दुचाकीस्वार ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
25- हैदराबादमध्ये पावसाचा कहर, चौघांचा मृत्यू
26- ठाणे : महिलेकडे बॉडी मसाजची मागणी करत छळणा-याची तुुरूंगात रवानगी
27- आज रिक्षांचा एकदिवसीय संप, प्रवाशांचे मोठे हाल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
28- ‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश
29- १०० वर्षांच्या आजीने मिळविले सुवर्णपदक!
30- मल्ल योगेश्वर दत्तच्या पदकाचा रंग बदलणार!
31- जोकोविच, नदाल दुसऱ्या फेरीत
32- बोपन्ना-पेस पुन्हा एकत्र खेळणार
33- असे काही झालेच नव्हते....
34- इंग्लंडचा ४४४ धावांचा विक्रम,पाकिस्तानचा १६९ धावांनी पराभव
35- किरण भगतकडून काका पंजाबी झोळी डावावर चितपट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
======================================
आज रिक्षांचा एकदिवसीय संप, प्रवाशांचे मोठे हाल
- मुंबई : ओला, उबेर यासह अॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे, अवैध वाहतुकीवर बंदी आणावी आणि तीन वर्षे झालेल्या लायसन्सधारक रिक्षाचालकांना बॅज देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईतील आॅटोरिक्षा चालकांनी बुधवारी संप पुकारला असून त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. आॅटोरिक्षा चालक व टॅक्सीमेन्स युनिअनने आज पुकारलेल्या संपात मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरांतील मिळून १ लाखांहून अधिक रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सातारा, लातूर, नांदेड येथे रिक्षा बंद ठेवतानाच चालकांकडून निदर्शनेही करण्यात येणार आहेत.दरम्यान संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रशासनाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. जास्तीच्या बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत.ओला, उबेरसह खासगी टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत या मागणीसाठी २९ आॅगस्टपासून जय भगवान महासंघ आणि स्वाभिमान टॅक्सी युनियनकडून बेमुदत संपाची हाक देण्यात आली होती. मात्र १ सप्टेंबर रोजी परिवहनमंत्री यांनी चर्चेसाठी बोलावल्याने टॅक्सी संप मागे घेण्यात आला. मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून मात्र आपल्या विविध मागण्यांसाठी ३१ आॅगस्ट रोजी संपाची हाक दिली होती. याबाबत युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की, मुंबईत पूर्णपणे रिक्षा बंद ठेवल्या जातील. त्याचबरोबर पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथेही परिणाम जाणवेल. तर अन्य शहरांत निदर्शने केली जातील. आमच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार न केल्यास गणेशोत्सवानंतर बेमुदत संप पुकारू. मागण्यांचे निवेदन बुधवारी दुपारी परिवहन आयुक्त यांना सादर केले जाईल, असे राव म्हणाले. मुंबईत होणाऱ्या संपात १ लाख ४ हजार रिक्षा सामील होतील. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवली आहे. मालवाहू वाहने तसेच इतर प्रवासी वाहने जसे बस व इत्यादीमधून बंद कालावधीत प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. बेस्ट आणि एसटी महामंडळाच्या बसही आवश्यकतेनुसार प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.
======================================
इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली
- ऑनलाइन लोकमतटेंटब्रीज, दि. ३१ - इंग्लंडने काल पाकिस्तान विरुद्ध नॉटिंगहॅम येथे झालेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करुन ४४४ धावांचा नवा विश्वविक्रम नोंदवला. पाकिस्तानचा भेदक गोलंदाज वाहाब रियाझची इंग्लिश फलंदाजांनी अक्षरक्ष: पिसे काढली.भारतीय क्रिकेटपटूंनीही पाकिस्तानच्या या कामगिरीची टि्वटरवरुन चांगलीच फिरकी घेतली. इंग्लंडवाले रियाझ करुन करुन पाकिस्तानची वाजवत आहेत असे टि्वट भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने केले. वाहाब रियाझने १० षटकात ११० धावा मोजल्या. नेटीझन्सनीही पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.
======================================
ठाणे : महिलेकडे बॉडी मसाजची मागणी करत छळणा-याची तुुरूंगात रवानगी
- ऑनलाइन लोकमतठाणे, दि. ३१ - महिलेला वारंवार फोन करून तिच्याकडे बॉडी मसाजची मागणी करत तिला त्रास देणा-या महाभागाला पोलिसांनी हिसका दाखवत तुरूंगवारी घडवली आहे. ठाण्यातील कोपरी भागात ही घटना घडली आहे. गुजरातमधील सिल्व्हासा येथे एका खासगी कंपनीत काम करणा-या अंकज पांडे (वय २४) याने कोपरी येथे राहणा-या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला (३५) फोन करून तिच्याकडे बॉडी मसाजची मागणी केली. तुमचा नंबर ' एस्कॉर्ट' (कॉलगर्ल्स ) सर्व्हिस पुरवणा-यातर्फे मिळाल्याचे सांगत त्याने त्या महिलेला बराच वेळ फोन केला. मात्र ही माहिती चुकीची असल्याचे त्या महिलेने स्पष्ट केल्यानंतरही तो तिला फोन करून त्रास देत राहिला. अखेर तिने त्याचा नंबर ब्लॉक करून टाकला.मात्र त्यानंतरही पांडे याने वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत त्या महिलेला त्रास देणे सुरूच ठेवले. एके दिवशी त्याने त्या महिलेला कोपरी येथील १२ बंगला भागात भेटण्यास बोलावले. त्रस्त झालेल्या महिलेने सर्व कॉल रेकॉर्ड करून कोपरी पोलिसांकडे तक्रार नोंदवत ते पुरावे त्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिस व सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी सापळा रचत त्या नराधमाला १२ बंगला भागात रंगेहाथ पकडले. व पोलिसांनी त्याची रवानगी तुरूंगात करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
======================================
हैदराबादमध्ये पावसाचा कहर, चौघांचा मृत्यू
- - ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 31 - मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे चौघांचा मृत्यू झाला असून यामधील तिघांचा मृत्यू भिंत कोसळल्याने झाला आहे. मुशीराबादमध्ये ही घटना घडली. ठिकठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने कर्मचा-यांना कार्यालयात एक तास उशिरा पोहोचण्याची मुभादेखील दिली होती.रायलसीमा आणि आंध्रप्रदेशच्या किनारी भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हैदराबाद महापालिका आयुक्त जनार्दन रेड्डी यांनी महापालिका कर्मचारी आणि आणीबाणी पथक वगळता इतर नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आयुक्त मुख्य सचिवांची भेट घेणार आहेत.
======================================
जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र
जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र
- योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमतविद्यार्थ्यांच्या कोवळ्या हळूवार मनाची तितक्याच कोमलपणे दखल घेणाऱ्या माननीय शिक्षणमंत्र्यांनी आणखी एक स्तुत्य उपक्रम राबवणार असल्याचे जाहीर केले आहे. मूल जन्माला आलं की महापालिकेच्या जन्मदाखल्यासोबतच, मुलाच्या 16व्या वाढदिवसाच्या तारखेचं दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.जुलै-ऑगस्ट, २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत तीन किंवा तीन पेक्षा अधिक विषयात अनूत्तीर्ण विद्यार्थी हे कौशल्य विकास सेतू कार्यक्रमासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकही गुणपत्रिकेवर नापास हा शिक्का राहणार नाही, असे शिक्षणमंत्र्यांनी मंगळवारी घोषित केले.त्यानंतर अनौपचारीक वार्तालाप करताना शिक्षणमंत्र्यांनी यापुढचं पाऊल आणखी दमदार असल्याचे सूचित केले. दहावीला नापास होणार नाही याची तर हमी मिळाली, परंतु दहावीपर्यंत पोहोचू का? शाळेत जायला जमेल का? गेलोच आणि सैराट होत आर्ची-परश्या झालो तर शैक्षणिक नुकसान होईल का? हे आणि असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर, पुढील काळात येण्याची शक्यता आहे. या अडचणींचा विचार करून जन्मदाखल्यासोबतच दहावीचं प्रमाणपत्र दिलं, तर विद्यार्थी अत्यंत निर्धोकपणे त्यांचं बालजीवन कृष्णलीला करत रमतगमत घालवू शकतील असा यामागचा विचार आहे.यावरच न थांबता, शिक्षणमंत्री देशभरातल्या विविध विद्यापीठांशी आणि कंपन्यांशी टाय अप करण्याचा प्रयत्न करत असून पदवीचं शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण व कँपस इंटरव्यूची सोय मुलाच्या जन्माच्यावेळीच करता येईल का याची चाचपणी करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तंत्रज्ञानाच्या वापराचा मंत्र त्यासाठी उपयोगाला येईल असा शिक्षणमंत्र्यांना विश्वास आहे. उगाच शैक्षणिक अभ्यासक्रमाचे उंबरठे झिजवण्यापेक्षा मुलाची डीएनए टेस्ट करून तो मोठेपणी कोण होईल हे ठरवता येणं आणि त्या अनुषंगानं पदव्या व नोकरीचं वाटपही जन्मदाखल्यासोबतच करता येईल अशी त्यांची अटकळ आहे.संपूर्ण महाराष्ट्राला शहाणं करून सोडणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा आदर्श शिक्षणमंत्र्यांच्या डोळ्यासमोर आहेच. विश्वाचं सार सांगणारी ज्ञानेश्वरी लिहून अवघ्या सोळाव्या वर्षी समाधी घेणाऱ्या ज्ञानेश्वरांना डिग्रीची अडचण भासली नाही, तर आपल्याला का भासावी असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला असून, हा विषय याच टर्ममध्ये मार्गी लावण्याचा निर्धार केला आहे.
======================================
‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश
- सैराट चित्रपटाची कथा ‘बोभाटा’ या कादंबरीवरून चोरल्याप्रकरणी पनवेल न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. नवनाथ माने यांनी २०१०मध्ये ही कादंबरी लिहिली होती. या प्रकरणी माने यांनी पनवेल न्यायालयात धाव घेतली होती. कादंबरीची कथा चोरल्याप्रकरणी न्यायालयाने कामोठे पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.कोट्यवधींचा गल्ला जमवणारा हा चित्रपट व त्यामधील कलाकार रातोरात प्रसिद्ध झाले. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या कादंबरीतील कथेत थोडाफार बदल करून चित्रपट तयार केल्याचा आरोप माने यांनी केला आहे. यासंदर्भात ३० सप्टेंबरपर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश पनवेल न्यायालयाने कामोठे पोलिसांना दिले आहेत.‘बोभाटा’ कादंबरीत ग्रामीण भागातील जातीच्या भिंती, प्रेमाची कथा, यातून निर्माण होणारा संघर्ष याचे वर्णन करण्यात आलेआहे.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनीदेखील कादंबरीचे कौतुक केले होते. कादंबरीवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी खुद्द माने यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र नागराज मंजुळे यांनी ही कथा चोरल्याने माने यांचे स्वप्न भंगले असल्याची माहिती त्यांचे वकील अभिषेक येंडे यांनी दिली.
======================================
No comments:
Post a Comment